गाभा:
६२०० कोटींचे शेअर्स विकून होणार कर्ज वसूली; बँकांना गंडवणाऱ्या विजय माल्याला दणका....
https://www.loksatta.com/arthasatta-news/sbi-led-banks-to-sell-vijay-mal...
--------
वसुली योग्य मार्गानेच जात आहे, असे वाटते ...
६२०० कोटींचे शेअर्स विकून होणार कर्ज वसूली; बँकांना गंडवणाऱ्या विजय माल्याला दणका....
https://www.loksatta.com/arthasatta-news/sbi-led-banks-to-sell-vijay-mal...
--------
वसुली योग्य मार्गानेच जात आहे, असे वाटते ...
प्रतिक्रिया
20 Jun 2021 - 5:22 pm | आनन्दा
खरेदी कोण करणार, आणि ती स्वतःच्या खिशातून होणार की परत बँकेचे कर्ज काढून होणार?
23 Jun 2021 - 6:05 pm | गॉडजिला
बाकीचे बघुच इकडे आणता आलेच तर...
20 Jun 2021 - 6:47 pm | कॉमी
कंपनी लिक्विडेट करण्याऐवजी शेअर विकण्याचा मार्ग पत्कारला आहे त्याचे कारण काय ? कर्मचाऱयांच्या नोकऱ्या टिकवणे हेच का ? का आणखी काही ?
20 Jun 2021 - 8:50 pm | नावातकायआहे
https://www.esakal.com/pune/uddhav-thackeray-considers-pratap-sarnaik-le...
20 Jun 2021 - 9:42 pm | श्रीगुरुजी
निर्लज्जपणा.
सेनेने इतक्या वेळा अर्वाच्य शिवीगाळ करूनही, इतक्या वेळा भाजपच्या सर्वोच्च नेत्यांची लाज काढूनही, भाजप नेत्यांवर वारंवार खोटे आरोप करूनही, भाजपला सातत्याने पेकाटात लाथा घालूनही, वारंवार भाजपचा विश्वासघात करूनही शेपूट हलवित कोणतीही नीतिमत्ता, धोरण, तत्वे नसलेल्या सेनेबरोबर जायची इच्छा वारंवार बोलून दाखविणे हा पराकोटीचा लोचटपणा आहे.
21 Jun 2021 - 5:13 pm | चौथा कोनाडा
तो सार्वजनिक राजकारणाचा भाग झाला !
पडद्यामागे तर सतत मांडवली चालू असते, पक्ष कोणता का असेना !
आपण आपले भाबडे सामान्य राजकारण्यांकडून फार अपेक्षा करतो.
पुढ्च्या निवडणुकीनंतर देफ मुख्यमंत्री, उठा उपमुख्यमंत्री (२.५+२.५ वर्षे आलटून पालटून) झाले तर आश्चर्य वाटायला नको !
20 Jun 2021 - 9:08 pm | मुक्त विहारि
गुजरात में 15 जून से लागू होगा लव जिहाद कानून, 10 साल की सजा का प्रावधान....
"गुजरात में 15 जून से लागू होगा लव जिहाद कानून, 10 साल की सजा का प्रावधान - Love jihad law will be implemented in Gujarat from June 15 read more - AajTak" https://www.aajtak.in/amp/india/gujarat/story/love-jihad-law-will-be-imp...
-------
20 Jun 2021 - 9:16 pm | मुक्त विहारि
गुजरात: मुस्लिम युवक ने पहचान छिपा लड़की से की शादी, लव जिहाद कानून के तहत पहली गिरफ्तारी....
https://www.google.com/amp/s/www.aajtak.in/amp/india/gujarat/story/gujar...
-------
20 Jun 2021 - 10:05 pm | गॉडजिला
.
20 Jun 2021 - 10:29 pm | कॉमी
https://www.misalpav.com/comment/1110420#comment-1110420
केरळ भाजपाप्रमुख के.सुरेंद्रन यांच्यावर दोन्ही लाच आरोपांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातल्या एका प्रकरणामध्ये पोलिसांनी केस नोंदवून घेतली नव्हती, त्यामुळे मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर समोर केस मांडली गेली. त्यांनी केस नोंदवण्याचा आदेश दिल्याने केस नोंदवली आहे. पुराव्यादाखल असलेल्या ऑडिओ टेप्स कोर्टाला दखल घेण्याजोग्या वाटल्या आहेत.
सुरेंद्रन यांच्या विरुद्ध उभा होणाऱ्या के.सुंदर यांनी केलेल्या आरोपाबाबत सुद्धा लाच देण्याची केस नोंदवली आहे.
हायवे रॉबरी मध्ये स्थानिक पोलिसांनी ते चोरले गेलेले पैसे भाजपाचेच होते असा अहवाल दिला आहे.
21 Jun 2021 - 3:45 pm | मराठी_माणूस
एक लेख
https://www.loksatta.com/anyatha-news/corona-virus-third-wave-zoom-whose...
त्यावर आलेले एक उल्लेखनिय पत्र
https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letters-loksatta... (शिर्षकः 'कायद्याचे राज्य’ विरत जाण्याने मध्यमवर्गाचे खच्चीकरण)
21 Jun 2021 - 4:13 pm | मुक्त विहारि
उत्तर प्रदेशात हजारो मुलं-महिलांचं धर्मांतर! ATS ने केला रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक.....
https://www.loksatta.com/desh-videsh-news/uttar-pradesh-police-anti-terr...
----------
21 Jun 2021 - 4:28 pm | गॉडजिला
हे करणे अत्यन्त चूक आहे
22 Jun 2021 - 8:09 am | कॉमी
काल एका दिवसात ८० लाख लसी दिल्या गेल्या. वेग चांगला पकडला आहे ! तिसरी लाट येणार आहे हे एव्हाना स्पष्ट झाले आहे, त्यामुळे असा वेग जोपासणे गरजेचे आहे.
22 Jun 2021 - 8:59 am | आनन्दा
फक्त 20 दिवसापूर्वी आम्ही लस घेतली..
तेव्हा अक्षरशः मारामारी करायला लागत होती लशीसाठी..
आता रजिस्ट्रेशन केलेले कोणीही शिल्लक नाही असे म्हणतात. लवकरच लसबंदी करायची वेळ येणार असे वाटतेय :P
22 Jun 2021 - 9:00 am | आनन्दा
किंवा दुसरा डोस कदाचित माझा जिओ चा recharge संपायच्या आधीच मिळेल
22 Jun 2021 - 11:58 am | मराठी_माणूस
ह्याला काय आधार ?
22 Jun 2021 - 12:10 pm | कॉमी
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/covid-third...
22 Jun 2021 - 12:21 pm | स्वप्निल रेडकर
हे ८० लाख शहरी भागातला आकडा दर्शवतात का ?सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यामध्ये तालुका लेवल च्या केंद्रामध्ये गेल्या आठवड्यापासून कोवीन एप वर नो सेन्टर अवैलेबल दाखवतेय. मी स्वतः सकाळी इथल्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन आलो तिथे कर्मच्रायांनी सांगितलं कि अजून १८+ साठी डोसेस नाही आलेत.
22 Jun 2021 - 2:03 pm | कॉमी
८० (८५, प्रिसैजली.) लाख पूर्ण भारतातला आकडा आहे, शहर आणि ग्रामीण दोन्ही.
भारतात साधारण ३४ कोटी ४५+ व्यक्ती आहेत. एकूण लसीकरण (पहिला+दुसरा डोस) २९ कोटी आहे. त्यापैकी ७.३ कोटी लसी १८-४४ गटाला दिल्या गेल्या आहेत. म्हणजे २१ कोटी लसी (फर्स्ट+सेकंड डोस) म्हणून ४५+ गटाला गेल्या आहेत.
त्यामुळे , दोन्ही डोस मिळून ४५+ गटाला (३४*२=६८) कोटी लसी द्यायच्या आहेत. दिल्या आहेत- २१ कोटी. अजून द्यायच्या आहेत- ४७ कोटी. त्यामुळे अजून फोकस ४५+ असेल.
एक शंका- वेगवेगळ्या वयोगटांना मिळणाऱ्या लसीत फरक आहेत का ? का त्या इंटरचेंजेबल आहेत ? वरील प्रतिसाद तसेच इतर काहींच्या बोलण्यावरून इंटरचेंजेबल नाहीत असे दिसते, हे बरोबर आहे का ?
22 Jun 2021 - 10:58 pm | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/pune-news/avinash-bhosale-property-worth-rs-40-...
-------
23 Jun 2021 - 8:52 am | मुक्त विहारि
उद्धव ठाकरेंचा परदेशात काळा पैसा, ईडीला पुरावे देणार, आमदार रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप ....
"उद्धव ठाकरेंचा परदेशात काळा पैसा, ईडीला पुरावे देणार, आमदार रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप | Badnera MLA Ravi Rana said CM Uddhav Thackray black money proofs will gave to ED in future | TV9 Marathi" https://www-tv9marathi-com.cdn.ampproject.org/v/s/www.tv9marathi.com/pol...
23 Jun 2021 - 9:38 am | मुक्त विहारि
कर्करुग्णांच्या नातेवाईकांसाठी घरे देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती.....
https://www.loksatta.com/mumbai-news/cm-uddhav-thackeray-stay-decision-t...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सदनिका हस्तांतरणाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यानी स्थगिती दिली.....
23 Jun 2021 - 9:49 am | श्रीगुरुजी
केंद्र सरकार आता दिशाहीन अवस्थेत भरकटणार नाही.
https://www.lokmat.com/national/rashtramanch-will-work-give-direction-ce...
23 Jun 2021 - 10:28 am | मुक्त विहारि
इतपत जरी सर्वसामान्य जनतेला सांगीतले तरी खूप ...
काही जणं तरी एक एकरात, कोटी रुपयांची वांगी काढतीलच, असा अंदाज आहे ...
23 Jun 2021 - 9:57 am | कॉमी
न्यूजलॉन्ड्री ने राम मंदिर संबंधित दुसऱ्या एका व्यवहाराबद्दल रिपोर्ट केले आहे.
आयोध्याचे महापौर, ऋषिकेश उपाध्याय यांचा भाचा दीप नारायण याने २० फेब्रुवारी २०२१ ला एक महंत देवेंद्र प्रसादाचार्य यांच्याकडून खरेदी केली. आणि ही जमीन नझुल ची म्हणजे, सरकारी मालकीची पण लीज वर दिलेली होती, म्हणून महंतांनी ती तीस लाखाला (सर्कल रेटला) विकली. महंत म्हणाले की ही जमीन ट्रस्टला मिळावी म्हणूनच विकली होती. आणि ते असेही म्हणाले की "जर २.५ करोड किंमत होती तर तितकी आम्हाला मिळायला हवी होती." ट्रस्ट ला थेट का नाही विकली ? यावर म्हणतात- ट्रस्ट के लोग तो हम से मिले नही, हमको मेयर साब मिले, उन्होने कहा जरुरत हैं।
त्यानंतर मे मध्ये दीप नारायण यांनी ही जमीन ट्रस्टला २.५ करोड रुपयांना विकली.
आत्तापर्यंत वाचले आहे त्यावरून दिसते की व्यवहार सुरु झाला तो फेब्रुवारी मध्येच, त्यामुळे दुसऱ्या वादाप्रमाणे इथे सेल अग्रीमेन्ट पूर्वी केले नव्हते असेच आत्तातरी दिसते, किमान तसे क्लॅरिफिकेशन अजून आले नाही. आणि, तेव्हा राम जन्म भूमी निकाल सुद्धा आला होता. मग महंतांकडून ३० लाखात घेतलेली जमीन २.५ करोड रुपयांना विकण्याला काय म्हणायचे बरे ?
https://www.newslaundry.com/2021/06/19/exclusive-bjp-mayors-nephew-bough...
23 Jun 2021 - 10:02 am | कॉमी
मुळात ही जमीन विकण्याचा हक्क दीप नारायण यांना आहे का याबद्दल सुद्धा विवाद आहे, कारण जमीन सरकारी मालकीची लीजवर दिलेली आहे. महंत सुद्धा तेच म्हणत होते, नझुल जमीन असल्याने काही पैसे मिळण्याची अपेक्षा नव्हती, पण तीस लाख मिळाले.
https://www.newslaundry.com/2021/06/22/exclusive-land-sold-to-ram-temple...
23 Jun 2021 - 7:57 pm | श्रीगुरुजी
वरील बातमीत so-called Ram Janmabhoomi असा उल्लेख आहे.
23 Jun 2021 - 8:04 pm | कॉमी
आहे खरा. पण त्याने बातमीच्या सत्यासत्यतेवर फरक पडू नये.
23 Jun 2021 - 9:12 pm | श्रीगुरुजी
फरक पडतो. यातून बातमीदाराची मानसिकता विचारसरणी दिसते. या उल्लेखावरून ही बातमी फेक असावी याची खात्री झालीये.
23 Jun 2021 - 9:16 pm | कॉमी
लॉल
23 Jun 2021 - 9:17 pm | कॉमी
बरं न्यूजलाउंड्री राहूदे. आजतक चा व्हिडीओ बघा कि. सर्च केलं तर दुसऱ्या बातमीदारांकडून पण बातमी सापडेल, न्यूजलोन्ड्री नंतर बऱ्याच जणांनी स्टोरी ढापली आहे क्रेडिट न देता.
23 Jun 2021 - 10:05 pm | श्रीगुरुजी
एखादी बातमी बऱ्याच जणांनी प्रसिद्ध केली म्हणजे ती खरीच असते का?
23 Jun 2021 - 10:29 pm | कॉमी
तसं काही नाही. फक्त एक दोन शब्दांमुळे फेक न्यूज वाटत असेल तर ते शब्द न नसलेली पण बातमी शोधली तर सापडू शकते. इतकेच.
मुळात फक्त ‛सो-कॉल्ड' वरून त्यातले सगळे तपशील बाजूला सारणे १००% अतार्किक आहे. जमिनीच्या व्यवहाराचे सरकारी साईट वरून फोटो सुद्धा दिलेत, जमीन विकणारे व्यक्ती म्हणतायत पण कि ट्रस्ट साठी ही जमीन ३० लाख ला विकली, ती नंतर २.५ करोड ला विकली हे साईट मधल्या फोटोत दिसतंय ह्यात शंका कशी घेणार ? फोटो सुद्धा फोटोशॉप केलेत असे तुमचे म्हणणे असेल तर बाब निराळी. पण तसं असतं तर आत्तापर्यंत बोंबाबोंब झाली असती.
बातमी खोटी/चुकीची/अर्धवट असू शकते पण आत्ता तरी तसं म्हणायचं काही कारण दिसत नाही.
23 Jun 2021 - 10:47 pm | श्रीगुरुजी
सविस्तर बातमी आल्यानंतर खरी की खोटी ते ठरेल. आता घाई करण्यात अर्थ नाही. राफेल, लोया, मोदींची २०१४ मधील मुलाखत, १५ लाखांचे आश्वासन अशा बहुचर्चित बातम्या सुद्धा खोट्या सिद्ध झाल्यात. इथे तर २.५ कोटी इतकी किरकोळ रक्कम. सरकारी रेडी रेकनर मध्ये जी किंमत दिलेली असते त्यापेक्षा प्रत्यक्ष व्यवहारातील किंमत किमान ५-६ पटीने जास्त असते याचे भान ठेवणे आवश्यक आहे.
यात काही सत्यांश असता तर एव्हाना बऱ्याच वाहिन्यांनी दळण दळायला सुरूवात केली असती. ३० लाख, २.५ कोटी अशा किरकोळ रकमा पुसटसा संशय घेण्यास सुद्धा पुरेश्या नाहीत.
23 Jun 2021 - 10:51 pm | Rajesh188
त्यांना चॅनेल बंद करायचे आहे का ?
23 Jun 2021 - 10:51 pm | Rajesh188
त्यांना चॅनेल बंद करायचे आहे का ?
23 Jun 2021 - 10:53 pm | श्रीगुरुजी
कोणती चॅनेल्स बंद झाली याची यादी असेल ना.
24 Jun 2021 - 8:32 am | प्रदीप
१८८ पळून जाणार, उत्तर येणार नाही.
कॉमी, मी हीच बातमी अन्यत्र शोधण्याचा प्रयत्न केला. कुठेच मिळू शकलेली नाही. एकादा दुसरा प्रमुख मीडिया हाउसेसचा दुवा असल्यास द्यावा.
24 Jun 2021 - 9:21 am | कॉमी
इंडिया टुडे.
आज तक
आजतक चा विक्री करणाऱयांचा व्हिडीओ आधीच वर दिला आहे, पाहू शकता.
नवभारत टाइम्स
हे झी न्यूज मध्ये आलेले दीप नारायण यांचे उत्तर (ज्यातून काही स्पष्ट झाले नाही. त्यात १ करोड ला विकलेल्या वडिलोपार्जित जमिनीबद्दलच स्पष्टीकरण आहे, ट्रस्ट ला देण्यासाठी २० लाख मध्ये घेतलेली जमीन २.५ करोडला कशी विकली काही स्पष्टीकरण नाही.)
23 Jun 2021 - 10:54 pm | कॉमी
रेडी रेकनर (सर्कल रेट)चा इथे काही संबंध आला नाही. ट्रस्टला देतो म्हणून एकाकडून २० लाखाला घेतली आणि ट्रस्टला २.५ करोडला विकली. एका प्रकारे फसवणूक आणि अनैतिक आणि ट्रस्टचे पैसे लाटण्याचा प्रकार असला (खरे असेल तर.) तरी बहुतेक बेकायदेशीर नाही त्यामुळे यापुढे काही सविस्तर येईल की नाही माहिती नाही.
टीव्ही पाहत नसल्याने दळण दळले कि नाही माहिती नाही. पण आजतकने प्रकरण कव्हर केले आहे. तसे आणि ते प्रो भाजपा आहेत.
23 Jun 2021 - 11:09 pm | श्रीगुरुजी
All this while, the property’s circle rate – the minimum amount of sale decided by local authorities – remained Rs 35.6 lakh.
हे वाचलं का? म्हणजे या जमिनीची व्यवहारातील किंमत किमान दीडपावणेदोन कोटी असावी.
बादवे, आजतक हे भाजप समर्थक आहे असे म्हणता येत नाही. शेतकरी आंदोलनात पोलिस गोळीबारात शेतकरी ठार झाला ही खोटी बातमी आजतक वरच कट्टर भाजपद्वेष्टा राजदीप सरदेसाईने दिली होती.
23 Jun 2021 - 11:23 pm | कॉमी
वाचलंय, पण त्याने मूळ आरोपात काय फरक पडतो ? ज्यांनी विकलं त्यांनी सर्कल रेटला/का त्याच्या खाली विकलं या विश्वासावर कि जमीन ट्रस्ट कडे चाललीये. तीच स्वस्तात घेतलेली जमीन ट्रस्टला २.५ करोडला विकली. जर जमीन विकत घेताना ट्रस्टला देऊ असे म्हणून स्वस्तात घेतली नसती तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. ते महंत म्हणतायत कि मेयरनी ट्रस्टची गरज म्हणून त्यांच्याकडून जमीन घेतली. आरोप सर्कल रेटच्या वरका विकलं हा नाहीये. तर ट्रस्टला देण्यासाठी स्वस्तात घेतलेली जमीन महागात विकली हा आहे.
आणि दिडपावणेदोन कोटी- हि कुठली व्यवहारातील किंमत म्हणताय समजले नाही. मार्केट किंमत म्हणत असाल तर असू शकते, इतकेच काय, ट्रस्टला विकताना मार्केट भावापेक्षा कमीने सुद्धा विकले असेल.पण देणार्याने जमीन सरकारचीच आहे आणि ट्रस्ट साठी म्हणून २० लाखात विकली असेल तर ट्रस्टला २.५ कोटीला विकणे चूक आहे की नाही ? त्यात आणि विकणारे म्हणतात मेयरनी सांगितलं होतं ट्रस्ट साठी पाहिजे जमीन असं.
आजतक प्रो भाजप नसेल पण, अनुभव नाही. जनरल इम्प्रेशन होते, फार माहित नाही.
24 Jun 2021 - 12:02 am | श्रीगुरुजी
मूळ आरोप काय? तर स्वस्तात घेतलेली जमीन खूप जास्त किंंमतीला विखली किंवा स्वस्तात असलेली जमीन खूप जास्त किंमत देऊन विकत घेतली हा मूळ आरोप.
आता ज्या जमिनीची सरकारी किंमत किमान ३५+ लाख आहे, त्या जमिनीचा प्रत्यक्ष बाजारभाव किमान दीडपावणेदोन कोटी असणार. म्हणजे बाजारभावापेक्षा खूप जास्त किंमत दिलेली दिसत नाही. म्हणजे भाविकांनी दिलेल्या देणग्या उधळल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही.
म्हणजे प्रश्न हा आहे की ३५+ लाख ही किमान किंमत असतानाही मूळ मालकाने दुसऱ्या मालकाला ही जमीन २० लाखाला कशी विकली? या व्यवहाराची सविस्तर माहिती मिळाल्यानंतरच यावर बोलता येईल. तोपर्यंत तरी या व्यवहारात काळेबेरे दिसत नाही.
तसेच या व्यवहारात अजूनपर्यंत काही नियमबाह्य, बेकायदेशीर वगैरे दिसत नाही.
त्यामुळे हा काहीतरी घोटाळा आहे असा निष्कर्ष काढण्याची घाई नको. अजून काही दिवसात पुरेशी माहिती आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
24 Jun 2021 - 10:39 am | आनन्दा
कॉमी,
असे व्यवहार भारतात तरी बरेच होत असतात. आणि तसे व्यवहार करण्याची क्षमता ही राजकारणी होण्याची पहिली पायरी असते. अपवाद वगळता.
पुण्यातले बहुतेक नगरसेवक, गुंठामंत्री या बाबतीत PHD होल्डर आहेत. त्यामुळे अश्या व्यवहारात अनैतिक वाटले तरी अनपेक्षित काहीच वाटले नाही.
जैतापूर आणि नाणार च्या वेळेस असे अनेक व्यवहार पाहिले आहेत, आणि त्यात सर्वपक्षीय लोक आघाडीवर आहेत. यामध्ये बहुतांश वेळा सरकारी किंवा इतर करदात्यांच्या पैसा लाटून तो नंतर निवडणूक फंड म्हणून वापरले जातात. सदर महंत आणि मेयर यांच्यात एखादी वेगळी डील देखील झालेली असेल, जी पाळली जात नाहीये म्हणून महंत इकडून नाक दाबत आहेत, असा देखील मला संशय आहे.
24 Jun 2021 - 9:19 pm | कॉमी
तुमचे म्हणणे खरे असू शकते कि असे जवळपास सर्व राजकारणी करतात. पण जर सदर घटना खरी असली तर आपण नॉर्मलाइझ करण्याचे सुद्धा काही कारण नाही, नाहीतर परिस्थिती कधीच बदलणार नाही.
महंत आणि मेयर डील असेल तर काय असेल ? मला लक्षात नाही आलं.
24 Jun 2021 - 9:57 pm | आनन्दा
म्हणजे संस्थांचा पैसे मेयर च्या मार्फत स्वतःच्या खिशात घालणे..
मठाला कमीत डील करायचे, आणि वरचा मलिदा अर्धा अर्धा घ्यायचा.(असे असेलच असे नाही. पण शक्यता नाकारता येत नाही)
नंतर मेयर उलटा फिरला असेल, मग आता काय करणार? मग बोंब मारा.
23 Jun 2021 - 10:35 am | मुक्त विहारि
"Shivsena Chief Minister Uddhav Thackeray Self esteem Telecommunication Marathi manus Justice of Maharashtra akp 94 | शिवसेना सत्तेसाठी लाचार होणार नाही! | Loksatta" https://www.loksatta.com/mumbai-news/shivsena-chief-minister-uddhav-thac...
-------
मानखुर्दच्या नव्या उड्डाणपुलाला ‘सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाब’ नाव द्या; शिवसेनेची मागणी....
"मानखुर्दच्या नव्या उड्डाणपुलाला ‘सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाब’ नाव द्या; शिवसेनेची मागणी, भाजपाचा विरोध - Marathi News | Name the new flyover at Mankhurd ‘Sultanul Khwaja Garib Nawab’; Shiv Sena demand, BJP oppose | Latest mumbai News at Lokmat.com" https://www.lokmat.com/mumbai/name-new-flyover-mankhurd-sultanul-khwaja-...
---------
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ....
23 Jun 2021 - 11:01 pm | Rajesh188
ते सुफी मुस्लिम संत आहेत आणि बोहरी मुस्लिम आणि सुफी मुस्लिम हे कायद्या नुसार च आपले जीवन जगतात.हिंदू न पेक्षा जास्त ते शिस्त पाळतात आणि देशाचे कायदे पण पाळतात.
24 Jun 2021 - 2:10 am | सुक्या
सगळ्या गाड्या "हिंदु" या स्टेशनावरुन न्यायचे तुमचे कसब वाखाणन्याजोगे आहे. चालु द्या.
25 Jun 2021 - 9:00 am | मुक्त विहारि
तुमच्या माहिती साठी काही लिंक देतो ....
https://youtu.be/RdeLfk1uglQ
https://youtu.be/j2_DVrDCniw
https://youtu.be/ZE36HEB339I
--------
शिवसेना हिंदू हितवादी आहे का? आता हीच शंका मनांत येते....
25 Jun 2021 - 9:59 am | श्रीगुरुजी
अजूनही मनात शंका आहे?
हा पक्ष स्थापनेपासून आजतागायत कधीही हिंदुत्ववादी नव्हता व नाही.
24 Jun 2021 - 7:38 pm | NiluMP
:-)
23 Jun 2021 - 6:02 pm | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/desh-videsh-news/uk-court-rejects-nirav-modis-p...
---------
ह्यासाठीच, भाजप सरकार हवे ...
23 Jun 2021 - 7:48 pm | श्रीगुरुजी
इतक्यात काही होणार नाही. अजून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी शिल्लक आहे. त्यानंतर इंग्लंडचा गृहमंत्री प्रत्यार्पणाच्या बाबतीत अंतिम निर्णय घेतो.
मल्याचे प्रकरण १ वर्षाहून अधिक काळ गृहमंत्र्याकडे प्रलंबित आहे. इंग्लंडचा खोडसाळ इतिहास पाहता गृहमंत्री त्याचे प्रत्यार्पण नाकारण्याची शक्यता अधिक आहे.
25 Jun 2021 - 9:01 am | मुक्त विहारि
अशा गोष्टी पटकन होत नाहीत ....
23 Jun 2021 - 8:26 pm | Rajesh188
https://www.sumanasa.com/go/WzPMV6.
हे असले प्रकार महाराष्ट्रात कधीच घडत नाही.
महाराष्ट्र चा नाद करायचा च नाही.
देशातील उत्तम प्रशासन असलेले राज्य .
25 Jun 2021 - 9:07 am | मुक्त विहारि
ते रामराव आदिक यांनी काय केले होते?
-------
देशातील उत्तम प्रशासन असलेले राज्य ....
हो का?
तांदूळ घोटाळा, खंडणी प्रकरण ह्याच राजवटीत झाले ....
25 Jun 2021 - 10:07 am | मुक्त विहारि
आणि कुठल्या राजवटीत?
आणि
एका सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली, ती कुठल्या राजवटीत?
24 Jun 2021 - 9:26 pm | नावातकायआहे
President of the Apni Party, Atlaf Bukhari, said the PM had condemned the statement - ‘you took Section 370 from us, we will take your daughters from you’ - made by certain leaders, at the meeting.
https://www.news18.com/news/india/centres-focus-on-jk-development-restor...
24 Jun 2021 - 11:20 pm | Rajesh188
देशातील कोणत्याच राज्यात केंद्राची लुडबुड नको.
प्रतेक राज्याला त्यांचे सर्व निर्णय घेण्याचं अधिकार असलाच पाहिजे.
अगदी कोणत्या राज्यातून ट्रेन राज्यात आलो पाहिजे कोणत्या राज्यातून नाही हे सुद्धा राज्यांनी च ठरवले पाहिजे.
३७० हे कलम काश्मीर ला परत लागू करणे .
हेच न्यायाचे आहे.
25 Jun 2021 - 12:00 am | Ujjwal
25 Jun 2021 - 7:42 am | प्रदीप
अजूनही आहे. त्यांत बदल केलेला आहे.
तरीही बदलाअगोदर त्यांत नक्की काय होते जे आता काढले गेलेले आहे. व त्यामुळे तेथील जनतेला व देशाला काय फायदा होता; आताच्या स्थितीत काय तोटे आहेत, ह्याविषयी तुम्ही इथे काही ठोस, माहितीपूर्ण व नीट संदर्भांसहीत लिहावे. तोंवर ही नुसतीच (तुमच्या नेहमीच्या संवयीप्रमाणे) तुमची उठवळ मते आहेत असे दिसेल.
25 Jun 2021 - 9:28 am | चंद्रसूर्यकुमार
दिल्लीत केजरीवाल सरकार २५ एप्रिल ते १० मे या काळात केंद्र सरकारकडे 'ऑक्सिजन द्या ऑक्सिजन द्या' असा घोषा लावत होते. पी.एम.केअर्समधून ऑक्सिजन प्लॅन्ट लावायला दिल्ली सरकारला पैसे दिले गेले होते त्याचा विनियोग त्यांनी केला नव्हता हे तर स्पष्ट झालेच आहे. आता आणखी एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे.
केजरीवाल सरकारने दिल्लीतील ऑक्सिजनची गरज आहे त्यापेक्षा चौपट जास्त सांगून जास्त ऑक्सिजन लाटायचा प्रयत्न केला. हे मी म्हणत नाहीये तर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली ऑक्सिजनच्या ऑडिटसाठीची समिती म्हणत आहे. https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/delhi-inflated-o2-need-by... . या प्रकरणी दिल्ली सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले होते आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जास्त ऑक्सिजन दिल्लीला पुरवावा लागला होता. तोच जास्तीचा ऑक्सिजन इतर राज्यांमध्ये पुरवून त्या राज्यांमधील रूग्णांचे प्राण वाचवता आले असते असेही या समितीने म्हटले आहे. असे काही होणार याचा अंदाज होताच. कारण आम्हाला ऑक्सिजन द्या म्हणून सतत भोकाड पसरणारे दिल्ली सरकार सर्वोच्च न्यायालयाने
ऑक्सिजनसाठीचे ऑडिट करायची समिती नेमायची घोषणा केल्यावर अचानक शांत झाले होते. त्याचीच खात्री या समितीने केली असे दिसते.
हा प्रकार खरोखरच धक्कादायक आहे. दादागिरी करून आपल्याला जास्त ऑक्सिजन घ्यायचा आणि त्यामुळे इतर राज्यांमध्ये ऑक्सिजन कमी पडून रूग्णांचा मृत्यू झाला तर मग मोदी सरकारविरोधात असंतोष वाढायला तेवढेच कारण मिळेल हा खरा डाव तर नव्हता? मोदी या एका नावाची इतका प्रचंड दुस्वास हे डाव्या एन.जी.ओंचे लोक करतात त्यावरून शक्यता पूर्ण नाकारता येणार नाही.
आता इतरांना 'मोदीभक्त' म्हणणारे केजरीवाल समर्थक या प्रकाराविषयी केजरीवालांना जबाबदार धरणार का हे बघायचे.
25 Jun 2021 - 9:46 am | कॉमी
चुकीचा दावा. असो.
कोणत्याही मेथड ने कॅल्क्युलेट केले तरी मागणी आणि वापर यांच्यातली तफावत कित्येक पट दिसते आहे, धक्कादायक आहे. नक्की दिल्ली सरकार जबाबदार आहे.
25 Jun 2021 - 9:52 am | कॉमी
25 Jun 2021 - 9:44 am | प्रदीप
कोव्हिडची दुसरी लाट, एप्रिल २५- मे १० ह्या दरम्यान शिखरावर असतांना, केजरीवालच्या दिल्ली सरकारने, त्यांच्या जरूरीपेक्षा चौपट ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी केली. ती पुरवल्यामुळे, इतर १२ कोव्हिड परिस्थिती गंभीर असलेल्या राज्यांना द्यावयाच्या ऑक्सिजन पुरवठ्यांत गंभीर कपात करावी लागली, असे निरीक्षण, सुप्रिम कोर्टाच्या "ऑक्सिजन ऑडिट टीम" ने नोंदवले आहे.
मला आठवते त्यानुसार, तेव्हा केंद्र व दिल्ली सरकार ह्यांच्यात, दिल्लीला नक्की किती ऑक्सिजन पुरवठा केला पाहिजे ह्यासंबंधात थोडा वाद झाला होता. पण मग, कोर्टाच्या (बहुधा दिल्ली हाय कोर्ट?) आदेशानुसार केंद्राला, दिल्ली सरकारच्या मागणीनुसार पुरवठा करणे भाग पडले होते.
25 Jun 2021 - 10:16 am | प्रदीप
मेच्या पहिल्या आठवड्यात, दिल्ली हायकोर्टाने केंद्राला, दिल्ली सरकारच्या मागणीनुसार दर दिवशी ७०० मेट्रिक टन इतका पुरवठा करावा, अन्यथा कोर्टाचा अवमान केल्याच्या आरोपास सामोरे जावे, असा निर्वाणीचा आदेश दिला होता.
25 Jun 2021 - 10:41 am | सुबोध खरे
याला JUDICIAL OVERREACH म्हणतात
25 Jun 2021 - 9:51 am | प्रदीप
३७० कलमाच्या दुरूस्तीनंतर काश्मीरमधील शेतकर्यांचे नुकसान झाले, असे त्या 'आंदोलनाचे' एक नेते राकेश टिकैत ह्यांनी म्हटले आहे.
येथील त्या 'आंदोलना'च्या पाठिराख्यांनी ह्यावर काही प्रकाश टाकावा.
25 Jun 2021 - 9:58 am | श्रीगुरुजी
अजून एक
https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/indapur-mp-udayan-raj...
25 Jun 2021 - 11:32 am | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/aurangabad-news/mim-to-contest-delhi-uttar-prad...
----------
हा अंदाज होताच .....
25 Jun 2021 - 3:31 pm | मुक्त विहारि
क्रूरपणाचा कळस! आधी फसवून लग्न, मग धर्मांतरासाठी बळजबरी आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार...
--------
https://www.loksatta.com/desh-videsh-news/up-man-marries-woman-after-fak...
---------
काय बोलावं ते सुचेना....
25 Jun 2021 - 3:39 pm | गॉडजिला
धर्म ही एक भौतीक अन राजकिय बाब आहे हे जितक्या लवकर लक्षात येइल उपाययोजना तितक्याच सोप्या होत जातील.
25 Jun 2021 - 3:41 pm | Rajesh188
योगी च्या राज्यात असे पण घडते ह्याचे आश्चर्य नाही वाटत.
भारत देशातील यूपी आणि बिहार ही राज्य अत्यंत मागास आहेत.ह्या राज्यात नेहमीच कायदा सू व्यवस्थेचा bandbaja वाजलेला असतो.
ह्या दोन्ही राज्य मुळे दिल्ली पण असुरक्षित होते.
दिल्ली च्या अनेक मुख्यमंत्र्यांनी तसे व्यक्त पण केले आहे.
शीला दीक्षित पण बोलक्या होत्या दिल्ली मध्ये गुन्हे घडण्यास बाजूची यूपी ,बिहार राज्य च जास्त जबाबदार आहेत.
25 Jun 2021 - 3:50 pm | मुक्त विहारि
आणि
करमुसे नामक सामान्य माणसाला मारहाण, कुठल्या राजवटीत झाली?
25 Jun 2021 - 3:41 pm | Rajesh188
योगी च्या राज्यात असे पण घडते ह्याचे आश्चर्य नाही वाटत.
भारत देशातील यूपी आणि बिहार ही राज्य अत्यंत मागास आहेत.ह्या राज्यात नेहमीच कायदा सू व्यवस्थेचा bandbaja वाजलेला असतो.
ह्या दोन्ही राज्य मुळे दिल्ली पण असुरक्षित होते.
दिल्ली च्या अनेक मुख्यमंत्र्यांनी तसे व्यक्त पण केले आहे.
शीला दीक्षित पण बोलक्या होत्या दिल्ली मध्ये गुन्हे घडण्यास बाजूची यूपी ,बिहार राज्य च जास्त जबाबदार आहेत.
25 Jun 2021 - 4:04 pm | गॉडजिला
किती तरी सर्वजनीक मुतार्यांमधे व्यवस्थीत पाणीच नसते.
25 Jun 2021 - 5:03 pm | Rajesh188
https://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-police-took-a-photo-with...
भारतीय पोलिस चा दर्जा खरोखर चिंताजनक आहे.पोलिस भरतीचे सर्व नियम बदलून सक्षम,शिक्षित, लोकच पोलिस मध्ये असले पाहिजेत.
गुन्हेगार बरोबर फोटो काढण्याची कोणती ही वृत्ती.
26 Jun 2021 - 10:51 pm | मदनबाण
आजची स्वाक्षरी :- Believer... :- Imagine Dragons
26 Jun 2021 - 11:01 pm | कॉमी
(मी व्हिडिओ पाहिला नाही)
पण, रवी शंकर यांनी उगाचच राईचा पर्वत केला आहे असे वाटते. त्यांनी कुठेतरी माँ तुझे सलाम चा ऑडिओ असणारे चलचित्र टाकले होते, त्याबद्दल सोनीने तक्रार केली होती, मग DMCA खाली ट्विटर ने तात्पुरते खाते लॉक केले. त्यात माजण्याचा काय प्रश्न समजत नाही ब्वा.
27 Jun 2021 - 12:02 am | मदनबाण
मग DMCA खाली ट्विटर ने तात्पुरते खाते लॉक केले.
अगदी बरोबर... त्यांनी ट्रम्प तात्यांचे अकाउंट देखील असेच बंद केले होते. जर अमेरिकन कायदे हिंदूस्थानी नागरिकांना लागु होत असतील तर हिंदूस्थानी कायदे देखील ट्विटरला लागु झाले पाहिजे. [ Do business in India by all means, but follow the laws: RS Prasad on social media rules | Exclusive ]
ज्या तत्परतेने त्यांनी अमेरिकन कायद्याचे पालन केले त्याच तप्तरतेने त्यांनी आपल्या कायद्याचे पालन केलेले मला तरी अजुन माझ्या वाचनात आलेली नाही.आता ट्विटर तसे करत नसेल तर त्याला माज म्हंटले तर त्यात काय गैर ?
असो... वरती दिलेल्या व्हिडियोत रवी शंकर प्रसाद यांच्यावर टिका करण्यात आलेली आहे, ती देखील आपल्याला कळावी म्हणुन तो व्हिडियो दिला आहे.
जाता जाता :-
In June 2021, Twitter lost its immunity as an "intermediary" under the Information Technology Act for its failure to appoint a local representative. It will be considered publisher of all materials posted on the platform.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Believer... :- Imagine Dragons
27 Jun 2021 - 12:30 am | Rajesh188
अमेरिकेच्या नादी लागण्याचे काही तोटे तर असणार च .स्वाभिमान नसलेला देश म्हणून च ते आपल्याला ओळखतात.
भारतीय कायदे नाही पाळले तरी चालते असे जगातील खूप देशांना वाटत.
मल्या ,मोदी ला कसे संरक्षण किरकोळ देश पण देत आहेत तेच माल्या ,मोदी अमेरिका,रशिया,चीन, ह्यांच गुन्हेगार असते तर कोणत्या ही देशाची हिम्मत झाली असती का संरक्षण देण्याची.
भारतीय लोकांना ना संस्कृती च अभिमान ,ना त्यांना भाषेचा अभिमान,ना त्यांना स्वतःच्याच कर्तृत्ववान लोकांचा अभिमान.ना देशाचा अभिमान.
कशाला आपल्या कायद्यांचा कोण आदर करेल.
27 Jun 2021 - 11:00 am | आनन्दा
तो स्नोडेन आणि असांजे कुठल्या देशात राहत होते म्हणे?
कुठेतरी परग्रहावर राहत असणार. अमेरिकेला डोळा वर करून दाखवायची कोणाची हिम्मत आहे म्हणा?
27 Jun 2021 - 7:58 pm | श्रीगुरुजी
https://m.timesofindia.com/india/terror-attack-at-iaf-station-in-jammu-w...
ड्रोन वापरून जम्मूतील विमानतळावर दोन स्फोट. हे काहीतरी नवीन भयंकर तंत्र दिसतंय.
27 Jun 2021 - 8:23 pm | गॉडजिला
यशस्वी वापर नव्याने झाला म्हणता येईल...
आता एक व्हावेच लागेल
28 Jun 2021 - 12:14 am | Rajesh188
Drone हल्ल्या बाबत काही माहिती दिली आहे का देशाला.
कसा झाला,कोणी केला,कोठून केला ह्या विषयी सरकार नी काही निवेदन केले आहे का?
फुटकळ नेत्यांनी आणि आणि मीडिया नी (ते पण भारतीय मीडियानं नी) ज्या कमेंट केल्या आहेत त्या सत्य च असतील ह्याची शक्यता कमी आहे..
आताच काही निष्कर्ष काढणे मूर्खपणाचे लक्षण आहे
28 Jun 2021 - 9:25 am | श्रीगुरुजी
लष्कराने व सरकारने या हल्ल्याची संपूर्ण माहिती मला दिली आहे.
28 Jun 2021 - 10:12 am | प्रदीप
फक्त आपापल्या जागेपुरते पहावे, उगाच राज्य, देश, जग ह्या सगळ्यांची उठाठेव कशाला. आणि चर्चा करून काय होतंय--- ही आपली मौलिक वक्तव्ये इथे येऊन १८.८ दिवसही झाले नसतील. तितक्यात तुम्ही स्वत:च अमेरिका, ड्रोन, काश्मिर, मोदी, आणिबाणी वगैरेंवर लिहीत सुटला आहात.
तेव्हा, स्वतःच्याच सांगण्याप्रमाणे आपल्या घरी बसून 'नाद करायचा नाही' चा खुळखुळा वाजवत बसा, कसे?
28 Jun 2021 - 3:20 pm | गॉडजिला
आता इथून पुढील काळ रोचक होणार... दहशतवाद्यांच्या समूळबिमोडाची ही सुरुवात आहे असे माझे तरी भाकीत आहे.
28 Jun 2021 - 1:04 pm | सॅगी
महाराष्ट्र हे खेदजनक राज्य, सुमित राघवन आता शरद पवारांच्या ताफ्यावर भडकला
आता यांना महाराष्ट्रद्रोही कधी ठरवले जाते ते पाहायचे...
.
आणि हो..
.
खरंच, नाद नाय करायचा महाराष्ट्राचा आणि त्याच्या नेत्यांचा...
28 Jun 2021 - 2:07 pm | कॉमी
सुमित राघवनची टीका योग्य आहे...
पण सॉरी स्टेट ऑफ अफेअर्स=खेदजनक राज्य वाचून करमणूक झाली.
28 Jun 2021 - 2:20 pm | सॅगी
मथळा/शीर्षक "खेदजनक प्रकार" किंवा काहीसे असले पाहीजे होते या मताशी सहमत..
28 Jun 2021 - 2:15 pm | श्रीगुरुजी
सुमित राघवनशी संपूर्ण सहमत!
28 Jun 2021 - 1:58 pm | Rajesh188
सुमित नी फक्त शरद पवार ह्यांच्या विषयी बोलले पाहिजे ते योग्य ठरले असते.
महाराष्ट्र राज्य विषयी बोलणे चुकीचं नाही का.
28 Jun 2021 - 2:18 pm | सॅगी
जे काही घडले आहे ते महाराष्ट्रातच घडले आहे ना? की उत्तर प्रदेश/बिहार मध्ये घडले आहे?
चुकीला चुकही म्हणायचे नाही का?
28 Jun 2021 - 2:40 pm | Rajesh188
शरद पवार साहेब म्हणजे म्हणजे महाराष्ट्र नाही.
महाराष्ट्र ल उच्च परंपरा आहेत.
सुमित राघवन सारखा अत्यंत लहान व्यक्ती महाराष्ट्र वर कमेंट करूच शकतं नाही...
मी काही ही चुकीचं सुमित विरूद्ध लिहलेले नाही . .
पवार साहेब चुकीचं असतील तर त्यांच्या वर टीका करा .
महाराष्ट्र वर टीका करण्याचा नक्कीच त्यांना हक्क नाही
28 Jun 2021 - 2:54 pm | सॅगी
बातमी १.८८ सेकंदात वाचली की असे होते...
हा कार्यक्रम शासकीय होता. आणि हा जो काही पराक्रम केलाय तो "महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा विभागाच्या शासकीय अधिकार्यां"नी केला आहे.
तेव्हा राज्यावर होणारी टिका स्वाभाविक आहे.
28 Jun 2021 - 3:01 pm | नावातकायआहे
सॅगी सर. ते फक्त "किवर्ड" बघतात. :-)
बातमी हि सर्व सामान्यांसाठी असते.
28 Jun 2021 - 3:02 pm | Rajesh188
जो प्रसंग सुमित शी संबंधित होता .फक्त त्याच्या पुरताच.
त्या वरून उच्च मानवीय मूल्य,उच्च परंपरा असणाऱ्या महाराष्ट्र वर तो टीका करू शकत नाही..
राज्य सरकार किंवा संबधित स्थानिक प्रशासन ह्या वर टीका करू शकतो
28 Jun 2021 - 3:09 pm | सॅगी
५ कोटींच्या सिंधेटिक ट्रॅक वर, खेळाडूंना पायी चालायचीही परवानगी नसताना, मंत्र्या-संत्र्यांच्या गाड्या यायला परवानगी दिली जाते, जय हो....
काय ती उच्च परंपरा, आणि काय ते कौतुक..
28 Jun 2021 - 3:11 pm | सॅगी
आपल्याच देशातील इतर राज्यांना खुजे दाखवणे हे आपल्या राज्याच्या "उच्च परंपरे"त बसते का हो?
28 Jun 2021 - 3:13 pm | आनन्दा
मग UP बिहार मधल्या एखाद्या घटनेचे शेपूट धरून तुम्ही जेव्हा सगळ्या राज्याला शिव्या घालता तेव्हा हा *धर्म* कुठे जातो?
28 Jun 2021 - 5:50 pm | सुक्या
कुणाकडुन *धर्मा* ची अपेक्षा करता . .
त्यांच्यासाठी काहीतरी खोडसाळ पणा करणे हाच एक धर्म आहे. बाकी दगडावर डोके आपटु नका ... त्रास तुम्हालाच होइल . .
त्यांच्यासाठी "कंगनाचा हिमाचल" / "योगींचा उत्तर प्रदेश" असतो ... बाकी महाराष्ट्र कुणाचाच नसतो ..
हा आइडी मुद्दाम खोडसाळ/ बाष्कळ प्रतीसाद देतो हे माहीत असुनही सगळे त्याला का एंटरटेन करता हेही एक कोडेच म्हणा ..
28 Jun 2021 - 6:50 pm | सॅगी
बाकी तुमच्याशी सहमत आहेच...पण त्या बाष्कळपणाचा/खोडसाळपणाचा नाच किती सहन करायचा हा ही एक प्रश्न उरतोच ना?
29 Jun 2021 - 11:56 am | मुक्त विहारि
उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतराचं बीड कनेक्शन आलं समोर; एकाला अटक....
https://www.loksatta.com/maharashtra-news/up-forced-conversion-case-irfa...
---------
?
29 Jun 2021 - 8:47 pm | मुक्त विहारि
यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; मूर्तीच्या उंचीपासून अनेक निर्बंध....
"Ganesh Utsav 2021 Maharashtra Government Issued Guidelines Corona Height Ganesh Idol 4 Feet Public Ganesh Mandals | Maharashtra, Ganesh Utsav Guidelines: यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; मूर्तीच्या उंचीपासून अनेक निर्बंध" https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/n...
-------------
ज्या मुर्तीकारांनी आधीच दोन फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मुर्ती बनवल्या असतील, त्यांनी काय करायचे?
29 Jun 2021 - 9:52 pm | रात्रीचे चांदणे
मूर्तींच्या उंचीवर मर्यादा कशासाठी हे समजले नाही. घरच्या मूर्तीच्या उंचीवर सुद्धा निर्बंध टाकलेत. बातमीत आस म्हटलंय की कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे सरकार ने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. पण समजा घरातली गणपतीची मूर्ती 4 फुटा पेक्षा जास्त असेल तर त्यामुळे कोविड च्या साथीवर कसा काय परिणाम होईल?
29 Jun 2021 - 10:09 pm | Rajesh188
तलावात,समुद्रात न जाता घरातच ,बिल्डिंग च्या टेरेस वर विसर्जन करता यावे हा हेतू .
लहान मूर्ती असेल तर ते सोप जाईल.
30 Jun 2021 - 9:50 am | मुक्त विहारि
त्यामुळे, असे प्रश्र्न गैरलागू ...