पोटाची भूक मरणावर मात करते हीच वस्तुस्थीती आहे.

आम्हाघरीधन's picture
आम्हाघरीधन in काथ्याकूट
27 Nov 2008 - 6:27 pm
गाभा: 

एक बातमी नेहमीच्या सदरातील.

भ्याड हल्ल्यांना न घाबरता मुंबईकर पुन्हा सावरले

मुंबई - बुधवारी रात्री दक्षिण मुंबईच्या विविध भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर मनात भीतीची सावलीही उमटू न देता सामान्य मुंबईकराने गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा आपल्या दैनंदिन कामाला सुरवात केली आहे. शहरातील सामान्य जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.

"ताज' आणि "ओबेरॉय' हॉटेलमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी लष्कराची कारवाई अजून सुरू असली, तरी छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याचे चित्र आहे.

बुधवारच्या हल्ल्यानंतर बंद पडलेली लोकल सेवा गुरुवार सकाळपासून पुन्हा एकदा सुरळीतपणे चालू झाली आहे. "बेस्ट'ची दक्षिण मुंबईतील सेवाही सुरू असून, टॅक्‍सीही रस्त्यावरून धावू लागल्या आहेत.

याआधीही बॉम्बस्फोटांसारख्या भ्याड हल्ल्यांमुळे घाबरून न जाता मुंबईकरांनी आपली जिगर दाखवत दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवले होते. बुधवारी रात्री झालेल्या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर हीच जिगर त्यांना या संकटावर मात करण्यास मदत करेल, हे नक्की.

किती काळ याच स्वरूपाच्या कुचाळ आनी कुटाळ बातम्या देवुन प्रसार माध्यमे मुम्बईकरान्ची चेष्टा करणार आहेत.
मरणाचे भय मुम्बईकराना वाटत नाहीच अश्या स्वरूपाची ही बातमी आहे. परन्तु पोटाची भूक मरणावर मात करते हीच वस्तुस्थीती आहे.
आपणाला काय वाटते ?

प्रतिक्रिया

किट्टु's picture

27 Nov 2008 - 6:33 pm | किट्टु

आपल्या मतांशी सहमत!!

-किट्टु.

सर्वसाक्षी's picture

27 Nov 2008 - 8:14 pm | सर्वसाक्षी

केवळ पोटासाठी आज सर्व मुंबईकर कामावर गेले असे म्हणणे बरोबर नाही. ज्यांना एक दिवसाची भरपगारी रजा मिळणे सहज शक्य आहे असे अनेक जण आज आवर्जुन कामावर गेले होते. बहुसंख्य मुंबईकर हे शूर म्हणण्यापेक्षा आलेल्या संकटांचा बाऊ न करता वा भेदरुन न जाता वाटचाल पुढे सुरू ठेवण्याइतके कर्तव्य दक्ष आहेत. अशा घटना कुठेही म्हणजे अगदी राहत्या घरी देखिल घडु शकतात तेव्हा भितीने घरात बसून उगाच काल काय घडले यावर वांझोट्या चर्चा करण्यापेक्षा सरळ उठा आणि कामाला चालु लागा असा मुंबईकरचा खाक्या आहे.

शिवाय काल असे काही भयंकर घडले व त्यात निरपराध नागरीक व कर्तव्यशूर अधिकारी मृत्युमुखी पडले असताना आज आपण कामावर जाणे हीच त्यांना श्रद्धांजली या भावनेने अनेक मुंबईकर आज घरच्यांचा काळजीला घरात ठेवुन कामावर गेले.

आज कामावर जाणे सोडा, काल बाँब फुटत असताना आणि गोळिबाराचे आवाज येत असतानाही अनेक नागरीक मोठ्या हिमतीने जखमींना उचलुन न्यायला सरसावलेले दिसत होते. आजपर्यंतच्या प्रत्येक आपत्तीमध्ये मला मुंबईकराचे हे रुप दिसले आहे.

मुंबईकरांच्या हिमतीला 'भूकेची मरणावर मात' असे हिणविणे बरे नाही.

मराठी_माणूस's picture

28 Nov 2008 - 8:42 am | मराठी_माणूस

हे 'कामावर जाण्याचे' उदात्तीकरण आहे. हीच वस्तुस्थिती असती तर आनंद झाला असता.

नाशिककर's picture

28 Nov 2008 - 11:44 am | नाशिककर

मुंबईकरांच्या हिमतीला 'भूकेची मरणावर मात' असे हिणविणे बरे नाही.... पटलं...!!

केवळ भूकेची मरणावर मात आहे हे म्हणणे बरोबर नाही... ही वेळ आहे दशहतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला उत्तर देण्याची... आणि काही झालं तरी तुम्ही आमच्या मनांत दहशत निर्माण करु शकत नाही आणि आम्ही तुमच्या या भ्याड हल्यांना भीत नाही असा संदेश देणारी ही क्रूती आहे अशा द्रुष्टीकोनातुन हि घटना पाहायला हवी!!

आणि खरंच सलाम मुंबई म्हणणं बरोबर पण आहे!!!!

जय हिंद!!!

कशिद's picture

27 Nov 2008 - 8:29 pm | कशिद

आपल्या मतांशी सहमत!!

कपिल काळे's picture

27 Nov 2008 - 8:40 pm | कपिल काळे

बिपिनने हा मुद्दा मांडला होता.

" सलाम मुंबै" अश्या गोंडस नावाखाली हे मिडिया वाले मुंबैच्या दु:खावर आपली पोळी भाजून घेतील.

http://kalekapil.blogspot.com/