लॅपटॉप विषयी सल्ला हवा आहे.

नीलकांत's picture
नीलकांत in काथ्याकूट
2 Dec 2008 - 2:11 pm
गाभा: 

मला डेलच्या व्होस्ष्ट्रो (Dell Vostro) लॅपटॉप बद्दल माहिती हवी आहे.

कुणी वापरला आहे का? अनुभव काय आहे? सध्या एक छान लॅपटॉप माझ्या आवाक्यात दिसतो आहे. घ्यावा का?

दिसायला सुंदर आहे. माझ्या वापरासाठी मजबुत सुध्दा दिसतो. इतर कुणापेक्षा मला तो आवडला आहे. मात्र तरी सुध्दा आधी कुणी वापरला आहे का याची चौकशी करावी या हेतूने येथे धागा उघडतो आहे.

कृपया आपले मत द्या.

नीलकांत

प्रतिक्रिया

ब्रिटिश's picture

2 Dec 2008 - 2:29 pm | ब्रिटिश

कनफिगरेशन आन रेट सांगा भाऊ
मग सांगतो.
मॉडेल सांगीतल तरी चालल

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

टारझन's picture

2 Dec 2008 - 11:47 pm | टारझन

मळखाऊ आणि टिकाऊ लॅपटॉप घ्या

- टारझन

नीलकांत's picture

2 Dec 2008 - 2:48 pm | नीलकांत

Proce = DC 2.0
Chip set= intel 965
Ram =1gb
HDD = 120gb
DVDRW
Graphic = intel128
Display = 14.1" WXGA
OS = Linux

other = wifi, BTooth,speaker,modem,Card reader,4usb, web cam,

RAM Upgrade to 2gb = 1650

खरं तर मला माहिती हवी आहे की तो हाताळायला कसा आहे? खुप नाजूक की मला वाटतंय की माझ्या हाताखाली टिकेल. ;)

तसेच पुढे काही अडचण आली का कुणाला? असंच काहीसं, म्हणजे वापरल्या नंतरचा अनुभव काय?
बाकी कॉनफिगरेशन वगैरे ठीक आहे.

नीलकांत.

घाटावरचे भट's picture

3 Dec 2008 - 6:44 am | घाटावरचे भट

मी स्वतः 'वॉस्ट्रो १४००' वापरतो. दगड आहे. वरुन पडला तरी काही होणार नाही. फक्त जड आहे.
मी गेले वर्षभर वापरतोय. अजून तरी काही त्रास नाही.

ब्रिटिश's picture

2 Dec 2008 - 2:52 pm | ब्रिटिश

dell is rough n tough. if configuration is ok for u, go for it. no prolem
just select the model with 3 yr warranty

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

टारझन's picture

2 Dec 2008 - 2:58 pm | टारझन

माझा मित्र आय.आय.एम. लखनौ मधे आहे. त्यांच्या इंस्टिट्यूट मधे लॉट ने डिस्काऊंटच्या किमतीत लॅपटॉप विकले जातात.
डेल चे लॅपटॉप विकलेले. सलग ५७ लॅपटॉच च्या हिंज मधे क्रॅक आला होता.

बाकी आपली विच्चा

- टारझन

भाग्यश्री's picture

2 Dec 2008 - 3:48 pm | भाग्यश्री

ह्म्म.. हिंज तुटण्याची शक्यता आहे, जर लॅपटॉप नाजुक वगैरे असेल तर... आमचा एक लॅपटॉप असाच तुटका झालाय!
दणकट पण असतात डेलचे.. तसा पाहून घेतलेला बरा..

http://bhagyashreee.blogspot.com/

शैलेन्द्र's picture

2 Dec 2008 - 4:03 pm | शैलेन्द्र

डेलचे हेच मोडेल मि वापरतोय, Good sturdy model, and in this model they have changed the Hinge design, so hopefully no problem.

एकलव्य's picture

2 Dec 2008 - 8:08 pm | एकलव्य

डेल टाळावा या मताचा मी आहे. हिंज तुटते; बॅटरीची बोंब बर्‍याच जणांकडून ऐकली आहे. इतकी दणकट बॉडी आहे पण अनेक कमकुवत गोष्टी वाटतात. शेवटी डेस्कटॉपसारखा वापरावा लागतो.

एकूण डेलचा सपोर्ट कसा आहे ते पाहून निर्णय घ्या.

- एकलव्य

मी गेल्या ६-७ महिन्यापुर्वी "डेल इन्स्पिरॉन १५२५ " मॉडेल घेतले ...
आत्तापर्यंत तरी त्याचे सार्थक झाले आहे, मला कधीही त्याचा पश्चाताप झाला नाही ...

>> हिंज तुटते;
डिसाईन बदलले आहे, आता काहीही इश्यु नाही ...
आत्तापर्यंत ऐकल्याप्रमाणे नवे मॉडेल्स उत्तर पर्फॉमन्स देत आहेत ...

>> बॅटरीची बोंब बर्‍याच जणांकडून ऐकली आहे.
त्याला खुप काळ झाला. आता तसे काही नाही ...
माझेच सांगतो, मी जरी पिक्चर वगैरे पहात बसलो तरी माझी बॅटरी कमीत कमी ४.५ ते ५ तास आरामात जाते ते पण एकदम हाय परफॉमन्स ला ....
माझा लॅपटॉप " ९ सेल बॅटरी" वाला आहे ही गोष्ट वेगळी, तरीही काही इश्यु नाही ...

>>इतकी दणकट बॉडी आहे पण अनेक कमकुवत गोष्टी वाटतात. शेवटी डेस्कटॉपसारखा वापरावा लागतो.
अजुन तशी वेळ आली नाही ...
लॅपटॉप एकदा पडाला आहे व एकदा त्यावर चक्क एक मित्र बसला होता ...
अजुन तरी व्यवस्थीत चालु आहे ....

>>एकूण डेलचा सपोर्ट कसा आहे ते पाहून निर्णय घ्या.
मुद्द्याचा प्रश्न ...
एकदा स्वतःच्या काड्या करण्यामुळे मला "कस्टमर केअर" ला फोन करण्याची वेळ आली ...
त्यांनी सर्व व्यवस्थीत समजावुन घेऊन एकदम "चपलख उपाय" सांगितला, शिवाय सर्व डायव्हर्सही ऑनलाईन उपलब्ध आहेत...
त्यामुळे जरी फॉर्मॅट मारले तरी "ड्रायव्हर्ससाठी" रडायची पाळी येत नाही ...
हा अनुभव लेटेस्ट आहे ...

सबब, डेल घेण्यास प्रत्यवाय नसावा ...!

छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना

लिखाळ's picture

2 Dec 2008 - 9:03 pm | लिखाळ

डॉन म्हणतो त्याला सहमत आहे.
माझ्याकडे सुद्धा डेलचा इन्स्पिरॉन १५०० आहे. ६-७ महिन्यांपासून वापरतो आहे. मला चांगला वाटला.

तसेच कस्ट्मर केअर बाबत माझ्या इतर काही डेल धारक मित्रांना चांगले अनुभव आले आहेत.
-- लिखाळ.

आजानुकर्ण's picture

3 Dec 2008 - 6:56 am | आजानुकर्ण

माझ्याकडे सुद्धा डेल इन्स्पिरॉन १५२० आहे. दीड वर्षे काहीही अडचण आलेली नाही. आताही मला २.३० तास ब्याटरी ब्याकप मिळतो. (६ सेल ब्याटरी) त्यांची ग्राहकसेवा बरी आहे. एकदा उबुंटू टाकायच्या नादात विंडोज उडवले होते. तर त्यांनी विंडोजच्या सीड्या कळवल्याबरोबर ताबडतोब पाठवल्या होत्या असे आठवते.

माझ्या एका मित्राच्या मुलाने त्याच्या डेलच्या लॅपटॉपवर चहा सांडवला होता. सर्व बटणे काढून लॅपटॉप व्यवस्थित पुसला आणि परत बटणे लावली.

काही अडचण नाही.

एकलव्य's picture

2 Dec 2008 - 9:26 pm | एकलव्य

डॉनभाऊ - आपला अनुभव चांगला असूही शकेल. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

माझ्या इन्स्पिरॉन ९३०० च्या बॅटरीची कटकट साधारण वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरू झाली. रिप्लेस केल्यानंतरही खूप गरम होत राहते. आश्च्यर्य म्हणजे हा प्रॉब्लेम जेनेरिक आहे असे आजूबाजूच्या काही डेलधारकांकडून कळला.

असो... माझ्या अनुभवानुसार डेल घेणे टाळावे किंवा सपोर्टची चौकशी करावी असे मी नक्कीच म्हणेन.

वेताळ's picture

2 Dec 2008 - 7:56 pm | वेताळ

तसेच कॉम्पक पण बरा आहे. डुअलकोअर घेण्यापेक्षा कोअर२डुओ घ्या.
वेताळ

प्राजु's picture

2 Dec 2008 - 8:41 pm | प्राजु

व्होस्ट्रोच वापारते आहे. मला तरी काहीच प्रॉब वाटत नाही. चांगला आहे परफॉरमेन्स. दण्कट आहे.. स्टर्डि आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बाकरवडी's picture

2 Dec 2008 - 8:46 pm | बाकरवडी

डुअलकोअर & कोअर२डुओ मधे नक्की काय फरक आहे कुणी सांगेल का ?
क्रुपया मदत करा.

ब्रिटिश's picture

2 Dec 2008 - 8:58 pm | ब्रिटिश

डुअलकोर - हायवे वरुन २ गाड्या एकावेळी
कोर२डुओ - ब्रॉड हायवे वरून ४ गाड्या एकावेळी

speed remains same at the time of multitasking without any slowdown process

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

कपिल काळे's picture

2 Dec 2008 - 8:55 pm | कपिल काळे

मी पण डेल वापरतोय. माझ्याकडे इन्स्पिरॉन आहे. पण मजबूत आहे. ब्याटरीचा काही प्रश्न नाही.

वरच्या सगळ्यांना मेकानिकल अडचणी आलेल्या दिसतायत- हिंज वगैरे.

खडूस's picture

2 Dec 2008 - 9:16 pm | खडूस

माझ्याकडे ४/५ वर्षापासून Dell चा लॅपटॉप आहे (७०० मॉडेल)
अजून तरी काहीही त्रास झाला नाही. (फक्त एकदा बॅटरी बदलावी लागली तीसुद्धा ४ वर्षानंतर)

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

रेवती's picture

2 Dec 2008 - 9:27 pm | रेवती

नवर्‍याचा डेल मस्तच चालू आहे.
एच पी चे बॅटरी प्रॉब्लेम्स खूप येतात.

रेवती

योगी९००'s picture

2 Dec 2008 - 9:37 pm | योगी९००

नीलकांत भाऊ,

माझ्या मते बरीच मते वाचून तुम्ही अधिक बावचळण्याची शक्यता आहे.

तेव्हा स्वतः धाडस करून कोठलाही संगणक घ्या. जर दुर्दैवाने खराब निघाला तर ज्याच्याकडुन घेतला त्याला परत नवीन बदलुन देत नाही तो पर्यंत सोडू नका.

माझा अनुभव असा की मी HP DV6767TX घेतला. पण आणल्यानंतर महिन्याभरात motherboard खराब. हात धुवून HP च्या पाठी लागलो आणि नवा संगणक बदलून घेतला.

पण नवा बदललेला संगणक अतिशय उत्तम आहे.

शेवटी electronic गोष्टीची काहीच guarranty नाही. तुमच्या नशिबावर आहे.

खादाडमाऊ

कोलबेर's picture

3 Dec 2008 - 7:06 am | कोलबेर

डेल, एचपी, काँपॅक, आयबीएम (पूर्वीचा. सध्याचा लिनोव्हो नव्हे) तोशिबा, सोनी ह्या कंपन्यांचे लॅपटॉप वापरलेले आहेत. त्यातील आयबीएम सगळ्यात टिकाऊ वाटला. एचपी आणि काँपॅक दिसायला देखणे पण गुणवत्तेत डेल इतकेच वाटले. डेल मला वैयक्तिक आवडीनुसार दिसायला अतिशय सुमार वाटतात (पूर्वी ते एकलव्य म्हणतात तसे बोजड देखिल असायचे नवीन मॉडल्स मात्र सुधारलेली दिसतात). इतर कंपन्यांच्या तुलनेत बाकी कोणतीही उणीव डेल मध्ये दिसली नाही. बॅटरी तापणे, खराब होणे हे सगळ्याच लॅपटॉपना भेडसावणारे प्रश्न आहे. तोशिबा आणि विशेषतः सोनी अव्वाच्या सव्वा किंमत लावलेले दिसतात.

तेव्हा तुम्हाला हवे असलेले कॉन्फिगरेशन वरील पैकी कोणती कंपनी सगळ्यात स्वस्त देत असेल ते पाहून खरेदी करण्याचा सल्ला मी देईन.

मैत्र's picture

3 Dec 2008 - 9:38 am | मैत्र

डेल जड, दिसायला तितकेसे खास नाही पण दणकट आणि रिलायबल असतात.
हिंजेस चा प्रॉब्लेम पुरातन आहे. आता सोडवला असेल तर नक्कि घ्या. कारण इतर पर्याय जे आहेत लॅपटॉप साठी त्यापेक्षा हे चांगले आहेत आणि ज्या किंमतीला मिळतात त्याला तर नक्किच.
आय बी एम असताना (लेनोव्हो च्या आधी) जे थिंकपॅड आले ते अतिशय उत्तम होते. त्या दर्जाचे लॅपटॉप परत कुठलेही पाहिले नाहित. कदाचित मॅक असेल तेवढा चांगला पण त्याची किंमत आणि मॅक ओ एस सोयीचे नाही.
तात्पर्य : डेल हा उपलब्ध लॅपटॉप मध्ये उत्तम. तोशिबा बकवास आहेत, एसर त्याहून वाइट.

मनिष's picture

3 Dec 2008 - 11:02 am | मनिष

मी पण डेल इन्स्पिरॉन १.५ वर्षे वापरतो आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. मला हवे तसे कॉन्फिगरेशन करून घेता येत होता म्हणून मी घेतला. एचपी, एसर, एचसील, लेनोव्हा (आणि कदाचित सोनी पण) च्या तुलनेत डेल नक्कीच उजवा आहे. डेल लॅटीट्युड हा सर्वोत्तम.

व्होस्ट्रो मधे विंडोज व्हिस्टा नाही आणि रंग निवडता येत नाही (फक्त काळ मिळायचा). लिनक्सबरोबर डेल मिळत असेल तर फारच छान!

विनायक प्रभू's picture

3 Dec 2008 - 3:59 pm | विनायक प्रभू

मला पण घ्यायचा आहे लॅप टॉप. सर्व चर्चा वाचल्यावर मी ब्रिटीश म्हणतो ते मॉडेल फायन॑ल करणार.
अवांत॑रः लॅप टॉप घेतल्यावर लॅप चे काही वांधे होत नाहीत ना?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Dec 2008 - 4:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> अवांत॑रः लॅप टॉप घेतल्यावर लॅप चे काही वांधे होत नाहीत ना?
लॅपटॉप टेबलवर ठेवूनही काम करता येतं.

घाटावरचे भट's picture

3 Dec 2008 - 4:51 pm | घाटावरचे भट

शिवाय व्हॉस्ट्रोवर व्हॉल्यूम कमी करण्याची कळ दाबली असता ® उमटतो......

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Dec 2008 - 5:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रकाटाआ

ते लॅप वर घेऊन टॉप केल्यावरच कळेल!!!!!!

नीलकांत's picture

4 Dec 2008 - 10:52 am | नीलकांत

गेले काही दिवस लॅपटॉप घ्यावा ह्या विचारात होतो. इन्टरनेटवर शोधाशोध पुण्यात दुकांनांना भेटी असा प्रवास केला.
काही काळ हार्डवेअर मध्ये काम केल्याने कॉनफिगरेशनवर भर असायचा. डिझाईन माझ्यासाठी दुय्यम भाग होता.

मजबुत कॉनफिगरेशन, दणकट बॉडी आणि सोबत किंमत कमी अशी पाककृती हवी होती.

कॉम्पॅकचा डिस्प्ले छान आहे मात्र त्यात विन्डोज एक्सपी चालत नाही. व्हिस्टाचीच गरज लागेल. ( पर्याय रद्द )
एचपी चे उत्तम पर्याय ४० हजारांच्या पुढे ( पर्याय रद्द ) मात्र एक मॉडेल ३३ हजारापर्यंत उपलब्ध होते. हा एकच पर्याय एचपीचा होता.
लिनोवो (आयबीएम ) चा पर्याय विचारात होता.
डिसीसी (डेक्कन ) नावाच्या दुकानात एलजी च्या लॅपटॉप वर एक आकर्षक योजना होती, त्यामुळे हा पर्याय होता.

डेल बाबत विचार असा की इन्स्पीरॉनचा पर्याय सर्वोत्तम आहे. मात्र ऑनलाईन खरेदी केला तर तो साधारण ३९००० पर्यंत गेला असता. एवढी गुंतवणुक करण्याचा विचार नव्हता.
डेलचा व्होस्त्रो उत्तम पर्याय होता. मात्र नेटवर उपलब्ध पर्याय महाग होते. पुण्यात व्होस्त्रो बिझनेस मॉडेल असल्यामुळे काही लोक ते विकत नव्हते.

शोध घेत घेत बाबा (टिळक रोड) ला गेलो. तेथे एसर, एलजी चे पर्याय पाहत असतांना व्होस्त्रो दिसला. मॉडेल ऑनलाईन उपलब्ध नव्हते (बार्गेनींगला वाव !) दिलेली किंमत ३६००० होती. मी बजेट ३०००० बोललो त्याने ताबडतोबआज घ्याल तर हाच ३०००० ला देतो म्हणाला.
मूळ रॅम १जीबी असल्याने मी ती वाढवून किती ला द्याल त्यावर अडलो. शेवटी २ जीबी १६५० ला नक्की झाला. खरं तर १५०० ला योग्य किंमत होती. मात्र तो म्हणाला की यापेक्षा कमी करत नाही बदल्यात २जीबी पेन ड्राईव्ह, हेडफोन,माऊस देतो.
त्याचा भर होता आताच घ्या किंवा नोंदणी करा. मी काहीच न करता बाहेर पडलो.

मिपावर धागा उघडला. मित्रांकडून सल्ला घेतला.छोटा डॉन ने फोन करून चर्चा केली. नंतर संध्याकाळी तेथे गेलो दोन जीबी रॅम वाढवून घेतली. आता एकून रॅम ३जीबी आहे. :)

ब्रिटीशांनी सुचवल्याप्रमाणे ३ वर्षाची वॉरंटीसाठी चौकशी केली तर खुप जास्त पैसे लागत होते म्हणून तो पर्याय रद्द केला.
आणि हो, वर मी वेबकॅम आहे असं म्हटलं होतं मात्र बिझनेस मॉडेल्स मध्ये वेबकॅम नसतो असं म्हणतात. यात सुध्दा नाहीये.

असा एकंदरीत माझा लॅपटॉप घेण्याचा प्रवास झाला.
डेल व्होस्त्रो ए८४० + २ जीबी रॅम अपग्रेड = ३१६५०/-

तुमच्या सुचनांसाठी धन्यवाद. खरं तर खुप आकर्षक योजना ऐकली की ती त्याक्षणी घ्यावी असं वाटतं, त्याक्षणी न घेता मित्रांना विचारण्यासाठी शोरूमच्या बाहेर आलं तर डोकं ठिकाण्यावर येऊन निर्णय घेता येतो. ;)

नीलकांत

घाटावरचे भट's picture

4 Dec 2008 - 10:57 am | घाटावरचे भट

नीलकांतराव, सर्वप्रथम नव्याकोर्‍या लॅपटॉपबद्दल अभिनंदन. बिझनेस मॉडेल्समध्ये वेबकॅम नसतोच असं काही नाहीये. व्हॉस्ट्रो स्मॉल बिझनेस प्रकारात येत असला तरी त्यात वेबकॅमचा पर्याय उपलब्ध आहे. माझ्या लॅपीमध्ये वेबकॅम आहे. फक्त मला त्याच्यासाठी ४० डॉलर जास्त मोजावे लागले. :(

३ वर्ष वॉरंटी नाही घेतलीस पण एक वर्षाचीतरी आहे ना? फार महत्त्वाची असते!
माझ्या एच्.पी.चा तीनच महिन्यात डिस्प्ले गुल झाला, रिपेर होईना, शेवटी वॉरंटी होती म्हणून मॉडेलच बदलून दिलं.

चतुरंग

नीलकांत's picture

4 Dec 2008 - 1:18 pm | नीलकांत

१ वर्षाची वॉरंटी आहेच. ती कशी सोडणार ?

३ वर्षाची असली तर उत्तम म्हणून चौकशी केली होती.

भट साहेब आणि रंगासाहेब,
धन्यवाद.

- नीलकांत

काळप्रवासी's picture

2 May 2015 - 10:35 pm | काळप्रवासी

Navin article lihayla surwat kuthun karaychi? Kuthla option?

काळप्रवासी's picture

2 May 2015 - 10:35 pm | काळप्रवासी

Navin article lihayla surwat kuthun karaychi? Kuthla option?

उजवीकडे 'लेखन करा' अशी लिंक दिसतेय ना, त्यावर क्लिकवा. आणि होज्जा शुरू!