गाभा:
- दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या दलालांनी काल भारत बंद करण्याचे आवाहन केले होते. ते पूर्णपणे फसले. पंजाब व हरयाणात भारत बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. उर्वरीत राज्यात शून्य प्रतिसाद मिळाला. हे आंदोलन केव्हाच मृत झाले आहे.
- आसाम व बंगाल मध्ये विधानसभेसाठी आज मतदान होत आहे.
- सचिन तेंडुलकरला कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्याने तो घरीच क्वारंटाईन झाला आहे.
- कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा जोरदार वाढत आहे. काल भारतात अंदाजे ६०,००० नवीन रूग्ण सापडले. त्यात महाराष्ट्रात अंदाजे ३६,००० रूग्ण आहेत.
प्रतिक्रिया
27 Mar 2021 - 3:34 pm | जानु
बंगाल मध्ये दुपारी दोन पर्यंत ५४ % मतदान झाले आहे. सायंकाळ पर्यंत ७० % होऊ शकते.
27 Mar 2021 - 3:45 pm | मराठी_माणूस
चाचण्या किती वाढल्या ?
27 Mar 2021 - 3:48 pm | Rajesh188
मतदान साठी लोक जास्त बाहेर पडत आहेत ह्याचा अर्थ लोक विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून मतदान करत आहेत.
मग दीदी साठी
की
मोदी साठी.
हे ठरवता येत नाही
27 Mar 2021 - 4:04 pm | Rajesh188
म्हणजे काय जगातील आठवे आश्चर्य घडले की काय.
Corona जो माणूस आहे त्याला कोणालाही होवू शकतो .
मुळात corona ची टेस्ट कधी करतात लोक हा प्रश्न सुध्धा महत्वाचा आहे?
१) कामगार लोकांना सक्ती नी रिपोर्ट आणायला सांगतात.
२) विमान प्रवास करताना करावीच लागते.
३) corona बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची जबरदस्ती नी.
ही तीन कारण बिना लक्षण corona चाचणी करण्यात कोणाची येते त्या बद्द्ल.
ज्या राज्यात कामगार जास्त.
विमान प्रवासी जास्त.
आणि corona बाधीत जास्त तिथे टेस्ट पण जास्त..
त्या मुळे महारष्ट्र संख्येत आघाडीवर असू शकतो.
Corona ची लक्षण काय ह्या विषयी ज्या राज्यात माहिती जास्त.
टेस्ट करण्याची सुविधा सहज उपलब्ध असण्याची सोय जास्त.
त्या मुळे पण टेस्ट करणाऱ्या लोकांची संख्या वाढत असावी.
त्या मुळेच
प्रगत देश,प्रगत राज्य,प्रगत शहर मध्ये corona बाधित जास्त.
हे समीकरण असू शकतं.
27 Mar 2021 - 5:35 pm | कपिलमुनी
भारताने आपल्या देशातील नागरिकांना जेवढ्या करोनाच्या लसींची डोस दिले नाहीत त्याहून अधिक डोस परदेशामध्ये निर्यात केलेत, असं भाजपा सरकारने संयुक्त राष्ट्रांसमोर सांगितलं आहे.
27 Mar 2021 - 9:33 pm | प्रदीप
मला समजते ते हे असे आहे:
* ऑक्सफर्डने शोधून काढलेल्या लशीचे सर्वाधिकार, अॅस्ट्रा- झेनेका ह्या स्वीस कंपनीने घेतलेले आहेत.
* सदर कंपनीने, सध्या कोरोनाचे जगभर थैमान सुरू असल्याने, ते तसे असेपर्यंत(१), आपण त्यावर रॉयल्टी घेणार नाही असे जाहीर केकेली आहे.
* भारतात ही लस बनवण्याचे कंत्राट, अॅस्ट्रा- झेनेकाने, सेरम इन्स्टिट्यूट ह्या भारतीय कंपनीस देऊ केलेले आहे.
* ह्या कंत्राटाचा एक भाग म्हणून सेरमला, WHO च्या, कॉव्हॅक्स, ह्या स्कीम अंतर्गत, इतर काही देशांना, ही लस पुरवणे बंधनकारक आहे. (२)
* त्यानुसार आतापर्यंत भारताने, ही लस कोव्हॅक्स अंतर्गत, अनेक देशांना पुरवली आहे.
* आतापर्यंत-- म्हणजे सुमारे एकाद आठवड्यापूर्वीपर्यंत, आपल्याकडील कोरोनाचे थैमान आटोक्यात असल्याचे दिसत होते. तेव्हा, इतर देशांना, जिथे कोरोना अजूनही अतिशय जास्त प्रमाणात आहे, तिथे ही लस आपण पाठवत राहिलो होतो.
* आता, आपल्याकडील परिस्थितीच ढासळू लागल्याने, भारत सरकारने, ह्या लशीची निर्यात, तात्पुरती थांबवली आहे.
खुलासे:
(१) ह्याविषयी नक्की आकडेवारी मला सध्या मिळालेली नाही- म्हणजे अॅस्ट्रा- झेनेकाचे रॉयल्टी न घेण्याचा थ्रेशोल्ड नक्की काय आहे, हे मला माहिती नाही.
(२) किती प्रमाणांत, व वेळेत, ही लस अशी निर्यात करावी, ह्याविषयीचा तपशील माझ्याकडे नाही.
वरील माहिती चुकीची असू शकते, तर त्यावर कुणी जाणकाराने दुरुस्ती जरूर सुचवावी.
27 Mar 2021 - 9:35 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
28 Mar 2021 - 12:07 pm | साहना
लस निर्माण केली म्हणून होत नाही, ती लोकांपर्यंत पोचवायला वेळ आणि इतर संसाधने लागतात त्यामुळे ती खराब होण्याच्या अगोदर इतर देशांना पाठवणे चांगली गोष्ट आहे.
अस्त्र झंका वॅक्सीन ला अमेरिकेतील मत्त FDA अजून प्रमाणीत करत नाही आणि वरून आधीच बनवून ठेवलेल्या लक्षावधी लसींना निर्यात सुद्धा करायला देत नाही त्यामुळे आता ती खराब होतील. अमेरिका फर्स्ट म्हणे.
https://www.nytimes.com/2021/03/11/us/politics/coronavirus-astrazeneca-u...
28 Mar 2021 - 1:54 pm | प्रदीप
अमेरिकेत बायो-एन-टेक (अथवा, बियॉनटेक्) व मॉडर्ना ही दोनच मुख्यत्वे वापरांत आहेत, व सध्यातरी त्यांचा तेथील सप्लाय व लॉजिस्टिक्स, व्यवस्थित सुरू आहेत, असे दिसते. बायडेन ह्यांचे सुरूवातीचे उद्दिष्ट, त्यांच्या कारकर्दीच्या १०० दिवसांत १०० मि. लशी टोचून द्याव्यात असे होते. आता ५९ दिवसांतच ते पूर्ण झाल्याने, त्यांनी ते उद्दिष्ट २०० मि. वर नेलेले आहे.
अमेरिकेने त्यांच्याकडे विनाकारण पडून असलेला साठा इतरस्त्र वळवला पाहिजे. पण अॅ-झे चे , ह्या लशीचे तेथील उत्पादक, WHO च्या कोव्हॅ़क्सचे पार्टनर्स आहेत किंवा नाहीत, ह्याचाही विचार कदाचित करावा लागेल. आणि ते इतके सोपे नाही, कारण एकतर ते उत्पादक काय किंमतीत त्या लशी इतर, मुख्यत्वे विकसनशील देशांना देऊ शकतील, हा एक मुद्दा. व WHO खास युरोपियन संस्था असल्याने त्यांचा विचारविनीमय होऊन काही निर्णय येइपर्यंत २०४१ साल उजाडायचे.
बरे ते विकसनशील देश जाऊदेत-- पण खुद्द युरोपांतच सध्या लशीचा भयंकर तुटवडा आहे. आम्ही आता 'ब्रेकिंग पाँइण्ट' ला आलो आहोत असे जर्मनी व इतर ई. यू. तील देश म्हणत आहेत. ह्याचे प्रमुख कारण अॅझी-च्या नेदरलॅण्ड्स मधील एका मोठ्या उत्पादकास ह्या अलिकडेपर्यंत ई-यू ने परवाना दिलेला नव्हता. त्यामुळे व्यथित होऊन अनेक युरोपीयन देश अॅझीच्या युरोपबाहेर जाणार्या लशीवर बंदी घालण्याची जोरदार मागणी करीत आहेत. तर त्यांना अमेरिकेकडून लस मागवावी असे का सुचले नाही? NYT च्या बातमीत मात्र हा उल्लेख आहे, व व्हाईट हाऊस अद्यापि त्यावर काहीच हालचाल करत नसल्याचेही म्हटले आहे.
27 Mar 2021 - 9:27 pm | स्वलिखित
औरंगाबादेत पुन्हा लोकडाऊन
जिंदगीचा गदर करून ठेवलाय आमच्या
27 Mar 2021 - 9:43 pm | मुक्त विहारि
https://maharashtratimes.com/maharashtra/amravati/deepali-chavan-had-wri...
आजची रात्र कठीण जाणार, वरिष्ठ अधिकारी इतके निष्ठूर कसे काय होऊ शकतात?
28 Mar 2021 - 11:33 am | मराठी_माणूस
खुप भयंकर आहे.
28 Mar 2021 - 11:47 am | मुक्त विहारि
ज्या देशांत, स्त्रीयांना मानसन्मान मिळत नाही, ते देश रसातळालाच जातात, हा इतिहास आहे आणि भविष्य पण आहे...
28 Mar 2021 - 12:30 pm | Bhakti
खुप कमी क्षेत्र आहे जिथे स्त्रीयांना मुक्त काम करता येत..जर त्यात असे अधिकारी असतील तर भयंकर आहे...
28 Mar 2021 - 2:28 pm | मुक्त विहारि
आणि त्वरित अंमलबजावणी...
आजकाल, डिजिडल फिंगर प्रिंटस्, पटकन नाहिशा करता येत नाहीत...
ह्या ताई जर कोर्टात गेल्या असत्या तर, त्यांचा जीव वाचला असता का?
सरकारी असो किंवा खाजगी, स्त्री कर्मचारी वर्गासाठी, वेगळे कोर्ट हवे...
27 Mar 2021 - 9:51 pm | कपिलमुनी
माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या बांगलादेश मुक्ती संग्रामातील सहभाग व त्यासाठी प्रत्यक्ष तुरुंगवास सोसल्याचे सांगितले आणि पुरोगाम्यांचा जाळधुर झाला. अनेक तर्क वितर्क लढवत खालच्या पातळीवर ही टीका शंका उपस्थित केल्या.
माननीय पंतप्रधान कार्यालय आणि भारताचे गृह खाते यांनी माननीय नरेंद्रजी मोदी यांनी कधी कुठे कसा सत्याग्रह केला, त्यासाठी त्यांना कोणी अटकेत टाकून कुठल्या तुरुंगात किती कालावधीसाठी अटकेत ठेवले होते (हे नक्कीच काँग्रेसचे पाप असणार) याची कागदपत्रे सार्वजनिक करून सर्व पुरोगामी लीब्रांडू ची तोंडे काळी करावीत.
27 Mar 2021 - 10:15 pm | श्रीगुरुजी
पुरोगामी लिब्रांडूंची तोंडे अनेकदा काळी झाली आहेत. यावेळीही वेगळे होणार नाही. विरोधकांना अत्यंत फालतू विषयात कसे गुंतवून तोंडावर पाडायचे यात मोदी वाकबगार आहेत.
27 Mar 2021 - 11:32 pm | Rajesh188
बांगलादेश निर्मिती फक्त आणि फक्त इंदिराजी सारखी कणखर भारताची पंतप्रधान होत्या म्हणूनच शक्य झाले हे 100% सत्य च.
मोदी चा त्या मध्ये काहीच सहभाग नाही हे पण सर्वांस माहीत आहे.
त्यांनी केला असेल एकद्या गल्लीत सत्याग्रह नसेल मोदी न व्यतिरिक्त कोणाला माहीत
ही पण शक्यता असू शकते.
ना..
असे पण 1971 मध्ये इंदिराजी सारख्या तेजस्वी व्यक्ती देशाच्या नेत्या होत्या त्यांच्या तेजापुढे काजवे थोडीच दिसत होते.
27 Mar 2021 - 11:38 pm | श्रीगुरुजी
तुम्ही तर मोदींचे बालमित्र, लंगोटीयार आणि शाळासोबती. म्हणून तर हक्काने प्रत्येक प्रतिसादात त्यांना अरे तुरे करून त्यांचा एकेरी उल्लेख करता. तुमचे एवढे जवळचे मित्र असूनही मोदींनी सत्याग्रह केल्याचे तुम्हाला माहिती नाही याचे आश्चर्य वाटते.
28 Mar 2021 - 7:50 am | मुक्त विहारि
आडनावाच्या पुढे जात नाही...
28 Mar 2021 - 1:18 pm | चौथा कोनाडा
एकशेअठ्याएंशी साहेब,
सत्याग्रहाची माहिती लवकरात लवकर उघड करून वादावर पडदा पाडावा !
28 Mar 2021 - 8:42 am | श्रीगुरुजी
https://m.lokmat.com/national/farmers-protest-punjab-farmers-tore-bjp-ml...
आपले आंदोलन पूर्ण अपयशी ठरले असून त्यास जनतेचा काडीमात्र पाठिंबा नाही यामुळे दलालांना वैफल्य आले असून ते आता हिंसक झाले आहेत. ते भविष्यात २६ जानेवारी पेक्षा जास्त हिंसक धुडगूस घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.
28 Mar 2021 - 10:31 am | साहना
सामान्य भारतीयांची सहनशीलता खूप आहे पण एकदा संपली कि मग "तक्षकाय स्वाहा इंद्राय स्वाहा" भारतीय जनता जबरदस्त करते. फुकटे, दलाल आणि दारूचे ठेके चालवून गब्बर झालेल्या ह्या आंदोलनजीवी मंडळींना जनता चांगलंच धडा शिकविक अशी अपेक्षा ठेवूया.
28 Mar 2021 - 11:26 am | मुक्त विहारि
शिकली सवरलेली लोकं देखील, ऐनवेळी फिरतात..
शिवाय सध्या नवीन मार्ग काढलेला आहे. घराणे एक, पण पक्ष अनेक.कुठलाही पक्ष आला तरी, सत्ता एकाच घराण्यात राहते.
मुंडे घराणे, खडसे घराणे, ही काही उदाहरणे... सध्या जरी संख्या कमी असली तरी, नंतर वाढतच जाणार आहे.
आता एकाच पक्षात राहुन, घराणेशाही राबवता येणार नाही... "चित भी हमारा और पट भी हमारा."
28 Mar 2021 - 9:28 am | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/desh-videsh-news/inquiry-into-the-chief-ministe...
28 Mar 2021 - 11:43 am | मुक्त विहारि
इंडोनेशिया : चर्चसमोर भयंकर बॉम्बस्फोट; मृतदेहाच्या उडाल्या चिंधड्या....
https://www.loksatta.com/desh-videsh-news/bomb-explosion-occurs-outside-...
आतंकवादी कृत्य असावे असे वाटते....
28 Mar 2021 - 2:21 pm | श्रीगुरुजी
पवार व प्रफुल्ल पटेल २ दिवसांपूर्वी अहमदाबाद मध्ये अमित शाह व गोतम अडाणींना गुपचुप भेटल्याची बातमी वाहिन्या चघळत आहेत. कमळ मोहीम, राज्यात नवे समीकरण,मविआ सरकार संकटात अशी भाकिते चघळली जात आहेत.
चर्चेत राहण्यासाठी मोठ्या नेत्यांना भेटण्याचा किंवा त्यांना बारामतीला बोलावून पाहुणचार करण्याचा पवारांना छंद आहे. ही भेट तसलाच प्रकार आहे.
28 Mar 2021 - 5:00 pm | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/desh-videsh-news/protesting-farmers-thrash-bjp-...
महात्मा गांधी यांच्या काळात, एका सत्याग्रहाला हिंसक वळण लागले होते. महात्मा गांधी यांनी त्वरित, सत्याग्रह रद्द केला होता..
28 Mar 2021 - 5:18 pm | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/maharashtra-news/holi-festival-2021-restriction...
नेमका, हिंदू सणवार असतांनाच, करोनाची लागण वाढते, हा निव्वळ योगायोग आहे... भाजपवाले, उगाच आगीत तेल ओततात....
29 Mar 2021 - 12:31 am | Rajesh188
त्या मुळे bjp नी अतिशय नीच राजकारण हिंदू धर्माचे नाव घेवून करू नये.
त्यांचीच लायकी लोकांना माहीत पडते.
29 Mar 2021 - 7:17 am | मुक्त विहारि
कारण, महाराष्ट्र राज्यात तर, शिवसेनेचे राज्य आहे...
30 Mar 2021 - 1:49 pm | श्री गावसेना प्रमुख
१८८ हे मिसळपाव चे संजय राउत आहेत...
29 Mar 2021 - 9:47 am | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/desh-videsh-news/ten-people-were-killed-in-an-a...
आता भारतातील, उदारमतवादी व्यक्ती काय प्रतिसाद देतात? हे वाचणे, रोचक ठरेल....
29 Mar 2021 - 1:58 pm | Vichar Manus
लोकसत्तातील आजचा अग्रलेखात निवडणूक रोख्यांवर टीका केली आहे, हे सर्व खरे असेल तर भयानक आहे
https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-page-refusal-to-stay-th...
29 Mar 2021 - 8:11 pm | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/pune-news/gang-rape-in-pune-criminals-tired-to-...
अजून किती दिवस, ह्या गोष्टी, महाराष्ट्र राज्यात होत राहणार?
29 Mar 2021 - 8:14 pm | मुक्त विहारि
“उद्धवजी, समस्या ही आहे की…”, Lockdown वरून आनंद महिंद्रांचे मुख्यमंत्र्यांना परखड बोल!
https://www.loksatta.com/mumbai-news/anand-mahindra-to-cm-uddhav-thacker...
आता, माननीय मुख्यमंत्री, काय अंमलबजावणी करतात? हे बघणे रोचक ठरेल...
30 Mar 2021 - 11:22 am | मराठी_माणूस
त्यांनी त्यांचे मत मांडले, "परखड" वगैरे श्ब्द टाकुन वृत्त छापणे हे अनावश्यक.
29 Mar 2021 - 8:29 pm | मुक्त विहारि
https://www.tv9marathi.com/maharashtra/mp-navneet-rana-slams-women-fores...
दरम्यान, दीपाली चव्हाण आत्महत्येनंतर माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दीपाली चव्हाण यांनी आपले वरिष्ठ अधिकारी शिवकुमार आपला छळ करत असल्याची तक्रार आमदार रवी राणा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली होती. यानंतर याबाबत राणा यांनी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यासोबत पत्र व्यवहार करत दीपालीच्या बदलीची शिफारस केली होती. मात्र, राठोड यांनी या बदलीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप राठोड यांच्यावर होतोय.
दिशा सालीयन, पुजा चव्हाण, दिपाली चव्हाण... गेल्या वर्षभरात झालेले संशयास्पद मृत्यू आणि आत्महत्या.... अजून किती??????
29 Mar 2021 - 9:22 pm | उपयोजक
https://www.thehindu.com/news/national/election-commission-working-with-...
30 Mar 2021 - 10:09 am | चंद्रसूर्यकुमार
२६ तारखेला बंगलोर विमानतळावरून गाडीने माजी पंतप्रधान ह.दो.देवेगौडांच्या हासनवरून पुढे एके ठिकाणी पर्यटनासाठी म्हणून गेलो होतो. साधारण साडेचार-पाच तासांचा प्रवास होता. त्या पूर्ण प्रवासात कुठेही भारत बंदचा लवलेशही नव्हता. सगळे काही नेहमीप्रमाणे चालू होते.
या दलाल लोकांच्या आंदोलनाला सामान्य जनतेने कधीच आपले म्हटले नव्हते. फक्त विरोधी पक्षातील राजकारणी आणि त्यांची कायमच तळी उचलून धरणारे ढुढ्ढाचार्य पुरोगामी विचारवंत सोडून इतर कोणीही या आंदोलनाला कधीच पाठिंबा दिला नाही असे म्हणायला हरकत नसावी.
30 Mar 2021 - 11:02 am | मुक्त विहारि
आंबे विकायला लागले, काजू पण सुरू झाले...
कसले आंदोलन आणि कसले काय?
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत. त्यामुळे, हे आंदोलन पण, शेतकरी वर्गाच्या भल्यासाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे...
30 Mar 2021 - 1:58 pm | चंद्रसूर्यकुमार
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे अमेरिकेच्या मागे धावणारे कुत्रे असल्याची टीका चीनच्या परराष्ट्रखात्यातील एका अधिकार्याने केली आहे. चीनच्या परराष्ट्रखात्याने काहीतरी म्हटले आणि त्याच्याशी सहमत व्हायची वेळ येईल हे अगदी कालपर्यंत स्वप्नातही आले नसते पण ते आज शक्य झाले आहे. जस्टीन ट्रुडोला असल्याच लाथा घालायला हव्यात.
एकूणच कॅनडाचे एक समजत नाही. ना आर्थिक महासत्ता, ना लष्करी महासत्ता ना कुठचीच महासत्ता. कायम अमेरिकेचे शेपूट म्हणून राहण्यात धन्यता मानणारा देश आणि सगळ्यांना उपदेशाचे डोस पाजायला मात्र पुढे असतो. भारतातील तथाकथित शेतकरी आंदोलनाला जस्टीन ट्रुडोने पाठिंबा दिला तेव्हा जाम डोक्याला शॉट गेला होता. असल्या फालतू देशाच्या फालतू नेत्याला अशाच किंबहुना त्यापेक्षा जास्त लाथा घालायला हव्यात.
https://maharashtratimes.com/international/international-news/chinese-di...
30 Mar 2021 - 2:59 pm | Rajesh188
कारण जे संशोधक म्हणून मिरवत आहेत त्यांची मत सरळ प्रकाशित केली जात आहेत.
कोण करत आहे?
जगातील प्रतिष्ठित सायन्स मॅगझिन.
अर्धवट कोणताच पूर्ण अभ्यास नसलेली .
फक्त असे होवू शकत असे ह्या संशोधकांना वाटते .
पण पूर्ण अभ्यास आणि निष्कर्ष नाही ..
अशी मत.
जागतिक प्रतिष्ठित सायन्स माध्यम अशी प्रकाशित करतात की ते जागतिक अंतिम सत्य आहे .
हे मी माझ्या विविध अभ्यासातून ,वाचनातून अनुभवले आहे
30 Mar 2021 - 3:17 pm | डॅनी ओशन
प्रभू आता वेळ आली आहे.
कू करा
सत्ता उलथवून takach
सगळे तुमचे भक्त तुम्हाला sapport करतील
समिती स्थापन karach
फक्त गोळ्या नका मारू १८८चॉप चॉप स्क्वेअर ची पद्धत apan पाडूया
Intrnet वरच्या अति शहाण्यांना असा धडा शिकवायला पाहिजे
तुम्ही pudhe व्हा
आम्ही मागे आहोत
फक्त एक शंका आहे
चाळणी परीक्षेचे पेपर kon बनवणार
Expert ने पेपर बनवले तर पास होनारा मोठा
कि पेपर बनवणारा
हे कसे कळणार
तुम्ही पेपर बनवणार असे asel तर मग ठीक आहे
30 Mar 2021 - 3:25 pm | मराठी_माणूस
https://www.loksatta.com/maharashtra-news/stone-throwing-at-the-hallabol...
हे भयंकर आहे.
30 Mar 2021 - 7:16 pm | श्रीगुरुजी
शेतकरी आंदोलन असो वा धार्मिक मिरवणुक असो वा सुवर्णमंदीरातील दोन शीख गटातील वाद असो वा पोलिसांबरोवर वाद असो, शीख कायम तलवारी घेऊन सामील होतात व हल्ले करतात. २६ जानेवारीस ट्रॅक्टर मोर्चातील शीखांनी पोलिसांवर तलवारीने हल्ला केला होता. मागील आठवड्यात शीखांनी तलवारीने हल्ला करून एका पोलिस फौजदाराचे हात कापले.
शीखांना तलवारी व कृपाण घेऊन सार्वजनिक वावरण्याची परवानगी आहे. त्यांना कृपाण बरोबर घेऊन विमानप्रवास करण्याची परवानगी आहे. हे धार्मिक लांगूलचालन समाजासाठी अत्यंत घातक आहे. परंतु कोणत्याही पक्षाने या प्रकाराला आजतागायत विरोध केलेला नाही.
31 Mar 2021 - 11:48 am | मराठी_माणूस
बरोबर.
इथे तर तलवारीने वाढदिवसाचा केक कापला तरी कारवाई होते.
30 Mar 2021 - 5:08 pm | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/desh-videsh-news/hundu-temple-in-pakistan-100-y...
30 Mar 2021 - 5:11 pm | Rajesh188
म्यानमार मध्ये जगाने लगेच हस्तक्षेप केला पाहिजे.भारताने पुढाकार घेतला पाहिजे कारण आपला शेजारी आहे.
म्यानमार लोकतान्त्रिक पद्धतीने निवडून आलेले सरकार स्वीकारत नसेल तर लष्करी कारवाई करण्यात येईल असा इशारा देणे गरजेचे आहे.
म्यानमार लष्करावर हल्ला करून त्यांना त्यांची लायकी भारताने दाखवून द्यावी.
इंदिराजी नी बांगलादेशी लोकांना लष्करी अत्याचार पासून वाचवले होते.
मोदी नी म्यानमार मधील लोकांना लष्करी अत्याचार पासून मुक्ती द्यावी.
30 Mar 2021 - 5:16 pm | मुक्त विहारि
तिबेटच्या वेळी हस्तक्षेप न करता, बांगलादेश मध्ये मात्रा,हस्तक्षेप का केला?
म्यानमार मधल्या घटनेचा, भारताने का विरोध करावा? किंवा हस्तक्षेप का करावा?
31 Mar 2021 - 1:59 pm | श्रीगुरुजी
या लेखातील बरेचसे मुद्दे पटले.
Why Congress-NCP must be wary of the Sena
31 Mar 2021 - 6:05 pm | चौथा कोनाडा
परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाने खडसावले
साधी तक्रार किंवा एफआयआरशिवाय सीबीआय चौकशीच्या आदेशाची मागणीच कशी करता? असा सवाल
31 Mar 2021 - 6:37 pm | वामन देशमुख
उत्तर दिल्ली पालिकेने खरंच स्तुत्य निर्णय घेतलाय.
In Hinduism & Sikhism, 'halal' meat is prohibited. So we approved a proposal, making it mandatory for all restaurants, dhabas & meat shops in North Delhi Municipal Corporation to put up posters stating whether they serve/sell 'halal' or 'jhatka' meat: Mayor Jai Prakash
ज्यांना हलाल मांस खायचं आहे वा झटका मांस खायचं आहे त्यांना आपापल्या निवडीचा अधिकार प्राप्त झाला आहे. (याआधी हा अधिकार ते कोणत्या प्रकारे बजावायचे याची कल्पना नाही.)
BTW, मला स्वतःला, हलालच्या तुलनेत झटक्याचे मांस आवडते कारण त्याची लज्जत खरंच अप्रतिम असते.
31 Mar 2021 - 7:00 pm | चौकस२१२
मुसलमान ग्राहक मिळावा म्हणून जसे हलाल प्रमाण पत्र लागते किंवा जिथे मूलमानांचे चालते त्या देशात "हलाल आहे कि नाही" ते सांगणे जबरदस्तीचे आहे तसेच जर हिंदू आणि शिखांच्या देशात हलाल कि झटका हे सांगणे जबरदस्तीचे करणे यात काहीच वावगे नाही .. अर्थात अर्बन नक्षलस आता गळा काढून रडतील कि "बघा फॅस्टीष्टांनी हलाल वर बंदी आणली जातीय "
अशी सक्ती काँग्रेस च्या काळात करण्याची हिंमत झाली नाही कारण गांधीगिरी आडवी आली किंवा "त्यांची मने दुखावली जातील ना.." म्हणू चुप्प
आज भाजपचं राज्यात हि "समानता " आणली जातीय हे योग्यच आहे
दुकाकाचं पाटीत बदल करण्याचाच खर्च वाढेल थोडा पण असा किती !
31 Mar 2021 - 7:14 pm | श्रीगुरुजी
जागतिक वारसा असलेले महापौर निवासस्थान स्मारकासाठी फुकट देऊन व ते देताना ७-८ कोटी रूपयांचे हस्तांतरण शुल्क माफ करून फडणवीसांनी काय मिळविले? राज्याच्या महसुलाचे म्हणजे पर्यायाने राज्याचे नुकसान मात्र करून ठेवले आणि भाजपचेही नुकसान केले. ५ वर्षे उद्धव ठाकरेंची खुशामत व हांजी हांजी करूनही शेवटी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लाथाडले. अजूनही सेनेशी जमवून घेण्याचे फडणवीसांचे संतापजनक प्रयत्न सुरू आहेत. सेनेपेक्षा खूप जास्त मोठा पक्ष असूनही, सेनेसमोर लाचारी करण्याच्या ३० वर्षांच्या इतिहासातून भाजप काहीच शिकला नाही व पुढेही शिकण्याची शक्यता दिसत नाही. उधोजींनी नुसती खूण केली तरी फडणवीस धावत धावत मातोश्रीवर जाऊन युतीची बोलणी सुरू करतील व राज्याच्या हितासाठी पुन्हा युती करतोय अशी मखलाशी सुद्धा करतील.
https://www.lokmat.com/politics/devendra-fadnavis-not-invited-lands-wors...
31 Mar 2021 - 7:56 pm | चौकस२१२
स्पष्ट बोलायचं झालं तर महाराष्ट्रात "ठरविक जात द्वेषामुळे" भाजप स्व बळावर कधी निवडून येणार नाही.. या मुळे सेनेशी युती करावी लागते त्यांना ( हा भाजपवर खरा तर अन्याय आहे... मोदी , शहा आणि योग्गी हे काही "ठरविक जातीचे " नाहीत आणि" जात जात खेळणाऱ्या काँग्रेस चे "राजघराणे " हे कोणत्या काश्मिरी जातीचे आहे हे एकदा बघावे ") पण लोकं डोकावून बघणार नाहीत .. झोडपायला महाराष्ट्रात "जात हा विषय सोप्पा आहे "
सत्ता नाही कि कार्यक्रम राबवता येत नाही ... मग करायचा काय? मग zakat युती!
आणि नेमका त्यात सेनेने आणि भाजपने जोशी आणि फडणवीस मुख्यमंत्री देऊन घोर गुन्हा केला आता १०० वर्षे तरी " ह्यांनी पेशवाई आणली म्हणून एल्गार करायला सगळे मोकळे .. झकास राडा चालुद्या
31 Mar 2021 - 8:24 pm | श्रीगुरुजी
२०१४ मध्ये भाजपने स्वबळावर १२३ जागा जिंकल्या होत्या. स्वपक्षातील सहकाऱ्यांना संपविले नसते, कायम मत देणाऱ्या समर्थक मतदारांसाठी घातक असणारे निर्णय घेतले नसते व पुन्हा स्वबळावर लढले असते तर २०१९ मध्ये भाजपने स्वबळावर बहुमत मिळविण्याची बरीच शक्यता होती.
31 Mar 2021 - 7:16 pm | मदनबाण
जितेंद्र आव्हाडांबरोबरच्या पोलिसांचे CDR डिलीट करू नका : मुंबई हायकोर्ट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KAKU | काकू | Rap Song by NEHA KULKARNI aka NASTI UTHATHEV | नस्ती उठाठेव | Savage reply to Kaku