मिसळपाव साईटवर फोटो देणे - जुलै २०२१

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
8 Jul 2021 - 7:13 pm

मोबाईल फोटो अपलोड - जुलै २०२१
मिपावरचा फोटो धागा मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही जोरात आहे.
ज्यांनी अजून फोटो दिले नाहीत त्यांनी द्यावेत.
पण फोटो इथे कसे द्यावेत अडचण वाटत असेल तर हा एक प्रयत्न.

फोटो देण्याची प्रक्रिया थोडक्यात अशी आहे --
मिसळपाव साईटवर स्वत:ची अशी स्टोरेज मेमरी सभासदांसाठी नाही. त्यामुळे आपल्या फोन / camera / pc मधले फोटो
A) कोणत्यातरी photo hosting / photo sharing / social media site वर अपलोड करावे लागतात.
B )तिथे फोटो अपलोड झाल्यावर त्यास 'public access' द्यावा लागतो. म्हणजे की त्याची URL ऊर्फ डिजिटल पत्ता मिळाल्यास कुणीही तो फोटो पाहू शकतो. त्या URL बऱ्याच विविध असतात. त्यातली 'direct image link' मिळवावी लागते. सर्वच साइटसमधून अशी लिंक मिळतेच असं नाही.
C) ती 'direct image link' मिळाल्यावर इथे फोटो देता येतो. म्हणजे की लेखन उघडल्यावर hosting site वरचा फोटो इथे उमटवला जातो. ती कृती शेवटी पाहा.
मागे यासंबंधी बरेच धागे आले आहेत ते वरील
प्रक्रिया ( B) बद्दल आहेत. धागे आणि त्यातील माहिती बदलल्यामुळे सतत अपडेट करावे लागतात. साईट्स बदलत राहातात.
काही साईट्स बंद होतात, ( tinypic ),
काहींचे domain reset होतात. (postimage ),
काही फ्री साईट्स बंद होऊन पेड झाल्यामुळे चालत नाहीत ( photobucket ),
काहींच्या फोटोंचे time stamp बदलतात( facebook group photo),
काही फोटो ठराविक काळानंतर ओटो डिलीट होतात ( facebook posts),
अशा विविध कारणांमुळे नवनवीन साईट्स शोधणे भाग पडते.

त्या जुन्या धाग्यांत
Google drive,
Google photos,
Flickr,
Post image,
Facebook,
Photobucket,
tinypic,
Onedrive,
Picasa

हे कसे वापरायचे ते आले आहे.
______________________
गूगल फोटोज बाबतीत अडचणी येत आहेत म्हणून पुन्हा देत आहे.

'गूगल फोटोज' Google Photos वरून फोटो शेअर करणे.

गूगल फोटोज ही एक cloud storage सोय आहे. ती Gmail/ google account असणाऱ्या यूजरला 15 GB free storage उपलब्ध करून देते. यामध्ये फोटो साठवता येतात आणि ते पाहता किंवा डाउनलोड करता येतात. आता एवढे फ्री स्टोअरेज देणारी ही एकमेव जागा ( service provider) आहे आणि शिवाय सुरक्षित ( secure) आहे.

गाभा
मिसळपाव ( मिपा)साईटची स्वत:ची स्टोरेज नाही त्यामुळे आपले ( मोबाईल/कंपुटर हार्ड डिस्क/ camera मधले) फोटो प्रथम कुठेतरी इंटरनेटवरच्या साईटवर असणे जरुरीचे आहे. मग तिथून ते मिपावर लेखामध्ये तात्पुरते दाखवता येतात. तशा साईटवर फोटो स्टोअर करून ' direct image sharing link' मिळवावी लागते. ती मिळाली की लेख/ प्रतिसाद लिहिताना तिथे असणारा 'image' pop-up menu वापरून फोटो देता येतो. ती 'direct image sharing link' google photos मधून कशी मिळवायची हे देत आहे. गूगल फोटोजवरून फोटोंच्या वेगवेगळ्या लिंका मिळतात परंतू त्या सर्वच मिपासाठीच्या direct image sharing link नसतात. तशी लिंक कशी मिळवायची ते इथे देत आहे.

तुम्ही android मोबाईल, iphone, computer ,tablet असे कोणतेही उपकरण (device) वापरत असलात तरी पद्धत एकच आहे.

१.तुमच्या डिवाइसमध्ये Google photos app सुद्धा असेल किंवा नसेल परंतू आपल्याला त्याची साईट वापरायची आहे.
ही साईट ब्राउजरमध्ये उघडा.
https://photos.google.com/
लॉगिन नसेल तर

https://photos.google.com/login
ही लिंक वापरून तुमच्या Gmail accountने लॉगिन करा.
( इथे तुम्ही फक्त backup केलेले फोटो दिसतात, डिवाइसच्या स्टोरेजमधले दिसणार नाहीत.)
२. मेनूमध्ये जाऊन album create करा.
अल्बमचे नाव द्या. उदाहरणार्थ
Share_to_mipa_1
त्याच पेजवरच्या मेनूमध्ये >> options>>share>>create link केल्यावर तो 'shared' album तयार होतो.
((नाव असे द्या की पुढे हे फोटो कशासाठी हे लगेच समजेल. शिवाय
Share_to_mipa_2
Share_to_mipa_3
. . .
अशी नावं दिल्याने त्या albumचे एडिटिंग सोपे जाईल.

३. पुन्हा फोटोजच्या मुख्य पेजवर जाऊन >> मेनू>>albums ओपन करा. इथे आता नवीन अल्बमचे नाव दिसेल व त्यावर shared हा शब्द दिसेल. या अल्बमवर क्लिक करून उघडा. अपलोडचा बाण वापरून हवे ते फोटो अपलोड करा. किंवा अगोदरच अपलोड केलेले फोटो 'add photos' वापरून त्या shared albumमध्ये आणा.
( (आता या albumमध्ये असणारे/आणलेले फोटो shared च असतील. पण तुमचे इतर backup फोटो shared नसल्याने इतरांना दिसणार नाहीत.))
४. या अल्बममधल्या एखाद्या फोटोला क्लिक केल्यावर तो मोठा दिसेल. त्यावर पुन्हा क्लिक करून 'open in new tab' करा.
Address bar मध्ये
https_lh3.googleusercontent_com/. . . .
अशी लिंक दिसली तर कॉपी करून घ्या। हीच direct image link.

अशी लिंक दिसली नाही तर
https_photos _dot_google_dot_com/share/. . . .
अशी दिसत असेल तेव्हा फोटोवर राईट क्लिक करून हवी ती https_lh3.googleusercontent_com/. . . . टाईपची लिंक 'copy link' मधून मिळते.

((सूचना लिंका शेअर केल्यानंतर album चे नाव बदलू नका. तसे केल्यास लिंका पुन्हा कराव्या लागतील.))

______________________

इतर काही आहेत काय?

मोबाईलवर camera ने फोटो काढले जातात.
समजा मोबाईलमधूनच कोणत्यातरी वरीलपैकी photo hosting / social media sites वर फोटो चढवून नंतर direct image link मिळवली तर मिपावर फोटो टाकता येतात. पण सर्वच साईट्सवरून image links मिळत नाहीत.

१) Dropbox
प्रसिद्ध साईट - फोटो होस्टींग/ स्टोरेज साईट आहे. फ्री वर्शनमध्ये 2gb स्टोरेज मिळते. अकाउंट नोंदवून फोटो चढवा. त्यावर शेअर लिंक मिळेल ती थोडीशी
https....www....dropbox dot com/s/.............../Photo......jpg?dl=0

अशी दिसेल. त्यात थोडा बदल करायचा. शेवटचा ? नंतर dl=0 बदलून raw=1 केले की झाली image link.

https....www....dropbox dot com/s/.............../Photo......jpg?raw=1

मूळ फोटोची साईज २-४ MB असली तरी शेअर होऊन लेखात दिसणारा फोटो मात्र १००- १५० kb पडतो.
-----------------

२) Imgur
फोटो शेअरिंग साईट / सोशल मिडिया साईट आहे. इतरांना फोटो दाखवण्याची साईट. फ्री आहे. स्टोरेज लिमिट नाही. अकाऊंट नोंदवून फोटो चढवा आणि post to imgur community public करा. त्या पब्लिश झालेल्या फोटोवरून कॉपी लिंक केली की झाली image link. या लिंकने लेखात टाकलेला फोटो हा मूळ मोठ्या साईजचाच येतो. तेवढा हाई रेझलूशनचा मोठा नको असेल तर फोटो एडिटिंग app वापरून अगोदरच लहान करून मग साईटवर चढवा. म्हणजे चार पाच MB चा फोटो अगोदरच 0.5/1.0/ 1.5 MB करून घ्यायचा.

आपले फोटो दिसतील त्यातून हव्या त्या फोटोवर क्लिक केल्यावर तो विंडोमध्ये मोठा दिसेल आणि बाजूला निरनिराळ्या लिंक्स दिसतात. त्यात
Image Link
Direct Link
Markdown Link
HTML
BBCode
वगैरे दिसतील.
त्यातून ' Direct Link ' वापरावी. ( Image Link वापरू नका.)

-----------
३)Shutterfly
मोठी साईट . पण direct image link मिळत नाही. Page link मिळते.
------------------
४) Instagram
मोठी साईट . पण direct image link मिळत नाही.Page link मिळते.

-------------
चारही साईट्सची apps आहेत Android वर. पण मी मोबाईल ब्राऊजरवर साईटचे डेस्कटॉप पेज उघडून काम केले. यामध्ये फायदा असा की काम पटापट होते, फोल्डर बनवता येतात, कोणत्याही ओएस अथवा डिवाइसमधून काम होते.

----------------
५) mediafire
10GB free storage देणारी साईट.
मोठी साईट . Photo ,video, document storage. पण direct image link मिळत नाही. Page link मिळते.

----------------------
६) jumpshare
Free version 2 GB storage. Photo ,video, document storage. पण direct image link मिळत नाही. Page link मिळते.

------------
गूगल फोटोवरच्या लिंकमधून शेअर करायच्या फोटोची साइज कंट्रोल करणे.

समजा गूगल फोटोच्या सेटिंग्ज मध्ये अपलोड फोटो इन 'हाई रेझलूशन'(default ) ऐवजी 'फुल ओरजिनल ' केले आणि
3MB चा फोटो अपलोड केला तर तो क्लाउडला 3MBसाईजमध्येच राहातो. याची
लिंक काढून लेखात फोटो शेअर केला तर तो १००-१५० kB लहान येतो. तर लिंकमध्ये शेवटी w570_h750 असेल तर ते आकडे तिप्पट/चौपट/पाचपट केल्यास फोटो मोठ्या साईजचे येतात.
w1070_h1450, / w2070_h2850 वगैरे.

---------------
Trial/ error करून practise करणे.
________________________

( नेट सहाय्य : How to get a direct link to image and insert it into an email signature

आणि इतर साईट्स.)

_____________________
सूचना, बदल आणि दुरुस्ती यांचे स्वागत.

__________________________
फोटो अपलोडसाठी 'direct image link' ( = लिंक ) कोणत्याही प्रकारे मिळवलीत की ती लेखात वापरून फोटो देण्याचे दोन प्रकार आहेत.

अ)
मिपा लेखन बॉक्स उघडल्यावर म्हणजे वरती जी चित्रे आहेत त्यातल्या पहिल्या सुर्योदयाच्या चित्रावर टिचकी मारल्यावर
Insert / edit image box चा पॉप अप येतो.
फोटो उभा portrate mode साठी
Image URL = लिंक टाका,
Width x height
Width = 80%
height = हा रिकामा ठेवा.
Alternate text = फोटोचं नाव तात्पुरतं.

फोटो आडवा landscape mode साठी

Image URL = लिंक टाका,
Width x height
Width = 100%
height = हा रिकामा ठेवा.
Alternate text = फोटोचं नाव तात्पुरतं.
शेवटी
OK - बटण प्रेस करा.

ब ) template वापरणे
उभ्या फोटोसाठी template
फोटो क्रमांक * आणि मथळा<img src="लिंक" width ="80%"/>

आडव्या फोटोसाठी template
फोटो क्रमांक * आणि मथळा<img src="लिंक" width ="100%"/>

_________________
हेसुद्धा वाचा.
11 Best Image Hosting Sites for Personal to Business

====================

प्रतिक्रिया

गोरगावलेकर's picture

9 Jul 2021 - 7:54 am | गोरगावलेकर

निश्चितच उपयोगी ठरेल

टर्मीनेटर's picture

9 Jul 2021 - 4:50 pm | टर्मीनेटर

चांगली माहिती!
मोबाईलवर मिपा वापरणाऱ्यांकरता

https://postimages.org/

ही वेबसाईट वापरायला सुलभ आहे.

अर्थात सुरवातीला थोडं किचकट वाटलं तरी इमेजेस लोड होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता गुगल फोटोलाच माझी पाहिली पसंती असतें.

कंजूस's picture

9 Jul 2021 - 7:06 pm | कंजूस

पण माझे २०१४ सालच्या लेखातले फोटो दिसेनासे झाले. त्या लिंका तपासल्यावर मेसेज आला की डोमेन is reset by order from gov of india. मग लिंकेत किंचित फरक केला.
साधी सोपी साईट आहे.

कंजूस's picture

9 Jul 2021 - 7:14 pm | कंजूस

w आणि h बदलून मोठे करून पाहिले.

उपयुक्त माहिती. वाखुसाआ. :-)

चौथा कोनाडा's picture

9 Jul 2021 - 5:11 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, अतिशय उपयोगी माहिती आहे ही !

फ्लिकर वरचा शेअर्ड व्हिडो एम्बेड करायचा आहे इथे.
माहिती मिळालयास उत्तम !

टर्मीनेटर's picture

9 Jul 2021 - 5:55 pm | टर्मीनेटर

Upcoming Evo X release LeLUTKA Ford Head 3.1

चौथा कोनाडा's picture

9 Jul 2021 - 6:02 pm | चौथा कोनाडा

हो, असाच करायचा होता ....
.. थोडी खटपट केल्यावर जमलं मला ! 😊

NMS_11_Video

थॅन्क्यू टर्मिनेटर !

टर्मीनेटर's picture

9 Jul 2021 - 6:08 pm | टर्मीनेटर

👍

मदनबाण's picture

9 Jul 2021 - 5:38 pm | मदनबाण

वाखुसा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lama

सुजित जाधव's picture

14 Dec 2021 - 6:12 pm | सुजित जाधव

असं

सुजित जाधव's picture

14 Dec 2021 - 6:20 pm | सुजित जाधव

ss

सुजित जाधव's picture

14 Dec 2021 - 6:22 pm | सुजित जाधव

ss

सुजित जाधव's picture

14 Dec 2021 - 6:37 pm | सुजित जाधव

ss

सुजित जाधव's picture

14 Dec 2021 - 6:56 pm | सुजित जाधव

कंजूस's picture

14 Dec 2021 - 7:46 pm | कंजूस

कळल्यास आणखी सुधारणा करू.

अनुस्वार's picture

31 Oct 2022 - 12:53 am | अनुस्वार

.

सुजित जाधव's picture

1 Nov 2022 - 10:20 am | सुजित जाधव

शाळा

चौथा कोनाडा's picture

1 Nov 2022 - 1:24 pm | चौथा कोनाडा

HNB1234DH2234

चौथा कोनाडा's picture

1 Nov 2022 - 1:32 pm | चौथा कोनाडा

वरील प्रचि "शेअर टू एव्हरीवन " नव्हते .... ते करून लिंक काढली ती पुढील प्रमाणे आली :

https://photos.google.com/share/AF1QipPUv5zCY_0zfJpwTsS4FtstSKf39It-xHjs...
open
हा पत्ता नविन टॅब मध्ये चिटकवून चित्र परत डिस्प्ले केले ..... त्या चित्रावर राईट क्लिक करून " open Image इन New Tab " हा पर्याय स्वीकारला.
नविन टॅब मध्ये आलेली लिंक पुढील प्रमाणे :

https://lh3.googleusercontent.com/pw/AL9nZEUZ3NyAFm2jyem8pLQgOvBpP8e-msD...

ही आलेली लिंक googleusercontent.com वाली होती .. पुढील गोष्टी नेहमी प्रमाणे केल्या .. (मिपा Insert Image ) नुसार चित्र दिसू लागले.

प्रोसेस किचकट आहे .. दर वेळी लढाई करत असे यश मिळवावे लागते !

सुजित जाधव's picture

3 Nov 2022 - 12:23 pm | सुजित जाधव

फारच किचकट आहे. याआधी मी फ्लिकर वरून फोटो चीटकायचो पण आता सेम प्रोसेस फॉलो करून पण फोटो अपलोड होत नाहीये..

सुजित जाधव's picture

3 Nov 2022 - 12:23 pm | सुजित जाधव

फारच किचकट आहे. याआधी मी फ्लिकर वरून फोटो चीटकायचो पण आता सेम प्रोसेस फॉलो करून पण फोटो अपलोड होत नाहीये..

चौथा कोनाडा's picture

3 Nov 2022 - 1:15 pm | चौथा कोनाडा

जमेल, जमेल .... जो पर्यंत जमत नाही तो पर्यंत चिकाटी सोडायची नाही !
.... शेवटी मिपाकर आहोत आपण ..

मिपाकर एकमेकांना नेहमीच मदत करतात !

कंजूस's picture

3 Nov 2022 - 2:38 pm | कंजूस

ही पद्धत घ्या-

>गूगल फोटो उघडा.
>>लॉगिन करा.
>एक फोटो अपलोड करा.
>>लगेच 1)add to album/ 2)shared album पर्याय दिसेल तेव्हा क्र.(२) निवडा.
>Album name/create new दिसेल.
>>create new निवडून तिथे नाव टाका - उदाहरणार्थ ((Mipa _Himachal_2022_11_03))
>>>Anyone with the link can view this हे दिसेल.
आता या अल्बममध्ये टाकलेले सर्व फोटो पब्लिक शेअर्डच राहतात. आणि आपल्याला खात्री राहते की दुसरे कुठले यात नसलेले फोटो कुणाला दिसणार नाहीत.

Advanced high resolution photo sharing/ downlod हा पुढचा धडा आहे.

ही खटपट करून मिपावरील लेखातील फोटोंची साईज (KB,MB) वाढवता येईल. हे न केल्यास गूगल फोटो ऍप 100, 200 KB साईजचेच फोटो शेअर करतो.

सुजित जाधव's picture

3 Nov 2022 - 6:59 pm | सुजित जाधव

Hh