नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून राजकीय धाग्यावरील धुळवड पाहता, चर्चा खेळीमेळीच्या न राहता व्यक्तिगत होतांना दिसत आहेत. सदस्यांवर व्यक्तिगत टीका करणे, शिवराळ भाषा वापरणे, अवांतर प्रतिसादांचा जाणीवपूर्वक रतीब घालणे, या आणि अशा अनेक गोष्टी निदर्शनास येत आहेत. मौज-मजा, हलक्या फुलक्या टपल्या यांचं स्वांतत्र्य मिपावर नेहमीच राहिलं आहे. तरीही त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये या हेतूने या सूचनेद्वारे सर्वांना कळविण्यात येते की यानंतर अशी वर्तणूक ठेवल्यास त्या त्या सदस्यांना व्यक्तिगत सूचना न देता अशा सदस्यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल. सर्वांनी सहकार्य करावे. - मिपा व्यवस्थापन

भिती का वाटत नाहीये? :(

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
22 Feb 2021 - 10:34 pm
गाभा: 

करोनाची दुसरी लाट विदर्भात पसरते आहे. तिथे काही ठिकाणी लॉकडाऊन लावावा लागला आहे.पहिल्या लाटेत अनेक लोक मेले,कर्ता माणूस गेला असेल तर त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक विवंचनेत जावे लागले.करोनावरील उपचार गरीबांना परवडणारे नाहीत.क्क्वारंटीन केले तर तितक्या दिवसांचा पगार, रोजगार,व्यवसाय बुडतो.इतके सारे नुकसान करोना पॉझिटिव्ह असल्यास होते.
मग असं असूनही काही लोक करोना होऊ नये म्हणून आरोग्य संस्थानी सांगितलेले नियम का पाळत नसावेत? मास्क न लावणे,एकमेकांपासून पुरेसं फिजिकल डिस्टन्स न ठेवणे,बाजारात गर्दी करणे, लग्न आणि अन्य सोहळे दणक्यात,गर्दी जमवून साजरे करणे(यात राजकीय नेतेसुद्धा आहेत) वगैरे धोकादायक प्रकार सुरु आहेत.अगदी दंड केला तरी त्यातून काही बोध घेत नाहीयेत.
हा काय प्रकार आहे? जीवावर बेतू शकतं हे माहित असूनही लोक इतके बेफिकीर का होत आहेत? पुण्यातले काही लोक हेल्मेट जीव वाचवत असूनही त्याच्या सक्तीला विरोध करतात.कारण काय तर ते वापरणं कंफर्टेबल नाहीये म्हणे.मास्क वापरणे टाळण्यामागे हेच 'वापरणे कंफर्टेबल नसण्याचं' कारण असावं का? आपण मरुही शकतो,मेलो तर आपला जीव जाईल,कुटूंब उघड्यावर पडेल याची भिती का वाटत नसावी? नक्की काय झाल्यावर लोक सुधारणारेत?? :(

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

22 Feb 2021 - 11:32 pm | श्रीगुरुजी

जनता सुशिक्षित आहे. आपलं संरक्षण कसं करायचं हे त्यांना समजतं. हेल्मेट वापरा, मास्क वापरा, हात धुवा असे आगंतुक सल्ले इतरांनी देऊ नयेत.

उपयोजक's picture

22 Feb 2021 - 11:54 pm | उपयोजक

करोनापासून संरक्षण होत नाही. 'शहाणपणा' असला तरच मास्क वापरणे,सुरक्षित अंतर ठेवणे यांचे महत्व पटून करोनापासून संरक्षण होते किंवा हेल्मेट वापरण्याचे महत्व पटते.त्यामुळे 'सुशिक्षितांना' मास्क वापरा,हेल्मेट वापरा हे सांगण्यात काहीही चुकीचे नाही.या तथ‍ाकथित 'सुशिक्षितांमुळे' करोना पसरला तर त्याची जबाबदारी हे सुशिक्षित घेणार आहेत का?

श्रीगुरुजी's picture

23 Feb 2021 - 12:14 am | श्रीगुरुजी

आपलं संरक्षण कसं करायचं ते सुशिक्षितांना ठरवू दे. त्यांनी हेल्मेट न घातल्याने इतरांना का त्रास होतो? मास्क वापरायचा की नाही, कोठे वापरायचा, किती वेळ वापरायचा, कसा वापरायचा हे सुद्धा इतरांनी ठरवायचं का? तुम्हाला वाटत असेल क्षतर तुम्ही मास्क वापरा. तुमचे संरक्षण होईल. बाकीचे त्यांचं बघून घेतील. तुम्ही नका त्यांची काळजी करू.

उपयोजक's picture

23 Feb 2021 - 12:27 am | उपयोजक

सुशिक्षित असण्यापेक्षा 'शहाणे' असणे आवश्यक आहे.'शहाणी' व्यक्ती मास्क वापरतेच,हेल्मेट वापरते,सुरक्षित अंतर ठेवते. 'अतिशहाणी' व्यक्ती मास्क न वापरुन स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात आणू शकते म्हणून त्यांनी मास्क लावलाच पाहिजे,हेल्मेट वापरलेच पाहिजे,पुरेसे अंतर ठेवलेच पाहिजे.मास्क वापरा,अंतर ठेवा हे वारंवार 'अतिशहाण्यांनाच' सांगावे लागते.शहाण्यांना नाही.

श्रीगुरुजी's picture

23 Feb 2021 - 8:02 am | श्रीगुरुजी

बरं. आम्ही कमी शहाणे आणि तुम्ही आमच्या दीडपट शहाणे. आता खुश?

सुक्या's picture

23 Feb 2021 - 1:11 am | सुक्या

नाही . . .

जर माझे आरोग्य कुना दुसर्‍याच्या बेफिकिरीने धोक्यात येत असेल ... (मास्क असो वा हेल्मेट) तर तशी सक्ती करणे अगदी योग्य आहे.
तज्ञ लोकांनी घालुन दिलेले नियम पाळावेच लागतील. नसेल पाळायचे नियम तर घराबाहेर पडु नये .. दुसर्‍याचा जीव धोक्यात घालु नये ...

जाता जाता : सुशिक्षित लोक रस्त्यावर च्या रेषेला योग्य मान देतात आणी ती ओलांडत नाहीत. बाकी ६ फुट कुंपण उभे केले तरी ऊडी मारतात ...

आजचीच बातमी आहे. कोरोनाने अमेरिकेत ५ लाखांपेक्षा जास्त बळी घेतलेत. तिथे सुद्धा ट्रंप तात्या आणि अमेरिकन जनतेची बेफिकिरीच नडली आहे.
आज राष्ट्रध्व्ज अर्ध्यावर उतरवलाय कारण गेल्या १०२ वर्षांत अमेरिकेत एव्ह्ढे बळी गेले नव्ह्ते अशी बातमी आहे.
भारतीयांनी यातून तरी धडा शिकला पाहीजे.

शाळेतील पुस्तकात एक संस्कृत श्लोक होता, तो आठवला:

साक्षरा विपरीताश्चेत् राक्षसा एव केवलम् ।
सरसो विपरीतश्चेत् सरसत्वं न मुञ्चति ।।

अर्थ :-
साक्षर हा शब्द उलट लिहिल्यावर राक्षस होतो. परन्तु सरस हा शब्द उलट लिहिल्यावरही सरसच राहतो.

तात्पर्य :-
साक्षर व्यक्ती विपरीत आचरण करते तेव्हा राक्षस बनते. सरस व्यक्ती विपरीत परिस्थितीतही आपले सरसत्व (सद्गुण) सोडत नाही.

उपयोजक's picture

23 Feb 2021 - 1:06 am | उपयोजक

आवडला :)

चामुंडराय's picture

23 Feb 2021 - 1:13 am | चामुंडराय

मास्क आणि हेल्मेट वापरण्यामध्ये एक मूलभूत फरक आहे.

हेल्मेट हे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी वापरायचे असते. मास्क मात्र फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांच्या सुरक्षिततेसाठी देखील असतो तेव्हा स्वतःबद्दल पर्वा नसली तरी इतरांसाठी तरी मास्क वापरावा असे वाटते.

चौकटराजा's picture

23 Feb 2021 - 10:03 am | चौकटराजा

मास्क न वापरणे व हेलमेट न वापरणे याची तुलनाच हस्स्यास्पद आहे ! सान्सर्गिक रोगाने येणारे मरण जाता जाता दुसर्यालाही बहाल केले जाउ शकते अनवधानाने का होईना . हेल्मेट ने येणारे मरण हे तसे नसते . प्रत्यक्शात अपघातात नक्की मोठा मार कुठे लागतो यावर ही मरण अवलम्बून असते. मल्टिपल इन्जुरी मधे हेल्मेट घातलेला देखील मरतो !

सांसर्गिक रोगाने येणारे मरण व्हायरल लोड, उपचारातील उशीर , वय ,इतर गन्भीर विकार व नशीब या सर्वाच्या समुच्च्याने येते तिथे मास्क, सनिटयझर , दूरी ,औषधे ऑक्सीजन यान्चाही उपयोग होत नाही .

हेल्मेट व मास्क दोन्ही न वापरणारे केवळ स्वतःच्या छोट्याशा गैरसोईला वाचवण्यासाठी स्वतःचा आणी ईतरांचा जीव धोक्यात घालत असतात. हेल्मेट न वापरणारे अपघातात स्वत: मरु शकतात, पण त्याच बरोबर दुसर्‍यालाही कोर्टकचेर्‍यांत अडकउन जातात. कित्येकदा दोष नसताना अशा अपघातात सापडलेले ४ चाकीवाले जमलेल्या गर्दीकडुन तुडवले जातात अथवा तुरुंगात जातात. तसेच मास्क न वापरणारे स्वत: आजारीपडु शकतात व दुसर्‍यालाही पाडु शकतात.

हेल्मेट व मास्क न वापरणे हे सरकारी नियमांच्या विरुध्द आहे. रस्ता सार्वजनिक असल्यामुळे दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा सरकारी नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच बाहेर पडताना सर्वांच्या सुरक्षीततेसाठी सर्वांनी मास्क लावणे आवश्यक आहे.

.

चौकटराजा's picture

23 Feb 2021 - 10:52 am | चौकटराजा

हेल्मेट न वापरणारे अपघातात स्वत: मरु शकतात, पण त्याच बरोबर दुसर्‍यालाही कोर्टकचेर्‍यांत अडकउन जातात. कित्येकदा दोष नसताना अशा अपघातात सापडलेले ४ चाकीवाले जमलेल्या गर्दीकडुन तुडवले जातात अथवा तुरुंगात जातात.
हेलमेट व मास्क दोन्ही कायद्याने अवश्यक आहेत यात काही शंका नाही .पण हेल्मेट घातले किंवा ना घातले याचा गर्दीच्या मानसशास्त्राशी काय संबंध ? त्यात पादचारी व दुचाकीवाला असा अपघात झाला तरी मार खातो दुचाकी वाला हेल्मेट घातले असले तरी ! अशा गोष्टीचा दुचाकी चारचाकी असा संबंध नाही . गर्दीची सहानुभूती लहानांकडे नेहमी जाते ! बाकी कोर्ट कचऱ्याचे म्हणाल तर त्यापूर्वी पंचनामा नावाची प्रक्रिया झालेली असते हे ध्यानात घ्या ! त्यावर आधारित आरोपपत्र मग कोर्टकचेरी असा क्रम आहे ! माझे वडील एस टी मधील अपघात विभागात काम करीत त्यामुळे मला या प्रकियेची पूर्ण नाही तरी पुरेशी माहिती आहे !

नेत्रेश's picture

23 Feb 2021 - 11:59 pm | नेत्रेश

तर्क असा आहे की -

हेल्मेट न घालणार स्वतःच्या चुकीने चारचाकीला धडकुन मेला आणी चारचाकीवाल्याला कोर्टात काही शिक्षा झाली नाही तरी पंचनामा, पोलिस रीपोर्ट, कोर्ट्कचेर्‍यांत होणारा मनस्ताप भरपुर असणारच.

आणी अपघातात चुकी जर चारचाकी वाल्याची असेल तर
- दुचाकीवाला हेल्मेट नसल्यामुळे मेला असे समजुन कोर्ट त्याला सोडुन देते का? (मला माहीत नाही)
- जर त्याने हेल्मेट घातले असते तर तो कदाचीत वाचला असता, व चारचाकीवाल्याला कदाचीत कमी शिक्षा झाली असती.
म्हणजे दुचाकीवाल्याने हेल्मेट न घालण्यामुळे दुसर्‍यालाही त्रास होतोच.

चौकटराजा's picture

24 Feb 2021 - 4:42 am | चौकटराजा

स्वतःच्या चुकीने हेलमेट घालणारा वा न घालणारा असेल तरी चारचाकी वाल्याला कोर्टात जावेच लागणार नाही ! कारण आरोपपत्रच नाही तर कोर्ट कुठून ? पन्चनाम्यात वहानाची दिशा , ब्रेक मार्क्स , रस्त्याची रुन्दी ई अनेक गोष्टी असतात त्याचे नकाशे तयार करावे लागतात ,त्यावर कोण दोषी हे ठरते ! अगदी हेड ऑन कोलिजन असेल तरच सहस दोघेही दोषी असतात . पलिकडचा चालक डिव्हाईडर ओलन्डून अलिकडे आला व त्यात मी जखमी झालो तर मलाही कोर्टात चकरा माराव्या लागतील असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?

कोर्ट निकाल देताना काही तन्त्रिक नाईलाज झाला का लक्षात घेते उदा अचानक टायर फुटणे , ब्रेक फेल होणे ई. हेलमेट घालणे वा न घालणे याचा कोर्टाच्या निकालाशी काही सम्बन्ध नाही कारण ती अचानक झालेली घटना नाही ! हेल्मेट घातले असते तर .... हा प्रश्न वैद्यकीय लोक वा पोलिस यान्चा खल असतो . न्यायालयाचा नाही !

नेत्रेश's picture

24 Feb 2021 - 11:41 am | नेत्रेश

तुमचे म्हाणणे बरोबर असेल, मला या प्रक्रीयेची फक्त ऐकीव माहीती आहे, आणी ती सुद्धा बरोबर असेल असे नाही.

पण डिव्हायडर असलेले रस्ते फार कमी आहेत, आणी ग्रामीण भागात जवळ जवळ नाहीतच. गेल्यावर्षी माझा एक चांगला मित्र घरातुन बाईकवरुन निघाला आणी एका मिनीटात अपघातात झाला, डोके फुटले आणी जागेवरच गेला. चारचाकी वाल्याचे काय झाले माहीत नाही, पण त्याच्या घरच्यांचे काय झाले ते पहात आहे. हेल्मेट न घालणारा व त्याच्याबरोबर ईतर अनेक परीणाम भोगत आहेत.

म्हणुन मास्क व हेल्मेट मध्ये साम्य वाटले. दोन्ही लोकांच्या प्रोटेक्शनसाठी बनवली आहेत. दोन्ही वापरायला थोडी गैरसोइची आहेत. पण न वापरल्याने स्वतः बरोबर ईतरांनाही परीणाम भोगावे लागतात.

हेल्मेट व मास्क दोन्ही न वापरणारे केवळ स्वतःच्या छोट्याशा गैरसोईला वाचवण्यासाठी स्वतःचा आणी ईतरांचा जीव धोक्यात घालत असतात. हेल्मेट न वापरणारे अपघातात स्वत: मरु शकतात, पण त्याच बरोबर दुसर्‍यालाही कोर्टकचेर्‍यांत अडकउन जातात. कित्येकदा दोष नसताना अशा अपघातात सापडलेले ४ चाकीवाले जमलेल्या गर्दीकडुन तुडवले जातात अथवा तुरुंगात जातात. तसेच मास्क न वापरणारे स्वत: आजारीपडु शकतात व दुसर्‍यालाही पाडु शकतात.

हेल्मेट व मास्क न वापरणे हे सरकारी नियमांच्या विरुध्द आहे. रस्ता सार्वजनिक असल्यामुळे दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा सरकारी नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच बाहेर पडताना सर्वांच्या सुरक्षीततेसाठी सर्वांनी मास्क लावणे आवश्यक आहे.

.

गवि's picture

23 Feb 2021 - 10:59 am | गवि

सहमत.

शिवाय हेल्मेट घालून जरी पूर्ण संरक्षणाची शंभर टक्के खात्री देता येत नसली तरी काही प्रमाणात जोखीम निश्चित कमी होते.

वरुन पुन्हा हेल्मेट न घालता जाणारे येणारे दुचाकीस्वार नकळत इतर अनेकांसाठी चुकीचे उदाहरण अतएव मनात हेल्मेटखेरीज सुरक्षिततेचा चुकीचा आभास निर्माण करतात

शा वि कु's picture

23 Feb 2021 - 7:18 pm | शा वि कु

+१

अर्धवटराव's picture

23 Feb 2021 - 3:03 am | अर्धवटराव

करोना बाधेची कुठलीच बाह्य लक्षणे नसतात/सौम्य लक्षणे असतात. त्यामुळे त्याची दृष्य भिती नसते. एकदा घरी परतले कि कोमट पाणि पिणे, हातपाय स्वच्छ धुणे वगैरे काहि उपाय केले आपण सुरक्षीत झालो असा काहिसा प्लासिबो इफेक्ट असतो. ९०% च्या वर रिकव्हरी रेट असल्यामुळे करोना झालाच तर आपण सहज मात करु अशी बेफीकीर वृत्ती असते. दहा मिनिटाचं तर काम आहे, एव्हढ्याने काहि होत नाहि बाहेर गेल्यास, असं आपल्याच मनाचं समाधान केलेलं असतं. मग दहाचे तीस, तीसाचे साठ मिनिट व्हायला वेळ लागत नाहि.
वर्षभराचा लॉकडाउन पचवुन आता अनेकांची आर्थीक परिस्थिती दुबळी व्हायला लागली असेल. काहि महिन्यांनी एकदम कोलमोडुन पडण्याऐवजी असे लोक्स आता रिस्क घ्यायला तयार झाले असावेत.
शिवाय निव्वळ टाईमपास म्हणुन हिंडणार्‍यांची संख्या देखील कमि नाहि आपल्याकडे. रेल्वे रुळ ओलांडताना रोज अपघात होतात. पण तरिही लोकं तसं करायचे थांबत नाहित. हे देखील असच काहिसं असावं.

मास्क वापरणारे ,स्वतःची काळजी घेणारी लोक जी जास्त प्रमाणात आहेत.आणि नियम न palnare हे कमी आहेत.तेवढी विविधता असणार च की

रात्रीचे चांदणे's picture

23 Feb 2021 - 10:41 am | रात्रीचे चांदणे

भीती का वाटत नाही, कदाचित ही करणे असावीत
१) आत्तापर्यंत भारतात १,१०,१५,८६४ लोकांना कोरोना झालेला आहे तर त्यापैकी १,०७,१०,४८७ लोक बरे झालेले आहेत म्हणजेच बरे होण्याची टक्केवारी ही ९७% पेक्षा जास्त आहे तर मृत्य दर फक्त १.४२% आहे. म्हणजेच जेव्हढी चर्चा आहे तेवढा कोरोना धोकादायक नाही. जेष्ठ नागरिक व काही आजारी लोकांना धोका जास्त असू शकतो पण तरुण लोकांनी जास्त घाबरण्याची गरज नसावी.
२) पहिला lockdown चालू होऊन अत्ता जवळ जवळ एक वर्ष होत आलंय, एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आणखीन कीती दिवस दडपणाखाली ठेवणार.
३) आत्तापर्यंत जवळ जवळ प्रत्येकाच्या घरात किंवा परिचितांपैकी कोणाला तरी कोरोना होऊन गेलेला असणार आणि बहुसंख्य लोकांना अतिशय सौम्य लक्षणे आहेत किंवा बऱ्याच लोकांना काहीही त्रास न होता ते बरे झालेले आहेत त्यामुळे अत्ता तरी लोकांना कोरोना ची काहीही भीती वाटत नाही.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना मुळे मरणाऱ्याची संख्या ही एक दिवसाला 100 पेक्षा कमी झालेली आहे, 130 कोटी मधून 100 म्हणजे अतिशय कमी आकडा आहे. ह्या पेक्षा जास्त लोक रस्ते अपघाताने किंवा इतर आजराने मरत असतील.

साहना's picture

23 Feb 2021 - 10:53 am | साहना

सहमत

उपयोजक's picture

23 Feb 2021 - 12:26 pm | उपयोजक

म्हणजेच जेव्हढी चर्चा आहे तेवढा कोरोना धोकादायक नाही.

मग राज्य आणि देशाचं सरकार इतक्या पोटतिडिकीने मास्क वापरा, पुरेसं अंतर ठेवा म्हणून सांगतायत? न्यूज चॅनल तर सतत कोणत्या ना कोणत्या शहराच्या बाजारपेठेत कॅमेरे फिरवून 'हे बघा लोक बिनामास्कचे फिरतायत,गर्दी करतायत' हेच सांगत असतात. भिती वाटावी इतके काही नसेल तर या न्यूज चॅनलवर भयगंड पसरवल्याबद्दल कारवाई व्हावी का?
जागोजाग दंडवसूली सुरु आहे.भेदरुन जावं इतकं काही नसेल तर मग दंड रद्द तरी व्हावा.चारचाकी वाहनाच्या आत मास्क लावला नाही तरी दंड घेतात. ३१ कोटींचा दंड वसूल केलाय.
https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/maharashtra/mumbai-new...

भयगंडाचा वापर करुन पैसे गोळा करणं हे खंडणीसमान आहे.याला लगाम कोण घालणार?

रात्रीचे चांदणे's picture

23 Feb 2021 - 1:57 pm | रात्रीचे चांदणे

मग राज्य आणि देशाचं सरकार इतक्या पोटतिडिकीने मास्क वापरा, पुरेसं अंतर ठेवा म्हणून सांगतायत?
मास्क चा वापर किंवा अंतर ठेवायला सरकार सांगत आसेल तर त्यात काहीही चूक नाही ह्यातून झाला तर फायदाच होईल. पण आत्ता परत lockdown नाही केला पाहिजे.
न्यूज चॅनल्स मात्र फक्त आणि फक्त भयगंडच पसरवत आहेत.

श्रीगुरुजी's picture

23 Feb 2021 - 2:33 pm | श्रीगुरुजी

राज्य सरकार आपली निष्क्रियता झाकण्यासाठी कोरोनाचे कारण पुढे करतंय. मागील जवळपास संपूर्ण वर्ष मुख्यमंत्री घरात बसून आहेत. विधिमंडळाची २ अधिवेशने प्रत्येकी २ दिवसच चालली. विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. बहुसंख्य सरकारी कामे ठप्प आहेत. यावर पांघरूण घालण्यासाठी कोरोनाचे कारण पुढे केले जात आहे.

दुसरीकडे मास्क न वापरल्यास दंड घेणे ही खंडणी आहे. काल धनंजय महाडिक कुटुंबियांच्या लग्नात हजारो माणसे विनामास्क होती. आज संजय राठोडचे हजारो समर्थक विनामास्क एकत्र होते. यांना एक रूपया सुद्धा दंड नाही.

सरकार एवढे बिनडोक पना दाखवत आहे की लोक वैतागली आहेत.
साथी च्या वेळी फक्त एकच व्यक्ती नी म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्री असलेल्या व्यक्ती नीच फक्त सरकारी निर्णय जाहीर केले पाहिजे.
इथे महापौर काही वेगळेच बोलतेय,जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी कशी भलतीच माहिती देत असतात.आणि बाकी किरकोळ अधिकारी ,पुढारी वेगवेगळे बोलत असतात .तर न्यूज चॅनल , paper wale वेगळ्याच दुनियेत असतात.
त्या लोक संतापली आहेत .मला पण सरकारी यंत्रणेच्या बिनडोक पणाच वैताग आलाय.
अचानक बस बंद करणे,अचानक ट्रेन बंद करणे,अचानक संचार बंदी लावणे .
सर्व मूर्खपणा आहे.
अगोदर च आठ दिवस जाहीर करा न म्हणजे लोक तयारीत राहतील,बाहेर असतील तर घरी येतील.
आणि हे पण कारण आहे लोक मास्क न वापरण्याचे.

मराठी_माणूस's picture

23 Feb 2021 - 3:30 pm | मराठी_माणूस

एव्हढ्यात कोणताही, उत्सव, सण (गणपती, दीवाळी , नव वर्ष इत्यादी) असे काही झाले नाही. तरीही रुग्ण संख्या का वाढत आहे आणि त्याचा दोष लोकांनाच का दीला जातोय ? लोकांनी एकदम ठरवल्या सारखे मास घालणे , हात धुणे इत्यादी बंद केले आहे का ?

शक्यता आहे की सवलती हळु हळु वाढवत नेल्या त्यामुळे लोकांचे एकत्र येणे वाढले. जसे हॉटेल्स चालु करणे , त्यांच्या वेळा वाढवणे, लग्न समारंभात जमणार्‍यंची संख्या , सर्वांसाठी लोकल इत्यादी. मग ह्या सवलतीत पुर्वी सारखी काटछाट करणे हे जास्त योग्य होईल. एकदम टाळेबंदी हा पर्याय निश्चितच त्रासदायक आहे.

चौकटराजा's picture

23 Feb 2021 - 4:17 pm | चौकटराजा

एक वेडगळ उपाय असा आहे की सर्व सर्वजनिक रुग्णालये यात फक्त जी साथीच्या रोगासाठी नेमलेली आहेत त्यातच उपचार मिळतील सर्व जम्बो रुग्णालये वगरे कायमची बन्द करण्यात येत आहेत असा फतवा सरकारने काढावा ! ज्याना करोना झाला आहे ते खाजगी रुग्णालयात उपचार घेतील . ज्याना परवडणारे नाही ते साथीरोगाच्या रुग्णालयात प्रतिक्शा यादीवर रहातील.ज्याना घरीच आपल्या मनाने कोणत्याही पैथीचे उपचार घ्यायचे असतील त्यानी ते घ्यावे यासाठी मुभा द्यावी. एकूण सरकारने यात फारसे लक्षच घालू नये ....

याने काय होईल
श्रीमन्त आहे व तरूण आहे तो बिन्धास्त मास्क न लावताही बाहेर फिरू शकेल .
श्रीमन्त आहे पण मधुमेह आहे तो आगाउ खाजगी रुग्णालयात आपले " जागे" चे बुकिन्ग करू शकेल .
मध्यम वर्गीय श्रीमंत व तरूण असे सगळेच पैसे एफ डी आर मधे ठेवणार नाही . बिन्धास्त बाहेर हिन्डेल व वेळ आल्यास खाजगी रुग्णालयात दाखल होईल.
मध्यम वर्गीय मधुमेही घरातच थाम्बतील.
गरीबान्ची थोडी जास्त प्रतिकार शक्ती असते असे "डेन्गी" मधे दिसून आले आहे . त्यानी मास्क वगरे काही वापरले नाही तरी चालेल . आलीच वेळ तर सरकारचे साथीरोगाचे रुग्णालयात प्रतिक्षा यादीत उभे रहावे.

मग देवालयात जाणे , मोठे समारम्भ , यात्रा जत्रा, मार्केटिन्ग, होटेलातील खादाडी, क्रिकेटच्या मॅचेस यासारख्या जीवनावश्यक गोष्टी विनासायास करता येतील .

चौकटराजा's picture

23 Feb 2021 - 4:48 pm | चौकटराजा

डॉ रवी गोखले यांनी एक ट्विट पी एम कार्यालयाला पाठवला आहे ..
सध्या सर्व जनतेचे टप्प्या टप्याने लसीकरण करण्याचा प्लान रद्द करून ज्याठिकाणी हॉटस्पॉट तयार होत आहेत इथे सरसकट लोकांना लस द्यावी व साखळी तोडावी .तीन महिन्यानंतर लसीचं उत्पादन वाढले की मग उरलेल्याना पुन्हा टप्प्याटप्याचा प्लान करून लस द्यावी !

चौथा कोनाडा's picture

23 Feb 2021 - 5:12 pm | चौथा कोनाडा

अगदी योग्य !

सध्या लशीचा तुटवडा (शॉर्ट सप्लाय) नसून सरप्लस पडून आहे असे सर्वत्र वाचण्यात येत आहे. मर्यादा पडलीय ती कमी पुरवठ्यामुळे नसून लस टोचण्याची यंत्रणा (सरकारी यंत्रणेमार्फतच लसीकरण करण्याच्या धोरणामुळे) अपुरी पडतेय. या यंत्रणेसह चालू वेगाने सर्व भारतीयांना लस टोचण्यास दहा बारा वर्षे लागतील. खाजगी क्षेत्राला यात प्रवेश देणे हा उपाय कदाचित वेगात बदल घडवू शकेल. तपासणी क्षेत्रात आणि लस उत्पादनात खाजगी क्षेत्र आहेच. आता प्रत्यक्ष लसीकरण प्रक्रियेतही त्यांना सामील करुन घेणे योग्य ठरावे.

गणपती सण येऊन गेल्यावर लोकं एकत्र आली आणि करोना वाढला होता. नन्तर दिवाळी येऊन गेली तेव्हा वाटलेलं परत वाढेल. पण नाही वाढला. गेले 3 महिने लोकं ट्रिप, बाजार,मंडई, कार्यालयीन कामकाज सगळं पूर्वीप्रमाणे चालू आहे. मग या 3 महिन्यात करोना कुठे गेला होता?
लाट यायची होती तर महिन्या, 2 महिन्यांपूर्वी यायला हवी होती. अचानक लस आल्यावर कशी आली?

चौकटराजा's picture

23 Feb 2021 - 6:51 pm | चौकटराजा

लस निर्माण करणारे व अ़खिल विश्व करोना व्हायरस संघाचे अध्यक्ष यान्च्यात बन्द खोलीत गुप्त करार झाला आहे !

सौंदाळा's picture

23 Feb 2021 - 6:57 pm | सौंदाळा

सक्तीचे लसीकरण सुरु करण्यासाठीची ही पुर्वतयारी आहे असं वाटतय.

श्रीगुरुजी's picture

23 Feb 2021 - 7:49 pm | श्रीगुरुजी

जागतिक आरोग्य संघटना व जगातील यच्चयावत डॉक्टरांचे सल्लागार उपाय सांगतीलच.

समजा त्यांनी नाही उपाय सांगितला तर जगभरातील सर्व नेत्यांना सल्ला देणारे सल्लागार योग्य तो उपाय सांगतील.

चौकटराजा's picture

24 Feb 2021 - 4:50 am | चौकटराजा

आपल्या इथेच मिपावर अशी माहिती मागे देण्यात आली आहे की लसीकरण सक्तीचे केले तर ते मोफतच करावे लागेल. हे या महाकाय देशात शक्य नाही.कोणत्याही साथीत विषाणूतील बदल व माणसान्च्या वर्तणुकीतील बदल यानुसार चढ उतार होत साथ सम्पते असा क्रम साथीच्या इतिहासात सापडेल . आजच्या घाईच्या ,चन्गळीच्या,बेरोजगारीच्या जीवनात १ वर्ष आपल्याला मोठे वाटते आहे ! विषाणूच्या जगतात हा काल फार कमी आहे !

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Feb 2021 - 1:59 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

लशीकरण वगैरेला नागरिक फाट्यावर मारणार हे गेल्या ४/५ महिन्यात लक्षात आले होते. आता लसी तयार आहेत त्यामुळे करोनाच्या केसेस वाढवा हे पुनावाल्यानी वांद्रेवाल्यांच्या नजरेत आणून दिले असावे असे ह्यांचे मत.

मास्क हवाच ...

चौकटराजा's picture

24 Feb 2021 - 9:18 am | चौकटराजा

प्रत्येक विषाणू एका माणसातून दुसर्या माणसात जाण्याचा मार्ग भिन्न आहे ! डेन्गी चा विषाणू हा सर्वच डासातून सन्क्रामत नाही तर तो फक्त एडीस इजिप्ती मार्फत जातो. इथे मास्क चा काही उपयोग नाही तर मछरदाणी चा आहे ! एच आय व्ही मधे मार्ग अश्रू , लाळ वीर्य असा आहे ! तिथे सेक्स मधे संरक्षण आवश्यक आहे उदा , चान्गल्या क्वालिटीचा निरोध . अर्थात अश्रू लाळ हे त्यातही मार्ग उरतातच ! इथेही मास्क चा उपयोग नाही. जे विषाणू हवेतून तरन्गत श्वासातून आत जातात तिथे फार मोठा धोका सम्भवतो ,तिथे हे घरगुती मास्क काही कामाचे नाहीत. असे मास्क निदान वैद्यकीय माहिती असलेले त्याबाबतीत घालणार नाहीत. पाण्यातून ,अन्नातून काही विषाणू शरीरात जातात की नाही माहीत नाही. कदाचित हेपेटायटीस चे जात असावेत . तिथे मास्क चा काही उपयोग नाही तर पाणी उकळून पिणे हा मार्ग आहे !

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Feb 2021 - 10:41 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"मेलो तर आपला जीव जाईल,कुटूंब उघड्यावर पडेल याची भिती का वाटत नसावी? नक्की काय झाल्यावर लोक सुधारणारेत?? :("
बिनधास्त जगा .. घाबरत जगू नका.. असे सल्ले तुमच्या त्या वॉट्स-अ‍ॅपवर येत असतात त्याचा परिणाम असावा. असो.
आता ज्याला भाजी आणायला बाहेर जायचे आहे तो जाणारच ना ? शहरात सुविधा असतात पण लहान गावात, दूध्/भाजीपाला/कचरा टाकणे ही कामे स्व्तःच करावी लागतात. बरे, राज्य सरकारे प्रामाणिकपणे माहिती देत आहेत तर तसेही नाही. लंडनहून मुंबईला येणार्याना ७ दिवस क्वारंटाईन पण लंडनहून दिल्लिला/बेंगळूरला येत असाल तर क्वारंटाईन नाही.
गेल्या वर्षीचा चॅनेलवरचा एक संवाद आठवला. एक पत्रकार तावातावाने माहिती देत होता व मार्केटमध्ये एका बाईशी संवाद साधतो.
पत्रकार- काय खरेदी करत आहात ताई तुम्ही?
बाई- भाजी घेतेय?
पत्रकार- ही भाजी घ्यायलाच हवी का ? चार दिवस नाही घेतली तर नाही चालणार ? करोना पसरतोय.. माहित आहे ना ?
बाई- माझ्याकडे नोकर नाही. घरी मुले नाहीत. तुझा बा आणूने देइल का भाजी संध्याकाळपर्यंत? मग मी जाते घरी.

हे असले माजोरडे लोक कोरोना ने मरायलाच हवेत. किंबहुना फक्त धडा शिकवण्यासाठी सरकारने कोव्हीड सेंटर्स ची फी लाखात नाही तरी निदान हजारात करायला हवी. मागे असे व्हिडियो सुद्धा आले होते ज्यांना कोव्हीड झाला होता त्यांच्याकडून, की हा रोग धोकादायक नाही, कोव्हीड सेंटर वर कशी काळजी घेतली जाते वगैरे. लोकांना कळायला हवं की कुठलंच जेवण फुकट नसतं (no free meals). आता एवढा प्रचार असून सुद्धा लोक विदाऊट मास्क बाहेर पडतच आहेत. खास करून तरुण. ज्यांना फी भरता येत नसेल त्यांना खुशाल मरू द्यावे. काही गोष्टी नशिबाचे फटके बसल्यानेच कळतात.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Feb 2021 - 1:53 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तुझा संताप समजू शकते रे पिनाक्या. पण जिल्हा पातळीवर प्रशासनाने माहिती नीट पुरवायला हवी. एकीकडे करोनाला घाबरण्याचे अजिबात कारण नाही असा प्रचार करायचा. दुसरीकडे परिस्थिती गंभीर होउ शकते असे दुसरे सरकार म्हणणार. एकदा कोणी सत्ताधारी म्हणणार "आता लॉकडाउन कधीही नाही" तर काही दिवसानी दुसरा सत्ताधारी "लॉक्डाउन पुन्हा येऊ शकतो" असे वक्तव्य करायचे.
मास्क लावायलाच हवा ह्याबद्दल दुमत नाही.

उपयोजक's picture

24 Feb 2021 - 6:37 pm | उपयोजक

एक गोष्ट सांगतो..

तो गर्भात असतांनाच डाॅक्टरांनी त्याच्या पालकांना होणाऱ्या बाळाच्या निरोगी असण्याबद्दल ५०% खात्री दिली होती..ती त्यांच्यासाठी पुरेशी होती..

चुकून काही समस्या आली तर मुलीचा रक्तगट मॅच होईल या आशेनं त्यांनी बाळाला जन्म द्यायचं ठरवलं
सिझेरियनद्वारे डेव्हिडचा जन्म झाला..

तो आईच्या गर्भातून बाहरेच्या जगात प्रवेश करतांना सगळ्यांसारखं रडला पण फक्त वीस सेकंद तो मोकळ्या वातावरणात राहिला..

त्याला अत्यंत काळजीपूर्वक एका प्लॅस्टिकच्या पारदर्शक घुमटात बंद करण्यात आलं कारण ज्याची भिती डाॅक्टरांनी व्यक्त केली होती ती खरी ठरली होती..
तो ‘नैसर्गिक सदोष प्रतिकारक्षमता’ घेऊन जन्माला आला..

हे गोड मुल एक दिवस-दोन दिवस-काही महिने नाही ‘आपल्याला काहीतरी ठोस उपचार मिळेल’ या आशेवर संपुर्ण आयुष्यभर निर्जंतूक केलेल्या प्लॅस्टिकच्या विविध कवचात राहिलं पण दुर्दैवानं त्याला तो ठोस उपचार मिळाला नाही..

हा मुलगा म्हणजे ‘डेव्हिड व्हेटेर‘
प्लॅस्टिकच्या घुमटात रहाणारा म्हणून ‘बबल बाॅय’ या नावानं ओळखला जाणारा ‘डेव्हिड’ हा सत्तर ते ऐंशीच्या दशकात टेक्सास वैद्यकिय केंद्रातील सगळ्यात जास्त लोकप्रिय रुग्ण होता..

तो प्लॅस्टिक बबलच्या कोषातच वाढला..
त्याच्या उपचारार्थ प्रचंड संशोधन केलं गेलं,प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली..
उणंपुरं ‘बारा’ वर्षांचं डेव्हिडचं आयुष्य हे मानवी इतिहासातली एक हृदयस्पर्शी गोष्ट ठरली..

त्याच्या आजूबाजूची अनेक लोकं त्याला प्रोत्साहित करत,त्याच्या हिमतीची दाद देत आणि “त्याच्या या गुढ अनाकलनीय रोगाचं उत्तर विज्ञान एक दिवस जरूर शोधेल आणि तो या पिंजऱ्यातून बाहेर पडेल” अशी प्रार्थना करत..

त्याच्या जन्मानं अन् अश्या अवघडलेल्या आयुष्यावर वैद्यकशास्त्र-नैतिकता-मानवी भावभावना या अनेक गोष्टींवर संख्य-असंख्य प्रश्नचिन्ह उभे राहिले..

नवजात अर्भक असल्यापासून त्याला फक्त प्लॅस्टिकचा स्पर्श माहित होता..
दस्तुरखुद्द नासानं त्याच्यासाठी वेगवेगळे पारदर्शक कंटेनर बनवले होते..
त्याच्यापर्यंत पोहोचणारी प्रत्येक वस्तू थेट मानवी स्पर्शाशिवाय संपुर्णपणे निर्जंतूकपणे त्याच्यापर्यंत पोहोचेल अशी यंत्रणा उभारली होती.

नऊ महिने आपल्या गर्भात वाढवणाऱ्या आईनंही त्याच्या जन्मानंतर त्याला एकदाही स्पर्श केला नव्हता..
त्याच्या आधीही अन् त्याच्या नंतरही कुणी असं कोषात आपलं सगळं जीवन व्यतीत केलं नाही..

डेव्हिडच्या अश्या अवस्थेचं कारण होतं ‘गंभीर आणि संमिश्र असा रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव असलेला जन्मजात आजार’

या आजारामध्ये रुग्णात आजाराविरुद्ध लढणाऱ्या पांढऱ्या अर्थात सैनिक पेशींची कमतरता असते..
या पेशी अनेक प्रकारच्या संसर्गांशी लढण्यास सक्षम असतात.
या आजारावर आजही फुलप्रुफ असा कुठलाही इलाज नाही..

डेव्हिड ‘जिवंत प्रयोग’ झाला होता..तांत्रिक मदत आणि विविध प्रयत्नांनी तो त्याच्या कुटूंबियांसह मिळालं तेवढं आयुष्य जगू शकला..

त्याच्या या आयुष्याविषयी अनेक वादविवाद झालेत काहींना त्याच्यावर झालेले प्रयोग अमानवी वाटले तर काहींनी डाॅक्टरांनी तो जगण्यासाठी,त्याचं जगणं अधिकाधिक सोपं होण्यासाठी औषधांशिवायही केलेले प्रयत्न महत्वाचे वाटले..

प्राप्त आणि विपरित परिस्थितीत तांत्रिक नसला तरी भावनिक विजय त्याच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी नक्कीच मिळवला होता..

वैद्यकिय जगत डेव्हिडच्या केसविषयी बोलायला फारसं उत्सुक नसलं तरी डेव्हिडनं अश्या प्रकारच्या गुंतागुंतीच्या आजारांचा अभ्यास अन् आकलन होण्यासाठी पुरेपूर सहकार्य केलं-रोगप्रतिकारशास्त्र समजावून घेण्यासाठी स्वत:च्या शरीराचं योगदान दिलं-अश्या प्रकारच्या आजारात काय काय उपाययोजना करता येतील याचं ज्ञानही दिलं..

त्याचं आयुष्य भले पुरेसं नसेल-चारचौघांसारखं नाॅर्मल नसेल पण त्याचामुळं वैद्यकीय जगताला प्रचंड मदत झाली..

डेव्हिडवर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी याआधीही अश्या केसेस हाताळल्या होत्या परंतू पालक उपचारास आणि प्रयोगास अनुत्सूक असत त्यामुळं काही महिन्यातच ते बाळ दगावत असे परंतू डेव्हिडचे पालक तो गर्भात असल्यापासून तर त्याच्या शेवटापर्यंत ‘आशावादी’ होते त्यामुळं तो जन्मल्यानंतर त्याच्या बहीणीचा आणि त्याचा रक्तगट न जुळण्यापासून ते रोजच्या संघर्षापर्यंत डेव्हिडमुळं डाॅक्टर मंडळींवर पहिल्यांदाच बरंच काही शिकायला भेटलं..

डेव्हिड मोठा होत गेला तसा तो रहात असलेल्या प्लॅस्टिकचा पारदर्शक बबल मोठा होत गेला..
‘स्टार वाॅर्स’ त्याच्या खास आवडीचं..
त्याला वयानुरूप दूरध्वनीवरून औपचारिक शिक्षण दिलं गेलं..

हळूहळू हा छानसा शिस्तप्रिय अन् बोलक्या डोळ्यांचा मुलगा त्याच्यावरच्या चर्चेमुळं लोकप्रिय होत गेला..
शारिरिक त्रास परवडतो पण जसं जसं तो थोडा जाणता होऊ लागला पिंजऱ्यातल्या त्या जगण्यानं अनेकदा त्याची चिडचिड होत असे..

“या बबलमधून आपण कधी बाहेरच पडू शकणार नाही.”
अश्या विचारांनी हळूहळू तो निराश होऊ लागला
डाॅक्टर त्याला विश्वास देत राहिले पण आता फक्त कुठली तरी प्रोसेस त्याचा धीर रोखू शकणार होती..

‘किती दिवस असं चालणार?’ हा ही प्रश्न होता शेवटी डाॅक्टरांनी अस्थीमज्जा रोपणाची नविन विकसित झालेली पद्धती वापरून त्याच्या बहिणीचं सॅंपल ट्राय करायचं ठरवलं..

ही शस्त्रक्रिया प्रारंभी यशस्वी वाटली पण हळूहळू डेव्हिडची तब्येत खालावू लागली,त्याला ताप येऊ लागला दुर्दैवानं शस्त्रक्रियेदरम्यान त्याला संसर्ग झाला होता..

डाॅक्टरांनी प्रयत्नाची शर्थ केली पण लसिकेच्या कर्करोगानं पुढिल पंधरा दिवसात डेव्हिड त्याच्या काचेचा बबल आणि हे जग सोडून कायमचं सोडून गेला..
त्याच्या आईनं मृत डेव्हिडच्या कपाळावर ओठ टेकले..
हा तिचा डेव्हिडला पहिला अन् शेवटचा स्पर्श होता..

वर्तमानपत्रातून टिकेचा वर्षाव झाला ‘जिवंत मुलाचा केलेला गिनिपीग गेला’ अश्या अर्थाच्या बातम्या झळकू लागल्या..

डेव्हिड नावाच्या या ‘बबल बाॅयची ही शोकांतिका असली तरी डाॅक्टरांना त्याच्यामुळं अनेक गोष्टी कळाल्या..
▪️’विषाणुजन्य संसर्ग’ कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो हे पहिल्यांदाच जगापुढं आलं.
▪️जनुकीय अभ्यासातून निदान अधिक जलद होऊ शकतं हे कळलं..
▪️रक्तगट जुळत नसला तरी अस्थीमज्जा रोपणाचं तंत्र विकसित झालं.
▪️अश्या प्रकारच्या ९०% केसेसमध्ये बाळ एक महिन्याचा होण्याच्या आत शस्त्रक्रिया करता येऊ लागल्या..

या आणि अश्या अनेक कारणांमुळं डेव्हिडचं नाव वैद्यक-विज्ञान विश्वात-मानवी इतिहासात कायमचं कोरलं गेलं..

त्याच्यावर गाणी बनली,सिनेमा बनला,लोकांनी त्याचे चित्र काढले,शिल्प बनवले..
टेक्सासमधील एका शाळेला अन् रस्त्याला त्याचं नाव देण्यात आलं..
‘बबल’हा तिथल्या भाषेतील महत्वाचा शब्द बनला..

त्याच्या थडग्याजवळील दगडावर “He never touched the world,But the world was touched by him” हे कोरलेले शब्द या बबल बाॅयच्या वेगळ्याच आयुष्याची आजही आठवण करून देतात..

त्याची आई कॅरोलनं एके ठिकाणी लिहून ठेवलंय की,
“पुढं इतरांचं आयुष्य अधिक सोपं होत असेल-त्यांचं दु:ख कमी होत असेल-आम्ही जे भोगलं ते त्याच्यामुळं इतर कुणाला भोगायला लागलं नसेल या विचारांनी जितके दिवस त्याच्यासोबत जसे काही घालवले त्यांनी पुरेपूर आनंद दिला तेवढंही आमच्यासाठी पुरेसं आहे !”

‘आयुष्यात उद्या काय वाढून ठेवलंय?’ हे आपल्या हातात नसतं,जे येईल त्याला मात्र आपण सकारात्मकपणे नक्कीच सामोरं जाऊ शकतो..

इमोशन्स मॅनेजमेंटचा वस्तूपाठ देणाऱ्या आनंदनंही हेच सांगूनच ठेवलंय,”बाबूमोशाय जिन्दगी बडी होनी चाहिए लम्बी नहीं”

डेव्हिडची ही गोष्टही एवढं तर नक्कीच शिकवून जाते..
तत्कालिन ताणतणाव-अपयश-अनारोग्य-निराशा हे आयुष्याचा भाग आहेत थेट आयुष्य नव्हे..
जिन्दगीमें सबसे बडी चिज क्या हैं पता हैं?..सिर्फ जिन्दगी !

दोन दिवसांपूर्वी डेव्हिडचा स्मृतीदिन होता.बारा वर्षे तो बबलमध्ये राहिला आपण बारा महिन्यात मास्कला कंटाळलो.
हॅट्स ऑफ डिअर

#ByPradnyawant
©डॉ.प्रज्ञावंत देवळेकर

David

धर्मराजमुटके's picture

24 Feb 2021 - 9:49 pm | धर्मराजमुटके

भिती वाटत नाहिये कारण आम आदमी चं झालयं मेलेलं कोंबडं ! आणि मेलेलं कोंबडं आगीला घाबरत नाही :)