भाग ३
या खेळात प्रथमच भाग घेणाऱ्या लोकांनी भाग ३ वर नजर टाकून आल्यास उपयुक्त ठरेल. म्हणजे गंमतगूढचा अर्थ नीट समजेल.
....................................................................................
यापूर्वीच्या तिन्ही भागांना मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे हा भाग काढतोय. मागच्या भागात खेळाडूंनी झुंजून छान उत्तरे मिळवली. आता आपण अजून एक इयत्ता वर जाऊ !
खाली १० शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व मिपावरची सदस्यनामे आहेत. ही नामे घेऊन त्यांच्यात एक विशिष्ट लेखनसंबंध जोडून ५ जोड्या तयार केल्यात.
तुम्हाला २ गोष्टी शोधायच्या आहेत :
१. हे सर्व शब्द ओळखायचे आणि
२. प्रत्येक जोडीच्या कंसात दिल्याप्रमाणे त्यांचे एकमेकांशी असलेले लेखनसाम्य उत्तरातून सिद्ध करायचे.
हे दोन्ही जमल्यासच उत्तर बरोबर ठरेल.
(शोधसूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी).
ओळखायची सर्व नामे सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यात अंक अजिबात नाहीत. नावे ओळखताना सदस्य खात्यात जशी लिहीली आहेत तशीच ओळखली जावीत.
……………………….
१. आजोबांना प्रेमाने दोन हाका मारा (4)
२. जिथे मद्यपान नाही तिथे हा चालत राहतो (5)
( १ व २ मध्ये प्रत्येकी एका अक्षराला ह्रस्व उकार हवा)
…..
३. हे खूप उंच असले तरी त्यांना बंद करायची सोय आहे(4)
४. मराठवाड्यातील शहरापुढे हात टेकले ! (6)
( ३ व ४ मध्ये प्रत्येकी एकाच अक्षरावर मात्रा हवी)
……………………
५. राज्य तोडल्यावर संघर्षाला तयार रहा(5)
६. आदरणीय पतीला जिंकणे माहीतच नाही (6)
( ५ व ६ मध्ये प्रत्येकी एकच अनुस्वार हवा)
…..
७. संयमीने ताल तोडला (4)
८. हे शब्दयोगी अव्यय सुंदर आहे (4)
( ७ व ८ मध्ये प्रत्येकी एका अक्षरावर ह्रस्व वेलांटी हवी)
.......................
९. कान्याविना पोकळ शब्द; वेलांटीविना उंच प्रदेश( 6)
१०. प्रसिद्धीला पकडून ठेवा (4)
( ९ व १० मध्ये प्रत्येकी एकाच अक्षरावर मात्रा हवी).
……………………………………………………………………………………….
एक जोडी सोडवून पूर्ण झाल्यावरच पुढच्या जोडीकडे जावे. म्हणजे गोंधळ होणार नाही. खेळाची सुरुवात कुठल्याही जोडीपासून करता येईल.
………………………………………………………………………………………………………
प्रतिक्रिया
23 Sep 2021 - 11:17 am | कुमार१
एखादे अंदाजे उत्तर सदस्यनाम असल्याची खात्री करायची झाली तर व्यनिची सुविधा वापरता येइल.
नवीन संदेश लिहायला घेतला की त्यात "To" या चौकटीत आपल्याला अपेक्षित नाव पूर्ण लिहायचे, मग उपलब्ध नावांचे पर्याय दिसू लागतात. या यादीत पाहिजे ते नाव असेल तर उत्तर बरोबर ठरेल.
23 Sep 2021 - 7:20 pm | गुल्लू दादा
कुमार सर लय डोकं खाजवलं पण मेळ लागला नाही अजून. प्रयत्न मात्र करत राहणार.
23 Sep 2021 - 7:45 pm | कुमार१
प्रयत्न केलात हे छान आहे.
कुठल्या जोडी पासून सुरुवात केली आहे ते सांगितलं तर मदत करता येईल.
23 Sep 2021 - 7:53 pm | आग्या१९९०
१. आजोबांना प्रेमाने दोन हाका मारा (4)
नानुअण्णा
23 Sep 2021 - 7:59 pm | कुमार१
१. आजोबांना प्रेमाने दोन हाका मारा (4)
नानुअण्णा
बरोबर, छान !
आता हीच जोडी पूर्ण करावी.
23 Sep 2021 - 7:59 pm | कुमार१
१. आजोबांना प्रेमाने दोन हाका मारा (4)
नानुअण्णा
बरोबर, छान !
आता हीच जोडी पूर्ण करावी.
24 Sep 2021 - 6:36 am | कुमार१
सोपे करून देतो
जिथे मद्यपान नाही तिथे याची मुक्त भटकंती (५)
24 Sep 2021 - 7:38 am | यश राज
जिथे मद्यपान नाही तिथे याची मुक्त भटकंती (५)
दुर्गविहारी
24 Sep 2021 - 7:46 am | कुमार१
दुर्गविहारी
बरोबरच !
छान
24 Sep 2021 - 8:11 am | गॉडजिला
३ लंबूटांग ?
24 Sep 2021 - 8:20 am | कुमार१
कारण
३ व ४ मध्ये प्रत्येकी एकाच अक्षरावर मात्रा हवी.
……………………
24 Sep 2021 - 8:21 am | कुमार१
बंद करायची सोय??
24 Sep 2021 - 4:02 pm | ज्ञानोबाचे पैजार
बंद करायची सोय यात पण आहे की?
पैजारबुवा,
24 Sep 2021 - 4:22 pm | कुमार१
??
नाही समजले.
24 Sep 2021 - 3:36 pm | श्वेता व्यास
३ किल्लेदार
४ मुदखेडकर
?
24 Sep 2021 - 4:20 pm | कुमार१
३ किल्लेदार
४ मुदखेडकर
अगदी बरोबर ! छान.
24 Sep 2021 - 5:22 pm | कुमार१
खेळाला आता चांगली गती आली आहे.
५ ते १० राहिले आहेत..
४ मुदखेडकर
>>> यावरून ...
प्रयत्न करणाऱ्यांसाठी विरंगुळा म्हणून पुलंचा एक विनोद सांगतो ( ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी )
"तशी महाराष्ट्रात शहरे बरीच आहेत....
परंतु, ज्या शहरांपुढे "कर" जोडावेत अशी तीनच : पुणे मुंबई आणि नागपूर !
हा विनोद सांगताना पुलं ज्या प्रकारे कोपरापासून हात जोडून दाखवतात ते अगदी बघण्यासारखे आहे.
24 Sep 2021 - 8:23 pm | श्वेता व्यास
५ महासंग्राम
६ श्रीकांतहरणे
?
24 Sep 2021 - 8:40 pm | कुमार१
५ महासंग्राम
६ श्रीकांतहरणे
अगदी बरोब्बर !
भाग-3 प्रमाणेच यावेळेसही तुम्ही सुंदर खेळत आहात .
अभिनंदन !!
25 Sep 2021 - 7:58 am | कुमार१
आता चारच उरले आहेत. पुढच्या जोडीसाठी थोडी मदत वाढवतो.
७. संयमीने ताल तोडला (4)
यामध्ये संयमीला योग्य समानार्थी शब्द सापडला की हे चुटकीसरशी सुटेल. उत्तर हे बऱ्यापैकी परिचित नाव आहे.
८. हे शब्दयोगी अव्यय सुंदर आहे (4)
इथे ‘सौंदर्य’ साठी एक छोटासा शब्द सुचला तर मग हे सुटायला सोपे होईल.
25 Sep 2021 - 12:24 pm | गुल्लू दादा
७. मनस्विता ?
25 Sep 2021 - 12:54 pm | कुमार१
७. मनस्विता बरोबर.
छान
25 Sep 2021 - 1:33 pm | कुमार१
स्पष्टीकरण देतो :
मनस्वी
वि. १ मन स्वाधीन असलेला; मन जिंकणारा; संयमी.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%...)
ताल तोडून त्यातील फक्त ता घेतला
मनस्वि + ता
25 Sep 2021 - 6:19 pm | कुमार१
थोड्याच वेळात समारोप करतो.
25 Sep 2021 - 6:49 pm | कुमार१
८. हे शब्दयोगी अव्यय सुंदर आहे ……. अभिरूप ( अभि हे अव्यय)
९. कान्याविना पोकळ शब्द; वेलांटीविना उंच प्रदेश( 6)........ रिकामटेकडा
१०. प्रसिद्धीला पकडून ठेवा (4)……………..यशोधरा
सर्व यशस्वीतांचे अभिनंदन आणि सहभागींचे आभार !
25 Sep 2021 - 7:20 pm | श्वेता व्यास
उत्तम