वात्तड चकली (खरेच) कशी बनवावी?

माहितगार's picture
माहितगार in पाककृती
4 Nov 2021 - 11:05 am

'शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वात्तड कशी?' म्हण सुपरिचित आहेच. मेमे व्हायरल करणार्‍यांचे म्हणी बनवणारे पुर्वज असावेत कि काय अशी शक्यता वाटते. या म्हणी वापरण्यास सुलभ असल्यातरी बनवणे आणि व्हायरल करण्याचे कौशल्य सोपे नसावे. 'जाणारा जातो जिवानिशी आणि मास्क न वापरणारा म्हणतो मास्क कशाला' अशी म्हण जाणिव पुर्वक बनवली तरी व्हायरल करणे कठीणच.

तर असाच प्रश्न अस्मादिकांना वात्तड चकली जाणीवपुर्वक कशी बनवावी असा पडतो. असे बर्‍याचदा होतेना इतरांना चुकलेला वाटणारा पदार्थ आपल्या आवडत असावा आणि पदार्थ त्या कथित चुकीच्याच पद्धतीनेच बनवून द्या म्हणणे एकदम ऑकवर्ड होऊन जाते पण इतरांच्या दृष्टीने चुकीचा पदार्थ आपल्या जाम आवडीचा असतो. म्हणजे असे की उर्वरीत जगतात खुसखुशीत चकली आदर्श समजली जात असली तरी आम्हाला ती न तुटता उकलून बघता येणारी दातांना व्यायाम देत चव चघळता येणारी वात्तड स्वरुपातच (शपथपुर्वक खरे खरे ) आवडते . म्हणजे यात विनोद व्यंग सर्कॅझम मुळीच नाही असे सांगूनही चकली बनवणार्‍या सुगरणांना अशी आवड शक्य वाटत नाही आणि जाणीवपुर्वक वात्तड चकलीची रिसिपी कशी मिळवावी हा प्रश्न परिचित चकली बनवणार्‍यांनी सोडवलेला नाही. तेव्हा कुणि मिपाकर वाचक लेखकांच्या गंभीर मार्गदर्शनाची 'वात्तड चकली (खरेच) कशी बनवावी?' या बाबत धीरगंभीर प्रतिक्षा आहे.

* प्रतिसादांसाठी आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार

प्रतिक्रिया

मला पण अशीच चकली आवडते

रावसाहेब चिंगभूतकर's picture

4 Nov 2021 - 7:51 pm | रावसाहेब चिंगभूतकर

मलाही अगदी तशीच चकली आवडते. मी कदाचित जगापेक्षा वेगळा आहे की काय असं वाटून तथाकथित रित्या खुसखुशीत चकली च कशी चांगली हे सांगणाऱ्याशी वाद घालायला मी जात नाही. बाकी वातड चकली म्हणजे न तुटणारी चकली नव्हे. चकलीत तेलाचा अंश असावा लागतो. अगदी ड्राय चकली वातड होत नाही. तसंच ती अगदी तेलाने soggy आणि मान टाकणारीही नसावी. मला वाटतं तो एक बॅलन्स आहे आणि लहानपणापासून अशी (तिखट) चकली चघळत दिवाळी अंकांचा फडशा पाडणे हा माझा आनंदाचा विषय होता.

कंजूस's picture

4 Nov 2021 - 8:28 pm | कंजूस

कोणत्याही नंबर १ चकल्या एका मोठ्या पसरट डब्यात ठेवा.
वर झाकण न लावता त्यावर ओले कापड झाकून ठेवा तासभर. तोपर्यंत मिपावर जाऊन दिवाळी अंक वाचा.दीड दोन तास जातील. आता चकलीवरचे कापड दूर करा. काम फत्ते झालेलं असेल.

nanaba's picture

5 Nov 2021 - 12:18 am | nanaba

Mala pan mala pan.
Tayar milayala havyat matra

चौकस२१२'s picture

5 Nov 2021 - 8:06 am | चौकस२१२

चकली च माहित नाही पण जर कुकी ( नांन खटाइ चा पाश्चिमात्य प्रकार ) जास्त खुशखुशीत आवडत नसेल तर बनवतानाच त्यात दूध जास्त घालतात म्हणजे ती अशी अर्ध मऊ होते

बाकी दिवाळीतील आपलं कमी आवडीचा पदार्थ म्हणजे १) कडबोळी कारण ती कधी कधी फार पचायला जड वाटते ! आणि २) नीट गोड आणि स्वादिष्ट ना झालेले पिठूळ चिरोटे ...
याशिवाय वेलची किंवा केशर काहीहि न घातळेले गुलाबजाम म्हणजे नको वाटतात

रावसाहेब चिंगभूतकर's picture

5 Nov 2021 - 10:03 am | रावसाहेब चिंगभूतकर

कडबोळी कारण ती कधी कधी फार पचायला जड वाटते !

हाय, फिर तो तूने (सही) कडबोळी खाई ही नही..

चौकस२१२'s picture

5 Nov 2021 - 11:36 am | चौकस२१२

कधी चांगली हि खाल्लीय म्हजे बाहेरून थोडी खुसखुशीत आतून थोडी मऊ पण कधी कधी त्याची चव पुरेशी मसालेदार तरी नसते किंवा त्यातील सगळ्या डाळी पोटाला जड वाटतात .. थालीपिठासारख्या
चकली सुदहा फार कडक झाली तरी वांदे ! वर्णन करणे अवघड आहे ....