लतादीदी....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
6 Feb 2022 - 4:05 pm

लतादीदींच्या जाण्याने एका स्वरयुगाचा अंत झाला.

आपण आज काहीच बोलू नये. बोलताच येत नाही, अशी ही अवस्था आहे.

भावपूर्ण आदरांजली.

A

प्रतिक्रिया

गवि's picture

6 Feb 2022 - 4:12 pm | गवि

बरोबर बोललात.

लतादीदी सार्थ आयुष्य जगल्या. लोकांचं प्रेम, मानसन्मान, दीर्घायुष्य, आर्थिक स्थैर्य असं सर्व शेवटपर्यंत लाभलं. त्यांचं सोनं झालं. नेहमी हसतमुख असायच्या.

त्यांची गाणी सोबतीला राहणारच.

गामा पैलवान's picture

6 Feb 2022 - 4:28 pm | गामा पैलवान

लतादीदी गेल्याचं खरं वाटंत नाही. स्वर्ग स्वरांतून निर्माण होतो हे त्यांनी दाखवलं. सुरांना श्रद्धांजली वाहणं कसं शक्य आहे ! त्यांच्या स्वरयात्रेचं पुण्यस्मरण. __/\__
-गा.पै.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Feb 2022 - 4:35 pm | ॲबसेंट माइंडेड ...

मेरी आवाज ही पहचान है.
लतादीदींना श्रद्धांजली _/\_

तुषार काळभोर's picture

6 Feb 2022 - 4:59 pm | तुषार काळभोर

मनातलं बोललात..!

उग्रसेन's picture

6 Feb 2022 - 5:51 pm | उग्रसेन

आकाशात देव आहे का? कोणी मला विचारलं तर
मी म्हणेन मला माहिती नाही.

मी एकच सांगेन, आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. दिवस नाही, रात्र नाही असा कोणताही क्षण नाही, की लताचा स्वर कुठूनतरी कुठेतरी जात येत असतो.

- पु. ल. देशपांडे.

प्रसाद_१९८२'s picture

6 Feb 2022 - 5:58 pm | प्रसाद_१९८२
कर्नलतपस्वी's picture

6 Feb 2022 - 6:11 pm | कर्नलतपस्वी

बातमी ऐकल्यावर थोडावेळ मन सुन्न झाले, अतर्क्य ना झाले काही तरी स्विकारताना जड गेले. नकळत दोन टिपूस ही गळले. तेव्हा कळले की दिदीचे स्थान कुठे आहे. सुचले ते लिहून ठेवले.

बाकी आसवांनी सांडले

कोकिळा का गप्प झाली
माहीत नाही का रुसून गेली
कोण गाईल आता अंगाई
का संपली पुण्याई

कोण रिझवेल आता
कोण निजवेल आता
ऐकता भजन, भूपाळी
दिस उगवेल का नाही

शांत झाली वीणा
तुटल्या तंबोऱ्याच्या तारा
मनी दाटला हुंदका
शातं झाला मुरलीतला वारा

भरून आला मेघ नयनी
निशब्द अतंरगी जाहले
एवढेच पाटी माडंले
अन बाकी आसवांनी सांडले

लेखनसिमा

गानसम्राज्ञी दिदीनां सजल नयन भावपूर्ण श्रद्धांजली.

उग्रसेन's picture

6 Feb 2022 - 6:42 pm | उग्रसेन

नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाज़ ही, पहचान है
गर याद रहे

वक़्त के सितम, कम हसीं नहीं
आज हैं यहाँ, कल कहीं नहीं
वक़्त से परे अगर, मिल गये कहीं
मेरी आवाज़ ही ...

जो गुज़र गई, कल की बात थी
उम्र तो नहीं, एक रात थी
रात का सिरा अगर, फिर मिले कहीं
मेरी आवाज़ ही ...

दिन ढले जहाँ, रात पास हो
ज़िंदगी की लौ, ऊँची कर चलो
याद आये गर कभी, जी उदास हो
मेरी आवाज़ ही ...

कंजूस's picture

6 Feb 2022 - 6:31 pm | कंजूस

चिरंजीवी.

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Feb 2022 - 7:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

संगीतातील एका युगाचा अंत झाला. खरेतर जोवर त्यांची गाणी आपल्याला ऐकु येताहेत तोवर अंत म्हणता येणार नाही. पण पंचरत्नामधील पहिला हिरा गळला. _/\_

प्रचेतस's picture

6 Feb 2022 - 8:13 pm | प्रचेतस

__/\__

श्रीगणेशा's picture

6 Feb 2022 - 8:57 pm | श्रीगणेशा

भावपूर्ण सुरस्मरण _/\_

उग्रसेन's picture

6 Feb 2022 - 9:04 pm | उग्रसेन

लतादीदींना एकदा मुलाखतीत त्यांच्या इच्छेबाबत विचारले होते. त्यावेळी त्या नम्रपणे म्हणाल्या होत्या की , मी आयुष्यात कधी कोणाचे वाईट चिंतले नाही किंवा वाईट केलं नाही. गाण्याच्या माध्यमातून मी देशाची सेवा केली याबाबत अशी आठवण लोकांनी ठेवावी, असे लतादीदी यांनी म्हटलं होते. ही अपूर्ण इच्छा आता लाखो संगीतप्रेमी आणि कोट्यवधी भारतीयांना पूर्ण करावी लागणार आहे.

वामन देशमुख's picture

6 Feb 2022 - 9:24 pm | वामन देशमुख

जन पळभर म्हणतील, हाय हाय

जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!'
मी जातां राहील कार्य काय

सूर्य तळपतील चंद्र झळकतील
तारे अपुला क्रम आचरतील
असेच वारे पुढे वाहतील
होईल कांहिं का अंतराय?

मेघ वर्षतील शेतें पिकतील
गर्वानें या नद्या वाहतील
कुणा काळजी कीं न उमटतील
पुन्हा तटावर हेच पाय

सगे सोयरे डोळे पुसतील
पुन्हा आपल्या कामी लागतील
उठतील बसतील हसुनि खिदळतील
मी जातां त्यांचें काय जाय?

राम कृष्णही आले गेले
तयां विना हे जग ना अडले
कुणीं सदोदित सूतक धरिलें
मग काय अटकलें मजशिवाय?

अशा जगास्तव काय कुढावें
मोहिं कुणाच्या कां गुंतावें
हरिदूता कां विन्मुख व्हावें
कां जिरवुं नये शांतींत काय?

- भा रा तांबे

---

आयुष्याच्या उत्तरार्धात येणाऱ्या विरक्तीच्या भावनेचे यथार्थ चित्रण करणाऱ्या या गीताला आपल्या मधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

जन पळभर म्हणतील हाय हाय

उग्रसेन's picture

6 Feb 2022 - 10:14 pm | उग्रसेन

दीदी वेगळ्या रे बाबा. जबतक चाँद सूरज रहेगा दीदी आपका नाम रहेगा.

दुश्मन ना करे, दोस्त ने ओ काम किया.
उम्रभर का गम हमे इनाम दिया है.

Bhakti's picture

6 Feb 2022 - 10:19 pm | Bhakti

लहानपणी लतादीदीचे सुर ओळखयची सुरूवात गणपतीमध्ये 'गणराज रंगी नाचतो' ही गाणी सतत ऐकून झाली.ज्ञानदेव ,रामदास स्वामी व संतांच्या मधुर रचना लतादीदींच्या सुरांनी उमगल्या.'शिवकल्याण राजा'ऐकत ऐकत महाराजांची किर्ती समजली.माझ्या मुलीला एकच मराठी गाणं शिकवलं'सागरा प्राण तळमळला'!
माधुरीच्या दिल तो पागल,मायन मायन,ये मौसम का जादू आणि असंख्य गाणी ऐकताना ताज तवान व्हायला होतं.
Lock डाऊन मध्ये गाण्याचा छंद लागला होता, लतादीदींची गाणी गाताना खुप ऐकायचे , तेव्हा आता कुठे लता नावाची जादू समजायला लागली होती.
त्यांचं ' न जाने क्यु होता है जिंदगी के साथ 'गाण खुपचं भावल.
आज असंच वाटतय,

वही है डगर
वही है सफ़र, है नहीं
साथ मेरे मगर, अब मेरा हमसफ़र
ढूँढे नज़र न जाने क्यूँ, वही है डगर
कहाँ गईं शामें मदभरी
वो मेरे, मेरे वो दिन गये किधर
न जाने क्यूँ, होता है ये ज़िंदगी के साथ

...
न जाने क्यु होता है ये जिंदगी के साथ
लतादीदींकडून काय शिकले तर ,याची जन्मी एक सुर तपस्विनी पाहिली.तपश्चर्या म्हणजे काय याचा अर्थ समजला_/\_

उग्रसेन's picture

7 Feb 2022 - 12:24 am | उग्रसेन

आता विसाव्याचे क्षण.

आता विसांव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी, सुखे गोवीत ओवीत त्यांची ओढितों स्मरणी.

काय सांगावें नवल ! दूर रानींचीं पाखरें ओल्या अंगणी नाचतां होती माझींच नातरें.

कधीं होती डोळे ओले, मन मानसाची तळी, माझे पैलांतले हंस डोल घेती त्याच्या जळीं.

कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली आश्वासती, "येत्या जन्मीं होऊं तुमच्याच मुली.'

मणी ओढतां ओढतां होती त्याचींच आसवें, दूर असाल तिथें हो नांदतों मी तुम्हांसवें.

नचिकेत जवखेडकर's picture

7 Feb 2022 - 7:06 am | नचिकेत जवखेडकर

खरोखर एक युग संपले. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना माहित असलेलं व्यक्तिमत्व! मनापासून आदरांजली.

भावपूर्ण श्रद्धांजली.

निनाद's picture

7 Feb 2022 - 8:25 am | निनाद

त्यांची गाणी सोबतीला राहणारच. अगदी खरे आहे!

अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव.

सर्वसाक्षी's picture

7 Feb 2022 - 11:33 am | सर्वसाक्षी

काल लतादिदींचे अंत्यसंस्कार पाहताना लक्षात आलं की या करुण प्रसंगी भावना व्यक्त करणारी गीतं ही स्वतः लतादिदींनीच गायलेली होती!
जणू काही स्वरसमाधी.

Trump's picture

7 Feb 2022 - 11:39 am | Trump

दिदी गेल्या...
एकंदरच मंगेशकर कुटुंबियांनी आयुष्य इतके समृध्द करुन ठेवले आहेत की नक्की नुकसान किती झाले आहे याचा अंदाज नाही. त्यांचे वय, आजारपण आणि पाठीमागच्या काही दिवसांमधील बातम्या ऐकुन मनाची तयारी झाली होती. त्यामुळे धक्का असा बसला नाही तरी मनाचा हळवेपणा नक्कीच आहे.
महाराष्ट्राने जी रत्ने भारताला आणि समाजाला दिली, त्यातल्याच दिदी एक. दिदी त्यांचे आयुष्य जगल्या, कर्तव्ये पुर्ण केलीत आणि आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर निघुन गेल्या. आयुष्यात अजुन तरी काय हवे!!!

श्रीनिवास टिळक's picture

7 Feb 2022 - 12:00 pm | श्रीनिवास टिळक

१९६५ साली मी Montreal, Canada येथे स्थलांतरित झालो. दोन वर्षांनी म्हणजे एप्रिल १९६७ ते ऑक्टोबर १९६७ तेथे Expo 67 World’s Fair सुरु होती. तेव्हा मी काम आटोपल्यावर भारताच्या pavilion मध्ये जात असे. एक दिवस लता मंगेशकर तेथे अचानक आल्या. Exhibits पाहून झाल्यावर त्या काही मिनिटे आम्ही जे काही लोक तेथे उपस्थित होतो त्यांच्याशी बोलल्या. मी त्यांना सहज विचारले कि त्या काही गाणार आहेत का? त्या काही बोलल्या नाही नुसत्या हसल्या. आता ५५ वर्षांनी त्या प्रसंगाची पुन्हा आठवण झाली आणि मन साहजिकच खिन्न झाले. असो. कालाय तस्मै नमः

भावपूर्ण श्रद्धांजली!

सं - दी - प

मित्रहो's picture

7 Feb 2022 - 3:14 pm | मित्रहो

भावपूर्ण श्रद्धांजली

सरनौबत's picture

7 Feb 2022 - 4:44 pm | सरनौबत

नर्गीस एकदा म्हणाली,‘राजा की आयेगी बारात’वर मला अभिनय करावा लागला नाही. ग्लिसरीन न लावता देखील आपोआप डोळे पाणावले. लताच्या स्वरांची किमया. भारत भूषण सुद्धा परवडला इतकी ठोकळा अभिनेत्री प्रिया राजवंश. तिला ‘जरा सी आहट होती है’ गाण्यात बघा. इतकं भारी ऍक्टिंग (न करताही) वाटतं कारण लता ची जादू!! अशी गाणी 'पाहिली' कि मग उमजतं लता मंगेशकरला 'स्वरसम्राज्ञी' का म्हणतात

श्रीरंग_जोशी's picture

8 Feb 2022 - 4:49 am | श्रीरंग_जोशी

लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली.
गेले दोन दिवस आपल्या जीवाभावाचं माणूस सोडून गेल्यासारखी अवस्था आहे. मी स्वतःला नशिबवान समजतो की लतादिदींसारखी असामान्य गायिका सक्रीय असताना मी लहानाचा मोठा झालो.

त्यांची अगणित गाणी आवडतात अन कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही.
मूळ व ४६ वर्षांच्या अंतराने गायलेलं ही दोन्ही गीते अंगावर रोमांच उभे करतात.

तसेच ग्रेस यांच्या 'भय इथले संपत नाही' या कवितेला आपल्या स्वरांनी लतादिदींनी ज्या प्रकारे गायलय त्याला तोड नाही.

भारतीय संगीत ऐकणार्‍या जवळपास ७ ते ८ पिढ्या (एकोणिसाव्या सतकात जन्मलेले ते एकविसाव्या शतकात जन्मलेले) लतादिदींच्या स्वरांनी मंत्रमुग्ध होत राहिल्या अन यापुढेही होत राहतील. माझ्या ६ वर्षांच्या कन्येलाही लतादिदी व आशाबाई यांची गाणी ऐकताच गायिकेचं नाव ओळखता येतं याचं एक बाप म्हणून खूप समाधान वाटतं.

चौथा कोनाडा's picture

8 Feb 2022 - 5:13 pm | चौथा कोनाडा

लता दिदी सदोदित आपल्या सोबत रहतील !
त्यांच्या गमनाबद्दल कोणत्या शब्दात भावना व्यक्त करणार हाच प्रश्न आहे !
lmt3854
गानसम्राज्ञीनां भावपूर्ण श्रद्धांजली !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2022 - 2:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लता मंगेशकर, देशातल्या सर्वाधिक लोकप्रिय गायिका. लतादीदींचे निधन झालं आणि सर्व स्वर व्याकुळ झालेले आपण पाहिले. लता मंगेशकर आपल्या काना-मनात कायम राहतील. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांनी गायलेली गाणी युगानेयुगे वाजत राहतील आणि लतामंगेशकर अजरामर राहतील यात काही वाद नाही. लता मंगेशकरांनी वयाच्या पाचव्या वर्षी आपलं गाणं गायला, शिकायला सुरुवात केली आणि आज तीसहजारांपेक्षा अधिक गाण्यांचा हिमालय, एक पट त्यांनी उभा केला.

लता मंगेशकर यांच्या संबंधी अनेक लेख, बातम्या आपण वाचल्या असतील. असंख्य घटना. प्रसंग, हे सर्व वाचावे आणि ऐकावे असेच वाटते. आपली आणि लता मंगेशकर यांची भेट झालेली नाही, पण त्या आपण सर्वांना आपल्या कुटुंबीयातल्याचा वाटल्या. आपले कोणी मिपाकर आणि त्यांची भेट झालीही असेल, कदाचित ते त्यांचा अनुभव लिहितीलही.

लता मंगेशकरांचा जन्म, २८ सप्टेंबर १९२९ ला मध्य प्रदेश इंदूर शहरात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता मंगेशकर ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. मंगेशकर कुटुंबीय मूळचे गोव्याचे. त्यांचे मूळ आडनाव नवाथे. सांगली येथे दीनानाथ मंगेशकर यांना मास्टर ही पदवी प्राप्त झाली. लतादिदी सांगलीतील सध्याच्या मारुती चौकातील दांडेकर मॉलच्या जवळील ११ नंबरच्या सरकारी शाळेत आपल्या लहान भावंडांसह शाळेत शिकायला जात असत. एक दिवस लहानगी आशा रडू लागली. तेव्हा एका शिक्षकांनी छोट्या लताला खूप रागावले. तेव्हापासून लतादीदीचे शाळेत जाणे बंद झाले. तेव्हा एक शिक्षक घरी येऊन त्यांना शिकवत असे. नंतर काही काळाने मंगेशकर कुटुंबाने सांगली शहर सोडले.

इ.स. १९४२ मध्ये लता मंगेशकर अवघ्या १३ वर्षांची होत्या तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला. लता मंगेशकर यांच्या 'नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी' हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मराठी गाण्यापासूनच दिदींच्या करिअरला सुरुवात झाली. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले.

मास्टर विनायक यांच्याबरोबर मंगेशकर कुटुंबीयही मुंबईला आले. लता दीदींचं अर्धवट राहिलेलं संगीताचं शिक्षण इथे पुढे सुरू ठेवण्याची संधी त्यांना मिळाली.उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) यांच्याकडून त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. इथेच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. वसंत जोगळेकरांच्याच १९४६ सालच्या ‘आप की सेवा में’ या हिंदी चित्रपटात संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘पा लागू कर जोरी’ हे पहिले गीत दीदींनी गायले. 'बडी मा' मधे लता मंगेशकर याच काळात एक भजनही त्यांनी गायलं. (माता तेरे चरणो मे) एकीकडे चित्रपटात गाणी म्हणता म्हणता दीदींनी आपलं संगीताचं शिक्षण चालूच ठेवलं होतं. उस्ताद अमानत खाँ (देवासवाले) आणि पंडित तुलसीदास शर्मा यांच्याकडून दीदींना नंतरची तालीम घेतली. त्यानंतर त्यांच्या प्रत्येक गाण्याला श्रोत्यांनी प्रचंड डोक्यावर घेतले.

इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंना तालीम मिळाली. इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताबाईंना मार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई (अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या. सुरूवातीला लता मंगेशकर आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लता मंगेशकर यांनी स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर उर्दू शब्द असत. ते शिकून घेण्यासाठी लता मंगेशकर यांनी शफ़ी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले.

लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९) चे आयेगा आनेवाला आयेगा हे गाणे लताच्या कारकीर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते.)

वर्ष १९५० च्या दशकात, लता मंगेशकर यांनी अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिनदेव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, मास्टर कृष्णराव, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणि उषा खन्ना या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायली. पुढे बैजू बावरा (१९५२ ) मुगल ए आजम ( १९६० ) श्री ४२० (१९५५) चोरी चोरी आणि मधुमती (इ.स. १९५८) यातलं ’आजा रे, परदेशी हे गाणं तर आजही तितकेच लोकप्रिय आहे. "सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका" म्हणून इथे त्या नावलौकिकास आल्या आणि पुढे हजारो पुरस्कार आणि गौरव त्यांना मिळत गेले. आणि हा प्रवास पुढे ’भारतरत्न (२००१) अव्याहतपणे सुरु राहीला.

१९७० पासून पुढे तर त्यांच्या गाण्यांची नुसती धुम होती. या दशकाच्या सुरूवातीस, त्यांनी इतर गैर-फिल्मी अल्बम रिलीज केले, जसे की त्यांचा गालिब गझलांचा संग्रह, मराठी लोकगीतांचा अल्बम (कोळी-गीते), गणेश आरतींचा अल्बम (सर्व त्यांचा भाऊ हृदयनाथ यांनी रचलेले) आणि एक अल्बम श्रीनिवास खळे यांनी रचलेले संत तुकारामांचे "अभंग". आणि पुढे पाकिजा चित्रपटातील गीताच्या. ”चलते चलते यूही कोई मिल गया था” ”इन्ही लोगोने इन्ही लोगो ने” ही आणि इतर कमाल गाणी ठरली. आवाजात गोडवा आणि गाण्यांनी लतागाण्यांना बहर आलेला होता.

मग पुढे आपण येतो वर्ष १९८० मध्ये, सिलसिला ( १९८१ ) फ़ासले, विजय, चांदनी ( १९८९) यातली गाणी तर सुपर डुपर हीट ठरली. प्रेम रोग, प्यार झुकता नही, राम तेरी गंगा मैली, राम लखन, संजोग. नगीना, आणि पुढे तर कितीतरी चित्रपट गाणी...रुदाली (1993) मधील "दिल हम हूम करे" हे भुपेन हजारी यांच्याबरोबर गायललें हे एक आठवणीतलं उत्तम गाणं. मला कायम आवडतं. असा हा गाण्यांचा प्रवास अगदी...30 मार्च 2019 पर्यंत लतादिदीनी भारतीय सैन्य आणि राष्ट्राला श्रद्धांजली म्हणून मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेले "सौगंध मुझे इस मिट्टी की" हे गाणे रिलीज केले इथपर्यंतचा प्रवास संघर्षाचा, गोड आवाजाचा आणि अद्भुत, चमत्काराचा असा हा मोठा प्रवास.

आपण लिहून थकून जाऊ इतकी गाणी. लता मंगेशकर यांची हीट गाणी सर्च केलं की कितीतरी गाणी आपल्या पुढ्यात येतात. सहगायंकांबरोबरची कितीतरी मराठी, हिंदी, आसामी इतर भाषांतील असंख्य गाणी.'स्वरसम्राज्ञी' लता मंगेशकर यांनी जवळजवळ वीस भाषांमध्ये तीस हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. हे लेखन आणि माहिती कायम अपूर्णच राहील.

काही दिवसांपूर्वी पळसखेडा इथे पद्मश्री ना.धो. महानोर यांच्या भेटीस गेलो होतो, तेव्हा त्यांनी लता मंगेशकरांची आठवण सांगितली होती. लता मंगेशकर भेटीस तिथे आल्या होत्या तेव्हा तेथील गोड अशा सीताफळांना ना.धो.महानोर यांनी 'लताफळ' असे नाव दिले. अशा लता मंगेशकरांच्या लतायुगात आपण जन्मलो, गाणी ऐकत लहानाचे मोठे झालो. सुख दुःखात आपणास या गीतांनी कायम साथ दिली पुढेही देत राहतील.

लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पसायदान. माहिती संकलन : मराठी विकी, मटा, लोकसत्ता. सौजन्याने. आभार.

-दिलीप बिरुटे

तिमा's picture

14 Feb 2022 - 7:49 am | तिमा

जन्मापासून आता आयुष्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत, लता-आशाचा सूर हाच आमचा श्वास होता. नवीन पिढीला हे सांगावेसे वाटते की तिच्याबद्दल आत्ताच्या मिडियामधे जे छापून येते त्याला महत्व देऊ नका. तिच्या सूरांवर सच्चे प्रेम असेल तर १९४५ ते १९६० मधला तिचा आवाज ऐका. (यू ट्युब वर सर्व उपलब्ध आहे). तिचा एकेरी उल्लेख आम्ही करतो कारण आम्हाला ती देवाइतकीच जवळची आहे आणि राहील.