‘पंचाक्षरी’चे व्यसन !

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
21 Jan 2022 - 8:08 pm
गाभा: 

सध्या ऑनलाईन इंग्लिश शब्दखेळांचे विश्वात Wordle हा पंचाक्षरी खेळ जबरदस्त लोकप्रिय झालाय. याचा उल्लेख मी शब्दखेळांच्या ‘चौकटीतील रत्ने’ या जुन्या धाग्यावर केला होता. त्याला एक प्रतिसाद आला. मग असा विचार केला की, जास्तीत जास्त शब्दप्रेमींना तो माहित होण्यासाठी नवा धागा काढलेला बरा.
तुमच्यातील काहीजण हा खेळ खेळून त्याचा आनंद घेत असतील हे नक्की. परंतु माहित नसलेल्यांसाठी हा परिचय धागा.

हा खेळ तीन स्वरूपात उपलब्ध आहे :
1. दैनंदिन एक शब्द : याचे आतापर्यंत 216 भाग झालेत.

2. वरील सर्व जुन्या भागांचा संग्रहित खेळ

3. अमर्यादित खेळ

नवागतांसाठी आपण प्रथम दैनंदिन खेळ पाहू.
1. खेळ निर्मात्याने एक ५ अक्षरी शब्द योजलेला असतो. तो आपल्याला ओळखायचा आहे. त्यासाठी या शब्दाचा अर्थ/ भावार्थ/ समानार्थ इत्यादी काहीही दिलेले नाही. मग ओळखायचा तरी कसा ?
खेळाच्या पटलावर पाच अक्षरी सहा ओळी दिलेल्या आहेत. त्यातील पहिल्या ओळीत तुम्ही कुठलाही आवडीचा पंचाक्षरी शब्द लिहायचा उदाहरणार्थ CHAIR. मग खेळातील enter दाबायचे.
ते दाबल्यावर प्रत्येक अक्षराची चौकट एका रंगाने भरेल. हे रंग तीन प्रकारचे आहेत.
त्यांचा अर्थ असा :
१. हिरवा : ते अक्षर अपेक्षित शब्दात त्याच स्थानी आहे; म्हणजे बरोबर.
२. पिवळट : ते अक्षर शब्दात आहे पण तुमचे स्थान चुकले आहे.
३. राखाडी : ते अक्षर त्या शब्दात अजिबात नाही.

आता पहिल्या ओळीतील हे रंगीत दृश्य हेच तुमचे पुढचे शोधसूत्र ठरते. त्यानुसार तुम्ही सुधारित शब्द पुढच्या ओळीसाठी तयार करायचा.
हा करताना एक लक्षात ठेवायचे :
• हिरव्या अक्षराचे स्थान कायम ठेवायचे
वर ज्या अक्षरांची चौकट राखाडी झालेली आहे ती अक्षरे वापरायची नाहीत.
• जी अक्षरे पिवळी झाली होती त्यांचे स्थान बदलायचं.

आता याप्रकारे नवीन जुळवलेला शब्द दुसऱ्या रांगेत भरा. पुन्हा enter दाबा. पुन्हा चौकटी ३ रंगांनी भरतील.
असे करत करत जास्तीत जास्त सहा प्रयत्नात बरोबर उत्तर आले पाहिजे. ज्या क्षणी तुमचे उत्तर बरोबर येते तेव्हा सर्व चौकटी हिरव्या रंगाने भरतात व खेळ संपतो.
...
एव्हाना तुमच्या लक्षात येईल की हा खेळ आपल्यातील कोणीही खेळू शकतो- अगदी दहावी पास विद्यार्थी देखील ! त्यासाठी शब्दार्थ, समानार्थ अशा भाषाज्ञानाची गरज नाही. तुम्हाला लढवायचा आहे तो तुमचा तर्क.

या प्रकारे दैनंदिन खेळ तीन-चार दिवस खेळलात की त्याची गोडी लागते. लवकरच त्याचे व्यसन जडते ! मग 24 तासांसाठी फक्त एक शब्द पुरत नाही. 😀
मग काय करायचे ? घाबरू नका त्यासाठी पुढची पायरी तयार आहे :

2. संग्रहित खेळ : इथे हवा त्या प्रकारे खेळ निवडण्याचे विविध पर्याय आहेत. त्यातील choose बटणावर टिचकी मारल्यावर तुमच्यापुढे १ पासून कालपर्यंत झालेल्या दिवसांचे अंक आहेत. कुठल्याही शब्दाचे उत्तर अर्थातच कुठेही दिलेले नाही. तुम्ही कुठलाही अंक निवडा किंवा Random हे बटन निवडूनही खेळ सुरू करू शकता. या प्रकारे तुम्ही एकाहून अधिक शब्द लागोपाठ तुमच्या आवडीनुसार खेळू शकता. हे खेळता-खेळता तुमचे इथले सर्व शब्द संपले आणि तुम्ही जर अट्टल व्यसनी झालेला असाल तर मग पुढची पायरी तयार आहे : 😄

3. अमर्यादित खेळ : तुमच्या सवडीने कधीही इथे या आणि हवे तेवढे खेळत बसा ! पण याची शिफारस मी करत नाही. इथे त्यांनी शब्दखेळांचे काही मूलभूत नियम पाळलेले नाहीत.

नवोदितांनो,
या तर, सुरू करा या खेळाच्या दैनंदिन प्रकारापासून. तुमचे अनुभव जरूर लिहा. मात्र एखादा दिवस(24 तास) संपल्याशिवाय ओळखलेला शब्द इथे लिहू नका. कारण तोच शब्द त्या संस्थळावर सर्वांसाठी समान असणार आहे.

या पंचाक्षरीचे व्यसन लागण्याची खात्री आहे !
तेव्हा स्वतःच्या जबाबदारीवर त्यात पडा !!
पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!!
तर्कबुद्धी मात्र तल्लख होईल !!!! 😉
……………………………………………………………………………………………………………………………..

प्रतिक्रिया

रश्मिन's picture

21 Jan 2022 - 9:39 pm | रश्मिन

धन्यवाद कुमार जी ! ह्या झक्कास खेळाबद्दल लिहिले ते बरे झाले !
गेले चार दिवस खेळतोय आणि पुढच्या दिवसाच्या शब्दाची वाट आतुरतेने पाहत असतो :) आणि संग्रहित खेळाची लिंक दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे ! वीकांताची सोय झाली
g

कुमार१'s picture

21 Jan 2022 - 9:43 pm | कुमार१

उद्या परवा मिळून किती शब्द संपवताय ते सांगा !
:)
शुभेच्छा

गुल्लू दादा's picture

22 Jan 2022 - 9:13 pm | गुल्लू दादा

छान ओळख. बघावे लागणार खेळून.

कंजूस's picture

23 Jan 2022 - 5:01 am | कंजूस

छान ओळख.पण खेळून बघणार नाही. ही शब्दकोडी आवडत नाहीत.
-----------
शब्दकोडी म्हटल्यावर लगेच लक्षात आले की तुम्ही सध्या 'प' अक्षराने नाव सुरू होणारे लेख लिहीत आहात.

कुमार१'s picture

23 Jan 2022 - 5:40 am | कुमार१

ज्यांना आवडतात त्यांनी जरूर खेळा.

*'प' अक्षराने नाव सुरू होणारे लेख
योगायोग ! :)

चांदणे संदीप's picture

24 Jan 2022 - 11:53 am | चांदणे संदीप

मी तीनही प्रकार खेळून पाहिले.

CRIMP हा शब्द तीन वेळा मला आला. संग्रहित ऑप्शनमुळे भारी टाईमपास मिळाला.

सं - दी - प

कुमार१'s picture

24 Jan 2022 - 12:03 pm | कुमार१

हा एक भन्नाट आहे.... बघा

ok

चांदणे संदीप's picture

24 Jan 2022 - 6:59 pm | चांदणे संदीप
चांदणे संदीप's picture

24 Jan 2022 - 7:09 pm | चांदणे संदीप

Wordle 161 5/6

पाचव्या प्रयत्नात जमलं.

पण टिल्डे!!

सं - दी - प

कुमार१'s picture

24 Jan 2022 - 7:41 pm | कुमार१

संदीप, छान पण
कुठलेही उत्तर फोडू नका म्हणजे अन्य लोकांना ते आव्हान कायम राहील !

त्यापेक्षा तुमच्या संपूर्ण रंगीत चौकटीचा स्क्रीनशॉट इथे चढवायचा असतो.
म्हणजे तुम्हाला आल्याचा तो पुरावा होतो आणि इतरांनाही उत्तर समजत नाही 😀

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Jan 2022 - 12:23 pm | ज्ञानोबाचे पैजार

CRIMP मलाही सोडवता आला, जाम भारी वाटले,

ह्या कोड्याचे स्वरुप पाहिल्यावर एक आयडिया डोक्यात आली,

पहिल्या ५ X ५ च्या चौकटीत भरण्याकरता ५ असे शब्द शोधायचे की ज्यांच्यात इंग्रजी वर्णमालेतली जास्तीजास्त अक्षरे येतील. (२६ पैकी २५ येणे अशक्य आहे याची जाणिव पहिल्या दोनतीन प्रयत्नातच झाली)

असा ५ शब्दांचा संच जर ठरवता आला तर कोड्यातला शब्द शोधण्याकरता जास्तिजास्त क्लु मिळतील.

सध्या अश्या ५ शब्दांचा संच बनवायचा उद्योग करतो आहे.

पैजारबुवा,

कुमार१'s picture

24 Jan 2022 - 12:30 pm | कुमार१

छान कल्पना

सध्याची एक ठराविक युक्ती अशी आहे:

पहिल्या दोन ओळींमध्ये असे शब्द घालायचे की त्यात इंग्लिशचे पाचही स्वर (a e i o u) येऊन जातात.
त्यातून नंतर y ची गरज आहे का ते समजते

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Jan 2022 - 2:22 pm | ज्ञानोबाचे पैजार

शब्द चौकटीच्या वर एक Letters असे लिहिलेला टॅब आहे, त्या टॅब चे बटन पुढे मागे केले की कोड्यातील अक्षर संख्या बदलता येते. कमीतकमी ४ आणि जास्तीजास्त ११ अक्षरांच्या शब्दांचे कोडे आपल्याला सोडवता येते.

पैजारबुवा,

कुमार१'s picture

24 Jan 2022 - 2:46 pm | कुमार१

छान माहिती.
पण ही सोय फक्त संग्रहित खेळाला दिसते आहे; दैनंदि ला नाही.
बरोबर ना ?

मित्रहो's picture

24 Jan 2022 - 3:36 pm | मित्रहो

कालचा शब्द जमला आजचाही आला.

टर्मीनेटर's picture

24 Jan 2022 - 4:07 pm | टर्मीनेटर

हा शब्दखेळ खेळण्यात येणार आहे!
मागे काही वर्षांपूर्वी मला संगणकावर Hangman ह्या शब्दखेळाचे व्यसन लागले होते 😀

तुषार काळभोर's picture

25 Jan 2022 - 8:14 pm | तुषार काळभोर

अंदाजे १०-१२ वर्षांपूर्वी गुगलचं होमपेज iGoogle नावाने कस्टमाइज करता यायचं. तेव्हा त्यामध्ये मी हॅन्गमॅन ठेवला होता. प्रत्येकवेळी क्रोम ओपन केलं की समोर हॅन्गमॅन दिसायचा आणि ५-१० वेळा खेळल्यावर बाकी कामे सुरू.
बाकी एक ट्रिक दोन्हीकडे उपयोगी आहे. E T A I N O S H R ही याच क्रमाने सर्वाधिक वापरली जाणारी अक्षरे आधी वापरायची.

कुमार१'s picture

25 Jan 2022 - 8:56 pm | कुमार१

E T A I N O S H R ही याच क्रमाने सर्वाधिक वापरली जाणारी अक्षरे आधी

>>>>
छान.
बरेच लोक पहिला शब्द ADIEU आणि दुसरा शब्द ROYAL हा वापरतात. त्यामुळे सर्व स्वर मंडळी त्यात उरकून जातात. पण अधूनमधून आपल्या मनाप्रमाणे वेगवेगळे शब्द घालावेत म्हणजे मजा येते हा अनुभव.

कुमार१'s picture

3 Feb 2022 - 7:14 pm | कुमार१

इथे या खेळाचे सुरेख विश्लेषण आहे. त्यानुसार इथे
E T A I N O S H R हा क्रम नको. त्या ऐवजी

ERAOTI LSCNUD हा क्रम चांगला .

कुमार१'s picture

24 Jan 2022 - 4:15 pm | कुमार१

याड लागणार हे म्या आधीच सांगितलं होतं !
हां, ज्यांना जमत आहेत त्यांनी एकदा तरी त्या रंगीत चौकटीचा पुरावा द्यायाचा असतो बरं का ! :)

जमू लागले की संग्रहित खेळातले 19, 78, 108 & 161 हे आव्हान म्हणून सोडवायला घ्याच....

दोन्ही दिवस पाचव्या प्रयत्नात जमले. धन्यवाद.

मित्रहो's picture

24 Jan 2022 - 5:51 pm | मित्रहो

असा जमला
WEARY
BRICK
CRISP
CRIMP

आजचे गणित उद्या. तीन प्रयत्नात जमले

वामन देशमुख's picture

24 Jan 2022 - 5:56 pm | वामन देशमुख

याड लागलं की हो, कुमार१!

कालचा प्रयत्न -
PRICE
CRIPS
CRIMP

कामातून आत्ताच मोकळा झालोय, आता ओरडले wordle कडे धाव!

कुमार१'s picture

24 Jan 2022 - 6:12 pm | कुमार१

वरील सर्व मंडळी,
छान खेळताय हो !
व्यसनी कंपूत सहभागी झाल्याचा आनंद आहेच.

खेळत असताना अधूनमधून J, K, X या 'मागासवर्गीय' अक्षरांकडे पण लक्ष राहू द्या !

टर्मीनेटर's picture

24 Jan 2022 - 7:50 pm | टर्मीनेटर
टर्मीनेटर's picture

24 Jan 2022 - 8:02 pm | टर्मीनेटर

संग्रहीत मधलं (Random) चौथ्या प्रयत्नात जमलं!

1

कुमार१'s picture

24 Jan 2022 - 8:05 pm | कुमार१

अभिनंदन !
आता हा खेळ तुमच्यासाठी औषधासारखीच जादू करणार आणि तुम्ही लवकरच पूर्ण तंदुरुस्त होणार ....

कुमार१'s picture

25 Jan 2022 - 6:07 pm | कुमार१

दैनंदिन शब्द कोणी सोडवला का?
एकदम परिचयाचा आहे
ज्यांना सुरुवात करायची असेल त्यांच्यासाठी तर उत्तम

पुंबा's picture

25 Jan 2022 - 6:49 pm | पुंबा

लगेच सुटला.

मित्रहो's picture

25 Jan 2022 - 6:50 pm | मित्रहो

परिचयाचा शब्द आहे

एकदम ग्वाड वाटलं सोडवून आजचा शब्द.

राघवेंद्र's picture

26 Jan 2022 - 9:03 am | राघवेंद्र

:)

या खेळाचे खरोखरच व्यसन लागते. मी खेळायला सुरूवात केल्यापासून बहुतेक शब्द तिसर्‍या किंवा चौथ्या प्रयत्नात सुटले. संग्रहित खेळांच्या संचातील रँडम कुठला तरी खेळ निवडून सोडवत बसतो आजकाल. ही तर्कक्रीडा मेंदू फ्रेश ठेवायला फार उपयोगी ठरेल.
बादवे, एक सुचना: एखादा शब्द अडला आणी काही केल्या सुचत नसला तर थोड्या वेळ इतर कशात तरी डोके घालावे, परत शब्दाकडे आले की क्षणार्धात कोडे सुटते. outdo या शब्दाने २० मिनिटे खाल्ली. एक मेल चेक करून परत आलो तर जादू व्हावे तसे उत्तर चमकून गेले. ही तर मेंदूची फेवरिट ट्रिक.

कुमार१'s picture

25 Jan 2022 - 7:09 pm | कुमार१

*

परिचयाचा शब्द आहे

>>> अ-ग -दी-च !

*

एखादा शब्द अडला आणी काही केल्या सुचत नसला तर थोड्या वेळ इतर कशात तरी डोके घालावे,

>> +१११
माझा पूर्वी लिहिलेला अनुभव सांगतो :

एखादा शब्द जाम सापडत नसला की तेव्हा आपण त्याचा नाद सोडतो. पण, त्या दिवसभर तो सापडेपर्यंत ते शोधसूत्र आपल्या डोक्यात असते. मग अगदी एकदम एखाद्या क्षणी डोक्यात वीज चमकावी तसे आपल्याला ते उत्तर मिळते. अशा प्रकारे कोडे सुटण्याची ठिकाणे बऱ्याचदा स्वच्छतागृह, रस्ता किंवा व्यायामशाळा असतात, हा स्वानुभव आहे. आपण जेव्हा या ठिकाणी असतो तेव्हा आपला मेंदू एक प्रकारे विश्रांतीच्या अवस्थेत असतो आणि त्यामुळे असे घडत असावे असा माझा अंदाज आहे. तेच जर आपण कोड्याचा कागद / मोबाईल जवळ घेऊन खूप वेळ उत्तर शोधत बसलेलो असू, तर मेंदूच्या थकव्यामुळे उत्तर काही येत नाही. कधीकधी तर ही शोधप्रक्रिया स्वप्नात देखील चालू राहते आणि त्यात ‘युरेका’ चा क्षणही येतो. पण जागे झाल्यावर मात्र त्याबद्दल काहीही आठवत नाही !

कॉमी's picture

26 Jan 2022 - 9:23 am | कॉमी

Wordle चे व्यसन लागणे सहज शक्य आहे, पण दैवकृपेने दरदिवशी एकच वर्डल खेळता येत असल्याने केवळ आजच्या वर्डल बद्दल विचार करणे इतकाच वेळ काय तो वाया जातो. पण असे कोडे डोक्यात भुणभुणणे हे कोडे सोडवण्याइतकेच मजेशीर असते.

कुमार१'s picture

26 Jan 2022 - 9:35 am | कुमार१

पण दैवकृपेने दरदिवशी एकच वर्डल खेळता येत असल्याने

>>> नाही !
संग्रहित खेळाचा दुवा दिलाय ना लेखात .
इच्छा असल्यास कितीही खेळू शकता एके दिवशी :)

रोज एक ही चांगली सवय आहे; व्यसनापासून लांब.

चांदणे संदीप's picture

26 Jan 2022 - 10:47 am | चांदणे संदीप

Wordle 221 5/6

पाचव्या प्रयत्नात जमला.

सं - दी - प

कुमार१'s picture

26 Jan 2022 - 11:33 am | कुमार१

मला पण चौथ्या प्रयत्नात जमला
शब्द नेहमीच्या वापरातला नसला तरी त्याचे मराठी रुपांतर जी ए कुलकर्णी यांच्या कथांमध्ये बऱ्यापैकी वाचले होते.!

कुमार१'s picture

27 Jan 2022 - 8:58 am | कुमार१

ज्यांचा या खेळाचा पुरेसा सराव झाला असेल आणि त्यात गोडी लागली असेल त्यांच्यासाठी या खेळाची नवी आवृत्ती आलेली आहे.

त्या संबंधी माहिती भाग २ मध्ये

स्वागत !

रुपी's picture

29 Jan 2022 - 1:13 am | रुपी

अरे वा!

कुठलीही कोडी सोडवायला नेहमीच आवडते, त्यामुळे अजून एका नवीन खेळाची ओळख झाली ते छान! धन्यवाद!

आम्ही कॉलेजमध्ये "Cows & bulls" हा खेळ खेळायचो. हा साधारण तसाच आहे. फरक हा, की 'Cows & bulls' मध्ये पाह ऐवजी चार अक्षरे असतात आणि १० संधी असतात.

कुमार१'s picture

29 Jan 2022 - 7:46 am | कुमार१

Cows & bulls"बद्दल काही माहीत नव्हते
धन्यवाद !

या खेळात स्वागत आहे
तुमचे अनुभव जरूर लिहा

काम सोडून हेच करत बसले :D
भरपूर सोडवले. आतापर्यंत सगळे बरोबर आले आहेत.

वर तुम्ही आव्हान म्हणून सुचवले आहेत ते पुढच्या आठवड्यात सोडवायला घेईन

कुमार१'s picture

29 Jan 2022 - 11:59 am | कुमार१

नंतर हा खेळ सोपा वाटू लागला की मग भाग २ ला जरूर भेट द्या
तिथे वेगळी गंमत आहे !

कुमार१'s picture

30 Jan 2022 - 11:16 am | कुमार१

आजचा शब्द देताना निर्मात्यांनी काही मूलभूत नियम पाळलेले नाहीत.

खेळात भूतकाळ, तृतीय वचनी वर्तमानकाळ, अनेक वचने असायला नकोत.

कुमार१'s picture

31 Jan 2022 - 12:50 pm | कुमार१

या प्रकारच्या खेळांमध्ये आपण यथावकाश मुरतो. मग अशी स्थिती येते जेव्हा दैनंदिन Wordle चुटकीसरशी सुटते; absurdle पळवून पळवून दमवते आणि नकोसे वाटते. तेव्हा पुढचे आकर्षण म्हणून Dordle हा खेळ बघा.

सोडवलेला नमुना
ok

कुमार१'s picture

1 Feb 2022 - 12:31 pm | कुमार१

दैनंदिन खेळ त्याच्या निर्मात्याने न्यूयॉर्क टाईम्सला विकला आहे सध्यातरी तो सर्वांसाठी मोफत उपलब्ध राहील.

https://www.cbc.ca/amp/1.6334285

सुखीमाणूस's picture

11 Feb 2022 - 3:12 am | सुखीमाणूस

www.shabdak.com

सुरेख प्रयत्न आहे मरठी मध्ये. या मध्ये सुचना साठी उत्तम मराठी वापरले आहे.

कुमार१'s picture

11 Feb 2022 - 7:45 am | कुमार१

सदर संस्थळ सुरक्षित नाही असे माझा संगणक सांगतो. म्हणून मी तिकडे गेलो नाही.

सोडवले. तीन अक्षरे आणि काना मात्र जोडाक्षर काहीही घेतले नसल्याने मर्यादित स्कोप वाटला. तसेही जोडाक्षरे, काना, मात्रा, वेलांटी (पुन्हा वेलांटी / उकाराचे ह्रस्व दीर्घ) हे सर्व वापरले तर या खेळाचा फोर्म्याट जपणे अवघड आहे. मुळात रोमन प्रकारच्या स्पेलिंगसाठी ही रचना जास्त योग्य आहे. भारतीय भाषांसाठी वेगळी पद्धत शोधावी लागेल.

कुमार१'s picture

11 Feb 2022 - 8:39 am | कुमार१

सहमत.
मराठीमध्ये इंग्लिशची जशीच्यातशी नक्कल करण्याऐवजी मी एक पर्यायी खेळ सुचवतो. तो असा:

खालील अक्षरांपासून जमतील तितके किमान ३ अक्षरी शब्द करा:

का श थ
र वे प
द शी र

निर्मात्याने सांगून ठेवायचे की कमीतकमी इतके शब्द झाले पाहिजेत.
हा खेळ कोणतीही संगणकीय प्रणाली न लागता सहज खेळता येतो.

कुमार१'s picture

15 Feb 2022 - 11:35 am | कुमार१

भूगोल प्रेमींसाठी या खेळाचे नवे प्रारूप : Worldle

https://www.hawkdive.com/worldle-a-unique-map-wordle-for-geography-lovers/

इथे फक्त देशाचे नाव लिहायचे आहे. नेहमीप्रमाणे सहा प्रयत्न.
प्रत्येक प्रयत्नात आपले उत्तर चुकीचे असेल तर ते आपल्याला अपेक्षित उत्तराचा देश आपण सांगितलेल्या देशापेक्षा किती किलोमीटर लांब आहे आणि कुठल्या दिशेला आहे ते दाखवते.

कुमार१'s picture

17 Feb 2022 - 11:28 am | कुमार१

आज भूगोलाचे Worldle (#27) सोडवले आणि चक्क दुसऱ्या प्रयत्नातच बरोबर आले.

पहिला देश मी मनाने लिहिला होता. त्यावर 13970 किलोमीटर लांब आणि मार्गदर्शनाची दिशा दाखवण्यात आली. त्यावर मी नकाशा न बघता अंदाजे टाकला आणि मटका मस्त बसला !
2/6

कुमार१'s picture

5 Mar 2022 - 8:19 pm | कुमार१

worldleहा खेळ सोडवण्यासाठी मी दुकानातून एक मोठ्या आकाराचा छापील जगाचा नकाशा घेऊन आलो आहे. त्यात बघून सोडवायला सोपे जाते.

परवा त्यांनी Diego Garcia यासारखे भूभाग सुद्धा ओळखायला सांगितले होते. ते संगणकावरील मर्यादित जागेत शोधणे खूप अवघड जाते. पसरून ठेवायचा मोठा छापील नकाशा आणल्याने पुन्हा एकदा शाळेत गेल्याचा आनंद मिळत आहे.

गवि's picture

6 Mar 2022 - 2:55 pm | गवि

पण पण पण..

ये तो चीटिंग है ना?

;-)

कुमार१'s picture

6 Mar 2022 - 3:02 pm | कुमार१

नाही हो !
हा खेळ वर्डलसारखा अक्षरांच्या आदलाबदलीचा नाही तो नकाशात बघूनच सोडवत जायचे आहे

रोज सोडवतोय (म्हणजे दोन वेळा ६ प्रयत्न संपून गेले हे कबूल). पण नकाशात शेप शोधून देश ओळखणे हे म्हणजे ओपन बुक टेस्टसारखे..

तो शेप बघून अंदाज लावणे हाच खरा मजेचा भाग असे वैयक्तिक मत.

आणि अर्थात वरील प्रतिसादही गंमतीनेच दिला होता. :-)

कुमार१'s picture

6 Mar 2022 - 3:38 pm | कुमार१

कबूल :)

अमेरिकन त्रिशंकू's picture

11 Mar 2022 - 9:48 pm | अमेरिकन त्रिशंकू

खरी मजा नकाशात न बघता सोडवण्यात आहे. याची अर्काइव्ह्ज इथे आहेत.
https://web.archive.org/web/*/https://worldle.teuteuf.fr

अजून तरी सर्व उत्तरं आली आहेत फेब १ पासून आजपर्यंत.

ह्या खेळाचा मराठी अवतार शब्दक ह्या नावाने इथे उपलब्ध झालेला दिसतो.

खेळाची स्रोतसामग्रीही ह्या ठिकाणी उपलब्ध आहे.

राघवेंद्र's picture

11 Mar 2022 - 8:51 pm | राघवेंद्र
राघवेंद्र's picture

11 Mar 2022 - 8:52 pm | राघवेंद्र
राघवेंद्र's picture

11 Mar 2022 - 8:56 pm | राघवेंद्र

माफ करा खूप प्रतिसाद झाले.

error येत होती.

कुमार१'s picture

11 Mar 2022 - 9:11 pm | कुमार१

दुर्मिळ योग
त्याप्रीत्यर्थ ही सप्तपदी झाली....:)

टोकेरी कंस वापरत असल्यास टाळावे. Html tag समजले जाऊन अदृश्य होते टेक्स्ट.

बाकी वर्डल दुसर्या प्रयत्नात आले होते एकदा. पण पहिल्या प्रयत्नात म्हणजे अतिदुर्मिळ. अभिनंदन..

Bhakti's picture

11 Mar 2022 - 9:42 pm | Bhakti

265
4/6
पहिल्यांदाच खेळले.सोप होतं.

कुमार१'s picture

12 Mar 2022 - 7:08 am | कुमार१

सोडवून बघायला हरकत नाही.
या प्रकारात मी पहिला शब्द खालील तीन पैकी घेतो:
Police, notice, futile.

अनुभव चांगला आहे
....
Lewdle मध्ये मला एकदाच पहिल्या प्रयत्नात जमले होते !

कुमार१'s picture

13 Mar 2022 - 9:19 am | कुमार१

या आठवड्यात भूगोलाच्या खेळात दोनदा कधीही न ऐकलेल्या दोन बेटांचा समावेश होता.

सर्वसाधारण नकाशात त्यांची नावे सुद्धा लिहिलेली नसतात. कालचेही त्यातलेच होते.
....

कुमार१'s picture

17 Mar 2022 - 4:19 pm | कुमार१

#worldle #55 3/6 (100%)

आजचे शोधायला एक महासागर धुंडाळावा लागला.

कुमार१'s picture

19 Mar 2022 - 11:46 am | कुमार१

#Worldle #57 2/6

आजच्या देशाला पृथ्वीच्या उत्क्रांतीमध्ये विशेष महत्त्व आहे.

अमेरिकन त्रिशंकू's picture

19 Mar 2022 - 9:20 pm | अमेरिकन त्रिशंकू

अजून एक हिंट
या नावाचे ३-४ अॅनिमेटेड (इंग्रजी) चित्रपट पण आहेत

कुमार१'s picture

21 Mar 2022 - 9:52 am | कुमार१

आजचा हा कुठलातरी कोपऱ्यातला देश "ऐकला" नाही बुवा कधी !

#Worldle #59 4/6

गवि's picture

21 Mar 2022 - 10:53 am | गवि

:-))

क्लू देण्याची तुमची सवय काही जात नाही बुवा. ;-)

कुमार१'s picture

21 Mar 2022 - 11:03 am | कुमार१

काय करणार!
चांगले भारत, अमेरिका ,कॅनडा ,ब्राझील असे देश दिले तर काही गरज नाही हो
:))
काही तरी हुडकून काढतात हे लोक

तुषार काळभोर's picture

21 Mar 2022 - 4:29 pm | तुषार काळभोर

५१ खेळलो. ९८% जमले.
आज लागोपाठ २५व्यांदा जमले.
एकदा दुसरा प्रयत्न (मी पहिले दोन शब्द POWER आणि NASTY वापरतो. एकदा हवा असलेला शब्दच NASTY होता..!)
१० वेळा तिसरा प्रयत्न
१३वेळा चौथा
१६ वेळा पाचवा प्रयत्न
९ वेळा सहावा प्रयत्न

कुमार१'s picture

21 Mar 2022 - 5:18 pm | कुमार१

वा ! छान आढावा.
आता या सहा अक्षरीच्या मैदानात....
:)

तुषार काळभोर's picture

5 May 2022 - 6:10 pm | तुषार काळभोर

आज इतका अनपेक्षित शब्द होता.
3

अरे स्पॉइलर्स नका टाकत जाऊ भाऊ. आजचे कोडे वाया गेले. :-(

तुषार काळभोर's picture

6 May 2022 - 12:26 am | तुषार काळभोर

मला वाटलं आता पाच अक्षरी कोणी खेळत नसेल.
शिवाय संध्याकाळचे सहा वाजून गेले होते.

पॉइंट नोटेड. पुढच्या वेळी योग्य तिथे मास्किंग केले जाईल..

कुमार१'s picture

5 May 2022 - 6:25 pm | कुमार१

म्हटले तर विशेषनाम
म्हटले तर क्रियापद !

राघवेंद्र's picture

6 May 2022 - 2:55 am | राघवेंद्र

माझेही असेच झाले

कुमार१'s picture

24 Mar 2022 - 11:34 am | कुमार१

आजचा देश अगदी ठळक असून प्रथमच पहिल्या फटक्यात जमला !

#Worldle #62 1/6

कुमार१'s picture

25 Mar 2022 - 10:19 am | कुमार१

६ अक्षरीचे संस्थळ व नाव बदलले आहे .

योग्य अक्षरासाठी आता निळा रंग येतो
.....
भूगोल :
#Worldle #63 1/6 (100%). सोपा !

कुमार१'s picture

5 May 2022 - 6:26 pm | कुमार१

सहा अक्षरीच्या संस्थळावर
चार पाच व सहा अक्षरी अशा तीन खेळांचा एकत्रित अंतर्भाव केलेला आहे.

मित्रहो's picture

5 May 2022 - 11:09 pm | मित्रहो

आज पंचाक्षरीचे शतक पूर्ण झाले. ९९ प्रतिशत यश आतापर्यतं
एकदा Lollypop समजून lolly च्या मागे धावलो आणि Lowly वाटले.

कुमार१'s picture

6 May 2022 - 7:14 am | कुमार१

या खेळाचा आनंद लुटणाऱ्या सर्वांना शुभेच्छा !
अनुभवांची देवाण-घेवाण होतच राहील...

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2022 - 10:45 am | प्रसाद गोडबोले

सांख्यिकीय दृष्टीकोन !

आमच्या सांख्यीकीय फील्ड मध्ये काम करणार्‍या एका मित्राने वर्डल सोडवण्याची ऑप्टिमल स्ट्रॅटेजी शोधुन काढली आहे ती म्हणजे -
ब्लॅक यंग डेप्थ आणि फर्म्स
हे चार शब्द पहिल्यांदा वापरायचे. ह्या चार शब्दात २० वेगवेगळे लेटर्स आहेत आणि सर्वच्या सर्व वॉवेल्स कव्हर केली जात आहेत , आणि समजा ह्यातही सर्व ५ भिन्न लेटर्स न मिळाल्यास उर्वरीत लेटर्स ही क्यु , डब्ल्यु , झेड, जे, एक्स , आणि व्ही ह्यामधीलच असणार हे निश्चित होते .

सो बहुतांश केसेस मध्ये तुम्हाला पाचव्या ट्राय फायनल सोल्युशन मिळुन जाते ! हा सक्सेस रेट वापरुन आमचा स्कोर १००% आहे !

स्टॅटिस्टिक्स रॉक्स !!

राघवेंद्र's picture

10 May 2022 - 1:47 am | राघवेंद्र

ही पद्धत रॉक्स

कुमार१'s picture

13 May 2022 - 1:34 pm | कुमार१

#Worldle #112 4/6 (100%)

आजचा न ऐकलेला देश शोधल्यानंतर मला हिंदी चित्रसृष्टीतील एका बहुचर्चित अभिनेत्रीची आठवण झाली !

कुमार१'s picture

20 May 2022 - 4:21 pm | कुमार१

Worldle #118 3/6 (100%)

कालचा देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे
त्याचे सर्वात नवे नाव सर्व नकाशांमध्ये नसते

कुमार१'s picture

19 Jun 2022 - 10:18 am | कुमार१

कालच्या आणि आजच्या देशांचा आकार अगदी शिस्तबद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे पहिल्या प्रयत्नात ओळखता आले

#Worldle #149 1/6

केंट's picture

20 Jun 2022 - 1:11 pm | केंट
केंट's picture

20 Jun 2022 - 1:11 pm | केंट
केंट's picture

20 Jun 2022 - 1:21 pm | केंट
कुमार१'s picture

23 Jun 2022 - 10:39 am | कुमार१

#Worldle #153 4/6 (100%)

आजचा जो देश आहे, त्यांची कथाकथन ही समृद्ध परंपरा आहे.

कुमार१'s picture

3 Jul 2022 - 9:28 am | कुमार१

जगातील तीन देशांचे एक समान भौगोलिक वैशिष्ट्य आहे.
या प्रत्येक देशाभोवती संपूर्णपणे दुसऱ्या देशाने वेढा घातलेला असतो.

आजचा देश या तिघांपैकी एक आहे

कुमार१'s picture

9 Jul 2022 - 12:30 pm | कुमार१

आजच्या देशाबद्दल काय बोलावे ?
त्याचे नाव काढताच भारतीयाला ......

जाऊद्यात झालं...
:)
तो धागा पण झाला आहे....

कुमार१'s picture

30 Jul 2022 - 9:54 pm | कुमार१

Quordle

४ शब्द ९ प्रयानांत हवेत.

कुमार१'s picture

30 Jul 2022 - 9:55 pm | कुमार१

प्रयत्नांत

तुषार काळभोर's picture

31 Jul 2022 - 7:18 am | तुषार काळभोर
तुषार काळभोर's picture

31 Jul 2022 - 7:18 am | तुषार काळभोर

Daily Quordle 188
9️⃣4️⃣
6️⃣8️⃣

कुमार१'s picture

31 Jul 2022 - 8:31 am | कुमार१

झकास!

कुमार१'s picture

4 Dec 2022 - 10:21 am | कुमार१

WORLDLE
भूगोलाच्या खेळात नुकतेच त्यांनी काही नाविन्य आणलेले दिसते.

देश ओळखून झाल्यानंतर पुढे काही फेऱ्या सुरू होतात.
त्यातल्या पहिल्या फेरीत दोन नकाशे देऊन संबंधित देशाचे शेजारी ओळखायचेत. त्यानंतर पुढच्या फेरीत देशाची राजधानी आणि नंतर देशाचा नकाशा ओळखायचा असतो.

हे गुगल न करता न आल्यास खरी मजा.
पाहून उत्तर दिल्यास सामान्यज्ञानाची उजळणी ! :)

कुमार१'s picture

4 Dec 2022 - 12:06 pm | कुमार१

आणि नंतर देशाचा नकाशा >>>

झेंडा असे वाचावे

तुषार काळभोर's picture

14 Mar 2024 - 6:47 pm | तुषार काळभोर

आज नऊशे नव्याण्णववा भाग होता.
उद्या हजारावा असेल.
आठ नऊ महिन्यापूर्वी मोबाइल रिसेट करावा लागला आणि शून्यातून सुरुवात करावी लागली. त्यानंतर nytimes मध्ये गुगल login करून ठेवल्याने पुन्हा तसं होणार नाही, अशी आशा आहे.
तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सहलीमुळे एक दिवस सोडवणे राहून गेलं.
सद्यस्थिती -
STATISTICS
Number of games played 255
Win percentage, 100%
Current Streak count, 65

GUESS DISTRIBUTION
1 - 0
2 - 6
3 - 66
4 - 92
5 - 70
6 - 20
(माझी सरासरी ४.१ होते)

कुमार१'s picture

14 Mar 2024 - 8:14 pm | कुमार१

छान आढावा.
मी सुद्धा हे पाच अक्षरी आणि अन्य एका ठिकाणी असलेले सहा अक्षरी नियमित सोडवत असतो

गवि's picture

15 Mar 2024 - 7:06 am | गवि

हा धागा वर आल्याच्या निमित्ताने खूप महिन्यांनी किंवा कदाचित एका वर्षाने आठवण होऊन वर्डल सोडवले. पाच प्रयत्न. त्यानंतर खाय खाय लागून वर्ल्डल सोडवायला घेतले. पण ते क्वचितच सुटते. मग उत्साह बसला. :-))

कुमार१'s picture

16 Mar 2024 - 5:05 pm | कुमार१

छान ,:)
पाच अक्षरी वर्डलमुळे काही बिगर इंग्लिश देशांमधले खाद्यपदार्थही समजले. ते आता सामान्यनाम म्हणून इंग्लिशमध्ये स्वीकारले गेलेले आहेत

उदाहरणार्थ,
sushi, bagel