महास्वार्थाचे पसरत जाणारे वर्तुळ
सुमारे ३४-३५ वर्षापूर्वी दैनिक दुपारचे महानगर (हो, तेच निखिल वागळेंचे) मधे वाचलेला हा लेख. शब्दशः आठवत नसला तरी अत्यंत लहान वयात वाचलेला हा लेख मनावर कोरला गेला आहे. काही तथ्य थोडी फार वरखाली असतील तर सांभाळून घ्या
------------------------------------
तर बहुतेक ६० च्या दशकातली ही गोष्ट असावी. महाराष्ट्रात सहकारी चळवळीने पाय रोवले होते आणि नवनवीन नेते आणि सत्ताकेंद्रे उभी रहात होती त्यातील एक वजनदार नाव म्हणजे वसंतदादा पाटील. त्यांचाही एक सहकारी साखर कारखाना होता. परंतू त्यांच्या लक्षात आले की कारखान्याला म्हणावा तसा नफा होत नाहीये. थोडा विचार केल्यावर, निरीक्षण केल्यावर लक्षात आले की कारखान्यातील कामगार हे मुख्यतः पंचक्रोशितील शेतकरी आहेत आणि घरातील, शेतातील काम करून कारखान्यात पोहोचायला त्यांना उशीर होतो, आणि त्यामुळे उत्पादकता कमी होते.
यावर उपाय म्हणून दादांनी कारखान्याच्या खर्चाने सर्व कामगारांना सायकली दिल्या. त्याचा परिणाम लगेच दिसून आला आणि कारखान्याचा नफा अनेक पटींनी वाढला. आता लक्षात घ्या, साठच्या दशकात सायकल ही फार फार मोठी गोष्ट होती, कदाचित आजच्या SUV सारखी, ती फुकटात मिळाल्याने कामगार फारच खुश झाले आणि दादांचे खूप नाव झाले. हेच कामगार आणि त्यांचे कुटुंब दादांचे आणि पर्यायाने काँग्रेस चे निष्ठावान मतदार झाले. इतकेच काय दादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीलाही तितकाच सन्मान आणि मत मिळाली.
आता पैसा कोणाचा तर कारखान्याचा, (राजकीय) फायदा कोणाला तर दादांना. कदाचित यालाच आजच्या व्यवस्थापन शास्त्रात विन विन म्हातातात.
यात प्रत्येकाचा स्वार्थ साधला गेला म्हणून या लेखाला बहुतेक महास्वार्थाचे पसरत जाणारे वर्तुळ असे नाव दिले गेले.
इथे महानगर मधला लेख संपतो, पुढील विचार माझे.
-----------------------------------------
५०-६०-७० च्या दशकात मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात अशा अनेक संस्था निर्माण झाल्या आणि त्यातूनच काँग्रेस आणि मराठा समाजाचे महाराष्ट्रातील राजकारणावर वर्चस्व निर्माण झाले. कार्यकर्त्यांची सोय लावायला अशा संस्थांचा वापर करण्यात आला. पण तितकेच नाही तर एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या अशा संस्थांमुळे त्या चेन मधून बाहेर निघणे अशक्य झाले. ज्याने असे प्रयत्न केले असतील त्याचे आर्थिक, राजकीय, सामाजिक वैभव बुडवणे फार सोपे झाले (हमामामे सब नंगे होते है ) त्यामुळे निष्ठावान कार्यकर्ते मिळणे सोपे झाले. किंबहुना माझ्यामते आजही राष्ट्रवादीचे खरे बळ याच सिस्टीम मधे आहे. जो पर्यंत लोकांचा स्वार्थ साधला जातो तो पर्यंत ते नेत्यांच्या जवळ जवळ प्रत्येक चुकीकडे दुर्लक्ष करतात. यात फक्त कार्यकर्तेच नाही तर चतुर राजकारण्यांनी उद्योगपती, मीडिया यांना पण पार्टनर केले, उगाच नाही वर्षानुवर्ष एकाच कुटुंबाचे गुणगान गायले जात. जो पर्यंत पत्रकारांना घरे, परदेश प्रवास मिळत होता तेंव्हा त्यांनीही चुकांकडे दुर्लक्षच केले. कधीतरी उगाच आपण निःपक्ष दाखवायला थातूरमातूर टीका केली असेल पण विषय कधी लावून धरले नाही. तशीही जनतेची स्मरणशक्ती कमी असते त्या मुळे जनताही या चुकांची व्याप्ती विसरली. आजही मिडिया काँगेसच्या खाल्ल्या मिठाला जागून आहे.
याच पद्धतीने आधुनिक राजकारणात मीडिया मॅनेज करायचे काम केजरीवाल करतात, नाहीतर दिल्लीत ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे म्हणून सकाळ, लोकमत मधे पण पान भर जाहिराती देण्याचे दिल्ली सरकारला कारण नव्हते, पण त्या मुळे केजरीवालांवर मी कधीही कुठेही प्रिंट मीडियामध्ये टीका बघितली नाही. परत स्वार्थ.
अर्थात बिजेपीही मिडिया मॅनेज करतच असेल पण काँग्रेस, राष्ट्रवादी सारखे संस्थात्मक बळ त्याच्याकडे आहे की नाही माहीत नाही. RSS हेच खरे बिजेपीचे बळ पण त्यात आर्थिक स्वार्थाने एकत्र आलेले लोकं नाही. त्यामुळे मोदी शहांची वैयक्तिक जादू ओसरल्यावर बिजेपी किती आणि कशी टिकेल माहीत नाही.
असो, आपले काय निरीक्षण, मत यावर?
प्रतिक्रिया
लेख आवडला
खूपच चांगला लेख
मी खरंतर राजकीय धाग्यांवर
छान आहे लेख.
राजकीय पक्षाचे कार्यकर्ते
योग्य
नो राजकीय मत.
खरे आहे
खरे आहे
काय ठरलं मग?