याचा अर्थ काय ?

हेरंब's picture
हेरंब in काथ्याकूट
29 Nov 2008 - 6:55 pm
गाभा: 

आज संध्याकाळी (२९-११-०८)सर्व वाहिन्या आलटून पालटून पहाताना जाणवले की प्रत्येक ठिकाणी अतिरेक्यांचा आकडा वेगवेगळा होता.
गृहमंत्रालय १५ अतिरेकी ठार व एक जिवंत पकडलेला असे दाखवत होते तर महाराष्ट्राचे गृहमंत्री ९ ठार व एक जिवंत असे सांगत होते. केंद्र व राज्य सरकारच्या माहितीत असा फरक कसा असू शकतो ?
तसेच आजच सकाळी ताजचे ऑपरेशन संपल्यावर एक अतिरेकी तिथे जिवंत पकडल्याचे सांगत होते. त्याशिवाय करकर्‍यांना मारणारा जिवंत अतिरेकी मोजला तर ते दोन व्हायला हवेत. ही गफलत जाणुनबुजून तर नव्हे ??? ज्यांना अतिरेकी मोजता येत नाहीत ते त्यांच्यापासून आमचे संरक्षण कसे करणार ? १६ - १० = ??? आणि तसे उरले असल्यास त्यांना शोधण्याची जबाबदारी कोणाची ?

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

29 Nov 2008 - 7:00 pm | विनायक प्रभू

शाळत गनिताला बराबर मास्तर भेटले नाय.

अवलिया's picture

29 Nov 2008 - 7:01 pm | अवलिया

मास्तर बरुबर ब्हत लक्स भलतीकड व्हत

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

बाकरवडी's picture

29 Nov 2008 - 7:06 pm | बाकरवडी

कोणाचाच कोणला मेळ नाहीए .

विनायक प्रभू's picture

29 Nov 2008 - 7:07 pm | विनायक प्रभू

आता एस.एम्.एस. ची कॉम्पिटीशीन घेणार आहेत. खरे किती-ज्याचे उत्तर बरोबर त्याला ३० दिवसाचा ताज स्टे फ्री.

बाकरवडी's picture

29 Nov 2008 - 7:15 pm | बाकरवडी

सर्व मत्र्यांनाच ताज मधे पाठवा.
त्याशिवाय हे सुधारणार नाहीत.

अनामिका's picture

29 Nov 2008 - 7:19 pm | अनामिका

सर्व मत्र्यांनाच ताज मधे पाठवा.
व बरोबर पुन्हा लष्करला विंनंति करुन त्यांचे काही अतिरेकी पण.
म्हणजे कळेल समोर मृत्यु आला की कशी फाटते ति?
"अनामिका"

मदनबाण's picture

29 Nov 2008 - 7:45 pm | मदनबाण

पोलिसांच्या कॉलिस मधुन गोळीबार करत सुसाट वेगाने पळुन जाणार्‍या अतिरेक्यांच काय झाल?? :?

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

दुसरा जखमी झाला होता त्याला उपचारानंतर अज्ञातस्थळी मुं.पोलीसांनी हलवले. त्याच्या चौकशीतून ह्या हल्ल्याची तयारी ५ महिने सुरु होती आणि पाकिस्तान लष्कराचा सक्रीय सहभाग होता हे उघडझाले आहे!

चतुरंग