चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग १)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
1 Apr 2021 - 9:34 am
गाभा: 

एप्रिल महिना सुरू झाला असल्याने चालू घडामोडींसाठी नवीन भाग सुरू करत आहे.

पी.पी.एफ आणि अन्य योजनांवरील व्याजदरात कपात करायचा वादग्रस्त निर्णय केंद्र सरकारने काही तासांत मागे घेतला आहे.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/govt-withdraws-cut-...

जून २००४ मध्ये त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींची हत्या करायला आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांबरोबर इशरत जहान या मुंब्र्याच्या २० वर्षीय तरूणी चकमकीत मारली गेली ती चकमक खोटी नव्हती असा निर्णय कोर्टाने दिला आहे. इशरत जहान प्रकरणावरून युपीए सरकारने जे काही किळसवाणे राजकारण केले त्याला तोड नाही. हिंदू दहशतवादाचे थोतांड उभे करणे, संघाच्या शाखांमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्याविषयी गुप्तचरखात्याचे रिपोर्ट आपल्याकडे आहेत हे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी जाहीरपणे म्हणणे इथपर्यंत मजल गेली. हुतात्मा तुकाराम ओंबळेंनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी आपल्या प्राणांची आहुती देऊन कसाबला जिवंत पकडले म्हणून नाहीतर २६/११ चे हल्ले हा पण हिंदू दहशतवादच होता हे सिध्द करायची सगळी तयारी युपीए सरकारने केली होती. किंबहुना २६/११ चे हल्ले हा रा.स्व.संघाचा कट होता याविषयी एका पुस्तकाचे प्रकाशन दिग्विजयसिंगांनी केले होते. गुप्तचर विभागाचे प्रमुख मणी यांनी हिंदू दहशतवाद खरा आहे हे सिध्द करायला खोटे पुरावे उभे करायला विरोध केला त्यांना प्रचंड त्रास दिला गेला. आता चिदंबरम, शिंदे, शरद पवार, दिग्विजयसिंग वगैरे काँग्रेस नेते आणि त्यांची तळी उचलून धरणारे पुरोगामी विचारवंत यावरून देशाची माफी मागणार का? याच लोकांनी आणि युपीए सरकारने नरेंद्र मोदी आणि अमित शहांना यात गोवून त्यांची राजकीय कारकिर्द खतम करायचा प्रयत्न केला पण मोदी-शहा प्रचंड खमके निघाले आणि त्यांनी युपीए सरकारचा डाव त्यांच्यावरच उलटवला हे चांगलेच झाले. मात्र या प्रकरणात अनेक पोलिस अधिकार्‍यांना जवळपास १७ वर्षे खूप म्हणजे खूपच त्रास झाला याचे वाईट वाटते.

प्रतिक्रिया

म्हणुन राजकीय मी आजकाल खुप सौम्य आणि कधीतरी लिहितोय..

आजकाल शब्द राहिलेला चुकून..

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2021 - 9:51 am | श्रीगुरुजी

फडणवीस यांचे वागणे वयक्तिक रित्या मला, कुराघोडीचे वाटते..

ठाकरे सरकार पाडण्यासाठी फडणवीस व भाजप आटोकाट प्रयत्न करीत आहेत यात शंका नाही. सर्व बाबतीत ठाकरे सरकारची अडवणूक सुरू आहे. परंतु अनेकदा ठाकरे सरकारने स्वतःलाच अडचणीत आणून झोडपण्याची भाजपला अनेकदा संधी मिळवून दिली आहे.

कंगना रनौटचे घर पाडणे, तिला जाहीर शिवीगाळ करणे, तिला मुंबईत पाऊल न ठेवून देण्याच्या धमक्या देऊन तोंडावर आपटणे, संजय राठोडची पाठराखण, सचिन वाझेची पाठराखण अशा सर्व अनावश्यक गोष्टीत ठाकरे सरकार तोंडावर आपटले व त्यामुळे भाजपला हातात आयते हत्यार मिळाले ही वस्तुस्थिती आहे.

कोरोना महाराष्ट्रात येऊन वर्ष लोटले. परंतु राज्य सरकार अजूनही क्लूलेस आहे. जून २०२० मध्ये होणारी ११ वी ची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचे एक संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले व दुसरे वर्षही वाया जाण्याची शक्यता आहे, परंतु हे सरकार ढिम्म आहे. नशीबाने मिळालेल्या सत्तेचा वापर जास्तीत जास्त ओरबाडून खाण्यासाठी सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्र खड्ड्यात गेलेला असताना हे सरकार थंडपणे निष्क्रीय बसून आहे.

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 10:56 am | मुक्त विहारि

MIM योग्य वेळ येताच, राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसची साथ सोडणार...

बंगाल मधील निवडणूक, जळगांव मधले सत्तांतर ह्या लिटमस टेस्ट आहेत...

काही जुने इतिहास आठवले....

एका हत्तीच्या घटनेवरून, भोसले घराणे आणि जाधव घराण्यात वैतुष्ट्य आले आणि आदिलशहाने फायदा उचलला....

एका क्षुल्लक गोष्टी वरून, गणोजी राजे शिर्के आणि छत्रपती संभाजी महाराज, यांच्यात दुही निर्माण झाली आणि फायदा औरंगजेबाचा झाला...

राघोबा दादांच्या धरसोड वृत्तीने, ब्रिटिशांनी मराठा साम्राज्यात प्रवेश केला...

शेवटी राज्य येणार ते MIMचे ....

श्रीगुरुजी's picture

7 Apr 2021 - 11:23 pm | श्रीगुरुजी

फडणवीसांना केंद्रात नेऊन महाराष्ट्रात नवीन नेता निवडून राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा एक पर्याय आहे, हे सुद्धा मी वाचले. काहीही असले तरी ठाकरे सरकारचे दिवस भरत आले आहेत, असं दिसतंय.

गणेशा's picture

7 Apr 2021 - 11:55 pm | गणेशा

नाही होणार..
आणि bjp ने आधी बरीच राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात घेतली होती, तेच आवडले नव्हते पाहिजे, आणि आता राष्ट्रवादी बरोबर युती केलेली त्यांच्या पाठीराखा्यांना चालेल?

मी bjp नको म्हणुन वोट दिले होते.. ज्यांना वोट दिले त्यांनी bjp बरोबर सत्ता केली तर मला ते मान्य नाही..
२०१६ नंतर मोदी आणि bjp मला अजिबात आवडत नाही..
भले माझ्या घरातील(गावाकडे )लोक bjp च्या पदावर असले तरी..

बिटाकाका's picture

8 Apr 2021 - 12:05 pm | बिटाकाका

मी bjp नको म्हणुन वोट दिले होते.. ज्यांना वोट दिले त्यांनी bjp बरोबर सत्ता केली तर मला ते मान्य नाही..

अगदी! हेच महाराष्ट्रातील जनता अनुभवत आहे. जनतेने काँग्रेस राष्ट्रवादी ला सत्तेतून बाहेर बसायचा आदेश दिला होता आणि म्हणूनच बहुसंख्य जनतेला हे असे सरकार मान्य नसावे.

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 12:48 pm | मुक्त विहारि

राज्य कारभार तरी नीट करा...

राजीव गांधी जसे अत्यंत प्रामाणिक राजकारणी होते तसे उद्धव ठाकरे पण आहेत.
त्या मुळे बाकी फडणवीस सारखी चालू राजकारणी त्याचा गैर फायदा घेत आहेत.
उध्दव साहेबांनी राज्यात टेस्ट कमी कराव्यात.
लक्षण दिसल्या वर च टेस्ट करावी असा नियम करावा .आणि अत्यंत गंभीर लोकांना सहज medical सुविधा मिळतील ह्या वर लक्ष द्यावे.
राज्यात लॉक down न करता राज्याच्या सीमा
पूर्ण १०० टक्के बंद कराव्यात.
सर्व पोलिस फोर्स राज्याच्या सीमेवर तैनात करावं.
महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या ना प्रवेश नाकरवा.
राज्यात विदेशातून एक पण विमान land होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
विमानतळ सील करावीत.
आणि जाहीर पने निर्णय जाहीर करावेत .
म्हणजे केंद्र सरकार आणि BJP ह्यांचे खरे चेहरे
लोकांना दिसतील.
यूपी, बिहारी ह्यांना राज्यात प्रवेश नाही मिळाला
की यूपी ,बिहार मध्ये गृहयुद्ध सारखी स्थिती निर्माण होईल.
बेकार लोक त्यांच्या राज्य सरकार च्या डोक्यावर बसतील.
आणि इतकी हिम्मत नसेल तर उद्धव साहेबांनी सरळ राजीनामा द्यावा.
त्या मध्येच सेनेचे हित आहे.

ह्याला सहमती... बाळासाहेब ठाकरे यांनी, ही गोष्ट ओळखली होती आणि म्हणूनच ते रिमोट हातात घेऊन बसले होते...

सुबोध खरे's picture

8 Apr 2021 - 10:46 am | सुबोध खरे

आपण किती भंपक आणि बिनबुडाचे लिहिता आहात याचे केवळ एक उदाहरण.

महाराष्ट्र राज्याची परिमिती १०००० किमी च्या आसपास आहे तेथे महाराष्ट्रातील एकंदर २ लाख पोलीस तैनात केले तर दर २०० मीटर वर एक पोलीस उभा केला जाईल (प्रत्येकी आठ तास सेवा त्यांच्या सुट्या आजारपण ).

या पोलिसांची राहायची जेवणा खाणाची व्यवस्था कुठे आणि कशी करायची. त्यांना तिथेँ घेऊन कुणी आणि कसे जायचे?

अन चार लोक एकत्र घुसले तर ६०० मीटर मधील ४ पोलिसांना बोलावून त्यांना थांबवता येईल का?

एवढा सगळं झाल्यावर तुमच्या घरात चोर घुसला तर तुम्ही कुणाकडे दाद मागायला जायचं?

१९८२ साली पोलीसानी आंदोलन केला होता तेवढया एका दिवसात गुंडाना रान मोकळं मिळाला होतं याची आठवण झाली.

बाकी तुम्ही इतके विनोदी प्रतिसाद कसे काय बुवा देता?

चौकस२१२'s picture

8 Apr 2021 - 1:41 pm | चौकस२१२

सर्व पोलिस फोर्स राज्याच्या सीमेवर तैनात करावं.
लै म्हणजे लै करमणूक झाली भावा
एवढे सगळं करण्यापेक्षा प्रिय पप्पू ला सत्ता द्या ना ...४ दिवसात सगळा सुपडा साफ करेल तो

बिटाकाका's picture

8 Apr 2021 - 1:51 pm | बिटाकाका

४ दिवस जास्त झाले, १५ मिनिटांत कामं करतात ते महाशय!

महाराष्ट्रांत ही दुसरी लाट तीव्र का आहे, ह्याचे एक कारण अनेकदा 'महाराष्ट्र इतरांपेक्षा जास्त तपासण्या करतो, म्हणून' असे दिले जाते. त्याची सत्यता पडता़ळून पहाण्यासाठी मी एका त्रयस्थ संस्थळावर उपलब्ध असलेला विदा वापरून, तपासण्या/ मि. व रिपोर्टेड केसेस ह्यांच्यात काही परस्परसंबंध आहे का, हे तपासले.

ह्यासाठी १७ राज्यांची माहिती तपासली. प्रत्येक राज्यासाठी:

१. २५ जाने, '२१ ह्यादिवशी झालेल्या तपासण्या/ मिलीयन व २५ मार्च, '२१ ह्यादिवशी झालेल्या तपासण्या/मिलीयन. २५ जाने. रोजी, दुसरी लाट दिसत नव्हती, व करोना आता भारतांतून गेला असे दृष्य होते. २५ मार्चला दुसरी लाट आलेली आहे, हे उघड होते.

२. ह्या दोन संख्यांतील फरक (प्रत्येक राज्यासाठीचा तपासण्यांचा डेल्टा).

३. २८ जाने, '२१ ह्यादिवशी नव्याने रिपोर्ट झालेल्या केसेस, व २७ मार्च, '२१ ला नव्याने रिपोर्ट झालेल्या केसेस.

४. ह्या दोन संख्यांतील फरक (प्रत्येक राज्यासाठीचा दर दिवशीच्या नव्या केसेसचा डेल्टा).

५. तपासण्यांतला डेल्टा, व नव्या केसेसचा डेल्टा हा विदा तक्त्यांत मांडून, तो तक्ता 'तपासण्यांतला डेल्टा'च्या उतरत्या क्रमाने मांडला.

६. खालील प्लॉट राज्यांनुसार ह्या दोन डेल्टांजचा आहे. जांभळ्या रंगाची रेषा 'तपासण्या- डेल्टा/मिलीयन'ची आहे, व ती उतरत्या क्रमाने दिसत आहे (कारण ५ मधे विदा तसा मांडला होता).

लाल रेषा त्या त्या राज्यांतील 'नव्या केसेसच्गा डेल्टा' ची आहे.

.

ह्या प्लॉट्मधे दिसल्याप्रमाणे 'तपासण्या- डेल्टा' व 'नव्या केसेस-डेल्टा' ह्यांच्यात काही परस्परसंबंध (को- रिलेशन) दिसून येत नाही.

म्हणून, वरील गृहितक ('तपासण्या जिथे जास्त, तिथे केसेसही जास्त' अर्थात 'एकाद्या राज्यांत तपासण्या जास्त होतात, म्हणून तेथे जास्त केसेस दिसून येतात') चूक आहे, असे वाटते.

प्रदीप's picture

8 Apr 2021 - 2:29 pm | प्रदीप

वर आपण एकाद्या राज्यांत, जाने ते मार्चच्या दरम्यान वाढवल्या असतील तर केवळ त्यामुळेच रिपोर्टेड केसेसच्या संख्येमधे फरक पडत नाही, हे पाहिले.

खाली सर्वच विदा दिला आहे, त्यांत राज्यानुसार आतापर्यंत किती तपासण्या झाल्या आहेत, त्याचीही माहिती आहे.

.

शाम भागवत's picture

8 Apr 2021 - 5:04 pm | शाम भागवत

एवढा अभ्यास करून लिहिले असेल तर वेगळा धागा काढा.
चालू घडामोडीमधे तुमचा अभ्यास ८-१० दिवसातच तुम्हाला सुध्दा सापडणार नाही.

प्रदीप's picture

8 Apr 2021 - 5:31 pm | प्रदीप

शेवटी ही चर्चा केवळ transitory स्वरूपाची आहे. तेव्हा तिच्याविषयी मी फारसा हळवा नाही.

तरीही आपल्या सुचनेबद्दल धन्यवाद.

शाम भागवत's picture

8 Apr 2021 - 8:09 pm | शाम भागवत

अहो, तुमचे हे निष्कर्ष महत्वाचे आहेत. त्याचा राजकारणाशी संबंध नाही.
पुन्हा एखादा संसर्गजन्य रोग काही वर्षांनी आला तर तेव्हां सुध्दा तुमच्या या मुद्याचा उपयोग होऊ शकतो.
निदान कुमार यांच्या कोवीडच्या धाग्यावर टाकलात तरी चालेल.
हवतर, कुमार१ यांना विचारून करा.

मला तरी तुम्ही काढलेला निष्कर्ष महत्वाचा वाटला.
असो.
🙏

कोणत्या राज्यात किती कोविद टेस्ट करणाऱ्या प्रयोग शाळा आहेत आणि त्यांची capacity किती आहे ह्या विषयी पण माहिती ध्या.
बाकी राज्यातील आकडे खरेच आहेत की नाही हे पण तपासता येईल.

तुम्ही पण थोडे हात पाय हलवा की राव. दुसर्‍यांना काय सारखे कामाला लावताय :-)

मुक्त विहारि's picture

9 Apr 2021 - 6:49 am | मुक्त विहारि

त्यांचा फक्त एकच अजेंडा आहे, भाजपद्वेष...

भाजपद्वेषाच्या बाणवर, वर्तुळे काढत बसायची...

Rajesh188's picture

8 Apr 2021 - 3:12 pm | Rajesh188

पूर्ण देशात rt pcr test करणाऱ्या फक्त 2447 लॅब आहेत
त्या मध्ये
महाराष्ट्रातील 11 कोटी लोकांसाठी 224 लॅब आहेत आहेत आणि वीस ते बावीस कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश मध्ये फक्त 238 लॅब आहेत.
बिहार मधील दहा कोटी जनतेसाठी फक्त 64 लॅब आहेत.
कसं काय जमावल बाबा यूपी,बिहार नी लाखो लोकांच्या टेस्ट करण.
घरीच तर चेक केले नाही ना?
गुजरात ची पण अशीच अवस्था आहे.फक्त ९७ लॅब आहेत.
फक्त तामिळनाडू मधील ७ कोटी जनतेसाठी २६१ लॅब आहेत.त्यांच्या वर विश्वास ठेवता येईल.

हा प्रश्र्न, आपल्या राज्यातील सत्ताधारी पक्षाला पडला पाहिजे....

प्रदीप's picture

8 Apr 2021 - 4:55 pm | प्रदीप

ही माहिती सरकारच्या संस्थळावरून घेतलेली आहे.

ती अशी दिसते:

.

ह्यांतील छत्तिसगढ आउट्लायर म्हणून सोडून देऊयात. इतर १६ राज्यांत टेस्ट्स/ लॅब कमीजास्त आहे, पण अगदीच गैरलागू नाही. कारण लॅब्स कुठेकुठे आहेत, सर्वसामान्यांना त्या सहजपणे उपलब्ध आहेत किंवा नाहीत, ह्यावर टेस्ट्स्/लॅबची संख्या अवलंबून रहाणार. तसेच ह्या लॅब्स कितीवेळ उघड्या असतात, हाही एक लक्षणीय भाग आहे.

आता, सरकारी लॅब्स राज्य सरकार स्थापन करते की केंद्र ह्याविषयी मला माहिती नाही. पण माझा अंदाज ही राज्यांची जबाबदारी असावी असा आहे.

प्रदीप's picture

8 Apr 2021 - 5:39 pm | प्रदीप

राजेश188, तुम्ही सांगितलेत, केवळ म्हणून मी ही Tests per lab माहिती काढली. पण खरे तर, lab ह्या युनिटला तसा फारसा अर्थ नाही. कारण, त्यांत लॅबच्या क्षमतेविषयी काही माहिती येत नाही. तशी संपूर्ण माहिती असेल तरच ह्या तुलनेस अर्थ आहे.