राजकीय पक्षांची संकेत स्थळे

विकास's picture
विकास in काथ्याकूट
29 Nov 2008 - 10:52 am
गाभा: 

मुंबई हल्ल्यानंतर उत्सुकते पोटी कोणकोणत्या प्रमुख राजकीय पक्षांनी शोक "फॉर्मली" व्यक्त करणारी विधाने त्यांच्या संकेतस्थळावर लिहीली आहेत हे पहायला गेलो:

काँग्रेसच्या संकेतस्थळावर प्रथम, "Congratulations to Smt Sonia Gandhi for Leading The Congress Party to Victory in the Lok Sabha Elections 2004. This is not only a Victory for Secular India but also a resounding defeat for the Forces of Communalism." अशी ताजी बातमी आली :-). संकेतस्थळावर प्रवेश केल्यावर मग बाकीच्या बातम्या, पण मुंबई हल्ल्यासंदर्भात शब्द नाही...व्हि.पी. सिंगांसंबंधीत काहीच नाही. :-(

भाजपच्या संकेतस्थळावर अडवानी आणि वाजपेयींची प्रतिक्रीया आणि आवाहन. वाजपेयींच्या नावाने व्हि.पी.सिंगांना पण श्रद्धांजली होती.

भाजपचे हाडवैरी (आणि उलट!) असलेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाच्या संकेतस्थळावर देखील मुंबई हल्ल्यासंदर्भात विधाने तसेच व्हि.पी सिंगांना श्रद्धांजली.

शिवसेनेच्या संकेतस्थळावर ताजे काहीच नसते पण मुखपत्राचे संकेतस्थळ बरेच लिहीत असते. (फायरफॉक्स मधे हा "टायगर" दिसत नाही :-) )

राष्ट्रवादी काँग्रेस अजून काहीच लिहीलेले नाही...

यावरून राजकीय पक्षांची प्रसंगासंबधीची आणि तंत्रज्ञानाच्या वापरा संबंधीची आस्था तरी किमान समजते. बाकी जे काही समजून घेयचे असेल ते घ्या...

प्रतिक्रिया

अनंत छंदी's picture

29 Nov 2008 - 11:16 am | अनंत छंदी

जरा या संकेतस्थळांच्या लिंक्स द्या ना, मी ही स्वतःची घटकाभर करमणूक करून घेईन म्हणतो!

लिंक्स दिलेल्याच आहेत. फक्त पक्षावर क्लिक करा
तरी देतो खाली

शिवसेना http://www.shivsena.org/
भाजपा http://bjp.org/
काँग्रेस http://www.congress.org.in/
रा.काँग्रेस http://www.ncp.org.in/
सीपीएम http://cpim.org/

अवांतरः
बाकी काँग्रेसची वेबसाईटदेखील सोनियामय आहे. धोरणांची पायमल्ली आणि गांधी या व्यक्तीची (सध्या सोनियाची) व्यक्ती पूजा ही काँग्रेसचा अविभाज्य भाग आहे.) गांधीबाबांनी दिलेल्या फाळणीची जखम भरुन येत नाही तोवर सोनियाशासनात झालेले कित्येक अतिरेक्यांचे हल्ले त्या जखमेवर मीठ चोळताहेत. सर्वधर्मसमभाव सांगणार्‍या काँग्रेसच्याच कारकिर्दीत धार्मिक तंटे सर्वात जास्त झालेले आहेत हे खेदाने म्हणावे लागत आहे.
सुज्ञ मतदार राजा जागा हो हे म्हणायची वेळ नक्कीच आलेली आहे (चांगल्या गोष्टीसाठी कोणतीही वेळ योग्यच असते)

यदा यदा ही धर्मस्य....

मुंबईवर झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत पावलेल्या सर्वच मृतांच्या आत्म्यांना शांती आणि सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना
आणि त्यातून सुटलेल्या सर्वांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावलेल्या सर्व शहीद झालेल्या आणि जिवंत असलेल्या सर्वच शूरवीरांना मानाचा मुजरा....

जय हिंद!!! जय महाराष्ट्र!!!
- सागर

आजानुकर्ण's picture

29 Nov 2008 - 9:01 pm | आजानुकर्ण

गांधीबाबांबद्दलचे मत वगळता सागरशी सहमत आहे...त्याचबरोबर हेही नमूद करावेसे वाचते की शिवसेनेची साईट ठाकरेमय आहे. बाळ ठाकरे या व्यक्तीची पूजा हा शिवसेनेचा अविभाज्य भाग आहे.

ऋषिकेश's picture

29 Nov 2008 - 10:04 pm | ऋषिकेश

सुज्ञ मतदार राजा जागा हो हे म्हणायची वेळ नक्कीच आलेली आहे

+१
फक्त "जागे होणे = काँग्रेसचा आंधळा द्वेष" असे समीकरण असू नये इतकेच वाटते.. तर मतदाराने खरोखर जागे व्हावे...

गांधींबद्दलच्या मतास -१

-(गोंधळलेला) ऋषिकेश

सुक्या's picture

29 Nov 2008 - 11:21 am | सुक्या

म्रुतांच्या टाळुवरचे लोणी खाणार्‍या या राजकीय पक्षांच्या नेत्रुत्वाकडुन काहीही अपेक्षा नाही. त्यांनी या घटनेचा राजकीय / मतांसाठी फायदा घेउन आमच्या जखमेवर मीठ चोळु नये हीच आमची हात जोडुन विनंती. फालतु लोकांना काय वाटते ते याविषयी काय म्हनतात याच्याशी आम्हाला काहीही घेणे नाही.

(एका राजकीय पक्षाने प्रसिध्द केलेली जाहीरात काल टी. व्ही. वप पाहील्यावर माझी मान खाली गेली. लाज वाटली मला.)

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

विकास's picture

29 Nov 2008 - 11:23 am | विकास

प्रश्न सहानभूतीचा नाही पण आधी म्हणल्याप्रमाणे, "यावरून राजकीय पक्षांची प्रसंगासंबधीची आणि तंत्रज्ञानाच्या वापरा संबंधीची आस्था तरी किमान समजते."

सुक्या's picture

29 Nov 2008 - 11:29 am | सुक्या

हे लोक ताज मधे मिशन चलु असताना आपली जात दाखवत राजकीय स्टंटबाजी करत भाषण करायला आले तेव्हाच त्यांची आस्था समजली.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

परिकथेतील राजकुमार's picture

29 Nov 2008 - 11:35 am | परिकथेतील राजकुमार

ह्या नादान लोकांनी वहिलेल्या श्रद्धांजली मुळे त्या वीरमरण प्राप्त झालेल्या शहिदांच्या आत्म्याला यातनाच होतिल !!

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

स्वप्निल..'s picture

29 Nov 2008 - 11:54 am | स्वप्निल..

राजकीय पक्षांची तंत्रज्ञानाच्या बाबतीत बोंबच आहे..सर्वांना फक्त भ्रष्टारातच रस आहे..

त्याबाबतीत मला अडवानींचे संकेतस्थळ आवडले.. http://lkadvani.in/eng/index.php
बाकी सर्वांपेक्षा प्रगत दिसते आणि अपडेटेड सुद्धा..

>>मी भाजपा शी संबधित नाही...

स्वप्निल

विसोबा खेचर's picture

29 Nov 2008 - 4:14 pm | विसोबा खेचर

बाकी जे काही समजून घेयचे असेल ते घ्या...

हा हा हा! :)

ऋषिकेश's picture

29 Nov 2008 - 10:38 pm | ऋषिकेश

विकास,
या रोचक गोष्टीकडे लक्ष वेधल्याबद्दल आभार..
बहुतांश संस्थळे बघून बरीच करमणूक झाली

-(गोंधळलेला) ऋषिकेश