कृपया इंटरनेटवर शोधून उत्तरे देऊ नयेत. तुम्हाला आधीपासून हे कोडे ठाऊक असेल तर उत्तर देऊन इतरांचा विचका करू नये.
एक आटपाट गाव आहे. गावांत काही लोकांचे डोळे घारे आहेत तर इतर सर्वांचे काळे. गावाची एक परंपरा आहे. जर कुठल्याही व्यक्तीला आपले डोळे घारे आहेत हे समजले तर त्या रात्री १२ वाजता त्या व्यक्तीने गांव सोडून जायचा. कुणीही गांवकरी दुसऱ्याला त्याच्या डोळ्याचा रंग सांगू शकत नाही किंवा डोळ्यांच्या रंगाविषयी काहीही बोलण्यास गावकर्यांना सक्त मनाई आहे.. गावांत आरसा वगैरे प्रतिबिंब दाखवणार्या गोष्टी नाहीत. डोळ्यांचा रंग फक्त तर्कशास्त्र वापरून व्यक्ती जाणून घेऊ शकतात. गांव तसा छोटा असल्याने दर दिवशी प्रत्येक माणूस गांवातील इतर माणसांना पाहू शकतो त्यामुळे प्रत्येक माणसाला आपण सोडून इतर सर्व लोकांच्या डोळ्यांचा रंग ठाऊक आहे.
एक दिवस गांवात एक साधू बाबा येतो. साधू बाबा कधीही खोटे बोलत नाहीत. ह्यावेळी गावांत एकूण क्ष व्यक्ती आहेत. साधूबाबा मग भर चौकांत राहून इतर लोकांचे चेहेरे पाहतो आणि मोठ्याने ओरडतो. "ह्या गांवातील काही लोकांचे डोळे घारे आहेत". आणि हे वाक्य बोलून साधू बाबा आपल्या वाटेने गांव सोडून जातात. साधूबाबाचे हे वाक्य गांवातील सर्व लोक ऐकतात.
ह्या एका वाक्याने पुढे काय होईल ?
हा एक को-ऑर्डिनेशन प्रॉब्लेम आहे. माहिती अनेक लोकांकडे असते पण कुलुपाची चावी नसावी त्याप्रमाणे कोऑर्डिनेशन सिंग्नल नाही तर ती माहिती लोक वापरू शकत नाहीत. होडी चालविणाऱ्या प्रत्येक माणसाच्या स्नायूंत बळ असले तर कुणी तरी एक दो एक दो म्हणून ताल धरल्याशिवाय सर्वांची शक्ती एकवटून बोट पुढे जाऊ शकत नाही. त्याच प्रमाणे साधू बाबाचे एक वाक्य संपुन गावांत एक अत्यंत छोटीशी माहिती पसरवते पण ह्याचे परिणाम मोठे आहेत. हिंट हवी असेल तर हे कोडे "सामान्य अनुमान" म्हणजे इंडक्शन वापरून सोडवले जाऊ शकते.
प्रतिक्रिया
18 Feb 2021 - 1:53 pm | मुक्त विहारि
उत्तराच्या अपेक्षेत ...
18 Feb 2021 - 4:06 pm | तुषार काळभोर
मग शेवटी गुगलवर शोधावं लागलं.
उत्तर अगदीच सरळ सोट नाही.
फार गुंतागुंतीचं पण नाही.
पण शुद्ध लॉजिक आहे.
18 Feb 2021 - 6:41 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अजून उत्तर शोधले नाही आहे पण इण्डक्शन का काय म्हणतात तसे करून..? म्हणजे तो साधू म्हणतोय "काही जणांचे डोळे घारे आहेत" .. समजा घारे डोळेवाली व्यक्ती एकच असेल तर तिला घारे डोळेवाली एकही व्यक्ती कोणीच दिसणार नाही. म्हणजे मग तिने गाव सोडायचा?
पण घारे डोळेवाल्या अनेक व्यक्ती अनेक असतील तर?
जरा वेळ लागेल..
18 Feb 2021 - 8:16 pm | आनन्दा
या कोड्यात एक त्रुटी वाटते मला,
प्रथम, मी उत्तर नेट वर शोधले आहे. आणि त्यानंतर मला ही त्रुटी जाणवली.
माझ्यामते हा हो *काही* आहे ना, तो तर स्थिर नंबर असेल, सगळ्यांना माहीत असलेला, तर कोडे सुटेल, जसे की 40 लोकांचे डोळे घरे आहेत, किंवा 20 लोकांचे डोळे वगैरे, पण जर तो नंबर अगदीच randam असेल तर काय लॉजिक लावणार?
साहना ताई, जर हा आक्षेप बरोबर असेल तर कृपया सुधारणा करा, किंवा संम ला सांगून हा प्रतिसाद उडवा.
18 Feb 2021 - 10:31 pm | गणेशा
तुमच्या ह्या उत्तरा ने मला वाटते, १ व्यक्ती असेल तर काय होईल,२ व्यक्ती असेल तर काय होईल असे विचार करून सोडवण्याचा पुन्हा प्रयत्न करतो...
18 Feb 2021 - 8:14 pm | शा वि कु
तुमचा पाल्य व्रात्य असल्यास त्याचा चमनगोटा करून पाठवा, असे कोड्याचे व्हर्जन ऐकले आहे.
मस्त कोडं आहे.
18 Feb 2021 - 10:01 pm | गणेशा
खूप वेळ विचार केला.. पण नक्की लॉजिकल काही सापडेना..
साधू खूप दिवसांनी गावात आलाय तोपर्यंत ज्या व्यक्ती गावात रहात होत्या त्यांना वाटत असणार कि त्यांचे डोळे घारे नाहीयेत.
साधू जेंव्हा काही लोक घारे डोळ्याचे आहेत असे बोलला तेंव्हा प्रत्येकाला आपले डोळे मात्र काळे आहेत असे जे वाटत होते तसेच वाटत राहून ते गावातच राहतील..
18 Feb 2021 - 10:49 pm | गणेशा
माईसाहेब म्हणतात त्यावरून आणि मुळ कोड्यातील खालच्या दोन वाक्याचा विचार करून मी उत्तराच्या जवळ पोहचलोयअसे वाटते..
१.हिंट हवी असेल तर हे कोडे "सामान्य अनुमान" म्हणजे इंडक्शन वापरून सोडवले जाऊ शकते.
२.आणि तर्कशास्त्र करून रंग माहिती करून घेऊ शकतात
तरी येथे लगेच लिहीत नाही...
18 Feb 2021 - 11:10 pm | गणेशा
डोक्याचा भुगा झाला पण लिहिताना सुटत गेले.. Else नसते जमले..उत्तर संदेश करतोय...
18 Feb 2021 - 11:30 pm | साहना
साधू येण्याच्या आधी :
समजा गावांत शून्य व्यक्ती आहेत. (प्रश्नच मिटला)
समज गावांत एक व्यक्ती आहै, तिला आपला डोळ्याचा रंग ठाऊक नाही त्यामुळे ती तशीच दिवस कंठत आहे.
समाज गावांत २ व्यक्ती आहेत आणि त्यातील एकाचे डॊळे जरी घारे असले तरी, आपले डोळे घारे आहेत हे त्याला ठाऊक नसेल, दुसऱ्याचे डोळे त्याला काळे वाटले, तरी सुद्धा गांवातील सर्व लोकांचे डॊळे काळे असू शकतात.
समजा गांवांत क्ष लोक आहेत, मग त्यांना इतर सर्व लोकांचे डोळे दिसत असले तरी त्यावरून आपल्या डोळ्यांच्या बद्दल ते काहीही अनुमान काढू शकत नाहीत.
साधू आल्या नंतर
गांवात एक व्यक्ती आहे आणि त्याचे डोळे घरे आहेत. साधूचे बोलणे ऐकताच त्याला लक्षांत येईल कि गांवातील एकमेव व्यक्ती मी असल्याने आणि साधू सत्यवचनी असल्याने त्याचे डोळे घारे आहेत. त्या रात्री तो गांव सोडून जाईल.
गांवांत दोन व्यक्ती आहेत. साधूचे बोलणे दोघांनी ऐकले. आता समजा त्यापैकि एकाचेच डोळे घरे आहेत, मग वरील निष्कर्षाप्रमाणे त्याला आपले डोळे घरे आहेत हे समजेल. पण समजा दोन्ही व्यक्तींचे डोळे घारे असले तर ? पहिल्या दिवशी दोन्ही माणूस असा विचार करतील कि ह्या दुसर्या माणसाचे डोळे घारे आहेत त्यामुळे आज रात्री तो गांव सोडून जाईल. पण दोघेही जण तोच विचार करत असल्याने ते गांव सोडून त्या रात्री जाणार नाहीत. दुसऱ्या दिवशी ते एकमेकांना पाहतील आणि विचार करतील कि हा माणूस गांव सोडून गेला नाही ह्याचा अर्थ त्याला दुसरा कोणी तरी घार्या डोळ्यांचा माणूस गांवात दिसत असला पाहिजे .....
आता हाच विचार ३ ४ ५ ... N लोकांसाठी करा.
तुम्हाला विंटरनेट वर उत्तरे शोधायची असेल तर हे पहा https://xkcd.com/blue_eyes.html