चालु घडामोडी- आॅक्टोबर. २०२१ भाग १

शुर's picture
शुर in राजकारण
5 Oct 2021 - 3:33 pm

मागचा धागा सुपर हिट आणी हाऊसफूल झाल्याने हा नवा धागा.

प्रतिक्रिया

भाजपला राज्यात नेत्रुत्व बदलाची गरज आहे का ?

सुबोध खरे's picture

6 Oct 2021 - 7:23 pm | सुबोध खरे

ते भाजपाला ठरवू द्या कि.

तुमचा भाजप द्वेष एवढा आहे तर भाजप बुडतंय (असं तुम्हाला वाटतं आहे) तर बुडू द्या कि

नावातकायआहे's picture

5 Oct 2021 - 3:41 pm | नावातकायआहे

मानव गुरुजींची मदत घ्या!! ९ ते १८० दिवसात जीवनात पाहिजे ते मिळवा. ;-)

Rajesh188's picture

5 Oct 2021 - 3:54 pm | Rajesh188

फडणवीस हे अतिशय हुशार,अभ्यासू,सर्व क्षेत्रातील जाणकार,विविध विषयात पारंगत असे नेते आहेत.
त्यांच्या वर महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी bjp नी सोपवावी
केंद्रीय नेतृत्व नी फडणीस ह्यांच्या कार्यात बिलकुल हस्तक्षेप करू नये.
केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस ह्यांच्या वर कोणतेच निर्णय थोपवू नयेत त्यांना पूर्ण अधिकार द्यावेत.
महाराष्ट्रात bjp चे अस्तित्व टिकून राहील.
काँग्रेस चे अधिपतन होण्यास सर्वात जबाबदार कोणते कारण असेल तर केंद्रीय नेतृत्वाची राज्यातील राजकारणात हस्तक्षेप.
कृपा गृह मंत्री महाराष्ट्र चा कसा झाला.
केंद्रीय नेतृत्वाच्या बकवास गिरी मुळे.

फडणवीस हे अतिशय हुशार,अभ्यासू,सर्व क्षेत्रातील जाणकार,विविध विषयात पारंगत असे नेते आहेत. >>>

खरंच?? अतिशय हुशार हे कशावरून ठरवले?? नेमके कोणत्या विषयांत पारंगत आहेत??

त्यांच्या वर महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी bjp नी सोपवावी>>>>
मग सध्या कोणावर आहे??

केंद्रीय नेतृत्व नी फडणीस ह्यांच्या कार्यात बिलकुल हस्तक्षेप करू नये.>>>>
केंद्र तसंही हस्तक्षेप करत नाहीये. म्हणून तर राणे मंत्रीपद पटकावतात नी खडसेना पक्ष सोडून जावे लागते. मुंडेंना बाजूला केले जाते.

कृपा गृह मंत्री महाराष्ट्र चा कसा झाला.
केंद्रीय नेतृत्वाच्या बकवास गिरी मुळे >>>
ईथेही राणे दरेकर झालेच आहेत की.

भर समुद्रातील पार्टीत अमली पदार्थ नियंत्रक पथकाने काही तरूणांना अटक केली. त्यात प्रसिद्ध नट शहरूख पुत्र आर्यन व इतर धनाढयांची मुले सापडली.त्यामुळे या प्रकरणाचा जोरात गाजावाजा व चर्चा होणार हे उघड.

भर समुद्रातील पार्टीत अमली पदार्थ नियंत्रक पथकाने काही तरूणांना अटक केली. त्यात प्रसिद्ध नट शहरूख पुत्र आर्यन व इतर धनाढयांची मुले सापडली.त्यामुळे या प्रकरणाचा जोरात गाजावाजा व चर्चा होणार हे उघड.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Oct 2021 - 8:57 am | माईसाहेब कुरसूंदीकर

गुजरातमध्ये शेकडो कोटीची ड्रग्ज पकडली गेली पण त्याची एकच दिवस बातमी आली. मात्र मुंबईत क्रूझवर आर्यन खान व ईतर श्रीमंत मुले पकडली गेली त्याच्या बातम्या दिवसातल्या १२ तास चालु.सत्ताधारी पक्षाला हवी तशी सनसनाटी निर्माण करण्याचे काम उथळ गोदी मीडिया करत आहे हे मान्य मात्र हे करताना मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष नको. गेल्या वर्षभरात ड्रग्जची तस्करी करणारे मोठे लोक किती पकडले गेले ? आणि किती तुरुंगात गेले? ह्याचीही चर्चा व्हावी.

कॉमी's picture

6 Oct 2021 - 9:16 am | कॉमी

बरोबर.

श्रीगुरुजी's picture

6 Oct 2021 - 9:31 am | श्रीगुरुजी

गुजरातमधील बंदरावर पकडलेले अंमली पदार्थ अफगाणिस्तानातून आले होते. त्या संदर्भात ४ अफगाणी नागरिक व दोन भारतीय नागरिक लगेच पकडले होते.

सुबोध खरे's picture

6 Oct 2021 - 9:51 am | सुबोध खरे

तैमूरला सर्दी झाली आणि बारीकसा खोकला झाला

आणि रणवीर कपूरच्या गाडीच्या पेट्रोल यामध्ये कचरा आला

हे मुखपृष्ठावर छापणाऱ्या पत्रयोषितांकडून काय अपेक्षा ठेवणार?

गॉडजिला's picture

6 Oct 2021 - 12:39 pm | गॉडजिला

बाकी आर्यनला शिक्षा वगैरे झालीच तर माझा या जगात पैशावरील विश्वास कायमचा उडुन जाइल हे खरे...

रात्रीचे चांदणे's picture

6 Oct 2021 - 11:06 am | रात्रीचे चांदणे

गुजरातमध्ये जी शेकडो कोटीची ड्रग्ज पकडली गेली ती कोणि पकडली असतील? एक तर गुजरात पोलीस किंवा पोर्ट वरती केंद्रीय सुरक्षा असेल त्यांनी, महाराष्ट्र पोलीस किंवा पंजाब पोलिसांनी तरी नसतील पकडली. त्या यंत्रणा जागरूक होत्या म्हणूनच पुढचा अनर्थ टळला. शाहरूख च्या मुलाला पकडल्यावर मीडिया trp साठी 24 तास तीच बातमी दाखवणार ह्यात चुकीचे असले तरी नवीन काहीही नाही. कारण आपला मीडिया सुरवातीपासून हेच करत आला आहे. कुठलेही मोठं पद नसताना मीडिया प्रियांका गांधींचीही बातमी देतच आहे, ह्यात फक्त आणि फक्त जास्तीत जास्त trp मिळावा हाच हेतू असणार.
सध्याला काही चॅनेल्स मोदी समर्थक आहेत तर काही विरोधक. निःपक्षपाती बातम्या देणारे एकही चॅनेल दिसत नाही. मोदी समर्थक चॅनेल जेवढा जास्त मोदींचा उदो उदो करणार तेवढं जास्त नुकसान मोदींच होण्याची शक्यता आहे.

Rajesh188's picture

6 Oct 2021 - 12:02 pm | Rajesh188

ज्या अदानी ह्यांच्या मालकीच्या बंदरावर ते करोडो चे ड्रग उतरलं गेले त्या मुळे अदानी ग्रुप ल किती आर्थिक फायदा झाला हे कुठे बाहेर येतेय.
खरी मेख इथेच आहे.किरकोळ लोकांना पकडुन कारवाई केली अशा थापा मरायची सवय केंद्र सरकार ला आणि bjp शासित प्रतेक राज्य सरकार आहे.
Thapade कुठले.
महाराष्ट्र पंजाब ही राज्य थापा मारत नाहीत काम करतात.

म्हणून तर विकसीत आहेत. भाजप शासीत राज्यातील लोक पवारांनी ऊभ्या केलेल्या महाराष्ट्रात पोट भरायला का येतात??

सुबोध खरे's picture

6 Oct 2021 - 7:21 pm | सुबोध खरे

भाजप शासीत राज्यातील लोक पवारांनी ऊभ्या केलेल्या महाराष्ट्रात पोट भरायला का येतात??

हायला

उत्तर प्रदेशातील लोक महाराष्ट्रात काय फक्त २०१७ नंतरच आले काय?

आणि बिहार मध्ये तर पूर्ण भाजपचे सरकार स्वातंत्र्यापासून एकदाही नव्हते.

भाजप द्वेष असण्याबद्दल नव्हे पण इतका आंधळा द्वेष?

बाकी चालू द्या

प्रदीप's picture

6 Oct 2021 - 1:08 pm | प्रदीप

तुमच्या डोक्यात आहे का?

अदानी हे पोर्ट ऑपरेट करतात, तसेच भारतांतील इतर काही विमानतळ इत्यादीही करतात (उदा. दिल्ली व मुंबई). तेव्हा ह्या विमानतळांवर काही सोने, अफू, गांजा इत्यादीची वाहतूक सापडली, तर त्याची जबाबदारी त्या ऑपरेटरवर येते काय?

कुणी एकाद्या घरांत भाड्याने रहात असेल, व तिथे त्या व्यक्तिने काही गैर व्यवहार केले, तर त्याची जबाबदारी त्या घरमालकाची असते? का ते घर ज्या सोसायटींत आहे, त्यांची असते? का निव्वळ त्या भाडेकरूची असते?

जुलै महिन्यांत न्हावा शेवा बंदरांत (जवाहरलाला नेहरू पोर्ट ट्रस्ट) मधे ८७९ कोटी रूपयांचे हेरॉईन सापडले. तर ती जबाबदारी त्या पोर्ट ट्रस्टची असते काय?

हे सगळे तुम्हाला अजिबात समजत नाही, असे मानणे अवघड जाते. अगदी तुम्ही उदा. रिकामटेकडे कॉलेजतरूण असाल, तरी.

मुळांत तुम्ही व शुर (किंवा कोरडे) इथे जे ट्रोलिंग करत आहात ते आता असह्य होत चाललेले आहे. मिपा व्यवस्थापनाचे इथे लक्ष इतके दिवस नाही, ह्याचे खरे तर आश्चर्य वाटते आहे. ह्या प्रकारामुळे मिपाच्या चर्चांची पातळी अतिशय खालावली आहे.

hrkorde's picture

6 Oct 2021 - 1:22 pm | hrkorde

महाराष्ट्रात सुशांत प्रकरणात तर ड्रग प्रकरणात ठाकरे , काँग्रेस , महाविकास आघाडी , मुंबई पोलीस , बॉलिवूड , खान लोकांचा धर्म हे सगळेच दोषी असल्यागत शिमगा चालला होता , तो गोस्वामी तर मुझे ड्रग दो , ड्रग दो करत किंकाळ्या फोडत होता.

आणि आता सगळे गप्प कसे , कुणालाही ही शंका येणारच , तुम्हाला नसेल शंका तर तुम्हीही गप्प रहा ह्यांच्याप्रमाणेच.

Rajesh188's picture

6 Oct 2021 - 1:26 pm | Rajesh188

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://indianexp...

न्यायालय नी पूर्ण विचारांती तशी ऑर्डर दिलेली आहे चोकशी करणाऱ्या यंत्रणांना.
की अदानी बंदराच्या व्यवस्थापन ल ड्रग उतरवल्या बद्द्ल आर्थिक फायदा तर झाला नाही ना त्याची चोकशी करा.
आता कोर्टाला पण अक्कल नाही,कोर्ट पण तुम्हाला ट्रोल करत आहे असे म्हणावे तुम्ही.

कोर्टाने ऑर्डर दिली आहे याचा अर्थ लगेच अदानीच्या नावाने अटक करण्याचे वॉरंट निघाले आहे असा होत नाही...

अदानी ह्यांना अटक करा असे मी पोस्ट मध्ये कुठेच लिहल नाही.
पण त्यांच्या ग्रुप ला आर्थिक फायदा झाला का ह्याची माहिती अजुन दिली नाही असे लिहाल आहे.
लोकशाही चा सन्मान करणारे आहोत आम्ही.
सुशांत सिंह केस मध्ये bjp नी स्वतः च किती तरी लोकांस गुन्हेगार ठरवून अटक करा म्हणून बोंब मारली होती.
ती वृत्ती नाही आमची.

सॅगी's picture

6 Oct 2021 - 1:59 pm | सॅगी

जरा काही झाले की "देश विकायला काढला" च्या बोंबा मारायला...अदानी अंबानींना गुन्हेगार वगैरे ठरवून बोंबा मारायला तुमच्यासारखेच पुढे असतात..
आता ही वृत्ती म्हणजे "लोकशाहीचा सन्मान" वगैरे आहे असे नका म्हणू.. ;)

hrkorde's picture

6 Oct 2021 - 3:36 pm | hrkorde

परमवीर सिंगच्या नुसत्या पत्राने खुश झालेले लोक आज कोर्टाच्या ऑर्डरला म्हणतात , की हे अजून सिद्ध कुठे झाले म्हणून .

सॅगी's picture

6 Oct 2021 - 4:05 pm | सॅगी

परमवीर सिंगच्या नुसत्या पत्राने गळपटणारे लोक आज कोर्टाच्या नुसत्या ऑर्डरने खुश होत आहेत. ;)

hrkorde's picture

6 Oct 2021 - 1:30 pm | hrkorde

आणि तुम्हाला असह्य होत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. आम्ही तुमच्यासाठी लिहीत नाही.

--संपादित--

मुळांत तुम्ही व शुर (किंवा कोरडे) इथे जे ट्रोलिंग करत आहात ते आता असह्य होत चाललेले आहे. मिपा व्यवस्थापनाचे इथे लक्ष इतके दिवस नाही, ह्याचे खरे तर आश्चर्य वाटते आहे. ह्या प्रकारामुळे मिपाच्या चर्चांची पातळी अतिशय खालावली आहे.

सदर आरोप कोणत्या आधारावर करन्यात आलाय? हे सान्गा नाहितर माफि मागा. कुनाचा ही काहीही आरोप मी खपवुन घेनार नाही.

प्रदीप's picture

6 Oct 2021 - 3:54 pm | प्रदीप

तुम्ही इथे काय करत आहांत ते सगळ्यांना दिसत आहे, तेव्हा मी काही आधार/ पुरावे वगैरे देत बसणार नाही.

आणि माझ्या मतावर मी ठाम आहे, म्हणून मी तुमची माफीही मागणार नाही.

श्रीगुरुजी's picture

6 Oct 2021 - 3:17 pm | श्रीगुरुजी

मुळांत तुम्ही व शुर (किंवा कोरडे) इथे जे ट्रोलिंग करत आहात ते आता असह्य होत चाललेले आहे. मिपा व्यवस्थापनाचे इथे लक्ष इतके दिवस नाही, ह्याचे खरे तर आश्चर्य वाटते आहे. ह्या प्रकारामुळे मिपाच्या चर्चांची पातळी अतिशय खालावली आहे.

रूप एक, संबोधने अनेक.

सुरिया's picture

6 Oct 2021 - 3:23 pm | सुरिया

म्हणजे तुम्हीच मीपा व्यवस्थापन आहात की काय?

प्रदिप हि व्यक्ति माझ्यावर लावलेल्या आरोपान्चे उत्तर देनार आहे कि नाहि? ह्या व्यक्तिचे उथळ आरोप मि का खपवुन घ्यावे?

बापूसाहेब's picture

7 Oct 2021 - 9:56 am | बापूसाहेब

राजेश जी. आपला अदानी यांच्यावरचा राग आणि जळफळाट समजु शकतो.

उदाहणादाखल सांगतो. बघा पटतंय का -

माझा एक मित्र दुबई वरून स्मगल केलेलं सोने आणि इतर गोष्टी मुंबई ते सातारा ST बस मधुन आणायचा आणि तिथून पुढे इतर लोकांना विकायचा... असे करताकरता एकदिवस पोलिसांनीत्याला सातारा ST बसस्थानकावर पकडले ...

मग आता सातारा आणि मुंबई बस स्थानकाला या गोष्टीचा किती फायदा झाला असेल जरा सांगता का ????

रात्रीचे चांदणे's picture

7 Oct 2021 - 10:38 am | रात्रीचे चांदणे

अडाणी पोर्टवरती ड्रग पकडल्यामुळे ड्रग माफिया ड्रग व्यापारासाठी अडाणी पोर्ट चा वापर करणार नाहीत, दुसरा कुठला तरी मार्ग निवडतील. त्यामुळे अडाणी चे नुकसानच होण्याची शक्यता आहे.

बापूसाहेब's picture

7 Oct 2021 - 11:24 am | बापूसाहेब

अदानी यांचा फायदा कसा काय होत होता ते स्पष्ट कराल का??
मग आपण नुकसानी बद्दल बोलू.. मी उदाहरादाखल सांगितल्याप्राणे त्या घटनेत बस स्थानकाचा काही फायदा किँवा तोटा किँवा स्मागलिंग मध्ये काही तरी involvement आहे का ???

आणि गुजरात मध्ये खट्ट जरी झाले तरी मोदी यांच्यावर आगपाखड करने कसे काय योग्य आहे?? वड्याच तेल वांग्यावर.

याच कारणाने भारतात व्यवसाय करणे अवघड आहे. आणि बहुतांश लोक नोकरी वर समाधान मानतात. कारण व्यावसायिक हा गरिबांना पिळून पैसे कमावतो आणि श्रीमंत होतो हा समाजवादी आणि कमुनिस्ट अजेंडा.

रात्रीचे चांदणे's picture

7 Oct 2021 - 1:21 pm | रात्रीचे चांदणे

अदानी यांचा फायदा होतोय हे मी नाही तर राजेश भाऊंचे म्हणणे आहे, उलट अदानी पोर्ट ची सुरक्षा चांगली असल्यामुळेच ड्रग पकडले गेले पण भविष्यात ड्रग्स व्यापारी अदानी पोर्ट चा वापर करणार नाहीत त्यामुळे झाले तर नुकसानच होईल. ड्रग्स व्यापारा मध्ये अदानी पोर्ट ची involvement आहे हे माझे पण म्हणणे नाही. involvement असती तर ड्रग्स पकडलेच गेले नसते.

hrkorde's picture

7 Oct 2021 - 1:43 pm | hrkorde

अडाणी ह्यांचा फायदा होतोय का ? हे माननीय कोर्टजी ह्यांनी तपास यंत्रणेस विचारले आहे.

राजेश , शुरु , कोरडे ह्यांचा ह्यात काहीही संबन्ध नाही

घरगुती LPG cylinder च्या दरात मोठी वाढ

https://solapurvarta.in/big-increase-in-the-price-of-domestic-lpg-cylinder/

महागाईचा आगडोंब ऊसळलाय. आधीच कोरोनाने काम धंदे हिरावलेले. त्यात गरींबांच्या गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढवल्या जाताहेत. हे अशिक्षीतांचे सरकार कधी सुधरणार??

सुबोध खरे's picture

6 Oct 2021 - 7:17 pm | सुबोध खरे

अशिक्षीतांचे सरकार

???

Rajesh188's picture

6 Oct 2021 - 12:42 pm | Rajesh188

ह्यांचे भाव वाढवले की देश प्रगती करतो,देशाची आणि त्या बरोबर लोकांची पण आर्थिक स्थिती सुधारते असे bjp च्या आर्थिक विषयातील तज्ञ समर्थकांना वाटते.मग मोदी ना. का तसेच वाटणार नाही.
गॅस,डिझेल,पेट्रोल चे फार वाढवून देशाला प्रगती पथ वर नेण्याचे महान कार्य bjp सरकार करत आहे.

कपिलमुनी's picture

6 Oct 2021 - 2:32 pm | कपिलमुनी

मनीष भानुशाली कोण??

नावातकायआहे's picture

6 Oct 2021 - 2:40 pm | नावातकायआहे

गुगल करा! भा ज पा चा कार्यकर्ता आहे. ए बी पि माझा वर नवाब मलिक मुलाखत बघा! एन सि बी / बा ज प चा डाव आहे असे आरोप मलिक ह्यांनी केले आहेत.

मुळात शाहरुख खानच्या मुलासाठी राष्ट्र(भ्रष्ट)वादी सभा घेऊन त्याचा बचाव करतीय यातच आले सगळे .. जावई कोणाचा अडकला होता आणि .. चोरान्चे पत्ते चोरान्ना माहित असतात :)

श्रीगुरुजी's picture

6 Oct 2021 - 4:19 pm | श्रीगुरुजी

अगदी बरोबर. याचा जावई अंमली पदार्थ विकण्याच्या आरोपावरून ८ महिने तुरूंगात होता आणि काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटला. आपल्या जावयाच्या गुन्ह्यांबद्दल एक चकार शब्द न बोलता याला शाहरूखच्या पोराचा कळवळा आलाय.

बापूसाहेब's picture

7 Oct 2021 - 9:59 am | बापूसाहेब

ईथे जात महत्त्वाची आहे.

एक कुत्र खड्यात पडला की भुंकायला कुट्रीच्य येतात.. मांजर कावळे इ प्राण्यांना त्याच्याशी घेणं देणं नसतं.

टीप - फक्तं उदाहरण दिलेले आहे. कोणीही आपल्या ला किँवा आपल्या जातीला त्याच्याशी जोडू नये.

hrkorde's picture

7 Oct 2021 - 10:28 am | hrkorde

कुत्र्यासाठी भुंकायला कुत्रीच येतात , आणि एवढेही न समजणारे लोक त्या साऊथ इंडियन सिनेमाच्या धाग्यावर कण्हत आहेत की तिकडे ख्रिसचन लोक ख्रिसचन लोकांनाच मदत करतात.

मोदीजीदेखील कर्नाटक इलक्षणात बोलले होते , इन कुत्तो से वफादारी सीख लो
About Mudhol dogs

मृगा मृगैः सङ्गमनुव्रजन्तिगावश्च गोभिस्तुरगास्तुरङ्गैः।
मूर्खाश्च मूर्खै: सुधियः सुधीभिः समानशीलव्यसनेषु सख्यम्॥

पंचतंत्र लब्धप्रणाश.

हरिण हरणांसह, गाई गाईंसह, घोडे घोडयांसह. मूर्ख मूर्खांसह आणि शहाणे शहाण्य़ांसह असतात. ज्यांच्यात स्वभाव आणि सवयी जुळतात त्याच्यात मैत्री होते.

टीप - फक्तं उदाहरण दिलेले आहे. कोणीही आपल्या ला किँवा आपल्या जातीला त्याच्याशी जोडू नये.

अरेरे... मनातले विचार सुस्पष्ट पणे मांडता पण येत नाहीत... धिक्कार असो आमचा द्वेष सेन्सॉर करणाऱ्या आणि आम्हाला असली डिस्क्लेमर द्यायला लावणाऱ्या मिपाचा...

कॉमी's picture

7 Oct 2021 - 12:48 pm | कॉमी

राजेश१८८ यांच्या प्रतिसादाच्या आज मागे चर्चेचा स्तर खालावला म्हणून हळहळणारे अनेक दिसतात. पण इतर ठिकाणी ते क्युरिअसली शांत असतात- त्यावरून असे वाटावे कि चर्चेचा स्तर खालावला हा प्रॉब्लेम नसून, तो कोणत्या दिशेने खालावला हा प्रॉब्लेम आहे. त्याविरुद्ध दिशेला खालावलेला स्तर हलालच.

प्रदीप's picture

7 Oct 2021 - 4:40 pm | प्रदीप

राजेश१८८ यांच्या प्रतिसादाच्या आज मागे चर्चेचा स्तर खालावला म्हणून हळहळणारे अनेक दिसतात

असे म्हणणार्‍यांत मी एक आहे, तेव्हा माझ्यापुरते उत्तर देतो.

प्रथम ह्या विधानाबद्दलच सांगतो. राजेश १८८ ट्रोल आहेत असे मी इथेच म्हटले होते. मात्र, ते मुदामहून ट्रोलींग करत नाहीत, असे मला मनापासून वाटते. त्यांचा एकंदरीत आवेश पहाता ते कुठल्याही विषयावर (निदान, ह्या चर्चांच्या संदर्भात, राजकीय बाबींवर) त्यांची मते इथे पटकन टाकून मोकळे होतात. आता, मते आपण सर्वच बनवत असतो, पण ती किमानपक्षी काही व्यवस्थित माहिती करून घेतल्यावर, त्यांवर थोडाफार विचार केल्यावरच जाहीर मांडली, तर ती अर्थपूर्ण असतील, हे त्यांना ठाऊकच नसावे असे म्हणण्यास बरीच जागा आहे. त्यामुळे होते काय की, त्यांना कुणी माहितीपूर्ण, आकडेवारीसकट प्रतिवाद केला की ते त्यावर काहीही टिपण्णी न करता सरळ दुसर्‍या विषयाकडे वळतात, तेथे पुन्हा तेच होते... आणि ते इथे आल्यापासून, म्हणजे सुमारे ७- ८ महिने असेच सुरू आहे. त्यांचे आतापर्यंतचे येथले प्रतिसाद व त्यांना मिळणारे प्रतिसाद* आपण नीट पाहिलेत तर आपणांस हे सहज दिसू शकेल.

(* इथे हे कबूल केले पाहिजे की ह्याच धाग्यावर मी त्यांना केलेला प्रतिसाद माझ्या अपुर्‍या माहितीवर आधारीत होता, त्याला त्यांनी कोर्टाचा हवाला दाखवून बरोबर उत्तर दिले, पण हा, त्यांच्या व माझ्यासाठीही एक अपवादच म्हणावा).

तर, ह्यामुळे ते जे काही बरेचसे एकतर्फी लिहीतात, त्याला उत्तरे देण्याच्या फंदांत फारसे कुणी पडत नाही. पूर्वी मी तसा प्रयत्न केला, मग थांबलो.

इतर ठिकाणी ते क्युरिअसली शांत असतात-

ह्याला कारण ही माणसे आपापल्या कामांत व्यग्र असतात. एकादा विषय घेऊन त्यावर काही टिपण्णी जाहीरपणे करायची म्हटली की काही जबाबदारी आली, त्यामागे थोडाबहुत अभ्यास आला. ते सारखेच करावयास कुणाला वेळ आहे?

तर अरेरे, अशासाठी म्हटले की तुमच्यासारख्या विचारी व्यक्तिने असे लिहावे, ह्याचे वैषम्य वाटले.

संपूर्ण समुहा विरोधी मत अथवा आपल्याला व्यानीमी कावा करायला साथ देणाऱ्या व्यक्तीच्या मता विरोधी मत मांडणे म्हणजे ट्रोलिंग ही व्याख्या असेल तर विषयच संपतो...

मला स्वतःला राजेश यांचे प्रतिसाद अतिशय आवेशपूर्ण जरी वाटत असले तरी ते ट्रोल फार क्वचित वाटतात.