लॉकडाऊन: वर्षपूर्ती

प्रचेतस's picture
प्रचेतस in काथ्याकूट
24 Mar 2021 - 3:45 pm
गाभा: 

मागच्या वर्षी याच दिवशी रात्री ८ वाजता एका तेज:पुंज व्यक्तिमत्वाकडून एक सुप्रसिद्ध घोषणा झाली..."आज रात १२ बजहसे......."

पाहता पाहता एक वर्ष उलटून गेलं ह्या घोषणेला, २२ तारखेच्या थाळीबजाव जनता कर्फ्युनंतर दोनच दिवसांनी मा. पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित केला जो आजही जगातला सर्वात कठोर लॉकडाऊन समजला जातो. सुरुवातीच्या २१ दिवसांच्या लॉकडाऊननंतर कितीवेळा त्याची मुदत वाढवली गेली हे आता सांगता येणे कठीण आहे. आजही तेव्हाचे दिवस अगदी लख्खपणे आठवतात. वर्क फ्रॉम होम, मोकळेढाकळे रस्ते, चित्रविचित्र पक्षी दिसणे आणि त्यांची वाढलेली किलबिल, घरातच वेगवेगळे पदार्थ स्वतः बनवून खाणे, डालगोना कॉफी, ऑनलाईन बुद्धिबळं, ग्रुप व्हिडिओ कॉल्स आणि अजून कित्येक. ह्या सगळ्या दिवसांचा लेखाजोगा मिपावर आला नसता तर नवलच.

सुरुवातीला केवळ लॉकडाउनच्या दिवसांत तुम्ही काय काय केलंत इतक्या साध्याश्या लेखाने सुरु झालेली हे लेखन एका विस्तृत लेखमालिकेचे स्वरुप धारण करेल असं कुणाला वाटलेलंही नव्हतं. नोकरदार, डॉक्टर, प्राध्यापक, कारखानदार, व्यावसायिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मिपाकरांनी आपली लॉकडाऊन विषयक मनोगतं मिपावर मांडली. अनेक उत्तमोत्तम लेख आले. कुठलेही नियोजन न करता सुरु झालेली ही लेखमालिका मिपाकरांनी उत्स्फूर्तपणे पुढे नेली. जवळपास चाळीस दिवस ही लेखमालिका मिपावर रोज सुरु होती. अनेक नव्या, जुन्या मिपाकरांनी ह्या लेखमालिकेत सहभाग घेतला.

लॉकडाऊनच्या दिवसातील मिपावर झालेले हे दस्तऐवजीकरण हे अमूल्य आहे. कालौघात हे लेख कुठे विरुन जाऊ नयेत, म्हणून त्यांचे एकाच धाग्यात संकलन असावे असे वाटल्यामुळे हे सर्व धागे मी संकलित करुन आपल्यासमोर मांडत आहे.

१. लॉकडाऊन : पहिला दिवस-----प्रशांत

२. लॉकडाउनः दुसरा दिवस -----प्रचेतस

३. लॉकडाऊन: तिसरा दिवस----गवि

४. लाॅकडाऊन : चाैथा दिवस----गणपा

५. लॉकडाऊन: पाचवा दिवस-----किसन शिंदे

६. लॉकडाऊन: सहावा दिवस----मोदक

७. लॉकडाऊन : सातवा दिवस----सस्नेह

८. लॉकडाऊन : आठवा दिवस----दाते प्रसाद

९. लॉकडाऊन: नववा दिवस-----सतिश गावडे

१०. लॉकडाऊन : दहावा दिवस----प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

११. लॉकडाऊन : अकरावा दिवस-----चौकटराजा

१२. लॉकडाऊन:- बारावा दिवस----अत्रुप्त आत्मा

१३. लॉकडाऊन : तेरावा दिवस-----गुल्लू दादा

१४. लॉकडाऊन : चौदावा दिवस-----ज्याक ऑफ ऑल

१५. लॉकडाऊन : पंधरावा दिवस-----कुमार१

१६. लॉकडाऊन : सोळावा दिवस-----मी-दिपाली

१७. लॉकडाऊन: सतरावा दिवस लॉकडाऊन: अठरावा दिवस----अमोल गवळी

१९. लॉकडाऊन: एकोणीसावा दिवस-----कंजूस

२०. लॉकडाऊन : विसावा दिवस-----सौंदाळा

२१. लॉकडाऊन: एकविसावा दिवस-----श्रीरंग_जोशी

२२. लॉकडाऊन: बाविसावा दिवस-----जोजो

२३. लॉकडाऊन: तेविसावा दिवस -----वामन देशमुख

२४. लॉकडाऊन: चोविसावा दिवस-----चौकस२१२

२५. लॉकडाऊन: पंचविसावा दिवस-----इरसाल कार्टं

२६. लॉकडाऊन: सव्वीसावा दिवस------ज्योति अळवणी

२७. लॉकडाऊन: सत्ताविसावा दिवस----अजित पाटील

२८. लॉकडाऊन: अठ्ठाविसावा दिवस---- चिमी

२९. लॉकडाऊन: एकोणतिसावा दिवस-----माझीही शॅम्पेन

३०. लॉकडाऊन: तिसावा दिवस----सान्वी

३१. लॉकडाऊन: एकतिसावा दिवस-----ज्ञानोबाचे पैजार

३२. लॉकडाऊन : बत्तीसावा दिवस------टर्मीनेटर

३३. लॉकडाऊनः तेहेतिसावा दिवस----गणेशा

३४. लॉकडाऊनः चौतिसावा दिवस----पिंगू

३५. लॉकडाऊनः पस्तिसावा दिवस-----गणामास्तर

३६. लॉकडाऊन : छत्तीसावा दिवस----गवि

३७. लाॅकडाऊन: सदतिसावा दिवस-----मी-दिपाली

३८. लाॅकडाऊन: अडतिसावा दिवस-----किसन शिंदे

३९. लॉकडाऊन : एकोणचाळीसावा दिवस-----आजी

४०. लॉकडाऊन: चाळीसावा दिवस------नीलकांत

प्रतिक्रिया

गवि's picture

24 Mar 2021 - 3:52 pm | गवि

उत्तम केले. धन्यवाद..

चंद्रसूर्यकुमार's picture

24 Mar 2021 - 4:08 pm | चंद्रसूर्यकुमार

लॉकडाऊन लागल्यावर काही दिवसातच आमचे वॉशिंग मशीन बंद पडले. अगदी मुहुर्त काढून मशीन बंद पडले होते. त्यामुळे दररोज हाताने कपडे धुणे आले. आणि नुसते कपडेच नाही तर चादरी, पांघरूणे पण मधूनमधून असायची. जूनच्या सुरवातीला एक मेकॅनिक कसाबसा मिळाला पण समजले की मशीन सुरू करायला लागणारा एक इलेक्ट्रॉनिक कम्पोनंट बिघडला होता आणि तो बदलून मिळणे लगेच शक्य नाही. तरीही त्याने कुठूनतरी जुगाड करून पंधरा दिवसात तो कंपोनंट आणला आणि एकदाचे मशीन सुरू करून दिले. जवळपास अडीच महिने कपडे हाताने धुवावे लागले होते. वॉशिंग मशीन दुरूस्त झाले तोच काही दिवसात फ्रीजने राम म्हटला. पण नशीबाने त्यावेळी पूर्ण लॉकडाऊन राहिला नव्हता त्यामुळे मेकॅनिक मिळायला अडचण झाली नाही तरी त्यातही १० दिवस गेलेच.

चांदणे संदीप's picture

24 Mar 2021 - 6:21 pm | चांदणे संदीप

सेम पिंच!

सं - दी - प

कुमार१'s picture

24 Mar 2021 - 5:24 pm | कुमार१

उत्तम केले. धन्यवाद..

मुक्त विहारि's picture

24 Mar 2021 - 6:04 pm | मुक्त विहारि

उत्तम

रंगीला रतन's picture

24 Mar 2021 - 6:05 pm | रंगीला रतन

फार छान काम केलेत. वाचनखुण साठवतो.
यातला एकही लेख वाचला नाहीये. आता सगळे वाचणार. आभारी आहे.

चांदणे संदीप's picture

24 Mar 2021 - 6:27 pm | चांदणे संदीप

छान केलंत वल्लीदा! आता पुन्हा एकेक करून वाचता येईल.
लेखमाला अनपेक्षितपणे वाढली त्याला लिहिणार्‍यांनी जसा प्रतिसाद दिला तसा मिपाकर वाचकांनीही दिला.
यानिमित्ताने पुन्हा त्या सगळ्या आठवणी फ्रेश होऊन समोर उभा राहिल्या.

सं - दी - प

सौंदाळा's picture

24 Mar 2021 - 7:12 pm | सौंदाळा

धन्यवाद
बादवे सरांशी बुद्धीबळ खेळता का आता? एखादा डाव असेल तर टाका इकडे.
आता रुटीन सेट झालंय. लुडो, पत्ते, कॅरम वगैरे पूर्ण बंद. स्वयंपाकघरातील लुडबुड पण कमी झाली आहे. काम मात्र भरपूर वाढले आहे.
आई वडिलांना लसीचा पहिला डोस दिला.

सरच माझ्याशी खेळत नाहीत आता :) आपण मात्र डाव टाकूच.
माझ्याही आईवडिलांचा पहिला डोस झाला, कॉव्हॅक्सिन मिळाली.

मला नाही येत खेळायला. म्हणजे नियम माहीत आहेत पण खेळालोच नाही विशेष कधी.
मी म्हणत होतो सरांबरोबरचा हल्ली खेळलेला एखादा डाव असेल तर टाका. पण सर खेळत नाहीत मग विषयच संपला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2021 - 9:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> सरच माझ्याशी खेळत नाहीत आता :)

काम आहेत सध्या पेक्षा आपल्याबरोबर बुद्धीबळ खेळायला मजा येते. पण सामना हरल्यानंतर आपण जे, सर कसे हरले, किती वेळात हरले, वजीर कसा घेतला, जे रसभरीत वर्णन करता त्याचा मला त्रास होतो. म्हणून खेळ बंद, कितीही लॉकडाऊन झाले आणि कितीही करोना व्हर्जन्स आली तरी :/

सामना आहे, हारजित होती है चलो गले मिलो असे वृत्ती नाही तुमची. खेळ हा खेळभावनेने खेळला गेला पाहिजे. च्यायला,आयुष्यात खवट मित्र काय कमी होते, या मिपाने अजून एक भर घातली. :(

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

24 Mar 2021 - 9:59 pm | प्रचेतस

=))

आठच्या टायमिंग नुसार तर मीच पयला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2021 - 9:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सगळ्या आठवणी जाग्या केल्या मन:पूर्वक आभार. खरं तर करोना आणि आज रातसे सब बंद म्हटल्यावर पहिल्या लॉकडाऊनला आपल्या सर्वांची xx फाटली होती. ( अपवाद असतील) पण एकमेकांची सोबत, धिराच्या गोष्टी, अनुभव याने ज़रा स्थिरास्थावर झाली. धन्यवाद मिपा आणि मिपाकर्स.

-दिलीप बिरुटे

कपिलमुनी's picture

25 Mar 2021 - 4:30 am | कपिलमुनी

लेख बरे आहेत.
सामाजिक परिस्थिती फार कमी लेखात व्यक्त झाली आहे.
एकंदरीत चटपटीत , टीपी लेख वाटले

लॉकडाऊन थोडा सरला होता तेव्हाची गोष्ट..
वृद्ध जोडपे, एकटे मुंबई उपनगरात राहते , हळू हळू घरातील वाढल्या कामामुळे थकलेले जीव ,भांडी करण्यासाठी मोलकरणीला येऊ द्यायचे का नाही?
कपडे धुवायला मशीन होते पण भांड्यांचे काय?
मला भारतात जाणे शक्य नवहते आणि असे जाऊन जाऊन ४ आठवडे फार तर ... आणि परतीच्या वाटा आमच्या सरकारने बंद केलेल्या ( अजूनही बंदच आहेत )
मग ठरवले घरात बसेल असे डिश वॉशर घ्य्याचे .. ( मोलकरणी वर थोडा अन्याय झाला .. तिला १-२ महिन्याचा जास्त पगार दिला आणि सांगितलं सध्या तरी येऊ नकोस .. शेवटी आपलं आपल्याला बघावाच लागते सामाजिक परिस्थिती!..) असो
एक बरे असते कि डिश वॉशर मध्ये आतच पाणी गरम होते पण त्यामुळे फक्त गार पाण्याचा नळ लागतो...
आता प्रश्न असा कि ज्या प्रमाणात कपडे धुण्याचे य्न्त्र भारतात सर्रास मिळते त्या मानाने डिश वॉशर कमी वापरला जातो ..
आलेल्या अडचणी:
-वृद्ध जोडपे ओनलाईन बँकिंग करीत नाही त्यांचे कडे क्रेडिट कार्ड नाही मग पैसे कसे भरणार ? आणि ते घराबाहेर पडणे शक्य नाही
-प्रथम उपनगरातील विजय सेल्स सारखया प्रसिद्ध दुकानातून घ्याचे ठरवले.. पण त्यांचं कडे पारदशातून पैसे घेण्याची सोयच नाही भारतातील व्हिसा कार्ड चालते पण बाहेरील नाही.. बरं ठीक .. ज्या ब्रँड चे पाहिजे होते ते उपलब्ध नवहते त्यासाठी १००० रुपये आधी पाठवून रांगेत क्रमांक लाव.. ठीक आह म्हन्ले त्यांना मी पैसे बँक ट्रान्सफर नि पाठवतो पण १००० नाही पूर्ण पैसे एकाच वेळेस पाठवतो... ते नाही जमणार...असे उत्तर आले मी म्हणले अरे बाबा १,००० रुपये पाठवण्यासाठी मी कशाला २५० रु भरू १००० काय आणि ५०,००० काय मला २५० च द्व्यारे लागतात... मग ते फिस्कटले
- ऍमेझॉन ( भारतातील ) उपलब्ध होते आणि ते बहेरुन पैसे घ्यायला तयार होते .. ते झाले पण त्यासाठी त्या जोडप्याच्या नावाने भारतातील ऍमेझॉन वर खाते उघडले आणि त्याला माझे बाहेरील कार्ड जोडले जेणेकरून सर्व निरोप ते त्यांना जातील .. नाहीतर रात्री २ वाजता मला इथे मेसेज !
- पुढलं प्रश्न नळ जोडणी... .. नेहमीच प्लुबर सापडेना... ऍमेझॉन आणि मशीन चे विक्रते काही मदत करू शकत नवहते , स्वयंपाकघरातील बेसिन वरील नळाला "टी" बसवणे आणि घाण पाण्यासाठी नली आणि ति बेसिन खालील कपाटात भोक पडून किंवा ते कापून त्यातून पुढे सरकवणे हे साधे कम्म होते...
मग सापडले "अर्बन कंपनी".. पण त्यात जे "स्ट्यांडर्ड " सेवा तुम्ही बोलवू शकत टाय "डिश वॉशर साठीची जोडणी" असे काही नाही..
भारतातील तोल फ्री क्रमांक आहे पण मला त्याचा उपयोग नाही कारण बाहेरून भारतातील टोल फ्री क्रमांकाला फोने करता येत नाही ( करुन बघा !) लँडलाईन किंवा मोबाइलला फोन करून विचारू तर तो नाहीच ! कहर म्हणजे अर्बन कंपनीचा येथील क्रमांक सापडला तिथे विचारले आणि फोन वर भारतीय माणूस... मला वाटले काल सेंटर भारतातात आहे .. चला म्हणजे माहिती मिळेल .. तर तो म्हणलं अहो मी भारतात नाहीये इथे प्रदेशात आहे .. आणि भारतातील सेवेबद्दल काही मदत नाही करू शकत
शेवटी नातेवाईकाने मदत केली आणि ५० रु ची "प्लुम्बर येईल आणि बघून खर्चाचा अंदाज देईल" अशी सेवा होती ती त्याने ठरवली
- ज्या वेळीस हा प्लंबर आला त्या वेळीस विडिओ कॉल करून सर्व त्याला आणि वृद्ध जोडप्यास समजावून सांगितले .. आणि मग हे काम झाले ...
हजारो मैलांवरून असा हा "प्रॉजेक्त्त म्यानेज " केला गेला ...हुश्श्य
- एक संबंधित प्रश्न : भारतातील पाण्यात कधी कधी कठीण पाणी असू शकते म्हणून भारतात जी डिश वॉशर यंत्रे मिटता त्यात मीठ टाकण्यासाठी एक वेगळा कप्पा असतो... हे मीठ या कंपन्या अव्वा चाय सव्वा किंतील विकतात... साधे मीठ टाकलेलं चालते का ? कोणाला महती असल्यास सांगावे

इति.. थाळी धुणे यंत्र कथा सम्न्पुर्नम

रंगीला रतन's picture

25 Mar 2021 - 10:11 am | रंगीला रतन

पाव्हणं या कथेची भाषा कोनती म्हनायची? मोडी पाली की अर्धमागधी? मऱ्हाठी वाणी दिसतिया पन वाटून न्हाय राहिली.

चौकस२१२'s picture

25 Mar 2021 - 11:46 am | चौकस२१२

रंगीला रतन
हा स्वानुभव होता - थोडक्यात बुलेट पॉईंटच्यात लिहिण्याचा प्रयत्न केला .. त्यात नेहमीची गडबड आणि देवनागरीत इसकाळ वरून लिहितांना होणारी गडबड आणि त्यातून होणारा अनर्थ असे असेल.. तर क्षमा
पण अनुभवाचा भावार्थ ना समजण्याएवडः अगाध आहे कि काय?

बहार्ड वॉटर मध्ये कॅल्शिअम ची रसायने असतात त्याला सॉफ्ट करण्यासाठी सोडिअम वापरले जाते त्यामुळे सर्वसाधारण सफेद मीठ बिनधास्त चालेल. पण काळजी घ्या कि आणखीन काही घाण मिक्स होणार नाही.

त्याशिवाय पाणी हार्ड आहे म्हणून घाबरण्याची गरज नाही. नाही तरी ते मशीन १० वर्षे टिकणार नाही, १० वर्षांत फार चांगली आणि किफायती मशिन्स येतील.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Mar 2021 - 8:21 am | ज्ञानोबाचे पैजार

मनःपूर्वक धन्यवाद वल्लीदा,
आता परत वाचतो सगळे लेख

पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

25 Mar 2021 - 12:21 pm | चौथा कोनाडा

लॉकडाऊनच्या काळात जवळचा नातेवाईक आकस्मिकपणे र्‍हदयविकाराने निवर्तला, त्या दु:खद आठवणी जाग्या झाल्या.
सुरेख संकलन आणि अवलोकन!
वल्लीसाहेब +१

तुषार काळभोर's picture

25 Mar 2021 - 12:50 pm | तुषार काळभोर

डायरी ही कल्पना अतिशय उत्तम होती. जेव्हा कधी कोरोना काळाचा आढावा घेतला जाईल, तेव्हा मराठी आंतरजालावरील कोरोनाच्या संदर्भात मिपा-कोरोना डायरीचा उल्लेख नक्कीच होईल. (जसा मिपाच्या दिवाळी अंक, श्रीगणेश लेखमाला यांचा होतो)

असा काळ आपल्या सर्वांच्या आयुष्यात 'न भुतो: न भविष्यति" असा होता.

सुदैवाने ऑलमोस्ट सगळे मिपाकर सुखवस्तू (किमान खाऊन पिऊन सुखी) क्याटेगरीतील असल्याने घरात बसून येणारा कंटाळा, वर्क फ्रॉम होम, किंवा नवे छंद, खाणे-पिणे याचे अनुभव जास्त असणे अपेक्षित होते.

पण, लॉकडाऊन मधील जिलेबी, डोल्गोना कॉफी, वर्क फ्रॉम होम, यांच्या पलीकडील काही ओरखडे आणि आठवणी…

Rajesh188's picture

25 Mar 2021 - 3:55 pm | Rajesh188

Feb ७ ते feb १५, पर्यंत गावीच होतो .
सहकुटुंब सह परिवार.
गावची यात्रा होती . आल्या वर लॉक डाऊन झाले .
लॉक डाऊन झाले तेव्हा सर्व च घरातील सदस्य घरीच होते.
एक गोष्ट मात्र पक्की लक्षात आहे.
चीन मधून corona नावाच्या रोगाच्या बातम्या आपले न्यूज चॅनेल दाखवत होते.
Wuhan ह्या चीन मधील शहरात हा संसर्ग जन्य रोग पसरला होता.
भारतीय मीडिया त्या बातम्या दाखवत होत्या पण त्यांचे बुध्दी नेहमी प्रमाणे सीमित वृत्तांकन करण्यात च चालत होती.
Wuhan शहरात लोकांना घरा बाहेर येण्यास मज्जाव होता.
रस्त्यावर पोलिस गाड्या अडवून लोकांना बाहेर खेचत होते.(,का हे भारतीय मीडिया ला माहीत नव्हते)असे वाटावे लोकांवर अन्याय होत आहे.
अशा खूप बातम्या येत होत्या .
पण मीडिया वर चर्चा काय तर चीन ची लोक कोण कोणते प्राणी खातात ,त्यांचा मांस बाजार.
सर्व उथळ कारभार.
पण covid व्हायरस विषयी योग्य बातमी कोणीच देत नव्हते.
भारतीय लोक चीन मधील बातम्या ची मज्जा घेत होते आणि चिनी लोक कशी मूर्ख आणि आम्ही कसे हुशार ह्या स्वप्नात भारतीय लोक
होती.
Who ही संस्था झोपा काढत होती .
वुहान ची स्थिती बघून लगेच युद्ध स्तरावर चीन चा संपर्क बाकी जागा शी तोडला पाहिजे असा इशारा who नी दिला नाही.
उलट बाकी देश कन्फ्युज कसे राहतील ह्याची काळजी who आणि संशोधक लोक घेत होती
जगात आज जी स्थिती निर्माण झाली आहे त्याला.
Who,संशोधक,सर्व देशांची सरकार जबाबदार आहेत..
वुहान ची मज्जा बघण्यात वेळ न लावता चीन शी सर्व संपर्क जगाने तोडला असता तर आज ही अवस्था झालीच नसती. .
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे corona चीन मध्ये पसरलाच नाहीं
.
चीन मध्ये पूर्ण देशभर कधीच लॉक डाऊन झाले नाही.
आता चीन मध्ये covid नावाचं रोग अस्तित्वात च नाही.
आणि अती हुशार भारत,अमेरिका,ब्रिटन,ब्राझील हे देश covid समोर हतबल आहेतं.
घ्या चीन ची मज्जा.

सुबोध खरे's picture

25 Mar 2021 - 8:30 pm | सुबोध खरे

लॉकडाऊनमधील अडचणी

माझ्या अडचणी सांगायच्या झाल्या तर एक लेखमालाच होईल.

दवाखाना संपूर्ण काळात उघडाच होता.

पण प्रथम सोसायटीने आम्हाला बाहेर काढायची धमकी दिली यानंतर मोलकरणीला येऊ देत नव्हते. तीन वेळेस अगोदर नगर सेवक नंतर आमदार आणि शेवटी डेप्युटी रजिस्ट्रार पर्यंत तक्रार करायला लागली.

सुरुवात ए सी बिघडण्यापासून झाली. तो दुरुस्त केला.

मग माझा संगणक क्रॅश झाला त्यात विंडो एक्स पी होते त्यातील रेडिओलॉजी सॉफ्टवेअर विंडो १० मध्ये चालत नाही. मग नवा संगणक घेतला

आता रिपोर्ट वर्ड मध्येच देतो

यानंतर सोनोग्राफी मशीनचा ट्रॅक बॉल चालेना तो दुरुस्त करायला गेलो तर त्याचा डिस्प्ले बिघडला त्याजागी बाजूला दुसरा डिस्प्ले लावून काम करत होतो तर मदर बोर्ड नीट काम करेना. म्हणून नवीन यंत्र घ्यायला लागले. किंमत ३६ लाख. कर्ज काढायला बँकेत गेलो तर ३ वर्षाचा आयकर रिटर्नची कॉपी पाहिजे. ती देण्यासाठी झेरॉक्स वाले बंद. मग सी ए ला फोन केला तर त्याचे कार्यालय बंद. त्याने कसे तरी घरून ३ वर्षाचे रिटर्न थेट बँकेला ऑनलाईन पाठवले.

यानंतर वॉशिंग मशीन बिघडले. त्याला तंत्रज्ञ खर्च ५ हजार येईल म्हणाला म्हणून नवीनच घेतले.

यानंतर आम्हाला करोना झाला १५ दिवस घरात हरी हरी म्हणत बसलो. या काळात डॉमिनार हि मोटार सायकल ची बॅटरी लीक झाली आणि सर्किट बिघडले ( याचा किस्सा मिपा वर टाकलेला आहे).

मग माझी युनिकॉर्न कष्ट द्यायला लागली मेकॅनिक म्हणाला साहेब १३ वर्षे झाली आहेत गाडीची बॉडी सडली आहे. किंमत येते आहे तर विकून टाका. ( मुलगा मुलीला चिडवतो कि तुझया लग्नासाठी बाबाला मोटार सायकल विकावी लागली)

मग मायक्रोवेव्ह बिघडला त्याची मोटार बदलली ३ हजार रुपये गेले.

मग घरचा ए सी बिघडला त्याची कॉइल अल्युमिनियमची होती. ती बदलून कॉपरची टाकली . खर्च ८ हजार.

या मधल्या काळात २५ ऑक्टोबर ला मुलीचे लग्न झाले दोन्ही कडची मिळून ५० माणसे फक्त. आमच्या २५ पैकी १६ तर अगदी घरचेच नातेवाईक. लग्नाची खरेदी सुद्धा याच काळात आटपली. लोकांना बोलावणी करणे शक्यच नव्हते.

हॉल वाला १००-१२५ लोकांना बोलवा मी मॅनेज करतो म्हणाला.

मी स्पष्ट नकार दिला . उगाच माणसे येऊन घरच्या वरिष्ठांपैकी कुणाला करोना झाला असता तर आयुष्यभरची टोचणी लागली असती.

एवढं सगळं करून आम्ही दिवाळीला मुलीचा दिवाळसण म्हणून केरळ ( मुलगी सध्या कोची ला आहे) आणि कन्याकुमारी करून आलो.

आणि फेब्रुवारी मध्ये आम्ही दोघं मुलगा, मुलगी आणि जावई चहर दिवस जीवाचं गोवा करून आलो.

जगायचं कसं ? कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?

किती सुंदर आटोपशीर लिहलंय..शेवट वाक्य मस्त!

तुषार काळभोर's picture

25 Mar 2021 - 11:03 pm | तुषार काळभोर

लईच ग्रहदशा खराब होती तुमची गेल्यावर्षी!

सुबोध खरे's picture

26 Mar 2021 - 10:44 am | सुबोध खरे

कुणीतरी लिहिलं होतं कि तुमची ( वृश्चिक राशीची) साडेसाती २०१९ च्या मध्यापासून संपते आहे.

आताशा माझा ज्योतिषावर विश्वास बसायला लागलाय

:D :D
पहिला माणूस ज्याला वाटलं असेल, उगीच साडेसाती संपली. साडेसाती मध्ये चांगलं चाललं होतं!

Bhakti's picture

25 Mar 2021 - 9:16 pm | Bhakti

माझ quarntine तर मी काही गोष्टी ठरवल्यामुळे जानेवारीमध्येच सुरू झालं होतं :). त्यामुळे कोरोना लॉक डाऊन हे असलं मला काही वेगळं वाटलच नाही.
उलट मी गमतीने म्हणायचे बघा मी घरी बसायचं ठरवलय तर बाप्पाने सगळ्यांना माझ्याबरोबर घरी बसवले.:)
सुदैवाने घरात कोणाला कोरोना झाला नाही.
दणकून उन्हाळी काम केलं,पापड,कुरडई वगैरे वगैरे.
मुलीबरोबर खुप आनंद साठवला.सगळ्या सणांचा मनसोक्त आनंद घेतला.मित्र मैत्रीणींशी पुन्हा नव्याने भेटले.पुन्हा लिखाण केलं ब्लॉग लिहीले इतके की ४ बक्षीस मिळवली.
काही जुन सुटलेल वर्तुळ ध्यानी ना मनी पुन्हा पूर्ण झालं.
...
वाचतेय हा सुंदर ठेवा वाचतेय.

कपिलमुनी's picture

25 Mar 2021 - 9:56 pm | कपिलमुनी

डिसेंबर शेवटच्या आठवड्यात पहिल्यांदा बाबा झालो , मार्च च्या पहिल्या आठवड्यात लॉक डाऊन ची कुणकुण लागताच सौ आणि बाळाला माहेरून घेऊन आलो. तेव्हा पासून आज वर्षं कसा गेला कळलच नाही.
लॉक डाऊन मुळे पूर्ण बाळ लीला बघता , अनुभवता आल्या.

एकंदरीत लॉकडाऊन माझ्यासाठी फार आनंददायक ठरलाय

रंगीला रतन's picture

25 Mar 2021 - 11:43 pm | रंगीला रतन

यात सामाजिक काय आहे? हे वैयक्तिक झालं!
तुमच्याकडून काहीतरी टीपी, वैयक्तिक सोडून सामाजिक अपेक्षित होतं :)

कपिलमुनी's picture

26 Mar 2021 - 1:06 am | कपिलमुनी

सगळंच खासगी अनुभव शेयर करत आहेत, म्हणून तीच लाईन पकडली आहे.

सोशल लिहिला की नेहमीचे धुरळामंडळ येऊन विचका करतील.

रंगीला रतन's picture

26 Mar 2021 - 1:25 am | रंगीला रतन

वैयक्तिक अनुभव शेअर करण्यास हरकत नाही. पण तुम्हीच सामाजिक परिस्थितीवर फार कोणी लिहिले नसल्या बद्दल टिप्पणी केली होती त्यामुळे तुमच्याकडून तशी अपेक्षा होती :)
मगाच्या प्रतिसादात लिहायचे राहिले होते ते आता लिहितो - बाबा झाल्या बद्दल तुमचे अभिनंदन आणि बच्चूस आशीर्वाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Mar 2021 - 11:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हिशेब कंप्लीट. असे म्हणायला पाहिजे होते शेवटी. (ह.घ्या)

-दिलीप बिरुटे
(हिशेबनिस)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2021 - 7:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> मागच्या वर्षी याच दिवशी रात्री ८ वाजता एका तेज:पुंज व्यक्तिमत्वाकडून एक सुप्रसिद्ध घोषणा झाली..."आज रात १२ बजहसे......."

=)) अरे देवा या ओळी वाचल्याच नव्हत्या. हसुन हसुन पुरेवाट झाली....!

बाय द वे, आदरणीय प्रचेतस सर. आयुष्यात अनेक लोकांनी आपल्याला प्रसंगपरत्वे फसवले असेल, आपण फसल्या गेलोही असू पण आदरणीय सेठच्या विविध टास्कने आपण फारच वेड्यात काढले गेलो, आठवणीने भयंकर त्रास होतो.

-दिलीप बिरुटे