✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

टेबलटॉप - क्लोज-अप आणि मॅक्रोज

प
पॉइंट ब्लँक यांनी
Sun, 01/03/2021 - 15:16  ·  लेख
लेख
बर्‍याचवेळेस वस्तुंचे त्यांच्या नैसर्गिक वातवरणात फोटो काढण्यात अनेक अडचवी येतात - जोरात वाहनार्‍या वार्‍यामुळे होणारी वस्तुची अस्थिरता, अपुरा प्रकाश, बॅकग्राऊंड क्लटर , आणि आपल्याला हवा तसा फोटो काढाण्यास ती जागा पुरक नसनं. ह्या सगळ्या अडचनींवर मात करायला टेबलटॉप फोटोग्राफी कामाला येत. ह्याचा व्यावसायिक उपयोग सहसा प्रोडक्ट आणि फुड फोटोग्राफीसाठी होतो. पन आज आपण काही साधी उदाहरणे बघुत. नवीन वर्षातील ह्या धाग्याची सुरुवात आपण गणपतीबाप्पाला नमस्कार करुन करुयात. ही सुंदर गणेशमुर्ती दोन वर्षापूर्वी फेअरवेल गिफ्ट स्वरुपात माझ्याकडे आली. ही मुर्ती जवळपास तीन इंच उंचीची आहे. बॅकग्राउंड बोखे मिळण्यासाथी थर्माकॉलच्या एका स्लॅबला , एक गिफ्ट रॅप पेपर चोळामोळा करुन लावला आणि त्याची चंदेरी बाजू बॅकग्राउंड म्हणुन वापरली ( असा बोखे बनवायची संकल्पना युट्युब विडिओ मध्ये मिळाली, त्याचा शोध मी लावला नाही हे प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते.) ह्या फोटोसाठी तीन फ्लॅशलाईट वापरले, त्यातला एक मास्टर म्हणुन सॉफ्ट्बॉक्स मधुन मुख्य स्त्रोत म्हणुन मुर्तीच्या समोर डाव्या बाजुला ४५ अंशामध्ये. बाकीचे दोन स्लेव्ह मोड्मध्ये. एक मुर्तीच्या बरोबर मागे जांभळा जेल ( जांभळ्या रंगाची थोडी पारदर्शक पट्टी जी फ्लॅशहेडवर बसते, त्यामुळे फ्लॅशच्या प्रकाशाचा रंग बदलतो ) लावून त्यावार एक स्नूट चढवून ( स्नूट मुळे फॅशच्या उजेडाचा कोन नियंत्रित होतो, म्हणजे तो उजड जास्त मोठ्या भागात पसरत नाही) ठेवला. मुर्तीमुळे तो झाकला गेला आहे ओपाआप. तीसरा फ्लॅश निळ्या रंगाचा जेल लावुन उजवीकडे असलेल्या भिंतीवरून तो प्रकाश परिवर्तीत करेल अशा पद्धतीने ठेवला आहे. ह्या तीन फ्लॅशच्या पॉवर सेटींग हा एक खेळ खंडोबा आहे. तीन्हीचा योग्य समन्वय साधण्यासाठी बर्‍याच प्रयोग करावे लागतात. असो इतका सगळा उपद्व्याप करून शेवटी हवी तशी प्रकाश योजना मिळाली. अजुन थोडीशी भर म्हणुन गिंपमध्ये प्रोसेसिंग करताना पाउस निर्माण केला. DSC_2697_final पूढचा फोटो आहे बाळकृष्णाचा. ही मुर्ती सुद्धा गेल्यावर्षी भेट स्वरुपात मिळाली. ही साधारण चार इंच उंच आहे. तिला रूंद पाया नाही त्यामुळे आधाराशिवाय ती उभी रहात नाही. त्यामुळे मूर्तीला थोडा नैसर्गिक वाटेल असा आधार देण्यासाठी मागे एक जाडजुड पुस्तक ठेवले आणि ते लपवायला फुलांच्या कुंडीमध्ये ठेवायचे गोटे/दगड वापरले आहेत. सोबत रंगसंगती म्हणून मोरपिसाची भर घातली. सेट अप बर्‍यापैकी वरच्या फोटोसारखच आहे. पण इथे चार फ्लॅश वापरले आहेत. मुख्य स्त्रोत अजुनही सॉफ्ट बॉक्सच आहे. पण मुर्तीच्या चेहर्‍यावर उजव्या बाजुला खुपच गडद सावली पडत होती म्हणुन अजुन एक फ्लॅश बाजुच्या भिंतीवरुन परावर्तीत करुन फिल लाईट म्हणुन वापरला आहे. उजव्या बाजुला अजुन एक जांभळा जेल लावलेला फ्लॅश भिंतीवरुन परावर्तीत केला आहे. डाव्या बाजुला एक फ्लॅश निळ्या जेल सकट लाईट स्टँड वर माउंट केला आहे. त्याला सॉफ्ट बनवन्यासाठी स्टीम इनहेलरचा भांडं चढवलं आणि इतकं करुनही काम झालं नाही म्हणुन एक पांढरी कापडी पिशवी त्याभोवती गुंडाळली. गिंप मध्ये हिमवर्षाव सुद्धा केला. DSC_3250_3 आता तिसरा फोटो आहे तारा ह्या देवतेचा क्लोज अप. खर तर हा टेबलटॉप नाही पन टेबलटॉप मध्ये जास्त सोप्या पद्धतीने काढता आला असता. ह्याला टेबलटॉप मध्ये काढण्यासाठी रीफ्लेक्टरची काळी बाजु बॅकग्रोउंड म्हनुन वापराच्यी आणि उजव्या बाजुने एक फ्लॅश भिंतीवरुन परावर्तित करायचा. फ्लॅश आणि मुर्ती भिंतीच्या शक्य तितक्या जवळ ठेवायच्या आहेत त्यामुळे उजेड जास्त पसरनार नाही. Tara2 वापरायच्या जवळपास सगळ्या युक्त्या वरील तीन फोटोंमध्ये सांगितल्या आहेत त्यामुळे आता सेटअप बद्दल जास्त चर्चा न करता इतर फोटो पाहुत. कृष्णाचे फोटो काढताना घेतलेले काहि मोरपिसाचे क्लोज-अप DSC_3087_00001 मोरपिसावर थोडं पाणी शिंपडुन काढलेले फोटो. DSC_5801_merged DSC_5804_merged मुगाच्या फुलाचे क्लोज अप- बॅकग्राउंडला जांभळा आणि फिकट नारिंगी रंगाचे गिफ्ट रॅप DSC_5938 DSC_5931 DSC_5927.JPG DSC_5912 गोकर्णाच्या फुलाचे क्लोज अप DSC_7601 DSC_7534 DSC_7516 बडीशेपचं फुल DSC_5629_2 DSC_5583_2 कोथिंबिरिच फुल DSC_6247 मोहरींच फुल DSC_6146 आमची मॅक्रो लेन्स फोकस ब्रिद करत असल्यामुळे कसबसा जमलेला स्टॅकिंचा एकमेव प्रयोग DSC_4775_merged छोटी कर्दळी- फोटो काढताना स्प्रेअर ने निर्माण केलेला खोटा पाऊस. DSC_6773_01 DSC_6776_01 जाताजाता एक किडा ;) गेल्यावर्षी शास्त्रज्ञांनी अब्जावधी रुपये खर्च करुन ब्लॅक होल चा फोटो काढला होता. तो ब्लर झालेला फोटो काय माझ्यातल्या फोटोग्राफरला बघवला नाही. मग मी स्वत:च तसा उत्कृष्ठ फोटो बनवायचा ठरवल. मी काढलेला फोटो . आणि त्या फोटोला किती भक्क्म शास्त्रोक्त पाया आहे हे दाखवण्यासाठी त्याच सेट अप सुद्धा देत आहे ;) DSC_1525_1 DSC_1523
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4074 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

Deep Learning!

कंजूस
Sun, 01/03/2021 - 20:26 नवीन
सर्व प्रयोग आवडले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद __/\__

पॉइंट ब्लँक
Mon, 01/04/2021 - 18:11 नवीन
धन्यवाद __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

फोटोग्राफी तंत्रातील तपशील

सौंदाळा
Sun, 01/03/2021 - 22:42 नवीन
फोटोग्राफी तंत्रातील तपशील समजत नाहीत पण सर्व फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद __/\__ , एकदा तुम्ही

पॉइंट ब्लँक
Mon, 01/04/2021 - 18:12 नवीन
धन्यवाद __/\__ , एकदा तुम्ही कॅमेर उचलुन फोटो काढायला चालु करा, सगळं समजेल, इतका विशेष काहि नसतं त्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

मस्त

तुषार काळभोर
Mon, 01/04/2021 - 10:06 नवीन
पहिले तीन फोटो एकदम मस्त आहेत. तारा चा फोटो खूप आवडला. पूर्ण काळा बॅकग्राउंड असलेला क्लोजअप (अंधाराचा उपयोग करून), पोस्ट प्रोसेसिंग न करता काढणे विशेष कसब आहे. फुलांच्या क्लोजअप मध्य पहिली फुले आणि बॅकग्राउंड यात फारसा कॉण्ट्रास्ट नसल्याने परिणामकारक वाटत नाहीत. पण पुढील फुले मात्र एकदम आकर्षक अन लक्षवेधक आहेत. कृष्णविवराचा फोटो काढण्यासाठी अतिशय भक्कम तांत्रिक पाया वापरला आहे, आणि तोदेखील डीप लर्निंग ते लिनीयर अल्जेब्रा इतका लांब, रुंद आणि खोल!
  • Log in or register to post comments

पहिले तीन फोटो एकदम मस्त आहेत

पॉइंट ब्लँक
Mon, 01/04/2021 - 18:15 नवीन
पहिले तीन फोटो एकदम मस्त आहेत. तारा चा फोटो खूप आवडला. पूर्ण काळा बॅकग्राउंड असलेला क्लोजअप (अंधाराचा उपयोग करून), पोस्ट प्रोसेसिंग न करता काढणे विशेष कसब आहे.
धन्यवाद __/\__
फुलांच्या क्लोजअप मध्य पहिली फुले आणि बॅकग्राउंड यात फारसा कॉण्ट्रास्ट नसल्याने परिणामकारक वाटत नाहीत.
हे मत प्रामाणिकपने मांडल्या बद्दल खुप आभारी आहे. नक्की विचार करेन ह्यात कशी सुधारणा करता येइल ह्यावर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

फोटो दिसत नाहीयेत

उपयोजक
Mon, 01/04/2021 - 13:25 नवीन
गुग्गुल क्रोमात
  • Log in or register to post comments

अजब. गूगल क्रोम मधुनच अपलोड

पॉइंट ब्लँक
Mon, 01/04/2021 - 18:16 नवीन
अजब. गूगल क्रोम मधुनच अपलोड केलेत आणि लेख लिहिला आहे राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

काय सुरेख

MipaPremiYogesh
Mon, 01/04/2021 - 18:55 नवीन
वाह काय सुरेख आहेत सगळेच फोटो. एक्सिफ सांगू शकाल काय
  • Log in or register to post comments

धन्यवाद. फोटो फ्लिकर वर आहेत.

पॉइंट ब्लँक
Tue, 01/05/2021 - 08:34 नवीन
धन्यवाद. फोटो फ्लिकर वर आहेत. जर फोटोवर क्लिक केलं तर तुम्हि फ्लिकरवर जाल. तिथे एक्सिफ दिसतील तुम्हाला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: MipaPremiYogesh

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा