चालू घडामोडी - घटलेले सरासरी आयुर्मान आणि प्रदूषण

Pratham's picture
Pratham in काथ्याकूट
3 Sep 2021 - 10:24 am
गाभा: 

२ दिवसांपूर्वी संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवलानुसार उत्तर भारतातील(दिल्ली, ऊ.प्र.,बिहार,हरयाणा इ) राज्यांतील नागरिकांचे सरासरी आयुर्मान हवा प्रदूषणा मुळे ९ वर्षांनी कमी होत आहे व विविध श्वसनाविषयी आजार होत आहेत.
तर महाराष्ट्र, म. प्र. या राज्यात ते प्रमाण २.५ ते ३ वर्षे इतके आहे.
रस्ते अपघात,कर्करोग,आत्महत्या यांच्यामुळे होणाऱ्या मृत्यू पेक्षा प्रदूषणामुळे होणारे अकाली मृत्यू चे प्रमाण जास्त आहे.
पण आपल्या नाकर्त्या राज्यकर्त्यांना त्याची काही तमा नाही.
आणि आपण नागरिक म्हणून योग्य मागण्या करत नाही असे मला वाटते.
मी पंढरपूर येथे राहतो व दिवसातून कमीत कमी एकदा तरी घराबाहेर पडावे लागते.
पंढरपुरात कुठेही जावा तुमच्या नाका तोंडात धूळ आणि धूर गेल्याशिवाय राहणार नाही(आता मास्क मुळे ते होणार नाही).
गावातून १-२ तास फिरून आले की डोळे लाल होतात.
आपली आयुष्याची गुणवत्ता कधी आणि कशी सुधारणार?

हे माझे पहिलेच आणि थोडके लेखन आहे तरी चुका झाल्या असल्यास क्षमस्व. आणि लेखात काही तांत्रिक चुकी असल्यास नक्की दुरुस्त करण्यास सुचवावे.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

विज्ञान वादी ,भारतात जो पर्यंत नेते,टीव्ही चॅनल,विदेशी संशोधक,,जो पर्यंत सांगत नाहीत तो पर्यंत अशा बातम्या अंध श्रद्धा असतात.
भले रोज श्वास घेताना त्रास झाला तरी प्रदूषण आहे हे मान्य करणार नाहीत.
स्वतःची बुध्दी न वापरता दुसऱ्यावर अवलंबून असलेला भारत हा विज्ञान वादी देश आहे.

आपल्या लोकांना सध्याचं प्रदूषण normalize झाले आहे असे मला वाटते.
इतना तो चलता हे!

गॉडजिला's picture

4 Sep 2021 - 8:28 pm | गॉडजिला

नवीन पिढी जी प्रदूषणात जन्मली तिच्यासाठी ही पातळी नॉर्मलच असेल... आता इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत त्या ध्वनी आणि उत्सर्जन दोन्हीं कमी करतात त्यामुळे एकूण प्रदूषण किती कमी होईल माहीत नाही पण अनेक परिसरात त्याचे प्रमाण नक्की खलावेल

रावसाहेब चिंगभूतकर's picture

3 Sep 2021 - 3:03 pm | रावसाहेब चिंगभूतकर

गावात फिरताना मास्क आणि बाईकवर घालायचा प्लास्टिक चा पारदर्शक गॉगल घाला. शक्यतो स्किन उघडी रहाणार नाही हे पहा. बाकी काहीही सांगितले तरी हा त्रास थांबणार नाही तेव्हा स्वतःची व घरवाल्यांची काळजी घ्या.

Pratham's picture

4 Sep 2021 - 3:38 pm | Pratham

हो नक्कीच.
प्रतिसादाबद्दल आभारी

प्रदुषण असले तरी त्यावर उपाय म्हणुन आयुर्वेद आहे. त्रिफळा चुर्ण पासुन ते पुनरनवा नावांची स्वस्त व खुप परीणामी औषधे शरीर शुध्द ठेवायला मदत करतात. अशी कीतीतरी औषधे, उपाय आयुर्वेदात आहेत. प्रदुषणावर घरातली अस्सल हळद सर्वात बेस्ट!

धन्यवाद माहितीबद्दल.
आयुर्वेदिक मेडिकल मधे मिळते का ते पाहतो

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Sep 2021 - 6:48 pm | अनिरुद्ध.वैद्य

विचारून घ्या

(माझा वैद्यकीशी आडनावाईतकाच संबंध)

चौथा कोनाडा's picture

3 Sep 2021 - 5:51 pm | चौथा कोनाडा

पंढरपुरची धुळ लै ब्बेक्कार !
तास भर फिरून आला की एवढं अनप्रेश वाटणार की बस्स ! अन हे अस्लं १९९५-२००० नंतर व्हायला लागलं !

स्वच्छ हवा, जरा कमी गलिच्छ रस्ते पाहता आले नाहीत याची मला खंत वाटते.
धन्यवाद

रंगीला रतन's picture

3 Sep 2021 - 6:47 pm | रंगीला रतन

सध्या यादित महाराष्ट्राचे नाव नाही. हा पण इथे चुकुन सत्ता बदल झाला तर पु॒ढ्ल्या यादित ते पहील्या क्रमांकावर असेल. तो पर्यन्त फार जास्ती काळजी घेण्याची गरज नाहि असे तुम्ही दिलेली यादि बघुन वाट्ते.

आयुर्मान घटणार आहे असे अहवाल सांगतो.
मध्यतरी सोलापूर शहराची हवा राहण्यालक नाही असे प्रदूषण फळक दर्शवत होता.

म्हणजे हॉस्पिटल रोड आहे. ते साहजिकच आहे कारण सहा ते बारा लाख लोक यात्रेवेळी एवढ्या लहानशा गावात आले की वैद्यकीय सेवा लागणारच.

फिरून आल्यावर डोळे चुरचुरणे याचे कारण पंढरपुरातच नाही. सर्व ठिकाणी आहे. जिथे वाहनांचे काळे धूर येतात तिकडे न जळलेलं डिझेल नंतर रस्त्याच्या धुळीवर बसतं. ती धूळ वाळून उडाली आणि डोळ्यात गेली की डोळे चुरचुरतात. त्याला उपाय नाही.

बाहेर पडताना मी आता चष्मा व टोपी घालतो.
मास्क मुळे पण गेल्या दीड वर्षात धुळीचा इतका त्रास झाला नाही.
प्रतिसादाबद्दल आभारी

सर टोबी's picture

3 Sep 2021 - 8:30 pm | सर टोबी

सहसा रस्ते आणि इतर परिसराची स्वच्छता व्यवस्थित नसते. त्यामुळे धूळ भरपूर असते. हा त्रास हिवाळ्यात फार वाढतो. थंडी आणि धूळ यामुळे त्वचा खूपच कोरडी पडते.

समाज कार्याची आवड असेल तर काही समविचारी मित्रांच्या मदतीने आपल्या परिसरात सकाळ संध्याकाळ पाण्याचा सडा टाकून बघा. तसेच मोकळ्या जागेत हिरवळ लावून बघा. हवेतील धूळ लक्षणीय प्रमाणात कमी झालेली दिसेल. या प्रयोगाची जमेल तशी प्रसिद्धी करावी म्हणजे परिसर हळूहळू स्वच्छ राहण्यास मदत होईल.

हो,नक्की प्रयत्न करून बघतो

साधारण १० वर्षांपूर्वी स्वच्छ, नीटनेटकं दिसणारं पुणे शहर, आता धूळ, वायू आणि ध्वनी प्रदूषणात हरवून गेलं आहे. लहान शहरांची अवस्था तर याऊनही वाईट आहे. शहर विकासासाठी नियोजन केलं जातं की नाही याबद्दल शंकाच आहे.

आमच्या घरी कचऱ्याची गाडी येण्यासाठी त्या गाडी चालकाला १००-१५० रु द्यावे लागत कारण रस्त्यापासून आमचं घर २५ मिटर आत आहे.
आता कसाबसा तो रोज येतोय.
पंढरपूर हे अत्यंत गलिच्छ शहर होऊन बसले आहे.

कुणा एकाला दोष देता येणार नाही. विशेषत: पंढरपूर बाबतीत.
नदी आहे, घाट आहेत, परंपरा आहेत. सुपीक जमीन आहे आणि सगळ्यात भारी माऊलीआहे गावात.
आता माऊली हवी, दुकाने चालायला यात्रा हवी पण घाण नको असे नाही ना होत. दरवर्षी लाखो भाविक येतात त्यांच्या जीवावर निम्मे पंढरपूर चालते. उरलेले निम्मे साखर कारखान्याच्या जीवावर चालते. मग गावातून ट्रॅक्टर ट्रॉली नको असे कसे होणार. मुळात पंढरपूर हे नोकरदारांच्या जीवावर नाही. मग व्यापारी आणि इतर गावकरी काय पध्दतीचे राजकारण खेळतात हे तुम्हाला सांगायला नको. तीर्थक्षेत्राला चाबर्या लोकांचा शाप असतो. पंढरपूर अपवाद ठरावे. आता सगळ्या महाराष्ट्रातले गलिच्छ राजकारण गावात होते त्याला जबाबदार तिथले नागरिकच. साखरसम्राट आणि पंत लोकाशिवाय कुणी सुविद्य सुशिक्षित आमदार झालाय का? गावात खाजगी सावकाराचे प्रमाण कदाचित देशात सर्वात जास्त आहे. गुंडगिरी खून टोळीयुद्ध असले प्रकार गावात प्रचंड आहेत त्याला जबाबदार नागरिकच. विटुमाऊली ची ही मागची बाजू कुणाच्या आशीर्वादाने? इतके सारे असताना गावाकडे बघायला कुणाला वेळ आहे. गावाला लागून इतके कारखाने आहेत पण एकतर खरोखर प्रख्यात असे विद्यालय आहे का? कराड रोडला ढीगभर खाजगी दवाखाने आहेत पण सरकारी दवाखाना कुठाय हे माहिती तरी आहे का? कारखान्याचा पैसा ढाबे आणि पुण्यामुंबैत कसा फिरतो हे चांगले माहिती असेल तुम्हाला? मग एका कुणाला प्रदूषण, दुर्दशा आणि त्रासाचा दोष देऊन उपयोग नाही.

त्यात अस्त्यावस्त पसरलेले प्लोटिंग आणि बेसुमार अवैध बांधकामे हे राहिले.

चौथा कोनाडा's picture

4 Sep 2021 - 5:34 pm | चौथा कोनाडा

खरंय, सुरिया !

प्रदूषण कमी करणे(पूर्णतः थांबवणे अशक्य आहे) हे सामूहिक काम आहे आणि ती सर्वांची जबाबदार आहे.पुढच्या पिढी साठी सर्व जण मालमत्ता,पैसे जमवून ठेवतो जेणेकरून त्यांचे आयुष्य सुखात जावे.
पण पुढच्या पिढी साठी शुध्द हवा,योग्य वातावरण,शुध्द पाणी,स्वच्छ शहर गाव,उत्तम अन्न निर्माण करण्यासाठी सुपीक जमीन ह्याची पण नितांत गरज आहे ह्याचा नेमका विसर सर्वांस पडत आहे.
शुध्द हवेचा विषय निघाला की कृत्रिम ऑक्सिजन हे solution सांगितले जाते.
पण ते अव्यवहारी आणि अशक्य आहे इतके उत्पन्न माणूस करणार नाही आणि खर्च परवडणार नाही
शुध्द पाण्याचा विषय निघाला की बिसलेरी हा पर्याय सुचवला जातो.
पण हवेचे प्रदूषण कमी करणे, जलस्त्रोत निर्मळ आणि प्रदूषण विरहित राखणे हे उपाय कोणी सांगत नाही.
आपल्या पिढी नी पुढच्या पिढी चे जीवन कठीण बनवले आहे ती पिढी आपल्याला नक्कीच दोष देणार.
सरकार चे काम आहे नियोजन बद्ध शहर
,गाव वसवणे,मोकळ्या जागा,मोठे रस्ते,लोकांना चालण्यास फूट पथ,
निर्माण करणे आणि ते अतिक्रमण मुक्त ठेवणे.
सांडपाणी,घन कचरा नियोजन आणि त्याची विल्हेवाट .
ही सर्व काम शासकीय पातळीवर च होवू शकतात.
ती शासनाची जबाबदारी आहे.
लोकांची जबाबदारी आहे सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे,अतिक्रमण न करणे,वाहन योग्य स्थिती मध्ये ठेवणे, सार्वजनिक संपत्ती ची हानी न करणे.
ट्रेन ,बस मध्ये बुट,चप्पल चे पाय पुढच्या सीट वर ठेवणारे महाभाग रोज बघायला मिळतात.
त्या वरून मी कधी भांडतो पण.

सुक्या's picture

3 Sep 2021 - 11:15 pm | सुक्या

"पण आपल्या नाकर्त्या राज्यकर्त्यांना त्याची काही तमा नाही. आणि आपण नागरिक म्हणून योग्य मागण्या करत नाही असे मला वाटते."

फक्त राज्यकर्त्यांना दोष देउन कसे चालेल? एक नागरीक म्हणुन आपल्याही काही जबाबदार्‍या असतात याचा बहुतेक लोकांना विसर पडतो. सार्वजणीक ठिकाणी कचरा टाकणे, रस्त्यावर राडारोडा आणुन टाकणे या सार्‍या गोष्टी कोण करते ? खुप मोकळा वेळ असतो लोकांकडे, पण कुणीही स्वतःहुन स्वच्छता करत नाही. ईतरांनी ती करावी हाच एक धोशा असतो सगळ्यांचा ..

स्वतःला सुशिक्षित म्हणवणारेही याला अपवाद नाहीत. तस्मात हे रडगाणे चालुच राहील ..

"आपली आयुष्याची गुणवत्ता कधी आणि कशी सुधारणार?"
तुमच्या आयुष्याची गुणवत्ता दुसर्‍यांनी सुधारावी अशी तुमची ईच्छा असेल तर ते कधीही शक्य नाही ...

पण प्रदूषण कमी करणे यासारखे विषय एकट्याने सोडवण्यासारखे नाहीत. त्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
दिल्ली अथवा मुंबई तील जर आपण दोन नागरिक घेतले,त्यातला एक उच्च वर्गातील असेल व दुसरा निम्न मध्यमवर्गातील आहे.जरी त्यांच्या भौतिक स्तरांमधे फरक असला तरी ते pm10 प्रदुषक असलेली एकच हवा आपल्या फुफुसांमधे भरतात व प्रदूषित पाणी पितात.
फरक एवढाच की उच्च वर्गातील नागरिक जो आहे तो पिण्याचे पाणी चांगल्या(?) फिल्टर मधून पित असेल व सहसा त्याचा बऱ्यापैकी वेळ चार भिंतींमध्ये जात असेल.
प्रतिसााबद्दल धन्यवाद

कॉमी's picture

5 Sep 2021 - 7:07 pm | कॉमी

अत्यंत उत्तम मुद्दा मांडला आहे.

महत्वाचा विषय मांडला आहे.

प्रदूषण अनेक प्रकारचे असते आणि त्याचा मानवी आरोग्य वर परिणाम होतो.
देशातील जवळ जवळ सर्वच शहरातील सांडपाणी नदीत सोडले जाते.त्या वर योग्य ती प्रक्रिया न करता सरळ ते नदीत सोडले जाते.
त्या मुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होते.एक तर पिण्यायोग्य पाणी देशात खूप कमी आहे.
कारखाने,विवध उद्योग ,रासायनिक कारखाने विषारी पदार्थ असलेले पाणी नदीत सोडतात.
आणि ह्या मुळे अनेक आजार माणसात निर्माण होतात
दुसरे वायू प्रदूषण ,अनेक वाहन,कारखाने,हवा दूषित करत असतात.
रस्ते नीट नसल्या मुळे आणि देशात अगदी १०० ,% परफेक्ट नियोजन केलेले एक पण शहर अस्तित्वात नाही..त्या मुळे शहर अत्यंत बिकट अवस्थेत पिचलेली आहेत.
अती प्रचंड लोकसंख्या सर्व शहरात आहे.कशी ही ,कुठे ही अतिक्रमण करून राहत आहे कसलेच कायद्याचे राज्य अस्तित्वातच नाही.
देशात नक्की सरकारी यंत्रणा अस्तित्वात आहे का अशी मिनिटा मिनिटा ला शंका येईल .
त्यांनी निर्माण केलेला घन कचरा डम्पिंग ग्राउंड वर टाकला जातो किती तरी मोठी जमीन ह्या कचऱ्या मुळे नष्ट होते.
मुंबई ,पुण्या सारख्या मोठ्या शहरात जो कचरा निर्माण करतात त्याची विल्हेवाट लावण्यासाठी किती तरी हेक्टर जमीन दरवर्षी बरबाद होते.
खूप मोठी किंमत महाराष्ट्र ल ह्या शहरां मुळे मोजावी लागते.

Pratham's picture

4 Sep 2021 - 3:04 pm | Pratham

प्रतिसादाबद्दल आणि जल प्रदूषणावर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद.

त्याला योग्य दिशा दिली तर सर्व भाविक मिळून पंढरपूर सहज स्वच्छ आणि सुंदर करू शकतात.

संजय पाटिल's picture

4 Sep 2021 - 9:22 pm | संजय पाटिल

हे होउ शकते....

गॉडजिला's picture

4 Sep 2021 - 9:28 pm | गॉडजिला

बरोबर आहे. अगदी गावातल्या लोकांनी जरी मनावर नाही घेतले आणि भाविकांनी जरी ठरवले तरीही गाव स्वच्छ राहू शकेल

चौथा कोनाडा's picture

5 Sep 2021 - 10:40 am | चौथा कोनाडा


त्याला योग्य दिशा दिली तर सर्व भाविक मिळून पंढरपूर सहज स्वच्छ आणि सुंदर करू शकतात.


सर्वसाधारणपणे गावातले लोकच (अपवाद वगळता) गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याबाबतीत निरुत्साही असतात, मग बाहेरून येणारे लोक हे करतील ही अपेक्षा बाळगणे कितपत योग्य आहे ?
शेवटी बाहेरून येणारे भाविक हे तीर्थपर्यटनालाच आलेले असतात, २-३ दिवस राहणार, स्थलदर्शन करणार आणि त्यांच्या गावी परतणार !

पहिल्यांदा राजेशभाऊ सोबत सहमत होतोय.

लोकजागृती करायला काय हरकत आहे?

रात्रीचे चांदणे's picture

5 Sep 2021 - 3:16 pm | रात्रीचे चांदणे

लोकजागृती केली तर हळूहळू नक्कीच फरक पडेल. Toilets च्या बाबतीत बराच फरक पडलेला आहे.

Rajesh188's picture

5 Sep 2021 - 7:14 pm | Rajesh188

म्हणजे उत्तम वातावरणात तुमचा पूर्ण दिवस जायला हवा.
राहण्यासाठी मोठी जागा हवी.
उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध असाव्यात.
खेळण्याची मैदान,जॉगिंग पार्क,मोठमोठी सुंदर उद्यान हवीत.
शुध्द ,अन्न पाणी,ट्रॅफिक विरहित,गर्दी विरहित प्रवास करणे सहज शक्य असावे.
शिक्षणाची सुविधा हवी, जिम ची सुविधा हवी.
गुन्हेगारी मुक्त समाज हवा, भ्रष्टाचरामुक्त प्रशासन हवं.
संवेदनशील शासकीय यंत्रणा हवी.
आणि ह्या सर्व सुविधा लोकांना सहज वापरता येतील इतकी त्यांची आर्थिक स्थिती हवी.
तेव्हा जीवनाचा दर्जा सुधारू शकतो.
भारतातून श्रीमंत लोकांचे दुसऱ्या देशात जावून स्थायिक होण्याचे प्रमाण बाकी देश पेक्षा जास्त आहे असे वाचनात आले.
पैसा खूप आहे पण जीवनाचा दर्जा सुधारेल अशी अवस्था ,सुविधा,देशात नाहीत हे त्याचे कारण आहे.
चार करोड ची गाडी मुंबई मध्ये स्वतःची आहे पण ट्रॅफिक मुळे दहा मिनिटाच्या प्रवासातही १ तास लागत आहे.
काय फायदा त्या ४ करोड च्या गाडीचा.
त्या मध्ये.
जातीय हिंसा,धार्मिक हिंसा,भ्रष्टाचार,राजकीय हिंसा,गुन्हेगारी ह्या मुळे मानसिक त्रास होतो तो वेगळा.
त्या मुळे श्रीमंत लोक,अती हुशार लोक अमेरिका,ऑस्ट्रेलिया,ब्रिटन ह्यांना जास्त पसंती देत आहेत
मुंबईकर ना दुबई हा पर्याय योग्य वाटत आहे.
उद्योग भारतात पण वास्तव्य परदेशात अशा लोकांची संख्या वाढत आहे.

सुबोध खरे's picture

6 Sep 2021 - 9:39 am | सुबोध खरे

तेनालीराम यांनी सार्वजनिक मनस्थितीचे उत्तम विश्लेषण करण्यासाठी श्री कृष्णदेवरायांना एक प्रयोग करण्यास सांगितला

श्रावणी सोमवारी श्री शंकरावर अभिषेक करण्यासाठी रविवारी प्रत्येक नागरिकाने राजवाड्यासमोरच्या हौदात एक वाटी दूध आणून ओतावे अशी दवंडी पिटली गेली.

प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य केले.

सायंकाळी पाहिले तर हौद पाण्याने भरून गेला होता.

आणि प्रत्येक नागरिक दुसऱ्याला दोष देत होता.

तुषार काळभोर's picture

6 Sep 2021 - 1:09 pm | तुषार काळभोर

त्यावेळी किमान वाटीभर पाणी घेऊन तरी लोक गेले. आता बाकीचे जातील, मी न गेल्याने कुणाला कळणारे/काय फरक पडतो, असं म्हणून सगळेच घरात बसतील.

हे पण तेवढेच सत्य आहे माणूस हा प्राणी आहे .
मेंढर सारखा त्याला मार्ग दाखविणार कोणी तरी नेता लागतो .मग तो त्याच्या पाठी धावत असतो.
सेनापती पडला की युद्ध हमखास हरते पराभव होतो.
देशाचा कर्तृत्व वान पंतप्रधान मेला की देश विस्कळीत होतो.
राजकीय पक्षाचा नेता,कंपन्यांचा मालक,घरातील कर्ता पुरुष गेले की सर्व विस्कळीत होते.
सामान्य जनता स्वतः कधीच सुधारणार नाही.
पुण्यात रोज १०० ट्रॅफिक रुल मोडणारा व्यक्ती दुबई मध्ये वर्षातून दहा पण ट्रॅफिक rule मोडत नाही.
व्यक्ती तीच आहे ना.