मटण खायचे तर आहे पण मसालेदार नकोय (फोटूंमुळे जळजळ होते मसाल्याने वाढायची ;) ), मग मटण सुप हा छान पर्याय आहे. आम्ही याला मोळं मटण पण म्हणतो.
चला तर मंडळी साहित्य लिहुन घ्या -
साहित्यः
* १/२ किलो मटण (स्वच्छ धुऊन घ्या)
* २ मध्यम आकाराचे कांदे (बारीक चिरुन)
* २ चमचे आलं-लसुण वाटण
* ७-८ काळी मिरी
* ४-५ लवंगा
* २ दालचिनीचे तुकडे (१")
* २ चमचे शहाजिरे
* १-२ तमालपत्रे
* १/४ चमचा हळद
* ३-४ चमचे तेल (तेल कमी वापरलं तरी चालतं)
आता कामाला लागा -
कृती:
१. कुकर मधे तेल गरम करुन त्यात सगळे मसाल्याचे जिन्नस तळुन घ्या. लवंग/मिरी तडतडली कि त्यात आलं-लसुण वाटण घालुन चांगले परतुन घ्या.
२. कांदा घालुन मउ (किंवा मंद सोनेरी होऊ पर्यंत) परतुन घ्या.
३. हळद घालुन व्यवस्थित हलवा.
४. मटण घाला आणि व्यवस्थित हलवुन घ्या
५. मटण हलके गुलाबी होउपर्यंत परतुन घ्या
६. पाणि (३-४ लिटर) घालुन एक उकळी येउ द्या. कुकर बंद करुन तीन शिट्ट्या घ्या.
हे घ्या गरमा-गरम सुप पिउन घ्या. बाहेर छान पावसाळी वातावरण आहे आणि मस्त थंड हवा आहे.
१-२ वाट्या सुप ओरपुन झाले कि मस्त भातावर वाढुन घ्या. वरुन मस्त मिरी भुरभुरुन घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घ्या. सर्दि-डोकेदुखी असेल तर कशी पळुन जाते पहा!!!
प्रतिक्रिया
30 Nov 2008 - 5:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपली पाकृती मस्त त्यावरुन सूप लैच भारी लागत असेल :)
फक्त त्यातला पहिल्या क्रमांकाचा फोटो वगळत जा राव ! खाणारा असूनही जरा मळमळल्यासारखं होतं :$
30 Nov 2008 - 5:39 pm | पांथस्थ
काढुन टाकला आहे. मला पण असे वाटले होते. कळतं पण वळत नाहि अश्यातली गत. सुचने बद्दल आभारि आहे.
उत्सुक मंडळिंना काढुन टाकलेला फोटु इथे बघता येइल
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
30 Nov 2008 - 5:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काढुन टाकलेला आहे. मला पण असे वाटले होते. कळतं पण वळत नाहि अश्यातली गत. सुचने बद्दल आभारि आहे.
कमाल आहे, अहो, ते फक्त माझं मत होतं काढायलाच पाहिजे होते असे नाही.
कधी कधी प्रतिसाद लैच सिरीयस घेता राव ! :)
(काढायचाच असता तर स्पेशल अधिकारात काढला असता ना आम्ही )
30 Nov 2008 - 5:42 pm | सहज
पांथस्थ तुमच्या पाकृ म्हणजे आता आमची पंचाईत आहे. दरवेळी नवी विशेषण कशी कुठून काढावी.
सध्या "रापचीक" आहे कसे वाटते? :-)
पहीला फोटो बघुन अरेरे कशाला बघीतला असे वाटणार्यातला मी एक :-)
30 Nov 2008 - 5:45 pm | विसोबा खेचर
अल्टिमेट....!
बा पांथस्था, का रे असा छळतोस? :)
तात्या.
30 Nov 2008 - 5:46 pm | विसोबा खेचर
सर्व छायाचित्र अत्यंत मनमोहक..!
जियो..!
तात्या.
30 Nov 2008 - 8:15 pm | नीलकांत
वाह साहेब,
आपण तर जाम खुष झालो
वाह !
नीलकांत
1 Dec 2008 - 1:01 am | प्राजु
तुम्ही दरवेळी असले फोटो देऊन उगाच त्रास देता बुवा.
असो.. मी मटण खात नाही. त्या ऐवजी चिकन वापरूनही करता येईल ही पाकृ.
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Dec 2008 - 12:32 pm | पांथस्थ
खुशाल करा. पण एक करा निषेध सभा बंगळुरात घ्या. म्हणजे आम्ही सभेच्या ठिकाणी (फोटूमधल्या) खाद्यपदार्थांचे आमिष दाखवुन सभा उधळुन लावु. कसे! <:P
उगीच नाहि बरका. मज्जा येते ;)
हे कस झाक बोललात. करुन बघा आणि अनुभव कळवा! (आणि हो जमले तर फोटू टाका)
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...