प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.राजेंद्र बर्वे यांच्या एका व्हिडिओचा हा सारांश आहे. सध्या १०/१२ वी ची मुले करिअरच्या दृष्टीने विविध कोर्सेसची माहिती घेत असतात. पण डॉ. बर्वे यांनी कोर्स शोधण्याआधी स्वत:ला शोधण्याच्या दिलेल्या या पायर्या
१) ज्ञान कसं साठवता ते शोधा.
Visual - पाहून लक्षात राहतं
Auditory - ऐकून लक्षात राहतं
Kinetic - कृतीतून लक्षात राहतं
२) काय चांगलं करता येतं ते शोधा
चांगलं गाता येणं, संगीत देता येणं,नृत्य करता येणं, सुसंवाद करता येणं असं जे उत्तम जमतं ते शोधून काढा.
३) कोर्स आणि करिअर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काय करायला मनापासून आवडतं ते म्हणजे करिअर.
४) मी कशाप्रकारचा व्यक्ती आहे?
मी अंतर्मुखी आहे की बोलका आहे? मला नवीन गोष्टींचं टेन्शन येतं की नाही येतं? मी लोकांमधे रममाण होणारा आहे की एकांतात बसून काम करणारा आहे? मी नवीन गोष्टी शिकायला तयार असतो की जुनी कौशल्येच वापरणं आवडतं? नवीन गोष्टी शिकत बसलो तर माझ्या कामाचा दर्जा बिघडत(हाय न्युरॉटिझम ट्रेट) मी नवीन ठिकाणी, नवीन परिस्थितीशी पटकन जुळवून घेऊ शकतो की ते मला जमत नाही? (अॅडाप्टिबिलिटी)
खूप महत्त्वाचे
जे काही तुमचं व्यक्तीमत्व आहे, त्याचे जे कंगोरे आहेत त्यात चूक की बरोबर हे अजिबात शोधू नका. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. करिअर हे असं सतत 'हे चूक की बरोबर' पैसे मिळवण्याच्या दृष्टीने किती फायदा आहे हे पाहून शोधू नये. तसे केल्याने आपल्याला आपल्या खर्या व्यक्तीमत्त्वाचा शोध लागत नाही.
प्रतिक्रिया
17 Oct 2021 - 6:43 pm | Bhakti
आणि Kinetic ऐवजी kinesthetic पाहिजे होते का?
17 Oct 2021 - 10:18 pm | उपयोजक
चूक दर्शवून दिल्याबद्दल धन्स :)
18 Oct 2021 - 5:54 am | चौकस२१२
हे बोलणं सोप्पं आहे पण , कोणी मार्गदर्शक नसेल तर अवघड होते
मला आठवतंय .. सुट्टीत विविध उपकरण ( जादूचं प्रयोगाचे डिझइन करणे, पिन हॉल कॅमेरा बनवणे , मेणबत्तीवर चालणारी बोट बनवणे .. आहे त्या मोडक्या तिचाकीची मागची बाजू दुचाकी सायकल ला लावून त्याचा रथ बनवणे , शाळेत झोपडी बनव्याला जे ठराविक साहित्य दिले दिले त्यात बिस्किटांचं पुढ्यात मिळणारया कोरगुटेड आयर्न सारखा दिसणारा कागद पत्रा म्हणून छतासाठी वापरणायची कल्पना काढणे " असह्य +गोंष्टींमुळे आणि घरात ३ मेकॅनिकल,१ सिविल,१ आर्किटेक्चर , १ काका काकू कमर्शिअल आर्टिस्ट असे आल्यामुले कदाचित ओढा मेकॅनिकल आणि डिझायिन कडे आहे हे त्यांना अंदाज म्हणून मार्गदर्शन मिळाले
नाहीतर सध्या बाजारात काय चालटाय यावर + साधारण कल यावरच बहुतेकानं ठरवावे लागते .. काय करणार
अर्हताःत भारतात आता विविध क्षेत्रांना चांगला मान आणि पैसे मिलत आहे हे चांगलेच आहे
18 Oct 2021 - 8:09 am | कंजूस
बरोबर.
सर्वसामान्य तरुण वर्गासाठी परिस्थिती हीच क्षार्गदर्शक असते. मानसोपचार, किंवा इतर तज्न नसतात. ते शहरी चोचले आहेत.
18 Oct 2021 - 6:36 pm | उपयोजक
चौकस २१२ , कंजुस
तज्ञ मानसोपचारतज्ज्ञांनी तसे सांगण्याचे काही कारण नक्की असेल ना? चिक्कार पैसा मिळवण्याच्या नादापायी नावडतं क्षेत्र,कोर्स निवडून तुफान दारुप्राशन,अरबट चरबट खाऊन बिघडलेली तब्येत आणि ढिगभर स्वभावदोष हे घेऊन वावरणारे लोक वाढायला हवेयत का समाजात? आनंदी राहणं महत्वाचं नाही का?
19 Oct 2021 - 9:44 am | चौकस२१२
आनंदी राहणं महत्वाचं नाही का?
हो आहे ना .. मी फक्त प्रत्यक्षात काय होत त्याचं उदाहरण दिलं .. घरातून मार्गदर्शन आणि अनुभव आणि माझा कल हि दिसत होता ( उदहारां दिली आहेतच) म्हणून मेकॅनिकल नाही तर आर्किटेक्त्त क्षेत्रात जाणे हे दिसायला लागल होतं
परिस्थितीवर अवलंबून अस्त .. कागदोपत्री सल्ला सो पा असतो .
मी माझ्या जीवनाचा परत विचार केला तर असं वाटतात कि कदाचित नाट्य दिग्दर्शनाकडे वळलो असतो तर ! किंवा आज काळ ज्याला इव्हेंट मानजेमेंट असतो
ज्याने मनाला आनंद तिकडे जा असा सल्ला देणार्याला काय फरक पडत नाही .. निस्तरायचा आपल्यलालाच असतं
हा मान्य कि डॉक्टर लागू किंवा डॉक्टर आगाशे, डॉक्टर साबळे हे कलाकार म्हणून जास्त आनंदी असावेत ( पण तसं पहिलं तर डॉक्टर आगाशे हे मानसोपचार तन्य म्हणून काम हि करतात अभिनयाबरोबर )
नावडतं क्षेत्र,कोर्स निवडून तुफान दारुप्राशन,अरबट चरबट खाऊन
हे टोकाचे तर्क कशाला? माणूस नावडत्या क्षेत्रात अडकून पडला तर दुखी असू शकतो पण म्हणून लगेच दारू पितोच?
19 Oct 2021 - 7:59 am | प्राची अश्विनी
लेख आवडला. मूळ व्हिडीओ कुठे बघायला मिळेल?
19 Oct 2021 - 2:09 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
लेख आवडला. मानसोपचार तज्ञांची देशाला खरोखर गरज आहे. विशेष करून विद्यार्थ्याना व तरूणाना. आजुबाजुची सामाजिक परिस्थिती,आर्थिक स्तर ह्यांचा कळत नकळत परिणाम करियर निवडताना होत असतोच. कुठलीच आवड नसलेला व अर्थाजनासाठी समोर दिसेल तो मार्ग निवड्णारा एक मोठा वर्ग समाजात असतोच.
सुदैवाने इंटरनेटच्या माध्यमातुन विविध शाखांबद्दल माहिती मिळवणे सोपे झाले आहे.
19 Oct 2021 - 8:51 pm | उपयोजक
देशात भरपूर असतील का नसतील? नसतील तर का नसतील? दर्जेदार शिक्षणव्यवस्था हे कारण असू शकेल?
23 Oct 2021 - 7:11 pm | सुबोध खरे
करिअर निवडण्यामागे कुटुंबाची आर्थिक स्थिती हा एक फार मोठा घटक आहे.
बिकट आर्थिक स्थिती असताना आपल्या आवडीच्या क्षेत्रापेक्षा जे क्षेत्र पटकन नोकरी मिळवू शकेल असेच निवडले जाते.
आमच्या वडिलांना कुळ कायद्यात शेती गेल्यामुळे मुंबईत यावे लागले १८ वर्षे वयाच्या फक्त मॅट्रिक झालेल्या मुलाला नोकरी करून करियर निवडीत काय निवडता येणार होते? त्यांची आवड अभियांत्रिकीत होती आणि त्यासाठी लागणारे गुण त्यांना त्या काळात इंटर सायन्सला सहज मिळाले असते पण
नोकरी करत असताना केवळ सकाळी तीन तास जाऊन सायन्स करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी बी ए केले एल एल बी केले आणि जमनालाल बजाज मधून अर्ध वेळ व्यवस्थापन पदवी घेतली. भावांची शिक्षणे आणि बहिणींचे विवाह करण्यासाठी नोकरी करणे अत्यावश्यक होते.
आवड निवड हे चोचले भरल्या पोटाचे होते.
पण १० वि झाल्यावर माझी आणि माझ्या भावाची व्यवसाय निवड चाचणी मात्र त्यांनी करवून घेतली आणि तुम्हाला जितके शिकायचे आहे तितके शिका मी पूर्ण सहाय्य करेन हे मात्र ते आवर्जून सांगत असत.
24 Oct 2021 - 8:33 am | उपयोजक
हे ही आहे.