मला काय करता येईल?

शब्देय's picture
शब्देय in काथ्याकूट
4 Dec 2008 - 12:28 am
गाभा: 

माझा एक साधा सवाल आहे. मी एक सामान्य माणूस आहे. मला आपल्या देशासाठी काही चांगले करायचे आहे. आज काल असे वाटू लगले आहे आहे मी नुसते बोलण्या पलिकडे काहीच करत नाहीये. नुसत्याच चर्चा ... मग तो विषय शेतकरी आत्महत्या करो वा २६/११ होवो. मी नुसते बोलण्या पलिकडे काहीच करत नाहीये.

मला काही करयचे आहे. काय करता येईल? मी एक सामान्य माणूस आहे त्यामुळे ना मी गांधी बनेन ना बाबा आमटे. पण मला आपल्या देशासाठी काही चांगले करायचे आहे.

कृपया मला सुचवा.

प्रतिक्रिया

कलंत्री's picture

4 Dec 2008 - 12:49 am | कलंत्री

सर्वात महत्त्वाचे आपण कोणत्या श्रेणीतले आहेत हे समजुन घ्या. आपला हा भाव बाह्यपरिस्थितीवर अवलंबुन असेल तर ती स्थिती बदलताच तो भावही निघुन जाईल.

अध्यात्मिक साहित्य वाचत रहा. कदाचित आपल्याला आपला इप्सित मार्ह मिळेलच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Dec 2008 - 9:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शब्देय,

आपण ज्या भावना व्यक्त केल्या आहेत तसेच काहीसे विचार ऋषीकेश आणि मी करत होतो. सध्या खूप काही ठोस विचार नाही आहेत, पण फक्त बडबड करण्यापलीकडेही काही केलं पाहिजे या विचारातून ऋषिकेशने एक योजना मांडली आहे. आपण आमच्यासोबत काम करायला तयार असाल तर उत्तमच!

अदिती

पंकज's picture

4 Dec 2008 - 10:18 am | पंकज

सहज आणि सोपा मार्ग म्हणजे "माहितीचा अधिकार", त्याचा जास्तीत जास्त वापर करा. लोकोपयोगी, सामाजीक हिताच्या गोष्टींसाठी त्याचा वापर करा. झाल्यास एक संघटना स्थापन करून "माहितीचा अधिकाराचा" प्रचार व प्रसार करा. "माहितीचा अधिकाराचा" वापर करण्यामुळे जर लोकोपयोगी कामे होत असतील तर वापर करणार्‍या व्यक्तीस व त्याच्या कामास प्रसिध्दी द्या.

नाम्या झंगाट's picture

4 Dec 2008 - 10:51 am | नाम्या झंगाट

तुम्ही फक्त दररोज एका जणाला आनंदी करा. दररोज असे वेगवेगळ्या चेहरयावर हसू बघुन आपल्याया फार सुख लाभेल....
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट