कोई दुष्मन ठेस लगाये....

विकास's picture
विकास in काथ्याकूट
30 Nov 2008 - 10:54 am
गाभा: 

किशोर कुमारने म्हणलेले खालील गाणे आज मला या अस्वस्थते आठवत आहे:

चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये, सावन जो अगन लगाये, उसे कौन बुझाये?
...

मजहार मे नैय्या डुबे तो माजी पार लगाये, माजी जो नाव डुबोये उसे कौन बचाये?
...

कोई दुष्मन ठेस लगाये, तो मीत जिया बेहेलाये, मनमीत जो घांव लगाये उसे कौन मिटाये?

वर दिलेल्या सर्वच पण विशेष करून शेवटच्या ओळी मला सारख्या डाचत आहेत. कारण?

अतिरेकी हल्ला चालू असताना थरथरणारे आपले आबा पाटील आता पोलादी पुरूष होऊन काय म्हणत आहेत? - "बडे शेहरोंमे ऐसे एखाद हादसे होते रहते है. वो ५००० लोगोंको मारने आये थे, हमने कितना कम नुकसान होने दिया!"

कधीकाळी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असे अभिमानाने म्हणणार्‍या या महाराष्ट्रात आज सैह्याद्रीच्या मदतीला असणारे नेत्रूत्व साध्या टेकडीची उंची पण गाठू नये ह्या विचाराने अस्वस्थता येते.

आता दुसरे उदाहरण - ज्या उद्योजकाबद्दल सर्वसाधारणपणे चांगले ऐकले आहे, आदर वाटू शकेल असे व्यक्तीमत्व आहे ते रतन टाटा काय म्हणताहेत ते पहा. त्यांचे म्हणणे आहे की :

"It's ironic that we did have such a warning, and we did have some measures," Tata said, without elaborating on the warning or when security measures were enacted. "People couldn't park their cars in the portico, where you had to go through a metal detector."

However, Tata said the attackers did not enter through the entrance that has a metal detector. Instead, they came in a back entrance, he said.

आता बोला काय म्हणणार याच्या पुढे? त्रैराशिक मांडा - असे जर टाटांचे तर इतरांचे काय असेल?

आता ठिगळं लावता येणार नाहीत....

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2008 - 11:42 am | परिकथेतील राजकुमार

Public memory is very short !
काहि दिवसातच लोक सगळे विसरुन जातील, घडलेली घटना पण आणी त्यावरिल प्रतिक्रिया पण :) आणी कोणी ह मुद्दा जिवंत ठेवायचा प्रयत्न केलाच तर, कशाला पुन्हा पुन्हा जुने मुद्दे उकरुन काढता आणी द्वेष पसरवता ? असे विचारायला आपलेच काहि हिंद बांधव धावतील. आणी पुन्हा एखादा हल्ला होइपर्यंत ह्याची कोण आठवण सुद्धा काढणार नाही !!

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

बडे शेहरोंमे ऐसे एखाद हादसे होते रहते है. वो ५००० लोगोंको मारने आये थे, हमने कितना कम नुकसान होने दिया

निर्लज्जतेचा कळस!!!!!

आता ठिगळं लावता येणार नाहीत....

नव्या पिढीसाठी नवं आकाश बांधायचं आहे हे खरंच! पण शासनाची तेवढी क्षमता आहे का?
जनतेची असे व्हावे ही इच्छा असली तरी त्यासाठी लागणारे कष्ट करायला जनता खरंच तयार का? इझी मनीच्या जमान्यात जन्माला आलेल्या पैशेवाल्या भारतात आरामाला कवटाळणार्‍या प्रत्येकाने नवं आकाश इतकं इझिली पैसे फेकून मिळणार नाहि ह्याची नोंद केली आहे का?

या घटने नंतर प्रत्येक कृतीत फक्त देशाचा "कंस्ट्रक्टीव्ह" विचार केला गेला तरी भारतीयांनी अतिरेक्यांना साफ हरवलं असं म्हणता येईल

-(गोंधळलेला) ऋषिकेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Nov 2008 - 2:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या घटने नंतर प्रत्येक कृतीत फक्त देशाचा "कंस्ट्रक्टीव्ह" विचार केला गेला तरी भारतीयांनी अतिरेक्यांना साफ हरवलं असं म्हणता येईल

या वाक्याशी २००% सहमत.

विकासरावांचा लेख खरोखरच पुन:पुन्हा विचार करायला भाग पाडणारा आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Nov 2008 - 2:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाईटच वाटले ! किती हा निर्लज्जपणा !
पाच हजाराचा आकडा पार झाला असता तर सिरीयस मॅटर झाले असते, तो पर्यंत चलता है म्हणून सोडून देण्याची वृत्ती लैच नीच..
खरं म्हणजे आबाकडून अशी अपेक्षा नव्हती.

अवांतर : आबाचा राजीनामा येतो की काय ? मग विलासरावांचा ? मग राणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ :?

-दिलीप बिरुटे

सहज's picture

30 Nov 2008 - 2:39 pm | सहज

स्वातंत्र्य मिळाल्यावर सत्तेची जी केंद्रे निर्माण झाली, जिथे जिथे सामान्य माणसाचा सरकारी खात्याशी संबध येतो तिथे तिथे ह्या नव्या राजांनी [अगदी संसद, पंतप्रधानपदापासुन सर्वात खालच्या श्रेणीचा सरकारी नोकर] सर्व पदाधिकार्‍यांनी आता आपण सामान्य नागरिकाचे राजे व त्याने कायम आपण म्हणु तसे वागले पाहीजे हीच अपेक्षा केली. परवा एकानी उदाहरण दिलेला बँक कॅशियर, ते प्रकाशकाकांना जातिवरुन मग तुम्ही या नोकरीत कसे हा प्रश्न हे सर्व कित्येक वर्षापासुन ठरत आलेल्या एका भ्रष्ट सामाजीक जाळ्याची जाणीव करुन देतात. मटा मधे माजी पोलीस महासंचालक इनामदार यांनी म्हणले आहे की पोलीसांनी सामान्य जनतेला आदराने वागवले नाही त्याचा विश्वास संपादन केला नाही तर पोलीसांना खबर [इंटेलीजन्स] कुठून व कसे मिळणार. मिपासंपादकीय मधे पोलीसी अनुभवांवर चर्चा झालीच आहे.

जास्त शहानिशा न करता पैसे खाउन अतिरेक्यांना पारपत्र, रेशनकार्ड, अजुन कसले कसले दाखले देणारे "सामान्य दर्जाचे" सरकारी कारकून, पैसे घेउन येणार्‍या सामानाची शहानिशा न घेता जाउ देणारे कस्टम अधिकारी, गुन्हेगारी पाश्वभुमी ना मिळणारा राजकीय आश्रय, या सर्वाचे परिवसन सामान्य माणसाचे खच्चीकरण करण्यात झाला. सर्व सामान्य माणसे "चलता है " ह्या मनोवृत्तीचे शिकार झाली. राजकीय नेत्यांबद्दल तर बोलायलाच नको.

आज याचेच फळ म्हणुन माननीय गृहमंत्री हे असे होणारच. मोठा उद्योजक ज्याला बहुतेक माहीत आहे की आतुन फंदफितुरी झाल्याने हे अटळ होते म्हणतो.

भ्रष्ट आचार कित्येक शतके, दशके चालवुन घेण्याच्या आपल्या समाजाच्या स्वभावामुळे आज आपण एक कोणिही यावे ....मारुन जावे समाज/ देश झालो आहोत.

मधे ३ दिवस अतिरेक्यांनी वेठीस धरले होते पण आता राजकीय पक्ष, नोकरशाही धरेल. सामान्य माणुस हा नेहमी कोणा न कोणाच्या तावडीत आहेच. कधी जात, कधी धर्म, कधी प्रादेशीक, कधी कोण किती पैसे देतो त्या हिशोबाने कोणा न कोणा राजकीय गोठ्यात स्वताला बांधुन घेणे यात आपण धन्यता मानतो. अशी लोकांचे भवितव्य कसे असणार?

अगदी उच्चशिक्षीत ते अशिक्षीत माणुस ह्या घाणेरड्या सवयी, नीच राजकारण सोडून पुर्ण देशाचा विचार स्व च्या आधी करेल तेव्हा या परिस्थीतीत बदल होईल.

सुजाण नागरीक हा नेहमीच भले तो हिंदुस्थानात असो की पाकीस्तान की बांगलादेश की सौदी अरेबिया, सुजाण नागरीक सगळ्याच देशात आज अगतीक आहे.

सर्व देशातील सरकारांनी एकत्र येउन बिमोड केल्याशिवाय हा आतंकवाद थांबणार नाही. आता हा भारताल्या कुण्या एका राजकीय पक्षाने किंवा भारत-पाक समंजस्यांने सुटणारा प्रश्न नाही. हा जगातील सर्व देशांनी एकत्र मोहीम केल्याशिवाय सुटणार नाही.

सर्वात महत्वाचे चलता है, मी कायदा कशाला पाळू ही प्रवृत्ती जरी आज सामान्य लोकांनी सोडली तरी फरक पडेल. किंबहुना हीच पहीली निर्णायक पायरी असेल.

कालच पोलीस ऑफिसर वाय पी सिंग यांच्या एका मुलाखतीत नुकत्याच घडलेल्या घटनेबद्दल त्यांनी सांगितले की विकत घेण्यापूर्वी पोलीसांची हेल्मेट्स जेव्हा चेक केली गेली, तेव्हा त्या हेल्मेट्सना बुलेट्सनी भोके पडली म्हणून पोलीसांनी ती रिजेक्ट केली परंतु वरिष्ठांकडून तीच हेल्मेट्स विकत घेण्यासाठी ऑर्डर दिली गेली...यामुळे पोलीसांमध्ये प्रचंड चीड आहे.... आता याचा अर्थ सर्वांनाच व्यवस्थित कळतो....
आता कशाकशांत पैसे खायचे बाकी आहे ? ??

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

30 Nov 2008 - 6:06 pm | विसोबा खेचर

हे सगळं वाचून सध्या फक्त खिन्नता जाणवते आहे!