जग में रह जाएंगे, प्यारे तेरे बोल"- स्वर्गीय कुंदनलाल सैगल
"Age is just a number. It carries no weight. The real weight is in impacts".
ही उक्ती बऱ्याच लोकांना लागू पडते मग ते कुठल्याही क्षेत्रातील आसू द्यात. बालकवी ठोंबरे(२७ वर्षे आयुष्य) ,कवी दत्त अल्पायुषी कवी, लवकरच काळाच्या पडद्याआड गेले पण आजही त्यांच्या कवीता जन मानसात घर करून आहेत. दत्तात्रय कोडों घाटे उर्फ कवी दत्त (२४ वर्षे आयुष्य) यांची एक कवीता "नीज नीज माझ्या बाळा, रवी गेला रे सोडूनी आकाशाला", आईने लहानपणी आपल्याला झोपी घालताना म्हटल्यांचे कित्येक जणाना आठवत असेल. आशीच दुसरी एक कवीता तर बऱ्याच मैत्रिणींनी भातुकलीचा खेळ खेळताना आपली लाडकी बाहुली रुसल्यावर तीला मनावण्या साठी म्हटंली असेल.
"या बाई या,
बघा बघा कशी माझी बसली बया......".
अमृता शेर-गिल, अवघ्या सत्तावीस वर्षाच्या आयुष्यात काय काय करून गेली सगळ्या कलाप्रेमीनां माहीतीच असेल. इतिहासात, भारतीय सेनेमधील तर असंख्य आशी उदाहरणे देता येतील.
"जब दिल ही टुट गया हम जी के क्या करेंगे",
"बाबूल मोरा नैहर छुटो ही जाय"
संगीतप्रेमींच्या लक्षात आलेच असेल! कुंदनलाल सैगल उर्फ के एल सैगल.अवघ्या दोन दशकाच्या कारकिर्दीतली त्यांच्या गायकी आणी अभिनयाची जनमानसावर पडलेली छाप आजुनही कायम आहे.यांच्या गाण्याने माझ्या आधीच्या पीढीला तर अक्षरशः वेड लावले होते. पुण्यात १९६८-७० च्या दरम्यान, नक्की केव्हा माहिती नाही, "ज्युक बाँक्स", पहिल्यांदा अलका टाँकिज जवळच्या कँफे मधे बसवला होता तेव्हा बरेचसे फँन दहा पैसे खर्च करून सैगल यांची गाणी ऐकत बसायचे.
मी त्यांचे चरीत्र आपल्या पुढे मांडत नाही कारण माझ्यापेक्षा नक्कीच तुम्हाला जास्त माहीती आसेल. मग आज आचानक आठवण कशी आली? मी पण त्यांच्या कलेचा प्रशंसक आहे व मॅट्रिकच्या परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी मी व माझा मित्र बरेच वेळा इथे येवून सैगल यांची गाणी ऐकत बसायचो.
१८ जानेवारी १९४७, आजच पंच्याहत्तर वर्षापुर्वी या अफलातून गायक अभिनेत्याचा जालंधर, पंजाब मधे आवघ्या बेचाळीसव्या वर्षी मृत्यू झाला पण त्याने पाठीमागे सोडलेली विरासत आजुनही संगीत प्रेमींनी जपून ठेवली आहे.
त्यांच्या आवाजाची लोकप्रियता एवढी मोठी की सर्वाधिक लोकप्रिय रेडियो सीलोन कित्येक वर्षे दररोज सकाळी सात सत्तावन्न वाजता त्यांचे एक गाणे प्रसारीत करत आसे. विवीध भारतीच्या "भुले बिसरे गीत",या सकाळच्या हिन्दी गाण्याच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांच्या मृत्यूनंतर पन्नास वर्षापर्यंत आसेच सुरू होते. पन्नासाव्या मृत्यू दिनी विवीध भारतीच्या याच कार्यक्रमात याचा विशेष उल्लेख केलेला मी स्वतः ऐकला आहे. सैगल याचं गाणं संपल की अस्मादिक दुचाकीवर आँफिस कडे निघायचे. बरेच वर्ष हाच नियम. क्वचीतच अपवाद.....
सुरूवातीची स्वर्गीय मुकेश यांची गाणी ऐकली तर त्याच्यावर सैगल याच्या गायकीचा प्रभाव दिसून येतो.
" इक दिन बिक जाएगा, माटी के मोल
जग में रह जाएंगे, प्यारे तेरे बोल"
स्वर्गीय कुंदनलाल सैगल यांच्या वादग्रस्त आयुष्यावर उहापोह न करता त्यांच्या स्वर्गीय आवाजाने रसिकांचे जे मनोरंजन केले त्या आठवणींना उजळा देण्यासाठी त्याच्या पचंहात्तराव्या स्मृतिदिनाच्या निमीत्ताने भावपूर्ण आदरांजली.
प्रतिक्रिया
18 Jan 2022 - 2:40 pm | मुक्त विहारि
माझं आवडतं गाणं ...
18 Jan 2022 - 6:59 pm | सौंदाळा
सुंदर
हे गाणे खूप आवडते, खालील विडिओ बघून आनंद घ्या.
इक दिन बिक जाएगा
18 Jan 2022 - 7:45 pm | अनन्त्_यात्री
हे सैगल यांचं गाणं त्यावेळी फार लोकप्रिय होतं. रेडिओ सिलोनवर हिंदी गाण्यांच्या रोज सकाळच्या प्रसारणाचा शेवट त्यांच्या एखाद्या गाण्यानेच केला जायचा.