नवीन फसवणुकीचा प्रकार

कासव's picture
कासव in काथ्याकूट
30 Jan 2022 - 12:07 am
गाभा: 

सर्व नावे बदलली आहेत. दोन्ही प्रसंग खरे आहेत
------
प्रसंग १
राजेश ला एका दुपारी अचानक WhatsApp विडिओ कॉल येतो. नंबर त्याच्या मोबाईल मध्ये सेव नसतो तरी तो फोन घेतो. पलीकडून एका मुलीचा आवाज पण काळी स्क्रीन. काही दिसत नाही. राजेश तिला ओळखत नाही पण ती त्याला म्हणते ओळख. एवढ्या लवकर विसरलास ना. २ ते ३ मिनिटे असेच होते आणि शेवटी ती wrong नंबर सांगून फोन कट करते.

१० मिनिटांनी एक मेसेज येतो. राजेश मोबाईल उघडतो आणि जागीच खिळून बसतो. मेसेज मध्ये एक व्हिडिओ असतो त्यात त्याचीच एक ब्लू फिल्म असते. त्याला कळते की आत्ता जो कॉल आला होता त्यातून काही क्लिप वापरून हा व्हिडिओ बनवला आहे. नंतर २ मिनिटांनी त्याला साधा कॉल येतो. त्यात एक पुरुष बोलत आहे. तो म्हणतो की तुझा हा व्हिडिओ मी सोशल करणार. तुझी माझी काही दुश्मन नाही पण मला पैसे हवेत. ५००० रुपये. ते ही आत्ताच दिले तर. नाहीतर दर तासाला ते दुप्पट होणार. २४ तासात पैसे नाही दिले तर हे सोशल होणार. आणि पोलिसांना सांगितले तर लगेचच.

राजेश घाबरतो पण तो त्याच्या एका मित्राशी बोलतो आणि ते पैसे द्यायला तयार होतात. आता तो व्यक्ती पैसे बिटकॉइन मध्ये मागतो. आली आता पंचीअत. राजेश ला बितकॉइन बदल काही माहिती नाही. मग तो अजून एकाला फोन करतो. त्या मित्राकडून त्याने बिटकॉईन बदल ऐकलं असतं. तो मित्र त्याला पोलिसाला गाठण्याचा सल्ला देतो. आणि काही घाबरून होणार नाही पैसे तर द्यायचेच नाहीत असे सांगतो. धीर करून हे लोक पोलिस स्टेशन गाठतात. पोलिस म्हणतात हे नेहमीच झालं आहे. Fir करू पण हे आरोपी सापडणार नाहीत. तुमची सोशल अकाउंट बंद करा किंवा सगळे सेक्युरिटी सेटिंग चेक करा. सर्व अनोळखी माणसे ताबडतोब फ्रेंड लिस्ट मधून हटवा. आणि त्या माणसाचा परत फोन आला तर पैसे देत नाही काय करायचंय ते कर म्हना.
राजेश ला परत फोन येतो. आणि राजेश पैसे देणार नाही असे सांगतो. तो माणूस खूप घाबरवत असतो तरी. राजेश परत पोलिस ना सांगतो आणि पोलिस त्याला कोणताच unknown नंबर चा फोन उचलू नको म्हणून सांगतात. ४-५ दिवस खूप फोन येतात पण हा व्हिडिओ काही शेअर होत नाही. आणि हळू हळू सगळे कॉल पण बंद होतात.

---
प्रसंग २
विलास सकाळी सरकारी दवाखान्यातून COVID chi लस घेऊन येतो. साधारण संध्याकाळी त्याला एक कॉल येतो. पलीकडून आवाज येतो की मी हॉस्पिटल मधून बोलतोय आणि तुम्ही आज लस घेतली का. विलास हो म्हणतो. तो माणूस म्हणतो की तुमचं आधार कार्ड वर लसीच डिटेल अपलोड होत नाहीयेत. तर आधार नंबर परत नीट सांगा आणि एक OTP येईल तो पण सांगा. विलास सावध होतो. तो म्हणतो मी हॉस्पिटल मध्ये येतो आणि काय असेल ते तिथे पाहू. तो माणूस गयावया करतो की ह्यात खूप वेळ जाईल. त्याचे डिटेल अपलोड होत नाही तो पर्यंत पुढच्या लोकांचे पण डिटेल टाकता येत नाहीत. सॉफ्टवेअर थांबलं आहे. त्याला अजून ४२ लोकांचे डिटेल टाकायचे आहेत. आणि त्याची आई घरी आजारी आहे त्याला सगळी काम संपून पटकन घरी जायचे आहे. तरी विलास तयार होत नाही. मग तो माणूस काही ओळखी ची नावे सांगायला लागतो. ह्यांना मी माहित आहे तुम्ही त्यांना विचारा पण आत्ता मला मदत करून घरी जाऊ द्या. विलास तरी ऐकत नाही म्हणल्या वर तो थोडा चिडून बोलायला लागतो आणि सारखं आईच कारण देत बसतो. नंतर तर तो शिव्या पण द्यायला लागतो. दरम्यान विलास कॉल चालू असतानाच हॉस्पिटल मध्ये पोचतो तर तिथे अशी कोणतीच व्यक्ती नसते. सगळे लोक आपापले काम संपवून निघ्यच्या तयारीत असतात. तिथले अधिकारी विलास ला शाबासकी देऊन पोलिस स्टेशन ला घेऊन जातात. ते तिथे रीतसर तक्रार करतात.

--
दोन्ही प्रसंगात माझे मित्र वाचले कारण एक जनाने मित्राचा सल्ला घ्यायचं ठरवलं आणि एक जण स्वतःच अलर्ट होता. पण अश्या लोकांचे कॉल खूपच खरे वाटतात. अगदी भाषेचा tone वगैरे आपल्याच भागातला वाटतो एवढे ते सराईत असतात. म्हाताऱ्या व्यक्ती किंवा अलर्ट नसतील तर कोणीही सहज फसू शकतो. ह्यांची जास्त पैस्याची पण अपेक्षा नसते. दिवसाला ५०००-१०००० मिळाले तरी बास. १० लोकांना ट्राय केले की एखादा तरी गळाला लागत असेल. कदाचित वाढती बेकारी करणी भूत असेल. पण ते जास्त कष्ट पण घेत नाहीत. तुम्ही त्यांना हवे तसे वागत नसाल तर ते जास्त वेळ खर्च न करता दुसरा बकरा शोधतात.

सर्वांनी खूप सावध रहा. उपयोग झाला नाही तरी रीतसर तक्रार करा. सोशल मीडिया वर कमीत कमी माहिती द्या. सर्व security सेटिंग चेक करा. हवं तर मित्रांची मदत घ्या. अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. तुमचे मित्र आणि नातेवाईक ह्यांना पण सतर्क करा.

अजून काही उपाय किंवा किस्से असतील तर प्रतिक्रिया मध्ये सांगा.

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2022 - 12:33 am | प्रसाद गोडबोले

सोप्पा उपाय

कोणत्याही अनोळखी नंबर वरुन फोन आला की "नमस्कार बोला, मला फक्त मराठी कळतं , मराठीत बोला . " इतका साधासा उपाय केल्याने जवळपास ९० % येणारे स्पॅम आणो फ्रॉड कॉल्स कमी होतात .

कासव's picture

30 Jan 2022 - 2:18 pm | कासव

पहिल्या प्रसंगात मित्र सेक्शुअल् कंटेंट मध्ये घाबरला होता

दुसऱ्या प्रसंगात समोरचा माणूस नुसतं मराठीच बोलत न्हवता तर त्याचा tone आणि शब्द प्रयोग आमच्या भागातले वाटत होते.

सर्व मार्ग माहित असून ऐन वेळी मती गुंग होते.

तर्कवादी's picture

30 Jan 2022 - 8:24 pm | तर्कवादी

दुसर्‍या प्रसंगात हॉस्पिटलमधला कुणी कर्मचारी भामट्यांना सामील असला पाहिजे नाहीतर तुमचा मित्र लस घेवून चाललाय हे त्या भामट्यांना लगेच कसं कळलं ? पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवत आणि थोडा कसून तपास केला तर निदान या प्रकरणातले दोषी पकडले जावू शकतात.

चौथा कोनाडा's picture

30 Jan 2022 - 8:50 pm | चौथा कोनाडा

भामट्यांचं कोलॅब्रेशन आणि टीमवर्क जबरदस्त असतं. ती एक वेगळी क्रॉस फंक्शनल टीम असते !

प्रसाद_१९८२'s picture

31 Jan 2022 - 12:43 pm | प्रसाद_१९८२

इथे पहिल्या प्रकारचा फ्रॉड एका पत्रकारांने उघड केला आहे.
-------------
https://www.facebook.com/109863820490363/posts/482504939892914/

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Jan 2022 - 2:27 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
हिंदीचं मराठी माणसाला असलेलं खुळ त्याचं नुकसान करून जातं.

sunil kachure's picture

30 Jan 2022 - 1:03 am | sunil kachure

मला व्हॉट्स ॲप वर एक लॉटरी लागल्याचा फोटो आणि एक ऑडियो msg आला.
मी तो msg बघितला ऑडियो msg चा फक्त एक शब्द ऐकला आणि सरळ तो नंबर ब्लॉक केला
बँकेतून बोलतोय तुमचे कार्ड बंद होईल म्हणून फोन करणारे अडाणी यूपी,बिहारी असतात लगेच भाषेवरून कळत.
सरळ शिव्या घालून असे नंबर ब्लॉक करून टाकणे.
थोडे सावध राहिले तर फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी असते.

कासव's picture

30 Jan 2022 - 2:20 pm | कासव

हाच मेसेज सांगायचं होता
सावध राहा आणि आपल्या मित्रांना पण सावध करा

प्रसाद_१९८२'s picture

30 Jan 2022 - 10:42 am | प्रसाद_१९८२

काय आहे ? लॉकडाऊनच्या आधी आणि नंतर गेल्या दोन वर्षात असले फसवणुकीचे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत.

कासव's picture

30 Jan 2022 - 2:15 pm | कासव

हे लोक नवीन नवीन फंडे काढतात. ते लगेच दुसऱ्यांना कळावे. माझ्या पाहण्यात हे दोन्ही किस्से नवीन होते. आधी बँकेचे kyc वगैरे चालायचे त्याचे हे नवीन version

कानडाऊ योगेशु's picture

30 Jan 2022 - 11:25 am | कानडाऊ योगेशु

मला एक मेसेज सतत येत असतो तो म्हणजे "तुमचे एस.बी.आय च्या अकाउंट चे केवायसी अजुन पूर्ण झालेले नाही. त्वरीत खालील लिन्क वर क्लिक करुन अपडेट करा."
आणि मेसेज मध्ये लिन्क पण असते. पहिल्यांदी खरेच वाटले आणि थोडी भीती वाटली. पण पुढच्याच क्षणी सावध झालो. काही दिवसांनंतर असाच मेजेस बायकोलाही आला. विशेष म्हणजे हा मेसेज फक्त एस.बी.आय अकाऊंट संबंधितच असतो.

बबन ताम्बे's picture

30 Jan 2022 - 1:57 pm | बबन ताम्बे

मला मध्ये नेहमी एका लेडीजचा फोन यायचा. दिल्ली कोर्टनसे आपके नाम का समन्स निकल चूका है. क्रिमिनल केस हैं. हमारे लॉयर आपकी सहायता करेंगे. नंबर ब्लॉक केला तर दुसऱ्या नंबरवरून फोन यायचे. चार दिवस सतत हरेसमेंट चालू होती. शेवटी दम दिला आणि म्हटले ऐसा कितना पैसा मीलता है तुमको लोगोंको फसाकर.मेहनत करके इमानदारीसे पैसे कमाओ ना. मैं जिंदगीमें कभी दिल्ली गया नाही. किसको बेवकुफ बना रहे हो. त्यांनतर कुठे ते फोन बंद झाले.
दुसरं इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणचे छोटा लडका हॉस्पिटलमें क्रिटिकल कंडिशनमें है, आप तुरंत पैसे की मदद करेंगे तो उसकी जान बच जायेगी.
हम अमुक ढमूक एन जी ओ से बोल रहे है आणि अगदी इमोशनल होऊन ती बाई/मुलगी लगेच ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करायला सांगायची. नाही म्हटले की लगेच टोन बदलून शिव्या द्यायला सुरुवात करायची.
कोण असतात हे लोक ?

तर्कवादी's picture

30 Jan 2022 - 8:26 pm | तर्कवादी

. दिल्ली कोर्टनसे आपके नाम का समन्स निकल चूका है. क्रिमिनल केस हैं.

तुमच्याकडे तिकोनाचं ब्रॉडबँड होतं आणि नंतर तुम्ही ते बंद केलं असं काही आहे का ? तिकोना कंपनी सोडून गेलेल्या ग्राहकांना नाहक त्रास देण्याकरिता बदनाम होती.

बबन ताम्बे's picture

31 Jan 2022 - 8:49 am | बबन ताम्बे

हो, तिकोनाचे ब्रॉड बँड होते आधी. हे कारण असेल माहीत नव्हते.
वात आणला होता त्या समन्सच्या कॉलने.

तुषार काळभोर's picture

2 Feb 2022 - 4:42 pm | तुषार काळभोर

+१
मीपण तिकोना बंद केल्यावर तीन चार वर्षे 'तीस हजारी कोर्टातून' कॉल येत. नंतर कंटाळून त्यांनी कॉल करणं बंद केलं :)

कासव's picture

30 Jan 2022 - 2:22 pm | कासव
चौथा कोनाडा's picture

30 Jan 2022 - 7:47 pm | चौथा कोनाडा

डेंजर आहे हे !

तुर्रमखान's picture

30 Jan 2022 - 5:38 pm | तुर्रमखान

मेसेज मध्ये एक व्हिडिओ असतो त्यात त्याचीच एक ब्लू फिल्म असते. त्याला कळते की आत्ता जो कॉल आला होता त्यातून काही क्लिप वापरून हा व्हिडिओ बनवला आहे.

पण त्याचीच ब्ल्यु फिल्म म्हणजे नक्की कशी फिल्म. कॉल करून त्यातून काही क्लिप वापरून म्हणजे नक्की काय केलं होतं?

sunil kachure's picture

30 Jan 2022 - 9:55 pm | sunil kachure

एफबी वर स्त्री आयडी ची फ्रेंड रिक्वेस्ट येते.
प्रोफाइल फोटो हा सुंदर असतोच
पुरुष ती विनंती मान्य करतात,बऱ्याच पुरुषांची स्त्री ही कमजोरी असते .
त्या नंतर messenger वर hi करून ती स्त्री संवाद साधते.
त्यांना थोडा फार अंदाज आल्या नंतर
ती स्त्री च व्हॉट्सॲप नंबर देते आपण सेक्स चाट करू असा असा msg असतो.
पण हे fraud स्त्री आयडी messenger वर चाट करत नाहीत
Messenger वर चाट पासून व्हिडिओ call पण करता येतो
व्हॉट्स ॲप जी सुविधा देते ती सर्व सुविधा fb messenger पण देते.
मग ह्या व्हॉट्स ॲप वर चाट करण्यास फक्त एकाच कारणासाठी आग्रही असतात तिथे तुमचा काँटॅक्ट नंबर भेटतो आणि नंतर धमकी देण्यासाठी त्यांना तो उपयोगी पडतो.
कोण अनोखळकी एफबी स्त्री फ्रेंड व्हॉट्स ॲप चाट चा आग्रह करत असेल तर सावधान व्ह्या.

तुर्रमखान's picture

30 Jan 2022 - 10:32 pm | तुर्रमखान

माहितीसाठी धन्यवाद, पण कॉल करून ब्ल्यु फिल्म विडिओ तयार करतात म्हणजे काय करतात हे अजुनही कळलं नाही.

कासव's picture

30 Jan 2022 - 10:59 pm | कासव

कॉल करून तुम्हाला ते उत्तेजीत करतात. तुम्हाला पण नग्न होण्यास भाग पाडतात. काहीच नाही तर गेल्या बाजारी आपल्या तोंडचे हावभाव बदललेले असतातच. त्याच क्लिप कट करून बेमालूम पने दुसऱ्या ब्ल्यू फिल्म मध्ये चीतकवल्या जातात. पाहणाऱ्याला असे वाटते की तुम्हीच त्या फिल्म चे हिरो किंवा व्हीलन आहेत.

Btw fb messager वर नाही तर WhatsApp कॉल आलेलं. आत्ता तुमचा नंबर मिळवणे सहज सोपा झालं आहे. कमीतकमी linkd इन ल तरी आपण खरा नंबर देतोच आणि ह्या लोकांकडे linked in चे subscription असतील

सायबर सेल ला ह्यांना पकडणे कठीण नाही पण केस हाई प्रोफाइल पाहिजे. मग अर्धे काम मीडिया च करेल

युपीए मध्ये गृहमंत्री श्री चिदंबरम ह्यांना मार्केटींगचे कॉल आल्याने भारतात DND यादी सुरु झाली.

सायबर सेल ला ह्यांना पकडणे कठीण नाही पण केस हाई प्रोफाइल पाहिजे. मग अर्धे काम मीडिया च करेल

साहना's picture

2 Feb 2022 - 12:56 pm | साहना

आपल्या विचारांत अत्यंत तर्कदूषिता आहे.

> आणि चुकीच्या सिलेक्शन मुळे मानव जात नामशेष होईल ही कदाचित.

नाही होणार. लोकांनी मुलींचे ऍबॉर्शन करत राहिले तर हळू हळू मुलींचा भाव वाढत जाईल.

> इतक्या मानव प्राण्यांची आणि त्यातले बरेच जे शासनावर भार आहेत किंवा असतील त्यांची पृथ्वीवर गरज आहे का?

शासन कसला डोंबलाचा भार घेते ? आणि कुणी सांगितलेय ह्यांना भार घ्यायला ? शासनाने ह्यांचा भार घेऊ नये असे आपले म्हणणे असेल तर १००% बरोबर आहे. पण लोकांना आधीच मारावे ह्याला काहीही अर्थ नाही.

> सनाने प्रत्येक आळशी, अन्स्कील्ड आणि अनप्रॉडकटिव्ह व्यक्तीला जगवण्याची जबाबदारी का घ्यावी?

घेऊ नये. सरकारने कुठल्याही फुकटयाला पोसू नये पण तो फुकटा आपल्याला पाहिजे ते काम करू इच्छित असेल तर त्याच्या कामांत आडकाठी सुद्धा करू नये. लोक शासनाचे गुलाम नाहीत. शासनाने लोकांची कुठलीच जबाबर्दारी घेऊ नये आणि शासन ती आपण घेऊन घेतोय म्हटल्यावर लोकसुद्धा शासनाची प्रॉपर्टी ठरत नाही.

सिलेक्टिव्ह ब्रीडिंग नावाचा प्रोग्रॅम आणला तर आपल्या सारख्यांचे काय होईल असे तुम्हाला वाटते ? आणि समाज उद्या तुम्ही वृद्ध झाला निरुपयोगी झाला तर सरकार किंवा तुमची मुळेच तुम्हाला कदाचित मृत्यूकेंद्रांत नेवून टाकतील.

> हा विचार कधीतरी प्रत्यक्षात विचारला जाईलच.

हा विचार पुरातन ग्रीक तसेच अमेरिकेत सुद्धा युजेनिक्स नावाने प्रत्यक्षांत आणला गेला होता. चालला नाही आणि सपशेल फेल झाला.

आता भारताचेच उदाहरण घ्या. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जे मूर्खपणाचे कायदे सरकारने काढले आहेत ते अत्यंत नीच प्रकारचे आहेत. मागे एकदा स्त्री कल्याण मंत्रालयाने स्त्री भ्रूण हत्येविषयी पत्रक काढले होते. त्यात माहिती दिली होती. "हे असेच चालू राहिले तर तुमच्या मुलांना लग्न करण्यासाठी स्त्री आणि मुले निर्माण करण्यासाठी आई मिळणार नाही" थोडक्यांत काय तर एका बाजूने स्त्री चे वस्तूकरण करू नका म्हणून बोंब मारायची तर दुसऱ्या बाजूला स्त्री म्हणजे तुमच्या पोरांसाठी बायको आणि नातवंडा साठी गर्भाशय असे दाखवून खूपच खालच्या प्रकारचे वस्तूकरण करायचे.

माझ्या मते एखादा समाज "पुरुष" प्रेमी असेल तर त्याचे चांगले वाईट परिणाम सुद्धा त्याच समाजाने भोगले पाहिजेत. समजा मुलींची संख्या कमी झाली आणि त्यामुळे समाजाला खूप वाईट परिणाम भोगावे लागले तर कदाचित त्यातून लोक योग्य तो धडा घेतील.

बरे कायदा केला म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही. आज अनेक जोडप्याना मुलाच्या लिंगाचा फरक पडत नाही. पण तरी सुद्धा ह्या घाणेरड्या कायद्याने मुलाला गर्भांत हलताना पाहायची सोपी सुविधा मिळत नाही. आपल्याच शरीराचे रिपोर्ट्स पाहायला मिळत नाही. पण तुम्ही गरीब असाल तर ! माझ्या माहितीचे अनेक लोक सध्या UAE मध्ये जाऊन लिंग निदान करून घेतात. भारतीय डॉक्टरांनीच तिथे दुकाने थाटली आहेत. नाहीतर काही लोक IVF करून घेतात आणि पाहिजे ते लिंग निवडतात, गर्भपातापेक्षा हे जास्त सुरक्षित.

ह्यांत दुसरी भर पडली आहे ती अंधश्रद्धा वाल्यांची. आम्ही लिंग निदान करून देतो. नाडी परीक्षा पासून पोटाला हात लावून सांगतो पर्यंत चे अनेक खोटे एक्सपर्ट निर्माण झाले आहेत. अमुक खावेसे वाटले तर मुलगीच आहे. तमुक खाऊन उलटी झाली तर मुलगा वगैरे वगैरे.

चेतन सुभाष गुगळे's picture

2 Feb 2022 - 3:33 pm | चेतन सुभाष गुगळे

हा प्रतिसाद दुसर्‍या लेखाच्या धाग्यावर प्रकाशित करायचा होता का?

तुर्रमखान's picture

30 Jan 2022 - 11:33 pm | तुर्रमखान

ओह आय सी. अननोन लंबरवरून आलेले विडिओ कॉल्स यंटरटेन करणार्‍या वल्नरेबल लोकांना एड्युकेट करणं अवघड आहे. आपलं नाणं खणखणीत नसेल तर मं फोलिसात जायची पण भिती वाटते. तसंही लुंग्यासुंग्याना फोलिस किती भाव देतील हा प्रश्नच आहे. त्यांच्या मागे वजनदार असामी किंवा टिआरपी देणारा त्यावेळचा ट्रेंडीग ट्वापिक असेल तर यफआयार नोंदवायचे कष्ट घेतले जातील.

सगळे क्रमांक मोबाईलमध्ये किंवा ओळखता येतात का असतात का?

ओह आय सी. अननोन लंबरवरून आलेले विडिओ कॉल्स यंटरटेन करणार्‍या वल्नरेबल लोकांना एड्युकेट करणं अवघड आहे.

sunil kachure's picture

31 Jan 2022 - 12:03 am | sunil kachure

खरी पोलिस केस करून पैसे उकळणे हा लांब चा आणि बेभरवशाचा मार्ग आहे कोर्टात काय निकाल लागेल हे सांगता येत नाही
ज्यांना फक्त सेक्स कॉल करून मिळालेली नग्न फोटीस,व्हिडिओ ह्यांचा वापर फक्त भीती दाखवण्यासाठी च करणार ते काही पोलिस केस करणार नाहीत.
कारण गुन्हा करणारे ते असतात .त्यांना अनेक बकरे हवे असतात.
ज्या व्यक्ती बाबत असा प्रसंग घडतो त्याने संयम ठेवला आणि धीर धरून त्यांच्या धमकीला भीक घातली नाही तर अशा फ्रौड लोकांचा हेतू साध्य होणार नाही .

तुर्रमखान's picture

31 Jan 2022 - 12:26 am | तुर्रमखान

नै म्हणजे अनोळखी नंबर वरून कॉल्स घ्यायला हरकत नाही पण अनोळखी नंबर वरून आलेले विडिओ कॉल अ‍ॅक्सेप्ट करून नग्न होवून किंवा पलिकडचं दृष्य बघून अनोळखी लोकांना आपल्या चेहर्‍यावरचे हॉर्नी हावभाव दाखवणं म्हणजे थोडं टू मच वाटलं इतकच. बाकी लोकांच्या स्खलनशीलतेचा फायदा घेवून लुबाडणुक करणं चूक हे मान्यच.

विमानाच्या तिकीटाचे पैसे मागतात ..

लाॅटरीच्या जॅकपाॅटचे तर पेव फुटले होते ...

सगळे पैसे मिळाले असते तर, किमान 2-4 ट्रिलियन डॉलर, नक्कीच खात्यात आले असते...

कर्नलतपस्वी's picture

30 Jan 2022 - 7:30 pm | कर्नलतपस्वी

माझा एक सहकारी बँकेत जाण्याची परवानगी मागायला आला. त्याला सहज विचारलं काही विषेश तो म्हणाला माझ्या मुलीला नोकरीचा काँल आलाय त्यांनी वीस हजार रुपये आनामत भरायला सांगितले आहे. खोलात गेल्या वर लक्षात आले की फसवणूक होणार आहे त्याला समजावले आणी परावृत्त केले. थोडा नाराज झाला. पण एका आठवड्याने जेव्हां त्याच्या मुलीच्या मैत्रिणीचे पैसे गेले तेव्हां त्याची नाराजी दुर झाली आणी माझे आभार मानले .

कधी मजबुरी तर कधी लालच यामुळे फसवणूक करणार्‍या चे फावते.

मुक्त विहारि's picture

30 Jan 2022 - 11:00 pm | मुक्त विहारि

असे छगनलाल, गल्लोगल्ली आहेत...

फार पुर्वी ह्यावरून एक लेखमाला लिहीली होती... छगनलालांचे सापळे...https://www.misalpav.com/node/22087

मला २००३ मध्ये नोईडामध्ये नोकरी मिळेल आणि ५०० रुपये अनामत रक्कम जमा करायला सांगितली होती.

मारूतीत नौकरी मिळेल असे सांगतात आणि

सर्वसाक्षी's picture

30 Jan 2022 - 8:03 pm | सर्वसाक्षी

सध्या नवीन प्रकारः

१) ध्वनिमुद्रीत संदेश ऐकवला जातो की भारतीय आयुर्विमा महामंडळाने एक नवीन आजन्म वीमा योजना सुरु केली आहे. अधिक माहितीसाठी १ दाबा

हा कॉल अनेक नंबरांवरुन येतो.

आपण कसलाही प्रतिसाद न देणं उत्तम. एल आय सी ची अशी कुठलीही पॉलिसी नाही, एल आय सी असे फोनही करत नाही

२) " आपली ----- साली घेतलेली **** कंपनीची पॉलिसी मॅच्युअर झाली आहे, बोनस सह एकुण रक्कम तीन लाखाच्या आसपास आहे. आपला काही तपशिल, के वाय सी वगैरे नसल्याने ती रद्द करण्यासाठी आली आहे."

रद्द करा असं सांगुन मोकळं व्हायचं. न काढलेल्या पॉलिसीच्या पैशाचा मोह टाळावा.

सासरेबुवांचे सगळे आर्थिक व्यवहार, आमची सासूच बघत असल्याने, फसवणूक झाली नाही...

रावसाहेब चिंगभूतकर's picture

30 Jan 2022 - 10:51 pm | रावसाहेब चिंगभूतकर

1 दाबल्यावर काय होतं?

sunil kachure's picture

30 Jan 2022 - 8:09 pm | sunil kachure

Lic ची पॉलिसी mature झाल्या नंतर lic वाले कॉल करतात.पण अधिकृत lic ऑफिस च्या फोन वरून .मोबाईल वरून नाही.

आपण राहतो त्या भागातील lic एजंट ला पण आपली माहिती देतात.
ते एजंट कॉल करतात काही मदत हवी आहे paper वर्क करण्यासाठी.
पण हे सर्व अधिकृत असते.
गेल्या वर्षी मी हा अनुभव घेतला आहे.

शाम भागवत's picture

30 Jan 2022 - 8:21 pm | शाम भागवत

गेल्या वर्षी मी हा अनुभव घेतला आहे.

आपला अनुभव सविस्तर वाचायला आवडेल.

आपण राहतो त्या भागातील lic एजंट ला पण आपली माहिती देतात.

जर तुमच्या भागातील त्या एजंटचा फोन नंबर वगैरे मिळाला तर आणखी बरे होईल.

पण हे सर्व अधिकृत असते.

म्हणजे मला अधिकृतरित्या अधिक माहीती मिळवता येईल.

तुमच्या या संदेशामुळे एखादा "सावध" माणूस "बेसावध" होण्याची भिती वाटल्याने एवढे सगळे लिहीले. :)

sunil kachure's picture

30 Jan 2022 - 8:55 pm | sunil kachure

गेल्या वर्षी मार्च मध्ये माझी एक Lic पॉलिसी mature झाली .दोन महिने अगोदर Lic चा टेक्स्ट msg आला.
ओरिजनल पॉलिसी,कॅन्सल चेक,आणि maturity फॉर्म भरून Lic ऑफिस मध्ये जमा करा.
Lockdown चा काळ होता .त्या ज्याच्या कडे पॉलिसी काढली होती तो एजंट मित्र होता त्याची मदत घेतली त्यांनी सर्व कागद पत्र Lic मध्ये जमा केली.
पंधरा दिवस बाकी असताना lic branch ऑफिस मधून एका ladies नी कॉल केला आणि कागद पत्र जमा केली आहेत का ह्याची माहिती करून घेतली
आणि तो अधिकृत ऑफिस चा नंबर होता
त्या मुळे गैर असे त्या मध्ये काही नव्हतं.
नंतर एक दोन दिवसांनी एका एजंट चा कॉल आला .
ह्या महिन्यात mature होणाऱ्या पॉलिसी ची लिस्ट आम्हाला lic नी दिली आहे आणि त्या मध्ये तुमचा पण काँटॅक्ट नंबर आहे.
म्हणून तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी मदत करीन असा कॉल.
मी त्याला मी सर्व कागद जमा केले आहेत आणि तुमच्या मदती च गरज नाही असे सांगितले.
त्यांनी पण जास्त आग्रह केला नाही .
आणि त्या नंतर परत कॉल पण केला नाही
कमिशन साठी पॉलिसी mature होणाऱ्या लोकांची लिस्ट एजंट ला पुरवत असावेत असा एक अंदाज
पण इथे फसवणूक हा प्रकार नसावा
म्हणून मी अधिकृत असा शब्द वापरला होता.

शाम भागवत's picture

31 Jan 2022 - 8:55 pm | शाम भागवत

ओरिजनल पॉलिसी,कॅन्सल चेक,आणि maturity फॉर्म भरून Lic ऑफिस मध्ये जमा करा.

या एका वाक्याने माझे सगळे संशय फिटले.
_/\_

टेलिकॉम क्षेत्रात काम करत असल्याने सांगतो - कॉलर आयडी, म्हणजे फोन करणाऱ्या व्यक्तीचा नंबर हा काहीही, हवा तसा सेट करता येतो. घरबसल्या लॅपटॉपवरून VoIP द्वारे असे उद्योग करणे अगदी सोपे आहे. त्यामुळं अधिकृत काय आणि अपरिचित काय, कोणत्याच नंबरवरून आलेला कॉल विश्वसनीय नाही. अश्या वेळी कॉल कट करून इंटरनेटवरून योग्य नंबर शोधून अधिकृत कॉल सेंटरला आपण स्वतः कॉल लावावा.

असे कॉल वाढण्याचे कारण म्हणजे बेरोजगारीचे वाढते प्रमाण.सरकारी नोकरीवर पडणाऱ्या उड्या आणि नोकरीसाठी चालणाऱ्या आंदोलनातून हेच दिसते आहे.

मुक्त विहारि's picture

30 Jan 2022 - 10:46 pm | मुक्त विहारि

तुमच्या वडिलांचा किंवा जवळच्या नातेवाईकाचा अपघात झाला आहे...

आंखो देखा किस्सा...

मी, माझा मावस मेहुणा आणि त्याचे वडील, घरीच बसलो होतो. थोड्या वेळाने मेहुण्याला फोन आला

मेहुणा ... हॅलो

पलिकडून... आपण फलाणा ढेकणा का?

मेहुणा ... हो

पलिकडून... तुमच्या वडिलांचा आत्ताच अपघात झाला, हाॅस्पीटल मध्ये दाखल केले आहे, त्यांनीच तुमचा मोबाईल नंबर दिला, हाॅस्पीटल मध्ये अनामत रक्कम भरायची आहे, पैसे पाठवा...

बोलघेवडा's picture

31 Jan 2022 - 9:49 am | बोलघेवडा

2 महिन्यापूर्वी ओलेक्स वर मुलाची सायकल विकायला काढली. 6000 रु किंमत ठेवली होती. त्याच दिवशी सुमारे 3 तासांनी ओलेक्स वर मेसेज आला की सायकल आवडली 5500 देतो. पुढच बोलण्यासाठी मोबाईल नंबर द्या. सगळ हिंदीत.
वस्तू न बघता भाव ठरवणे, एक प्रकारची घाई या वरून शंकेची पाल चुकचुकली होतीच. पण तरी पुढे गेलो.
त्याने whatsap वरून संपर्क केला. Dp मध्ये देवाच चित्र होतं. मी थोडी घासाघीस करता तो सरळ 6000 द्यायला तयार झाला.
मग म्हणाला की मी ऑनलाईन व्यवहार करतो. तुम्हाला स्कॅनर पाठवतो. तो स्कॅन करा पैसे जमा होतील. त्याच डाव मला समजला त्यामुळे पुढं जाहिच केला नाही. त्याने मका कॉल करून विचारलं. तेव्हा त्याला सांगितलं की मला ही ट्रिक माहिती आहे. तेव्हा तो हसून बोलला की "ठीक है".
त्याचा नंबर मी ओलेक्स ला रिपोर्ट करून ब्लॉक केला.

पण qr कोडे स्कॅन केल्या मुळे पैसे कसे संबंधित व्यक्ती च्या अकाउंट मध्ये जातात ते समजत नाही.
आणि अशा बऱ्याच केसेस ओलेक्स च्याच आहेत.

सुबोध खरे's picture

31 Jan 2022 - 10:55 am | सुबोध खरे

मी डॉक्टर असल्याने मला रुग्णांचे अनेक अनोळखी फोन येतात तेंव्हा अनोळखी क्रमांक न उचलणे शक्य नाही.

येणारे फोन आणि त्याला मी दिलेली उत्तरे -- यानंतर मी ते फोन ब्लॉक करून टाकतो

१) तुम्हाला लॉटरी लागली आहे तेंव्हा या नंबरवर फोन करा. मी त्यांना दवाखान्याच्या पत्त्यावर डिमांड ड्राफ्टने पैसे पाठवा सांगितले. फोन कट

२) तुमचे एस बी आय च कार्ड किंवा खाते ब्लॉक होईल केवायसी अजुन पूर्ण झालेले नाही. त्वरीत खालील लिन्क वर क्लिक करुन अपडेट करा."
माझं उत्तर -- माझं एस बी आय चा कार्डही नाही आणि खातं हि नाही -- फोन कट

३) एल आय सी ची पॉलिसी मॅच्यूअर झाली आहे -- माझी एल आय सी ची पॉलिसी नाहीच

४) डॉक्तरांसाठी खास व्याजदराने कितीही कर्ज उपलब्ध आहे-- माझा वय ७८ वर्षे आहे. १५ वर्षासाठी कर्ज मिळेल का? फोन कट.
जस्ट डायल वर माझ्याऐवजी त्या मूर्खांनी माझ्या वडिलांचा फोटो लावलेला आहे. तीन वेळेस सांगूनहि उपयोग झालेला नाही.

५) सुझान बेटी एड्रियाना इ माझ्याशी गप्पा मारण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत किंवा त्यांना ३० कोटी डॉलर्स धर्मार्थ द्यायचे आहेत सारखे अनेक इ मेल माझ्या स्पॅम फोल्डर मध्ये रोजच येत असतात ( माझी मेल .CO.UK आहे)

६) माझं पेटीएम खातं के वाय सी नसल्याने बंद होईल म्हणून एक माणूस वारंवार फोन करत असे आणि पोलिसात जाण्याची धमकी देउनही बधत नसे.

शेवटी कंटाळून एका रिकाम्या दिवशी त्याचा नंबर माझ्या दवाखान्याच्या खाली "नोकरी चाहिये" या जाहिरातीत तसेच "बजाज फायनान्स" कारवाले, कार ट्रेड, रुणवाल बिल्डर, शेठ बिल्डर, इंडियन पॉर्न, लिंग बढाइये सारख्या पॉर्न साईट वर "चिमा साहेब" नावाखाली त्याचा नंबर टाकला. पोट भरून हसलो आणि नंबर ब्लॉक केला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Jan 2022 - 11:05 am | ज्ञानोबाचे पैजार

शेवटचा उपाय जालिम आहे,
एकदा करुन बघितला पाहिजे
पैजारबुवा,

मी बायजुच्या साईट नेहमी वापरते.
बंगलोरहून उठसूट फोन यायचा, व स्कालरशिप मिळेल हे करा ते करा! ब्लॉक केला शेवटी!खरा बायजु कडून होता की फसवणूक माहिती नाही.

sunil kachure's picture

31 Jan 2022 - 12:21 pm | sunil kachure

गूगल वर आपण जे seaech करतो त्या विषयातील जाहिराती येणे हे समजू शकतो.
आपण उस्तुकाता म्हणून काही चावट,कर्ज विषयी,अशा विषयात सर्च केले की .
तसे कॉल पण येणे सुरू होते
आपली सर्च हिस्टरी लीक कशी होते
हा प्रश्न उभा राहतोच

टोर न्याहाळक (ब्राऊझर) https://www.torproject.org/download/
आभासी जोडणी (VPN) वापरा

अजुनही त्रास होत असेल तर व्हर्चुअलबॉक्स https://www.virtualbox.org/wiki/Downloads व्यवस्थापित करुन हवे ते करा.

sunil kachure's picture

31 Jan 2022 - 12:34 pm | sunil kachure

चांगली माहिती दिल्या बध्दल.

sunil kachure's picture

31 Jan 2022 - 12:32 pm | sunil kachure

आता कमी झाले पण पाहिले टीवी चॅनल शॉपिंग चे कार्यक्रम चालवायचे
त्याकाळी स्लिम होण्या पासून सोफे,विविध किचन उपयोगी वस्तू,साड्या ,अगदी सेक्स stamina वाढवणारी औषध .
सर्व असायचे.
कोण तरी गोरा डेमो दाखवून जाहिरात केली जायची
साड्या विषयी असे कार्यक्रम खूप होते.त्या खाली काँटक्ट नंबर यायचे.
एकदा दुपारी असाच तो कार्यक्रम बघत असताना दिलेल्या नंबर वर कॉल केला.
तो प्रॉडक्ट घ्या म्हणून सांगत होता
मी नको मला त्याचे दर पटत नाहीत म्हणून कॉल कट केला.
नंतर त्यांनी स्वतः परत कॉल केला.
तेव्हा रागानी शिव्या देवून कॉल ठेवून दिला आणि तो नंबर ब्लॉक केला .
त्या दहा मिनिट तरी विविध नंबर वरून कॉल करून त्रास दिला.
नंबर ब्लॉक केला की दुसऱ्या नंबर वरून कॉल करायचा
शेवटी मीच माझा तो नंबर airplane मोड वर टाकला.
अशा टीव्ही वर चालणाऱ्या कार्यक्रम मधील नंबर वर कधीच कॉल करू नका.
ते पण fraud असतात.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

31 Jan 2022 - 1:19 pm | रावसाहेब चिंगभूतकर

एक महत्वाचे observation. परवाच एका मित्रा बरोबर ट्रिप ला जायचे बोलत होतो. बोलता बोलता हे ही बोललो की हॉटेल्स ही बुक करायला लागतील. कॉल संपल्यावर अक्षरशः काही सेकंदात booking.com चे नोटिफिकेशन आले जानेवारी मध्ये आणि फेब्रुवारी मध्ये हॉटेल्स बुकिंग करा म्हणून. परमिशन मॅनेजर मध्ये जाऊन चेक केले. Booking.com ला दोन्ही साठी, फोन आणि मायक्रोफोन, परमिशन डीनाईड आहे. त्याच्याकडून मला फारशा नोटिफिकेशन येत नाहीत. एकमेव जी आधीची सापडली ती 30 दिसेम्बर ची होती. आता बोला.

द ओनियनने आधीच सांगितले आहे!!

रावसाहेब चिंगभूतकर's picture

31 Jan 2022 - 11:27 pm | रावसाहेब चिंगभूतकर

मला पहिल्यांदा हे खरंच वाटलं. गड्या आपुला नोकिया 3315 बरा.

द ओनियनने सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी पुढे सत्य झाल्या आहेत. त्यामुळे सावध

गवि's picture

31 Jan 2022 - 1:40 pm | गवि

बोलण्यात जो विषय आला त्याबद्दल जाहिरात / सजेशन हे तर अगदी कॉमन झाले आहे. त्यात नाकारता येण्यासारखे काही नाही.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

31 Jan 2022 - 11:43 pm | रावसाहेब चिंगभूतकर

पण जर मी बुकिंग डॉट कॉम ऍप ला कशाचाच ऍक्सेस दिलेला नाही तर ही माहिती गूगल बुकिंग डॉट कॉम ला देतंय? This is very disturbing. आणि फक्त हे एकच ऑब्झर्वेशन नाही. या आधीही मी हे ऑब्झर्व केलंय. उदाहरणार्थ मी घरी एखादं गाणं टीव्ही वर ऐकत / गुणगुणत असेन (एखादं कडवं) आणि जर मोबाईल जवळ असेल आणि मला पूर्ण गाणं youtube वर ऐकायचं असेल तर पहिला शब्द टाइप करताच बरोबर तेच गाणं सर्च करताना पहिल्यांदा सर्च मध्ये येतं. या सगळ्यावर उपाय ठाऊक नाही, पण गूगल आपल्या आयुष्यात फार घुसखोरी करतंय असं वाटतं.

गवि's picture

1 Feb 2022 - 12:14 am | गवि

एकूण..

शूज, वॉशिंग मशीन, टॉईज, पिझ्झा असे शब्द असलेली वाक्ये पाच सहा वेळा स्मार्टफोन चालू असताना (कॉलमधे नव्हे.. नुसते सर्फिंग, तूनळी बघताना) बोलत राहायची. उदा. आय नीड न्यू शूज. चीप शूज. शूज फाटलेत. नीड स्पोर्ट्स शूज. असे म्हणत राहायचे. थोड्या वेळात (काही तास ते एक दिवस) तूनळी व्हिडिओजचे विषय पहायचे. पाचातले एक दोन किंवा तीन व्हिडिओ त्या शब्दावरुन असतील. लोकसत्ता, मटा किंवा अन्य गूगल ads एम्बेड करणारी पेजेस उघडून स्क्रोल करत जा. अन्य जाहिरातींत एक किंवा दोन बुटांच्या असतील. पूर्ण पान स्क्रोल करुन नीट बघा.

समजा बूट, वॉशिंग मशीन हे अगदी सामान्य शब्द वाटत असतील तर मधेच एकदा ऑड शब्द वापरुन पहा. उच्चार स्पष्ट आणि पुन्हा पुन्हा करा. वाक्यात शब्द ठेवा आणि समोरच्या व्यक्तीशी गप्पा करा. उदा. "मला होटेल रुम हवीय", "गोव्यात हॉटेल रुम स्वस्तात" अशी वाक्ये इंग्रजीत बोला.

कोणत्याही परमिशन दिलेल्या नसणे हे गृहीत धरले आहेच.

:-)

sunil kachure's picture

1 Feb 2022 - 11:05 pm | sunil kachure

हे घडतं ते कुकीजमुळे तुम्ही वेबसाइटला भेट देता आणि तेथे काही क्रियाकलाप करता, ते तुमच्या ब्राउझरवर कुकीज सेव्ह करतात. आता प्रश्न असा आहे की, या कुकीज काय आहेत? कुकी हा एक छोटा प्रोग्राम आहे जो वेबसाइटला तुम्हाला विशिष्ट वापरकर्ता म्हणून लक्षात ठेवण्याची परवानगी देतो.

प्रत्येक वेबसाइट हे काम करते आणि तुमचा मूड जाणून घेते. तुमच्या लक्षात आले असेल की, जेव्हा तुम्ही वेबसाइटला भेट देता तेव्हा तुम्हाला कुकीजला परवानगी देण्यास सांगितले जाते आणि तुम्ही त्याला यस करता.

यामुळे होतं काय की, तुमचा इतिहास तुमच्या कुकीजद्वारे जतन केला जातो आणि नंतर जाहिरात कंपन्या तुम्हाला सहजपणे ट्रॅक करतात. कारण जेव्हा तुम्ही वेबसाइटवर जाता, तेव्हा तुम्ही तिथे कुठे क्लिक केलेत, तुम्ही किती वेळ थांबता आणि कोणत्या विशिष्ट लिंक्सवर क्लिक करत आहात, त्याचा डेटा तयार केला जातो. त्या डेटाच्या आधारे तुम्हाला सर्वत्र तो कंटेन्ट दिसतो.

तुमच्या सर्व अ‍ॅक्टिव्हिटी लक्षात ठेवल्या जातात आणि त्यामुळे जाहिरात स्पेसमध्ये तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीनुसार जाहिराती दिसायला लागतात. त्याच वेळी, जर इतर कोणताही कंटेन्ट तुम्हाला हवा असेल, तर तुम्हाला फक्त मागील शोधाच्या आधारावर सामग्री मिळू लागते. जेव्हा तुम्ही एकाच प्रकारचे अधिक व्हिडीओ पाहता तेव्हा सोशल साइट्सवर तुम्हाला स्क्रीनवर अशाच प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात.

विशेष गोष्ट अशी आहे की, सर्व वेबसाइट्स एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि आपल्या कुकीज एकमेकांशी शेअर करतात, म्हणजेच इतर वेबसाइटलाही तुमच्या आवडीनिवडी किंवा नापसंतीची माहिती मिळते. हे आरोप फेटाळून लावले असले तरी लोकांचे संभाषण रेकॉर्ड करून डेटा तयार करून कंपन्यांना दिला जात असल्याचा आरोप अनेक कंपन्यांवर करण्यात आला आहे.

कुकीजचे माहीत आहे. तो वेगळा भाग आहेच. तसेही incognito मोड वापरुन कुकी स्टोरेज टाळता येते. आणि अबोव्ह ऑल त्यासाठी मुळात वेबसाईट व्हिजिट किंवा सर्च ब्राऊजरमधे करावी लागते.

इथे फक्त शब्द तोंडाने बोलणे असा भाग होता. तेही किवर्ड रुपात कुठेतरी शोषले जात असावेत असं मानण्याजोगे अनुभव येतात. अनेकांना आले असावेत.

उदा. चिकन, फ्रेश चिकन असे शब्द चर्चेत आले, फक्त एकमेकांत बोलताना वापरले पण कुठेही चिकन या विषयावर शब्द टाईप करुन सर्च केली नाही, त्याविषयीच्या (समजा वेन्कीज, गोदरेज रियलगुड चिकन किंवा KFC) वेबसाईट्स बघितल्या नाहीत. अलेक्सा, असिस्टंट यापैकी कोणाला वापरले नाही, तरी चिकनबद्दल व्हीडीओ, जाहिराती दिसणे असे अनेकदा अनेकांना अनुभवास आले आहे. चिकन ऐवजी च्यवनप्राश, बूट, टूर, स्मार्टवाच असे वेगवेगळे शब्द मानता येतील.

असे नसूही शकेल. निव्वळ योगायोग मात्र आश्चर्यकारक म्हणावा लागेल.

मुक्त विहारि's picture

31 Jan 2022 - 6:56 pm | मुक्त विहारि
sunil kachure's picture

1 Feb 2022 - 2:01 am | sunil kachure

मला ही शंका वाटते.
त्या मुलीने व्हॉट्सॲप वेब लं व्हॉट्स ॲप कनेक्ट करून नंतर लोग आउट करायचे विसरली असणार
आणि तो pc तिच्या ऑफिस मधील असावा ,किंवा कुठल्या सार्वजनिक ठिकाणचा.
एक शका..
बाकी अमेझॉन,रेड बस हे ॲप वापरले ह्याला काही अर्थ नाही

मुक्त विहारि's picture

1 Feb 2022 - 2:37 pm | मुक्त विहारि

तो बघावा ....

मला गेल्या महिन्यात भारती अ‍ॅक्सा मधून बोलतेय असे सांगून तीन चार वेळा फोन आले.
ती बाइ म्हणत होती की मी म्हणे जुन्या कंपनीत असताना २०१३ मधे एक पॉलीसी उतरवली होती.
त्याचा एकच हप्ता भरला (४९९९५ /- ) होता.
आणि आता ती पॉलीसी लॅप्स होऊन कंपनीत जमा होणार आहे. तुम्ही जर क्लेम करत असाल तर तुम्हाला २,३७०००/- मिळतील
तर कृपया कन्फर्म करा
मला स्वतःला अशी कोणतीही पॉलीसी उतरवल्याचे आठवत नाही. असे साम्गितले.
त्या बाईने मला कम्पनीने तुमच्याशी बरेच वेळा ईमेल ने सम्पर्क केला असे साम्गितले. नाव ,माझी जन्मतारीख ,पॉलीसी नम्बर वगैरे दिला. मात्र इमेल पत्ता थोडा चुकीचा सांगितला. ( . _ चा फरक)
मी भारती अ‍ॅक्सा च्या पोर्टलवर चेक केले. तो पॉलीसी नंबर डीटेल आणि ईमेल आयडी मॅच होत नव्हते.
त्या बाईने तीच्या साहेबाचा नम्बरही दिला आनि याम्च्याशी बोला असे साम्गितले.
मी त्याला फोन केला नाही.
त्या नम्बरही तीन चार वेळी फोन आले.
यात कसला प्लॅन होता कोण जाणे.
आता फोन येणे बंद झालंय

मुक्त विहारि's picture

1 Feb 2022 - 4:24 pm | मुक्त विहारि

पैसे लुबाडणे...

चौथा कोनाडा's picture

1 Feb 2022 - 5:08 pm | चौथा कोनाडा

मलाही "रिलायन्स इन्शुरन्समधुन बोलत आहे" असा फोन येतो.
साधारण विजूभाऊंना तपशील सांगितले तसेच असतात.
तेच अमीष असतं. मी झिडकारून टाकतो कारण मी असली पॉलिसी कधी काढलेलीच नसते.
.... आणि गंमत म्हण्जे दर वर्षी किंवा ६-८ महिन्याने असा फोन येतो ... गेली ५-६ वर्षे !

चौथा कोनाडा's picture

2 Feb 2022 - 5:42 pm | चौथा कोनाडा

बाप रे, खतरनाक प्रकरण आहे !
तब्बल 26,240 रू ना ठकवलं !

पुढे काही कारवाई झाली का ?

तर्कवादी's picture

1 Feb 2022 - 11:30 pm | तर्कवादी

आधी फेसबूकवर अ‍ॅड करुन मग मेसंजर वरुन चॅट करत व्हॉट्स अ‍ॅप नंबर मागणार्‍या मुलींमध्ये (म्हणजे मुलींच्या प्रोफाईलमध्ये) एक समान गोष्ट आढळून आली ती म्हणजे प्रोफाईलनुसार या मुलींचे व्यवसाय "ब्युटीशियन" वा ब्युटीपार्लरमध्ये काम असे नमूद केलेले असते.

जपंतारा नावाची मालिका पहिलाआहेत का?

भारताबाहेर तर याचा एक वेगळ्या प्रकारचं त्रास हितो त्याचा त्रास भारतातील चांगली कॉल सेंटर ला पण होतो
कास तर असा
१) मी माइक्रोसॉफ्ट किंवा टॅक्स ऑफिस ( औस्ट्रेलयंन टॅक्स ऑफिस ) मधून बॊलतोय असे भुक्कड फोन येतात ते माझ्य सारखया भारतीयांना येतातच आणि इतर ऑस्ट्रेलियन लोकांना पण येतात ... फसवणुकीचे असतात त्यामुळे आपण वैतागलेले असतो .. एकतर कटकट आणि दुसरे असे कि या मुळे भारताची बदनामी होते आणि स्थानिक लोकांकडून "तुम्ही भारतीय असले धंदे करता अश्या प्रकारची टीका ऐकावी लागते "
असा फोन आला तर कधी कधी त्यांची खेचतो काय वाटेल ते बोलत बसतो ..उगा आपल्याला अर्धवट भारतीय भाषा येतीय ,कॉल करणाऱ्याला गर्ल फ्रेंड आहे का? काहीही पण भीती हि वाटते कि जर या मागे गॅंग वैगरे असतील तर आपला पत्ता शोधून त्रास देतील का ?
अशी फसवणुकीची कॉल सेंटर भारत सरकार का नाही बंद करीत ? कि फसवलेला जाणारा भारताबाहेरील आहे म्हणून जाऊदे ना असे असते !
भारताचे नाव बदनाम होते सरकार ला कळत नाही का?
मागे जेवहा इस्राएल मधून बायनरी ऑप्शन चे अनेक फसवणूतिचे प्रकार चालू झाले तेवहा इस्राएल सरकार ने यावर कडक कारवाई केली होती !

२) या चिड्लेलंय अवस्थेत जर आपण एखाद्य खरंय ग्राहक सेवेला फोन केला आणि त्यांनी कॉल सेंटर जर भारतात ठेवले असेल तर आपण कधी कधी त्यांच्यावर कारण नसताना चिडतो

माझ्या माहीतीप्रमाणे सरकारने कारवाई केली आहे.

भारताचे नाव बदनाम होते सरकार ला कळत नाही का?

चौकस२१२'s picture

3 Feb 2022 - 12:17 pm | चौकस२१२

काय कारवाई केली कोण जाणे
अजूनही तसले कॉल येतात पुढे मी विजेचं बिलाचे उधारण दिले तो कॉल हा एक फार सफाईदार फसवणुकीचा प्रकार

Trump's picture

3 Feb 2022 - 12:28 pm | Trump

सहज येथे बघितले.

https://www.youtube.com/results?search_query=india+fake+call+centre+busting

अजूनही तसले कॉल येतात पुढे मी विजेचं बिलाचे उधारण दिले तो कॉल हा एक फार सफाईदार फसवणुकीचा प्रकार

नेहमीप्रमाणे चोर-पोलिसाचा खेळ असावा.

चौथा कोनाडा's picture

3 Feb 2022 - 12:14 pm | चौथा कोनाडा

जमतारा मालिका भारी होती. फसवणुकीचे रॅकेट एका गावातुन कसे चालते, त्यांची यंत्रणा कशी असते, संरक्षण कसे मिळते ई. तपशील भारी दाखवले होते.
पाहण्यासारखी मालिका.
पाहिली नसल्यास जरूर पहा.

पर्वा तर कहर झाला या फसणूक करणाऱ्यांची डोकी कुठे चालतील

इथे साधारण अशी प्रथा आहे कि विजेचे उत्पादन करणारी जरी एकाच संस्ताह असली तरी त्याचे विपणन करणार्या ३-४ कंपन्या असतात आणि तुम्ही त्यांचे कडे "ट्रान्स्फर " व्हा अश्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात आणि त्यासाठी काही ठराविक अर्ज असतात .. हे सगळे ठीक तर यावर बेतलेला एक नवीन फसवणुकीचा प्रकार
फोन येतो कि तुम्हाला विजेचं बिलावर पैसे वाचव्यायचे आहेत का ? आपण म्हणतो हा हे ठीक आहे कारण असले असा कोणत्यातरी टाय ३-४ कंपनी चा फोन पण प्रत्यक्षात तसे नसते कारण तसे असते तर फॉर्म भरून पाठवा/ आणि ती कंपनी आपल्याला माहित असते
हे "डील "असं
scammers will ask unsuspecting customers for copies of their Jacana Energy bills, obtaining their electricity account details in the process. Scammers will then make payments to the customer's Jacana Energy account on their behalf and subsequently ask the customer to pay them a portion of the bill minus an alleged discount.

Once the scammers have received the customer's payment, they will dispute their own payment made to Jacana Energy and get the payment reversed through their financial institution. This will leave the customer's Jacana Energy account outstanding and the customer potentially defrauded of a large sum of money.

sunil kachure's picture

3 Feb 2022 - 12:43 pm | sunil kachure

कसा चालतो हे लोकांना माहीत आहे म्हणजे बँका आणि सरकार ह्यांना माहीत असणारच.
१) kyc च्या नावाखाली आणि अकाउंट बंद होईल अशी भीती दाखवून अकाउंट ची माहिती मिळवून फसवणूक.
२) लॉटरी लागली आहे खूप मोठ्या रक्कमेची अशी लालुच दाखवून फसवणूक.

३) क्रेडिट कार्ड, विसा कार्ड ह्यांचे पासवर्ड मिळवून फसवणूक.
असे अनेक मार्गाने फसवणूक होते...

फुकट मिळणाऱ्या पैशाच्या हव्यासपोटी स्वतःच फासणारी लोक .
ह्यांना कोणी जबाबदार नाही त्याला ती लोक च जबाबदार आहेत.
पण बाकी प्रकारात जी फसवणूक होते.ह्याला बँका आणि सरकार पण जबाबदार आहे.
आपल्या ग्राहकांची सायबर security करणे हे बँका चे कर्तव्य च आहे.
त्याच्या कडूनच वसुली केली पाहिजे.सरकारी यंत्रणा आध्यावत नसल्या मुळे त्यांना तांत्रिक काही कळत नाही.
त्या मध्ये सरकार नी बदल केला पाहिजेत

देशपांडे विनायक's picture

3 Feb 2022 - 7:20 pm | देशपांडे विनायक

एक दीड वर्षापूर्वीची गोष्ट .
माझा मित्र घरी आला तेव्हा त्याचा चेहरा काळजीयुक्त दिसत होता .
कारण विचारल्यावर म्हणाला नातवाचे प्रताप !!
जरा सविस्तर सांगितलेस तर मलाही बरे वाटेल असे म्हणालो तेव्हा म्हणाला दोन दिवसापूर्वी ४००० ला टोला बसलाय.
आता आणखी कितीवेळा हा बसणार या चिंतेने झोप उडाली आहे.
मामला गंभीर आहे हे लक्षात आले.थोडा वेळ गेल्यावर सांगू लागला
दोन दिवसापूर्वी नातवाचा PC बंदच होईना .एक नोटीस स्क्रीनवर दिसत होती .
बेकायदेशीर PORN साईट्स बघितल्याबद्दल pc बंद करण्यात आला आहे.
शेजारील फोटो स्कॅन करून ४००० रुपये भरल्यावर pc वापरता येईल.
नातू घाबरला .पैसे भरणे त्याला शक्य नव्हते.आई वडिलांना सांगण्या इतके धैर्य नव्हते.
मुकाट्याने आजोबाकडे आला. आजोबांनी म्हणजे माझ्या मित्राने पैसे भरले.
नोटीस कशी दिसत होती असे विचारल्यावर म्हणाला
मी काय मूर्ख आहे का ? मी नोटीस नीट पाहिली.अरे त्यांनी कोणत्या कलमाखाली हा गुन्हा आहे तेही लिहिले होते.
माझा अनेक वर्षाचा अनुभव सांगत होता कि मित्राने खरोखरच मूर्खपणा केला आहे.
आता त्याची भीती कशी घालवावी याचा मी विचार करू लागलो.आणि एक दिवस मला उपाय सापडला .
मी रोज पोर्न साईट उघडू लागलो आणि दुसऱ्या नवीन tab वर माझे काम करू लागलो.
साधारण तीन आठवड्याने माझा pc पण lock झाला . मित्राने वर्णन केले तशीच नोटीस स्क्रीनवर दिसत होती
ती नोटीस बनावटआहे हे मला समजले. माझ्या mobile वर मी त्या नोटिशीचा फोटो काढला आणि माझ्या वकिलांना whatsapp वर पाठवून तो पाहण्यास फोन करून सांगितले.
पाच मिनिटात वकिलांचा फोन आला.
या वयात हिरोगिरी करू नका असे कठोर आवाजात सुनावले.
ती नोटीस बोगस आहे कि नाही हे विचारल्यावर म्हणाले तेवढे तुम्हाले नक्कीच समजते. पण तुमचा pc ह्याक होण्याचे chancess तुम्ही वाढवून ठेवलेत. आता बँकेचे सर्व password बदला आणि असली हिरोगिरी करू नका.
माझ्या मित्राला जेव्हा मी whatsapp वरील फोटो दाखवला आणि वकिलाचा नंबर दाखवला आणि त्यांना जाऊन भेटण्याचा सल्ला दिला तेव्हा तो म्हणाला ४००० रुपये अक्कलखाती जमा झाले.

ब्लॅक मिरर चा "शट अप अँड डान्स" नावाचा एपिसोड याच एक्झॅक्ट कल्पनेवर आहे.

चौथा कोनाडा's picture

3 Feb 2022 - 8:55 pm | चौथा कोनाडा

पुर्वी येऊन गेलेला मराठी सिनेमा "TC.GN :Take Care Good Night" हा याच विषयावर आहे.
याचे आयएमडीबी वर Rating: 7.5/10 असे आहे.

चौथा कोनाडा's picture

3 Feb 2022 - 8:58 pm | चौथा कोनाडा

उद्या रोबोट,ड्रायव्हर लेस car,विमानांना दिशा दाखवणारी यंत्र,ह्यांना जर कोणी टार्गेट केले तर केवढे मोठे संकट निर्माण होईल

sunil kachure's picture

3 Feb 2022 - 8:41 pm | sunil kachure

म्हणजे ऑफिस,रेल्वे स्टेशन,हॉस्पिटल
,कुठलेही जी वायफाय नेटवर्क सार्वजनिक प्रकारे वापरले जाते ते किती सुरक्षित असते.
कारण काही महत्वाच्या वेबसाईट अशा सार्वजनिक नेटवर्क वर ओपन होत नाहीत.
"तुमचे नेटवर्क सार्वजनिक आहे आणि ते सुरक्षेच्या दृष्टी नी धोकादायक आहे"
असा संदेश त्या साईट display करतात.
मोबाईल नेटवर्क आणि सार्वजनिक वायफाय नेटवर्क ह्यांच्या मध्ये सुरक्षेच्या दृष्टी नी खरंच फरक असतो का?

sunil kachure's picture

3 Feb 2022 - 8:47 pm | sunil kachure

लॅपटॉप,मोबाईल ह्यांची स्क्रीन जेव्हा शेअर केली जाते तेव्हा दोन्ही device एकच वायफाय नेटवर्क वर कार्यान्वित असणे गरजेचे असते .
तर त्याच permises मध्ये असलेली बाकी संगणकीय यंत्रणा माहिती हॅक करू शकते का?
संगणक मधील बिलकुल ज्ञान नसल्या मुळे माझा हा प्रश्न साफ चुकीचा पण असू शकतो.

नाही. ते कोणत्याही नेटवर्कने जोडले गेलेले असले पाहीजेत.

लॅपटॉप,मोबाईल ह्यांची स्क्रीन जेव्हा शेअर केली जाते तेव्हा दोन्ही device एकच वायफाय नेटवर्क वर कार्यान्वित असणे गरजेचे असते .

ते कोणता संगणक हॅक झाला ह्यावर अवलंबुन आहे. जर मुख्य संगणक (सर्वर), नेटवर्क (जर राउटरचा फर्मवेअर) हॅक झाला असेल तर मग अवघड आहे.

लॅपटॉप,मोबाईल ह्यांची स्क्रीन जेव्हा शेअर केली जाते तेव्हा दोन्ही device एकच वायफाय नेटवर्क वर कार्यान्वित असणे गरजेचे असते .
तर त्याच permises मध्ये असलेली बाकी संगणकीय यंत्रणा माहिती हॅक करू शकते का?

बाकी छोट्या व्हायरस, मालवेअरची इतकी भिती नसते.

शाम भागवत's picture

5 Feb 2022 - 2:40 pm | शाम भागवत

आला.
आज मला फोन आला.
बायकोने उचलला.
माझ्या वडिलांनी म्युच्युअल फंडात ५०००० गुंतवले असून मी नॉमिनी आहे.
पण मी घरात नसल्याने नंतर फोन करा असं बायकोने सांगितले आहे.
:)

शाम भागवत's picture

5 Feb 2022 - 2:42 pm | शाम भागवत

मुख्य म्हणजे फोन बीएसएनएल च्या लँन्डलाईनला आला. हा नंबर त्यांना कसा मिळाला काही समजत नाही. हैद्राबादहून बोलतोय म्हणे.