भाग-1 इथे https://www.misalpav.com/node/49180
…...
नमस्कार.
या खेळाच्या पहिल्या भागामध्ये आपण आपल्या मिपाकर बंधू-भगिनींची सदस्यनावे ओळखली. एकंदरीत धमाल आली. आता सादर करीत आहे या मालेतील पुढील भाग:
धागा-शीर्षके ओळखणे
खाली 10 शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकावरून मिपावरील धागा-शीर्षके ओळखा.
१. तुम्हाला संबंधित शीर्षकाचे सर्व शब्दसमूह ओळखायचे आहेत. हे धागे मिपाच्या विविध विभागांमधून निवडले आहेत. दिलेल्या सूत्रापुढे दोन कंस आहेत.
२. पहिल्या कंसात ओळखायच्या शीर्षकातील प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या आहे. शीर्षक ओळखून झाल्यावर त्याची खात्री पटवण्यासाठीची माहिती दुसऱ्या कंसात दिली आहे.
तुमचे उत्तर या माहितीशी जुळले पाहिजे. त्यामध्ये संपूर्ण शीर्षकातील काही अक्षरांची वैशिष्ट्ये एकत्रित दिलेली आहेत. हे देण्यामागे, एखाद्या सूत्राचे पर्यायी उत्तर शक्यतो येऊ नये असा प्रयत्न आहे.
३. दिलेल्या सूत्रातील माहिती ही धाग्याच्या फक्त शीर्षकाशीच संबंधित आहे. त्याचा संबंध धाग्याच्या आशयाशी वगैरे लावू नये.
४. ओळखायची सर्व शीर्षके मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यातील प्रत्येक शब्द हा सलग असून त्यात कुठेही जोड नाही. शीर्षकामध्ये अंकांचा बिलकुल समावेश नाही.
५. हा भाग जरा गुंतागुंतीचा वाटू शकेल. म्हणून आधी एक उदाहरण देतो:
सूत्र असे आहे :
भयानक संहाराची आठवण (५, ५) ( एकूण चार वेलांट्या, एक जोडाक्षर).
याचे उत्तर :
…
...
हिरोशिमाचा स्मृतिदिवस
( स्मृ हे जोडाक्षर, एकूण चार वेलांट्या मोजाव्यात).
……..
शोधसूत्रे :
१. हे क्षुल्लक लक्षात आहेत ( ६, २) ( एकूण तीन वेलांट्या)
२. भावना तशी अमर्याद (३, २, २) ( एक जोडाक्षर, दोन वेलांट्या)
३. त्याच खऱ्या, तुम्हीच खोटे (७, ४) ( दोन जोडाक्षरे एक वेलांटी)
४. कुठे तो थोर अन कुठे तो क्षुद्र (४, २,.३) ( दोन जोडाक्षरे, एक उकार)
५. नुसते पिऊ नका, जरा लांब पहा (३ , ४) (एक जोडाक्षर एक मात्रा)
६. सदानकदा तेच खाताय (२ ,२,३) ( दोन जोडाक्षरे )
७. विचारून घ्या नाहीतर कायम पश्चात्ताप (४, २) ( एक वेलांटी, एक जोडाक्षर)
८. कलुषित भडिमार (४,३,५) (१ जोडाक्षर ,१ अनुस्वार )
९. सुस्कारे टाकत हिंडा तेथे (३,३) ( एक जोडाक्षर, एक अनुस्वार)
१०. हे पण दाद मागतात ? (४,३) ( २ वेलांट्या)
…....
प्रतिक्रिया
2 Sep 2021 - 7:15 am | गॉडजिला
की मला गंमत उरतच नाही. इतरांना शुभेच्छा.
2 Sep 2021 - 7:50 am | ज्ञानोबाचे पैजार
मिपावर जवळजवळ ५० हजार धागे आहेत. त्यातून हे १० शोधायचे (कितीही सुप्रसिध्द असले तरी) हे म्हणजे गवताच्या गंजीतुन सुई शोधण्याचे आव्हान आहे.
कुठे म्यागनेट सापडते का ते पहातो.
पैजारबुवा,
2 Sep 2021 - 7:56 am | गॉडजिला
http://misalpav.com/user/30033/track
2 Sep 2021 - 8:34 am | कुमार१
नाही, तसं नाही म्हणता येणार .
जी शीर्षके आकर्षक वाटली आहेत ती घेतली आहेत
2 Sep 2021 - 7:52 am | कुमार१
धागे गेल्या १-२ वर्षातील आहेत.
सूत्रातील माहितीनुसार विचार करावा
2 Sep 2021 - 8:48 am | ज्ञानोबाचे पैजार
१. हे क्षुल्लक लक्षात आहेत ( ६, २) ( एकूण तीन वेलांट्या) - आठवणीतील किडे - प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पैजारबुवा,
2 Sep 2021 - 9:05 am | कुमार१
आठवणीतील किडे -
अगदी बरोबर
उत्तम सुरुवात !!
2 Sep 2021 - 9:59 am | ज्ञानोबाचे पैजार
५. नुसते पिऊ नका, जरा लांब पहा (३ , ४) (एक जोडाक्षर एक मात्रा)- चहाच्या पलीकडे - मायमराठी
पैजारबुवा,
2 Sep 2021 - 10:01 am | कुमार१
चहाच्या पलीकडे अगदी बरोबर !
बुवा
जमतंय कि वो छान तुम्हास्नी :))
मस्त...
2 Sep 2021 - 10:03 am | ज्ञानोबाचे पैजार
९. सुस्कारे टाकत हिंडा तेथे (३,३) ( एक जोडाक्षर, एक अनुस्वार) - स्मरण रंजन - नीलकंठ देशमुख
पैजारबुवा,
2 Sep 2021 - 10:19 am | कुमार१
कारण सुस्कारे पण विचारात घेतले पाहिजेत
2 Sep 2021 - 10:22 am | कुमार१
स्मरणरंजन हा त्या धाग्यामध्ये सलग सहा अक्षरी शब्द आहे
३, ३ हवे
2 Sep 2021 - 11:00 am | ज्ञानोबाचे पैजार
९. सुस्कारे टाकत हिंडा तेथे (३,३) ( एक जोडाक्षर, एक अनुस्वार) - श्वासांचा बाजार - आमचे परम मित्र - खिलजि
पैजारबुवा,
2 Sep 2021 - 11:06 am | कुमार१
श्वासांचा बाजार बरोबर.
ज्ञा पै
तुमची सलग हॅटट्रिक थोडक्यात हुकली परंतु तुम्ही ओव्हर हॅटट्रिक केलेली आहे
अभिनंदन.!
2 Sep 2021 - 10:38 am | गवि
२. प्रेमाला सीमा नाही
???
2 Sep 2021 - 10:40 am | कुमार१
२. प्रेमाला सीमा नाही
अगदी बरोबर.
वा !
2 Sep 2021 - 10:53 am | गवि
प्रेमाला सीमा नसते. पण प्रेमाला सीमाशुल्क असते.. ;-)
2 Sep 2021 - 10:58 am | कुमार१
बरोबर बोललात !
हा धागा 2020 या दिवाळी अंकातला असल्यावर गवि नाही ओळखणार, तर कोण ओळखणार.!
:))
2 Sep 2021 - 3:19 pm | कुमार१
देखरेख करणारे सीमा शुल्क अधिकारी सुद्धा बराच त्रास देतात !
2 Sep 2021 - 12:00 pm | टर्मीनेटर
१०. हे पण दाद मागतात ? (४,३) ( २ वेलांट्या)
कावळ्याची फिर्याद ???
2 Sep 2021 - 12:01 pm | कुमार१
कावळ्याची फिर्याद
बरोब्बर !
छान. व इथे स्वागत !
2 Sep 2021 - 12:08 pm | टर्मीनेटर
एक तरी ओळ्खायला जमलं म्हणयचं :)
बाकी पैजार बुवांची गाडी सुसाट चालली आहे... मस्त!
2 Sep 2021 - 12:04 pm | कुमार१
गती सुंदर आहे .
निम्मे संपले
आता आहे उरलेत :
३. त्याच खऱ्या, तुम्हीच खोटे (७, ४) ( दोन जोडाक्षरे एक वेलांटी)
४. कुठे तो थोर अन कुठे तो क्षुद्र (४, २,.३) ( दोन जोडाक्षरे, एक उकार)
६. सदानकदा तेच खाताय (२ ,२,३) ( दोन जोडाक्षरे )
७. विचारून घ्या नाहीतर कायम पश्चात्ताप (४, २) ( एक वेलांटी, एक जोडाक्षर)
८. कलुषित भडिमार (४,३,५) (१ जोडाक्षर ,१ अनुस्वार )
2 Sep 2021 - 12:36 pm | गुल्लू दादा
आमचं डोकं काही चालेना या खेळात. मजा मात्र पूर्ण घेतोय.
2 Sep 2021 - 12:52 pm | शाम भागवत
+१
2 Sep 2021 - 12:55 pm | ज्ञानोबाचे पैजार
४. कुठे तो थोर अन कुठे तो क्षुद्र (४, २,.३) ( दोन जोडाक्षरे, एक उकार) - विश्वामित्र आणि विषाणू - विवेकपटाईत
पैजारबुवा,
2 Sep 2021 - 1:19 pm | गवि
एकहाती सर्वच कोडी सोडवतात वाटते बुवा आज
बुवा, एक्षेल शीट?? ;-) ह.घ्या.
2 Sep 2021 - 1:35 pm | ज्ञानोबाचे पैजार
आधि नियम निट वाचले अन मग एक्सेल शीटच घेउन बसलो आहे..त्यात LEN चा यथेच्च वापर केला आणि मग Filter आणि लॉजिक लावत बसलो
त्या शिवाय काही हे कोडे सुटले नसते कारण सप्टेंबर २०२० पासुन पुढे २१०० धागे निघाले आहेत आणि कुमार सरांनी २ वर्षांची रेंज दिली आहे.
अन त्यातले दहा ओळखायचे आहेत .
पैजारबुवा,
2 Sep 2021 - 1:42 pm | टर्मीनेटर
Ethical Cracking... :) :) :)
भारीच!
2 Sep 2021 - 3:18 pm | वामन देशमुख
Ethical Cracking... :) :) :)
2 Sep 2021 - 1:56 pm | कुमार१
हे काय असतं ते माझ्यासारख्या अडाण्याला शिकवा ना भाऊ !
2 Sep 2021 - 3:21 pm | वामन देशमुख
दिस् इझ् मात्र नॉट् फेअर् हं !
😉
2 Sep 2021 - 1:49 pm | कुमार१
विश्वामित्र आणि विषाणू
बरोब्बर !
2 Sep 2021 - 1:25 pm | टर्मीनेटर
६. सदानकदा तेच खाताय (२ ,२,३) ( दोन जोडाक्षरे )
ज्यात त्यात बटाटा ???
2 Sep 2021 - 1:51 pm | कुमार१
ज्यात त्यात बटाटा
बरोब्बर !
एवढ छान उत्तर देता आणि मग ती प्रश्नचिन्ह कशाला टाकता राव !
बरोबर आहे तुमचं....
2 Sep 2021 - 1:53 pm | कुमार१
तसा काही नियम नसला तरी आता बुवा जरा काही तास विश्रांती घेतील काय ?
म्हणजे इतरांना पण जरा बॅट फिरवून बघता येईल राव
:))
2 Sep 2021 - 2:06 pm | ज्ञानोबाचे पैजार
आपका हुक्म सर आँखों पर मेरे आका, बसतो परत बाटलीत जाउन,
नवी बाटली उघडलीत की पुन्हा प्रगट होईन,
(बाटलीतला राक्षस) पैजारबुवा,
2 Sep 2021 - 5:50 pm | शाम भागवत
पण ते एक्सेल शीट बनवले कसे ते सांगा की.
2 Sep 2021 - 6:55 pm | गॉडजिला
आधी दोन वर्षांपूर्वी निघालेले धागे बाद करायचे
त्या नंतर एक शोधसूत्र घेऊन त्याच्या शीर्षकाचे दिस्क्रिपशन असलेले शीर्षक धागे वेगळे करायचे व हे वेगळे झालेले धागे अर्थातच शब्द संख्या व वेलांटी याच्या साधर्म्यमुळे अतिशय कमी उरतात व त्याचा अर्थ सहजपणें ताडून उत्तर मिळून जाते...
2 Sep 2021 - 6:59 pm | गॉडजिला
तर यासाठीच कुमार१ यांना ट्रॅक करायचे म्हणजे त्यांनी असे कोणते धागे पाहीले जे जास्तीजास्त दोन वर्षे जूने आहेत यांची सहज माहिती मिळून आपल्याला अंदाज करणे अजून सोपे जाते :)
2 Sep 2021 - 7:00 pm | कुमार१
छान युक्ती आहे.
अर्थात मला एक्सेल वगैरे काहीच येत नाही.
शिकावे लागेल. :)
2 Sep 2021 - 7:05 pm | कुमार१
पण एक शंका आहे
जी शीर्षके मी निवडली त्यांच्यावर टिचकी मारुन मी आत धाग्यात शिरलेलो नाही
तरीसुद्धा ट्रॅक ने कसे काय जमेल
2 Sep 2021 - 7:24 pm | गॉडजिला
हा फुल्लप्रूफ मार्ग अर्थातच नाहीये फक्त एक सुरुवात म्हणून ठीक आहे...
तसेही पुढील वेळीं तूम्ही रिसर्च डुआयडी वापरून कराल त्यावेळी तुम्हाला ट्रॅक करून देखील फायदा नाही.
2 Sep 2021 - 7:29 pm | कुमार१
हे पण भारीच की !
हरकत नाही
वरील सर्व युक्त्या वापरून होता कोण सोडवणार आहे 3, 7, व 8 ?
2 Sep 2021 - 8:15 pm | गॉडजिला
सोडवतील कारणं त्यांचेकडे एक्सेल शीट आहे ;)
2 Sep 2021 - 8:25 pm | कुमार१
ते चालणार नाही बर का ;)
पहिल्या कसोटीमध्ये शेवटी मैदानात उतरून तुम्ही एक छान उत्तर दिले होते तसे या खेपेसही एक तरी उत्तर तुमच्याकडून हवेच
त्याशिवाय धाग्याची सांगता नाही ...
2 Sep 2021 - 8:25 pm | शाम भागवत
म्हणजे "सर्व धाग्यांची नावे" हा मूळ विदा कसा जमवला ते कळत नाहीये.
नावे टाईप करून नक्कीच नसावे ना?
2 Sep 2021 - 9:48 pm | गॉडजिला
कॉम्प्युटर वर हे सुलभ आहे मोबाइल वर किचकट
2 Sep 2021 - 9:48 pm | गॉडजिला
.
2 Sep 2021 - 2:09 pm | कुमार१
धागा प्रकाशित केला तेव्हा निदान 36 तास चालेल अशी अटकळ बांधली होती.
. परंतु या दुसऱ्या कसोटीतील खेळाडूंनी घणाघाती फलंदाजी करून आत्ताच 70 टक्के खेळ आटोक्यात आणलेला आहे .
आता फक्त तीन राहिले आहेत. ३, ७,८.
मागच्या पहिल्या कसोटीतील दमदार मंडळींची आठवण होत आहे
कुठे गायब आहेत ?
या मैदानात.....
2 Sep 2021 - 2:28 pm | लई भारी
आपला पास, पण मजा येतेय खेळ बघायला सुद्धा :-)
2 Sep 2021 - 3:22 pm | वामन देशमुख
हेच म्हणतो.
2 Sep 2021 - 3:25 pm | कुमार१
सर्व प्रेक्षक मंडळींनो,
बिंदास मैदानात यायचं आणि बॅट फिरवून बघायची.
बसतो एखादा चौकार ...
खेळून तर बघा
2 Sep 2021 - 4:27 pm | कंजूस
चाक फिरवतो गरागरा
मडकी घडवतो भराभरा ।
मी कोण?
तसं आइडींचं लिहा. मागे एकदा अभ्या.. ने टी शर्ट काढलेले. चित्रवाले आइडी.
2 Sep 2021 - 9:32 pm | कुमार१
आता राहिलेले तीन रात्रपाळीची मंडळी संपवतील अशी आशा आहे.
तसे न झाल्यास उद्या बुवांवर कुठलेच बंधन असणार नाही.
त्यांनी खुशाल बाटलीचे बूच उडवुन बाहेर यावे आणि उरलंसुरलं एक हाती संपवून टाकल्यास आनंद होईल !
3 Sep 2021 - 11:09 am | कुमार१
शेवटचे ४ तास.
3 Sep 2021 - 3:08 pm | कुमार१
१. हे क्षुल्लक लक्षात आहेत ( ६, २) ... आठवणीतील किडे
२. भावना तशी अमर्याद (३, २, २) …. प्रेमाला सीमा नाही.
३. त्याच खऱ्या, तुम्हीच खोटे (७, ४) …... वेश्याव्यवसायाची नैतिकता.
४. कुठे तो थोर अन कुठे तो क्षुद्र (४, २,.३) ….. विश्वामित्र आणि विषाणू.
५. नुसते पिऊ नका, जरा लांब पहा (३ , ४) …. चहाच्या पलीकडे.
६. सदानकदा तेच खाताय (२ ,२,३) …. ज्यात त्यात बटाटा.
७. विचारून घ्या नाहीतर कायम पश्चात्ताप (४, २) ... शेवटची इच्छा.
८. कलुषित भडिमार (४,३,५) …. बातम्यांचे विषारी गुलाबजाम.
९. सुस्कारे टाकत हिंडा तेथे (३,३)..... श्वासांचा बाजार.
१०. हे पण दाद मागतात ? (४,३) .. कावळ्याची फिर्याद.
.....
आपणा सर्वांचे अभिनंदन व आभार.
3 Sep 2021 - 3:33 pm | ज्ञानोबाचे पैजार
मजा आली हे कोडे सोडवताना, या कोड्या मुळे वेगळा आणि वेगवान विचार कसा करायचा याची चाचणी करता आली.
आता तुमच्या पोतडीतुन नवे काय निघते आहे त्याची वाट पहातो आहे.
पैजारबुवा,
3 Sep 2021 - 4:37 pm | गॉडजिला
नवे काय निघते आहे त्याची वाट पहातो आहे.
3 Sep 2021 - 4:54 pm | कुमार१
ते ठीक आहे हो :)
पण वरील खेळात तीन सात आणि आठ पैकी तुम्ही एक तरी उत्तर द्यायचे होते की !
बरीच वाट पाहिली...
पण तुम्ही सांगितलेल्या संगणकीय युक्तींच्या मुळे मात्र धमाल आली !
धन्यवाद
3 Sep 2021 - 5:06 pm | गॉडजिला
कारण काल रात्री मनी हिस्ट चा नवासिजन बघायचा प्रोग्राम होता त्यामुळं इतर कामे त्या नुसार अरेंज केली होती त्यामूळे धाग्यकडे फिरकलो नाही मग उशीरा लक्षात आले सीजन रात्री १२.३० न्हवे तर दुपारी १२.३० ला रिलीज होणार आहे व त्यात गुंतून पडणे होणार मग पुन्हा सर्व वेळ नवीन टाईमटेबल नुसार आज दुपारची कामे रात्रीच संपविण्यात घालवला गेला यात जागरणही झाले त्यामुळे धाग्याकडे पुरेसे लक्ष देता आले नाही...
त्यामूळे माफी असावी _/\_
3 Sep 2021 - 5:40 pm | कुमार१
हरकत नाही ,गंमत केली.
पण या एक उत्तराचं कर्ज तुमच्यावर लागू आहे एवढ हक्काने सांगतो. पुढच्या खेपेस त्याची परतफेड हवीच !
.........
रच्याकने,
तुम्ही मनी हाईस्ट चा विषय काढलाच आहे तर त्या संदर्भातील माझा एक लेख इथे वाचता येईल :
https://www.misalpav.com/node/43940
ही मालिका आणि मदारी चित्रपट यांच्यावर एकत्रित असा तो लेख आहे. या मालिकेचे पहिले दोन मोसम मी पाहिले. नंतर नेटफिक्सला कौटुंबिक रामराम झाल्यामुळे पुढचे पहायला मुकलो.
पण हरकत नाही. शेवटच्या मोसमामध्ये शेवटी काय झाले ,(टोकियो सगळी गोष्ट सांगायला जिवंत राहणार हे तर उघड आहे) ते तुमच्याकडून कळले तरी पोट भरल्यासारखे वाटेल !
3 Sep 2021 - 7:29 pm | गॉडजिला
शेवटचा मोसम १० भागांचा आहे त्यातील निम्मे भाग आज प्रदर्शित झाले निम्मे बहुदा डिसेंबर मधे होतील म्हणजेच अजून शेवट झालेला नाही... :) वाट पहायची. बाकी थोडे काही जरी बोललो तर आपोआप स्पोयलर बनेल इतकी रोचकता या सिजन मध्ये आहे, पुढे मागे हा शो बघणारच नसाल तर तुमच्यासाठी रोचक गोष्टी व्यनीत आत्ताच सांगेन... तशाही या आठवडाभरात कथेवर जालावर सर्वत्र अनेक चर्चा होतीलच त्यामूळे गोपनीय तर जास्त वेळ काहिच असणार नाही :)
3 Sep 2021 - 7:35 pm | कुमार१
जरूर !
आभार
3 Sep 2021 - 5:31 pm | गुल्लू दादा
+1
3 Sep 2021 - 6:34 pm | रंगीला रतन
पहिल्या डावात एक उत्तर देता आले होते, या डावात शुन्यावर बाद :-)
7 Sep 2021 - 6:42 am | सुधीर कांदळकर
वेगळा, अभिनव खेळ. मजा आली.
धन्यवाद.
7 Sep 2021 - 9:32 pm | कुमार१
आगामी:
मिपा गंमतगूढ (३) : नाती गुंतागुंतीची
हा भाग लिहून तयार आहे.
तो उद्या परवा उरकून घ्यायचा की श्रीगलेमा संपल्यानंतर आरामात पुढच्या महिन्यात घ्यायचा हे वाचकांनी सांगावे.