सत्य अंगिकारले आहे का ?

शंकरराव's picture
शंकरराव in काथ्याकूट
5 Dec 2008 - 4:24 pm
गाभा: 

नुसते हिंसा-अहिंसा विषयावर वाद विवाद करुन अहिंसा कशाशी खातात हे समजणे कठीन आहे. सत्य हे तत्व अंगिकारल्या शिवाय कोणी ही अहिंसावादी होउ शकत नाही. अर्जूनाला श्रीक्रुष्णांनी सत्याचा बोध दिल्यावर कळले कि हिंसा-अहिंसा काय आहे. जिथे लोकांमधिल धर्म (अंतरिक सत्व\सत्य ) नष्ट झालेले (कौरव) त्यांना मारने हि हिंसा होत नाही तर मानवाच्या उत्क्रांती साठी केलेले योग्य कर्म ठरते.
तसेच अहींसा हि माणसातील एक व्रूत्ती आहे. अहींसेतून परिवर्तन अपेक्षित आहे. अहींसेच्या नावावर डास, कोंबड्या न मरने हे अ-नेसर्गीक वाट्ते व असल्या गोष्टींवर वाद होउ शकत नाही . अधूनिक जगात हजारो ध्रुतराष्ट्र जन्माला आले तेंव्हा कौरवांची काय गणती. अहींसेच्या मूखवट्या आड भ्रष्टाचार ही सूद्धा आधूनिक कौरवाची जमात. वाद घालन्या आधि आत्मपरिक्षण करावे आपण सत्य अंगिकारले आहे का ?. ज्या भूमिवर जन्माला आलो त्या भूमिला हजारो वर्षांचा इतिहास आहे 'सत्य मेव जयते '