आयएएस आणि बिहारी गणित :)-
हेमंत वाघे
बिहार कसा आयएएस मध्ये पुढे आहे आणि मराठी तरुण त्यात नाही आहे यासाठी अतिरंजित आणि पूर्णतः: खोटे दावे करणारी एक पोस्ट गेली काही वर्षे येत आहे आणि आता परत आली
त्या पोस्ट नुसार
UPSC चा आज आलेला रिझल्ट १७५७ पैकी एकट्या बिहारने पुन्हा रचला इतिहास.. ११२३ बिहारी बनले IAS अधिकारी..
.
म्हणजे १७५७ पैकी इतर संपूर्ण देशाचे फक्त ६३४; आणि त्यात महाराष्ट्र जवळजवळ नाहीच..
.आता हा रिझल्ट कोणता कोणत्या वर्षीचा हे दिले नाही
आता गंमत बघा हा
( यात काही चूक असेल तर प्लिज सांगा )
UPSC अनेक परीक्षा घेते तर त्यातील राजा समजली जाते हि परीक्षा असते त्यातून IAS अधिकारी निवडले जातात
आता हि परीक्षा होते त्यातून खालील अधिकारी निवडले जातात
प्रशासकीय सेवा (आयएएस), विदेश सेवा (आयएफएस), पोलीस सेवा (आयपीएस), गट अ आणि गट ब ( IAS/ IFS / IPS / Central Services Group ‘A’/ Group ‘B’ Services)
तर २०२० साली झालेल्या परीक्षेच्या मुलाखती अजून व्हायच्या आहेत
मला तरी शेवटचे २०१९ चे रिझल्ट मिळाले
ते रिझल्ट असे ( बायजु वरून )https://byjus.com/free-ias-prep/last-india-rank-for-ias-ips-ifs/
IAS - 180
IFS - 24
IPS - 150
Central Services Group ‘A’ - 438
Group ‘B’ Services - 135
Total - 927
Total IAS/IFS/IPS - 354
लोकसत्ता मध्ये पण याची बातमी होतो **
https://www.loksatta.com/maharashtra-news/upsc-result-2019-five-candidat...
लोकसत्ता मध्ये गट बी चे आकडे कमी होते
अजून एक नेट वरील आकडेवारी सांगत आहे कि गेली काही वर्षे फक्त १८० IAS निवडले जात आहेत .
https://www.ksgindia.com/blog/ias-preparation/23552-how-many-ias-officer...
पण सांगायचं मुद्दा हा
मी महाराष्ट्रात जिकडे गणित शिकलो तिकडे ११२३ हा आकडा १८० पेक्षा फार मोठा आहे किंवा ३५४ वा ९२७ पेक्षा
जास्तीत जास्त ९२७ मुले जर यूपीएससी फायनल मधून निघत असतील ( त्यात १८० IAS ) तर त्यात ११२३ बिहारी कसे ?
हे बिहारी गणित मला समजावून द्याल का ?
आणि लोकसत्ता सांगते कि - महाराष्ट्रातील ८५ ते ९० मुलांची निवड झाली -
यात ७० तरी मराठी मुले असतील ना ?
आता हि ७० - ८५ - ९० हि सर्व निकालात असतील
आणि त्यात IAS कमी असतील
आणि त्यावर पण बिहार / उत्तर प्रदेश मधली असणार
पण महाराष्ट्रातील पण ७-८ टक्के मराठी मुले असतील
आणि हा आकडा वाढत आहे
बाकी इतके हजारो IAS ( असल्या आकडेवारी नुसार ) देऊन त्यांचा बिहार / उत्तर प्रदेश च्या प्रगतीला हातभार काय ?ते भाग मागासलेले का ?
तिकडे सर्वसाधारणपणे स्त्रियांचे स्थान काय ?सुरक्षितता किती आहे ?
असले प्रश्न विचारायचे नाही ना ?
- हेमंत वाघे
प्रतिक्रिया
22 Jun 2021 - 5:25 pm | कंजूस
पण "बिहारी युवक जमकर पढता है।" हे खरं.
११२३ हे ११.२३% ?
22 Jun 2021 - 7:19 pm | गॉडजिला
☺️☺️☺️
22 Jun 2021 - 8:56 pm | Rajesh188
WhatsApp वापरणारे ते ऍप वापरण्यासाठी लायक नाहीत .
भारतात तर बिलकुल लोक WhatsApp किंवा कोणतेच समाज माध्यम वापरण्यासाठी सक्षम नाहीत.
काहीच,कसलाच विचार न करता चुकीचे,खोटे msg फॉरवर्ड केले जातात.
22 Jun 2021 - 9:35 pm | Rajesh188
भारतात प्रशासकीय अधिकारी निवडण्याची जी पद्धत आहे ती निर्दोष आहे का?
ज्या पद्धती नी प्रशासकीय अधिकारी निवडले जातात त्या मधून उत्तम दर्जा चे प्रशासकीय अधिकारी भारताला मिळतात का?
भारताची अवस्था बघितली तर उत्तम दर्जा चे प्रशासन भारतात नाही.हे कोणी ही कबूल करेल.
बाकी जगात प्रशासकीय अधिकारी कसे निवडले जातात ह्याची माहिती कोणी दिले तर बरं होईल.
यूपीएससी परीक्षा ज्या भाषेत घेतली जाते ते आक्षेप घेण्यास पात्र आहे
यूपीएससी परीक्षा ही एक तर फक्त इंग्लिश मध्येच घेतली जावी किंवा ते शक्य नसेल तर देशातील सर्व भाषेत ती परीक्षा झाली पाहिजे.
हिंदी ही काही राज्यांची भाषा आहे ह्याचा फायदा हिंदी भाषिक राज्यांना होत आहे.आणि निखळ स्पर्था त्या मुळे होत नाही.
22 Jun 2021 - 10:14 pm | हेमंत सुरेश वाघे
देशातील सर्व भाषेत UPSC परीक्षा होते
interview पण देता येतो
मला वाटते २०११ पासून
https://timesofindia.indiatimes.com/home/education/news/UPSC-aspirants-c...
हा नियम बदलला का ?
22 Jun 2021 - 10:54 pm | Rajesh188
एक हिंदी भाषेचा पेपर असतो असे ऐकले होते आणि त्याचे मार्क पकडले जातात.
कन्फर्म माहीत नाही.
मोदी सरकार नी ही हिंदी भाषेचा नियम बदलला होता आल्या बरोबर.
तेव्हा उत्तर भारतात आंदोलन झाली होती हे स्पष्ट आठवत आहे.
22 Jun 2021 - 11:23 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"बाकी इतके हजारो IAS ( असल्या आकडेवारी नुसार ) देऊन त्यांचा बिहार / उत्तर प्रदेश च्या प्रगतीला हातभार काय ?ते भाग मागासलेले का ?
तिकडे सर्वसाधारणपणे स्त्रियांचे स्थान काय ?सुरक्षितता किती आहे ?
असले प्रश्न विचारायचे नाही ना ?"
हजारो नसावेत पण गेल्या २५ वर्षात प्राबल्य आहे बिहार-उ.प्र मधील तरूणांचे. त्यात काही गैर आहे असे नाही. ६०-ते ८०च्या दशकापर्यंत तामिळनाडू/केरळ/आंध्रमधील लोकांचे वर्चस्व असायचे. व्यक्तिगत प्रगतीचा व सामाजिक सुधारणांचा संबंध असतोच असे नाही. आय ए एस/आय एफ एस चे कौतुक आपण करतो पण तेवढ्याच गुणवत्तेचे लोक पाकिस्तान/ईराणच्या प्रशासकीय सेवेतही असतात.
22 Jun 2021 - 11:29 pm | Rajesh188
चे आयएएस ऑफिसर बिहार यूपी मध्ये नोकरी करण्यात बिलकुल इंटरेस्ट नसतात.
नोकरी करण्यासाठी त्यांना देशातील प्रगत राज्य च पाहिजे.
यूपी बिहार जर प्रशासकीय सेवेत असतील हिंदी cha वापर करून तर ते objectionable आहेच.
बाकी राज्यांनी त्यांना का स्वतःच्या राज्यात पोस्टिंग द्यावे जे राज्याच्या विकास करण्यासाठी काहीच कामाचे नाहीत.
23 Jun 2021 - 10:24 am | माईसाहेब कुरसूंदीकर
ह्याच तालावर
महाराष्ट्रात जे काही मोठे उद्योगधंदे उभे राहिले ते अमराठी लोकांमुळे. मराठी लेकाचे फक्त ९ ते ६ ह्या वेळेत पाट्या टाकण्यासाठी. ह्यांना आपापल्या गावात पाठवायला पाहिजे पण ह्या मराठीना नोकरी करण्यासाठी मुंबई-पुणेच पाहिजे.
राज्यातल्या ईतर जिल्ह्यानी ह्या लोकांना बोलावुन नोकर्या द्याव्यात.
29 Jun 2021 - 4:42 pm | चिगो
हे असले व्हॉट्सॅप मेसेज वाचू नका. लोकसेवा परीक्षांबद्दल लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर सगळी माहिती मिळेल. ते हिंदी भाषा प्राबल्य, फक्त हिंदी/इंग्रजी मधेच मुलाखत देता येते, युपी/बिहारवाले त्यांच्या राज्यात काम करायला तयार नसतात वगैरे फालतू ग्यान वर मांडलेलं आहे, त्यालाही फाट्यावर मारा..
ह्या असल्या पोस्ट्स 'मराठी टक्का वाढावा' ह्यासाठी प्रेरणेची दुकाने मांडून फायदा कमावण्यासाठी देखील मुद्दाम पाठवल्या जात असतील, अशी शंका आहे.
29 Jun 2021 - 4:55 pm | गॉडजिला
शब्दा शब्दाशी सहमत आहे. :)
29 Jun 2021 - 6:24 pm | Ujjwal
नमस्कार साहेब. आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून मेघालयातील घडामोडी, सामाजिक आणि आर्थिक जीवनावर धागे काढा की. ईशान्य भाग तसा बराच दुर्लक्षित राहिल्यामुळे मेनस्ट्रीम मीडिया मध्येही जास्त काही पाहायला मिळत नाही. तुमचे फर्स्ट हॅन्ड अनुभव वाचायला आवडतील.
30 Jun 2021 - 9:55 am | जेम्स वांड
चिगोंचे जुने लेखन काढून वाचले, इथं निवृत्त नौदल अधिकारी ते आयएएस सगळे आहेत राव !
चिगोंचे लेखन वाचता ते "कॉलिंग स्पेड अ स्पेड" लिहितात असे वाटते, इतकं वास्तववादी लेखन सगळ्यांना पचेल असेही नाही.