परदेशवारी-२

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
16 Feb 2022 - 8:48 pm

दुर राहाणाऱ्या लोकांचा "भावनिक भागांक"(Emotional quotient) हा जवळपास राहाणाऱ्या लोकां पेक्षा जास्त आसतो.हा सैन्यातला स्वानुभव, कायमच घरापासून दूर,वर्षातून एकदाच काय ते सुट्टीवर जायचे, त्यामुळेच दूर राहणार्‍या मुलांना काय वाटत असेल याची जाणीव ठेवूनच सामानाचे नियोजन केले होते. शिकागोला पोहोचल्या नंतर सकाळपासून मुलांच्या मीत्र मैत्रिणीचे फोनवर फोन, 'आले का आई बाबा?फ्लाईट वेळेवर आली ना!" वगैरे.
बरोबरच आम्ही आल्याशिवाय सुटकेस उघडाल तर बघुन घेऊ आशी प्रेमळ धमकी पण देत होते. करोनामुळे नाईलाजास्तव एक आठवडाभर थांबावेच लागले. घरातच क्वारटाइन होतो. प्रत्येकजण सात दिवस संपायची अतुरतेने वाट पहात होते ,शेवटी शुक्रवार आलाच, TGIF. शुक्रवार संध्याकाळ पासून विकेण्ड सेलिब्रेशनची सुरुवात होते.कुणी बाहेर तर कुणी आपल्याच बॅकयार्ड मधे पार्टीचे आयोजन करतात. म्युझिक, बाॅनफायर, बारबिक्यू आणि बार आसा सगळा ताम झाम. पाच दिवसात आलेला कामाचा शीण विसरणे आणी आयुष्य मजेत जगणे एकमेव उद्देश.तद्वत आम्ही पण एक गेट टुगेदर आयोजित केले. सगळेच पुणे किंवा आसपासच्या परिसरातील पण भाषा वेगळी, मराठी,तामीळ,तेलगू, मल्याळम,प॔जाबी आसा एक छोटा भारतच जमा झाल्यासारखा वाटत होता.सौ.नी बनवलेले घरगुती जेवण कधी फस्त झाले कळलेच नाही. कुणा कुणाच्या घरून आणलेली पाकिटे,पार्सले लगेचच उघडली गेली.आम्ही पण प्रत्येका साठी काहितरी नेले होते.मुलांच्या चेहऱ्यावर जणू आपलेच आईवडील भेटल्याचा आनंद स्पष्ट दिसून येत होता.सहा महिन्यांत बर्‍याच मुली जावयाचे प्रेम मिळाले. परत येतांना जोरदार निरोप समारंभ,भेटवस्तू आसा भावनिक,सदैव आठवण राहिल असा कार्यक्रम झाला. पुन्हा लवकरच येण्याचा आग्रह केला आणी सर्वानी नमस्कार करत नाते घट्ट केले.

सात दिवस क्वारंटाइन,बाहेर जरी पडलोआसतो तरी कोणी विचारले नसते पण मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक.लाडाची लेक,पहिलीच भेट नवीन गोष्टी,कोडकौतुक, प्रवास वर्णन,लग्नाची चित्रफित यात दोन दिवस कसे गेले कळलेच नाही. नियमित व्यायामाची सवय गप्प बसू देईना.बाहेर वजा तापमान,अधून मधून बर्फवॢष्टी,पावसाचा लपंडाव चालू होता.अनोळखी शहर, कलियुगातला सर्वज्ञ ,भ्रमणध्वनी (Mobile) तारणहार मदतीला नव्हता. जो पर्यंत मोबाईल फोन करता सिमकार्ड मीळत नाही तोपर्यंत व्यायाम सायकल (Exercise Bike) वरच भागवून घ्यावे आसे ठरवले.

mi 1 व्यायमाची सयकल

करोना मुळे सर्वच व्यवहार थंडावले होते,सिमकार्ड लवकर येत नाही बघुन चुळबळ सुरू झाली. सभोवताली इतका सुंदर निसर्ग आणी घरातच कोंडून घेणे नामंजूर. स्थानिक मानचित्र आणी खाणा खुणा बघितल्यावर लक्षात आले की फिरायला जाणे एवढे काही अवघड नाही. आठ आणि नऊ मैल नावांच्या समांतर रस्त्यांना प्रतेकी एका मैलावर भेदणाऱ्या गील आणि हाॅलस्टेड या समांतर रस्त्यांच्या चौकटीत आमचे घर. परिक्रमेचा मार्ग अनुसरला तर चुकायची शक्यता नाहीच. घरातून कडाडून विरोध, चुकलात तर कोण शोधणार, खूप थंड आहे,रस्त्यावर कुणीच बोलत नाहीत, इथे शस्त्र बाळगण्यास परवानगीच लागत नाही,अनोळखी माणूस दिसला तर स्वसंरक्षणार्थ सरळ गोळी झाडू शकतात आसे अनेक प्रकारे मनोधैर्य खच्चीकरणाचा प्रयत्न चालू
होता तोवर हातमोजे,कानटोपी, काळा चष्मा,स्वेटर,जर्किनआणि अर्थातच न चालणारा मोबाईल फोन घेऊन निघणार एवढ्यात आवाज आला "जपून जा फार लांब जाऊ नका, लवकरच परत या", इती भारतीय नारी

परिक्रमा मार्ग सो. गूगल आभार mi 1 बर्फच बर्फ mi 1

निसर्ग सौन्दर्य mi 1 निसर्ग सौन्दर्य mi 1

निसर्ग सौन्दर्य mi 1 निसर्ग सौन्दर्य mi 1

रस्त्यावर खरेच कुणी नव्हते.चहूकडे बर्फाचे साम्राज्य, लांबलचक पसरलेल्या काळ्याशार रस्त्यावरील तुरळक वाहनं, तीच काय तेवढी १४४ कलमाचे उल्लंघन करत सुसाट पळत होती.एखादाच भरभर पळणारा पाढंरा ढग,निळंशार,निरभ्र आकाश,सुखावणारे ,हवेहवेसे आभासी उबदार उन कडक थंडी उगाचच किंचित कमी झाल्याचा भास करत होते.उचंच उचं आकाशाला गवसणी घालणारे हिरवेगार सुचिपर्णी,पर्णविहीन फाद्यांचे,खराटे झालेले वृक्ष ,डेरेदार पण पर्णविहीन "मॅपल" वृक्ष आणी त्यावर विसावलेले बर्फ, जणू गुढी पाडव्याच्या गुढ्याच. विजेच्या तारांवर थिजलेलं बर्फ जणू एका रांगेत बसलेले पांढरे "युरोपियन समुद्री गुल" पक्षीच वाटत होते. बर्फाच्छादित टुमदार घरे आणि चहूकडे निरव शांतता.अशा वेळेस आठवतात ते निसर्ग कवी बालकवी ठोंबरे. मला दिसलेला निसर्ग असा होता.

ऊचं उचं गुढ्यांवर
निळंशार आभाळं टेकलं होतं
घेवून शुभ्र धवल दुलई
जग स्वप्नात झोपलं होतं

बागडत होती खारूताई
मुके घुंगरू तीच्या पायी
भिरभिरती नजर तीची
फुदकत होती ठायी ठायी

थांबली होती सळसळ
पाचोळा ही शांत होता
चंचल खट्याळ निर्झर
पांढर्‍या शालीत बांधला होता

मधून तिरीप सोन्याची
डोकावून जात होती
चाळवता झोप
पुन्हा अंगाईगीत गात होती

निसर्ग सौन्दर्य mi 1 कैनेडीअन गीज चा थवा mi

आसे निसर्ग सौंदर्य बघताना भान हरपून गेलं,किती वेळ आणि किती लांब चालत आलो कळलेच नाही. कर्णकर्कश ब्रेकच्या आवाजाने भानावर आलो.एक रस्ता ओलांडून जाणाऱ्या हंस पक्षाच्या थव्याला (Canadian Gees Birds) वाचवण्या साठी ड्रायव्हरचा यशस्वी प्रयत्न.

भाकीत केल्याप्रमाणेच रस्ता चुकला आणी एक क्षण माझ्या काळजाचा ठोका पण. घरापासून बारा कि मी दुर आलो होतो. निघून दोन तास झाले होते. पुढे भोगाव्या लागणाऱ्या कर्मफळांचा आंदाज आला. जवळपास कुणास विचारायचे म्हणून आल्यापावली माघारी फिरलो. त्या दिवशीची रपेट चोवीस कि मी झाली. पुढे काय झाले याचा आदांज तुम्हीच लावा. लवकरच मोबाईल मोबाईल झाला आणी दररोजची भटकंती अविस्मरणीय अनुभव ठरली.

"जिन्हें घर अच्छा लगता था वो घर में रहे,
हमे आवारगी पसंद थी हम पूरे शहर में रहे." - रेख्ता...

पुढचे सहा महीने मात्र खुप फिरलो.गुगल पिक्सलची साथ होती.भरपूर फोटो काढले,भरभरून नविन र॔जक माहीती मिळाली. काश्मीर खोऱ्यातील आठवणींना उजळा मिळाला.

फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली की डेट्राईट शहर मोठ्ठया फार्म हाऊस सारखे आहे.मोठ्ठी नीटनेटकी कापलेली कुरणे,चहूबाजूने कातीव कुंपण झाडे (हेज), क्रिसमस झाडाच्या रांगा (ज्युनिपर) वेलवर्गीय,झुडूपवर्गीय,वृक्षवर्गीय विवीध प्रकारच्या वनस्पती,कुठे घनदाट जंगल तर जागोजागी नैसर्गिक विस्तीर्ण तळी(सध्या गोठलेली),आवती भवती बिनधास्त फिरणारी हरणे,हंस पक्षांचे थवे,जायंट खारी, चितकबरे सशे अन किडे ,गांडुळाच्या शोधात असलेले पांढरे समुद्री गुल, असं अनुपम आरस्पानी निसर्ग सौंदर्य व तुरळक मनुष्य वस्ती.जणू जंगल सफारीच.उतरत्या छपराचें,बसके बंगले आणि त्यामधून बाहेर पडलेली धुराडी. लहनपणी काढलेल्या चित्रां सारखे एका चौकोनावर त्रिकोण ठेवल्या सारखे.

||
_/\||/\__/\
|____|_|____|
‌l---------l-------l

कोपऱ्यात व्यवस्थित रचून ठेवलेला लाकडाचा ढिग.घसरगुंडी सी साॅ ची फळी,बर्माब्रिज,ट्रॅम्पोंलीन,झोका,बास्केटबॉल कोर्ट या सारखी खेळाची साधने, भाजीपाला आणि फुलबाग फुलल्याच्या खुणा,रस्त्यालगतच लेटर बाॅक्स आणी कचरा पेटी ( कारण पोस्टमन गाडीतूनच पत्र डिलीवरी करतो तर आठवाड्यातून एकदाच कचरा गाडीने उचलतात) आसे जवळपास प्रत्येक बंगल्यातील दृश्य.काही ठिकाणी चार सहा ,आठ आसे दोन मजली घरांचे समूह मोठ्या अंगणात फेर धरून उभे,बाजुलाच उतरत्या पत्र्याची शेड आणी त्यात निवांत पडलेल्या गाड्या.एक,दोन जागा दिव्यागां साठी राखीव असल्याचे निळे फलक आणी एका कोपऱ्यात सामुदायिक कचरा पेटी आशा मनुष्य वस्तीच्या खुणा.

अमेरीका-कॅनडा सीमेवरील डेट्राईट एक मेट्रो शहर,डेट्राईट नदीवरील बंदर आणी अमेरीका-कॅनडा यांना जोडणाऱ्या पुलामुळे प्रसिद्ध आहे. येथील "रिव्हर वाॅक", अ‍ॅम्बेसिडर पुल,डेट्राईट-विण्डसर महामार्ग आणी रेल्वे टनल हे मुख्य आकर्षण, याच्यावर आपण नंतर बोलूच.

तीन प्रमुख वाहन उद्योगाचे मुख्यालय, फोर्ड (१९३०), जनरल मोटर्स(१९३१), स्टेलांटिस,(१९२५,Maxwe) म्हणून मोटोसिटी किंवा मोटर सिटी असेही म्हणतात.

एके काळी ऑटो उद्योग मुळे भरभराटीला आलेल्या शहरास साठच्या दशकात उतरती कळा लागली अणि कामगाराचे पलायन सुरू झाले अणि बरीच घरे खाली, रिकामी झाली. म्हणून याला भूताचे शहर असेही म्हणतात. इथे गगनचुंबी इमारती मिशिगन विद्यापीठ भाग सोडल्यास क्वचित ठिकाणीच आढळून येतात.

आता ही भटकंती जरा जास्त दिवसाची अणि वेगळ्या प्रकारची तेव्हा वर्णन पण जरा हटके आहे.

कडक थन्डी mi 1 ह्ररणाच कळप mi 1

युरोपिएन समुद्री गील mi 1 घर वापसी mi 1

ता क..... करोनामाइ क्रिपावन्त झाल्या मुळे उशीर झाला.
पुढील भाग लवकरच..........
16 फेब्रुवारी 22

प्रतिक्रिया

कंजूस's picture

17 Feb 2022 - 1:56 am | कंजूस

फोटो आणि वर्णनं उत्तम. बरेच जातात पण थोडेच लिहितात. अधिकाधिक फिरा आणि लिहा.

छान झालाय भाग.. पुभाप्र

श्रीगणेशा's picture

17 Feb 2022 - 10:04 am | श्रीगणेशा

खूप छान. एका वेगळा दृष्टिकोन!

चौथा कोनाडा's picture

17 Feb 2022 - 12:20 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप छान लिहिलंय !
प्रचि देखिल सुंदर !
👌

डेट्रॉइट शहराचे सुरेख चित्र रंगवलंत ! वाचताना हरवून गेलो होतो.
२४ किमीची धाडसी भटकंती खरोखरच अविस्मरणीय म्हणावी लागेल. एक वेगळ्या प्रकारचा थरार !

"जिन्हें घर अच्छा लगता था वो घर में रहे,
हमे आवारगी पसंद थी हम पूरे शहर में रहे."
हे झकासच !

|| पु भा प्र ||

अनिंद्य's picture

17 Feb 2022 - 2:39 pm | अनिंद्य

झकास

कर्नलतपस्वी's picture

17 Feb 2022 - 5:40 pm | कर्नलतपस्वी

धन्यवाद, कंजूस, सुखी, श्रीगणेशा, चौथा कोनाडा आणि अनिद्या .

टर्मीनेटर's picture

17 Feb 2022 - 6:12 pm | टर्मीनेटर

वाचतोय.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे!

प्रचेतस's picture

18 Feb 2022 - 6:48 pm | प्रचेतस

भारी लिहिताय कर्नलसाहेब.
वृत्तांत आणि फोटो सुरेख. मधेच पेरलेल्या काव्यपंक्ती अगदी समर्पक.

Nitin Palkar's picture

18 Feb 2022 - 7:14 pm | Nitin Palkar

छान लिहिताय. सुरेख वर्णन, सुंदर प्रची. पुभाप्र.

गोरगावलेकर's picture

18 Feb 2022 - 9:19 pm | गोरगावलेकर

फोटो आणि काव्यपंक्तीही छान

कॅलक्यूलेटर's picture

19 Feb 2022 - 12:12 pm | कॅलक्यूलेटर

सुरेख वर्णन आणि फोटो. पण फोटोंची साईझ अजून वाढवता आली तर अजून मजा येईल.

कर्नलतपस्वी's picture

19 Feb 2022 - 1:24 pm | कर्नलतपस्वी

300X300 साईझचे चित्र आहेत किती साईझचे पाहिजे गूगल वरुन अपलोड करतोय.

कॅलक्यूलेटर's picture

19 Feb 2022 - 3:24 pm | कॅलक्यूलेटर

तसा मीही नवीनच आहे पण कंजूस काका, चौथा कोनाडा साहेब किंवा टर्मिनेटरजी तुम्हाला मदत करू शकतील.

कॅलक्यूलेटर's picture

19 Feb 2022 - 3:28 pm | कॅलक्यूलेटर

मला चौथा कोनाडा साहेबानी मदत केली होती. कंजूस काकांनी दिलेली लिंकच मी वापरतोय अजून तरी प्रत्येक वेळी.

कर्नल साब कसे झाले दोन हाथ ?
कैसा परास्त किया दुश्मनको ?

कर्नलतपस्वी's picture

19 Feb 2022 - 8:02 pm | कर्नलतपस्वी

लढवत होती पंजा
आजमावत होती जोर
पण मजबूत ज्याचा माजां
तोच कापणार होता दोर
लढवत होती पेच
टाकत होती डाव
घालत होती सह्याद्रीच्या उरावर
टिकावा चा घाव
तीन दिवस तीन रात्री
घमासान लढाई केली
खूप काढला घाम
आणी खूप दमणूक झाली
शिजत नाही डाळ बघून
मागे परत फिरली
"सिर्फ त्रिवेदी बचेगा", ही कविता धाग्यावर आहे

आलो आलो's picture

19 Feb 2022 - 9:58 pm | आलो आलो

सॅल्यूट आपको आपकी हिम्मतको .

कर्नलतपस्वी's picture

19 Feb 2022 - 8:05 pm | कर्नलतपस्वी

लढवत होती पंजा
आजमावत होती जोर
पण मजबूत ज्याचा माजां
तोच कापणार होता दोर
लढवत होती पेच
टाकत होती डाव
घालत होती सह्याद्रीच्या उरावर
टिकावा चा घाव
तीन दिवस तीन रात्री
घमासान लढाई केली
खूप काढला घाम
आणी खूप दमणूक झाली
शिजत नाही डाळ बघून
मागे परत फिरली
"सिर्फ त्रिवेदी बचेगा", ही कविता धाग्यावर आहे

कर्नलतपस्वी's picture

21 Feb 2022 - 12:41 pm | कर्नलतपस्वी

सर्व वाचकांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद ,

सरिता बांदेकर's picture

21 Feb 2022 - 2:12 pm | सरिता बांदेकर

मस्त वर्णन आणि फोटो.एकटं फिरताना आजू बाजूचं निसर्ग सौंदर्य न्याहाळताना खूप छान वाटत असेल ना?
मोबाईल आला म्हणजे गूगल मॅप वापरून नवीन रस्त्यांवरून फिरताना नवीन फोटो आणि वर्णन वाचायला मजा येणार आहे.

स्वराजित's picture

22 Feb 2022 - 2:00 pm | स्वराजित

पुढील भागाच्या प्रतीक्षेत
खुप छान लिहिता.

जुइ's picture

23 Feb 2022 - 7:36 pm | जुइ

पायी भटकंती रम्य आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

श्रीरंग_जोशी's picture

24 Feb 2022 - 9:30 am | श्रीरंग_जोशी

एकाच फेरीत २४ किमी चालणे धाडसाचे वाटले. उष्ण वातावरणाच्या तुलनेत थंड वातावरणात ते थोडे सोपे असु शकते पण अती शित तापमानात (माझ्यासाठी १ अंकी अंश फॅ) १५ मिनिटेही चालणे त्रासदायक वाटते (विशेष करुन वारे वेगाने वाहत असल्यास). तुम्ही ऐन हिवाळ्यात भारतातून येवून मिशिगनमधे इतके चालू शकता याचे खूप कौतुक वाटले.
वर्णन व फोटोज आवडले.

नका जास्त ताणू ...

कर्नलतपस्वी's picture

14 Mar 2022 - 7:28 am | कर्नलतपस्वी

बराच उशीर झालाय,
एक महिना करोनामाईचा पाहुणचार करावा लागला.
पुढे हवापालट, आलेल्या शारीरीक मानसिक थकवा, बदल म्हणून गणपतीपुळे
मग काही घरगुती समारंभ.
आपण दाखवलेल्या उत्सुकतेनेी मला आधीक बळ मिळाले, पुढचा भाग लिहीत आहे ,लवकरच टाकेन. व्यक्तिगत निरोप सुद्धा पाठवेन.धन्यवाद .

संजय पाटिल's picture

20 Aug 2023 - 11:10 am | संजय पाटिल