कोविड अनुभव तसे पहिले तर आता लोकांना नवीन नाहीये तरीही मी हे लिहिण्याचं कारण कि कोणाला थोडासा तरी फायदा होऊ शकेल.
तारीख १२ मार्च , माझ्या मुलाचा वाढदिवस. पुरणपोळीचा प्लॅन चालू होता आणि फोन खणखणला कि तडक हॉस्पिटल मध्ये या. माझ्या सासर्यांना वेगळ्या कारणासाठी ऍडमिट केले होते तिकडून फोन होता. आम्ही ब्रेकफास्ट चा घास तसाच ठेवला आणि हॉस्पिटल ला गेलो. ICU मधले डॉ म्हणाले कि त्यांना covid डिटेक्ट झालाय आणि इकडून शिफ्ट करावे लागेल. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. मेव्हणी आणि मेव्हण्याला फोन केला. ते पण आले. डॉ ची चर्चा केली ते म्हणाले आम्ही चौकशी करतो कुठे जागा मिळेल तशी. कुठे मिळत नव्हते शेवटी एका हॉस्पिटल मध्ये जागा आहे म्हणाले. आम्ही लगेच होकार दिला आणि पुढचा बॉम्ब पडला कि घरातल्या सगळ्यांना टेस्ट कराव्या लागतील. म्हटलं आधी ह्यांना ऍडमिट करू मग ठरवू. ऍम्ब्युलन्स वाला म्हणाला एक जण पुढे जा. मी तातडीने पुढे गेलो , ५ मिनिट मध्ये ऍम्ब्युलन्स आली. तिकडे ते म्हणाले फाईल दाखवा, पण ती माझ्या मेव्हण्याकडे होती, तो येई पर्यंत ऍम्ब्युलन्स तिकडेच बाहेर. ते आले आणि आम्ही तडक आत गेलो. तिथले डॉक म्हणाले कि सॉरी इकडे जागा नाहीये तुम्ही घेऊन जा दुसरी कडे. आम्ही म्हणालो अहो , हॉस्पिटल मधून ऑलरेडी बुक केले आहे तरीही ते ऐकायला तयार नव्हते. सासरे तसेच बाहेर ऍम्ब्युलन्स मध्ये आम्ही पण हवालदिल . पोटात काही नाही, पाणी पण नव्हतो प्यायलो. शेवटी बरीच फोना फोनी करून झाल्यावर ते तयार झाले. सासर्यांना आम्ही अजून कल्पना दिली नव्हती. आता बेसिक टेस्ट झाल्यावर त्यांना आत नेतांना आम्ही कल्पना दिली. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांना आत घेऊन गेले. आम्हाला सांगितले कि आत कोणाला जाता येणार नाही, तुम्ही तासभर थांबा बाहेर, औषध लागली तर द्यायला. आमची अवस्था खूपच भयंकर झालेली बायको आणि मेव्हणी एकदम टेन्शन मध्ये होत्या. शेवटी आम्ही पाण्याची बाटली घेतली, बिसकटस खाल्ले, नारळपाणी प्यायलो. २ तासांनी तिकडून निघालो.
आता कोविड टेस्ट साठी कोणी मिळेना घरी येणारे कारण ३ वाजून गेले होते. शेवटी कसाबसा एक जण तयार झाला आणि आमचा स्वाब घेऊन गेला. माझ्या मुलाला मी माझ्या घरी आई बाबांबरोबर ठेवले. आम्ही बाकीचे दुसऱ्या एका घरी थांबलो. ती रात्र कशीबशी काढली , दुपारनंतर रिपोर्ट आले . मी , बायको, आणि मेव्हणी पॉसिटीव्ह. सासूबाई, मेव्हणा , त्यांची मुलं निगेटिव्ह . एकदम काय करावे कळेना झाले. ५ वाजून गेले होते, संध्याकाळ झालेली. ३-४ ठिकाणी चौकशी केली पण कुठलीच OPD चालू नव्हती. शेवटी कर्वेनगर मध्ये एक डॉक मिळाले, तिकडे गेलो . तिथे लगेच xray काढण्यात आला , डॉक्टरांनी चेक केलं . काळजीचं कारण नाही म्हणाले, पण १७ दिवस घरीच थांबा असं सांगण्यात आलं. आता आई बाबा आणि मुलाच्या टेस्ट केल्या. तो रिपोर्ट आला रविवारी आणि धक्का बसला ते तिघेही पॉसिटीव्ह निघाले. आता आम्ही ठरवले कि मुलाला इकडे घेऊन यायचं आणि मी आई बाबांबरोबर थांबायचं . दुसऱ्या दिवशी आई बाबांना घेऊन परत त्याच डॉ कडे गेलो. त्यांना पण तसेच सांगितले आणि घरीच राह्यला सांगितले. गोळ्या आणणे, जेवणाचं बघणे ह्यात तो दिवस खूप हेक्टिक गेला . मित्राने जेवण आणि बऱ्याच गोष्टी आणून दिल्या., जेवणाचा डबा लावला . २-३ दिवस बहिणीने पण डबा दिला. बहिणीच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या हे बरं झालं. त्यानंतर २ दिवस सलग ताप , डॉक म्हणाले जर थांबला नाही तर स्टिरिओईड चे इंजेकशन दयावे लागतील पण त्यासाठी ऍडमिट व्हायला लागेल. पण नशिबाने ताप आला नाही परत आणि मी पण विश्रांती घेतली . रोज मॉनिटरिंग चालूच होतं . तिकडे हॉस्पिटल मध्ये सासऱ्यांची खूपच नीट काळजी घेतली जात होती. आणि सगळं फोन वरून मॅनेज होत होतं . मुलाशी विडिओ कॉल होत होता. सोसायटी मध्ये कळवले तसे सगळ्यांनी सांगितले काहीही लागलं तर कळवा . मित्र तर कायम कॉन्टॅक्ट मध्ये होते.
अचानक एक दिवस बाबांना चक्कर यायला लागली , जेवण पण एकदम कमी जायला लागलं. oxygen ९२, ९१ दाखवायला लागला. डॉक ना फोन केला , ते म्हणाले तडक ऍडमिट व्हायला लागेल. मी गाडी चालवत गेलो आणि ऍडमिट केले आणि त्यांना ट्रीटमेंट चालू झाली.
आज दोन्ही बाबांना (माझे बाबा आणि सासरे ) ह्यांना discharge मिळाला. मित्र, आप्तेष्ट , डॉक्टर आणि देवाच्या कृपेने आम्ही ह्या परिस्थिति मधून बाहेर पडलो.
काही खास अनुभव आणि observations :
१. पहिली गोष्ट म्हणजे पॅनिक व्हायचे नाही, घरातल्या कितीही जणांचे रिपोर्ट पॉसिटीव्ह आले तरी
२. xray जरी काढला तरी २-३ दिवसात CTScan करावा
३. फॅबिफ्लू हि गोळी लगेच चालू करायला हवी. अर्थात डॉक च्या सल्ल्याने. पण मला वाटते सगळ्यांनी घ्यावी
४. कोणी कितीही काहीही म्हटले तरी ऑक्सिमीटर हवेच आणि दिवसातून २-३ वेळा चेक करावे . बाबांची तब्येत त्यातूनच कळली आणि वेळीच उपचार मिळाले
५. एक रिपोर्ट शीट तयार करावे आणि रोजचे temperature आणि oxygen तसेच symptoms लिहावीत.
६. दिवसातून ३ वेळा वाफारा घ्यावा.
७. गरम पाणी पित राहावे.
८. दोन वेळा तरी गुळण्या कराव्यात . झोपताना दूध हळद घ्यावे .
९. फळं भरपूर खावीत
१०. आराम भरपूर करावा
११. Remdisivir औषध हे नक्कीच वरदान आहे. माझ्या बाबांना आणि सासर्यांना ह्याचा ५ दिवसाचा कोर्स दिला त्याचा फायदा नक्कीच झाला.
१२. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पॉसिटीव्ह थिंकिंग करावे आणि डॉक्टर वर पूर्ण विश्वास ठेवावा.
१३. एकूण लक्षात आले कि माणुसकी अजून नक्कीच आहे. सगळ्यात भारी वाटले जेंव्हा आमच्या बिल्डिंग मधल्या ७० वर्षाच्या आजींनी फोन करून तब्येतीची चौकशी केली आणि विचारले कि बाहेरून काहीही आणून द्यायचे असल्यास नक्की सांग. :)
कोणाला कसलीही मदत, ईन्फो हवी असल्यास नक्की संपर्क करा, जमेल तशी नक्कीच मदत कारेन.
पुणे किंवा कोथरूड मध्ये राहत असल्यास काही महत्वाचे संपर्क देत आहेत. उपयोगी पडू शकेल
कोवीड टेस्ट (घरपोच) - संतोष पाटील (मेट्रोपोलीस ) - 8668783402
होम आणि कार सानेटीझशन - सुरेश गायकवाड (Urban) - 9049288481
सॅनेटरी इन्स्पेक्टर - 9850841727
डबा (घरपोच) गोंगळे - 9890856018
प्रतिक्रिया
29 Mar 2021 - 9:09 pm | चौकटराजा
बेफिकीर लोकाना हे कळत नाही की मी माझे आई वडील बायको कधीतरी या आजाराने ग्रासणार आहोत. म्र्युत्यूचा दर जरी कमी असला तरी बरे होणे हे ६५ चे वरचे रुग्णास पुरेसे नसते. यासाठी पाच सहा महिने दोन्ही व्रुद्धाना सनिटयझर ,मास्क यान्चे बन्धन चालूच ठेवा! आमच्या समोर दोन पेशंट होते त्याना मदत केली याचे समाधान आहे ! खाली एक पेशंट होती पण तिने मदत बिदत काही लागणार नाही असे सांगितले ! सगळ्याची टेस्ट करावी हा थ्री टी मधील प्रोटोकॉल च आहे ! त्याला इलाज नाही. एकूण किती खर्च व कसकसा आला ते ही लिहा कारण तितके पैसे राखून ठेवता येतील.
30 Mar 2021 - 12:47 pm | टवाळ कार्टा
त्याहून जास्त काळजीचे कारण म्हणजे आरोग्यसेवेवर पडणारा ताण....हॉस्पिटलमध्ये बेड नसतील तर काय करणार? आणि इथे मिपावर लोक बोंबा मारत आहेत कि करोना वगैरे सगळे थोतांड आहे
1 Apr 2021 - 9:39 pm | MipaPremiYogesh
चौरा जी - खर्च साधारण पणे खालील प्रमाणे
Rt-cpr - 980
X ray - 350
Ct scan ~ 2500
Blood reports ~ 1500 te 2000
Medicines ~ 5000
Dr consultation ~ 500
Food (tiffin) ~ 3000
Fruits etc. ~ 1000
In case of hospitalization ~ 70000 to 90000 (depend upon hospital and treatment)
29 Mar 2021 - 9:30 pm | गणेशा
सगळे व्यवस्थित आहेत हे ऐकून छान वाटले..
काळजी घ्या..
30 Mar 2021 - 5:15 am | मुक्त विहारि
आता काळजी घ्या....
ह्या रोगाची कुठल्याही प्रकारची खात्री देता येत नाही, हीच खात्री...
30 Mar 2021 - 8:25 am | प्रचेतस
सर्व जण सुखरूप बाहेर पडलात हे उत्तम झाले.
30 Mar 2021 - 12:56 pm | चौथा कोनाडा
दोन्ही बाबा आणि आपण सर्व ह्या परिस्थिति मधून बाहेर पडलात हे खुपच चांगले झाले ! देवाची कृपा.
निरिक्षणे आणि संपर्काक दिले हे उत्तम केले, उपयोगी पडतील.
अनुभव सामायिक केल्याबद्दल धन्यवाद !
30 Mar 2021 - 2:17 pm | सरिता बांदेकर
काळजी घ्या अजून थोडे दिवस.
तुम्ही माहिती आणि सगळे फोन नं. दिलेत त्याबद्दल धन्यवाद.
पॅनिक व्हायचं नाही म्हटलं तरी वेळ येईल तेव्हा शांत राहता येईल का हा खरा मला पडलेला प्रश्न आहे.
परत सांगते काळजी घ्या
30 Mar 2021 - 3:42 pm | रंगीला रतन
अनुभवकथन आवडले.
डॉक्टर वर पूर्ण विश्वास ठेवावा.
हे महत्वाचे, नाहीतर काही लोकं कंपाउंडर वर जास्त विश्वास ठेवतात :)
काळजी घ्या. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.
30 Mar 2021 - 6:34 pm | मुक्त विहारि
स्वतःवर आजारपण ओढवले की, डाॅक्टरच गाठतात..
असेच एकजण, मातृभाषा प्रेमी होते, अगदी कट्टर, पण नंतर मात्र घरच्या मंडळींना, इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले....
1 Apr 2021 - 9:40 pm | MipaPremiYogesh
धन्यवाद सगळ्यांना. कोणाला काहीही मदत किंवा माहिती हवी असल्यास, व्य नि करावा.