विमान उपलाब्ध नव्हते म्हणुन कमांडोंना यायला उशीर झाला ?

अप्पासाहेब's picture
अप्पासाहेब in काथ्याकूट
1 Dec 2008 - 10:20 am
गाभा: 

दिल्लीच्या विमानतळावर कोणत्याही क्षणी पाहीले तर किमान पाच तरी विमाने उड्डाणाच्या तयारीत दिसतील, त्याही वेळी असतील, त्यातलेच एक ताब्यात घेता आले नसते का? देशाच्या सुरक्षे पुढे काही प्रवाश्यांची गैरसोय किरकोळ आहे, इंडियन, जेट, किंगफिशर सर्व विमान कंपन्यांनी हे सह्कार्य नक्की दिले असते. दिल्लीतील एकालाही हे सुचु नये याचे आश्चर्य वाटते.

मुंबई, बेंगलुरु, चेन्नई, कोलकाता, हैद्राबाद, अहमदाबाद सारख्या मह्त्वाच्या शहरांत सुसज्ज कमांडो पथके नसावीत ह्या पेक्षा मोठी बौध्दिक दिवाळखोरी कोणती?