आमच्या इथे मिरवणुकांचा भरपूर त्रास आहे. पोलिस डीजे प्रेमी कार्यकर्त्यांना अगदी बड्डे, जयंती मयतीसाठी मिरवणुकीची परवानगी देतात. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांना आता गाण्यांच्या तालावर नाचायची जणू सवय लागली आहे. येता जाता मग ते डीजे लावून मिरवणुका काढत आहेत. त्यामुळे जागरण आणि प्रकृतीच्या तक्रारी हा अनेकांचा रोजचा कार्यक्रम झालाय. पोलिसांना कळवले तर त्यांनी किरकोळ गुन्हे दाखल करून सर्वांना परत सोडून दिले. कार्यकर्त्यांचे डीजे लावून गोंधळ करणे ही नैसर्गिक गोष्ट आहे तिच्यात आम्ही फार काही करू शकत नाही. दिवाळीत किंवा निवडणुकीआधी सगळे गुन्हे मागे घेतले जातात असे मला सांगितले गेले आहे.
आपल्या संविधानात सेक्शन 290 आहे. त्यानुसार:
Punishment for public nuisance in cases not otherwise provided for.—Whoever commits a public nuisance in any case not otherwise punishable by this Code, shall be punished with fine which may extend to two hundred rupees.
या नुसार आपण या नाचप्रेमींना रस्त्यात मोठ्याने गाणी लावणे, त्या तालावर किंवा ताल सोडून मुक्तपणे नाचणे यावर संपूर्ण बंधने आणू शकत नाही. आता खरे तर संविधानातील आर्टिकल २९० हे आपण कसे interpret करतो त्यावर बरेचसे अवलंबून आहे. डिजेप्रेमींनी रस्त्यावर न येता मैदानावर किंवा बंदिस्त सभागृहात रीतसर परवानगी घेऊन नाचावे आणि त्याच्या साठी आवश्यक ती कायदेशीर पूर्तता करून घ्यावी आणि बाहेर शांतता राहील असे बघावे असे आम्ही त्यांना सुचवले. पण ते धार्मिक उत्सवा आडून शांतता पाळण्यास तयार नाहीत. कार्यकर्त्यांना नाचायचे असेल तर आमची तशी हरकत नाही पण ते त्यांनी रस्त्यावर डीजे लावून न नाचता गावाबाहेर जाऊन नाचावे अशी विनंती आम्ही आमच्या गावातील पुढाऱ्यांना केली. पण त्यानी सेक्शन 263, 290 चा आधार घेऊन आम्ही त्यांना अडवू शकत नाही, दोनशे रुपये दंड फारतर करू शकतो असे सांगितले.
मी वकिलाचा सल्ला घेतला तर जवळपास सर्व कायदे कार्यकर्त्यांच्या बाजूने आहेत असे समजले.इलेक्ट्रॉनिक नोईज जनरेटर वापरायचा सल्ला मिळाला आहे. त्यानं म्हणे कर्कश्य आवाज होऊन ते गाणी बंद करतील.. पण हे कितपत परिणामकारक असतात ते इथे कोणास माहित आहे का ? आणि जर मी हे सिग्नल जनरेटर वापरले तर एखाद्या नाचोत्सुक कार्यकर्ता अभिव्यक्ती संरक्षक आर्टिकलचा भंग केल्यासारखे होईल का ?
यावर मध्यम मार्ग कोणता ?
शिवाय "एक नागरिक म्हणून आपल्याकडून समाजातील इतर लोकांना उपद्रव होणार नाही, अशी दक्षता मी घेईन " अशा अर्थाचे ही काही आर्टिकल संविधानात आहे का? सवाई गंधर्व संगीत महोत्सव आला की अनेकांना बरोब्बर शांतता कशी आवश्यक आहे याचा साक्षात्कार होतो..
आता यावर काही उपाय मिळेल, की 'डीजेवाले बाबू मेरा गाना बजाव' म्हणून आपणही वर्षानुवर्षे नाचत राहायचे?
प्रतिक्रिया
25 May 2021 - 5:12 pm | पिनाक
ही सोनिक कॅनन तयार करता येते का पहा. हल्क पिक्चर मधली आहे.
चीन ने काही पोर्टेबल सोनिक गन्स तयार केल्या आहेत असे कळते. इम्पोर्ट करता येते का पहा.

https://epochtimes.today/china-develops-portable-sonic-weapon-for-crowd-...
25 May 2021 - 6:24 pm | गॉडजिला
सोनिक कॅननचा सेफ्टी लॅच वापरुन लॉक अँड लोड करावे अन्यथा आपली १२ गॉजची शॉटगन निकामी होउ शकते ;)
25 May 2021 - 6:22 pm | माहितगार
यात संविधान एवजी भारतीय दंड संहिता म्हणजे आयपीसी असे हवे का?
25 May 2021 - 6:24 pm | खेडूत
विडंबन हाय.. अशे बदल करायला अमाला पावर नाय!
25 May 2021 - 11:45 pm | योगी९००
एक जालिम उपाय..
पुलंनी सांगितल्याप्रमाणे शेजार्यांने मोठ्या आवाजात रेडीओ आपल्यासाठीच लावला आहे असे समजून प्रत्येक मिरवणूकीचा आनंद घ्या.
ह्यात अगदीच इंप्रोवाईज करायचे असे वाटले तर तुम्ही पण नाचात भाग घ्या. असे काही चवताळून नाचा व धक्का बुक्की करा की आजूबाजूची दोन चार पोट्टे व पोट्ट्या तुमच्या मुळे जखमी झाल्या पाहिजेत. हवे तर एखादी बाटली चढवून जा किंवा चढल्याची अॅक्टींग करा. एक दोन वेळा डीजे इक्वीपमेंट किंवा स्पिकरच्या बाजूला नाचा व नाचाच्या भरात त्याला धक्का देऊन पाडा किंवा वायर बियर तुटेल असे बघा. असे काही वेळा केल्यावर तुम्हाला घाबरून लोकं मिरवणूका बंद करतील.
26 May 2021 - 7:41 am | आनन्दा
समजा मिरवणूक बंद करायच्या ऐवजी लोकांनी यांनाच प्रसाद दिला तर?
26 May 2021 - 7:42 am | आनन्दा
यांचीच मिरवणूक काढायची वेळ येईल :P
26 May 2021 - 10:17 am | ज्ञानोबाचे पैजार
ते कलम २९० वगेरे समजत नाही पण खरे सांगायचे झाले तर हे असले लोक्स श्वानप्रेमींपेक्षा जास्त डोक्यात जातात.
"अग्नीसाक्षी" मधे नाना जशी पार्टी बंद पाडतो तशी यांची पार्टी बंद पाडावीशी वाटते
पैजारबुवा,
26 May 2021 - 12:46 pm | साहना
आमच्या ओळखीच्या एका व्यक्तींना हाच प्रॉब्लेम होता. उच्चभ्रू कॉलोनी होती आणि बाजूला एक बेकायदेशीर मंदिर. इथे लोकल "कार्यकर्ते" मोठ्यांनी भजने वगैरे लावायचे. बरेच फ्लॅट रिकामे होते आणि ह्या गोंगाटाने लोक घ्यायला मागे पुढे होत होते. बिल्डरने म्हणे मग एक फ्लॅट एक विशेष राजकीय नेत्याला भेट म्हणून दिला. आठवड्याभरात गोंगाट बंद आणि मंदिर सुद्धा बेकायदेशीर म्हणून पाडले गेले. आता तिथे पार्क आहे.
26 May 2021 - 7:26 pm | सुबोध खरे
आपण भारतीय लोक फार गोंगाट करणारे आहोत.
आमच्या स्वयंपाक करणाऱ्या बाईंच्या नातीचे बारसे होते. त्यांनी त्यांच्या चाळीच्या एक खोलीच्या घराबाहेर तीन फूट उंचीचे दोन स्पीकर लावून त्यांनी त्यावर कानठळ्या बसवणारे संगीत लावून चाळीला नकोसे केले होते. आम्ही बाळाच्या हाती पाकीट देऊन दीड मिनिटात बाहेर पडलो.
नंतर त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, घरात समारंभ आहे तर संगीत हवंच कि.
लोक काय म्हणतील?
मी कपाळावर हात मारला.
मी आता आपल्या फ्लॅटला साउंड प्रूफ काचा बसवून घेत आहे.
आमचा मेहुणा चेंबूर ला राहत होता. ( आताच त्याने घर बदलले). तेथे खालून जाणारा वाहता रस्ता होता आणि तो मिरवणुकांचा जाता येता रस्ता होता. मी त्याला या आवाजाचा त्रास होत नाही का असे विचारले तेंव्हा त्याने काचा बंद करून आतमध्ये टाचणी पडेल तितकी शांतता होते असे दाखवले हा उपाय मला एकदम पसंत पडला.
आता मी माझ्या घराला हा उपाय करतो आहे. आपण भारतीय जनतेची मानसिकता बदलू शकत नाही.
27 May 2021 - 12:45 pm | प्रकाश घाटपांडे
मी त्याला या आवाजाचा त्रास होत नाही का असे विचारले तेंव्हा त्याने काचा बंद करून आतमध्ये टाचणी पडेल तितकी शांतता होते असे दाखवले हा उपाय मला एकदम पसंत पडला.>>>> असा उपाय आहे? जरा लिहाना
27 May 2021 - 2:56 pm | खेडूत
+१
असेच म्हणतो.
काही खास रचना असेल तर खिडक्या बदलायला आवडेल.
पूर्वी मी राहत असलेल्या पुण्यातल्या ठिकाणी खिडक्या आणि जमीन हादरत असतं, काचा फुटतील असे वाटे. तात्पुरता उपाय म्हणून काचांना लागून उश्या ठेवत असे.
विशेषतः मिरवणूक बंद करायला दहाची वेळ असेल तर सव्वा दहापर्यंत वाजवणे मोठेपणाचे मानले जाई.
बाकी बारा वाजता केक कापून अचानक किंचाळणे, ओरडणे, शंभर फटाके सलग हवेत उडून वाजत राहणे असे किरकोळ प्रकार बहुतेक अदखलपात्र असावेत!
27 May 2021 - 3:14 pm | टवाळ कार्टा
याबद्दल आणखी लिहिता का?
27 May 2021 - 4:28 pm | उगा काहितरीच
+१
खर्च, लावण्यासाठीचा कालावधी, सोसायटीची परवानगी वगैरे गोष्टी कळल्या तर बरं होईल .
धन्यवाद.
27 May 2021 - 7:44 pm | गॉडजिला
त्यासोबतच टाचणी कोनती होती ते ही समजुन घ्याची उत्सुकता हाइ
27 May 2021 - 8:59 pm | आग्या१९९०
Finesta कंपनीचे साऊंड प्रूफ दरवाजे आणि खिडक्या अगदी बेस्ट. तक्रारीला वावच नाही. माझ्या घराचे बांधकाम करताना मी त्या महाग असल्याने लावल्या नाही, नंतर पस्तावलो. खिडकीची ग्रॅनाईट चौकट, anodised sliding window आणि ग्रिलचा खर्च ह्या खिडकीच्या खर्चापेक्षा २० % कमी झाला परंतू धूळ,आवाज ह्यापासून त्रास होतो. Finesta खिडकी दरवाजे आकर्षक दिसतात. ग्रील, mosquito net, आणि फ्रेम उत्तम दर्जाची असतात . देखभाल खर्च शून्य.
30 May 2021 - 3:19 pm | मराठी_माणूस
माहीती बद्दल धन्यवाद