शीर्षक दिलाय मराठी खरं पण हि पाककृती आहे लेबनी / इजिप्त मध्ये मिळणाऱ्या फलाफल रोल ची ... आज थोडी खिचडीच झालीय खर करताना पिझ्झ्यासारखी , वाढताना गुंडाळी केलेली आणि पातळ पोळी
साहित्य
- फलाफल वडे ( छोले आणि तीळ, पार्सली आणि जिरे वैगरे घातलेले मिश्र वडे म्हणा ना ) हे मी तयार आणून त ळून किंवा एअर फ्र्यार मध्ये खरपूस करून घेतले
- काकडी , गाजर, तांबडी आणि पिवळी ढब्बू मिरची, टोमॅटो चिरून
- टेस्टी चीज
- चटण्या: मिळत असेल तर ताहिनी ( तिळाची ) किंवा होमस पण आज लसणाची अयोली ( फेसलेले अंडे आणि ऑलिव्ह तेल ) आणि स्वीट चिली सौस वापरले
- पोळी : खबुस किंवा लेबनी रोटी असले तर .. आज मैदा आणि मक्याची मेक्सिकन पोळी तयार वापरली
- पार्सली किंवा कोथिंबीर पाहिजे आज नवहती
खालील छायाचित्रे आहेत त्यामुळे वेगळे असे वर्णन करीत नाही
प्रतिक्रिया
16 Sep 2021 - 4:29 pm | चौकस२१२
flikr वरन छाया चित्र कशी मिपावर आणायची.. परत गंडल काहीतरी ALt M karun pudhe nakki konti link dyaychi ? dsrweles gondhal hoto maza
16 Sep 2021 - 7:04 pm | चौकस२१२
16 Sep 2021 - 9:30 pm | कंजूस
फोटो छान दिसत आहेत. नवा प्रकार आहे आमच्यासाठी.
17 Sep 2021 - 3:36 am | चौकस२१२
आजकाल भारतात शवर्मा सगळीकडे मिळते असे ऐकलंय तिथे कदाचित हे फलाफल वडे मिळत असतील.. नसतील तर
मिश्र दाली + छोले + धने जिरे मीठ तिखट +कोथिंबीर याचे भरद्या पोतिचे मिश्रण करून वडे करावे .. जास्त मसालेदार नको आणि चण्याची डाळ नको नाहीतर ती भजी होतील
17 Sep 2021 - 6:11 am | तुषार काळभोर
फलाफल, भाज्यांसोबत किंवा चिकन सोबत, एकदम मस्त प्रकार. बिघडण्याची शक्यता फारच कमी.
21 Sep 2021 - 6:05 pm | hrkorde
डाळीचा वडा आणि ते बुडवायला त्याच बॅटरची चटणी !!!!
27 Sep 2021 - 5:43 am | चौकस२१२
बॅटरची चटणी ?
3 Nov 2021 - 8:01 pm | nanaba
I am so so so hungry now...
3 Nov 2021 - 10:09 pm | मुक्त विहारि
ह्याच्या बरोबर, वांग्याची भाजी पण मिक्स करायचो
जोडीला व्हिनेगर मधले बुडवलेली काकडी आणि गाजर असायचेच
5 Nov 2021 - 5:47 pm | मदनबाण
फलाफल खाऊन मला एक तप झालं... या पाकृ आणि फोटोंनी जुन्या आठवणी जाग्या झाल्या, विशेषतः फलाफल शब्द वाचताच.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।