मिपा गंमतगूढ (३) : नाती गुंतागुंतीची

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
8 Sep 2021 - 10:45 am
गाभा: 

भाग २ : https://www.misalpav.com/node/49198
……………….

पहिल्या दोन्ही भागांना मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे हा भाग काढण्याची प्रेरणा मिळाली आहे. आता आपण अजून जरा वरच्या इयत्तेत जाऊ ! या भागात संपूर्ण शोधसूत्रांची मिळून एक छोटीशी कथा रचली आहे.

खाली ८ शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व मिपावरची सदस्यनामे आहेत. ही नामे घेऊन त्यांच्यात एक विशिष्ट संबंध जोडून हा खेळ तयार केलेला आहे.

तुम्हाला २ गोष्टी शोधायच्या आहेत :
१. हे सर्व शब्द ओळखायचे आणि
२. सूत्रांत दिल्याप्रमाणे त्यांचे एकमेकांशी असलेले नाते उत्तरातून सिद्ध करायचे.
हे दोन्ही जमल्यासच उत्तर बरोबर ठरेल.

(शोधसूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती.
संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी).

ओळखायची सर्व नामे सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यात अंक अजिबात नाहीत.

अनुक्रमेच सोडवायला घेतल्यास बरे होईल.

शोधसूत्रे:

१. याच्या कामाची व्याप्ती अफाट, कल्पनातीत (५)
२. क्रमांक १ च्याच जातकुळीतील. याच्यापासून काय लपवणार? (४)
(शक्यतो १ व २ चे उत्तर एकदम द्यावे म्हणजे सिद्धता होते).

३. हे चार अक्षरी
४. हे पाच अक्षरी.
३ व ४ चा एक गुणधर्म समान असून त्यासाठी त्यांच्यात सुप्त स्पर्धा. त्या गुणामुळे कोणालाही भुरळ पाडण्याची क्षमता आहे. परंतु १ व २ ना यांच्याबद्दल आकर्षण नाही !

(शक्यतो ३ व ४ चे उत्तर एकदम द्यावे म्हणजे सिद्धता होते).

५. याच्याजवळ रात्र व श्रीमंती कपडा जो ३ व ४ ना अगदी प्रिय (५)

६. याच्यात कुठेही दूरवर पोचण्याची क्षमता. परंतु १ व २ चा पत्ता त्याला अजून सापडलेला नाही.! (५)

७. हा क्रमांक ६ प्रमाणे नसून बसल्या जागीच झेप घेतो. ती झेप कदाचित १ व २ पर्यंत पोचू शकते !(५)

८. याला डोक्यावर बसायची सवय. पण १ व २ चे बारसे करतेवेळी याला दूर ठेवण्यात आले (४).
………...

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 10:53 am | कुमार१

अनुक्रमे जात असताना खालील शक्यता राहते :

समजा 1 व 2 ची उत्तरे अपेक्षितपेक्षा वेगळी आली, परंतु शोधसूत्रांशी थोडीफार जुळणारी असली, तर आपण काही वेळ त्यांना प्रलंबित ठेवू.
जशी पुढची उत्तरे येतील तसा संबंध स्पष्ट होईल आणि मग तेव्हा ते उत्तर बरोबर की चूक ते ठरेल.

मला ६ ओळखू आलंय ;) आताच नाही सांगणार (हे हे) भारी मजा येणार आहे :)

आग्या१९९०'s picture

8 Sep 2021 - 12:32 pm | आग्या१९९०

१) मदनबाण
२) चित्रगुप्त

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 12:52 pm | कुमार१

दोन्ही नाही
आता लगेच तुम्हाला हा निर्णय कदाचित पटणार नाही पण दम धरावा ही विनंती हळू ते स्पष्ट होत जाईल
१) मदनबाण
२) चित्रगुप्त

यांची जातकुळी एक म्हणता येणार नाही

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 2:13 pm | कुमार१

वरील उत्तरे देताना विचारांची दिशा योग्य होती पण नेम चुकलेत

एक व दोन सुटेपर्यंत जरा त्रास होईल
सर्वांनी सहकार्य करावे ही वि.

आग्या१९९०'s picture

8 Sep 2021 - 6:52 pm | आग्या१९९०

फार डोकं नाही चालत आमचे. शब्दशः अर्थ लावून हवेत बाण मारले. काम आणि मदनबाण यांचा संबंध जोडला आणि मानवाचा पूर्ण लेखाजोगा ठेवणाऱ्याकरून काय लपवणार? म्हणून चित्रगुप्त.
असंही सुडोकू सारखे एकमेव उत्तर नाही ह्याची कल्पना असल्याने न पटण्याचे कारण नाही.

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 6:54 pm | कुमार१

धन्यवाद
तुम्ही चांगला प्रयत्न केलेला होता.
आवडला.
शेवटी या शोधयात्रेचा आनंद आपल्या सगळ्यांनाच मिळतो आहे :)

१ व २ अनुक्रमे टर्मीनेटर आणि गॉडजिला?

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 2:56 pm | कुमार१

नाही आपला मूलभूत नियम बघा:

सर्व अपेक्षित शब्द मराठी भाषेत आहेत

प्रचेतस's picture

8 Sep 2021 - 2:59 pm | प्रचेतस

ओह्ह ओके.

गॉडजिला's picture

8 Sep 2021 - 3:05 pm | गॉडजिला

१) याच्या कामाची व्याप्ती अफाट, कल्पनातीत (५)

- अनंतयात्री ?

त्यांचा आयडी 'अनन्त्_यात्री' असा आहे त्यामुळे ते नसावेत.

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 3:16 pm | कुमार१

नाव सलग पाहिजे
खंड चालणार नाही

....
आतापर्यंतच्या प्रयत्नांना मी दाद देतो
सर्वांना कुठल्या परिघात विचार करायचा आहे हे फार छान समजले आहे
त्याबद्दल कौतुक !

१ चे जे काम आहे त्याला "उत्पादन" म्हणूया !!

Bhakti's picture

8 Sep 2021 - 3:44 pm | Bhakti

अरेरे
६ चे उत्तर अनंत _यात्री नाही तर...-१

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 3:56 pm | कुमार१

हो ना, अरेरे !
पण आशा सोडू नका
त्याच धर्तीवर शोधता येईल

गॉडजिला's picture

8 Sep 2021 - 3:19 pm | गॉडजिला

लेखनवाला ?

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 3:23 pm | कुमार१

लेखनवाला

इथे मर्त्य मानवांच्यात नका घुटमळू !

प्रचेतस's picture

8 Sep 2021 - 3:13 pm | प्रचेतस

क्र. १ - पाषाणभेद?

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 3:19 pm | कुमार१

पाषाणभेद अजिबात नाही
पूर्ण वेगळ झाले

पलाश's picture

8 Sep 2021 - 3:41 pm | पलाश

क्रमांक २. सर्वसाक्षी

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 3:51 pm | कुमार१

क्रमांक २. सर्वसाक्षी

अगदी बरोबर ,सुंदर

अभिनंदन
तुम्हीच १ जोडीने उभे करा बरं. :))

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 4:49 pm | कुमार१

'कोण'आहे ते तर सर्वांना कळले आहे !
तोच तो ज्याच्यामुळे सर्व चराचर.....

येऊ द्या...

शाम भागवत's picture

8 Sep 2021 - 4:59 pm | शाम भागवत

विश्वनिर्माता

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 5:27 pm | कुमार१

विश्वनिर्माता

अगदी बरोबर छान

क्रमांक १. (विश्वनियंता, जगन्नियंता, परमेश्वर अशासारखा) विश्वाच्या अफाट पसार्‍याकडे लक्ष देणार्‍या देवासाठी असलेला पाच अक्षरी समानार्थी शब्द असावा. असे सभासद नाव आहे का हे पहाता आले नाही.

शाम भागवत's picture

8 Sep 2021 - 5:39 pm | शाम भागवत

३ व ४ सापडलंय असं वाटतंय.

३ व ४ चा एक गुणधर्म समान असून त्यासाठी त्यांच्यात सुप्त स्पर्धा. त्या गुणामुळे कोणालाही भुरळ पाडण्याची क्षमता आहे. परंतु १ व २ ना यांच्याबद्दल आकर्षण नाही !

पण १ व २ चा एक वैषिष्ट्य ४ मधे आहे का?

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 5:51 pm | कुमार१

नाही .सांगतो

आता एक व दोनचा सुंदर शोध लावल्यानंतर आपण सगळे ते थेट पृथ्वीवर खाली येऊ !

त्यामुळे इथून पुढचा परिघ पूर्ण मानवातला समजायला हरकत नाही...
आता ऐहिक पातळीवरून चला

४ यांचा शेवटचा लेख एप्रीलमधला आहे का?

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 6:02 pm | कुमार१

तसे नाही सांगता येणार कारण मी तशी काही नोंद ठेवलेली नाही.
मी अनेक पानांवरून जात आकर्षक वाटणारी नावं घेतली आहेत.

या प्रकारची मदत वात करावी का असा एक पेच आहे :)
?

जर सदस्यांना उत्तर ओळखायला जड जायला लागले तर
या पध्दतीने एखादी खूण देता येईल.
किंवा
त्या सदस्याचे लेखनाचे एखादे वैशिष्ट्य

ह्या मार्गाने मिपाचे जे नियमीत वाचक आहेत ते उत्तराच्या जवळ जाऊ शकतील तसेच त्यांना यात भाग घ्यावासा वाटू लागेल.
उदाहरणार्थ एखादा सदस्याने एखादी चांगली शशक लिहीली असेल तर तसा उल्लेख करायला हरकत नाही.

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 6:23 pm | कुमार१

तुमच्या सूचनेची नोंद घेत आहे.
मात्र या वेळेस मी तशी प्रत्येक सदस्याची काही नोंद ठेवलेली नाही
मुळात मिपा शोध सुविधा यासंबंधी मार्गदर्शन झाले तर कोणालाही केव्हाही उत्तर तपासून पाहता येईल.

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 6:39 pm | कुमार१

श्याम
निरोप पहावा

सलामीच्या खेळाडूंनी 1 व 2 ची उत्तरे अतिशय छान शोधली आहेत.
आता सर्वांना 1 व 2 च्या उत्तरांची शोध सूत्रानुसार कशी अनुरूपता आहे ते पडताळून पाहता येईल.
**

वर पलाश यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्यासंदर्भात मी ज्ञानोबाचे पैजार किंवा अन्य संपादकांना जाहीर विनंती करतो :

अशा खेळात एखाद्याला सुचलेले नाव सदस्यनाव आहे की नाही याची खात्री करायची असल्यास काय प्रकारची शोध सुविधा वापरता येईल ? मिपाची काम करते आहे का मला माहित नाही. गुगल वापरून काही उपयोग होईल का याचे मार्गदर्शन करावे.

पण खात्री करायची झाली तर व्यनिची सुविधा वापरता येइल, नविन संदेश लिहायला घेतला की त्यात "To" या चौकटीत आपल्याला अपेक्षित नाव लिहायचे, मग उपलब्ध नावांचे पर्याय दिसू लागतात, या यादित पाहिजे ते नाव असेल तर तो अधिकृत मिपा आयडी आहे असे समजता येइल. एक काळजी घ्यायला हवी ती अशी की नाव लिहिताना पूर्ण लिहावे.

उदा कुमार असा शोध घेता कुमार, कुमार जावडेकर, कुमार ज्र, कुमार थत्ते, कुमार दा, कुमार पवार १६०५, कुमार पोफले, कुमार भिडे, कुमार राम व कुमारकौस्तुभ हे पर्याय आले.

जेव्हा मी कुमार१ असे पूर्ण लिहिले तेव्हा कुमार१ आणि कुमार१९६९ हे पर्याय दिसले.

पैजारबुवा,

कुमार१'s picture

9 Sep 2021 - 8:33 am | कुमार१

उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे

इथून पुढे आम्हा सर्वांना त्याचा चांगला फायदा होईल

कुमार१'s picture

9 Sep 2021 - 9:03 am | कुमार१

आताच मी वर सांगितलेली चाचणी करून पाहिली.

. निरोप मध्ये जाऊन मी To या जागेत फक्त ज्ञानोबा असे टंकले तेव्हा तिथे ज्ञानोबाचे पैजार हे एकमेव नाव हजर झाले.

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 6:52 pm | कुमार१

आता पुढील शोध घेताना दोन पातळ्यांवर काम करता येईल
* 3 व 4 चा एकत्रित शोध चालू ठेवणे,

* ८ चा संबंध फक्त १ व २ शी चआहे. तेव्हा त्याचाही स्वतंत्रपणे विचार करता येईल.

शाम भागवत's picture

8 Sep 2021 - 7:03 pm | शाम भागवत

८. याला डोक्यावर बसायची सवय. पण १ व २ चे बारसे करतेवेळी याला दूर ठेवण्यात आले (४).

१ व २ चे बारसे

म्हणजे "ॐ" का?

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 7:08 pm | कुमार१

म्हणजे "ॐ" का? >> नाही

याला डोक्यावर बसायची सवय.>>
१ ,२ या नावांकडे बारकाईने बघत राहा आणि मग तुम्हाला सूत्राचा अर्थ उमगेल...

छान प्रयत्न

श्वेता व्यास's picture

8 Sep 2021 - 7:15 pm | श्वेता व्यास

८ अनुस्वार ?

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 7:17 pm | कुमार१

८ अनुस्वार

सुंदर उत्तर
अगदी बरोबर !

शाम भागवत's picture

8 Sep 2021 - 7:19 pm | शाम भागवत

८. याला डोक्यावर बसायची सवय.

हा गुणधर्म शोधताना...

मी अनेक पानांवरून जात आकर्षक वाटणारी नावं घेतली आहेत.

हीच पध्दत वापरली असता.
त्यावरून डोक्यावर बसणारी नावे शोधत होतो.
जून महिन्यात एक नाव मिळालं.

अनुस्वार
हा नेहमी डोक्यावर बसतो पण १ व २ मधे तो नाही.

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 7:26 pm | कुमार१

खेळाला सुंदर गती आलेली आहे. सर्वांचेच प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. प्रयत्न करणारा प्रत्येक जण अभिनंदनास पात्र आहे.

तेव्हा प्रयत्न करून उत्तर आले नाही तर अजिबात कमीपणा मानायचा नाही.

इथे प्रत्यक्ष खेळणे आणि शोधयात्रेत सहभागी होणे हाच सर्वांसाठी आनंद आहे.
पुढील शोध यात्रेसाठी शुभेच्छा आहेतच
….

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 7:26 pm | कुमार१

खेळाला सुंदर गती आलेली आहे. सर्वांचेच प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. प्रयत्न करणारा प्रत्येक जण अभिनंदनास पात्र आहे.

तेव्हा प्रयत्न करून उत्तर आले नाही तर अजिबात कमीपणा मानायचा नाही.

इथे प्रत्यक्ष खेळणे आणि शोधयात्रेत सहभागी होणे हाच सर्वांसाठी आनंद आहे.
पुढील शोध यात्रेसाठी शुभेच्छा आहेतच
….

श्वेता व्यास's picture

8 Sep 2021 - 7:41 pm | श्वेता व्यास

५ चांदणशेला ?
६ जगप्रवासी ?

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 7:46 pm | कुमार१

५ चांदणशेला
६ जगप्रवासी

श्वेता
फारच छान
५, ६ अगदी बरोबर
खेळातली पहिली हॅटट्रिक तुमच्या नावावर .

अभिनंदन !!
.....
निम्मे ओलांडले देखील ...

श्वेता व्यास's picture

8 Sep 2021 - 7:52 pm | श्वेता व्यास

धन्यवाद सर :)

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 7:51 pm | कुमार१

१. विश्वनिर्माता
२. सर्वसाक्षी
....

३. हे चार अक्षरी
४. हे पाच अक्षरी.
३ व ४ चा एक गुणधर्म समान असून त्यासाठी त्यांच्यात सुप्त स्पर्धा. त्या गुणामुळे कोणालाही भुरळ पाडण्याची क्षमता आहे. परंतु १ व २ ना यांच्याबद्दल आकर्षण नाही !
.....
५.चांदणशेला
६. जगप्रवासी

...
७. हा क्रमांक ६ प्रमाणे नसून बसल्या जागीच झेप घेतो. ती झेप कदाचित १ व २ पर्यंत पोचू शकते !(५)
....

८. अनुस्वार

शाम भागवत's picture

8 Sep 2021 - 7:52 pm | शाम भागवत

७. हा क्रमांक ६ प्रमाणे नसून बसल्या जागीच झेप घेतो. ती झेप कदाचित १ व २ पर्यंत पोचू शकते !(५)

योगविवेक

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 8:02 pm | कुमार१

योगविवेक

याला पर्यायी बरोबर असे देण्यात येत आहे.
छान
जमल्यास शेवटी अपेक्षित उत्तर अन्य कोणी शोधावे.

गॉडजिला's picture

8 Sep 2021 - 7:58 pm | गॉडजिला

सुटले की सर्व... कमाल आहे लोकांची

शाम भागवत's picture

8 Sep 2021 - 8:01 pm | शाम भागवत

३. रातराणी
४ मदनबाण

गॉडजिला's picture

8 Sep 2021 - 8:03 pm | गॉडजिला

४. हे पाच अक्षरी.

मदनबाण ?

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 8:06 pm | कुमार१

३. रातराणी
४ मदनबाण
हे जोडी म्हणून योग्य आहे
पण......

५ चाश्रीमंती कपडा जो ३ व ४ ना अगदी प्रिय

हा संबंध नाही जुळून येत.

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 8:09 pm | कुमार१

तीन व चार हे फुलांची नावे म्हणून सांगितल असेल तर मग त्यांना श्रीमंती कपडा प्रिय हे नाही पटत

म्हणून अजून प्रयत्न करावा ही विनंती.

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 8:12 pm | कुमार१

शेला माणूस परिधान करतो.

शाम भागवत's picture

8 Sep 2021 - 8:34 pm | शाम भागवत

महामाया
मदनबाण
दोघेही भुरळ पाडतात.
भुरळ पाडणे हा गुण दोघांतही समान आहे.
या दोघांना ओलांडल्या शिवाय १ व २ कडे जाता येत नाही.

दोघांनाही शेला चालू शकेल. पण तो त्यांना प्रिय आहे असे म्हणवत नाही.

माझे प्रयत्न संपले.
:)

श्वेता व्यास's picture

8 Sep 2021 - 8:38 pm | श्वेता व्यास

३ नीलकांत ?
४ शामसुन्दर ?

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 8:39 pm | कुमार१

या प्रकारच्या खेळांमध्ये शोध सूत्रांचे मूळ तत्व भाग 1 मध्ये सांगितले होते ते असे:

"संपूर्ण शोधसूत्राचा एकाच शब्दात भावार्थ काढू नका

दोन भिन्न सूत्रे = २ कल्पना
>> दोन शब्द आणि मग जोडणे."

त्यानुसार...

५ चे चांदणशेला हे उत्तर असे बनले आहे
चांदण + शेला.
आता ५ सूत्र नीट बघा:
…. श्रीमंती कपडा जो तीन व चारला प्रिय.

त्यामुळे तीन व चार ही माणसे आहेत हे समजावे.
.......

तुम्ही छानच खेळला आहात त्याबद्दल अभिनंदन आता हा बारकावा घेऊन अन्य कोणी जरूर प्रयत्न करावा.

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 8:44 pm | कुमार१

नीलकांत व शामसुंदर ही दोन नावे तुम्ही पुरुषांचे म्हणून घेत आहात की अन्य काही ते आधी स्पष्ट करा

हे दोन्ही पुरुष असतील तर ते कोणालाही भुरळ कशी काय पाडतील?

श्वेता व्यास's picture

8 Sep 2021 - 8:51 pm | श्वेता व्यास

देव म्हणून, नील आणि शाम वर्णाने भुरळ पाडतात, देवांना शेला प्रिय असतो, पण नावे माणसांचीही असतात, शिवाय नील व शाम हि सुप्त स्पर्धा आहेच.
अर्थात उत्तर फक्त अंदाज आहेत, माझेही प्रयत्न संपले :)

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 8:57 pm | कुमार१

देवांना शेला प्रिय असतो

>> देव ही संकल्पना असल्याने त्यांना एखादी गोष्ट प्रिय असे म्हणता येईल ?
या माणसांनी निर्माण केलेल्या देवांच्या प्रियच्या कल्पना आहेत.

एखादी गोष्ट प्रिय असणे हा मानवी गुणधर्म आहे असे मला वाटते.
पुन्हा १ व २ ला तीन व चार बद्दल अजिबात आकर्षण नको आहे

श्वेता व्यास's picture

8 Sep 2021 - 9:16 pm | श्वेता व्यास

हम्म ओके

कुमार१'s picture

8 Sep 2021 - 9:31 pm | कुमार१

३ व ४ या स्त्रिया समजाव्यात आणि शोध घ्यावा म्हणजे सर्व नातेसंबंध व्यवस्थित जुळलेले दिसतील

कुमार१'s picture

9 Sep 2021 - 10:00 am | कुमार१

चार तासांनी समारोप करतो .
जर नवीन खेळाडूंपैकी कुणाला तीन व चार साठी प्रयत्न करायचे असतील तर जरूर करा
धन्यवाद

शाम भागवत's picture

9 Sep 2021 - 1:50 pm | शाम भागवत

७ राहिलेलं आहे ना.
योगविवेक हे पर्याय म्हणून मान्य केलं गेलंय.

कुमार१'s picture

9 Sep 2021 - 1:58 pm | कुमार१

तुम्ही प्रयत्न करत आहात का तसे सांगा
नाहीतर आत्ता मी समारोपाला आलो होतो !
:)

कुमार१'s picture

9 Sep 2021 - 2:58 pm | कुमार१

उत्तरे व स्पष्टीकरण:

३. मालविका (सुंदर राजकुमारी)
४. मृगनयनी (एक आकर्षक स्त्री)

*३ व ४ चा एक गुणधर्म समान असून त्यासाठी त्यांच्यात सुप्त स्पर्धा. त्या गुणामुळे कोणालाही भुरळ पाडण्याची क्षमता आहे. >> सौंदर्य.

दोघींना ५ कडील श्रीमंती वस्त्र प्रिय.

(परंतु १ व २ ना यांच्याबद्दल आकर्षण नाही !)
….
७. अजून एक उत्तर.:
मुक्तचिंतक
….
सर्वांचे अभिनंदन व आभार !

कुमार१'s picture

9 Sep 2021 - 3:14 pm | कुमार१

सर्व उत्तरे एकत्र

१. याच्या कामाची व्याप्ती अफाट, कल्पनातीत (५)..... विश्वनिर्माता

२. क्रमांक १ च्याच जातकुळीतील. याच्यापासून काय लपवणार? (४)..... सर्वसाक्षी

३ व ४ चा एक गुणधर्म समान असून त्यासाठी त्यांच्यात सुप्त स्पर्धा. त्या गुणामुळे कोणालाही भुरळ पाडण्याची क्षमता आहे. परंतु १ व २ ना यांच्याबद्दल आकर्षण नाही !....
३. मालविका
व ४ . मृगनयनी

५. याच्याजवळ रात्र व श्रीमंती कपडा जो ३ व ४ ना अगदी प्रिय (५).... चांदणशेला

६. याच्यात कुठेही दूरवर पोचण्याची क्षमता. परंतु १ व २ चा पत्ता त्याला अजून सापडलेला नाही.! (५).... जगप्रवासी

७. हा क्रमांक ६ प्रमाणे नसून बसल्या जागीच झेप घेतो. ती झेप कदाचित १ व २ पर्यंत पोचू शकते !(५)..... मुक्तचिंतक

८. याला डोक्यावर बसायची सवय. पण १ व २ चे बारसे करतेवेळी याला दूर ठेवण्यात आले (४).
………... अनुस्वार

मला मालविका सापडलं पण मृगनयनी काही सापडलं नव्हतं
मृगनयनी यांचे शेवटचे लेखन ७ डिसेंबर २०१३ चे आहे. त्यात त्यांनी विनय आपटे यांच्या निधनाची बातमी त्यांनी दिली होती.
तुम्हाला हे नाव कसे सापडले?
तुम्ही मागे जात जात ४५८ पाने उलटली?

मुक्तचिंतक यांनी जनातलं मनातलं या सदरामधे काहीच लिहिलेले नसल्याने हे सदस्यनामही सापडले नाही.
त्यांनी फक्त अंडाभुर्जी व उकडलेली अंडाभूर्जी यावर दोन लेख लिहिले आहेत ते पाककृती सदराखाली आहेत.

पण एकंदरीत मजा आली.

कुमार१'s picture

9 Sep 2021 - 3:33 pm | कुमार१

धन्यवाद.

तुम्ही मागे जात जात ४५८ पाने उलटली?>>>>

नाही हो, मी नवे लेखनमधून मागे जात असताना मला बऱ्यापैकी लवकर ते नाव मिळालं.

मला मृगनयनी सापडलं पण खात्रि न्हवती कारण मालविका काही सापडलं नव्हतं…

आणि का काय माहित पण गंमतगुढ धाग्यावर गेस मारायाचे धैर्य होत नाही… चुकीचे उत्तर देणे फार बॅड फिल होते कदाचीत मिपावर प्रतिसाद लिहायचा तोच मुळी स्वताचे म्हणणे सांगायला आत्मविश्वासाने असा सराव असल्याने निव्वळ गेस मारलेला प्रतिसाद लिहावासा वाटत नाही….

सुरिया's picture

9 Sep 2021 - 3:29 pm | सुरिया

कंटाळवाणी कोडी.
सादरकर्त्याचाच जास्त उत्साह असलेने नुसते वाचताना सुध्दा कंटाळा येतो.

कुमार१'s picture

9 Sep 2021 - 3:34 pm | कुमार१

अभिप्रायाबद्दल आभारी आहे.
प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते.

अकिलिज's picture

9 Sep 2021 - 7:18 pm | अकिलिज

दोन दिवस कामामुळे फिरकलोच नाही. तरी खाली न सरकता पहीले मला कितपत जमतंय पाहीले. मग ह्ळू हळू खाली सरकत गेलो. समोर कोडं सुटताना दिसत होते. मजा आली नुसते वाचनमात्र राहूनही.
कुमार१ सरांचं कौतुक आहे. अशी कोडी तयार करायलापण मेहनत लागते. अजून येऊद्या.

जाता जाता सोडवणार्‍यांसाठी : प्रत्येक कोड्यात मदनबाण उत्तर वापरू नका. :)

कुमार१'s picture

9 Sep 2021 - 8:13 pm | कुमार१

धन्यवाद .
पुढच्या वेळेस सहभागी व्हा .आनंद होईल.

मदनबाण उत्तर

>>
या नावाची लोकप्रियता बघा किती !

तुमचे सदस्यनाम कुतूहलजनक आहे.

टर्मीनेटर's picture

10 Sep 2021 - 1:41 pm | टर्मीनेटर

प्रतिसाद न वाचता फक्त (क्रमांक २ = सर्वसाक्षी) एवढे एकच ओळखता आले 😀

कुमार१'s picture

10 Sep 2021 - 2:08 pm | कुमार१

हरकत नाही.
पण महत्त्वाचे ओळखलेत
😀

कुमार१'s picture

17 Sep 2021 - 7:15 pm | कुमार१

या खेळासाठी निवडलेल्या सदस्यनावांत चांदणशेला या नावाच्या तर मी प्रेमातच पडलो. नंतर काही भाषाप्रेमींशी या शब्दावर चर्चा केली. जालावर सहज धुंडाळले असता एक छान कविता मिळाली ज्यात तो आहे.
त्या कवितेचा अंश इथे देतो:

राधा म्हणते,

तुजसाठी पैंजण पायी
तुजसाठी काजळ डोळां
भेटींस तुझ्या मी येते -
घेउनिया चांदणशेला"