१) मी २००८ - २००९ ला मुलीसाठी नवी मुंबईत शाळा शोधत होतो
एक ठरले होते कि मराठी माध्यमात घालायचे नाही - त्याचे प्रॉब्लेम मी आणि बायकोने पूर्ण अनुभवले होते आणि त्यामुळे हे तर नक्की होते .
आता इंग्लिश माध्यम हे बाकी ठिकाणी नवीन असले तरी मी मुंबईत ते पण पश्चिम उपनगरात राहिलो होतो आणि त्यामुळे आसपासचे सर्व इंग्लिश माध्यमात होते त्यामुळे त्याचा फायदा पाहिला होता
आता बोर्ड चा प्रश्न तर ११ वि १२ वित काही ICSE वाले आणि २ CBSE वाले ओळखीचे होते आणि लक्षात आले ह्या मुंलाना अभ्यास सोपा जातोय . तसे पण नॅशनल टॅलेन्ट search परीक्षा दिली होती आणि त्यासाठी सातवीपासून ट्रेनिंग घेतले होते त्यासाठी CBSE ची पुस्तके वापरली होती आणि लक्षात आले कि ह्यांची काठिण्य पातळी अधिक आहे , पुस्तके फार चांगली आहेत . नंतर आयआयटी द्यायचा प्रयत्न केला आणि तेंव्हा लक्षात आले कि CBSE ची पुस्तके ( म्हणजेच NCERT ) ची हि या परीक्षेला बेस म्हणून वापरली जातात.
नंतर हि ICSE / CBSE वाल्यांचाच संबंध इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आला - ३० -३२ वर्षांपूर्वी हि नॉव्हेल्टी होती पण पश्चिम / मध्य / दक्षिण मुंबईत कोणी ना कोणी होते . अनेक जण ICSE वाले होते आणि मुले अभ्यासात चांगली होती आणि त्यापलीकडे हि मुले suave / sophisticated / polished होती . याचा फायदा त्यांना नक्की मिळाला.
बी स्कुल मध्ये ICSE / CBSE वाल्यांचे प्रमाण जास्त होते - शाळा कमी असून . आणि आठवते तिकडे त्यावेळी हि १९९१ ला CBSE ची मुले तुलनेने IIT मध्ये अधिक जातात हे ऐकले होते
नंतर मुंबईत तरी ICSE / CBSE शाळा झपाट्याने वाढू लागल्या खास करून ICSE . आणि त्यात जायला दूर जावे लागते ते हि नाही . मला बाळ तुलनेने उशिरा झाले आणि अनेक मित्र मैत्रीणीची मुले आता डिग्री पूर्व केली आहेत किंवा उच्चं शिक्षण घेत आहेत - एक दोन मैत्रिणी असल्या शाळेत शिकवत हि आहेत त्यामुळे काही गोष्टी कळल्या .
तरी मला ICSE / CBSE मध्ये CBSE अधिक चांगले वाटते कारण माझ्या माहितीत अनेक स्पर्धा परीक्षा चा बेस हा असतो
केंद्र सरकार या अभ्यासक्रमाचे नियमन करते
हा थोडा कठीण आहे ( काहींच्या मते ICSE थोडा अधिक कठीण ऐकले आहे - पण यात परत भिन्न मते आहेत )
ICSE / CBSE मध्ये मला तरी CBSE च फी तुलनेने कमी वाटली आहे . ICSE ची संलग्नता सहज मिळत असल्याने शाळा काहीही करीत असायला - यात वेगळा अनुभव हि असू शकतो
माझी मुलगी अभ्यासू नाही आणि तिला डिजिटल आर्ट करायचे असे म्हणते - मला तरी वाटते कि चांगल्या मुलांच्या मध्ये असल्याने असल्या वेगळ्या वाटेवर हि फायदा व्हावा .
मुलीची शाळा निवडताना अंतर हा निकष होता . नवी मुंबईत शाळांचे भरपूर पर्याय आहेत आणि ऍडमिशन ची तितकी मारामारी नाही
सुदैवाने घराजवळ ५ मिनिटे चालत वर रायन ची CBSE होती - रायन सानपाडा - फी प्रचंड नव्हती आणि बालवाडी मध्ये सहज ऍडमिशन मिळाली - इकडे बालवाडी ३ वर्षांची आहे , मुलीला प्ले स्कुल मध्ये टाकले नाही .
२) शाळेची फी किती आहे ते जरूर पहा आणि आपल्या आर्थिक स्थिती च्या प्रमाणात किती खर्च आहे ते पण पहा . तसेच खरे तर मला तर पहिली ते चौथी पर्यंत ची फी हि पाचवीत कमी झाल्याचे दिसले आहे पण इतर शाळांचे तसेच असेल असे नाही
एक म्हणजे शाळेचा बोर्ड वर बहुतेक पहिली ते दहावी ची फी लावलेली असते त्या वरून अंदाज येतो
तरी हि साधारण जी सरासरी फी आहे त्याच्या अडीच / तीन पट फी परवडते का ते पहा - त्या वरून अंदाज घ्या ( आपले उत्पन्न आणि महागाई पण वाढणार आहे हे पण लक्षात घ्या)
३) शाळेची साईट बघा , फेसबुक पेज असेल तर बघा , गुगल वर रिव्ह्यू बघा . अर्थात २/४ वाईट रिव्ह्यू असू शकतात . तसेच काही दहावीची बॅच पूर्ण झालेल्या शाळा नोटीस बोर्ड वर आपल्या मुलांची / माजी विद्यार्थ्याची कामगिरी लावतात - त्यामुळे शाळा किती बरी / वाईट आहे ते कळते . तसेच अभ्यासात नाही तर काही शाळा क्रीडा / कला / काही इतर ऍक्टिव्हिटी यात हि चांगल्या असतात
४) आसपास शाळेची चौकशी करा - काही वेळा लोकांकडून काही माहिती मिळते . शाळा कोणता संस्थेची आहे , कोण चालक आहेत ते हि पहा , त्यांची नावे गुगल करा .
५) जर मुलाला ICSE / CBSE बोर्ड मध्ये प्रॉब्लेम येत असेल , जमत नसेल तर कोर्स करेक्शन म्हणून SSC ला टाकायला बिचकू नका. तुलनेने सोपे असल्याने / परवडत नाही म्हणून / बदली झाली तर असे करणारे लोक आहेत . आणि हो शाळेत अभ्यासात पुढे म्हणजे पुढे नक्की काय होईल हे सांगता येत नाही . दहावी ला दोन तीन वर्ष अडकले पुढे योग्य ते कोर्स घेऊन शिकलेले आणि व्यवस्थित परफॉर्म करणारे अनेक लोक माहीत आहेत
६) शाळे संबंधी आणि बोर्डा संबंधी अजून एक निरीक्षण आहे - एखाद वेळी ते जुन्या भागात / मुंबईला लागू असेल
अनेक चांगल्या स्टेट बोर्ड इंग्लिश शाळा - त्यात काही कॉन्व्हेंट होत्या या अनुदानित आहेत आणि त्यामुळे फी अतिशय कमी आहे
पूर्वी त्यात प्रवेशासाठी फाईट असायची आता सर्वच जण ICSE / CBSE च्या मागे आहेत त्यामुळे यात प्रवेश मिळतो .
या शाळांनी हि ICSE / CBSE सुरु केले तरी स्टेट बोर्ड अनुदानित असल्याने ती शाळा चालू ठेवली आहे
तर अशी शाळा जवळ असेल तर चौकशी करून पहा -
तसेच हल्ली शाळा निकाल , अजून काही चांगले असेल ते बोर्ड वर लावतात - त्यामुळे शाळा किती चांगली वाईट हे कळायला मदत होईल
नेट वर हि शाळा कळली तर तिचे review वाचू शकता .
७) अजून २/३ इंटरनॅशनल बोर्ड पण आहेत - IGCSE / IB ते मला फार महाग वाटले आणि त्याचे भारतात शिकताना काय फायदे आहेत ते कळले नाही . किती समजले यापेक्षा हि प्रवेश परीक्षा देता येणे हे आपल्याकडे अधिक महतवाचे आहे असे माल तरी वाटते . फी पाहून या बोर्ड चा विचार केला नाही
हेमंत वाघे.
HuntMyJob.in ( Coming Soon )
प्रतिक्रिया
3 Mar 2021 - 5:18 pm | मुक्त विहारि
घटा घटाचे रूप आगळे....
आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात,"हत्तीला उडायला आणि चिमणीला चालायला शिकवू नये."
आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता आणि शैक्षणिक रस ओळखून, शिक्षण दिलेले उत्तम...
साधारण पणे, वयाच्या तिसर्या वर्षां पर्यंत, मुले आपली बौद्धिक क्षमता दाखवतात, क्वचित एखादा अपवाद निघतो.....
पण, वयाच्या 18व्या वर्षांपासून किंवा तेरावी नंतर मुलांनी स्वतःच्या कमाईला सुरूवात करावी किंवा आपले एक वेगळे स्थान निर्माण करावे...
मोठा मुलगा, इंजिनियरिंग करता करता, शिकवत होता तर धाकटा शिकता शिकता डबे पोचवतो, इथे प्रश्र्न पैशांचा नाही तर स्वतःच्या पायावर उभे राहता यायला पाहिजे...
आता काळ बदलत आहे, धंदा हा उत्तम पर्याय आहे...
गाईला चारा वाले, कौटुंबिक 50-60 हजार आणि ते देखील आयकर न भरता कमावतात
रिक्षावाले, कौटुंबिक 1000-1500 दररोज, तीन पाळ्यांत काम करून कमावतात
भाजीवाले एका दिवसांत, पैसे डबल करतात
हे कष्ट सोसण्यासाठी, मुलांना व्यायामशाळेत पाठवा... माझी मुले व्यायाम केल्या शिवाय जेवत नाहीत...
4 Mar 2021 - 11:03 am | हेमंत सुरेश वाघे
मुवि काका जर्मनी मध्ये आपली मुले शिकताना शेती करतात , गाईला चारा टाकतात का ? आणि व्यायाम केल्याशिवाय जेवत नाही ??ग्रेट!
4 Mar 2021 - 12:12 pm | मुक्त विहारि
माझ्या प्रतिसादांत, तसा उल्लेख पण नाही...
दुसरी गोष्ट अशी की, माझी मुले सर्वसामान्य आहेत, त्यांच्या कडे, IIT, IIM, MIT, IAS, IPS वगैरे साठी लागणारी उत्तम बुद्धीमत्ता पण नाही..
त्यांच्या बुद्धीचा आणि शक्तीचा, वापर करून, ते चार पैसे कमावतात...
समाजाला सगळेजण हवे असतात... प्रत्येक डाॅक्टर हा कलाकार नसतो आणि प्रत्येक कलाकार IIT,MBA ,IAS,नसतो...
4 Mar 2021 - 1:23 pm | हेमंत सुरेश वाघे
आपणच बऱ्याच पूर्वी मुले जर्मनी ला गेलीत / कि जाणार आहेत असे सांगितल्याचे आठवते .
4 Mar 2021 - 2:04 pm | मुक्त विहारि
जायचा प्रयत्न केला होता...
आणि अजुनही सुरूच आहेत... काही गोष्टी एकमेकात फसल्या आहेत... त्या गोष्टी इथे सांगण्यात अर्थ नाही... आणि ह्या धाग्याचा विषय वेगळा आहे...
बाय द वे,
आमच्या सरकारी शाळेतील, साधं SSC बोर्ड असलेली, सेमी इंग्रजी माध्यमातून न शिकलेली मुले पण, परदेशी स्थाईक झालेली आहेत आणि चांगल्या पोस्ट वर, उत्तम पगारावर आहेत...
उत्तम गुणांनी पास होऊन, काही मुले डाॅक्टर पण झाली आहेत...
काही मुले, IIT पण झाली आहेत....
माझी काही आत्ये, मावस, मामे भावंडे देखील, मराठी माध्यमातून SSC होऊन, छान पैकी परदेशी स्थाईक झालेली आहेत....
SSC बोर्डातील प्रत्येक मुलगा IIT होत नाही, तसेच, इतर माध्यमातील पण नाही...
घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाची बुद्धीमत्ता वेगळी.
4 Mar 2021 - 3:00 pm | स्वतन्त्र
आपल्या मताशी मी ९९ % सहमत.पण CBSE चा अभ्यासक्रम थोडा ऍडवान्सड असल्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या वेळेस SSC वाल्यांना थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतात हा स्व अनुभव आहे.
4 Mar 2021 - 4:23 pm | मुक्त विहारि
जास्त कष्ट घ्यावे लागतात हा स्व अनुभव आहे....
ह्याबद्दल वादच नाही...
पण, काय चुकत आहे, चुक कशी सुधारता येईल, अशा गोष्टींवर, ही हुषार मुले पटकन तोडगा काढतात...
माझी दोन्ही मुले, सेमी इंग्रजी माध्यमातून शिकली. SSC बोर्ड, फी जास्तीत जास्त हजार ते बाराशे रुपये दर वर्षी, हा माझा आर्थिक फायदा...
माझी दोन्ही मुले, अति बुद्धीवान नाहीत, हे सलग तीन वर्षे ब्रेन मॅपिंग केले तेंव्हा समजले आणि ते पण 3 वेगवेगळ्या तज्ञ माणसां कडून...
सेमी इंग्रजी माध्यमातून शिकूनही, एका मुलाने जर्मन भाषेच्या 2 लेव्हल पुर्ण केल्या तर, दुसरा मुलगा फ्रेंच भाषा शिकवतो. त्याने फ्रेंच भाषेच्या 3 लेव्हल पुर्ण केल्या....
एक जण इंजीनियरिंग आहे तर दुसरा BMS शिकत आहे...
एकाच घरात, एकाच सामाजिक वातावरणात, एकाच शाळेत शिकत असूनही, दोघांची शैक्षणिक आवड आणि प्रगती वेगवेगळी आहे...
माणसाला कधीच एका तराजूत तोलू नये.
4 Mar 2021 - 3:23 pm | हेमंत सुरेश वाघे
पण अधिक मुले एक बोर्डाची असणार तर त्यात काहीतरी वेगळे असेलच ना ?
हा CBSE चा फायदा दिसत आहे .
शिवाय आज अनेक नोकर्यात polished असणे फार महतवाचे आहे आणि या शाळेत ज्ञान मिळत नसेल - आणि त्याने काय फरक पडतो हाही प्रश्न आहे- तरी मुले स्टायलिश चकचकीत polished तरी होतात
आणि नोकरीच नाही तर अनेक व्यवसायात हि दिसणे / वागणे याला महत्व आले आहे .
अजून एक फायदा आहे.
बर्याचदा वर्गातील मुले विविध प्रयत्न करीन असतात त्याचा हि बराच फायदा होतो . अनेक ठिकाणी मुलांचे प्लान असतात पण माहिती नसते असे दिसले आहे
एका ग्रुप वर बारावी नन्तर हॉटेल मॅनेजमेंट ला जायचे तर कॉमर्स नन्तर जात येईल का असे कोणीतरी विचारले .
तर त्याला जाता तर येते पण तयारी काय केली हे विचारले तर त्याला प्रवेश परीक्षेचे माहीत नव्हते .
इकडे प्रवेश परीक्षेची तयारी दोन वर्षे खास क्लास करून करणारे माहीत आहेत - आणि हो असे करणारी भारतात मेरिट मध्ये आली .
अर्थात ती आठवीपासून याचा प्लॅन करीत होती.
SSC बोर्डातील प्रत्येक मुलगा IIT होत नाही, तसेच, इतर माध्यमातील पण नाही...- हो पण इतर बोर्डातील जाणार्या मुलांची संख्या फारच जास्त आहे - आणि इतर हि चांगल्या संस्था आहेत तिकडे हि प्रमाण जास्त आहे
घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाची बुद्धीमत्ता वेगळी. - हो आणि या बोर्डात हि अनेक जण असामान्य नसतात - अतिशय थोडासा फरक इकडचा तिकडे नेतो . अनेकदा पुढील कोर्स ला प्रवेश घेताना मुले अपुऱ्या माहितीवर चुकीचे निर्णय घेताना पाहिले आहे
4 Mar 2021 - 9:23 am | चौकस२१२
काही वर्षपूर्वी ,दिल्ली मुंबई आणि पुण्यात या संबंधी मी खालील प्रश्न विचारले होते पण कधीही धड उत्तरे मिळाली नाहीत एक तर माहिती नाही किंवा थातुर मातुर उत्तरे
- कल्पना अशी होती कि जगात २-३ देशात राह्यची परवानगी हाती असल्यामुळे बाहेर जाणे कधी।ई शक्य आहे पण जर भारतात परत यावे पुढील काही वर्षांसाठी तर पुढे पुढील पिढीने जर तिथेच राहायचे ठरवले तर किंवा परत भारताबाहेर जायचे ठरवले तर राज्य बोर्डापेक्षा यात का जावे?
शक्यता १" भारत्तातच पुढील शिक्षण मग जर पुढे इंजिनीरिंग किंवा मेडिकल ला प्रवेश हा जर त्या त्या प्रवेश परीक्षेवर ठरलेला तर फरक काय पडतो कि१२ वी उत्तम अश्या राज्य बोर्डातून केले काय किंवा तथाकथित इंटरनॅशनल शाळेतून केला काय? ( तो अभ्यासक्रम नावीन्य पूर्ण असेल वैगरे सगळे ठीक आहे पण प्रश्न तो नवहता )
शक्यता २ : १२ च्या आधी मध्येच समजा ९ वि मध्ये परत बाहेर देशात जायचे आहे खास करून पाश्चिमात्य तर भारतातील तथाकथित इंटरनॅशनल शाळेचा आणि कानडा, अमेरिक, इंग्लड ऑस्ट्रेलिया , नू झीलंड येथील शाळेत प्रवेश मिळायला काय वेगळा फायदा होतो? काहीच नाही कारण येथे येणारे नवीन स्थलांतरितांच्या मुलांना सहज प्रवेश मिळतो वयानुसार .. त्यात काहीच फरक केला जात नाही कि तुम्ही कोणत्याप्रकारचं शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलाय ते?
बरं असे धरुयात कि जगातील सर्व इंटरनॅशनल शाळेत गणित आणि शास्त्र सारखेच शिकवत असतील पण इतिहास , राज्यशास्त्र हे त्या त्या देशातीलच नको का शिक्याला
फुरसुंगीत राहून भारतीय इतिहास ना शिकता जर बेल्जियम चा इतिहास आणि इंगलंड ची राज्यवयवस्था शिकली तर काय उपयोग
किंवा फ्रांकफुर्त ला राहून इंडोनेशियन इतिहास का शिकणार आहोत?
बरं इंटरनॅशनल चा राहुंदे .. १० वि नंतर होणारी प्रवेश घ्या हि ICSE / CBSE बोर्ड जी मुलं होतात त्यांचे गुणपद्धती आणि राजय (एस एस सी ) बोर्डाची यांची गुणपद्धती यांचा मेळ कसा घालतात जेणे करून कोणावर अन्य्याय होणार नाही
काय सगळा गोंधळ
माझ्या माहितीची काही तरी गडबड होत असावी .. पण सरळ आणि स्पष्ट कोण सांगत नवहते नुसते मार्केटिंग परवडतंय ना मग घ्या प्रवेश इंटरनॅशनल शाळेत.. बस बघा कषाय वातानुकूलित आहेत असला सगळं मामला..
पण कोणाला इंटरनॅशनल म्हणजे नक्की काय हे काही सांगत आले नाही जणू असे भासवले जात होते कि लंडन मधील शिक्षक पुण्यात राहून तेथील अभ्यासक्रम शिकवतात आहेत आणि ७ वि नन्तर आठवीत जणू काही तुमची मुलं इंग्लड जाणार असतील तर विमान पकडायचा आणि तेथील शाळेत जायचं
4 Mar 2021 - 12:05 pm | स्वतन्त्र
यंदा माझ्याही मुलाची तीन वर्ष पूर्ण होत असल्यामुळे ऍडमिशन घेतली ,तेव्हा हि असेच प्रश्न मला हि पडले होते.
माझ्या समोरचे पर्याय आणि त्यावर मी शोधलेले उत्तर.
१. आय सी एस सी .
-नव्याने आलेले बोर्ड.अत्यन्त महाग व तुलनेने नुकत्याच सुरु झालेल्या शाळा या पॅटर्न ला जात आहेत. त्यामुळे ऍडमिशन घेतली नाही.
२. एस एस सी .
- माझे स्वतःचे शिक्षण याच बोर्डातून झाले असल्यामुळे याचे फायदे तोटे चांगलेच माहित आहेत,आणि तुमच्याशीच मिळते जुळते मत माझे हि या बद्दल आहे.
३.सी बी एस सी
-केंद्र सरकार या अभ्यासक्रमाचे नियमन करते, त्यामुळे देशभरात एकछत्री राहणार.पुढे पोरगा अभ्यासात बरा निघाला तर IIT वा तत्सम प्रवेशप्रक्रियेत फायदा होणार ( जो मला SSC मुळे नाही झाला ).आणि बरा नाही निघाला तर SSC आहेच .
ऍडमिशन अर्थातच घराजवळच्या (१.८ किमी अंतर - सर्वात महत्वाचा निकष ) CBSE शाळेतच.
4 Mar 2021 - 12:52 pm | चौकस२१२
पण ११ वि च्या प्रवेशात या सगळ्यांची १० वि ची तुलना कशी केली जाते हे काही अजून कळले नाही ? सुत्र ठरवुन दिले आहे का ? कि सीबीएस सी चे ८०% म्हणजे एस एस सी चे ९०%?
4 Mar 2021 - 4:56 pm | हेमंत सुरेश वाघे
फार पूर्वी असे काहीतरी होते
तेंव्हा ICSE / CBSE मध्ये कमी मार्क मिळायचे म्हणून त्यांना मुंबई तरी माल आठवते ५ टक्के अधिक मार्क देतात असे ऐकले होते .
मग काही वर्षात या बोर्डानी मार्कांची खैरात सुरु केली - तोपर्यंत हे ५ मार्क पण गेले होते .
मग SSC बोर्डाने पण खैरात सुरु केली
आता नक्की माहीत नाही
पण मुंबईत ची चांगली कॉलेज आहेत तिकडे या मुलांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे - पण असे हि असेल कि मुअम्बिसाठी हा बोर्ड तितकासा नवीन नाही - ५० एक वर्षांपासून - आणि त्याही आधी काही ICSE शाळा मुंबईत होत्या .
4 Mar 2021 - 7:57 pm | कानडाऊ योगेशु
अवांतर होईल पण लिहिण्याचा मोह आवरत नसल्याने लिहितो.
मार्क देण्यामध्ये प्रमाणीकरण नसल्याचा फार मोठा फटका महाराष्ट्रातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना काही वर्षांपूर्वीपर्यंत बसत होता.
साऊथ कडे इंजिनिअरिंगला ढिगाने मार्क देतात.डिस्टींक्शन तर कोणीही सर्वसाधारण विद्यार्थीही मिळवु शकतो. पण महाराष्ट्रातील कुठल्याही विद्यापीठातील प्रथम श्रेणीमध्ये येण्यासाठीही फार प्रयत्न करावे लागतात. आणि पुढच्या सगळ्या परिक्षांना वा मुलाखतींना किमान डिस्टींक्शन अशी पात्रतेची अट असल्यामुळे ती पात्रता पूर्ण करणारे अगदी तुरळक महाराष्ट्रीयन विद्यार्थी निघत.(महाराष्ट्रीयन म्हणतोय मराठी नाही. कारण महाराष्ट्रातील बर्याच इंजिनिअरिंग कॉलेजात परराज्यातील मुलेही शिकत असत.)
उमेदवारीच्या काळात पुण्यातील एका सरकारी आस्थापनात काम केले होते. त्या आस्थापनात शास्त्रज्ञ म्हणुन प्रवेश मिळवायचा असेल तर स्पर्धा परिक्षा असत आणि त्याची किमान पात्रता विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण ( डिस्टींक्शन) अशी असल्यामूळे फक्त एक शास्त्रज्ञ सोडुन बाकी सर्व परराज्यातील मंडळी होती.
ह्या एका मराठी शास्त्रज्ञाबद्दल मला फार आदर वाटला.महाराष्ट्रातुन पदवी मिळवुन शास्त्रज्ञ झाला म्हणजे बराच हुशार वगैरे असला पाहिजे असे वाटले. नंतर कळले तो मूळचा मराठी पण राहिला आंध्रप्रदेशात होता व तिथुनच शिकला सवरला होता.
4 Mar 2021 - 8:22 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
4 Mar 2021 - 8:44 pm | Bhakti
मार्कांची खिरापत महाराष्ट्रात चांगल्या महाविद्यालयात कधीच मिळत नाही.पण बरेचदा बाकीच्या राज्यांत भरपूर मार्कस मिळतात,जो विद्यार्थ्यांना प्लस प्लाईंट होतो.
4 Mar 2021 - 1:21 pm | नेत्रेश
अमेरीकेत प्रत्येक स्कुल डीस्ट्रीक्टचा अभ्यासक्रम वेगळा असतो. आणी अशी हजारों स्कुल डीस्ट्रीक्टस आहेत.
प्रत्येक स्कुल डीस्ट्रीक्ट स्वतःचा अभ्यासक्रम ठरवते. कुठली पुस्तके व कुठले विषय (उदा:: जगाच ईतिहास, की अमेरीकेचा ईतीहास, की युरोपचा ईतिहास) कुठल्या ईतत्तेला शिकवायचे (किंवा नाही) हे सर्व स्कुल डीस्ट्रीक्ट ठरवते.
घराच्या पत्यावरुन मुलांचा स्कुल डीस्ट्रीक्ट ठरतो, व त्यातले स्कुलही ठरते. उगाच कुठलया लांबच्या शाळेत प्रवेश घेता येत नाही (अपवाद असतात).
एकाच स्कुल मधल्या, एकाच ईयत्तेतल्या सर्व मुलांना त्यांना आवडतील ते विषय, आणी झेपेल तीतकी कठीण पातळी घेण्याचे स्वातंत्र्य असते. त्यामुळे प्रत्येक मुलाचा अभ्यासक्रम वेगळा असु शकतो. बर्याच वेस्टर्न कंट्रीजमध्ये साधारण हीच व्यवस्था आहे.
भारतातल्या किंवा जगातल्या कुठल्याही शाळेत शीकुन आलेल्या मुलाला तीथे पुढच्या ईयत्तेत प्रवेश मिळतो. SSC / CBSE /ICSE वगैरेने काही फरक पडत नाही.
CBSE चा फायदा देश विदेशात बदली होणार्या केंद्रसरकारच्या कर्मचार्यांच्या मुलांना होतो. बर्याच ठीकाणी विदेशातही CBSE च्या शाळा आहेत.
ICSE चे पण साधारण तेच फायदे आहेत. जर पालक या देशातुन त्या देशात फीरत असतील आणी लोकल भाषा ईंग्रजी नसेल तर ICSE चे स्कुल मुलांना सोईचे पडते.
आता भारतात ICSE ची ईतकी स्कुल का आहेत ते नक्की माहीत नाही.
4 Mar 2021 - 2:20 pm | मुक्त विहारि
1. मला इंग्रजी येत नाही, कारण मी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले नाही, ही न्यूनगंड असलेली माणसे...
2. फाडफाड इंग्रजी बोलतो तोच हुषार, ही गुलामगिरीची मानसिकता...
3. शेजार्याचा पाल्य जातो मग माझा पण जायलाच पाहिजे... दुस्वास
वृत्ती...
आपल्या पाल्याची कुवत लक्षांत घेतली नाही तर, राजीव कपूर होतो.
4 Mar 2021 - 3:30 pm | हेमंत सुरेश वाघे
पण असे जेंव्हा लोक सांगतात तेंव्हा त्यांच्या मुलांनी काही फार चांगले केले असेल तर ऐकण्यात अर्थ आहे ना?
साधी गोष्ट आहे कि जेंव्हा इंग्लिश बोलन्याहा फायदा होतो असे दिसते म्हणून लोक बोलतात ना ?
किंवा जेंव्हा रिझल्ट दिसतात तेंव्हाच त्या गोष्टीचे नाव होते
बहुतेक चांगली इंजिनिअरिंग कॉलेज किंवा बी स्कुल चे नाव एकाच गोष्टी मुले झाले आहे -
त्यातून बाहेर पडणाऱ्या बहुसंख्य मुलांचे चांगले करिअर -
बऱ्याच अंशी हि गोष्ट प्लेसमेंट शी संबंधित आहे
आणि प्लेसमेंट साठी कंपनी येतात म्हणजेच त्या कॉलेज ची मुले त्या प्रमाणात डिलिव्हर करतात .
आणि २/४ वर्षे होत नाही हे - काही कॅम्पस वर अनेक कंपनी २६ -२७ - अगदी ३० वर्षे येत आहेत .
4 Mar 2021 - 4:08 pm | मुक्त विहारि
आपली आर्थिक कुवत आणि मुलाची बौद्धिक पातळी, ह्या दोन गोष्टी लक्षांत घेतल्या तर, फायदा होतो...
4 Mar 2021 - 6:37 pm | उपयोजक
4 Mar 2021 - 7:23 pm | मुक्त विहारि
एकाच शाळेतील, एकाच वर्गातील, एकाच क्लासला जाणारी, एकाच आर्थिक परिस्थितीतील, मुलेमुली वेगवेगळे क्षेत्र निवडतात आणि यशस्वी होतात... काही जण आयुष्यभर गुलामगिरी स्वीकारतात तर काही जण नौकरी देणारे होतात....
आमच्या शाळेत एक अत्यंत ढ मुलगा होता ... सगळे शिक्षक आणि शिक्षिका त्याची चेष्टा करत असत.1981 मध्ये तो जेमतेम SSC झाला. पुढे तो कल्याण आणि टिटवाळा भागात, मोठा बिल्डर झाला...
माणसांना, कधीच एका तराजूत तोलू नये.
4 Mar 2021 - 11:14 pm | उपयोजक
https://www.instagram.com/p/B9EGq9_Jafh/?igshid=daayheqf55n8
4 Mar 2021 - 11:23 pm | मुक्त विहारि
https://en.m.wikipedia.org/wiki/List_of_Nobel_laureates_by_country
5 Mar 2021 - 2:22 pm | साहना
राज्य बोर्डच्या नाडी लागू नका. ICSE आणि CBSE दोन्ही चांगले आहेत, जिथे आपल्याच सामाजिक आणि आर्थिक स्तरांतील मुले जात असतील तिथे ऍडमिशन घ्या. उगाच महाग शाळा नको. शिकवणी शक्य असेल तर लावाच. IIT मध्ये जायचे नको असले तरी त्याची कोचिंग घ्या, कारण त्यामुळे इतर हुशार मुलांची ओळख मैत्री इत्यादी होते.
5 Mar 2021 - 2:39 pm | मुक्त विहारि
तुमची बौद्धिक क्षमता अतिशय उत्तम आहे...हे मी मनापासून म्हणत आहे...
कारण, माझ्या ओळखीत एक IIT इंजिनीयर आहे, तो म्हणतो की, IIT फारच सोपे आहे....
आणि तुमचा आर्थिक स्तर पण फारच चांगला आहे.....हे पण मी मनापासून म्हणत आहे...
माझ्या ओळखीतील खूपशा लोकांना, 500 रुपये दरमहा फी भरणे पण अशक्य आहे....
5 Mar 2021 - 2:48 pm | साहना
पांघरून पाहून पाय पसरावेत अशी शी काही म्हण आहे. त्यामुळे आपल्या पाल्याची कुवत आणि आपली आर्थिक क्षमता दोन्ही लक्षांत घेऊनच शाळा निवडावी. ह्यांत दुमत असण्याचे कारण नाही. पण पर्याय उपलब्ध असतील तर सर्वच पर्याय एक सारखे आहेत असे नाही. काही चांगले तर काही कमी दर्जाचे आहेत.
5 Mar 2021 - 2:59 pm | मुक्त विहारि
सेमी इंग्रजीचे, शास्त्र आणि गणित शिकवायला, उत्तम शिक्षक मिळत नाहीत...
भारत एकाच वेळी, बैलगाडीतून, रेल्वेतून, विमानातून आणि अंतराळ यानातून प्रवास करतो....
शिक्षणाचे पण असेच स्तर तयार झाले आहेत.... ह्यात नुकसान फक्त दोनच माणसांचे होते, गरीब पण बुद्धीवान विद्यार्थी आणि श्रीमंत पण सामान्य विद्यार्थी....
बुद्धीवान विद्यार्थी वर्गाला न्याय द्यायचा असेल तर, निदान, दहावी पर्यंत तरी, एकच फ्लॅटफाॅर्म हवा आणि तो गरीब माणसांचा विचार करून हवा...
सुदैवाने माझा आर्थिक स्तर उत्तम होता, म्हणून माझा मोठा मुलगा इंजिनीयर झाला...
6 Mar 2021 - 12:11 am | साहना
> भारत एकाच वेळी, बैलगाडीतून, रेल्वेतून, विमानातून आणि अंतराळ यानातून प्रवास करतो....
भारत एकाच वेळी, बैलगाडीतून, रेल्वेतून, विमानातून आणि अंतराळ यानातून प्रवास करतो....ह्यांत काहीच चुकीचे नाही. इतर सगळीकडे सुद्धा हीच परिस्थिती (कमी-जास्त स्वरूपआत) आहे.
>शिक्षणाचे पण असेच स्तर तयार झाले आहेत.... ह्यात नुकसान फक्त दोनच माणसांचे होते, गरीब पण बुद्धीवान विद्यार्थी आणि श्रीमंत पण सामान्य विद्यार्थी....
श्रीमंत विद्यार्थ्यांचे नुकसान विशेष होत नाही कारण चांगल्या पण शैक्षणिक प्रेशर नसलेल्या शाळा सुद्धा आहेत.
> बुद्धीवान विद्यार्थी वर्गाला न्याय द्यायचा असेल तर, निदान, दहावी पर्यंत तरी, एकच फ्लॅटफाॅर्म हवा आणि तो गरीब माणसांचा विचार करून हवा...
मला हे पटत नाही. बैलगाडीला वेगाने जाता येत नाही म्हणून गाडीच्या स्पीड वर बंधने घालण्यासारखे आहे. गरिबाला पर्याय नाही, कष्ट करून आणि थोडी नशिबाची साथ असली तर गरीब लोक हळू हळू त्यातून बाहेर येतीलच.
6 Mar 2021 - 9:24 am | उपयोजक
नशिबाची साथ असली तर गरीब लोक हळू हळू त्यातून बाहेर येतीलच.
नशीबाची साथ नसेल तर काय करावं?
6 Mar 2021 - 9:34 am | मुक्त विहारि
शिक्षणाची पदवीच कशाला पण पैसे असतील तर, नौकरी पण विकत घेता येते...
याच आठवड्यात, नौकरीचे Scandal उघडकीस आले...
7 Mar 2021 - 2:05 am | साहना
इतर सर्व लोक करतात तेच, आपल्या हातांत जे नाही त्यावर हळहळ व्यक्त करण्यात वेळ अपव्यय न करता जे आपल्या हातांत आहे ते सर्व करून पुढे जायचं. बाकी सर्व श्री ची इच्छा.
6 Mar 2021 - 9:37 am | मुक्त विहारि
कारण,
खेडेगावात, उत्तम सोयी नाहीत....
संधी समान हवी....
7 Mar 2021 - 2:07 am | साहना
खेडेगावांत सोयी नाहीत म्हणून लोक शहरांच्या दिशेने वळतात. शहरांत आणि खेडेगावांत संधी कश्या सामान असतील ? खेडेगावांत प्रति एकर किती रेव्हेन्यू निर्माण होतो ? मुंबईत किती होत असेल ?
7 Mar 2021 - 11:20 am | मुक्त विहारि
तुमचे बरोबर आहे
7 Mar 2021 - 2:22 am | Rajesh188
पण शिक्षण आणि पैसे ह्याचा संबंध जोडला गेल्या मुळे अतिशय बुध्दीमान लोकांना आपण मुकत आहोत कारण त्यांच्या कडे पैसे नाहीत.
Talent ओळखून संधी दिली गेली असती तर अतिशय हुशार डॉक्टर्स, इंजिनियर,खेळाडू ,उद्योग पती आपल्याला मिळाले असते.
आता फक्त फक्त पैसे आहेत म्हणून सुमार दर्जा चे डॉक्टर्स,इंजिनियर,खेळाडू,संशोधक आपल्या बोकांडी बसले आहेत.
एक उदाहरण देतो.
आमच्या जिल्ह्यात एक 32 km ची धावयची शर्यत होती.
सर्व professional runner अगदी स्पोर्ट शूज,सूट घालून सहभागी होते.
एक धनगरांचा मुलगा अंगात लेंगा आणि शर्ट आणि पायात बिना sox चे रबरी बुट खालून सहज मज्जा म्हणून सहभागी झाला होता.
तो इतक्या वेगात थावला की त्याला पाठी मागे कोणीच दिसायला नाही लागले की त्याला थांबावे लागायचे त्यांची वाट बघत..
असे किती तरी सचिन पेक्षा उत्तम खेळाडू आता आहेत त्या पेक्षा किती तरी अती उत्तम डॉक्टर्स,प्रशासकीय अधिकारी आपण गमावत आहोत.
सरकार नी अशा अतिशय हुशार मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून निधी उभा करावा त्या मध्ये देशाचेच हित आहे.
7 Mar 2021 - 2:39 am | Rajesh188
मुल स्पर्थेत च नसतील तर त्या स्पर्धा परीक्षा आणि entrence exam ची किंमत 0 आहे.
वासरात लंगडी गाय शहाणी एवढीच त्या स्पर्धा परीक्षा , entrence exam क्रॅक करणाऱ्या मुलांची किंमत आहे.
त्यांनी खरी स्पर्धा करावीच लागली नाही.
6 Mar 2021 - 2:30 am | Rajesh188
यशस्वी होणे म्हणजे जास्त पैसे कमावणे ही यशस्वी होण्याची व्याख्या आहे आपल्याकडे.
जगात किती तरी मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे मालक काही अगदी उच्च शिक्षित नाहीत पण त्याच्या हाताखाली किती तरी अती उच्च शिक्षित लोक काम करत असतात.
दहावी शिकलेला व्यक्ती अती उच्च शिक्षित लोकांपेक्षा किती तरी जादा पैसे कमावतो ह्याची लाखो उदाहरणे आहेत. मुळात शिक्षण हे बुद्धीचे चे मोजमोप करण्याचे परिमाण नाही.
उपजत हुशार असणारी मुल कोणत्या ही शाळेत शिकलो तरी यशस्वी होतातच.
जवळ जवळ सर्व multi speciality हॉस्पिटल चे मालक dr पण नाहीत तरी ते व्यवस्थित हॉस्पिटल चालवतात हुशार मानल्या जाणाऱ्या डॉक्टर ना कामावर ठेवून.
महिना पन्नास लाख कमावणारा हुशार नोकरदार कंपनी नी कामावरून टाकले आणि दुसऱ्या कोणत्या कंपनीने कामावर नाही ठेवलं तर महिना दहा हजार सुद्धा कमवू शकत नाही.
जे aadani मजूर आरामात कमवू शकतो.
नोकऱ्या गेल्यावर आत्महत्या करणारे उच्च शिक्षित कमी नाहीत.
6 Mar 2021 - 3:05 am | Rajesh188
१)बिल गेट्स
Drop outs
२) Cyrus पूनावला
Graduate आणि नंतर त्यांना phd दिली गेली
३) धीरूभाई अंबानी
दहावी नापास
४) मुकेश अंबानी
Chemical engineering.
५) Steve Wozniak
ऍपल कंपनीचे संस्थापक.
Drop out.
६) gautam अदानी
Drop out.
हे सर्व अती अती श्रीमंत व्यक्ती आहेत .
पण ह्या मधील एक पण अती उच्च शिक्षित नाही.
अशी अनंत उदाहरणे आहेत.
6 Mar 2021 - 9:32 am | पिनाक
माझ्या मते, शिक्षण म्हणजे काय या संकल्पनेतच मुळात गोंधळ आहे. फक्त पैसे कमावणे हा शिक्षणाचा उद्देश नसतो. सुजाण आणि सुशिक्षित व्यक्ती तयार करणे हा उद्देश असतो. म्हणून सगळ्या विषयांचे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, भाषा, गणित आणि शास्त्र, कला, खेळ हे सगळे विषय शिकवले आणि आत्मसात केले जायला हवेत. त्या ऐवजी आपण मार्कांच्या चक्रात अडकून आहोत. आणि मग शिकलेले लोक सुद्धा अंधश्रद्धेच्या चक्रात अडकणे किंवा शास्त्रातल्या जुजबी संकल्पना माहीत नसणे या गोष्टी होतात. माझे कित्येक शाळा कॉलेज चे मित्र मूर्खपणाच्या कथा whatsapp वर फॉरवर्ड करताना पाहून आश्चर्य वाटतं. कॉलेज मध्ये शिकवताना हे लोक कुठे होते?
दुसरी गोष्ट पैशाची. पैसे कमावणे हा महत्वाचा criteria आहे, पण कमावल्यानंतर जर तुम्हाला कला, साहित्य, शास्त्र यात गती नसेल तर त्या पैशाचा उपयोग शून्य आहे. तेव्हा कॉलेज ड्रॉप आउट जास्त कमावतात किंवा उच्चशिक्षित असून कमी शिक्षित माणसाच्या कंपनीत काम करणे किंवा भाजीवाला पण नोकरदार माणसापेक्षा जास्त कमावतो या विधानाला काहीच अर्थ नाही. पैसे हेच सर्वस्व असणारेच असा विचार करू शकतात.
6 Mar 2021 - 12:21 pm | मराठी_माणूस
अतिशय महत्वाचा मुद्दा.
6 Mar 2021 - 12:25 pm | Rajesh188
देशातील सर्व राज्यांची नाव माहीत नसतात.
प्रधानमंत्री सोडून बाकी मंत्र्याची नाव माहीत नसतात.
राज्यांच्या भाषा माहीत नसतात.
अनेक बरेच काय काय माहित नसते.
साहित्य,शास्त्र हे खूप मोठे विषय झाले.
6 Mar 2021 - 12:28 pm | मुक्त विहारि
दुर्दैवाने हे सत्य आहे.
सर्वे गुणः कांचनं आश्रयंते.
पण,
तुम्ही म्हणता तसे,
" पण कमावल्यानंतर जर तुम्हाला कला, साहित्य, शास्त्र यात गती नसेल तर त्या पैशाचा उपयोग शून्य आहे."
ह्याला सहमती आहे....
6 Mar 2021 - 12:29 pm | Rajesh188
आवड,छंद,चिकाटी,आत्मीयता,dashing पना,हे सर्व गुण असावे लागतात.