टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २०२०

तुषार काळभोर's picture
तुषार काळभोर in काथ्याकूट
23 Jul 2021 - 4:32 pm
गाभा: 

नमस्कार,

https://upload.wikimedia.org/wikipedia/en/1/1d/2020_Summer_Olympics_logo_new.svg

दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होतात, आपण दरवर्षी एक मोठ्ठा संघ पाठवतो. आणि दोन-चार पदके कमावतो.
१९९६ मध्ये लिअँडर पेसने टेनिस पुरुष एकेरी मध्ये कांस्य जिंकलं आणि खूप वर्षांचा पदकांचा आणि खूप दशकांचा वैयक्तिक पदकांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर दरवर्षी वैयक्तिक पदके १-२-३-४ मिळत आहेत.
२०१६ रियो ऑलिम्पिक : एक रजत, एक कांस्य
२०१२ लंडन ऑलिम्पिक : दोन रजत, चार कांस्य
२००८ बिजिंग ऑलिम्पिक : एक सुवर्ण, दोन कांस्य
२००४ अथेन्स ऑलिम्पिक : एक रजत
२००० सिडनी ऑलिम्पिक : एक कांस्य
असा या शतकातील प्रवास आहे.

यंदा देखील मोठा संघ, मोठा सपोर्ट स्टाफ, मोठ्या आशा आणि अपेक्षासह भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाला सुरुवात होत आहे.
मिपाचे लोकप्रिय क्रीडा लेखक जे पी मॉर्गन यांनी गार्‍हाणं मांडून शुभेच्छा दिलेल्या आहेत.

तर स्पर्धेचे अपडेट्स, विशेष बातम्या आणि अर्थातच भारतीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धांविषयी येथे चर्चा करुयात.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

23 Jul 2021 - 4:48 pm | तुषार काळभोर

उद्घाटन सोहळ्यात भारतीय ध्वजवाहक बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह हे दोघे होते.

आज (२३ जुलै) भारतासाठी तिरंदाजीच्या चार स्पर्धा आहेत.
मिश्र सांघिक
पुरुष सांघिक
महिला एकेरी
पुरुष एकेरी

कुमार१'s picture

23 Jul 2021 - 5:11 pm | कुमार१

आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा !

गुल्लू दादा's picture

23 Jul 2021 - 5:54 pm | गुल्लू दादा

धन्यवाद हा धागा काढल्याबद्दल तुषार. भारतीय खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा.

सौंदाळा's picture

23 Jul 2021 - 6:22 pm | सौंदाळा

धन्यवाद,
वाचत राहीन आणि जमेल तशी भर घालेन

२०१३ मध्ये २०२० चे ओलिंपिक्स जपानला दिले गेले पण पुढे काय होणार त्यांना काय माहीत. प्रेक्षकच नसल्याने सर्वात महागडा समारंभ आणि खेळस्पर्धा आयोजन ठरणार.

आतापर्यंतच्या सोहोळ्यात बीजिंग ओलिंपिक्स सोहाळा गाजला. चीन काय आहे ते जगाला दाखवले पेपर उघडून. जपान काही तरी सुंदर दाखवेल ही अपेक्षा होती. पण महामारी आली आडवी.

----------
धावणे, रीले धावणे, पोहणे, शूटिंग इत्यादीमध्ये आपले गुण आणि जागतिक उच्चांक तुलनात्मक अगोदरच माहीत असतात. पण कुस्तीत काहीही होऊ शकते.

बघू काय होते?

आंद्रे वडापाव's picture

23 Jul 2021 - 7:05 pm | आंद्रे वडापाव

का कोणास ठाऊक, पण या ऑलम्पिक मध्ये नेहमीपेक्षा आपण एखाद्दुसरं जादा पदक कमावू असं मला वाटतंय (सिक्स्थ सेन्स म्हणा हवं तर )

कालच जाहीर झाले २०३२ वर्षाचे ऑलिम्पिक ऑस्ट्रेलिया मध्ये होणार आहे
... फक्त २. कोटी लोकसंख्येचं देशाने ३ ऱ्यांदा हा मान मिळवला आहे !

नावातकायआहे's picture

23 Jul 2021 - 7:50 pm | नावातकायआहे

२०३२ वर्षाचे ऑलिम्पिक ऑस्ट्रेलिया मध्ये होणार आहे कारण बाकी कोणीच बोली लावली नाही.

चौकस२१२'s picture

23 Jul 2021 - 8:36 pm | चौकस२१२

बर मग? यात काही विशेष सांगण्यासारखे नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?
तस असेल तरी पिंपरी चिंचवड नि लावयायाची होती ना बोली !
अहो का उगा खवचटपणा करताय ... मी काही भारताला नावे ठेवली नाहीत ,, फक्त ज्या देशात राहतो त्या छोट्या देशाने काहीतरी करून दाखवले त्याची निंदा केली तर ते चुकले का ... यापूढे कानाला खडा
जाऊदे

चौकस२१२'s picture

23 Jul 2021 - 8:37 pm | चौकस२१२

त्याची नोंद

नावातकायआहे's picture

23 Jul 2021 - 9:35 pm | नावातकायआहे

खवचटपणा वाटला असल्यास माफी!

माझ्या मते भारताने यात अजुन तरी पडु नये. या आयोजनाचा खर्च आव्याढव्य असतो. त्यात जर अपेक्षित परतावा मिळाला नाही तर केलेली गुंतवनुक पांढरा हत्ती होते. स्पर्धेसाठी बनवलेली क्रीडांगणे वापराअभावी पडुन राहतात. खेळाडुंची निवासस्थाने गावाबाहेर असल्यामुळे त्याचा वापर होत नाही.

त्यापेक्षा तो पैसा इथे पायाभुत सुविधा वाढवण्यावर वापरला तर दिर्घकालीन फायदा होइल. ऑलिम्पिक मधे पदके मिळण्यासाठी खुप आधीपासुन तयारी करावी लागते .. म्हणजे मुले लहान असतात तेव्हाच .. पुढे विद्यालयीन / महाविद्यालयीन शिक्षण घेताना तशी तयारी करुन घ्यावी लागते. तेव्हा कुठे हजारात एक खेळाडु तयार होतो. आपल्याकडे क्रिकेट सोडले तर इतर कुठल्याही खेळाला प्रतिष्ठा नाही .. सपोर्ट नाही .. ते आधी बदलावे लागेल. आताच ठरावीक खेळाडुंवर प्रेशर टाकुन पदकांची अपेक्षा करणे बरोबर नाही...

साहना's picture

24 Jul 2021 - 11:55 pm | साहना

+१

पराग१२२६३'s picture

25 Jul 2021 - 12:41 pm | पराग१२२६३

सुक्या, तुमच्या ऑलिंपिकची तयारी आणि आयोजनासंबंधीच्या मतांशी पूर्णपणे सहमत!

कंजूस's picture

23 Jul 2021 - 8:03 pm | कंजूस

मुंबई गोवा रस्ता खड्डे बुजवून रूंद केलेला असेल. गेली पंचवीस वर्षे खटपट चालू आहे. कोस्टल रोडचे काही पूल बांधलेले असतील.

या जोशपूर्ण गाण्यासह आमच्याही शुभेच्छा

:)

तुषार काळभोर's picture

24 Jul 2021 - 10:05 am | तुषार काळभोर

कालचा दिवस (Day-0) होता.

आज भारत:
महिला १० मीटर एअर रायफल >> भारत बाहेर

तिरंदाजी मिश्र सांघिक >> भारत विरुद्ध दक्षिण कोरिया, उपांत्यपूर्व फेरी ११.०० वाजता

टेबल टेनिस महिला एकेरी पात्रता फेरी >> पाहिली फेरी मनिका बात्रा विरुद्ध इंग्लंड, 12.00 वाजता
पहिली फेरी सुतीर्था मुखर्जी विरुद्ध स्वीडन 1.00 वाजता

टेबल टेनिस मिश्र दुहेरी उप उपांत्यपूर्व >> पराजित विरुद्ध तैवान

पुरुष १० मीटर एअर पिस्टल पात्रता फेरी >> चालू आहे.

पुरुष हॉकी A ग्रुप >> भारत विजयी 3-2 विरुद्ध न्युझीलंड

बॅडमिंटन पुरुष दुहेरी ग्रुप A विरुद्ध तैवान >>

वेट लिफ्टींग महिला - ४९ किलो गट >>

टेनिस पुरुष एकेरी पहिली फेरी>>

बॅडमिंटन पुरुष एकेरी ग्रुप D - विरुद्ध इस्राईल >>

रोइंग पुरुष दुहेरी >>

ज्युडो महिला ४८ किलो >> भारत बाहेर.

बॅडमिंटन पुरुष दुहेरी ग्रुप A >> विरुद्ध तैवान

बॉक्सिंग पुरुष (63-69 किलो) >> विकास किशन विरुद्ध जपान 4.00 वाजता

हॉकी महिला ग्रुप A >> विरुद्ध नेदरलँड

असा आजचा कार्यक्रम आहे.

कंजूस's picture

24 Jul 2021 - 12:07 pm | कंजूस

रोइंगचे चित्रण सकाळी पाहिले.
मग विचार केला की हा खेळ वाढवायचा तर ते infrastructure किती महाग पडेल. पुण्याच्या बालेवाडीत आहे म्हणतात . आहे का?

Bhakti's picture

24 Jul 2021 - 12:17 pm | Bhakti

अभिनंदन!
वेट लिफ्टींग महिला - ४९ किलो गट
रजत-मीराबाई चानू

चानेलवाले ( सोनी टेन 2 )काही आठवणी दाखवत होते त्याही छान होत्या.

प्रचेतस's picture

24 Jul 2021 - 12:21 pm | प्रचेतस

पहिल्याच दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारताला रौप्यपदक मिळवून दिले.

सोनी टेन 2 चालूच आहे पण आपला भाग नंतर कुठे.

आज चारला आपला हॉकी नेदरलॅंड सोबत आणि उद्या Australia बरोबर आहे. शिवाय उद्या सिंधू बॅडमिंटन वैयक्तिक आणि अजून काही सामने आहेत.
सकाळी सहापासून टी व्ही समोर!

कंजूस's picture

24 Jul 2021 - 3:24 pm | कंजूस

होऊन गेल्यावर कुठे?

तुषार काळभोर's picture

24 Jul 2021 - 1:57 pm | तुषार काळभोर

यंदाचे पहिले पदक!!

गुल्लू दादा's picture

24 Jul 2021 - 2:05 pm | गुल्लू दादा

पहिले पदक...माहितीसाठी सर्वांचे धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

24 Jul 2021 - 2:13 pm | तुषार काळभोर

टेबल टेनिस महिला एकेरी पात्रता फेरी >> पाहिली फेरी मनिका बात्रा विजयी विरुद्ध इंग्लंड

तिरंदाजी मिश्र सांघिक >> भारत पराभूत विरुद्ध दक्षिण कोरिया, उपांत्यपूर्व फेरी

पुरुष १० मीटर एअर पिस्टल पात्रता फेरी >> मिरत चा सौरभ चौधरी पात्रता फेरीत सर्वाधिक गुण मिळवून अंतिम फेरीत.

बॅडमिंटन पुरुष दुहेरी ग्रुप A विरुद्ध तैवान >> विजयी

वेट लिफ्टींग महिला - ४९ किलो गट >> मीराबाई चानू रजत पदक

टेनिस पुरुष एकेरी पहिली फेरी>> सुमित नागल विजयी विरूद्ध उझबेकिस्तान

बॅडमिंटन पुरुष एकेरी पहिली फेरी>> बाहेर

रोइंग पुरुष दुहेरी >> बाहेर

बॅडमिंटन पुरुष दुहेरी ग्रुप A >> सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी विजयी विरुद्ध तैवान

तिरंदाजी मिश्र सांघिक >> भारत पराभूत विरुद्ध दक्षिण कोरिया

छान अपडेट दिले आहेत.

तुषार काळभोर's picture

24 Jul 2021 - 3:57 pm | तुषार काळभोर

सौरभ चौधरी पात्रता फेरीत पहिला आला होता, पण अंतिम फेरीत फारच सुमार कामगिरी झाली. आठपैकी सातव्या स्थानावर आला.

सुतीर्था मुखर्जी हिने देखील मानिका बात्रा पाठोपाठ पहिली फेरी जिंकली.

टेबल टेनिस महिला एकेरीत आता भारताच्या दोन खेळाडू दुसऱ्या फेरीत दाखल झाल्या आहेत

कंजूस's picture

24 Jul 2021 - 4:26 pm | कंजूस

त्यात कसे गुण मिळतात ते कळले नाही.

गॉडजिला's picture

24 Jul 2021 - 5:28 pm | गॉडजिला

पण जिथे मि मार्शल आर्ट शिकलो तिथे

समोरच्याचा पंच अथवा किक व्यवस्थित ब्लॉक केली की अर्धा गुण, आपली किक समोरच्या चेहऱ्याला लागली तर दोन गुण,
पंच /किक बेल्टच्यावर अन मानेच्या खाली असेल तर एक गुण

आपला पंच चेहऱ्यावर लागला तर अर्धा गुण कट
आपली पंच/ किक जर बेल्ट च्या खाली मारली तर अर्धा गुण कट
कोणत्याही कारणाने आपला बेल्ट जमिनीला टेकला (आपण पडलो) तर पाच गुण कट

असे नियम होते.

कंजूस's picture

24 Jul 2021 - 7:47 pm | कंजूस

धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

24 Jul 2021 - 6:47 pm | तुषार काळभोर

बॉक्सिंग पुरुष (63-69 किलो) >> विकास किशन पराभूत विरुद्ध जपान

हॉकी महिला ग्रुप A >> भारत पराभूत विरुद्ध नेदरलँड

हे दोन्ही पराभव ५-० असे दारुण होते.

तुषार काळभोर's picture

24 Jul 2021 - 6:51 pm | तुषार काळभोर

चीन अपेक्षेनुसार सुरुवातीपासून आघाडीवर आहे.
काही मिनिटांसाठी भारत एका रजत पदकासह दुसऱ्या स्थानी होता.
(त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवलाय ;) )
सध्या भारत बाराव्या स्थानी आहे.
.
.
एकदा का athletics मुख्य स्पर्धा (धावणे, लांब उंच उडी, पोहणे, इत्यादी) सुरू झाल्या की अमेरिका आणि युरोपची लयलूट सुरू होईल.

अरे वाह स्क्रीन shot फोटो द्या.
मी वाचलं की चीनने या स्पर्धेत​ल पहिल सुवर्ण मिळवले आहे.

तुषार काळभोर's picture

24 Jul 2021 - 10:03 pm | तुषार काळभोर

1

तुषार काळभोर's picture

24 Jul 2021 - 7:16 pm | तुषार काळभोर

महिला १० मीटर पिस्तूल >> पात्रता फेरी
(मनू भाकर आणि यशस्विनी सिंह देस्वाल)

पुरुष स्कीट शूटिंग >> पात्रता फेरी
(राज्यवर्धन राठोड यांना ज्यात रजत पदक मिळालं होतं)
मैराज अहमद खान
अंगद विरसिंह बाजवा

रोईंग पुरुष दुहेरी >> (पुनः प्रयत्न) पात्रता फेरी
अरुण लाल जाट
अरविंद सिंग

बॅडमिंटन महिला एकेरी ग्रुप J राऊंड >>
पी व्ही सिंधू विरुद्ध इस्रायल

टेनिस महिला दुहेरी >> पहिली फेरी
सानिया मिर्झा+ अंकिता रैना विरुद्ध युक्रेन

नौकानयन Laser Radial Women
नेत्रा कुमानन
2

१०मीटर एअर रायफल पुरुष एकेरी >> पात्रता फेरी
दीपक कुमार
दिव्यांश पनवर

नौकानयन Laser Radial Women >> दुसरी रेस
नेत्रा कुमानन

टेबल टेनिस पुरुष एकेरी >> दुसरी फेरी
साथीयन G

नौकानयन Laser Radial पुरुष >> पहिली + दुसरी शर्यत
विष्णू सर्वानन

टेबल टेनिस महिला एकेरी >> दुसरी फेरी
मनिका बात्रा विरुद्ध युक्रेन

बॉक्सिंग महिला फ्लाय वेट (४८-५१) >> पात्रता फेरी
मेरी कोम

हॉकी पुरुष >> ग्रुप A दुसरा सामना
विरुद्ध ऑस्ट्रेलिया

बॉक्सिंग पुरुष लाईट वेट (५७-६३)>> पात्रता फेरी
मनीष कौशिक

जलतरण महिला १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट १
माना पटेल

जलतरण पुरुष १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट ३
श्रीहरी नटराज

हुश्श!
भरगच्च कार्यक्रम आहे!

तुषार काळभोर's picture

25 Jul 2021 - 2:32 pm | तुषार काळभोर

महिला १० मीटर पिस्तूल >> पात्रता फेरी
(मनू भाकर आणि यशस्विनी सिंह देस्वाल) बाहेर
***
आर्टिस्टिक जिमॅस्टिक महिला>> पात्रता फेरी
प्रणती नायक बाहेर
मागच्या वेळी दीपा कर्माकरचं पदक थोडक्यात हुकलं होतं. नेत्रा कुमानन, दीपा कर्माकर, प्रणती नायक अशा खेळात प्रतिनिधित्व करतात ज्यांची नावे वाचल्यावर हे काय आहे, ते पाहण्यासाठी गुगल करावं लागतं. अशा परिस्थितीत त्या तिथपर्यंत पोहचल्या, हेच खूप मोठं यश आहे. अर्थात अल्पसंतुष्टपणा नाही, पण पदक न मिळताही त्यांना यशस्वी म्हणावं लागेल.

***

रोईंग पुरुष दुहेरी >> (पुनः प्रयत्न) पात्रता फेरी
अरुण लाल जाट
अरविंद सिंग
>> उपांत्य फेरीत दाखल
****
बॅडमिंटन महिला एकेरी ग्रुप J राऊंड >>
पी व्ही सिंधू विजयी विरुद्ध इस्रायल
****
टेनिस महिला दुहेरी >> पहिली फेरी
सानिया मिर्झा+ अंकिता रैना पराभूत विरुद्ध युक्रेन
****
१०मीटर एअर रायफल पुरुष एकेरी >> पात्रता फेरी
दीपक कुमार
दिव्यांश पनवर
बाहेर
**

तुषार काळभोर's picture

25 Jul 2021 - 11:26 am | तुषार काळभोर

एक गोष्ट लक्षात आली आहे, इतर देशांच्या खेळाडूंच्या कपड्यांवर स्पॉन्सरचे लोगो दिसतात. भारतीय खेळाडूंच्या कपड्यांवर (अर्थात अपवाद सोडून) लोगो दिसत नाहीत.
बहुतेक सगळे भारतीय खेळाडू वैयक्तिक अथवा सरकारी अर्थसाहाय्यावर अवलंबून आहेत.

पी.व्ही सिंधू खेळाचे हायलाईट!
भारी!
https://www.facebook.com/olympics/videos/341655644164207/?app=fbl

तुषार काळभोर's picture

25 Jul 2021 - 8:14 pm | तुषार काळभोर

पुरुष स्कीट शूटिंग >> पात्रता फेरी दिवस-१ : भारत बाहेर.
(राज्यवर्धन राठोड यांना ज्यात रजत पदक मिळालं होतं)
मैराज अहमद खान - ७१ गुण, २५ स्थान
अंगद विरसिंह बाजवा - ७३ गुण (Count back 13) , ११ स्थान.
(टॉप सहा खेळाडू अंतिम फेरी खेळतील. )
कदाचित यात दिवस २ आहे, ज्यात रँकिंग उंचावण्याची संधी असेल.
****

नौकानयन Laser Radial Women
नेत्रा कुमानन सोळाव्या स्थानी आहे. पण पुढील फेरीत जाण्याचे नियम माहिती नाहीत. उद्या कदाचित कळेल.

****

टेबल टेनिस पुरुष एकेरी >> दुसरी फेरी
साथीयन G हाँगकाँग विरुद्ध चुरशीच्या सामन्यात पराभूत झाला.

****
टेबल टेनिस महिला एकेरी >> दुसरी फेरी
मनिका बात्रा विजयी विरुद्ध युक्रेन

****
बॉक्सिंग महिला फ्लाय वेट (४८-५१) >> पात्रता फेरी
मेरी कोम विजयी विरुद्ध डॉमिनिकन रिपब्लिक
२०१२ लंडन मध्ये कांस्य विजेती, चार मुलांची आई, ३८ वर्षे वय. जिगरबाज!!

**** खालील लढती आज बाकी आहेत.
हॉकी पुरुष >> ग्रुप A दुसरा सामना
विरुद्ध ऑस्ट्रेलिया

बॉक्सिंग पुरुष लाईट वेट (५७-६३)>> पात्रता फेरी
मनीष कौशिक

जलतरण महिला १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट १
माना पटेल

जलतरण पुरुष १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट ३
श्रीहरी नटराज

कपिलमुनी's picture

25 Jul 2021 - 2:15 pm | कपिलमुनी

भारताच्या प्रिया मलिक ला सुवर्ण

कंजूस's picture

25 Jul 2021 - 3:12 pm | कंजूस

हंगेरीत. दुसरीकडे.

नावातकायआहे's picture

25 Jul 2021 - 4:07 pm | नावातकायआहे

हॉकी पुरुष >> ग्रुप A दुसरा सामना
विरुद्ध ऑस्ट्रेलिया ५-१ पहाणे सोडून दिले!

तुषार काळभोर's picture

25 Jul 2021 - 7:51 pm | तुषार काळभोर

हॉकी पुरुष >> ग्रुप A दुसरा सामना
भारत पराभूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१:७
अतिशय दारुण पराभव. भारतीय पुरुष हॉकी संघाचा ऑलिंपिक स्पर्धेत इतका वाईट पराभव कधी झाला नसावा.
****

बॉक्सिंग पुरुष लाईट वेट (५७-६३)>> पात्रता फेरी
मनीष कौशिक पराभूत विरुद्ध इंग्लंड
४:१
****

जलतरण महिला १०० मीटर बॅक स्ट्रोक >> पात्रता फेरी
माना पटेल
बाहेर. एकूण खेळाडूंमध्ये ३९वा क्रमांक. केवळ टॉप १६ खेळाडू उपांत्य फेरीत पात्र ठरले.
***

जलतरण पुरुष १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट ३
श्रीहरी नटराज
बाहेर. एकूण खेळाडूंमध्ये २७ वा क्रमांक. केवळ टॉप १६ खेळाडू उपांत्य फेरीत पात्र ठरले.

****

एकूण आजचा दिवस वाईटच गेला.
जे पराभव झाले ते अतिशय वाईट झाले.
मेरी कोम, सिंधू, मनिका बात्रा आणि अरुण लाल जाट व अरविंद सिंग अशा केवळ चार स्पर्धात पुढील फेरीत जाण्यापुरते यश मिळाले.
त्यातील पहिले दोन अपेक्षित होते.

तुषार काळभोर's picture

25 Jul 2021 - 9:46 pm | तुषार काळभोर

आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरताना भारतीय पुरुष संघाने सात गोल स्वीकारले.
1928 ते 1956 दरम्यान च्या सर्व सहा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मिळून भारताने केवळ सात गोल स्वीकारले होते.

तुषार काळभोर's picture

25 Jul 2021 - 7:53 pm | तुषार काळभोर

चीन, जपान आणि अमेरिका अनुक्रमे ६, ५ व ४ सुवर्ण पदकांसह पहिल्या तीन स्थानी.
भारत एक रजत पदकासह २४ वा क्रमांक.

तुषार काळभोर's picture

30 Jul 2021 - 7:23 am | तुषार काळभोर

१. टेनिस पुरुष एकेरी : दुसरी फेरी
सुमित नागल विरुद्ध रेफ्यूजी ROC संघाचा दानील मेदवेदेव
***

२. तिरंदाजी पुरुष सांघिक : उपांत्यपूर्व
विरुद्ध कझाकस्तान
***

३. टेबल टेनिस महिला एकेरी : तिसरी फेरी
मनिका बात्रा विरुद्ध ऑस्ट्रिया
***

४. तलवारबाजी (फेन्सिंग) : Women's individual sabre
पहिली फेरी
भवानी देवी विरुद्ध ट्यूनीशिया
***

५. टेबल टेनिस पुरुष एकेरी : दुसरी फेरी
शरथ कमल अचंता विरुद्ध पोर्तुगाल
***

६. बॅडमिंटन पुरुष दुहेरी : पहिली फेरी गट A
सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी
***

७. नेमबाजी पुरुष एकेरी - Skeet : दिवस २
मैराज अहमद खान - ७१ गुण, २५ स्थान
अंगद विरसिंह बाजवा - ७३ गुण (Count back 13) , ११ स्थान.
***

८. जलतरण पुरुष एकेरी : २०० मीटर बटरफ्लाय : पात्रता फेरी
साजन प्रकाश
***

९. बॉक्सिंग पुरुष मिडलवेट : पात्रता फेरी
आशिष कुमार विरुद्ध चीन
***

१०. हॉकी महिला : गट फेरी A
विरुद्ध जर्मनी

Bhakti's picture

26 Jul 2021 - 4:09 pm | Bhakti

https://www.indiatoday.in/sports/tokyo-olympics/story/tokyo-2020-china-z...
खरच कालच मला स्वप्न पडलं होते हे!पहाटे पडलं असेल तर नक्की सत्यात उतरेल :)
चायनीज विजेता खेळाडू डोपींगमध्ये सदोष आढळण्याची शक्यता तेव्हा मीराबाई चानु यांना गोल्ड मिळण्याची शक्यता आहे.

Bhakti's picture

26 Jul 2021 - 4:09 pm | Bhakti

https://www.indiatoday.in/sports/tokyo-olympics/story/tokyo-2020-china-z...
खरच कालच मला स्वप्न पडलं होते हे!पहाटे पडलं असेल तर नक्की सत्यात उतरेल :)
चायनीज विजेता खेळाडू डोपींगमध्ये सदोष आढळण्याची शक्यता तेव्हा मीराबाई चानु यांना गोल्ड मिळण्याची शक्यता आहे.

तुषार काळभोर's picture

27 Jul 2021 - 6:53 am | तुषार काळभोर

खरं झालं तर खरंच स्वप्नवत होईल!

तुषार काळभोर's picture

30 Jul 2021 - 7:25 am | तुषार काळभोर

१. टेनिस पुरुष एकेरी : दुसरी फेरी
सुमित नागल पराभूत विरुद्ध रेफ्यूजी ROC संघाचा दानील मेदवेदेव
***

२. तिरंदाजी पुरुष सांघिक :उप-उपांत्यपूर्व
विजयी ६:२ विरुद्ध कझाकस्तान
उपांत्यपूर्व : पराभूत विरुद्ध द. कोरिया
***

३. टेबल टेनिस महिला एकेरी : तिसरी फेरी
मनिका बात्रा पराभूत विरुद्ध ऑस्ट्रिया
***

४. तलवारबाजी (फेन्सिंग) : Women's individual sabre
पहिली फेरी
भवानी देवी विजयी १५:३ विरुद्ध ट्यूनीशिया
दुसरी फेरी भवानी देवी पराभूत विरुद्ध फ्रान्स
***

५. टेबल टेनिस पुरुष एकेरी : दुसरी फेरी
शरथ कमल अचंता विजयी ४:२ विरुद्ध पोर्तुगाल
***

६. बॅडमिंटन पुरुष दुहेरी : पहिली फेरी गट A
सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी पराभूत विरुद्ध इंडोनेशिया
***

७. नेमबाजी पुरुष एकेरी - Skeet : दिवस २
मैराज अहमद खान - ७१ गुण, २५ स्थान
अंगद विरसिंह बाजवा - ७३ गुण (Count back 13) , ११ स्थान.
स्पर्धेतून बाहेर.
***

टेबल टेनिस महिला एकेरी : दुसरी फेरी
सुतीर्था मुखर्जी ०:४ पराभूत पोर्तुगाल
***

नौकानयन पुरुष एकेरी + महिला एकेरी : दोघेही पात्रता फेरीत बर्‍यापैकी पिछाडीवर आहेत. आतापर्यंत चार शर्यती झाल्या आहेत. अजून किती शर्यती आहेत कुणास ठाऊक!
***

बॉक्सिंग : मिडलवेट पात्रता फेरी
आशिष कुमार : पराभूत विरुद्ध चीन
***

जलतरण पुरुष २०० मीटर बटरफ्लाय
प्रकाश साजन : पहिल्या गटात आठपैकी चौथ्या स्थानावर आहे. एकूण बत्तीसपैकी पहिले सोळाजण उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील.
***

बाकी:
१०. हॉकी महिला : गट फेरी A
विरुद्ध जर्मनी

एकूणच आजचा दिवस कालच्या पेक्षा अधिक निराशादायक.
केवळ शरथ अचंता पुढील फेरीत दाखल व प्रकाश साजन अजून बाकी गटांच्या निर्णयावर अवलंबून

श्रीगुरुजी's picture

27 Jul 2021 - 8:34 am | श्रीगुरुजी

भारतीय पुरूष मैदानी हॉकी संघाने स्पेनच्या संघावर ३-० असा विजय मिळविला.

तुषार काळभोर's picture

27 Jul 2021 - 7:11 pm | तुषार काळभोर

१. १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक :
पहिल्या फेरीत मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी पहिला क्रमांक मिळवला, पण दुसऱ्या पात्रता फेरीत सातव्या क्रमांकावर राहिले. आव्हान संपुष्टात.

२. हॉकी पुरुष गट A:
विजयी ३:० विरुद्ध स्पेन

३. बॅडमिंटन पुरुष दुहेरी : गट फेरी
सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी विजयी २:० विरुद्ध ब्रिटन

४. टेबल टेनिस पुरुष एकेरी : तिसरी फेरी
शरथ अचंता पराभूत १:४ विरुद्ध चीन

५. सेलिंग मध्ये नेत्रा कुमानान आणि विष्णू सरवानान यांनी प्रत्येकी सहा शर्यती पूर्ण केल्या आहेत.

६. १० मीटर मिश्र सांघिक
एलावेनिल वलरीवन आणि दिव्यांश सिंह पन्वर बाराव्या स्थानी आणि बाहेर.

७. बॉक्सिंग महिला वेल्टर वेट (६४-६९): पात्रता फेरी
लवलिना बोर्गोहेन विजयी विरुद्ध जर्मनी

एकूण बरा दिवस.
हॉकी, बॅडमिंटन, बॉक्सिंग मध्ये समाधानकारक विजय मिळाले.

हॉकी मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पराभव विसरून चांगली सुरुवात केली असं दिसतंय. पुढचा प्रवास असाच जोषपूर्ण होवो...

बॅडमिंटन आणि बॉक्सिंग मध्ये आशा पल्लवित झाल्या आहेत.

गॉडजिला's picture

27 Jul 2021 - 9:15 pm | गॉडजिला

फिर चाहे वो लडकी लाये या लडका...

पण लडके फार काही करत आहेत असे दिसत नाही ऑलिम्पिकमधे

तुषार काळभोर's picture

30 Jul 2021 - 7:25 am | तुषार काळभोर

१. महिला हॉकी (गट फेरी)
पराभूत ४:१ विरुद्ध ब्रिटन

२. बॅडमिंटन महिला एकेरी (गट फेरी)
सिंधू विजयी २:० विरुद्ध हाँगकॉंग

३. तिरंदाजी (३२ ची पात्रता फेरी)
तरुणदीप राय विजयी ६:४ विरुद्ध युक्रेन
(अंतिम १६ मध्ये पराभूत विरुद्ध इस्रायल)

४. रोइंग पुरुष डबल स्कल प्रकार (उपांत्य फेरी)
अरुण लाल जाट आणि अरविंद सिंग (अंतिम सामना -ब) साठी पात्र)

५. तिरंदाजी पुरुष एकेरी (३२ ची पात्रता फेरी)
प्रवीण जाधव विजयी विरुद्ध रेफ्यूजी ROC संघाचा Galsan BAZARZAHPOV
..
प्रवीण जाधव पराभूत विरुद्ध युएसए

६. तिरंदाजी महिला एकेरी (३२ ची पात्रता फेरी)
दिपीका कुमारी विजयी विरुद्ध भुतानची कर्मा
१६ ची पात्रता फेरी
दीपिका कुमारी विजयी विरुद्ध युएसए
(अंतिम आठ - उपांत्यपूर्व मध्ये दाखल)

७. बॅडमिंटन पुरुष एकेरी (गट फेरी)
साई प्रणिथपराभूत ०:२ विरुद्ध नेदरलॅण्ड्स

८. बॉक्सिंग महिला मिडलवेट (६९-७५ किलो) (१६ पात्रता फेरी)
पुजा राणी विजयी विरुद्ध अल्जीरिया

आतापर्यंत बरा दिवस..

मदनबाण's picture

28 Jul 2021 - 4:14 pm | मदनबाण

M1

आपल्या देशातील जाहिरात करणार्‍या कंपन्यांनी देशास गौरव प्राप्त करुन देणार्‍या, खेळाडु , शास्त्रज्ञ, विध्यार्थी इ इ इ. यांना आता जाहिरातीत घेतले पाहिजे. बॉलिवुडवाले आता बास्स झाले. लोकांना जाहिरातीत या देशातील खरे "हिरो" पहायला अधिक आवडतील आणि अनेकांना प्रेरणा देखील मिळेल आणि खेळाडुंना प्रोत्साहन देखील. :)

फिलिपाईन्सला ऑलिंपिकच्या आत्ता पर्यंत इतिहासातील पहिले सुवर्ण पदक मिळाल्याची बातमी वाचनात आली आहे, तेथील सरकार ने खेळाडुंवर विशेष बक्षिसे देखील जाहीर केलेली होती.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो ना कोई... :- मीरा

Bhakti's picture

28 Jul 2021 - 5:11 pm | Bhakti

होय,
रिनच्या जाहीरातमधील भवानी देवी (भारताची पहिली महिला ऑलिंपिक तलवारबाजी पटू) दरवेळी लक्ष वेधून घेते.

तुषार काळभोर's picture

28 Jul 2021 - 5:51 pm | तुषार काळभोर

रिन म्हणजे "माझ्या खेळासाठी आईने सोनं विकलं. आई, बघ मी सोनं जिंकून आणलं !" - तीच जाहिरात ना?

थम्सअपने पण चेंज म्हणून रणवीरसिंग ऐवजी, मनू भाकरला घेऊन जाहिरात केली आहे. (आता बहुतेक अजून २-३ जण घेतले आहेत त्यात).

बदल चांगला आहे, पण दुर्दैवाने या चतु:वार्षिक उचक्या आहेत. १५ ऑगस्टनंतर परत रणवीर सिंग (आणि महेश बाबू) परत येतील.

(आता जाहिराती येताहेत आठ पंधरा दिवसांसाठी. पण कुठल्याच खेळाडूच्या कपड्यांवर पुरस्कर्त्यांचा लोगो नाही दिसत.)

Bhakti's picture

28 Jul 2021 - 6:38 pm | Bhakti

हो तीच
https://youtu.be/gbMsDZjb-Bo
कोल्ड्रिंक्सच/पेय ;) आवडत नाही.
कोल्ड्रिंक्सच्या /पेयाच्या जाहिराती तर नाहीच नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो ना कोई... :- मीरा

तुषार काळभोर's picture

28 Jul 2021 - 10:44 pm | तुषार काळभोर

१. गोल्फ पुरुष पहिली फेरी
अनिर्बन लाहिरी
उदयन माने

२. रोइंग पुरुष डबल स्कल प्रकार (अंतिम फेरी B)
अरुण लाल जाट आणि अरविंद सिंग

३. नेमबाजी २५ मीटर पिस्तूल महिला एकेरी पात्रता फेरी
राही सरनौबत
मनू भाकर

४. हॉकी पुरुष गट फेरी
विरुद्ध अर्जेंटिना

५. बॅडमिंटन महिला एकेरी उपउपांत्यपूर्व सामना
सिंधू विरुद्ध डेन्मार्क

६. तिरंदाजी पुरुष एकेरी (३२ ची पात्रता फेरी)
अतनू दास

७. Sailing laser radial पुरुष सातवी आणि आठवी शर्यत
विष्णू सरवानन

८. Sailing laser radial महिला सातवी आणि आठवी शर्यत
नेत्रा कुमानन

९. Sailing 49er पुरुष पाचवी आणि शर्यत
गणपती केल्पंडा
वरुण ठक्कर

१०. बॉक्सिंग सुपर हेवी (९१+ वजन) : १६ची पात्रता फेरी
सतीश कुमार विरुद्ध जमैका

११. बॉक्सिंग फ्लाय वेट (४८-५१) १६ ची फेरी
मेरी कोम विरुद्ध कोलंबिया

१२. जलतरण पुरुष १०० मीटर बटरफ्लाय गट फेरी
सजन प्रकाश

श्रीगुरुजी's picture

29 Jul 2021 - 8:27 am | श्रीगुरुजी

मैदानी हॉकी स्पर्धेत भारतीय पुरूष संघाने अर्जैंटिना संघावर ३-१ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पी. व्ही. सिंधूने आपला सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

मैदानी हॉकी स्पर्धेत भारतीय पुरूष संघाने अर्जैंटिना संघावर ३-१ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
>>>
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारूण पराभवाने पेटून उठलेले दिसताहेत.

सिंधूकडून पुष्कळ आशा आहेत.

साईना जेव्हा तिच्या खेळाच्या शिखरावर होती, तेव्हा दुर्दैवाने ऑलिम्पिक स्पर्धेत तिला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती.

श्रीगुरुजी's picture

29 Jul 2021 - 9:58 am | श्रीगुरुजी

तिरंदाजीमध्ये अतानू दासने प्रथम तैवानच्या डेंग यू चेंगचा ६-४ असा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यानंतर दासने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या जिन हायकचा शूट आउटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.

बॉक्सिंगमध्ये पुरुषांच्या ९१ किलो वजनी गटात भारताच्या सतीशकुमारने जमैकाच्या रिकोर्डो ब्राउनचा ४-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

आजचा दिवस चांगला चाललाय.

तुषार काळभोर's picture

29 Jul 2021 - 12:01 pm | तुषार काळभोर

खरंय!
एकापाठोपाठ एक विजयी वार्ता येत आहेत.

नावातकायआहे's picture

29 Jul 2021 - 3:55 pm | नावातकायआहे

मेरी ताई हरल्या... :-(

तुषार काळभोर's picture

29 Jul 2021 - 4:14 pm | तुषार काळभोर

तीन फेर्‍यांमध्ये ५ परीक्षकांपैकी दोघांनी मेरी कोमच्या पक्षात गुण दिले तर तिघांनी विरोधात. पण फरक केवळ एका गुणाचा होता. १४२ विरुद्ध १४३

गॉडजिला's picture

29 Jul 2021 - 7:00 pm | गॉडजिला

:( मनापासून वाईट वाटले... मेरी को एक पदक मंगताच

कंजूस's picture

30 Jul 2021 - 7:25 am | कंजूस

बॉक्सिंग,कुस्ती... गुणपद्धती केविलवाणी आहे.

सुमो कुस्ती बरी. तळपायाव्यतिरिक्त अंग जमिनीला लागले/ रिंगणाबाहेर गेले की हरला.

तुषार काळभोर's picture

29 Jul 2021 - 5:04 pm | तुषार काळभोर

१२. जलतरण पुरुष १०० मीटर बटरफ्लाय गट फेरी
सजन प्रकाश दुसर्‍या स्थानी (सर्व गटांतील मिळून टॉप १६ उपांत्य फेरीत खेळतील.)
जर सजन प्रकाश पहिल्या सोळात असेल, तर उद्या उपांत्य फेरी आहे.

२६ जुलैला सजन प्रकाश याने पुरुष २०० मीटर बटरफ्लाय गट फेरीमध्ये सहभाग घेतला होता, पण तो पहिल्या सोळात नव्हता, त्यामुळे तो उपांत्य फेरीत सहभागी होऊ शकला नाही.

मदनबाण's picture

29 Jul 2021 - 5:35 pm | मदनबाण

पिझ्झा प्रेमी मीराबाई यांना लाईफ टाईम ऑफर ! :)
टिवटिव दुवा :- https://twitter.com/dominos_india/status/1418915109154471941?lang=en

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front

तुषार काळभोर's picture

29 Jul 2021 - 6:03 pm | तुषार काळभोर

ज्या प्रकारात सर्वाधिक पदकांची लयलूट होते, ते अ‍ॅथलेटीक्स खेळ उद्यापासून सुरू होत आहेत.
पदक तालिकेत वर्चस्व गाजवणारे देश इथेच सर्वाधिक पदके कमावतात.

पुरुष १०० मीटर
पुरुष २०० मीटर
पुरुष ४०० मीटर
पुरुष ८०० मीटर
पुरुष १५०० मीटर
पुरुष ५००० मीटर
पुरुष १०००० मीटर
पुरुष मॅराथॉन

पुरुष ३००० मीटर स्टिपलचेस
पुरुष ११० मीटर अडथळा
पुरुष ४०० मीटर अडथळा

पुरुष उंच उडी
पुरुष पोल व्हॉल्ट
पुरुष लांब उडी
पुरुष तिहेरी उडी

पुरुष गोळा फेक
पुरुष थाळी फेक
पुरुष हातोडा फेक
पुरुष भाला फेक

पुरुष डेकॅथलॉन
पुरुष २० किमी चालणे
पुरुष ५० किमी चालणे

पुरुष ४*१०० मीटर रिले
पुरुष ४*४०० मीटर रिले

महिला १०० मीटर
महिला २०० मीटर
महिला ४०० मीटर
महिला ८०० मीटर
महिला १५०० मीटर
महिला ५००० मीटर
महिला १०००० मीटर
महिला मॅराथॉन

महिला ३००० मीटर स्टिपलचेस
महिला १०० मीटर अडथळा
महिला ४०० मीटर अडथळा

महिला उंच उडी
महिला पोल व्हॉल्ट
महिला लांब उडी
महिला तिहेरी उडी

महिला गोळा फेक
महिला थाळी फेक
महिला हातोडा फेक
महिला भाला फेक

महिला हेप्टॅथलॉन
महिला २० किमी चालणे

महिला ४*१०० मीटर रिले
महिला ४*४०० मीटर रिले

मिश्र ४*४०० मीटर रिले

या प्रकारात ४८ सुवर्ण , ४८ रौप्य आणि ४८ कांस्य अशी एकूण १४४ पदके उपलब्ध आहेत.

भारताचा समावेश केवळ तीन प्रकारात आहे: जास्तीत जास्त तीन पदके मिळण्याची शक्यता.
१. पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस शर्यत (पहिली फेरी) - अविनाश साबळे
२. पुरुष ४०० मीटर अडथळ्यांची शर्यत (पहिली फेरी) - पलियालिल मदारी
३. मिश्र ४*४०० मीटर रिले शर्यत (पहिली फेरी) - अ‍ॅलेक्स अ‍ॅन्टोनी, सार्थक भांबरी, रेवती वीरमणी, सुभा वेंकटेशन

Bhakti's picture

29 Jul 2021 - 6:55 pm | Bhakti

चांगली माहिती.
बघूया बोल्टचा रेकोर्ड मोडता का कोणी.Fastest Man !

तुषार काळभोर's picture

30 Jul 2021 - 7:25 am | तुषार काळभोर

१. गोल्फ : पुरुष दुसरी फेरी
अनिर्बन लाहिरी
उदयन माने

२. घोडेस्वारी : (Eventing Dressage) पहिला दिवस (भाग एक आणि दोन)
फवाद मिर्झा

३. नेमबाजी २५ मीटर रॅपिड फेरी
मनू भाकर सहावा क्रमांक
अंतिम फेरीत दाखल

४. तिरंदाजी महिला एकेरी उपांत्यपूर्व
दीपिका कुमारी विजयी विरुद्ध रेफ्यूजी ROC
उपांत्य फेरीत दाखल

५. पुरुष ३००० मीटर स्टीपल चेस शर्यत पहिली फेरी
अविनाश साबळे

६. हॉकी महिला गट फेरी
विरुद्ध आयर्लंड

७. पुरुष ४०० मीटर अडथळा शर्यत
पलियाली मदारी

८. बॉक्सिंग महिला लाईट वेट (५७-६०) उप उपांत्यपूर्व
सिमरन जीत कौर विरुद्ध थायलंड

९. Sailing 49er पुरुष सातवी आठवी आणि नववी शर्यत
गणपती केलापांडा आणि वरुण ठक्कर

१०. Sailing laser radial महिला नववी आणि दहावी शर्यत
नेत्रा कुमानन

११. बॉक्सिंग महिला वेल्टर वेट (६४-६९)
उपांत्यपूर्व फेरी
लवलीना बॉर्गोहेन विरुद्ध तैवान

१२. महिला १०० मीटर शर्यत पहिली फेरी
द्युती चंद

१३. Sailing laser radial पुरुष नववी आणि दहावी शर्यत
विष्णू सरवानान

१४. बॅडमिंटन महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी
सिंधू विरुद्ध जपान

१५. हॉकी पुरुष गट फेरी
भारत विरुद्ध जपान

१६. मिश्र ४*४०० मीटर रिले शर्यत (पहिली फेरी) - अ‍ॅलेक्स अ‍ॅन्टोनी, सार्थक भांबरी, रेवती वीरमणी, सुभा वेंकटेशन

श्रीगुरुजी's picture

30 Jul 2021 - 9:10 am | श्रीगुरुजी

दीपिका कुमारी उपांत्यपूर्व फेरीत आली आहे.

तुषार काळभोर's picture

30 Jul 2021 - 9:51 am | तुषार काळभोर

तिने जिंकलेली फेरी १/८ elimination होती. मला वाटले की आता जिंकून ती १/४ म्हणजे उपांत्य फेरीत गेली. :)
उपांत्यपूर्व फेरी आजच दक्षिण कोरिया विरुद्ध आहे.

तुषार काळभोर's picture

30 Jul 2021 - 7:43 am | तुषार काळभोर

वरील बऱ्याच प्रतिसादात मी रिफ्यूजी संघाचा उल्लेख केला आहे. ऑलिंपिक च्या अधिकृत माहितीमध्ये ROC असा उल्लेख असतो. मला तो निर्वासित खेळाडूंसाठी असणारा Refugee Olympic Team संघ वाटला होता आणि इतक्या खेळात चांगली कामगिरी करत पदके कमावत असल्याने कौतुकही वाटत होते.
आताच लक्षात आलं की तो Russian Olympic Committee संघ आहे.

२०१९ मध्ये उत्तेजक द्रव्ये नियमांच्या उल्लांघना साठी रशिया देशावर आंतरराष्ट्रीय खेळात (ऑलिंपिक सहित) सहभाग घेण्यावर बंदी घालण्यात आली. सुरुवातीला चार वर्षे असणारी ही बंदी नंतर कमी केली, तरी ती डिसेंबर २०२२ पर्यंत आहे. त्यामुळे रशियाला यंदाच्या स्पर्धेत भाग घेणे शक्य झाले नाही.
मात्र रशिया हा पाश्चात्य देश आहे, ताकदवान देश आहे, ऑलिम्पिक पदक तालिकेत नेहमीच पहिल्या पाच मध्ये असणारा देश आहे. त्यामुळे रशियन खेळाडूंसाठी एक तोडगा काढण्यात आला. काही नियमांखाली त्यांना स्पर्धेत सहभागी करून घेतलं.

रशियन खेळाडू ROC या नावाच्या संघासाठी खेळतील.
रशियाचे नाव वापरण्यात येणार नाही.
रशियाचा ध्वज वापरण्यात येणार नाही.
पदक जिंकल्यावर रशियाचे राष्ट्रगीत ना वाजवता Pyotr Tchaikovsky’s “Piano Concerto No. 1 वाजवलं जातं.
रशियाचे खेळाडू लाल, निळा व पांढरा या रशियन रंगाचे कपडे घालतात, मात्र त्यावर रशिया हे नाव अथवा रशियाचा झेंडा निर्देशित होणार नाही, हे बघितले जाते.
ROC संघाचा ध्वज ऑलिंपिक ची पाच वर्तुळे व त्यावर लाल निळ्या पांढरा रंगातील ऑलिंपिक ज्योत असा आहे.

4

संदर्भ : TIME website वरील बातमी.

त्यामुळे वरील सर्व ठिकाणी जिथे रेफ्युजी संघ असा उल्लेख आहे, तिथे ROC असे आहे. चुकीसाठी क्षमस्व..

कंजूस's picture

30 Jul 2021 - 7:28 am | कंजूस

या माहितीसाठी.

फ्री स्टाईल स्पर्धाही भरवावी.
मग कंपन्यांच्या जाहिराती येतील 'आमची उत्तेजक द्रव्ये घ्या आणि यश मिळवा.'

Bhakti's picture

30 Jul 2021 - 11:47 am | Bhakti

हा हा
येईल तो काळही येईल .घोर कलियुग आहे.सिनेमा ,वगैरे बाडीबिल्डर घेतात आणि त्यांचे सर्किटही असते.

रात्रीचे चांदणे's picture

30 Jul 2021 - 9:17 am | रात्रीचे चांदणे

भारतासाठी दुसरे पदक निश्चित झाले. बॉक्सिंग मध्ये बॉक्सर Lovlina Borgohain ने सेमी फायनल मध्ये जागा निश्चित करून कमीत कमी bronze medal आपल्या नावावर केलं.

तुषार काळभोर's picture

30 Jul 2021 - 9:53 am | तुषार काळभोर

अपेक्षित पदकांच्या यादीत लवलिना चं नाव नव्हतं.
त्यामुळे लवलीनाचं पदक सुखद धक्का आहे!
अभिनंदन!

आणि उपांत्य फेरी जिंकण्यासाठी शुभेच्छा!!

Bhakti's picture

30 Jul 2021 - 11:48 am | Bhakti

Go for गोल्ड
Lovlina Borgohain!!
:)

तुषार काळभोर's picture

30 Jul 2021 - 1:32 pm | तुषार काळभोर

तिरंदाजी महिला उपांत्यपूर्व फेरी
दीपिका कुमारी दक्षिण कोरिया च्या An San कडून पराभूत

हॉकी महिला गट फेरी
भारत विजयी १:० विरुद्ध आयर्लंड

श्रीगुरुजी's picture

30 Jul 2021 - 2:55 pm | श्रीगुरुजी

सिंधू वि. यामागुची यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील सामना पाहिला. सिंधूने २१-१३, २२-२० असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू १५-१० आघाडीनंतर १८-२० अशी मागे पडली होती. नंतर सलग ४ गुण मिळवून तिने सामना जिंकला व पदक नक्की केले.

हेच सांगायला आले होते.

रात्रीचे चांदणे's picture

30 Jul 2021 - 3:15 pm | रात्रीचे चांदणे

पदक जिंकण्यासाठी कदाचित आणखीन एक विजय गरजेचा असेल.

तुषार काळभोर's picture

30 Jul 2021 - 3:50 pm | तुषार काळभोर

अंतिम सामन्यात सुवर्ण आणि रौप्य पदक.
उपांत्य मध्ये हरलेल्या दोघांत तिसऱ्या स्थानासाठी (कांस्य पदक) एक सामना होईल.

बॉक्सिंग मध्ये दोघांना कांस्य मिळतं. त्यामुळे उपांत्य मध्ये दाखल झाल्यावर पदक नक्की होतं.

तुषार काळभोर's picture

30 Jul 2021 - 4:05 pm | तुषार काळभोर

टेनिसमध्ये पुरुषांच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ क्रोएशियाचे आहेत.
म्हणजे अंतिम फेरीतील सर्व चार खेळाडू एकच देशाचे!

दुसरीकडे नुकतंच विम्बल्डन जिंकलेला जोकोविच आज उपांत्य सामन्यात जर्मनी विरुद्ध पराभूत झाला.
उद्या तो कांस्य पदकासाठी स्पेन च्या पाबलो बुस्ता विरुद्ध खेळेल.

तुषार काळभोर's picture

30 Jul 2021 - 7:14 pm | तुषार काळभोर

१. गोल्फ : पुरुष दुसरी फेरी
अनिर्बन लाहिरी
उदयन माने
उद्या सुरू राहील

२. घोडेस्वारी : (Eventing Dressage) पहिला दिवस (भाग एक आणि दोन)
फवाद मिर्झा
भाग एक सातवा क्रमांक, भाग दोन सुरू आहे.

३. नेमबाजी २५ मीटर रॅपिड फेरी
मनू भाकर पंधरावा क्रमांक
स्पर्धेतून बाहेर

४. तिरंदाजी महिला एकेरी उपांत्यपूर्व
दीपिका कुमारी विजयी विरुद्ध रेफ्यूजी ROC
उपांत्यपूर्व फेरीत पराभूत विरुद्ध दक्षिण कोरिया

५. पुरुष ३००० मीटर स्टीपल चेस शर्यत पहिली फेरी
अविनाश साबळे
सातवा क्रमांक
स्पर्धेतून बाहेर

६. हॉकी महिला गट फेरी
विजयी विरुद्ध आयर्लंड

७. पुरुष ४०० मीटर अडथळा शर्यत
पलियाली मदारी
सातव्या स्थानी
स्पर्धेतून बाहेर

८. बॉक्सिंग महिला लाईट वेट (५७-६०) उप उपांत्यपूर्व
सिमरन जीत कौर पराभूत विरूद्ध थायलंड

९. Sailing 49er पुरुष सातवी आठवी आणि नववी शर्यत
गणपती केलापांडा आणि वरुण ठक्कर

१०. Sailing laser radial महिला नववी आणि दहावी शर्यत
नेत्रा कुमानन

११. बॉक्सिंग महिला वेल्टर वेट (६४-६९)
उपांत्यपूर्व फेरी
लवलीना बॉर्गोहेन विजयी विरुद्ध तैवान
उपांत्य फेरीत दाखल.
पदक नक्की

१२. महिला १०० मीटर शर्यत पहिली फेरी
द्युती चंद
सातवा क्रमांक
स्पर्धेतून बाहेर

१३. Sailing laser radial पुरुष नववी आणि दहावी शर्यत
विष्णू सरवानान

१४. बॅडमिंटन महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी
सिंधू विजयी विरुद्ध जपान
उपांत्य फेरीत दाखल

१५. हॉकी पुरुष गट फेरी
भारत विजयी विरुद्ध जपान

१६. मिश्र ४*४०० मीटर रिले शर्यत (पहिली फेरी) - अ‍ॅलेक्स अ‍ॅन्टोनी, सार्थक भांबरी, रेवती वीरमणी, सुभा वेंकटेशन
आठवा क्रमांक
स्पर्धेतून बाहेर

लवलीना आणि सिंधू दोघी आपापल्या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहचल्या.
हॉकी महिला आणि पुरुष दोन्ही संघांचे विजय.
दीपिका कुमारीची चांगली वाटचाल आज संपुष्टात आली.
बाकी ठिकाणी फक्त उपस्थिती होती, त्यामुळे विशेष काही नाही.
नौकानयन मध्ये काय चाललंय ते कळत नसलं तरी सर्व प्रकारात भारतीय खेळाडू (ऑलमोस्ट) तळाला आहेत, हे नक्की.

एकूण चांगला दिवस.

आरओसी संघा बद्धलची माहिती आवडली.
धागा उत्तम पद्धतीने अपडेट होतोय याचा विशेष आनंद आहे... kudos to you. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism

तुषार काळभोर's picture

30 Jul 2021 - 10:29 pm | तुषार काळभोर

ऑलिंपिक च्या अधिकृत साईटवर बहुधा काल मला पूर्ण माहिती मिळाली नाही. भारतीय खेळाडू आणखी काही athletics प्रकारात सहभागी आहेत.

१. घोडेस्वारी : (Eventing Dressage) दुसरा दिवस (भाग तीन)
फवाद मिर्झा
पहिल्या दिवसाखेर सातव्या क्रमांकावर आहे.
पात्रता अथवा पुढे जायचे नियम माहिती नाहीत. उद्या स्पष्ट होईल.

२. महिला थळी फेक गट A फेरी
सीमा पूनिया
(अंतिम फेरीसाठी पात्रता ६४ मीटर फेकणे, अशी आहे. ६४ मीटर फेक करणारे सर्व खेळाडू किंवा किमान १२ खेळाडू अंतिम फेरीत जातील. सीमा पूनीया हिचा वैयक्तिक उच्चांक ६४.८४ मीटर आहे. पण यंदाच्या मोसमात तिची सर्वाधिक फेक ६३.७२ मीटर होती. उद्या ती ६४ मीटर फेक करून अंतिम फेरीत जाऊ शकेल का, याची उत्सुकता आहे.)

३. तिरंदाजी उप उपांत्यपूर्व फेरी (१/८ elimination)
अतनू दास विरुद्ध जपान

४. महिला थळी फेक गट A फेरी
कमलप्रित कौर
(हिचा वैयक्तिक उच्चांक यंदाच्या मोसमात ६६.४९ मीटर आहे. उद्या ती ६४ मीटर फेक करून अंतिम फेरीत जाऊ शकेल का, याची उत्सुकता आहे.)

५. बॉक्सिंग पुरुष फ्लाय वेट (४८-५२) पात्रता फेरी
अमित विरुद्ध कोलंबिया

६. नेमबाजी महिला ५० मीटर थ्री पोझिशन पात्रता फेरी
तेजस्विनी सावंत (टॉप आठ खेळाडू अंतिम फेरीत जातील.)

७. नौकानयन 49er दहावी, अकरावी, बारावी शर्यत
गणपती केलापांडा आणि वरुण ठक्कर

८. महिला हॉकी गट फेरी
विरुद्ध दक्षिण आफ्रिका

९. बॅडमिंटन महिला एकेरी उपांत्य सामना
सिंधू विरुद्ध तैवान

१०. बॉक्सिंग महिला मिडलवेट (६९-७५ किलो) (उपांत्यपूर्व)
पुजा राणी विरुद्ध चीन

११. पुरुष लांब उडी पात्रता फेरी
श्रीशंकर
(अंतिम फेरीसाठी पात्रता ८.१५ मीटर उडी मारणे, अशी आहे. ८.१५ मीटर फेक करणारे सर्व खेळाडू किंवा किमान १२ खेळाडू अंतिम फेरीत जातील. श्रीशंकर याचा वैयक्तिक उच्चांक ८.२६ मीटर आहे. तो यंदाच्या मोसमात केला आहे. उद्या ८.१५ मीटर उडी मारून अंतिम फेरीत जाऊ शकेल का, याची उत्सुकता आहे.)

तुषार काळभोर's picture

31 Jul 2021 - 7:37 am | तुषार काळभोर

बॉक्सिंग मधील गुणपद्धती नेहमीच वादग्रस्त राहिली आहे..
उपांत्यपूर्व सामन्यात तीन राऊंड्स मध्ये पाच परीक्षक गुण देतात. प्रत्येक फेरी कोणत्या खेळाडूला अधिक परीक्षकांनी गुण दिले, तो जिंकतो.
त्या सामन्यात पहिल्या फेरीत ४ परीक्षकांनी मेरीच्या विरोधात गुण दिले तर एकाने मेरीच्या पक्षात. त्यामुळे तो राऊंड मेरीने ४:१ असा गमावला.
पुढील दोन राऊंड मेरीने ३:२ असे जिंकले.
त्यामुळे तीनपैकी दोन राऊंड मेरीने जिंकले होते.
१:४
३:२
३:२
त्यामुळे मेरी विजेती असायला हवी होती. मात्र कोलंबिया च्या खेळाडूला विजयी घोषित करण्यात आलं.

मेरीचं म्हणणं आहे की हा निर्णय चुकीचा आहे.
2

मात्र परिक्षकांचे गुण विचारात घेतले तर त्यांनी असे गुण दिले होते
Valencia : Kom
३०:२७
२९:२८
२७:३०
२९:२८
२८:२९
एकूण ३:२
त्यामुळे निकाल मेरीच्या विरोधात गेला.
शिवाय एकूण गुण १४२:१४१ असे मेरीच्या विरोधात होते.
अर्थात जो नियम आहे तो दोघानाही लागू असतो, त्यामुळे मेरीचा विजय झाला असता तर कदाचित या गुनपद्धतीची चर्चा सुद्धा झाली नसती.

या सामन्याच्या काही मिनिटे आधी अजून एक गोष्ट झाली. काही कारणास्तव मेरीला तिचा रिंग मधील ड्रेस बदलायला सांगण्यात आलं होतं. खेळाडूंच्या जर्सिवर मागे देशाचं नाव आणि खेळाडूंचं नाव असतं. पण मेरी कोम च्या म्हणण्यानुसार तिला विनाकारण जर्सी बदलायला सांगण्यात आली, ज्यामुळे तिच्या खेळावर परिणाम झाला.
बहुतेक लवलीना सुद्धा नेहमीच्या जर्सी शिवाय खेळली होती.
दोघींच्या जर्सी बदलण्याविषयी आणि करण्याविषयी खात्रीशीर बातमी सापडली नाही.

अभिजीत अवलिया's picture

31 Jul 2021 - 8:06 am | अभिजीत अवलिया

पण ज्याअर्थी व्हॅलेंसियाला विजेता घोषित केले त्याअर्थी कुणी किती राउंड जिंकले यापेक्षा अंतिम गुण हा मुख्य क्रायटेरिया असावा. गुगल वरती पण तसेच लिहीलेले सापडले.
जर दोन्ही खेळाडूंनी समान गुण मिळवले तर कोणी किती राउंड जिंकले यावर निर्णय होत असेल.

तुषार काळभोर's picture

31 Jul 2021 - 9:06 am | तुषार काळभोर

to सामना पाहताना "Winner based on score" असं काहीसं खाली लिहिलं होतं.

गॉडजिला's picture

31 Jul 2021 - 9:03 pm | गॉडजिला

Winner based on score

Not round... आणि मुळात कोम ला धक्का तेंव्हा बसला जेंव्हा तीन परीक्षकांनी तिला गुण दिला नाही... एकाने मात्र दिला...सिंधू प्रमाने जर ती सपशेल हरली असती तरीही पराभव खिलाडू वृत्तीने मान्य करायला अडचण न्हवती

ह्युमन एरर... आणखी काय :(

Anyways, Meri kom was, is and will be an inspiring soul... always.

तुषार काळभोर's picture

31 Jul 2021 - 10:31 am | तुषार काळभोर

१. घोडेस्वारी : (Eventing Dressage) दुसरा दिवस (भाग तीन)
फवाद मिर्झा
नवव्या क्रमांकावर

२. महिला थळी फेक गट A फेरी
(अंतिम फेरीसाठी किमान ६४ मीटर फेक आवश्यक किंवा किमान १२ खेळाडू पात्र)
सीमा पूनिया : ६०.५७ मीटर (सहावा क्रमांक)
कमलप्रित कौर : ६४.०० मीटर : अंतिम फेरीसाठी पात्र

३. तिरंदाजी उप उपांत्यपूर्व फेरी (१/८ elimination)
अतनू दास पराभूत विरुद्ध जपान
स्पर्धेतून बाहेर

५. बॉक्सिंग पुरुष फ्लाय वेट (४८-५२) पात्रता फेरी
अमित पराभूत विरुद्ध कोलंबिया

खेडूत's picture

31 Jul 2021 - 12:50 pm | खेडूत

संमिश्र निकाल येत आहेत.
काल मेरी अणि आज अतानु दास हे पूर्वी पदक मिळवणारे खेळाडु बाहेर गेले. अमित हा चांगलं मानांकन असलेला बॉक्सर बाहेर गेला. :(

आज सिन्धू कडून खूप आशा आहे, तिला शुभेच्छा! आज हा सामना दुपारी साडेतीनला भारतात पहाता येईल.
कमलप्रीत ने आज कमाल केली. तिचा स्वत:चा आधीचा उच्चांक (६६ मी.) मोडला नाही तरी ६३.९७ मीटर्स थाळी फेकली. एकूण स्पर्धकांत दुसरी असल्याने पदकाच्या आशा आहेत.
लवलिनाची पुढची फेरी कधी आहे माहीत नाही.
(एकूण यात मराठी टक्का नगण्य आहे हे मात्र खुपते आहे! )

मराठी खेळाडू
तेजस्विनी सावंत
राही सरनौबत
प्रवीण जाधव
अविनाश साबळे

हॉकी महिला संघ (दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळलेला संघ)
हरियाणा 9
पंजाब 1
ओडिशा 1
झारखंड 2
उत्तरप्रदेश 1
मिझोरम 1
मणिपूर 1

पुरुष हॉकी संघ (काल जपान विरुद्ध खेळलेला संघ)
हरियाणा 1
पंजाब 10
ओडिशा 2
मध्यप्रदेश 1
उत्तरप्रदेश 1
तामिळनाडू 1
कर्नाटक 1
मणिपूर 1

तुषार काळभोर's picture

31 Jul 2021 - 2:41 pm | तुषार काळभोर

अंजुम आणि तेजस्विनी सावंत दोघी अनुक्रमे १५ व ३३ व्या स्थानी राहिल्या.
फक्त आठ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र आहेत.

महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिका संघावर ४:३ असा विजय मिळवला.

नावातकायआहे's picture

31 Jul 2021 - 3:56 pm | नावातकायआहे

पुजा राणी पराजीत..

नावातकायआहे's picture

31 Jul 2021 - 4:44 pm | नावातकायआहे

आणि सिंधु.... :-(

श्रीगुरुजी's picture

31 Jul 2021 - 4:45 pm | श्रीगुरुजी

सिंधूचा उपांत्य फेरीत १८-२१, १२-२१ असा पराभव झाला.

श्रीगुरुजी's picture

31 Jul 2021 - 4:46 pm | श्रीगुरुजी

आजचा दिवस खूप वाईट गेला.

श्रीगुरुजी's picture

31 Jul 2021 - 4:52 pm | श्रीगुरुजी

सिंधूचा १८-२१, १२-२१ अशा सरळ गेम्समध्ये पराभव झाला. पहिल्या गेममध्ये सिंधू ११-८ अशी आघाडीवर असूनही १८-२१ अशी हरली. दुसऱ्या गेममध्ये ८-८ अशा बरोबरीनंतर सिंधूने वेगाने गुण गमावले व ८-१४ अशी मागे पडली. तेथेच बहुतेक तिने हाय खाल्ली व शेवटी १२-२१ असा पराभव झाला.

तुषार काळभोर's picture

31 Jul 2021 - 8:52 pm | तुषार काळभोर

महिला हॉकी : भारताची कामगिरी फारशी चांगली नव्हती मात्र आयर्लंड ची कामगिरी त्याहून वाईट झाल्याने भारताचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश झाला आहे. :)

दुसरीकडे सिंधू आता कांस्य पदकासाठी खेळेल.

एकूण चंदेरी किनार असलेला वाईट दिवस.

कंजूस's picture

31 Jul 2021 - 9:11 pm | कंजूस

अमित हा चांगलं मानांकन असलेला बॉक्सर बाहेर गेला.
त्याचा प्रतिस्पर्धी फारच भारी खेळत होता आणि अमित दूर पळत होता किंवा त्याला धरून ठेवत होता.

कंजूस's picture

31 Jul 2021 - 10:25 pm | कंजूस

भारतीय खेळाडुंचे
dd sports (1) free dish dth वर दिसतात.

आणि 'dd national hd' channel >वर >paid dth = ( dishtv, tata sky,Videocon... वगैरे)

तुषार काळभोर's picture

1 Aug 2021 - 9:58 am | तुषार काळभोर

१. गोल्फ चौथी आणि पदक फेरी
अनिर्बन लाहिरी आणि उदयन माने जिंकण्याच्या स्थितीत नाहीत.

२. घोडेस्वारी
फवाद मिर्झा स्पर्धेतून बाहेर

३. बॉक्सिंग हेविवेट (९१+) उपांत्यपूर्व फेरी
सतीश कुमार पराभूत ५:० विरुद्ध उझबेकिस्तान
हा सामना पूर्ण एकतर्फी झाला. उझबेकिस्तान चा बाखोदिर जलालोव त्याच्या उंचीचा आणि चापल्याचा फायदा उठवत लागोपाठ ठोसे लगावत होता. सामना पाहताना सतिशचा पराभव स्पष्ट दिसत होता.

४. बॅडमिंटन महिला एकेरी
कांस्य पदकासाठी सामना संध्याकाळी ५.००
सिंधू विरुद्ध चीन

५. हॉकी पुरुष उपांत्यपूर्व फेरी संध्याकाळी ५.३०
भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2021 - 11:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॉक्सिंग हेविवेट (९१+) उपांत्यपूर्व फेरी

प्रतिस्पर्ध्याची उंची पाहता तो जिंकेल असे सुरुवातीलचा वाटले. त्याचे खेळणे लाजवाब होते.
आपण लढलो, सतीशकुमार लढलाच नै असे वाटले. अजून दोन चार ठोसे दिले असते तर जमले असते असेही वाटले पण ते शक्य नव्हते.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

1 Aug 2021 - 7:04 pm | तुषार काळभोर

भारताचे दुसरे पदक.

कांस्य पदक सामन्यात पी व्ही सिंधूने चीनच्या बिंग जियाओ हे हिला २-० असं हरवलं.
सामना बघताना सिंधूची देहबोली एकदम वेगळीच होती. सुवर्णपदक लढत असल्यासारखी सिंधू खेळली.
अभिनंदन सिंधू!

कुमार१'s picture

1 Aug 2021 - 7:30 pm | कुमार१

अभिनंदन सिंधू!

गॉडजिला's picture

1 Aug 2021 - 7:58 pm | गॉडजिला

सोनं नाही पण कांस्य पदक आणलेस याचा आनंद आहे... असुदे जे व्हायच ते चांगलेच झालं म्हणुया, अन फुडच्या वेळी सुवर्णकामगीरी करुन आमचा आनंद द्विगुणित नक्कि करावास अशी अपेक्षा आहे.

तुषार काळभोर's picture

1 Aug 2021 - 6:19 pm | तुषार काळभोर

चीन, अमेरिका आणि जपान पहिल्या तीन स्थानी.

भारत ६४ वरून ५९ व्या स्थानी.

गॉडजिला's picture

1 Aug 2021 - 10:50 pm | गॉडजिला

जब तक स्कुलमे maths teacher sports का पिरियड लेते रहेंगे हमारे मेडल नही आयेंगे ;)

तुषार काळभोर's picture

1 Aug 2021 - 9:21 pm | तुषार काळभोर

उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटन विरुद्ध ३:१ असा दिमाखदार विजय मिळवत उपांत्य फेरीत पोहचला आहे.

पहिल्या सामन्यातील ७:० अशा दारुण पराभवानंतर भारतीय संघाने राखेतून भरारी घेत सफाईदार विजय मिळवले आहेत.

उपांत्य फेरी जिंकून अंतिम सामन्यात सुवर्ण पदक जिंकण्यासाठी शुभेच्छा!!

नोट: भारताने हॉकी मध्ये शेवटचं पदक १९८० साली मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेत जिंकले होते. त्यानंतर कधीही भारत अंतिम चारमध्ये सुद्धा पोहोचलेला नाही. तब्बल चाळीस वर्षांनी भारतीय संघ हॉकीच्या उपांत्य फेरीत पोचला आहे.

तुषार काळभोर's picture

1 Aug 2021 - 9:31 pm | तुषार काळभोर

१. ॲथलेटीक्स महिला २०० मीटर पात्रता फेरी = ०७:२४
द्यूती चंद

२. नेमबाजी ५० मीटर 3 पोझिशन पुरुष पात्रता फेरी = ०८:००
ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर
संजीव राजपूत

३. हॉकी महिला उपांत्यपूर्व = ०८:३०
विरुद्ध ऑस्ट्रेलिया

४. थाळीफेक महिला अंतिम फेरी = १६:३०
कमलप्रित कौर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2021 - 8:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किती वाजता आहे मॅचेस ?

तुम्ही सांगितलं म्हणून आजचे सामने पाहता आले. हॉकी आणि बॅडमिंटन दोन्ही पाहिले आणि दोन्ही जिंकून दिले. ;)

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

1 Aug 2021 - 9:21 pm | Bhakti

सर थाळीफेक मधील मेडल पक्क करून द्यावे! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Aug 2021 - 9:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या भारत ऑस्ट्रेलिया महिला हॉकी पाहतोय. आपण १-० ने आघाडी घेतलीय. ही आघाडी टिकली पाहिजे.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Aug 2021 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महिला हॉकीने ऑस्ट्रेलियाला १-० धूळ चारली. मजा आली. दिल की धड़कने तेज हो गई थी....! मजा आली. जय हो...!

आता कब है थाली ? थाली फेक.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2021 - 9:49 am | श्रीगुरुजी

Indian girls hockey team leads 1-0 against Australia in the quarter final match. Just 8:00 minutes to go. 2 penalty corners saved.

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2021 - 10:14 am | श्रीगुरुजी

भारतीय मुलींनी अत्यंत बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला १-० असे पराजित करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने तब्बल ७ पेनल्टी कॉर्नर वाचविले व १-० अशी आघाडी जवळपास ४५ मिनिटे अबाधित ठेवली.

पराभवानंतर ऑस्ट्रेलियन मुलींना रडू आवरत नव्हते.

तुषार काळभोर's picture

2 Aug 2021 - 10:56 am | तुषार काळभोर

ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य आणि कणखर संघातील खेळाडू रडवेल्या झाल्या, यात त्या निकालाचं प्रतिबिंब होतं.

दोन्ही हॉकी संघ आता उपांत्य फेरीत आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Aug 2021 - 11:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

AusInd

हिरमुसले ग मन माझे....! आता आपली सेमी फ़ायनला अशी अवस्था होऊ नये म्हणजे झालं. भारतीयांना अजून जोश दाखवणे गरजेचे आहे.

पराग१२२६३'s picture

2 Aug 2021 - 12:03 pm | पराग१२२६३

भारतीय महिला हॉकी संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला हरवून पहिल्यांदाच ऑलिंपिक उंपात्य फेरीत दाखल झालाय.

कुमार१'s picture

2 Aug 2021 - 2:32 pm | कुमार१

उंच उडी प्रकारात....
मुताज बर्सहिम आणि तेम्बेरी यांच्यादरम्यान सुवर्णपदकासाठी स्पर्धा होणार होती. मात्र त्यापूर्वीच बर्सहिमने येथील पंचांना “आम्हाला दोघांनाही सुवर्णपदक मिळू शकतं का?”, असं विचारलं असता अधिकाऱ्यांनी चक्क होकारार्थी उत्तर दिलं आणि या दोघांनी एकाचवेळी जल्लोष सुरु केला.

ग्रेट! ऐकावं ते नवलंच!! पण छान झालं हे खरं. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Aug 2021 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद माहितीपूर्ण आहे, पण स्पर्धा म्हटल्यावर असं कुठं असतं व्हय. स्पर्धा स्पर्धा असते आणि विजेता विजेता. स्पर्धा संयोजकांचा मेल आयडी आहे का ? स्पर्धेच्या ध्येय धोरणाबाबत तक्रार करायची आहे.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

2 Aug 2021 - 4:33 pm | तुषार काळभोर

फवाद मिर्झा अंतिम फेरीतील २५ जणात पात्र ठरला आहे.
(पदकाची शक्यता शुन्यवत आहे. पण अंतिम फेरीत दाखल झाला ही अभिमानाची गोष्ट!)

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2021 - 6:51 pm | श्रीगुरुजी

महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताची कमलप्रीत कौर ६ वी आल्याने पदक मिळाले नाही.

तुषार काळभोर's picture

2 Aug 2021 - 9:22 pm | तुषार काळभोर

सिंधूने दुसरं ऑलिंपिक पदक जिंकून इतिहास घडवला.
दोन ऑलिंपिक पदके मिळवणारी ती पहिली आणि तूर्त एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे.
याआधी दोन वैयक्तिक ऑलिंपिक पदके मिळवण्याचा पराक्रम कुस्ती खेळाडू सुशील कुमार याने केला होता. २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकल्यानंतर २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने रजत पदक जिंकून इतिहास घडवला होता. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू होता.

नऊ वर्षांनी सिंधूने तोच पराक्रम केल्यावर सर्व माध्यमांनी सुशील कुमार समोर माईक धरून ' अब आपको कैसे लग रहा है' असा प्रश्न विचारला असता.

पण सुशील कुमार उत्तर द्यायला उपलब्ध नव्हता. कदाचित त्याला सिंधूचा तो सामनाही पाहता आला नसेल. कारण तो दुसऱ्या कुस्तीगीरचा खून केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2021 - 10:06 pm | श्रीगुरुजी

२०१६ मधील ऑलिम्पिक स्पर्धैसाठी सुशीलकुमार ऐवजी भारतीय संघात नरसिंग यादवचा समावेश केला होता. हा सुशीलकुमारवर अन्याय होता. त्याने रिओमध्ये कदाचित तिसरे पदक मिळविले असते.

ऑलिम्पिक स्पर्धैपूर्वी झालेल्या डोपिंग टेस्टमध्ये नरसिंग यादव अपयशी ठरल्याने तो सुद्धा जाऊ शकला नाही व त्या गटात भारताचा एकही स्पर्धक शिल्लक राहिला नव्हता.

अभिजीत अवलिया's picture

2 Aug 2021 - 10:29 pm | अभिजीत अवलिया

मला वाटते सुशीलकुमारनेच आपला 'गेम' केला असा काहीसा संशय नरसिंग यादवने व्यक्त केला होता.

तुषार काळभोर's picture

3 Aug 2021 - 5:51 am | तुषार काळभोर

१. भाला फेक महिला पात्रता फेरी
अन्नू राणी
अंतिम फेरीसाठी पात्रता निकष ६३ मीटर फेक.
अन्नू राणीची सर्वोत्तम कामगिरी ६३.२४ मीटर आहे. मात्र पाच खेळाडू तिच्यापेक्षा किमान ४ मीटर सरस आहेत. त्यामुळे अंतिम फेरी कदाचित होईलही,मात्र पदकाची आशा कमीच आहे.

२. हॉकी पुरुष उपांत्य सामना
विरुद्ध बेल्जियम.
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ सलग विजयी झाला आहे. या सामन्यात बेल्जियम वर मात करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळावा या शुभेच्छा..

३. गोळा फेक पुरुष पात्रता फेरी
ताजिंदरपाल सिंह तूर
वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी २१.४९ मीटर
अंतिम सामन्यासाठी पात्रता २१.२०
पाच खेळाडू २२+ मीटर कामगिरी केलेले आहेत.

४. कुस्ती - महिला फ्री स्टाईल - ६२ किलो (१/८ फेरी)
सोनम विरुद्ध मंगोलिया

तुषार काळभोर's picture

3 Aug 2021 - 6:50 am | तुषार काळभोर

१. भाला फेक महिला पात्रता फेरी
अन्नू राणी
अंतिम फेरीसाठी पात्रता निकष ६३ मीटर फेक.
अन्नू राणी ने ५४.०४ मीटर फेक केली. चौदाव्या स्थानी असल्याने अंतिम फेरीत प्रवेश नाही. तिच्या ६३.२४ मीटर या सर्वोत्तम पेक्षा फारच सुमार कामगिरी.

श्रीगुरुजी's picture

3 Aug 2021 - 8:24 am | श्रीगुरुजी

बेल्जियम वि. भारत उपांत्य फेरी -

२-२

अजून ११ मिनिटे आहेत.

श्रीगुरुजी's picture

3 Aug 2021 - 8:25 am | श्रीगुरुजी

बेल्जियम ३-२ ने पुढे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Aug 2021 - 8:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पेनल्टी स्ट्रोकमुळे बेल्जियमचा चौथा गोल. ४ -० ने आघाडी मला वाटतं शेवटच्या दोन मिनिटात अजुन दोन गोल आवश्यक पण आता हे शक्य वाटत नाही.

बेल्जियमची संरक्षण फळी मजबूत असल्यामुळे भारतीयांसाठी आजची सकाळ खराब म्हणावी लागेल. आता काही चमत्कारच वाचवू शकेल.

गुड्डे ऑल...! :(

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

3 Aug 2021 - 8:44 am | श्रीगुरुजी

बेल्जियम ५-२ विजय

श्रीगुरुजी's picture

3 Aug 2021 - 8:49 am | श्रीगुरुजी

४ सत्रांपैकी पहिल्या सत्राअंती भारत २-१ असा आघाडीवर होता. परंतु शेवटी २-५ असा पराभव झाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Aug 2021 - 9:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महिला कुश्तीही हरलो 2 -0 ने आघाडी होती. शेवटच्या 40 सेकंद राहिले होते, मंगोलियाच्या खेळाडूने शेवटच्या डावाने 2-2 ने बरोबरी नव्हे तर घेतलेल्या आघाडीमुळे मंगोलिया विजयी.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

3 Aug 2021 - 10:55 am | तुषार काळभोर

आता आशा लवलीना आणि महिला हॉकी यांच्यावर..

रात्रीचे चांदणे's picture

3 Aug 2021 - 12:05 pm | रात्रीचे चांदणे

सोनम मलिक पहिली कुस्ती हरली असली तरीही अजून बाहेर पडलेली नाही, कदाचित तिला अजून एक संधी मिळू शकेल.

तुषार काळभोर's picture

3 Aug 2021 - 10:30 pm | तुषार काळभोर

१. गोल्फ महिला पहिली फेरी
अदिती अशोक आणि दिक्षा डागर

२. भाला फेक पुरुष पात्रता फेरी.
अंतिम फेरीत जाण्यासाठी निकष ८३.५० मीटर
नीरज चोप्रा. याचा वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८८.०७मीटरअसून जागतिक रँकिंग १३ आहे.

३. कुस्ती पुरुष (१/८) उप उपांत्यपूर्व फेरी
भारताचे तीन खेळाडू आहेत.
रवी कुमार विरुद्ध कोलंबिया
अंशू विरुद्ध बेलारूस
दीपक पुनिया विरुद्ध नायजेरिया

४. बॉक्सिंग (६४-६९) महिला वेल्टर वेट उपांत्य फेरी
लवलिना विरुद्ध टर्की

५. हॉकी महिला उपांत्य फेरी
विरुद्ध अर्जेंटिना

टिनटिन's picture

4 Aug 2021 - 10:04 am | टिनटिन
  • रवी कुमार आणि दीपक पुनिया उपान्त्य फेरीत. दुपारी २ ४५ नन्तर सामने
  • आन्शु मलिक हरली
  • नीरज चोप्रा भालाफेक अन्तिम फेरिमध्ये. शनिवारी १६ ३० ला अन्तिम सामना
  • मुष्टियुद्धा उपान्त्य सामना ११ वाजता
  • महिला हॉकी सामना १५ ३० वाजता