गाभा:
मी साधारण एक एकशे तीस पानांची कथा लिहिली आहे, सध्या मी अश्या व्यक्तींच्या शोधात आहे जे मला ही कथा वाचून त्यावर प्रामाणिक अभिप्राय देतील, तर तुमच्या ओळखीत असे कोणी आहे का? किंवा असं लिखाण हातावेगळं केल्यानंतर अश्यावेळी काय करायचं जेणेकरुन आपल्याला योग्य अभिप्राय मिळतील. या शिवाय कोणी प्रकाशक जो नव्या लिखाणाच्या शोधात असेल तर त्यांच्याशी कसा संपर्क करायचा. येणा-या उत्तरांसाठी अगोदरपासूनच धन्यवाद
प्रतिक्रिया
30 Mar 2021 - 9:59 am | मनो
प्रकाशन व्यवसाय पूर्णतः predatory आहे. जर पुस्तक प्रसिद्ध करायचे असेल तर तुम्हाला छपाईचा खर्च, प्रकाशकाचा नफा हे सर्व आगाऊ मागितले जाईल. विक्री, प्रसिद्धी तुम्हाला स्वतःच करावी लागेल. किती प्रती गेल्या त्याचे खरे आणि प्रामाणिक उत्तर मिळणार नाही, आणि विक्रीचे पैसे अनेक वर्षांनी नशीबवान आणि जिद्दी असाल तर मिळतील. इथे मिसळपाववर एक धागा होता अश्या अनुभवांचा तो जरूर पहा.
प्रतिक्रिया हवी असेल तर काही पाने इथेच लेख म्हणून टाका, आम्ही देऊ खरी प्रतिक्रिया!
30 Mar 2021 - 12:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>प्रतिक्रिया हवी असेल तर काही पाने इथेच लेख म्हणून टाका, आम्ही देऊ खरी प्रतिक्रिया!
-दिलीप बिरुटे
31 Mar 2021 - 7:07 am | तुषार काळभोर
त्यांना जर मिसळपाव वरील खऱ्या व 'चान चान' नसलेल्या प्रतिक्रिया आवडल्या नाहीत तर?
30 Mar 2021 - 12:44 pm | चौथा कोनाडा
मिपावर लेखन टाकले की मिपाकर उत्तमोत्तम अभिप्राय देत असतात. टीकाही करतात, चर्चा ही करतात.
प्रामाणिक अभिप्राय ?
म्हणजे आपण लिहिलेल्या कथेवर तुलनातमक / समिक्षात्मक / रसग्रहणात्मक दीर्घ लेखन अपेक्षित आहे काय ?
जर अभिप्राय देणारा सेलीब्रेटी लेखक / व्यक्ति नसेल तर अभिप्रायाचा फार काही उपयोग होईल ?
30 Mar 2021 - 1:10 pm | साहना
> या शिवाय कोणी प्रकाशक जो नव्या लिखाणाच्या शोधात असेल तर त्यांच्याशी कसा संपर्क करायचा. येणा-या उत्तरांसाठी अगोदरपासूनच धन्यवाद
माझ्या मते लिखाण एक ऍप्प म्हणून प्रकाशित करा आणि लिंक सर्वाना पाठवा. प्रतिक्रिया छान मिळाल्या आणि हजारो वाचकांनी वाचले तर त्या नंतर प्रकाशकही संपर्क साधा.
हल्लीच्या दिवसांत पुस्तक प्रकाशित करून पैसेही मिळत नाहीत आणि वाचक सुद्धा मिळत नाहीत.
30 Mar 2021 - 6:17 pm | सौन्दर्य
वर अनेक मिपाकरांनी म्हंटल्या प्रमाणे येथे काही पाने प्रकाशित केल्यास वाचून मी प्रतिसाद देईन. पण एक गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या आणि मनाची तयारी ठेवा ती म्हणजे हा प्रतिसाद यदाकदाचित जर आवडला नाही, किंवा पटला नाही तरी व्यक्तिगतरित्या मनाला लावून न घेता काय सुधारणा करता येतील ह्याचा विचार करा.
मी एका संकेत स्थळावर लिहित असे आणि त्यावर येणारे प्रतिसाद नेहेमीच 'छान, उत्तम, सुंदर' असेच यायचे. नंतर कळले की कोणत्याही लिखाणावर टीका करायची नाही अशी त्या संकेतस्थळाची ती पॉलीसीच होती. अशी पॉलिसी असणे काहींना आवडेल काहींना नाही, मला व्यक्तिगतरित्या ती आवडली नाही.
चला येऊ द्या तुमची कथा.
31 Mar 2021 - 10:06 am | Bhakti
मी पण एका संकेतस्थळावर लिहायचे,तिथेपण views भरपूर असे भासवले जायचे..मग मी पण हूरळून जायचे ,,नंतर लक्षात आले की ते सब झूठ है, कदाचित प्रतिक्रिया बाबतही असच काहीतरी असू शकते लक्षात आले.
पण अर्थात मला तिथे कथा रचण्याची सवय झाली,पण तिथला वाचक वर्ग केवळ महिला वर्ग आहे, तेव्हा तोच तोच पणा लिखाणात येतो.
पण लिखाणातील कमी सांगतांना लिखाणात काहीतरी चांगले असतेच ते आधी सांगितले पाहिजे, तेव्हा कुठे लिखाण खुलून जाते.
30 Mar 2021 - 6:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
कुठे प्रिंट करत बसताय
सरळ पी डी एफ करा आणि मस्त अमेझॉन/फ्लिपकार्ट्/इन्स्टाग्रामवर टाका. रु१०० पेक्षा कमी किंमत ठेवलीत तर काही शे प्रती खपतील.
30 Mar 2021 - 6:28 pm | मुक्त विहारि
मस्तच ...
30 Mar 2021 - 7:09 pm | राजेंद्र मेहेंदळे
धन्यवाद मुविकाका
30 Mar 2021 - 7:10 pm | चौथा कोनाडा
छापील प्रकाशित करावयाचे असल्यास मिपाचे ज्येष्ठ लेखक जयंत कुलकर्णी यांचे काही मार्गदर्शन मिळते का ते पहा.
30 Mar 2021 - 7:55 pm | कंजूस
शेवटची चारपाच पाने वाचकांना नोंदीसाठी कोरी ठेवा. अर्ध्या
भागात कथेचा पहिला भाग टाका. म्हणजे पुढचे पुस्तकही हमखास खपेल.
कथांमध्ये नाविन्य उरले नाही हे कथा न वाचताच दिलेला अभिप्राय समजा.
उलट सुलट सर्व कांडं मराठी मालिकांत दिखाऊ आणि जबरी कलाकार पुढे रेटतात. सणवारांची तयारी, खाद्यपदार्थ , त्यांचे महत्त्व असतेच.
तर कथापुस्तकांतही क्रमश: आणि उत्सुकता टिकवण्यासाठी हा उपाय करावा.
2 Apr 2021 - 8:10 pm | मराठी कथालेखक
किंडलवर प्रकाशित करा तिथे भरपूर खप झाल्यास मग छापील आवृत्तीकरिता प्रकाशकाशकांशी संपर्क साधा.
5 Apr 2021 - 8:02 am | लेखनवाला
माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Reference)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership).
https://www.amazon.in/dp/B091FD93LS
त्यांची सुरवातीची काही पान इथे वाचायला देत आहे.
https://misalpav.com/node/48593
आवडल्यास संपूर्ण कथा वाचण्यासाठी नक्की अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक वाचा, लिंक वरती दिली आहे, आणि वाचल्यावर तुमचा अभिप्राय नक्की कळवा.
3 Apr 2021 - 10:38 am | सरिता बांदेकर
तुम्ही जर आय फोन,आय पॅड किंवा मॅक वापरत असाल कर ॲपल बूक्सवर प्रकाशित करू शकता.