पश्चात्य प्रसार मध्यमांचा निषेध

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in काथ्याकूट
27 Nov 2008 - 7:30 pm
गाभा: 

मुंबईवरच्या नीच हल्ल्याच्या बातम्या आम्ही सीएनएन वरुन बघत होतो. अशा दु:खद वेळेला आणखी एक क्लेशदायक बाब पहायला मिळत होती. या वाहिनीवर (तसेच त्यांच्या संकेत स्थळावर) भारताच्या नकाशात कश्मिर दाखवतच नव्हते! जागतीक प्रसार मध्यमांनी युनो ने संमत केलेले नकाशे दाखवावेत असा संकेत आहे. युनो ने संमत केलेल्या नकाशात पाकव्याप्त व चीनने गिळंकृत केलेले भाग वगळून काश्मिर भारताच्या नकाशातच दाखवला जातो.

अशा संकंट समयी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या सीएनएनच्या या मूर्खपणाचा त्रिवार निषेध!

या सारख्या प्रसार माध्यमांचा निषेध करण्यासाठी आपण त्यांच्यावर निषेधपत्रकांचा भडिमार करावा असे वाटते. आम्ही काही मित्र मिळून असे इमेल त्यांना पाठवत आहोत. तसेच त्यांच्या संकेतस्थळांवर याविषयी निषेध नोंदवत आहोत. अजून काय करावे बरे?

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

27 Nov 2008 - 7:36 pm | सर्वसाक्षी

आपल्या निषेधाव्यतिरीक्त सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणती कायदेशीर कारवाई करु शकते? तज्ज्ञांनी यावर काही प्रकाश टाकावा. किमान या देशाचा मान न राखणार्‍या या मुजोर वाहिन्यांना भारतात बंदी घालावी.

आपल्या निषेधाव्यतिरीक्त सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणती कायदेशीर कारवाई करु शकते?
आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या वाहिन्यांना नोटीसा पाठवून जाब विचारायला हवा. तेवढे तर नक्कीच करता येण्याजोगे आहे. जर त्या वाहिन्या नमल्या नाहीत तर त्यांच्या भारतीय वाहिन्यांवर (जसे सीएनएन-आयबीएन) येथे बंदी आणायला हवी.
त्याच बरोबर आपले सरकार त्या त्या देशांच्या वकीलाला बोलावून समज देऊ शकते व तो निरोप त्या त्या देशांच्या परराष्ट्र मंत्री, अध्यक्ष/पंतप्रध यांच्या पर्यंत पोचवू शकते.

इच्छाशक्ती हवी.

आपला,
(षंढ सरकारचा प्यादा नागरिक)भास्कर

वेताळ's picture

28 Nov 2008 - 10:57 am | वेताळ

पाकव्याप्त काश्मिर आता पाकिस्तानचा पुर्ण भाग झाला आहे. त्यावर आपला अधिकार नसताना आपण तो भाग आपल्या नकाश्यात का दाखवायचा?फक्त मनाला बर वाटाव म्हणुन?किती दिवस तुम्ही असे करणार? पुढची पिढी तुम्हाला विचारणार एक ना एक दिवस. त्यावेळी काय उत्तर देणार? प्रथम तो भुभाग जिंकुन घ्या .मग फुशारक्या मारा.ज्यावर आपला अधिकार नाही ते भुभाग आपल्या नकाश्यात कोण कसे दाखवणार?
वेताळ

भास्कर केन्डे's picture

28 Nov 2008 - 7:17 pm | भास्कर केन्डे

पाकव्याप्त काश्मिर आता पाकिस्तानचा पुर्ण भाग झाला आहे. त्यावर आपला अधिकार नसताना आपण तो भाग आपल्या नकाश्यात का दाखवायचा?
अहो, मी पाकव्याप्त काश्मिर बद्दल नाही बोलत आहे. भारताच्या अख्त्यारीत असणारा काश्मिर सुद्धा या वाहिन्या दाखवर नाहीयेत. हे फार भयंकर आहे.

विसोबा खेचर's picture

1 Dec 2008 - 12:30 pm | विसोबा खेचर

अशा संकंट समयी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या सीएनएनच्या या मूर्खपणाचा त्रिवार निषेध!

हलकट आहेत साले चुतमारिचे!

केवळ_विशेष's picture

4 Dec 2008 - 11:07 am | केवळ_विशेष

हे सी एन एन वाले अंमळ वेडझवे आहेत्...काही वर्षांपूर्वी यांनी काश्मीर अख्खं पाकिस्तानला जोडलेलं दाखवलं होतं, ज्याची त्यांनी माफीही मागितल्याचं आठवतय..
अहो मारणार्‍याचा एकवेळ हात धरता येतो, पण बोलणार्‍याचं तोंड कसं धरणार!

धम्मकलाडू's picture

4 Dec 2008 - 11:17 am | धम्मकलाडू

मुंबईवरच्या नीच हल्ल्याच्या बातम्या आम्ही सीएनएन वरुन बघत होतो. अशा दु:खद वेळेला आणखी एक क्लेशदायक बाब पहायला मिळत होती. या वाहिनीवर (तसेच त्यांच्या संकेत स्थळावर) भारताच्या नकाशात कश्मिर दाखवतच नव्हते! जागतीक प्रसार मध्यमांनी युनो ने संमत केलेले नकाशे दाखवावेत असा संकेत आहे. युनो ने संमत केलेल्या नकाशात पाकव्याप्त व चीनने गिळंकृत केलेले भाग वगळून काश्मिर भारताच्या नकाशातच दाखवला जातो.

निषेध! निषेध! निषेध!

अशा संकंट समयी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या सीएनएनच्या या मूर्खपणाचा त्रिवार निषेध!

अरेरे! निषेध! निषेध! निषेध!

या सारख्या प्रसार माध्यमांचा निषेध करण्यासाठी आपण त्यांच्यावर निषेधपत्रकांचा भडिमार करावा असे वाटते.

हो सोडू नका. भंडावून सोडा. पुन्हा एकदा निषेध! निषेध! निषेध!

आम्ही काही मित्र मिळून असे इमेल त्यांना पाठवत आहोत. तसेच त्यांच्या संकेतस्थळांवर याविषयी निषेध नोंदवत आहोत.

निषेध! निषेध! निषेध! तुमचा नाही. पुन्हा एकदा सीएनएनचा.

अजून काय करावे बरे?

मिपाकरांना जागृत करा. पुन्हा एकदा त्रिवार निषेध करा. निषेध! निषेध! निषेध!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"