अतिरेक्यांचे राष्ट्रीयत्व

विकास's picture
विकास in काथ्याकूट
28 Nov 2008 - 8:14 pm
गाभा: 

आत्ता सीएनएन वर ऐकत असल्याप्रमाणे पॉला न्युटन या लंडनमधील सिक्यूरीटी ऍनॅलिस्ट का तत्सम व्यक्तीने स्कॉटलंड यार्ड आणि मुंबई पोलीसांच्या माहीतीवर आधारीत सांगितले की किमान २ अतिरेक्यांचे राष्ट्रीयत्व हे ब्रिटनचे होते.

हे खरे असेल तरी दुद्रैवाने काही नवल नाही...

पण मला वाटते की ह्या युद्धास इतर कोणा राष्ट्रातील अतिरेकी जबाबदार असण्यापेक्षा आपल्यास देशातील अतिरेकी जबाबदार आहेत. हे अतिरेकी बंदूका घेऊन जाणारे नाहीत तर बंदुका घेऊन जाणार्‍यांकडे दुर्लक्ष केवळ पैशाच्या हावेचा अतिरेक करणारे आहेत असे वाटते.

थोड्यावेळापुर्वी बीबीसीवर ऐकल्याप्रमाणे -ताज मधे जेंव्हा पहील्या कहीतासात १७० का अशाच काही ओलीसांना सोडवले तेंव्हा खूप प्रमाणात बंदुका, गोळ्या, मॅग्झिन्स, क्रेडिटकार्डस, पैसे वगैरे मिळाले आणि जप्त केले. तरी देखील अजून चालूच आहे. हे इतक्या प्रमाणात सर्व सुरक्षाव्यवस्थेतून जातेच कसे? मला देवगिरीच्या रामदेवरायची आठवण होत आहे.

सर्व काही हट्टाने नॉर्मल वागताना मनात खूप ऍबनॉर्मल वाटत आहे.

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Nov 2008 - 9:45 pm | llपुण्याचे पेशवेll

मला तर मुंबईची आणि देशाची काळजीच वाटत आहे. आर.आर. पाटील तर अगदी थरथर कापत होते परवाच्या दिवशी. कसे होणार आहे माझ्या देशाचे. अजून मंदीचा फटका इतका बसलाच नाही तर अशा प्रकारचा दहशतवाद सुरू साला आहे. पुढे काय होईल. आता चालू असलेला दहशतवाद जर या कारणाने वाढला तर जगाला त्याच्याशी लढणे फारच अवघड जाईल. अराजक माजेल अशी भिती वाटते आहे.
पुण्याचे पेशवे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Nov 2008 - 10:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्यास देशातील अतिरेकी जबाबदार आहेत. हे अतिरेकी बंदूका घेऊन जाणारे नाहीत तर बंदुका घेऊन जाणार्‍यांकडे दुर्लक्ष केवळ पैशाच्या हावेचा अतिरेक करणारे आहेत असे वाटते.

सहमत आहे. अहो, या विषयावर कितीही बोलले तरी कमीच आहे. क्षणीक मोहापायी अजून किती वीरमरणे आणि निरपराधांची हत्या पाहावी लागणार कोणास ठाऊक ! लोकशाही यंत्रणेची संवेदनशुन्यता तर अंगवळणी झाली आहे.
राजकर्त्यांची स्वार्थी, संकूचित धोरणे, दहशतवाद पोसतात. बाहेरचे अतिरेकी येथील तरुणांना हाताशी धरतात जर बातमी खरी असेल तर( मटाची बातमी ) घरातल्याच माणसांनी घरातल्या लोकांना गोळ्या घालाव्यात ..तिसरा दिवस आहे पण अजून खात्री नाही की संपूर्ण अतिरेक्यांचा खातमा झाला की नाही म्हणून. छ्या स्वतःचीच चीड येते...काहीच लिहावे वाटत नाही ...

ऋषिकेश's picture

28 Nov 2008 - 10:18 pm | ऋषिकेश

विकासरावांशी पूर्ण सहमत

छ्या स्वतःचीच चीड येते...काहीच लिहावे वाटत नाही ...

+१

-( :( ) ऋषिकेश

ज्या थाळीत खातात त्याच थाळीत हगणात हे अतिरेकी... दोन्ही प्रकारचे - जे स्वतः अतिरेकी आहेत ते व जे त्यांना डोळ्याआड करतात ते सुद्धा. या सगळ्यांनाच कडक धोरण राबवून कंठस्नान घालायला हवे.

छ्या स्वतःचीच चीड येते...काहीच लिहावे वाटत नाही ...
आगदी मनातले बोललात डॉक्टर साहेब.

प्राजु's picture

28 Nov 2008 - 10:25 pm | प्राजु

दहशत वाद आणि त्यांचे हमले अवघ्या जगाला ग्रासलेला आहे..
माझ्या देशाला आणि मुंबईला.. वाचव या सगळ्यातून! हीच प्रार्थना करते आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आनि मायबाप सर्कार अजुन निर्वनिचा इशारा देत आहे...
आता यान्चेच निर्वान बाकि आहे....