मराठीद्वेष?

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in काथ्याकूट
26 Dec 2007 - 1:06 am
गाभा: 

हे वाचा.... आणि त्या खालच्या कॉमेंन्ट्स पण वाचा.... ही आपली आपल्याच राजधानीत पत.

http://www.mumbaimirror.com/net/mmpaper.aspx?page=article&sectid=15&cont...

बृ.मुं.म.न.पा. चे बरोबर का चूक ते राहू दे पण लोकांच्या प्रतिक्रिया तर बघा...

बिपिन.

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

3 Jan 2008 - 2:41 am | इनोबा म्हणे

या परप्रांतीयांमुळे मुंबई व पुण्यासारख्या शहरांमधे हिंदीचा वापर वाढू लागलाय्.मी हिंदीचा द्वेष करत नाही पण स्वतंत्र भारतात राज्यांची निर्मीती भाषेच्या निकषांवर केली गेली होती मग त्या-त्या राज्यात स्थानीक भाषा वापरली गेली तर बिघडले कुठे?पण यांना(विशेषकरून दक्षिण भारतीयांना)आपल्या राज्यात जरी मातृभाषा हवी असली तरी महाराष्ट्रात मात्र हिंदी किंवा इंग्रजी हवी असते,हा निव्वळ मराठीद्वेष आहे,दुसरे काय.

दक्षिण भारतीयांना त्यांच्या स्थानीक भाषेशिवाय इतर कोणत्याही भाषेचा आदर करण्याची इच्छा नाही.अगदी राष्ट्र्भाषेचाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Jan 2008 - 2:03 am | बिपिन कार्यकर्ते

मराठीद्वेष हे नक्कीच पण ती बातमी देणारेही मराठीच दिसत आहेत... मी आज पर्यंत दाक्षिणात्यांबरोबर खूप राहिलो आहे, इतके की मला ऐकून ऐकून बर्‍यापैकी कळायले लागली आहे त्यांची भाषा. पण भाषेच्या बाबतीत आपण जेवढे उदासिन आहोत तेवढे क्वचितच कोणी असेल. आमच्या ऑफिसच्या इंटर्नल मिटींग्ज सुद्धा कधी कधी तामिळ मधे घसरतात...

बिपिन.

खरोखरच उत्तम चर्चा आहे ही.... एखादे वेळीस जर २ तामिळी माणसे तमिळ मधे बोलली तर ते भाषा प्रेम आणि मराठी माणसाने मात्र मराठीचा आग्रह धरला तर मात्र तो अट्टाहास हा कोणता न्याय? पण याबाबतीत मला एक सुचवावेसे वाटते ते असे की....'मराठीच्या हीताच्या आड येणारी भाषा मग ती आपली राष्ट्रभाषा का असेना त्यावर लगाम कसलाच पाहिजे'....
बिपिननी व्यक्त केलेल्या गोष्टीची एक फार खेदकारी बाजू सांगू का? मी माझ्या ऑफीस मधे अनेक मराठी लोकाना हिंदी मधे बोलताना ऐकले आहे(एकमेकांच्यात देखील)... ही निव्वळ लाचारी नव्हे तर काय??
ध.अ.मिराशी

इनोबा म्हणे's picture

9 Jan 2008 - 10:48 am | इनोबा म्हणे

धन्याशी सहमत.ही भाषीक गुलामगिरी आपण सोडवायलाच हवी.मी स्वतः नेहमी याकरीता प्रयत्न करतो,माझ्या आसपास असणार्‍या प्रत्येकालाच मी मराठीत बोलण्याचा सल्ला देतो...अगदी परप्रांतीयांनासुद्धा.ऑर्कुटवर माझी या विचारांना वाहिलेली 'अस्सल मराठी-कट्टरवादी मराठी' नावाची कम्युनिटी आहे.

(कट्टर मराठीप्रेमी) -इनोबा

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jan 2008 - 7:47 am | llपुण्याचे पेशवेll

विन्या,
सहीच रे. मला कम्युनिटीची लिंक पाठव ना! किंवा मिसळ्पाववर जाहीर कर.. मला सामिल व्हायला आवडेल.
ध.अ.मिराशी

इनोबा म्हणे's picture

10 Jan 2008 - 9:10 pm | इनोबा म्हणे

मला वाटतं ऑर्कुटपेक्षा आपण मिपावरच याचा प्रचार करू,तरीदेखील तुला ही कम्युनिटी बघायची असेल तर या लिंकवर टिचकी मार.

इनोबा म्हणे's picture

10 Jan 2008 - 9:25 pm | इनोबा म्हणे

मुंबई मधील परप्रांतीयांच्या आक्रमणावर आधारीत 'मुंबई आमचीच' या चित्रपटाचे प्रदर्शन येत्या ११ ता.ला होणार आहे अशी बातमी झी चोवीस तासला पाहिली. या चित्रपटाचे प्रदर्शन गेल्या वर्षी रखडले होते,(संकेतस्थळावरही बंदी लादली होती)आता तो प्रदर्शीत होतोय्.या चित्रपटामुळे मराठी समाजाचे डोळे उघडतील अशी आशा आहे.

या चित्रपटावर बंदी लादल्यानंतर दै.लोकसत्ता मधे एक लेख छापून आला होता. हा लेख येथे वाचता येईल.

सुधीर कांदळकर's picture

10 Jan 2008 - 9:43 pm | सुधीर कांदळकर

शासनात मराठीच चालते. पोलिस खात्यात तर मराठी बोलल्यावर फार चांगली वगणूक देतात. रडत बसण्यापेक्षा सगळीकडे बिनधास्त मराठी बोला. गि-हाईक मराठी म्हटल्यावर दुकानदार मराठीतच बोलतात. बाहेरगांवी फिरतांना अचानक मराठी बोलणारे अमराठी देखील लोक आढळतात. व प्रेमाने मराठी बोलतात. एकदा कोडाईकनालला आम्ही बेसावधपणे मराठीतून वाह्यात बोलत असतांना तमीळ मुस्लिम मॅनेजरने सांगितले 'ओ साहेब. आम्हाला पण मराठी येते'. त्याला खरोखर चांगले मराठी येत होते. तसेच कोईमतूरला एका साड्यांच्या दुकानांत दुकानाचा मारवाडी मालक छान मराठीतून बोलला. तमिळपेक्षा वेगळी भाषा ऐकून त्याला पण बरे वाटले.

इनोबा म्हणे's picture

11 Jan 2008 - 1:25 am | इनोबा म्हणे

सुध्या,
हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रसंग सांगून थांबलास?आता महाराष्ट्रातील किती मराठी लोक या परप्रांतीयांसाठी हिंदी बोलतात ते सांग पाहू....मोजता येनार नाही इतके लोक आहेत या वर्गामधे...आपल्या लोकांची हीच तर खरी अडचण आहे.महाराष्ट्रात असुनसुद्धा एखाद दुसरा बिगर मराठी मराठीत बोलू लागला तर आपले लोक अर्ध्या हळकुंडात पिवळे होतात,त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे...महाराष्ट्रात राहत आहेत म्हटल्यावर मराठी यायलाच हवे...

(???) -इनोबा

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jan 2008 - 7:38 pm | बिपिन कार्यकर्ते

सुधीर, तुमच्याशी सहमत आहे. मी सुध्दा आता बेधडक मराठीत बोलतो. आपण बोलल्याशिवाय इतरांना जाणवणार नाही.

भारताबाहेर मला पण तुमच्या सारखेच खूप अनुभव आले आहेत. बरेच अमराठी भाषिक जे मुंबईत / महाराष्ट्रात राहतात ते आवर्जून मराठीत बोलले / बोलतात. काही लोकांना तर खूप आनंद झाला बर्‍याच वर्षांनी मराठीत बोलून. पण त्यातल्याच काही लोकांना मी विचारले की ते मुंबईत होते / जातात तेंव्हा मराठीत बोलतात का? बहुतेक जण नाही म्हणाले, एक जण तर एवढेच म्हणाला, 'गरजच पडत नाही.' आता बोला.

बिपिन.

चतुरंग's picture

11 Jan 2008 - 3:25 am | चतुरंग

भाषेसारख्या विषयात कोणीच जबरदस्ती करुन चालत नाही. कायद्याने प्रश्न सुटायला नक्कीच मदत होईल. महाराष्ट्राची भाषा मराठी असे एकदा पक्कं झालं की सर्व व्यवहार मराठीतून व्हायला हवेत.
आपण सर्वांनी मराठीतून संवाद साधणे जितकं गरजेचे आहे, त्याच बरोबर बाहेरचे जे लोक मराठी बोलतील त्यांचं स्वागत करायला हवं. त्यांना मराठी बोलायला प्रोत्साहन द्यायला हवं, तरच त्यांना ही भाषा शिकायची इच्छा होईल.
कारण व्यवहारात गोष्टी गरजेतूनच घडतात. ते हिंदीतून बोलून जर त्यांचं चालत असेल तर ते मराठी का बोलतील? आपण तरी चेन्नईला जाऊन तमिळ शिकू का जर आपली कामे इंग्लिशमधून होत असतील तर?
आडमुठेपणाने ह्यावर मार्ग निघणे फार कठिण आहे.
आपापल्या वैयक्तिक वर्तुळात मराठी ठेवणे आणी बाहेरचा जो कोणी आपल्या संपर्कात येईल त्याला मराठी बोलायला उद्युक्त करणे ही आपली जबाबदारी आहे, नाहीतर आपली गळचेपी होत राहणार.

चतुर

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jan 2008 - 8:36 am | llपुण्याचे पेशवेll

कधीही बघा. एखाद्या समूहात एकच बिगर मराठी माणूस असेल तर संपूर्ण मराठी समूह हींदीत बोलू लागतो. आणि याला कारण मराठी माणूसच आहे. हा विषय जेव्हा माझ्या कार्यालयात चर्चेला आला तेव्हा अमराठी लोकाना मराठीत बोलायला आपण प्रवृत्त केले पाहिजे या माझ्या सूचनेला विरोध करणारे सर्व लोक दुर्दैवाने मराठीच होते.
ध.अ.मिराशी

सुधीर कांदळकर's picture

13 Jan 2008 - 7:44 pm | सुधीर कांदळकर

खरे आहे. आमच्या गृहसंस्थेच्या वार्षिक सभेत एकमेव उपस्थित अमराठी सदस्याने हिंदीतून बोलण्याचा जोरदार आग्रह केला. इतकी वर्षे राज्याच्या राजधानीत राहून मराठी कळत नसेल तर तुझ्या गावी चालता हो असे परखड उत्तर त्याला तेव्हा चिटणिसाने दिले होते. आणि त्या ...... ला सगळे बोललेले कळत होते.

विकि's picture

11 Jan 2008 - 6:21 pm | विकि

मराठी भाषा ,मराठी माणुस यांवर चर्चा करून उपयोग नाही.मराठी मुंबईत बाहेरील राज्याचे लोक वाढत आहेत व होते तेव्हा काय मराठी माणुस झोपा काढत होता. आताच गरज का भासली.
आज मुंबईत भोजपुरी चित्रपट तुफान गर्दीत चालु आहेत याला जबाबदार कोण. मराठी शाळा बंद पडत आहेत.बस,रेल्वे,इ. सार्वजनिक ठीकाणी हिंदी,इंग्लिशशिवाय काही ऐकु येत नाही.इंग्लिश येत नाही म्हणुन नोकर्‍या नाहीत अशी मराठी तरुणाची अवस्था आहे. मराठी भाषा दोन वेळच अन्न देऊ शकत नाही याचा ही विचार करणे आवश्यक आहे. तेव्हा खोटी भाषीक अस्मिता जपु नका?
मराठी माणुस का एकत्र रहत नाही, वेळ पडल्यास मराठी माणुस- दलीत मराठी माणुस आणी मराठी माणूस असा भेदभाव का करतो.
आपला
कॉ.विकि

विसोबा खेचर's picture

12 Jan 2008 - 5:09 pm | विसोबा खेचर

मराठी भाषा ,मराठी माणुस यांवर चर्चा करून उपयोग नाही.मराठी मुंबईत बाहेरील राज्याचे लोक वाढत आहेत व होते तेव्हा काय मराठी माणुस झोपा काढत होता. आताच गरज का भासली.
आज मुंबईत भोजपुरी चित्रपट तुफान गर्दीत चालु आहेत याला जबाबदार कोण. मराठी शाळा बंद पडत आहेत.बस,रेल्वे,इ. सार्वजनिक ठीकाणी हिंदी,इंग्लिशशिवाय काही ऐकु येत नाही.इंग्लिश येत नाही म्हणुन नोकर्‍या नाहीत अशी मराठी तरुणाची अवस्था आहे. मराठी भाषा दोन वेळच अन्न देऊ शकत नाही याचा ही विचार करणे आवश्यक आहे.

विकिरावांशी सहमत आहे...

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jan 2008 - 7:46 pm | बिपिन कार्यकर्ते

विकि, इथे विषय मराठी - अमराठी असा चालला आहे. तुम्ही सवर्ण - दलित (तुमच्या भाषेत मराठी - दलित) असा नविन अँगल टाकलात. माझ्या मते हे बरोबर नाही. तसे बघितले तर ही दरी अमराठी भाषिकांमधे पण आहे, उत्तरे कडे तर जास्तच.

दलित - इतर हा एक वेगळा आणि अधिक ज्वलंत प्रश्न आहे.

बिपिन.