इंग्लंड संघाचा भारत दौरा रद्द

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
27 Nov 2008 - 1:27 pm
गाभा: 

सुरक्षिततेच्या कारणावरुन इंग्लंड संघाने भारताचा दौरा रद्द केला आहे. आधि गुवाहाटि येथे खेळण्यास नकार देणार्‍या इंग्लंड संघाने आता दौराच रद्द केला आहे. मुंबई मध्ये घडलेल्या व घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभुमीवर खेळाडुंच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचे त्यांचे मत आहे. आगामी चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया

अंतरंग....'s picture

27 Nov 2008 - 1:42 pm | अंतरंग....

साले वाईट हरतील म्हणून सुरक्शेचे निमित्त करुन पळाले.....

जैनाचं कार्ट's picture

27 Nov 2008 - 1:43 pm | जैनाचं कार्ट (not verified)

देशावर कलंक !

देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विदेशी खेळाडूंनी देशात खेळण्यास नकार दिला व देश सोडून गेले !
चॅपीयन लिग व भारत इंग्लंडचे मॅच रद्द झाले !

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

दत्ता काळे's picture

27 Nov 2008 - 1:45 pm | दत्ता काळे

सुरक्षिततेच कारण योग्य असेलही. पण पीटर्सनला हायसं वाटलं असेल, कारण सगळ्याच ODI हरण्याचं अपयश माथी आलं असतं.

छोटा डॉन's picture

27 Nov 2008 - 1:45 pm | छोटा डॉन

महाराष्ट्र पोलीसचे शान असलेले एकाहुन एक शुर अधिकारी गेले १२-१४ तास शीर हातात घेऊन प्राणपणाने लढत व प्रसंगी प्राण गमवत असताना आम्हाला त्या "चिल्लर क्रिकेट खेळाचे व त्यांच्या दौर्‍याचे" काडीइतके कौतुक नाही.
आय जस्ट डोन्ट गीव्ह हीम डॅम ...

चॅम्पीयन्स ट्रॉफी सुद्धा आत्ताच रद्द करावी ...
सामान्य माणसाच्या जीवाची शास्वती सोडा इथे "ए टी एस प्रमुख" गोळ्यांना बळी पडत असताना हे कसले "चॅम्पीयन्स" व्हायला निघाले आहेत हे देव जाणो.
सद्य परिस्थीतीत (आमच्यासारख्या ) सामान्य माणसाच्या भावना समजुन घ्याव्यात , असल्या फालतु गोष्टींचे भांडवल करुन स्वतःचे कौतुक करुन घेऊ नये ह्या क्रिकेटर्सनी / नेत्यांनी / अभिनेत्यांनी अथवा कुणीही ...

अवांतर : स्वतःचे प्राण खेळापेक्षा अधिक महत्वाचे असल्याने दौरा रद्द करणार्‍या "इंग्लंड संघाचे" दुसर्‍या बाजुने आम्हाला कौतुक आहे. पण मिडीया अथवा कुणीही याचे भांडवल करु नये, हा प्रश्न अजिबात महत्वाचा नाही, चुपचाप निघुन गेलात तरीही हरकत नाही ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विनायक प्रभू's picture

27 Nov 2008 - 1:54 pm | विनायक प्रभू

I care a shit for that cricket being cancelled

मनस्वी's picture

27 Nov 2008 - 1:56 pm | मनस्वी

क्रिकेट दौर्‍याचा आणि दहशतवादाचा संबंध लावू नये. त्याचे भांडवल करू नये.
आत्ता फक्त दहशतवादावरच लक्ष केंद्रित करण्याची आणि नायनाट करण्याची गरज आहे.
त्याला क्रिकेट / बॉलीवूड ची जोड देउन मेडियाने विषयाला फाटे फोडू नयेत.

कपिल काळे's picture

27 Nov 2008 - 9:16 pm | कपिल काळे

डॉन शी सहमत

http://kalekapil.blogspot.com/

मराठी_माणूस's picture

27 Nov 2008 - 1:46 pm | मराठी_माणूस

जे काही चालले आहे त्याचे गांभिर्य लक्षात घेता हे नगण्य आहे

अरे बाबानो तुम्हीच तुमच्या देशात सुरक्षित नाही मग काय डोंबाल तुम्ही त्याचे रक्षण करणार.तुमची टीम पण नाही पाकिस्तान मध्ये खेळायला गेली? का नकार दिला? इथे जर रस्त्यावर हातबॉम्ब फुटत असतील,दहशतवादी एके ५६ रस्त्यावर घेवुन गोळीबार करत खुलेआम फिरत असतील तर कोणता देश आपल्या नागरिकांना पाठवेल.जरा शांतपणे विचार करा. आपला देश म्हणजे इस्त्राईल नव्हे.
वेताळ

छोटा डॉन's picture

27 Nov 2008 - 1:49 pm | छोटा डॉन

त्यांना दोष अजिबात देऊ शकत नाही. त्यांचे बरोबर"च" आहे ...
दोष आपल्या मिडीयाला व काही स्वार्थी लोकांना आहे जे याचे भांडवल करत आहेत. नक्की काय महत्वाचे आहे ह्याचे अज्ञान व समजुन घेण्यास तेवढी मानसीक पात्रता नसेल तर ह्या गोष्टी घडतात, आम्हाला ह्याचा राग नाही पण "कीव" येते ...
असो, वाचक सुज्ञ आहेतच ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनस्वी's picture

27 Nov 2008 - 1:49 pm | मनस्वी

त्या खेळाडूंना काय नावं ठेवायचीयेत? काय चुकलं त्यांचं?
या देशाच नागरीकच सुरक्षित नाही तर त्यांची काय बात? कोण घेणार त्यांची जबाबदारी?
सिरीज आपण जिंकलेलोच आहोत, म्हणून हार खाण्याच्या भितीने ते पळून चाललेत म्हणणे चुकीचे ठरेल.
आपण ज्या दहशतवादाला या ना त्या शहरात दर महिन्याला सामोरे जातो, तो त्यांना नवीनच!

श्री's picture

27 Nov 2008 - 1:58 pm | श्री

अहो त्यात त्याना का म्हणुन दोष दयावा. मुंबईत येण्यासाठी ची रेल्वे बुकींग धडाधड रद्द होताहेत, मग हे तर परकीय खेळाडू. आणी पोलिसांचा ताण पण कमी होईल. अगोदर आपण घराला लागलेली आग विझवुया मग खेळाच बघुया.
तमसो मा ज्योर्तिगमय

इंग्लंड दौर्‍याबरोबर चँपियन्स लीगही रद्द करावे.
नाहीतर एका झटक्यात 'झाले गेले विसरून' भारतीय लोक 'मिडलसेक्स भारी का राजस्थान रॉयल्स? कोणत्या टीमवर बेटिंग करावे?' या जास्त महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर विचार सुरू करतील.

नकोच!

परिकथेतील राजकुमार's picture

27 Nov 2008 - 2:26 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या बातमीला फार मोठे महत्व द्यावे असा अज्जिबात उद्देश नाहि, परंतु घडलेल्या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे आणी ती हि आधीच्या पेक्षा थोड्या वेगळ्या पध्दतीने येव्हडेच सांगणे होते. ह्या आधि पाकिस्तान प्रमाणे भारतात परदेशी नागरिकांना कधिच असुरक्षित वाटले न्हवते. हा रद्द होणार दौरा बरेच चुकिचे समज पसरवुन जाणार हे निश्चित !

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।
आमचे राज्य

अंतरंग....'s picture

27 Nov 2008 - 2:29 pm | अंतरंग....

mee rajkumra la purna sahamat aahe

विसुनाना's picture

27 Nov 2008 - 3:16 pm | विसुनाना

चुकीचे समज कसले? योग्य तेच समज झाले आहेत परकीय नागरिकांचे! ते कशाला येतील भारतात मरायला?
परकीयांचे सोडा हो! अनिवासी भारतीयसुद्धा भारतात अशा परिस्थितीत येतील असे वाटत नाही.
अनिवासी भारतियांचे सोडा हो! निवासी भारतीय तरी भारतात बिनधास्त फिरतील तर मिळवली!!

आम्हाघरीधन's picture

27 Nov 2008 - 3:55 pm | आम्हाघरीधन

सध्या घडणार्या घटना हा देशाच्या सुरक्षीततेचा मुद्दा आहे, त्या पळपुटया क्रिकेटर लोकान्चा विषय तात्पुरता बाजुला ठेवलात तरि चालेल.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
आम्हा घरी धन शब्दान्चीच रत्ने, शब्दान्चीच शस्त्रे यत्ने करु|
शब्द्ची अमुच्या जीवाचे जिवन, शब्दे वाटु धन जन लोका|

ऋषिकेश's picture

27 Nov 2008 - 4:12 pm | ऋषिकेश

फट्टु आहेत साले !!!!!!!

-(खेळून हरणारा) ऋषिकेश

डुरक्या's picture

27 Nov 2008 - 9:14 pm | डुरक्या

आधि पाकिस्तान प्रमाणे भारतात परदेशी नागरिकांना कधिच असुरक्षित वाटले न्हवते >> पैसा बोलता है.. भारतीय क्रिकेटमध्ये पैसा मिळत नसता तर कोणी फिरकले ही नसते.. असो.. हा विषय आता गौण आहे..