सर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो.
योगनिद्रा हा ध्यान म्हणजेच deep relaxation चा झोपलेल्या स्थितीमध्ये केला जाणारा प्रकार आहे. योगनिद्रेच्या अभ्यासाने शरीर रिलॅक्स होतं व मन शांत होतं. शरीराचे ताण व मानसिक स्ट्रेससाठीही उपयोगी आहे. शक्यतो डोक्याखाली उशी न घेता झोपलेल्या स्थितीमध्ये ३५ मिनिट दिलेल्या सूचना ऐकून सहजपणे करता येणारा हा ध्यान प्रकार आहे. आपल्या सोयीने चटई, सतरंजी किंवा गादीवर झोपून सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी किंवा अगदी झोपतानाही आपण हे करू शकता. शवासनात आडवे होऊन फक्त सूचनांनुसार स्वतःला रिलॅक्स करत जायचं आहे. इथून आपल्याला सूचना डाउनलोड करून ऐकता येतील. हे एक music असलेलं guided meditation आहे. https://drive.google.com/file/d/12Ll2_N0IQgXACOMMduHP59VSJQOUQ8ja/view?u...
त्याशिवाय कोणत्याही प्रकारे कंफर्टेबल स्थितीमध्ये बसून करता येणारा ध्यानाचा- deep relaxation चा एक सोपा प्रकारसुद्धा मी घेतला आहे. हे अर्धा तासाचं खोलवरचं रिलॅक्सेशन आहे. इथून म्युझिकसह असलेल्या सूचना डाउनलोड करून ऐकता येतील:
https://drive.google.com/file/d/1VIdQ2AtUMbdkJVdnPyGgg58YyIx0EnX8/view?u...
अनेक जणांनी ह्या दोन्ही प्रकारांबद्दल फीडबॅक दिला आहे. तणाव, शारीरिक वेदना व अस्वस्थता असतानासुद्धा हे ऐकून बरं वाटलेलं आहे. आणि रिलॅक्स होण्यासाठी मदत झाली आहे. हे ऐकताना आपण शांत होणार असल्यामुळे हे ऐकताना आपला मोबाईलही शांत ठेवावा लागेल. सध्याच्या कठीण काळात खूप उपयोगी राहील. आपल्या जवळच्यांसोबत अवश्य शेअर करावं. धन्यवाद.
(योगनिद्रा व ध्यान निवेदक- निरंजन वेलणकर niranjanwelankar@gmail.com, 09422108376 सध्याच्या काळामध्ये अनेक लोकांच्या दु:खावर फुंकर घालणारा आणि मृत्युबद्दल विचारमंथन करणारा माझा लेख- http://niranjan-vichar.blogspot.com/2021/04/blog-post_28.html)
प्रतिक्रिया
29 Apr 2021 - 11:20 am | गॉडजिला
कोणाला फरक पडतो कोणाला नाही पडत पण सर्वांनी प्रयोग नक्कि करुन पाहावा. आम्ही तसे श्रमजीवी लोक. पहाटे लवकर उठुन गाडी धुण्यापासुन बाजारहाट करुन ते रात्री सर्व हिशोब सेटल करुन पुन्हा उद्याच्या तयारीत झोपणे हीच दिनचर्या. आणी यातुन योग, ध्यान प्रकाराला वेळ काढणे म्हणजे... ... .. .
पण कुतुहल म्हणुनच एकदा रद्दीच्या दुकानातुन जवळपास फुकटच योगनिद्रेचे पुस्तक उचलले. आणी वाचुन घेतले. काय आहे बघुया म्हणुन योगनिद्रेचा अभ्यास चालु केला व कमालिचा उत्साह अनुभवाला मिळाला. तेंव्हा पासुन मन कितिही दमले तरी योगनिद्रा घेतच झोपी जातो. अर्थात कामाच्या गराड्यात अथवा शरीरीक श्रम भरपुर झालेले असतील अथवा आळस म्हणुन यातील सतत्य सतत भंग होतय पण मनाचा व शरीराचा उत्साह टिकवायला मला याचा अधुनमधुन कमालिचा फायदा होतो
29 Apr 2021 - 12:11 pm | गोंधळी
वा.खु.सा.आ.
29 Apr 2021 - 12:34 pm | सोत्रि
हा लेख खुपच छान आहे!
- (मुमुक्षू) सोकाजी
29 Apr 2021 - 6:05 pm | मार्गी
सर्वांना धन्यवाद!
शक्य असल्यास ऐकल्यानंतर फीडबॅक द्यावा.
@ सोकाजी, धन्यवाद! @ गॉडजिला जी, अरे वा! छानच.