गाभा:
मुंबईत २६ नोव्हे. रोजी हल्ला केल्यानंतर कमांडो कारवाईत मरण पावलेल्या अतिरेक्यांचे भारतभुमीत कुठेही दफन होऊ न देण्याचा निर्णय काही मुस्लिम संघटनानी घेतला आहे. अधिक बातमी इथे वाचता येईल.
हा एक अतिशय चांगला निर्णय म्हणता येईल.
पण याच बरोबर या मुस्लिम संघटनानी या समाजातील सुशिक्षित बेकार तरुण गुन्हेगारी कडे न वळता मुळ प्रवाहात कसे सामिल होतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
आपल्याला काय वाटते?
प्रतिक्रिया
2 Dec 2008 - 12:19 pm | तांबडा पांढरा
एक चांगला निर्णय आहे
2 Dec 2008 - 12:26 pm | ऊचापत्या
इब्राहीम तायी झिन्दाबाद.
2 Dec 2008 - 12:38 pm | विजुभाऊ
हा शुद्ध मूर्खपणा आहे. मृतदेह कोणताही असो त्याला मूठमाती मिळालीच पाहिजे.
मरणान्तान्ती वैराणं हे आपण भारतीयच म्हणतो. ती प्रेते दफन केली नाहीत तर मग त्यांचे करायचेकाय?
असेच एक पोरकट वाक्य मुंडे म्हणाले होते. "आय एस आय च्या प्रमुखाना मुम्बैत पाउल ठेवु देणार नाही" एक राजनैतीक अधिकारी म्हणून भारताने त्याना बोलावले आहे. मुंडेना आंतर्रष्ट्रीय प्रोटोकॉल कळत नाहीत असेच म्हणावे लागेल.
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
2 Dec 2008 - 1:31 pm | राघव
आपला विरोध हा मृत शरीराशी कधीच नको. त्यांचे दफन व्हायलाच हवे. मुस्लीम संघटना असे सरळपणे म्हणू शकणार नाहीत. नाहीतर त्यांच्यावर आणिकच गंडांतर यायचे. अन् हे जे काही ते बोललेत तो सारा स्टंट आहे असे मला वाटते. खरे सांगायचे तर ते काहीही बोललेत तरी त्यांची गोची आहे.
मुमुक्षु
2 Dec 2008 - 12:57 pm | घाशीराम कोतवाल १.२
असे होनार नाही कारण ही एक उत्स्फुर्त प्रतिक्रिया आहे त्यामुळे माझा विश्वास नाही
इब्राहीम तायी याना त्याच्य जातभाई कडुन त्रास होईल मग ते म्हनतील मी असे म्हटले नव्हते
आणी मग हेच त्याच्या मयताला हजर होतिल फुलांची चादर घेउन
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
2 Dec 2008 - 1:15 pm | हर्षद आनंदी
नक्राश्रू नक्राश्रू नक्राश्रू नक्राश्रू आणि फक्त नक्राश्रु
विजुभाऊंशी १००% सहमत्..
पण पण पण त्यांचेच नंतर दर्गे बनतात... अफजलखानाचा दर्गा ज्वलंत उदाहरण
2 Dec 2008 - 2:36 pm | सुनील
अतिरेक्यांचे नागरीकत्व तपासावे. पुरेशी खात्री झाली की, त्या त्या सरकारला मृतदेह घेऊन जाण्याविषयी विनंती करावी. जर अमान्य झालीच तर, अन्य बेवारशी मृतदेहांचे जे करतात (बहुधा मेडिकलच्या विद्यांर्थ्यांना शवविच्छेदनासाठी देतात), ते करावे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
2 Dec 2008 - 3:15 pm | अमोल केळकर
अहो सुनिल साहेब,
हे अतिरेकी पाकिस्तानी आहेत हे नक्की. अशा परिस्थितीत पाकिस्तान ते मृतदेह नक्किच घेणार नाही. त्यामुळे मेडिकलच्या विद्यांर्थ्यांना शवविच्छेदनासाठी उपयोग करता येऊ शकेल हे मान्य .
त्यातील सडक्या मेंदू वर अधिक संशोधन करता आले तर बरं होईल.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
2 Dec 2008 - 10:51 pm | सागरलहरी
मुस्लीम संघटनांनी यापेक्षा त्यांच्या वस्त्यात लपणारे बांग्लादेशी पकडून द्यावेत. व कुराणातला हिंसक भाग वगळावा .. जमेल हे?
3 Dec 2008 - 12:44 am | एक
मुस्लीम असण्यावर शिक्कामोर्तबच झालं असतं (सध्या अतिरेक्यांच नाव आणि त्यांच शरीर याव्यतिरीक्त काय पुरावा आहे?) आणि याचा फार मोठा तोटा पुढच्या राजकारणात सोसावा लागला असता.
त्यामुळे ही लोकं म्हणणारच की हे सच्चे मुसलमान नव्हते आणि म्हणून त्यांना इथे पुरू नका. यात कौतूक कसलं? नुसतेच फतवे काढ्णार्यांकडून कसली अपेक्षा ठेवायची?
ते मनापासून असं म्हणत असतील तर नक्कीच कौतुकास्पद आहेत पण सद्य स्थितीत असा विश्वास त्यांच्यावर ठेवता येत नाही. त्यांना त्यांच्या देशभक्त असण्याचा सुद्धा पुरावा द्यावा लागेल.
असा पुरावा कलामांसारखे शास्त्रज्ञ त्यांच्या कृतीतून देत असतात. असा प्रस्ताव त्यांच्या सारख्यांकडून आला असता तर अभिमानास्पद ठरला असता.
3 Dec 2008 - 1:56 am | _समीर_
बजरंग्यांनी जेव्हा गर्भवती स्त्रियांचे पोट चिरले तेव्हा एक हिंदू म्हणून तुम्ही देशभक्तिचा कुठला पुरावा दिलात ते कळवा तोच पुरावा आता मुसलमानांकडे मागू.
समीर
3 Dec 2008 - 2:39 am | एक
बजरंग्याने जे केलं ते माणूसकीला, हिंदूत्त्वाला काळीमा फासणारं आहे. त्याला आणि मला तुम्ही "हिंदू" असं संबोधलं तर तो माझा अपमान आहे. असं होवू नये पण दुर्दैवाने अश्या बजरंग्याची संख्या वाढली तर मला माझ्या हिंदूत्वाचे नक्कीच पुरावे द्यावे लागणार.
इथे मुद्दा "देशभक्ति"चा आहे. देशविरोधी अतिरेकी हे कुठल्या समाजातून जास्त संख्येने आले आहेत?
समजा, जर "क्ष" देशविरोधी अतिरेकी "समाज १" मधून आले आणि "य" अतिरेकी "समाज२" मधून आले.
जर क्ष > य आणि समाज१ < समाज२ , तर कुठ्ल्या समाजाची विश्वसनीयता संशयास्पद आहे?
मुद्दा नीट समजावून घ्या. उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका.
3 Dec 2008 - 1:15 am | प्रभाकर पेठकर
तशीच समस्या असेल तर त्या अतिरेक्यांचे अवयव दान करावेत. एका मानवी मृतदेहाच्या महत्त्वाच्या अवयवांचा उपयोग अनेक गरजू रुग्णांना होऊ शकतो. त्यांनी १९४ निष्पापांना ठार मारले आहे. त्यांच्याच (अतिरेक्यांच्या) देहांनी १००-१२५ रुग्णांना तरी जीवनदान मिळू शकेल.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
3 Dec 2008 - 1:20 am | प्राजु
..............
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/