मघाशी एक व्हीडीओ बघत होतो, टायगर क्लॉजबद्दल, खुप आवडला. पण नंतर त्याच व्यक्तीचा हा व्हीडीओ बघितला. 'आता मी काय बघतोय?' अस काहीतरी मिसळपाववरच आठवल, त्यावरचे प्रतिसाद आठवले. मग मी त्या वेबसाईटला बोललो : "हड साला ही वेबसाईट".
https://www.youtube.com/watch?v=qQqy4qcC6Co
आपल्याला एका अंतरराष्ट्रीय कंपनीने असे करण्याचे काय कारण वाटते?
त्यादीवशी ईथे मिसळपाववर एक मुर्तीसंबधीत लेख वाचला, देवींच्या मुर्तीबद्दल कीती सात्विकपणे सर्व पटवुन दीले होते. मला ह्या वरील व्यक्तीचे व्हीडीओ पाहताना वाटले की मी ह्या व्यक्तीची त्या लेखकाशी ओळख करुन द्यायला हवी. मी त्या दोन्ही व्यक्तींना व्ययक्तीक पातळीवर ओळखत नाही ही वेगळी गोष्ट, पण तेव्हा खरोखर तसे वाटले.
खरच आपण कोणाला पाळतोय, त्याला जो आपल्याच मुळावर उठलाय. आपण, आपण म्हणजे, आपल्या देशाबद्दल खरे असणारे, माणुसकी व दया हाच धर्म असणारे भारतीय.
(झेंडावंदन झाल्यावर जमीनीवर पडलेले भारताचे झेंडे उचलणारा शालेय विद्यार्थी)
प्रतिक्रिया
17 Sep 2021 - 5:27 pm | चौथा कोनाडा
बर्याच प्रकारचे स्वार्थः आर्थिक, राजकिय, भौगोलिक ... इ.इ.इ.
लेखक त्या व्यक्तिला बहुधा ओळखत असावा (उदा. मी ही ओळखतो, अरथात व्हर्च्युअली ) व्हर्च्युअली किंवा प्रत्यक्ष देखील !
आपण कोणालाही पाळत नसून तेच लोक आपल्याला पाळत आहेत.
सर्व रेल्वे स्थानकांवर गुगलने वायफाय सेवा देऊन सर्व प्रवाश्यांचा पर्सनक डेटा हॅक केलेलाच आहे.
हे ठीक. पण खुपदा जाणवते, आपण भाबड्या जगात वावरत असतो, पाठिमागे बर्याच घटना घडत असतात !
18 Sep 2021 - 12:30 am | साहना
ह्या प्रकारचं तंत्रज्ञानावर मी भरपूर काम केले आहे.
१५ लाख मेम्बर असलेल्या चॅनेल ला youtube काही दुष्ट हेतूने त्रास करत आहे असे म्हणणे म्हणजे गांवातील पंचाने "शरद पवार ह्यांनी खास हस्तक्षेप करून मला विलेक्शन मध्ये हरवले" असे म्हणण्यासारखे आहेत. सदर चॅनेल आणि त्याचा करता youtube च्या खिजगणतीत सुद्धा नसेल.
हल्ली स्वतःला "व्हिक्टीम" म्हणवून सोशल मीडिया वर जास्त प्रसिद्धी प्राप्त करणे हे फॅड झाले आहे. अर्थांत हे प्लॅटफॉर्म बहुतेक वेळा हिंदू विरोधी आणि डावे आहेत ह्यांत शंकाच नाही पण छोट्या माश्यांवर त्यांची अजिबात स्पेशल नजर नसते. बहुतेक वेळा ह्या गोष्टी १००% ऑटोमेटेड असतात आणि ह्या विडिओ च्या संदर्भांत असे का झाले ते तांत्रिक दृष्ट्या मी समजू शकते.
18 Sep 2021 - 1:34 am | गामा पैलवान
साहना,
तुम्हाला माझा अनुभव सांगतो.
मी फेसबुकावर गामा पैलवान नावाने एक पोस्ट टाकली होती. तिच्यात तीन उदाहरणं देऊन युक्तिवाद केला होता की हिंदू व मुस्लिमांचं भांडण व्हायलाच नको. पहिलं वंदे मातरम्ला विरोध हे उदाहरण घेतलं. म्हंटलं की, आज इम्रान खान स्त्रियांच्या आदर व सन्मानाच्या गोष्टी करतोय. हे पाकिस्तानी वंदे मातरमच नव्हे काय? हिंदू व मुस्लिमांचं भांडण व्हायलाच नको.
दुसरं उदाहरण बाबरी मशिदीचं होतं. ज्याअर्थी वादग्रस्त वास्तूखाली राममंदिराचे जुने अवशेष सापडले, त्याअर्थी ती गैरमुस्लीम वास्तू आहे. अशा ठिकाणी मशीद उभारणं हा इस्लामचा घोर अवमान ठरेल. आग मुस्लिमांनी हिंदूंसाठी सोडून द्यावी, म्हणजे हिंदूंच्या सदिच्छाही मुस्लिमांना मिळतील. अयोध्येच्या राममंदिरावरून हिंदू व मुस्लिमांचं भांडण व्हायलाच नको.
तिसरा मुद्दा आठवंत नाही.
सदर पोस्ट लिहिल्यावर कोणीतरी तक्रार केली. फेसबुकने माझ्या खात्याला चाप लावला. साहजिकच कथन हटवलं गेलं. मराठीत कथन होतं. म्हणजे वाचकवर्ग अगदी मर्यादित होता. कथन सौहार्दाचं होतं. भडकावू वगैरे नव्हतं. तरीपण ते उडवण्यात आलं.
फेसबुक कम्युनिस्ट आहे. त्यांना भांडणं लावून रक्तपात घडवून आणायचा आहे. मी परत कधी तिथे गेलो नाही.
आ.न.,
-गा.पै.
18 Sep 2021 - 1:36 am | गामा पैलवान
आग = ही जागा
आग मुस्लिमांनी हिंदूंसाठी सोडून द्यावी, = ही जागा मुस्लिमांनी हिंदूंसाठी सोडून द्यावी,
-गा.पै.
21 Sep 2021 - 4:11 pm | शानबा५१२
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार.
काही परदेशी युट्युबर्स जे 'फुड व्लॉग्स' वगैरे करतात ते भारतीय कीती गलिच्छ वातारवरणातले अन्न खातात ते मुद्दाम जोर देउन दाखवतात, सांगतात. काही प्रसिध्द ठीकाणी जाउन 'या जागेचे नाव खुप असले तरी तिथे कीती घाण आहे बघा' असेही मुद्दाम दाखवतात. ते बघुन चीड यायची म्हणुन मी बघणे सोडुन दीले नंतर आता परत हे असे मुर्त्यांबद्दल बघितले तेव्हा परत चीड आली.
साल ते अल्गोरीदम की काय ते अस बनवलय की जो शुध्द मनाने काही बघायला गेला की त्याला चीड यायलाच पाहीजे.