"माझं जरा ऐकाल का?"
"दह्शतवादाचा बिमोड करण्यासाठि माझ्यामते पुढिल उपाय आवश्यक आहेत.........."
१. मुंबईसारख्या महत्वाच्या शहरातिल पोलिसांना एके-४७, एके-५६ वा तशाच सक्षम रायफली, व बुलेटप्रुफ जैकेटं पुरवावीत.
२. मुंबईसारख्या महत्वाच्या शहरातिल सर्व शासकीय व खाजगी महत्वांच्या जागांना कडेकोट सुरक्षाव्यवस्था. (कारण हे दह्शतवादी नेहमी महत्वाची ठीकाणच नेमकी हेरतात.)
३. मुंबईत येणारया या नराधमांचा (all time) पिच्छा...(जर आपण त्यांचा पिच्छा केला नाही तर पुन्हा भविष्यात 'ते' नक्कीच येतील)
४. मुंबईची कसुन तपासणी (दहशतवादि मुंबईत लपुन बसु शकतात.)
५. पुन्हा वाकड्या नजरेने भारताकडे बघणार नाहीत अशी क्रुती अपेक्षित. ( संबधित सर्व सुरक्षा यंत्रणानी दहशतवाद्यांचा माग काढत त्यांच्या अस्तित्वालाच challenge करावं.)
६.सुरक्षाव्यवस्था सारख्या विषयात राजकारण करणारे (*****) नकोत.
(१ शहिद...... )
प्रतिक्रिया
29 Nov 2008 - 3:57 pm | मदनबाण
१. मुंबईसारख्या महत्वाच्या शहरातिल पोलिसांना एके-४७, एके-५६ वा तशाच सक्षम रायफली, व बुलेटप्रुफ जैकेटं पुरवावीत.
एके ४७ आणि ५६ चे माहित नाही पण चांगल्या दर्जाची बुलेटप्रुफ जैकेटं देणार आहेत म्हणे ते सुध्दा २००९ च्या शेवटीच मिळु शकणार आहेत्..तो पर्यत असे हल्ले होणार नाहीत याची शासन खात्री देऊ शकेल का ? उत्तर तुम्हाला माहितच आहे!!
२. मुंबईसारख्या महत्वाच्या शहरातिल सर्व शासकीय व खाजगी महत्वांच्या जागांना कडेकोट सुरक्षाव्यवस्था. (कारण हे दह्शतवादी नेहमी महत्वाची ठीकाणच नेमकी हेरतात.)
सामान्य माणसांना कोण सुरक्षा देणार ?? हे लोक स्वतः झेड+ सुरक्षा घेऊन फिरतात्..त्यांचा जिव जनते पेक्षा जास्त महत्वाचा आहे ना !!
३. मुंबईत येणारया या नराधमांचा (all time) पिच्छा...(जर आपण त्यांचा पिच्छा केला नाही तर पुन्हा भविष्यात 'ते' नक्कीच येतील)
पिच्छा ?? मुळात इथं येता येणारच नाही असा बदवस्त हवा..चार दिवस नाकाबंदी करुन काय मिळणार ?
४. मुंबईची कसुन तपासणी (दहशतवादि मुंबईत लपुन बसु शकतात.)
तपासणी ? मुंब्र्यात काही ठिकाणी पोलिस जाऊ सुध्दा शकत नाही असे कुठे तरी वाचल्याचे सारखे वाटतय मला.भिंवंडीत काय झाल हे सर्वांनाच माहित आहे.पोलिसांची जरब बसायला हवी ना अशा जागी ?
५. पुन्हा वाकड्या नजरेने भारताकडे बघणार नाहीत अशी क्रुती अपेक्षित. ( संबधित सर्व सुरक्षा यंत्रणानी दहशतवाद्यांचा माग काढत त्यांच्या अस्तित्वालाच challenge करावं.)
अस्तित्वालाच challenge करावं ? माझ्या मते अस्तित्वच नष्ट करणे !!
६.सुरक्षाव्यवस्था सारख्या विषयात राजकारण करणारे (*****) नकोत.
मग राजकारणी काय करणार ??त्यांना काही काम उरेल का ? हिंदूस्थानाचा किती विकास सर्व पक्षांनी केला हे आपणा सर्वांना माहित नाही का?
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
29 Nov 2008 - 3:57 pm | विसुनाना
एक उमदा, नर्मविनोदी स्वभावाचा तरूण संदीप उन्नीकृष्णन. (हुतात्मा...!!!)
high school: the frank anthony public school, bangalore
industry: Government
job description: non-productive
career interests: finance, human resources management
अरे संदीप, तुझा 'जॉब' नॉन-प्रॉडक्टीव्ह कसा म्हणता येईल रे? इतका 'प्रॉडक्टीव्ह' जॉब जगात दुसरा शोधून सापडेल काय? तू तर आमच्यासारख्या सामान्य भारतीयांच्या जीवनाचं रक्षण करत होतास.फक्त तुझ्या 'इंडस्ट्री'तले चोरमन झोपा काढत होते.
संदीपचा ऑर्कुट प्रोफाईल इथे पहा.
29 Nov 2008 - 4:19 pm | विकि
असले उपाय १९९३ चे बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्वरीत करायला हवे होते.असो
29 Nov 2008 - 10:03 pm | १.५ शहाणा
असले उपाय १९९३ चे बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्वरीत करायला हवे होते.असो आपले नेहमी चे ये रे माझ्या माग्ल्या...............
29 Nov 2008 - 10:04 pm | १.५ शहाणा
असले उपाय १९९३ चे बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्वरीत करायला हवे होते.असो आपले नेहमी चे ये रे माझ्या माग्ल्या...............