बेनझीर भुत्तोची हत्त्या: भारतापुढील सन्कटान्ची नान्दी?

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in काथ्याकूट
28 Dec 2007 - 10:30 am
गाभा: 

माझ्या मते बेनझीर भुत्तोन्ची झालेली हत्त्या भारतापुढे सन्कट उभे करू शकते. पाकिस्तानात लष्कराचे प्राबल्य कमी करून तिथे लोकशाही प्रस्थापीत करू शकणारी एकमेव व्यक्ति नाहिशी करण्यात आली आहे. आता मुशरृफ याना पुन्हा आणी-बाणी घोषीत करण्याची आणि आपली पर्यायाने पाक लष्कराची अनिर्बन्ध सत्ता स्थापन करण्याची उत्तम सन्धी चालून आली आहे.
बेनझीर ह्या काही प्रमाणात प्रागतिक विचारान्च्या होत्या, पुरोगामी होत्या.( अत्युच्च पदावर स्त्री ही कल्पनाच इस्लामला मान्य नाही!) त्यामुळे त्यान्ची हत्त्या हा इस्लाम मूलतत्ववाद्यान्चा विजय आहे. व हाच भारताला धोक्याचा इशारा आहे..

प्रतिक्रिया

>>बेनझीर ह्या काही प्रमाणात प्रागतिक विचारान्च्या होत्या, पुरोगामी होत्या

इस्लामला अत्युच्च पदावर स्त्री असणे मान्य नाही हे सत्य आहे. पण बेनझीर या खरोखरच पुरोगामी होत्या का?कारण काश्मीरातील दहशतवादी हिंसाचाराचे मूळ जनरल झियांच्या ऑपरेशन ToPak मध्ये होते.पण झिया १९८८ मध्येच पैगंबरवासी झाले.त्यानंतर बेनझीर सत्तेवर आल्या.काश्मीरात चालू झालेल्या हिंसाचाराची सुरवात १९८९ मध्ये बेनझीर सत्तेवर असताना झाली. काश्मीरविषयी झियांची धोरणेच बेनझीरनी चालू ठेवली. १९९४ च्या मार्च महिन्यात बेनझीरच्या पंतप्रधानपदाच्या दुसर्‍या कारकिर्दीत पाकिस्तानने जिनीव्हा येथे मानवी हक्क परिषदेत भारताविरूध्द ठराव मांडला होता.त्यावेळी वाजपेयी, सलमान खुर्शीद यांच्या शिष्टाईने भारताने बाजी मारली. बेनझीरने पंतप्रधानपदाच्या दुसर्‍या कारकिर्दीत जमाते उलेमा या धर्मांध पक्षाला मोकळे रान दिले. तालीबानमध्ये पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात युवक भरती झाली त्यात या जमाते उलेमाचा वाटा मोठा आहे.

पाकिस्तानी राज्यकर्त्यांना सत्तेत असताना भारतविरोधी कारवाया केल्या नाहीत तर सत्तेवर राहणे कठिण जाते. त्यामुळे सत्तेत नसताना आम्ही भारताशी संबंध सुधारू असे कितीही उच्चरवाने म्हटले तरी त्याची पूर्तता सत्तेत आल्यावर होईल याची खात्री नसते. याच बेनझीरने 'दुनिया की कोई भी सुपरपॉवर कश्मीर के आवाम को self determination से रोक नही सकती' या डरकाळ्या पाकिस्तानच्या इतर कोणाही राज्यकर्त्याप्रमाणे १९९० च्या सुरवातीला सत्तेत असताना फोडल्याच होत्या.

तरीही बेनझीरची हत्या म्हणजे पकिस्तानातील तालिबानी प्रवृत्तींच्या वाढत्या प्रभुत्वाचे निदर्शक आहे आणि भारताच्या दृष्टीने तो एक धोक्याचा इशारा आहे. अयमान अल जवाहिरीने बेनझीरच्या हत्येमागे अल्-कायदचा हात आहे असे म्हटल्याचे बातम्यांत म्हटले आहे.जर अल-कायदाचे पाकिस्तानवर पूर्णपणे वर्चस्व स्थापन झाले तर गझनीच्या महंमदाप्रमाणे भारतावर टोळधाडींची आक्रमणे करायचा ते नक्कीच प्रयत्न करतील.आणि तो धोका मोठा आहे.

बेनझीरचा पूर्वेतिहास कसाही असला तरी जागतिक दबावापुढे काही प्रमाणात झुकत मुशर्रफने लाल मशिद, स्वाट खोरे, वजिरीस्तान यासारख्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात दहशतवाद्यांविरूध्द कारवाई केली तसेच बेनझीरनेही केले असते असे म्हणायला मात्र जागा आहे.मात्र भारतीय उपखंडाने महान नेता गमावला किंवा भारत-पाकिस्तान शांततेसाठी झटणारा एक नेता कमी झाला अशी स्तुतीसुमने त्यांच्यावर उधळायला योग्य पार्श्वभूमी आहे असे वैयक्तिक पातळीवर मला वाटत नाही.

सध्याच्या पाकिस्तानात केमालपाशा सारखा खरोखरच पुरोगामी विचारांचा नेता यायला हवा. पण सध्याच्या परिस्थितीत ते होणे फारच कठिण दिसत आहे.आणि हा धोका खरोखरच मोठा आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

डॉ.प्रसाद दाढे's picture

28 Dec 2007 - 2:42 pm | डॉ.प्रसाद दाढे

अर्थातच क्लिन्टनसाहेब, पाकिस्तानचा जन्मच मुळी भारत देशाच्या द्वेषापोटी झाला आहे आणि तिथे कोणीही सत्ताधीश आला तरी भारताशी छुपे युद्ध करणे हा एकमेव कार्यक्रम तो हाती घेतो. तसेच बेनझीर यान्ची झालेली हत्त्या म्हणजे पाकिस्तानने पेरलेल्या विषवृक्षाचीच फळे आहेत. पर॑तु तेथील इस्लामी मूलतत्ववादीन्च्या हाती जर अण्वस्त्रे पडली तर मात्र अनर्थ होउ शकतो.