मदत पाहिजे - उत्तर भारतात प्रवास आणि COVID चे नियम

Primary tabs

विकास...'s picture
विकास... in भटकंती
29 Mar 2021 - 11:35 pm

नमस्कार नमस्कार

लय लांबड लावत नाय मुद्द्याचं चालू करतोय

हा तर सगळं काही बंद पडून १ वर्ष झालय आणि कुठेतरी जायचंय असं म्हणून नुसतं एक्सेल वर प्लॅन बनवून बनवून आणि मॅप वर बघून बघूनच सगळं फिरून झालं (आणखी कोणी समदुःखी असेल तर बोलते व्हा)

मग बस्स आता एकच उपाय मिपावर मदत मागायची

हा तर १००-१ प्लॅन पैकी एक  प्लॅन खाली देतोय,  जर का कोणी तिकडे* गेलं असेल तर माहिती सांगावी

* तिकडे म्हणजे पुणे ते  - दिल्ली विमानतळ, ISBT, New Delhi  रेल्वे स्टेशन आणि इथून पुढे आणि परत असा प्रवास केला असेल तरी अनुभव सांगावा

पुणे  - दिल्ली - विमान प्रवास
दिल्ली - डेहराडून - बस/रेल्वे 
डेहराडून - मंडल - HRTC बस (Mandal is a village. District: Chamoli, Uttarakhand)
मंडल इथून सुमो करून - Chopta, चंद्रशिला, जोशीमठ, AULI (रुपये शिल्लक असतील तर Valley of Flowers)

परत येताना फक्त दिल्ली ते पुणे रेल्वे हा बदल का?
का तर फोटो आणि विडिओ पाठवायची चांगली जागा म्हणजे रेल्वे चे सहा फुटाचे बेड, कारण विमानाने लवकर माघारी आलो तरी दोन तीन दिवस फोटो पाहण्यात आणि लोकांना पाठवण्यात जातात. 

अधिक माहिती
कधी प्रवास सुरु करणार: 15-April or 01-May
किती प्रवासी: एक - मी वय ३९ शुद्ध शाकाहारी (काहींना घाई असते कुठे काय चांगले मिळते ते सांगायची पण ते समोरचा खातो का हे आधी विचारत नाहीत)
खर्च: विमान प्रवास सहित दहा हजार
सुट्टी: १०० शिल्लक आहेत (बायको फक्त सात दिवस देतेय)
का प्रवास करणार: मंडल पासून अनुसया माता मंदिर आणि श्री दत्त जन्म स्थान जवळ आहे
तळटीप: (तळटीपा)
- COVID साठी कोणती काळजी घ्यावी लागतेय आणि बदलणारे नियम याची माहिती दिली तर स्वागत आहे
- माझे मिपावर कधीतरी लॉगिन होते, सगळ्यांना उत्तरे देता येतील असे नाही समजून घ्यावे
- भाषा थोडी सातारी वाटेल, मग बरोबरय -  फलटणकर आहे

प्रतिक्रिया

कंजूस's picture

30 Mar 2021 - 6:22 am | कंजूस

मी हिमालयात गेलो नाही {आणि जाणारही नाही} हे पर्यटन माहिती वाचून आणि विडिओ पाहूनच नक्की केलं.
तुमची आवड धार्मिक ठिकाणांची वाटते आहे.
Visa2explore channel ( हरीश बाली, दिल्ली) यांची उत्तराखंड प्लेलिस्ट २५+ भागांची आहे. त्यातून फिरायच्या जागा कोणत्या, काय खाल्लं, प्रवासास किती वेळ लागतो,राहाणे हे समजेल. EP 13,14,15 पाहा. Travel blog असल्याने सत्य परिस्थिती आहे.
पण कोविड नियमाने विमानतळ, रेल्ववे स्टेशन्सला काय अडचणी येतात पुढे ते सांगता येत नाही. महाराष्ट्रात देवळं बंद आहेत , तिकडची नसावीत .

विकास...'s picture

30 Mar 2021 - 3:28 pm | विकास...

धन्यवाद माहिती बद्दल

Visa2explore channel ( हरीश बाली, दिल्ली) यांची उत्तराखंड प्लेलिस्ट २५+ भागांची आहे...  -एकदम मुद्देसूद माहिती आहे पण  हे सगळे भाग एप्रिल २०२० मधेच पाठान्तर केलेत. त्यामध्ये आणखी भर पाहिजे ती COVID बद्दल

प्रामाणिक सल्ला आहे की काही महिने दम धरा. पुढच्या वर्षी हवे तितके भटकता येईल की. माझ्या ऑफिसमधील मित्राचा तरुण भाऊ तुमच्यापेक्षा लहान असूनही covid मुळे अचानक गेला. काही लोक या आजाराला जास्त संवेदनशील आहेत. त्यात तुम्हीही असू शकाल.

दुसरी गोष्ट जर अचानक आजारी पडलात तर अनोळखी शहरात इस्पितळात दाखल होण्यापासून ते जवळ कुणी माणूस नसणे अश्या अडचणी येतील. केवळ तुम्हालाच नाही तर बायको, इतर नातेवाईक आणि जवळचे मित्र यांनाही किती त्रास होईल त्याचा विचार करून शक्यतो प्रवास टाळा.

कंजूस's picture

30 Mar 2021 - 10:30 am | कंजूस

आणि अगोदर हिमालयात गेला नसाल तर नकोच.

विकास...'s picture

30 Mar 2021 - 5:05 pm | विकास...

पटतंय....  सप्टेंबर ला एकदा विचार करून बघू नाहीतर पुढच्या वर्षी नक्की बुकिंग करू

सुक्या's picture

30 Mar 2021 - 10:45 am | सुक्या

सध्या परीस्थीती चांगली नाही. घर सोडुन जाउ नका ...

विकास...'s picture

30 Mar 2021 - 5:05 pm | विकास...

नोंद घेतलीये

अनसूया असे बरोबर नाव आहे.
बाकी सध्या मौज म्हणून प्रवास लांबणीवर टाकला तर बरे.

( स्वगत: शंभर सुट्ट्या का कश्या काय साठतात ब्बवा!! )

कंजूस's picture

30 Mar 2021 - 11:37 am | कंजूस

पण फारच पावरबाज होते ऋषी आणि मिसेस ऋषी.
आठ ऋषींना ( ब्रम्हर्षींंना ) नाळ आणि बेंबी नव्हती कारण थेट ब्रम्हाची निर्मिती. विश्वामित्रास शेवटी एकदाची पदवी मिळाली ब्रम्हर्षी म्हणून पण....

अनसूया असे बरोबर...  याची नोंद घेतलीये

 आणि सुट्ट्या बद्दल म्हणाल तर
घरापासून जवळच शिफ्ट मध्ये नोकरी आहे आणि दुपारी ३ नंतर सुट्टीच असते, आणि सासुरवाडी, माझे मामा, तिचे मामा, मावश्या, बहिणी असे सगळे पाहुणे ५ किमी मध्ये आहेत
सगळे देव फलटण ला आहेत
बायको घरची सगळी लहान मोठी कामे बघते
आणि वाढदिवस नावाचा प्रकार आपल्याला माहिती नाही मग सुट्ट्या शिल्लक राहतात
 असो ...

फिरायचं असेल तर महाराष्ट्रातच फिरा, ते ही शक्य असेल तर स्वतःच्या वाहनाने.

विकास...'s picture

30 Mar 2021 - 5:09 pm | विकास...

ठीक आहे मग, पावसाळ्यात घाट बघू आणि ते पण सायकल वर

चौथा कोनाडा's picture

30 Mar 2021 - 1:18 pm | चौथा कोनाडा

- माझे मिपावर कधीतरी लॉगिन होते, सगळ्यांना उत्तरे देता येतील असे नाही समजून घ्यावे

फिरायला गेला नाहीत तर नित्यनियमाने मिपा हाटीलात या अन रोज १५-२० प्रतिसाद द्या असे सुचविन.
जेव्हा केव्हा फिरायला जाल तेव्हा मिपाकरांच्या इष्टचिंतनाने ट्रीप चांगली होईल हे नक्की !

कालचे लॉगिन तसेच चालू आहे,  आता इथेच फिरून प्रतिसाद देतो

Rajesh188's picture

30 Mar 2021 - 1:45 pm | Rajesh188

आता पर्यटन करण्यासाठी योग्य वेळ नाही .
कुठेच प्रवास करू नका

नोंद घेतलीये, प्रवास बंद, कुटुंबासह YouTube वर आरामात उत्तराखंड पाहुयात 

अभिजीत अवलिया's picture

30 Mar 2021 - 6:05 pm | अभिजीत अवलिया

मनो आणि प्रचेतस यांनी सांगितलेले पटले.
मी पण मार्च एंडला सहकुटुंब डेहराडूनला जाण्याच्या विचारात होतो. तिथेच २-३ महीने राहून उत्तराखंड बघून मे किंवा जूनच्या शेवटी परत यायचे असे ठरवले होते. डेहराडून मधील २-३ फ्लॅट बघून एक फायनल पण होत आला होता.
फक्त मी विमानाऐवजी स्वत: कार चालवत जाणार होतो. पण लेटेस्ट माहितीनुसार महाराष्ट्रातून मध्य प्रदेश वा राजस्थान मधे प्रवेश करणार्या प्रवाशांना ७ दिवसांचे Quarantine आहे.
त्यामुळे सगळे बेत रहीत केले. वर कोरोनाची महाराष्ट्रारातील रुग्णसंख्या पाहता, महाराष्ट्र पासिंगची गाडी पाहून तिकडे लोक थोडे फटकून राहण्याचीच शक्यता वाटतेय.

देशभरातून जे पोट भरण्यासाठी करोड लोक राज्यात येत आहेत ते बंद होतील.
आणि त्यांच्या संबधित राज्यात परत जावून तेथील सरकार वर तुटून पडतील.

टवाळ कार्टा's picture

30 Mar 2021 - 6:53 pm | टवाळ कार्टा

भिक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती नको यायला

मुक्त विहारि's picture

30 Mar 2021 - 6:26 pm | मुक्त विहारि

Travel.... when you must ...

तातडी नसेल तर, घरीच थांबा....

कंजूस's picture

30 Mar 2021 - 9:28 pm | कंजूस

एक नक्की होतं ते म्हणजे कुठे जायचं नाही हे ठरवणं सोपं जातं.