आत्ताच मला ईमेल ने आलेल्या ह्या लिंक्स पाहिल्या….आणि धक्काच बसला. पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्यावर्चा परामर्ष घेण्यात आला आहे. त्यात ज्या दोन व्यक्तिंच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत त्यापैकी एकाने सदर हल्ला भारतीय लष्करानेच केलेला आहे आणि पाकिस्तानवर उगाचच आरोप केला जात आहे असा जावईशोध लावला आहे. दुसर्या व्यक्तिने तर हल्ला भारतात झाला आहे; भारतात स्वत:च्या इतक्या बंडखोर चळवळी चालू असताना पाकिस्तानवर आरोप करताना भारताने विचार करायला हवा. शिवाय त्यांच्याकडे तसे काही पुरावे असतीलच तर त्यांनी त्यांचा ( रॉ ) ऑफिसर इथे पाठवायला हवा पुरावे घेऊन. आमच्या माणसाने तिथे का जावे ? अशी मुक्ताफळे उधळली आहेत.शिवाय पहिल्या विडीयोत श्री. राम जेठमलानी सारख्या माणसाचे, ’ पाकिस्तान याला जबाबदार नसल्याचे’ वक्तव्यही आहे.
हे पाहून संतापाची एक तिडीक गेली. काय खरं आणि काय खोटं हा भाग वेगळा पण पाकिस्तान स्वत:ही दहशतवादाशी झुंज देत असताना अशी बेताल भाषा त्यांच्या सिक्युरीटी एक्सपर्ट जायद हमीद ने वापरावी ? ज्या उर्मट पद्धतीने तो आणि दुसर्या मुलाखतील्या बाईने वक्तव्य केली आहेत ते पाहून असेच म्हणावेसे वाटते की ’सौ चुहे खाके बिल्ली हज को चली'
पाकिस्तानने भारतीयांवर केलेली चिखलफेक
गाभा:
प्रतिक्रिया
6 Dec 2008 - 1:21 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या विषयावरचा हा तिसरा धागा सुरु आहे !
अधीक सांगणे न-लगे !!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
6 Dec 2008 - 2:15 pm | टारझन
नविन धागा काढा आणि जुण्याच धाग्यांची लिंक देत चला ... =))
आम्ही पण प्रतिसादांच्या लिंक्स देउ
- टारझन
6 Dec 2008 - 2:15 pm | टारझन
नविन धागा काढा आणि जुण्याच धाग्यांची लिंक देत चला ... =))
आम्ही पण प्रतिसादांच्या लिंक्स देउ
- टारझन