शहीद पोलीस अधिकारींना अभिवादन

अंतरंग....'s picture
अंतरंग.... in काथ्याकूट
27 Nov 2008 - 11:50 am
गाभा: 

नुकत्याच मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या श्री. करकरे, श्री. कामठे व श्री.साळस्कर यांना नम्र अभिवादन

तिघेही जाबाज मराठी अधीकारी, मरणाची पर्वा न करता दहशती गोतात घुसले......

श्री. करकरे यांनी वयाच्या ५४ व्या वर्ष देखिल दाखवलेल्या या पराक्रमाला खरेच प्रतीमा नाही......

प्रतिक्रिया

मैत्र's picture

27 Nov 2008 - 11:55 am | मैत्र

दुसर्‍या धाग्यांमध्ये मी हाच मुद्दा मांडला आहे.
या तिघांचे शौर्य वादातीत आहे. पण ज्यांची नावे अजून आपल्या पुढे आली नाहीत ते इतर कॉन्स्टेबल्स आणि कमांडोज ही याच गौरवाला पात्र आहेत. आत्ताच वाचलं की एका नेव्ही कमांडोचा ओबेरॉय मध्ये धुमश्चक्रीत मृत्यू झाला.
सर्वांना विनम्र अभिवादन.

अंतरंग....'s picture

27 Nov 2008 - 12:01 pm | अंतरंग....

श्री कामठे यांच्या घरची १५० वर्ष ची पोलीस परंपरा आहे,
त्यांचे वडिल, आजोबा आणि पणजोबा सुद्धा पोलीस खात्यात होते...

अशा शुर हिरा ला माझा पुन्हा एकदा सलाम....

अनामिका's picture

27 Nov 2008 - 2:47 pm | अनामिका

या अतिरेकी हल्ल्याच्या निमित्ताने मुंबई पोलीसांची कर्तव्यदक्ष अधिकार्यांची एक पुर्ण फळीच गारद झाली कि जाणिवपुर्वक केली गेली?एटिएस प्रमुख हेंमंत करकरे,विजय साळसकर, अशोक कामटे या सारखे अनुभवी अधिकारी अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडले /नक्की अतिरेक्यांच्याच गोळ्यांनी या सगळ्यांचा घात केल की आपल्याच राज्यकर्त्यांच हे कुकर्म म्हणायच्?मला नुसती शंकाच नाही दाट विश्वास आहे की यांना वीरमरण आलेल नसुन यांच एन्काउंटर केल गेलय आणि ते देखिल राज्यसरकार द्वारा?
"अनामिका"

अंतरंग....'s picture

27 Nov 2008 - 1:40 pm | अंतरंग....

मला नाही वाटत की हा कुण्या राज्यकर्त्याचा कट असावा
आपले नेते माजलेत पण, असे क्रुत्य कोण करणार नाही.....

म.टा. मध्ये आलेल्या बातमी वाचा. हे जर खरे असेल तर या सर्व न्युज चॅनेल्सवर ताबडतोब बंदी आणली पाहिजे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Nov 2008 - 2:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे जर खरे असेल तर या सर्व न्युज चॅनेल्सवर ताबडतोब बंदी आणली पाहिजे.
या न्यूज चॅनल्सवर बंदीच आणली पाहिजे. एका कर्तव्यदक्ष अधिकार्‍याचा जीव या वार्ताहरांच्या अतिउत्साहामुळे जातो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. काय गरज आहे, आपण तमाम सामान्य जनतेला माहित असण्याची की कोणत्या पोलिसाने बुलेट प्रूफ जॅकेट घातलं आहे का नाही ते?

हे तर एक टोक आहे, पण प्रत्यक्ष घटनास्थळी हे वार्ताहर नुसते फोटो, व्हिडीओ काढत बसतात, पण एकालाही असं वाटत नाही की हे सोडून पहिले त्या जखमींना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे? यांच्यावर मानवाधिकारवाले काही केसेस का नाही करत?

विकास's picture

28 Nov 2008 - 12:07 am | विकास

अतिरेकी काय न्यूजचॅनल्स मधून मधून बघत त्यांचे डावपेच ठरवत होते असे म्हणायचे आहे का?

माध्यमांची जर चूक असेल तर "कायम" अशा अधिकार्‍यांना प्रसिद्धीच्या "झोतात" ठेवणे ही. पण ती केवळ न्यूज चॅनल्सची नाही तर सर्वच प्रसिद्धी माध्यमांची आहे.

आज सकाळ मधे करकरे कुठे राहतात त्या इमारतीचे नाव, घर क्रमांक, मुलींची नावे सर्व काही मनापासून दिले आहे. याची खरेच गरज आहे का? त्यामुळे अतिरेकी हल्ल्यात फरक पडणार नाही कारण त्यांना अशा बातम्यांची गरज नसते, तरी देखील कशासाठी?

अजून एक गोष्टः आत्ताच सीएनएन वरील एक अमेरिकन वार्ताहार त्यांच्या अमेरिकेतील स्टुडीओ मधूनच तिच्या ताजमधील आठवणी सांगत होती. त्या प्रमाणे तीथे "वॉल्स ऑफ सिक्यूरीटी" आहे जिच्यामधून गेल्याशिवाय आत प्रवेश मिळत नाही. अगदी पार्कींग लॉट मधेपण... एका केंद्रीय मंत्र्याने (स्वतःचे नाव जाहीर न करता) असे सांगितले आहे की अतिरेक्यांनी कमांड सेंटरच ताज मधे चालू ठेवले होते. मग हे इतके काही घरभेदी असल्याशिवाय गेले असेल असे वाटते का?

थोडक्यात हे युद्ध आहे आणि ते युद्ध म्हणूनच हाता़ळले पाहीजे.

इन्स्पेक्टर शशांक शिंदे
सबइन्स्पेक्टर प्रकाश मोरे
नानासाहेब भोसले
तुकाराम होंबळे
कॉन्स्टेबल्स एआर चित्ते
विजय खांडेकर
योगेश पाटील
जयंत पाटील
अंबादास पवार
एससी चौधरी

हि नावे इथे आहेत.

नीलकांत's picture

27 Nov 2008 - 2:09 pm | नीलकांत

श्री. करकरे, श्री. कामठे व श्री.साळस्कर आणि आपले कर्तव्य बजावत शहीद झालेल्या सर्वांना अभिवादन.

याचे हे वीरमरण कामास येवो. आणि या किमान या प्रकरणाचा तरी राजकिय हस्तक्षेप न होता लवकरात लवकर सोक्षमोक्ष लागो ही परमेश्वराजवळ प्रार्थना.

- नीलकांत

मेघना भुस्कुटे's picture

27 Nov 2008 - 9:49 pm | मेघना भुस्कुटे

श्री. करकरे, श्री. कामठे व श्री.साळस्कर आणि आपले कर्तव्य बजावत शहीद झालेल्या सर्वांना अभिवादन.

याचे हे वीरमरण कामास येवो. आणि या किमान या प्रकरणाचा तरी राजकिय हस्तक्षेप न होता लवकरात लवकर सोक्षमोक्ष लागो ही परमेश्वराजवळ प्रार्थना.

असेच म्हणते. निदान इतक्या लांछनास्पद हल्ल्यानंतर तरी गोष्टींचा राजकीय फायदा घेण्याची राजकारण्यांना लाज वाटो आणि देशाबद्दल काही एक किमान प्रेम-अभिमान-कर्तव्य वाटो. दुर्दैवाने असे घडले नाही, तर अशा लोकांना निवडून देणारे आम्ही तितकेच नालायक आहोत याचा आम्हांला कदापि विसर न पडो आणि सक्रिय राहून देशप्रेम दाखवण्याची आमची इच्छाशक्ती जिवंत राहो.

अंतरंग....'s picture

27 Nov 2008 - 2:16 pm | अंतरंग....

हरामखोर आहेत सगळे मिडिया वाले
काय आणि कीति कसे दाखवायचे याची अक्कल नाहिये त्यांना....
मि म टा तल्या बातमी शी पुर्ण सहमत आहे.....

भारत सरकारने यांना वेठिस आणन्यासाठी काहीतरी नीयम काढले पाहीजेत....

केशवराव's picture

27 Nov 2008 - 3:32 pm | केशवराव

सर्व शहीद ऑफिसर्सना त्रिवार सलाम! अनामिकाच्या मताशी असहमत ! मिडीया वाल्यांचा धि़क्कार !!

अरण्यसैनिक's picture

27 Nov 2008 - 7:19 pm | अरण्यसैनिक

जबरदस्त कामगिरी बजावली अधिकार्यांनी

सर्वसाक्षी's picture

27 Nov 2008 - 7:30 pm | सर्वसाक्षी

एरवी पोलीसखात्यातल्या भ्रष्टाचारावर मनसोक्त तोंडसुख घेत असताना जेव्हा असे काही कर्तव्यदक्ष अधिकारी जिवावर उदार होउन जनतेच्या रक्षणाला धावतात तेव्हा त्यांना मानवंदना देणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे.

माध्यमांनी प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडला आहे. 'फक्त आमच्याच वाहीनीवर' अशी जाहीरात करता यावी यासाठी हे लोक काहीही करु शकतात. यांना कोण जगले कोण मेले याच्याशी काही सोयर सुतक नाही, यांचे '२४ तास' दुकान चालले पाहीजे. हे सगळे पाहीले की वाटते पूर्वी एक सरकारी बातमीपत्र होते तेच बरे होते.

कपिल काळे's picture

27 Nov 2008 - 9:02 pm | कपिल काळे

चिलखत आणि शिरस्त्राण घालून ताज हॉटेल मध्ये गेले होते. तिथून ते बाहेर आले.
त्यानंतर सी एस टी मधील परिस्थिती पाहून ते अझाद मैदान पोलिस चौकीत गेले असता बाहेर गोळीबार होत होता. तिथे तीन अतिरेकी गोळ्या झाडत होते.
करकरे त्या अतिरेक्यांच्या पाठलागावर असताना त्यांना गोळ्या लागल्या.

ही बातमी मी सीएनएन वर पाहिली. त्यांचा वार्ताहर रोहित चंदावरकर ह्याची ही बातमी सीएनएन च्या आंतरराष्ट्रीय वाहिनीवर काल दाखवली जात होती.

http://kalekapil.blogspot.com/

सभ्य इसम's picture

27 Nov 2008 - 9:53 pm | सभ्य इसम

सर्व कर्तव्यदक्ष अधिकारयांना विनम्र अभिवादन.
सर्वांत दुर्देवाची बाब म्हणजे केवळ हया असल्या गोष्टी घडल्यांनंतरचा तोच तो घटनाक्रम:
न्यूज चॅनल्स वर ३-४ दिवस ह्याच विषयावर वेगवेगवेगळे रिपोर्ट्स.
मग आमच्या सारख्या सभ्य इसमांनी त्यावर केलेला युक्तीवाद,
चॅनल्सवाले, राजकारणी ह्यांच्यावर केलेल्या टीका. पोलिसांचे आतापुरतं केलेलं कौतुक.
त्यानंतर भिकार रिआलिटी शोजमधील (योजनाबद्ध) वायफळ वादावर चर्चा, गरीब बिचारया क्रिकेटर्सच्या रेकॉर्डसची गोळाबेरिज, सिनेतारकांच्या खाजगी आयुष्यातल्या सामान्य माणसाकरिता अत्यंत महत्वंपूर्ण अशा घडामोडींवर द्रुष्टीक्षेप ह्या सगळ्या गोष्टी पुर्वपदावर येऊन सर्वकाही पुर्वीसारखं सुरु होईल.
काही दिवसांनी ह्या घटनेमागे कोण होते, कसा कट रचला गेला ह्याचा खुलासा होईल. काहींना अटक होईल. निदान ५ ते १० वर्षांत आरोपींना शिक्षा जाहीर होईल. फाशीची शिक्षा जाहीर झाल्यास त्याला विरोध करणारया काही थोर व्यक्ती पुढे येतील.
महत्वाची गोष्ट म्हणजे आपले महान राजकारणी लोक ह्या सर्वं घटनांचा राजकीय फायदा घेऊन अनेक निवडणुका लढतील आणि जिंकतीलही.
बॉलिवूडही मागे राहणार नाही मग.या घटनेवर काही चित्रपट निघतील, ते पाहताना आमचे डोळे पाणावतील (त्यातील पोलिस अधिकारयांची भुमिका केलेल्या नायकाने केलेल्या AWARD WINNING ACTING वर).
ह्या चित्रपटांच्या निमित्ताने आम्हाला ह्या तीन अधिकारयांची नावे आठवतील.

१-२ वर्षात, मग अचानक अतिरेक्यांना स्मरण होईल, दिल्ली, मुंबईत आणि देशातील इतर भागात बरेच दिवस घातपात न घडवल्याचे.
पुन्हा असला प्रकार घडेल आणि त्याच त्या गोष्टी घडत राहील.

करकरे,साळसकर, कामते साहेब आणि इतर सर्व शहीद पोलिस कर्मचारी...तूम्ही ज्यांच्या सुरक्षेसाठी आपले प्राण त्यागले, त्या आमच्या सारख्या सभ्य इसमांना त्याची कधी किंमत कळेल, ह्याची कल्पना नाही, पण तो दिवस नक्की लवकरच येवो आणि आपल्या सारख्या इतर शुरवीरांच्या कार्याची कदर पूर्ण देश त्यांच्या जिवंतपणीसुद्धा करो हीच अपेक्षा.

देशासाठी काही उपयोग नसलेला,
सभ्य इसम.

अभिजीत's picture

27 Nov 2008 - 9:53 pm | अभिजीत

शहीद झालेले ३ उच्च अधिकारी आणि ११ पोलिस यांना विनम्र अभिवादन.

- अभिजीत

अनामिका's picture

27 Nov 2008 - 10:09 pm | अनामिका

आताच झी २४ तास या वृत्तवाहिनी वर दिल्या गेलेल्या वृत्तानुसार श्री हेमंत करकरे यांचा मृत्यु छातीत गोळ्या लागल्यामुळे झाला.काल अतिरेक्यांनी पोलिसांची जी कॉलिस गाडी पळवली होती त्याच गाडित साळस्कर व करकरे हे दोघे देखिल होते.चालकाला मारहाण केल्यावर पुढिल आसनावर बसलेले साळस्कर व मागिल आसनावरील करकरे यांना देखिल गोळ्या घालण्यात आल्या?
या बाबतीत मटाने दिलेल्या वृत्तात तफावत अढळते आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3764403.cms
तसेच आज साळस्कर यांच्या अत्यंविधी नंतर त्यांच्या आईने आपला मुलगा हा अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडला नसुन त्याच्या मृत्युमागे मोठे कारस्थान असल्याचा गंभिर आरोप केला आहे.
मुळातच या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांचे अश्या प्रकारे झालेले मृत्यु हे संभ्रमात टाकणारे आहेत्.इतकी वर्षे पोलिसदलात आपली उभी हयात घालवल्या नंतर व महत्वाच्या मोहिमा यशस्वी पणे पार पाडल्यावर त्यांचा मृत्यु अश्या प्रकारे व्हावा हे खचितच पोलिसांचे व त्याच बरोबर सर्वसामान्य नागरिकांचे मनोधैर्य खच्ची करणारे आहे.
"अनामिका"

श्री's picture

28 Nov 2008 - 10:21 am | श्री

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3767093.cms हे ही वाचा.

तमसो मा ज्योर्तिगमय

अनामिका's picture

27 Nov 2008 - 10:36 pm | अनामिका

श्री सदानंद दाते यांच्या तब्येतीविषयी कुणाला काही माहीती आहे का?
असल्यास कृपया द्यावी
"अनामिका"

पक्या's picture

28 Nov 2008 - 8:54 am | पक्या

वीरमरण आलेले ३ उच्च अधिकारी आणि ११ पोलिस यांना विनम्र अभिवादन.
तसेच जीवाची पर्वा न करता बचावकार्य हाती घेऊन ते यशस्वीपणे पार पाडलेल्या फायर ब्रिगेड जवानांना त्रिवार सलाम !
(त्यांची अग्निपरीक्षा : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3767049.cms )

घाशीराम कोतवाल १.२'s picture

28 Nov 2008 - 9:22 am | घाशीराम कोतवाल १.२

एरवी पोलीसखात्यातल्या भ्रष्टाचारावर मनसोक्त तोंडसुख घेत असताना जेव्हा असे काही कर्तव्यदक्ष अधिकारी जिवावर उदार होउन जनतेच्या रक्षणाला धावतात तेव्हा त्यांना मानवंदना देणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे.

साला ज्या अधिकारी ची नावे एकुन भले भले चड्डी ओलि करायचे ज्यांनी १५० च्या वर लोकांना ढगात पाठवले ते अधीकारी अशे कशे
मरतात साला काही तरी गोम आहे आपले मुंबई पोलिस ती नक्कि शोधतील जर राजकारण नाही आल तर.........
साळस्कर साहेबांच्या मातोश्री यांची प्रतिक्रिया कुठे तरी पटते कि माझ्या मुलाला मारले गेले आहे तो मेला नाही

तसेच आज साळस्कर यांच्या अत्यंविधी नंतर त्यांच्या आईने आपला मुलगा हा अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडला नसुन त्याच्या मृत्युमागे मोठे कारस्थान असल्याचा गंभिर आरोप केला आहे.
मुळातच या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांचे अश्या प्रकारे झालेले मृत्यु हे संभ्रमात टाकणारे आहेत्.इतकी वर्षे पोलिसदलात आपली उभी हयात घालवल्या नंतर व महत्वाच्या मोहिमा यशस्वी पणे पार पाडल्यावर त्यांचा मृत्यु अश्या प्रकारे व्हावा हे खचितच पोलिसांचे व त्याच बरोबर सर्वसामान्य नागरिकांचे मनोधैर्य खच्ची करणारे आहे.

मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

सचिन बडवे's picture

28 Nov 2008 - 9:30 am | सचिन बडवे

वीरमरण आलेले ३ उच्च अधिकारी आणि ११ पोलिस यांना विनम्र अभिवादन. यातुन आता तरि आपले शासन जागे होइल आशी आशा ....

सचिन बडवे's picture

28 Nov 2008 - 9:31 am | सचिन बडवे

वीरमरण आलेले ३ उच्च अधिकारी आणि ११ पोलिस यांना विनम्र अभिवादन. यातुन आता तरि आपले शासन जागे होइल आशी आशा ....

वल्लरी's picture

28 Nov 2008 - 11:06 am | वल्लरी

मेजर संदीप उन्नीक्रुष्ण्न्न यांना ही विनम्र अभिवादन.
ताज होट्ल च्या ऑपरेशन मध्ये मेजर संदीप उन्नीक्रुष्ण्न्न शहीद झाले

अनामिका's picture

29 Nov 2008 - 12:22 pm | अनामिका

स्वर्गिय हेमंत करकरे यांच्या पत्नी श्रीमती कविता करकरे यांनी कुठल्याही राजकिय पक्षाकडुन दिली जाणारि मदत नाकारण्याचे संकेत दिल्याचे समजते.
असे असेल तर अत्यंत योग्य निर्णय .कुणाच्याही जिवीताच मोल हे पैशात होवुच शकत नाहि.
स्व करकरे यांना विनम्र अभिवादन.
"अनामिका"

बाकरवडी's picture

29 Nov 2008 - 3:19 pm | बाकरवडी

शूरा मी वंदिले
धारातीर्थी जे पडले.........

सर्व शहीद ऑफिसर्सना त्रिवार सलाम!

बकासुर's picture

29 Nov 2008 - 6:20 pm | बकासुर

करकरे,साळसकर आणि कामटे एकाच वेळी मारले गेले. साळसकर आणि कामटे क्वालिस मधे पुढे बसले होते. करकरे मधल्या सीटवर होते. दहशतवाद्यांनी लाल दिव्याची गाडी पाहून गोळीबार केला.संपूर्ण बातमी इथे पहा.