यानंतर तरी महाराष्ट्र पोलीसांना अत्याधुनिक साधने मिळतील काय?

बहुगुणी's picture
बहुगुणी in काथ्याकूट
1 Dec 2008 - 9:32 am
गाभा: 

महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यातील भ्रष्ट आर्थिक व्यवहारावर प्रकाश टाकणारी ही बातमी पहा. आता यानंतर तरी उपलब्ध (बहुतेक पुरेशा) रकमेचा योग्य विनियोग होईल, आणि महाराष्ट्र पोलीसांना अत्याधुनिक साधने मिळतील, याची खात्री करता येईल काय?

परदेशात पोलीस यंत्रणा आधिक दक्ष आणि सुसज्ज असल्याचं बरेचदा दाखवून देण्यात येतं (इथे मिसळपाव वर देखील), आता अशीच सुसज्जता मुंबईतही पोलिसांना मिळावी यासाठी लोकांचा खर्चावर वचक राहील अशी काही योजना होऊ शकेल काय? या संदर्भात अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर कायमस्वरूपी काहीतरी constructive काम करू इच्छिणारी मिपा वरील बरीच मंडळी आहेत असं दिसतं. आपण (गरज पडल्यास माहिती आधिकारांचा उपयोग करून) काही करू शकू का?

केवळ अस्वस्थ होऊन चर्चा करीत पुढच्या अतिरेकी हल्ल्याची वाट पहाणं आपल्यापैकी बहुतेकांना आवडणार नाही आहे हे स्पष्ट आहे, तेंव्हा असे मूळ दोष शोधून त्यांचं निराकरण कसं होईल हे ठरवणं ही काळाची गरज आहे असं वाटतं.

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

1 Dec 2008 - 5:10 pm | विनायक प्रभू

तुमच्या लेखाला एकही प्रतिसाद नाही ह्याला काय म्हणावे.